Thinking of school books and stories free download online pdf in Marathi

शाळेचा विचार

आपली शाळा मागे नाही?

मराठी माध्यमातील शाळा अलिकडे त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कारण आहे पटसंख्या. अलिकडे पटसंख्याच कमी होत आहे व शिक्षकांना देण्यात येणाऱ्या वेतनाचा खर्च शासनाला ओझं वाटत आहे. तसंच शासनानं अलिकडे नवीनच प्रकार आणला आहे. तो म्हणजे नवीन भरती करण्यात येणार. ज्यांना इंग्रजी अस्खलितपणे येणार.
सरकारनं कॉन्व्हेंटला प्राधान्य दिलं. त्यानंतर कॉन्व्हेंट शाळेत तशा सोयी करण्यात आल्या. त्या सोयी पाहिल्या तर अलिकडे विचार येतो की आपली शाळा मागे आहे आणि ती बरीच मागे आहे. त्याचं कारण काय? त्याचे कारण आहे आपल्या शाळेची गरीबी. आपल्या शाळेत ना बरोबर संगणक आहे ना आपल्या शाळेतील मुलांसाठी खेळण्याचं साधन. ना आपल्या शाळेतील प्रशासन व्यवस्था. ना आपल्या शाळेत अस्खलितपणे बोलणारा इंग्रजी शिक्षक. तो अस्खलित बोलणारा शिक्षक पाहिला तर असं वाटतं की आपली शाळा बरीच मागे आहे.
आपली शाळा मराठी माध्यमाची शाळा. त्या शाळेत मराठी शिकवली जाते आणि त्याचबरोबर माणूसकीही शिकवली जाते. आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे. मग आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वा शिक्षकांना इंग्रजी जर येत नसेल तर त्यात वावगं काय? मराठी तर अस्खलितपणे येते ना. मग या शाळा मागं कशा? परंतु सरकार त्यांना मागं व मागासलेले समजते. का बरं समजते ते कळत नाही.
मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे मागासलेल्या शाळा का? मराठी माध्यमातील शाळा या झोलबा पाटलाच्या शाळा काय? तर याचा अर्थ नाही असा होतो. कारण आज जे कोणी अधिकार पदावर बसलेले आहेत, ते कुठं शिकले याची शहानिशा केल्यास ते जिल्हा परीषद व मराठी माध्यमाच्याच शाळेत शिकल्या. जर मराठी शाळा मागासलेल्या होत्या तर ही अधिकारी मंडळी अधिकारी तरी बनली असती का? यावर आज विचार करण्याची गरज आहे. यावरुन मराठी शाळा काल मागं नव्हत्या. मग आजच त्या मागं कशा राहिल्या? तसंच इंग्रजी ज्या शाळेतील शिक्षकांना अस्खलीत येतं. त्या शाळा समोर कशा गेल्या? त्याचं कारण आहे इंग्रजीचा अट्टाहास. आपल्याला इंग्रजीचा गर्व आहे. आज इंग्रजी आपली प्रमाण भाषा नाही. ती विदेशी भाषा आहे. तरीही जसा आपण आपल्या घरी पाहुण्यांचा आदर करतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या जिनसा बनवून चारतो. परंतु आपल्या मुलांना तसं खाऊ घालत नाही. तसंच आपण इंग्रजीचं केलं आहे.
वरील बाबतीत महत्वपुर्ण गोष्ट ही की इंग्रजी ही आपली भाषा नाही. ना राष्ट्रीय भाषा आहे ना राजभाषा आहे. मग आपल्याला इंग्रजी महत्वाची भाषा का वाटावी? राज्य भाषा जर मराठी आहे तर आपल्या मराठी शाळा ह्या मागासल्या शाळा म्हणून का गणल्या जाव्या? हं, हिंदीचं ठीक आहे. ती सर्वांना समजते. कारण ती राष्ट्रीय भाषा आहे. परंतु इंग्रजी. इंग्रजी ही विदेशी भाषा. परंतु जसं आपल्या घरी आपल्या घरच्या पाहुण्यांना महत्व देतो. तेच आपण भाषेसाठी करतो. इंग्रजीला महत्व देतो. त्याच भाषेतून ती आपली भाषा नसतांनाही व ती सर्वसामान्य लोकांना समजत नसतांनाही. साहजीकच त्यामुळंच आपल्या देशातील भाषेतील शाळा मागासलेल्या ठरत आहेत नव्हे तर ठरल्या आहेत. आता त्या शाळा अशा कोणी ठरवल्या व आपल्या मराठी शाळा मागे आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे.
मुळात सांगायचं झाल्यास इंग्रजी ही आपली पाहणी भाषा. या भाषेत शिकणारी मुलं आपल्या मायदेशात सोडून विदेशात नोकरी करायला जातात. त्याचं कारण म्हणजे पाहुणा हा पाहुण्यासारखा काही दिवस राहतो व तो जातोच. तसंच घडत असतं इंग्रजी शिकून. ते मायबापालाही विसरुन जातात. ते मायबाप मरण पावतात तरी मरणालाही येत नाहीत. यासाठीच इंग्रजीला महत्व द्यावं का? यासाठीच आपल्या शाळेला मागासलेले समजायचे का? प्रश्न आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास इंग्रजी आपली भाषा नाही. मग ती जरी लोकांना अस्खलीतपणे येत असेल तरी. मग ती भाषा ज्या शाळेतील शिक्षकांना येत असेल तरी आणि ती ज्याला येते. त्या शाळेला चांगली व मराठी माध्यमातील शाळेला मागासलेली शाळा मानण्याचं कारण नाही. कारण मराठी शाळेनं आजही प्रत राखलेली आहे. आपली प्रत सोडलेली नाही. इंग्रजीपण व आपला थाटबाज दाखवला नाही. माणूसपण जपलेलं आहे व आजही आपलं व्रत पद्धतशीर करीत आहे व इमानदारीनं करीत आहे आणि आजच्या कलिकाळात जो इमानीइतबारे कार्य करतो. तोच मागं राहतो, त्याच वृत्तीप्रमाणे मराठी शाळा मागं आहेत. कारण आजचा सर्वच प्रकारचा व्यवहार हा इंग्रजीतून होतो व मराठीतून नाही. परंतु मराठी शाळेची महत्ती व वास्तविकता अशी आहे की मराठी शाळा मागे नाही व मागासलेल्याही नाहीत. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED