The story is bomb books and stories free download online pdf in Marathi

कथा बोंबाबोंब

साक्षरतेची बोंबाबोंब; काम महत्वाचे

भाऊराव एक ग्रामीण भागातून शहरात आलेला व्यक्ती. त्याचं संपूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागात झालं होतं. त्याला शिक्षणाबाबत तळमळ होती. कदाचित तो ग्रामीण भागात राहात असल्यानं त्याला चांगलं शिक्षण मिळालं नव्हतं नव्हे तर पुरेशा सोयी नसल्यानं त्याला उच्च शिक्षणही घेता आलं नव्हतं. त्यातच आज त्याला वाटत होतं की ग्रामीण भागातील मुलं शिकायला हवी.
भाऊराव जेव्हा लहान होता. तेव्हा त्याचे शिक्षकही त्याला शिकवीत नव्हतेच. ते शिक्षक रोजच काहीतरी लिहितांना दिसत असायचे. मुलांचा वेळ मग गोष्टी करण्यात जात असे किंवा दंगामस्ती करण्यात जात असे. परंतू भाऊरावच्या मनात शिकायची इच्छा असल्यानं तो कसाबसा शिकला व शहरातील एका मोडक्या तोडक्या शाळेत तो शिक्षक म्हणून रुजूही झाला.
आजचा काळ हा तरुणाईचा काळ आहे. आता लोकांना लवकर निकाल हवा असतो. त्यांना कसे म्हणून थांबायला वेळ नाही. दिवसभर मोबाईलवर राहणे, टिव्ही पाहणे ही कामं आता तरुणाई करु लागली आहे.
ज्याप्रमाणे तरुणाईला झटपट निकालाची गरज असते. त्याप्रमाणे शासनालाही झटपट निकालाची घाई असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्यांना त्या घाईतून काय निष्पन्न होवू शकेल यांचं काही एक सोयरसुतक नसतं.
भाऊराव असाच एक गृहस्थ. आपलं साधं जीवन जगत होता. योगायोग असा जुळून आला की तो सरकारी नोकरीवर लागला. त्यातच तो खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागला. काही दिवसानं तो मुख्याध्यापकही बनला.
भाऊराव शाळेत काम करीत असतांना त्याला मुख्याध्यापक काम सांगायचे. तेव्हा त्याला विचार यायचा की मुख्याध्यापकाची ही कामं, पण मुख्याध्यापक आपल्या अंगची कामं टाळून ती आम्हाला सांगतात. त्याला त्या जीवनाचा कंटाळा यायचा. वाटायचं की शिक्षकाला निव्वळ शिकवायचं काम असावं. अशा फालतूच्या गोष्टी नकोत. परंतू असे होत नव्हते. शासन रोजची कामं आणत होते. ती कामं मुख्याध्यापक आपल्या सहका-यांची मदत घेवून पुर्ण करीत असे. तसं पाहता मुख्याध्यापकालाही पुरेसा वेळ मिळत नसे.
आज सरकार साक्षरता म्हणत होतं. शंभर प्रतिशत विद्यार्थीसंख्या साक्षर व्हायला हवी असं सरकारलाही वाटत होतं. पण भाऊरावच्या मनात प्रश्न होता तो म्हणजे लोकं शंभर टक्के साक्षर कशी होणार? कारण त्याच्याजवळ सरकारी कामं करतांना शिकवायला पुरेसा वेळच मिळत नव्हता. तो नेहमी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड भरण्यात व्यस्त असायचा.
आज सरकारच्या दररोजच्या सरकारी रेकॉर्ड खातर भाऊरावलाच नाही तर संपूर्ण देशातीलच शिक्षकांना शिकवायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. सरकार म्हणत होते की शंभर प्रतिशत विद्यार्थी साक्षर करा. पण ते साक्षर कसे करणार. प्रश्न होता. पूर्णतः साक्षरतेची बोंब होती. परंतू सरकारच्या दृष्टीकोणातून कामासाठी कागदपत्राची पुर्तता करणे गरजेचे होते.
भाऊरावला सरकारबाबत खरी गोष्ट लक्षात आली होती. ती म्हणजे पुर्तता. सरकारला खरी साक्षरता हवी नव्हती तर कागदपत्रावरील साक्षरता हवी होती. त्यासाठीच ते दररोजच कागदपत्रावर विद्यार्थ्यांचे गोषवारे मागत होते. जे गोषवारे तयार करतांना शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना पुरेसा वेळ मिळत नव्हता नव्हे तर खरे शिक्षण मुल्यहिन ठरलं होतं.
आज त्याला त्याचं बालपण आठवत होतं. आपल्यालाही आपले शिक्षक शिकवीत नसून ते असं काहीतरी दिवसभर लिहित असल्याचं आठवत होतं. ते लिहिणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सरकारी रेकॉर्ड व गोषवारेच होते हेही त्याला आज पटत होतं.यातूनच आपलं नुकसान झालं ही खंत आज त्याच्या मनात होती. ज्या खंतेतून त्याच्या मनात उणीव निर्माण झाली होती. ती उणीव आज कधीच भरुन निघणारी नव्हती. कारण ख-या साक्षरतेची खिल्ली उडाली होती नव्हे तर सरकारी कामाच्या व्यस्ततेनं बोंबाबोंब झाली होती.
साक्षरता अशीच होती पिजलेली की त्या साक्षरतेनं बोंबाबोंब होणं गैर गोष्ट नव्हती. साक्षरता होती. परंतु ती नसल्यासारखीच वाटत होती. म्हणूनच साक्षरतेची बोंबाबोंब झाली होती.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय