Then no one will commit suicide books and stories free download online pdf in Marathi

मग कोणीही आत्महत्या करणार नाही

मग कोणीही आत्महत्या करणार नाहीत?

पाऊस.......पाऊस कधी येतो, कधी नाही. कधी जास्त येतो. कधी काहीच येत नाही. म्हणतात की पाऊस हा झाडांवर अवलंबून असतो.
खरंच पाऊस हा झाडांवर अवलंबून तरी असतो का? तर याचं उत्तर होय असंही देता येईल. नाही असंही देता येणार नाही. होय असं द्यायचं झाल्यास सुर्याच्या उष्णतेपासून जी पाण्याची वाफ होते. ती पाण्याची वाफ वर आकाशात जाते. ती एवढी वर जाते की ती वर जावून थंड होते. ती थंड झालेली वाफ........त्या वाफेतून बाष्पाचे पुंजके तयार होतात. ते बाष्पयुक्त पुंजके वाहायला लागतात व जिथं डोंगरं असतात व जिथं झाडं असतात. तिथं ते अडतात व त्या ठिकाणी पाऊस पडतो. हे बाष्पयुक्त पुंजके तिथंच थंड होतात असं नाही. तर ते त्या डोंगराच्या पुढेही वाहात असतात. ते पुढंही पावसाच्या रुपानं पडतात. म्हणूनच जिथं डोंगरं वा पर्वत असतात. त्या परिसरात पाऊस अतिप्रचंड पडतो. महत्वपुर्ण गोष्ट ही की पाऊस पडण्यात डोंगराचा संबंध येतो. झाडांचा नाही. मग झाडांचा पावसाशी संबंध का जोडण्यात येतो? त्याचा तर पावसाशी संबंध नाही. बरोबर आहे. झाडाचा पावसाशी दुरदुरचा संबंध दिसत नाही. मग असे असतांना जिथं डोंगर वा पर्वत नसतं, तिथं पाऊस कसा काय पडत असेल? असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही. याबाबत माझं तुटकंफुटकं मत व्यक्त करतो. कदाचीत ते बरोबरही असू शकते.
आपण पाहिलं आहे की काही ठिकाणी पर्वत वा डोंगर नसतं, तरीही तिथं पाऊस पडतो. त्याचं कारण म्हणजे वातावरणातील हवेचा दाब. तो वाढला वा कमीजास्त झाला की विजा कडाडतात. गडगडाट ऐकायला येतात. ही वीज झाडांवरच जास्त पडते. त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण असतं झाडांचं श्वास घेणं. झाडं श्वास घेतांना कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सीजन वातावरणात सोडतात. परंतु कधीकधी हीच झाडं हवेतील ऑक्सीजन शोषून घेतात व कार्बनडाय ऑक्साईड हवेत सोडतात. त्यातच ही झाडं जेव्हा ऑक्सीजन हवेत प्रवाहीत करतात. तेव्हा या ऑक्सीजनचा हवेतील अतिप्रमाणातील हेलिअमशी संपर्क येवून तो जळतो व फट् असा आवाज येवून वीज निर्माण होत असते. यातूनच पाण्याची निर्मीती होते. जर अति प्रमाणात झाडं असली तर अति प्रमाणात ऑक्सीजन प्रवाहीत होवू शकतो व याच अति प्रमाणातील ऑक्सीजनचा हेलीअमशी संयोग होवू शकतो व अति प्रमाणात पाण्याची निर्मीती होवू शकते. म्हणूनच अति प्रमाणात झाडं असायला हवीत.
पाऊस झाडांपासून येतो. याचं सोपं उदाहरण देतो. वातावरणातील हेलीअम अर्थात हायड्रोजन. हा जेव्हा झाडापासून प्रवाहीत होणाऱ्या ऑक्सीजनशी संयोग पावतो. तेव्हा फट् असा आवाज येतो. हा गडगडाट होय व तो ऑक्सीजनसोबत संयोग पावतांना लख्खं प्रकाश निर्माण होतो. हीच वीज होय आणि तो संयोग पावल्यावर पाणी तयार होतं. हाच पाऊस होय.
महत्वाचं सांगायचं झाल्यास झाडांना आपण आपले मित्र मानतो. का मानतो? कारण झाडं आपल्याला वरील प्रकारे पाऊस देतात. फळ, फुल देतात. सावलीही देतात. इमारती लाकूड देतात, अन्नधान्य देतात व इतर बरंच काही देतात. ज्याचा विचारही आपण करु शकत नाही. ते पाऊसही देतात. परंतु आपण त्यांना तोडतो. जंगलं नष्ट करतो. कारण आपल्याला राहायला जागा नसते. आपल्याला आपलं पोट भरायला शेत नसते. म्हणूनच आपण जंगलही तोडून साफ करतो. परंतु त्याचा परिणाम होतो आपल्या पावसावर होतो. पाऊस पडत नसल्यानं सुका दुष्काळ निर्माण होतो. पाऊस पडत नसल्यानं पीक होत नाही. सतत मोडी होतात. पाऊस पडत नसल्यानं अख्खं पीक करपतं. घरात खायला दाणाही नसतो. उपाशी पोटी राहावं लागतं. हं, जबाबदारी ज्याच्यावर असते, तो राहतोही एकवेळ उपाशी. परंतु त्यावर अवलंबून असणारे घटक म्हणजे त्याची मुलं बाळं जेव्हा उपाशी असतात. तेव्हा विचार येतो. तो विचार एवढा भयंकर असतो की त्याची परियंतीच गावता येत नाही. कर्जावर कर्ज वाढतं. सावकार वा बँका त्रास देतात. मग कर्जाचा डोंगर एवढा वाढतो की अचानक विचार आल्यानं ती जबाबदारीची पावलं कोणताही वेळेवर निर्णय घेवू शकत नाहीत. ती पावलं अचानक त्या झाडाकडं वळतात. जे आपल्या शेतात डौलानं उभं असतं. ते काटेरी आपल्या काही कामाचं नाही, म्हणूनच आपण त्याला तोडलेले नसते. ज्याला बाभळीचं झाड म्हणतात. बाकी हिरवीगार सर्व झाडं आपणच तोडलेली असतात. ती चोपडी असतात म्हणून. यात जे वाचलं असतं. ज्याचं काही काम नसतं. जे पाऊस पाडत नाही. तेच झाड आपण निवडतो. अचानक जबाबदारीची आपली पावलं त्याच झाडाकडं वळतात. त्या झाडावर दोराचं एक टोक टाकतात आणि दुसरं टोक आपल्या गळ्यात. मग तो दोर आवरला जातो. त्यानंतर काय घडतं ते सर्वांनाच माहीत आहे.
विशेष सांगायचं म्हणजे झाडं आपली मित्र आहेत असे आपण बरेचदा म्हणतो. परंतु आपण त्यांच्याकडे मित्रत्वाच्या भावनेनं पाहतो का? याचं उत्तर नाही असंच आहे. आपणच त्यांच्याशी विश्वासघात करतो हे सत्य आहे. आज चांद्रयान पाठवून चंद्रावर मानव जाणार व वस्ती करणार असा संकेत चांद्रयानानं दिलेला आहे. कारण आज पृथ्वीवर निर्वासीताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण पृथ्वीवरचं पाणी संपत आलं आहे. म्हणूनच चंद्रावर पाणी शोधण्यासाठी आपण चांद्रयान पाठवलं आहे. भविष्यात आपली योजना आहे की पृथ्वीतलावरील पाणी पुर्णतः संपल्यास आपण चंद्रावर वस्ती करण्यासाठी जावू. परंतु ते पाणी संपण्यापुर्वी आपण त्यावर उपाययोजना केली तर.......तर कदाचीत पृथ्वीतलावरील पाणीच संपणार नाही व आपले चंद्रावर जाण्याचे स्वप्न ते स्वप्नच राहील.
महत्वाचं म्हणजे ते स्वप्न, स्वप्नच राहायला हवं. पृथ्वीवरील पाणी संपूच नये. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जेवढी झाडं आपण तोडतो आपल्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी. त्याच्या द्वितीय प्रमाणात आपण झाडं लावली पाहिजेत. प्रत्येक गावात वा शहरात विपूल प्रमाणात झाडं दिसायला हवीत. ज्याच्यातून प्रवाहीत होणा-या ऑक्सीजनचा वातावरणातील हायड्रोजनशी संयोग होवून पावसाची निर्मीती होईल. हे जेव्हा आपण करु. तेव्हाच पाऊस पडेल. अन्नधान्य पिकेल. आपल्याला भरघोस प्रमाणात अन्नधान्य मिळेल व कोणीही उपासमार झेलणार नाही आणि मग अचानक जबाबदारीची वा इतर कोणतीच पावलं बाभळीच्या झाडाकडं वळणार नाही व कोणीच त्या झाडाला दोर बांधून आत्महत्याही करणार नाही हे तेवढंच खरं आहे यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED