Divorce is a concern books and stories free download online pdf in Marathi

घटस्फोट चिंतेची बाब

*घटस्फोटाची प्रकरणं; एक चिंतेची बाब*

*लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा विवाह न करणाऱ्या लोकांसाठी असावा. विवाहानंतरच्या लोकांसाठी नको. तसा कायद्यात बदल व्हावा. अलिकडील वास्तविक परिस्थिती पाहता न्यायालयात घटस्फोटाची दाखल होणारी प्रकरणं जास्त आहेत व ती वाढतच आहेत. ही वाढत आहेत लिव्ह इन रिलेशनशीपच्या सरकारच्या कायद्यामुळे. तसं पाहता न्यायालयानंही इतर देशाप्रमाणे याही देशात लोकांना लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्याची मुभा दिलेली आहे. तसं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये देशात कोणत्याही वयातील स्री व पुरुषांना राहता येतं. त्यातच अशा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये लोकं आपले आपले विवाहाचे पती वा पत्नीच सोडून नाही तर चांगला रमलेला संसार सोडून राहतात. परंतु यानं संसार उध्वस्त होतो. विवाहाला फाटा फुटतो व संस्काराचा मृत्यू होतो. तसं पाहता बऱ्याच समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे न्यायालयानं अशा कायद्याला मंजुरी द्यावी की विवाहाला फाटा फुटणार नाही. विवाह संस्कार तुटणार नाही. संस्काराचा मृत्यू होणार नाही. कारण विवाह ही अशी गोष्ट वा बंधन आहे की त्याचे धागे मजबूत नसतात. विवाह हा काचेसारखाच असतो. जी काच जशी क्षणीक धक्क्यानं तुटते. तसाच विवाहही तुटतो. याला जबाबदार जरी इतर गोष्टी असल्या तरी एक महत्वाचं कारण आहे लिव्ह इन रिलेशनशीप. म्हणूनच याचे गंभीर परिणाम लक्षात घेता सरकारनं देशातील सर्वांसाठी एकच कायदा बनवावा. देशातील अविवाहित तरुणांसाठी लिव्ह इन रिलेशनशीप असावं. विवाहीत लोकांसाठी नाही. जेणेकरुन विवाह झाल्यानंतरही आज जे लोकं लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत पती पत्नीसोबत न राहता दुसऱ्याच परकीय माणसांसोबत मजेनं राहतात. प्रसंगी असे राहून आपल्याच जोडीदारांकडून खावटीही वसूल करतात. ही चिंतेची व गंभीर बाब आहे. असे राहतात, तेही घटस्फोट न घेता. त्यातूनच खुन, बलत्कार, अपहरण, बदला यासारखी गुन्हेगारी घडत असते. हे जर बंद करायचे असेल तर लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा विवाहपुर्व लोकांसाठी असावा. विवाहानंतरच्या लोकांसाठी नकोच.*
लिव्ह इन रिलेशनशीप हे पती पत्नीच्या भांडणाचं तेही कारण महत्वाचं आहे. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण अलिकडील काळात पती पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असतात. ती भांडणं एवढी मोठी होतात की त्यातून कधीकधी खुनही होत असतात. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सध्याचा काळ हा सुशिक्षीत लोकांचा काळ आहे. मुलंच नाही तर मुलीही आज शिकायला लागल्या आहेत. परंतु तसं पाहिल्यास लोकं जरा जास्तच सुशिक्षीत झालेत. त्यामानानं मेंदू तेवढा सुशिक्षीत झाला नाही. तशीच शिक्षणाची टक्केवारी पाहिली तर मुली जास्त प्रमाणात शिकतांना दिसत आहेत. त्यामानानं मुलं कमी. त्यातच मुली ह्या उच्चतम टक्केवारी मिळवतात तर मुलं ह्या कमी. हा झाला शिक्षणाचा विषय. पुढं कामाचीही गती पाहिली असता मुली ह्या जास्त काम करतांना आढळतात. काही मेहनतीचीही कामं करतांना दिसतात. जसे बाहेर काम करुन आल्यावर घरातील स्वयंपाकाचीही कामं मुली करीत असतात. परंतु मुलं फक्त बाहेरची कामं करतात. घरची कामं करीत नाही. याचाच अर्थ स्वयंपाकाची कामं करीत नाहीत. तसा दर्जाच्या बाबींचा विचार केल्यास पुरुषांच्या बरोबरीने स्रियाही अंतराळात गेलेल्या आहेत. परंतु हे जरी खरे असलं तरी जास्त ताकदीची कामं स्रिया करीत नाहीत. मात्र ती आपल्या मेंदूच्या ताकदीनं मोठमोठी कामंही पार पाडत असतात.
ताकदीची कामं.......होय. महिला ताकदीची कामं करीत असतात. परंतु ती कामं करीत असतांना त्या कुणाची तरी मदत घेत असतात. अशातच समजा त्यांना पतीनं पाहिलं तर त्या पतीच्या मनात शंका निर्माण होत असतात.
पुर्वीही तसंच असायचं. त्यामुळं पुर्वी स्रियांना कोणताही पती कामाला जावू देत नसे. यातूनच ना स्रियांचे कामाला जाणे, ना तिला ताकदीची कामं करावी लागणे, ना तिनं कोणी पुरुष मदतनीस पकडणे, ना तिचं वागणं पाहून कोणत्याही पतीच्या मनात शंका निर्माण होणे. या गोष्टी घडत असतात.
अलिकडील काळात तर लोकांच्या वागण्याचं चित्रच बदललं आहे. कालपर्यंत जी स्री कमऱ्याच्या चार भिंतीत बंदीस्त होती. ती आता बाहेर निघाली आहे. तिला पती असतांना ती परपुरुषांसोबत फिरु लागली आहे. त्यातच ती व्याभीचारही करु लागली आहे परपुरुषांसोबत. हे वास्तववादी चित्रण आज सर्वत्र दिसायला लागलं आहे. यात पुरुषही काही मागं नाहीत. पुरुषही आपली एक पत्नी असतांना परस्रीसोबत फिरु लागला आहे. त्यातच तो व्याभीचारही करु लागला आहे. अन् हे जेव्हा जोडीदाराला दिसतं. तेव्हा भांडणं होतात व तद्नंतर लिव्ह इन रिलेशनशीपचा वापर होतो. परंतु त्यामुळं चांगल्या संसारात वितुष्ट येतं. आज अशाच स्वरुपाचं स्री आणि पुरुष असलेल्या पती पत्नीचं वागणं एकमेकांना दिसत असल्यानं घटस्फोटाचं एक कारण म्हणून तेच कारण पुढं येत आहे.
वरील परिणाम पाहता याच प्रकारातून खुनही आज होत चाललेले आहेत. याबाबतीत एक प्रसंग असा घडला होता की त्या प्रसंगात एका पत्नीनं आपल्या प्रियकराला रात्री एक वाजता आपल्या पतीला गाढ झोपेत असतांना बोलावले व आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कारण तिला तो प्रियकर आवडत होता व ती त्याचेसोबतच राहणार होती. परंतु कधीकधी तिला मुलं असल्यानं मजबुरीनं पतीकडं येत होती व पतीही तिला राहू देत होता.
यात महत्वपुर्ण गोष्ट ही की कधी अशा परलोकांच्या विवाहबाह्य संबंधात पडून कधी पत्नी आपल्या पतीची हत्या करते तर कधी पती आपल्या पत्नीचीही हत्या करतो. तसंच आज असे विवाहबाह्य संबंध वाढत चाललेले आहेत. याचं कारण आहे आजचं पाश्चात्यीकरण. आज लोकं पाश्चात्य लोकांचं अनुकरण करुन विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत. ते विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात. कारण तेथील वातावरण विवाहबाह्य संबंध ठेवण्यास लाभदायक आहे. तसं येथील वातावरण नाही. ती आपली संस्कृतीही नाही. ही आपली भारतीय संस्कृती आहे व आपली भारतीय संस्कृती एक महान संस्कृती आहे. परंतु आपल्या अशाच प्रकारच्या विवाहबाह्य संबंधानं आपल्या देशात पतीपत्नींमध्ये शंका कुशंका शिरतात. ज्या शंका कुशंका मानवी मनाला घातक असतात व त्यातूनच पुढे वेगवेगळ्या समस्या वाढीस लागतात. कुठे घातपातही होतो.
अलिकडे याच विवाहबाह्य संबंधातून न्यायालयात घटस्फोटाचे खटले दाखल होत आहेत. त्यांचे प्रमाण जास्तच आहे. तसं पाहता ही देशाची एक गंभीर समस्या बनलेली आहे. यात निर्दोष असलेले पती वा पत्नी पिसले जातात. तसं पाहता यात वयाचं बंधन नसतं. नेमक्या वयात विवाहबाह्य संबंध निर्माण होतील असं काहीच नसतं. त्यातच वय वर्ष चौदा पुर्ण झाले की आजच्या काळात विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. जरी त्यांचं वय झालं नसलं तरी. तसेच कोणाचे विवाहबाह्य संबंध हे विवाहानंतर निर्माण होतात. यातच सरकारनं एक कायदा आणला आहे लिव्ह इन रिलेशनशीप. व्यक्ती विवाह न करता आपल्या विवाहाच्या व्यक्तीला सोडून कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही अन् केव्हाही दिर्घकाळ सहवास करु शकतो. राहू शकतो. याचाच अर्थ असा की विवाहानंतरही व्यक्तीचं त्याच्या जोडीदाराबरोबर पटत नसल्यास तो त्या जोडीदाराला सोडून आपल्या प्रियकरासोबत दिर्घकाळ राहू शकतो. यातूनच चांगल्या नात्यात विच्छेद निर्माण होतो व घटस्फोटाचे खटले दाखल होतात.
एकीकडे न्यायालयातील लिव्ह इन रिलेशनशीपच्या कायद्यानुसार लोकं घटस्फोटाचे खटले न्यायालयात दाखल करुन लढत असतात व निर्दोष असलेल्या पती वा पत्नीला सतावत असतात तर दुसरीकडे लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत न्यायालयातून सुरक्षा असल्यानं व खुद्द न्यायालयानंच अभय दिलं असल्यानं प्रियकरांसोबत राहात असतात. हे आजचं वास्तविक वर्तमान आहे. यात महत्वपुर्ण गोष्ट ही की अशा विवाहबाह्य संबंधातून व लिव्ह इन रिलेशनशीप मधून आज विवाहाचं स्वरुप पालटलं आहे. संस्कृती मोडीत निघाली आहे. याचा परिणाम हा सर्वच गोष्टीवर झालेला आहे. जसा विवाह उशिरा होणे. याच विवाह उशिरा होण्यातून संतती न होणे, वांझपण येणे, कधीकधी विवाह होण्यापुर्वी असे संबंध असल्यास गर्भ राहू नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्याही घेतल्या जातात. त्यातूनच पुढं त्याचा परिणाम होवून वांझपण येतं.
महत्वपुर्ण गोष्ट ही की असे विवाहबाह्य संबंध व त्यातून निर्माण झालेल्या समस्या फार मोठ्या आहेत. त्या समस्या अलिकडील काळात वाढतच चालल्या आहेत. त्याचं कारण आहे आज न्यायालयानं लोकांना दिलेले अभय. यात महत्वाचा विचार असा की आज न्यायालयातील घटस्फोटाची वाढती प्रकरणं पाहता न्यायालयानं लिव्ह इन रिलेशनशीप प्रकरणावर विचार करावा. कायद्यातही तसाच बदल करावा. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याची अशा लोकांना परवानगी द्यावी की जे विवाहीत नाहीत वा ज्यांचा कुठंही विवाह झालेला नाही. असं जर न्यायालयानं केलं वा तसा बदल जर कायद्यात झालाच तर कदाचीत न्यायालयातील घटस्फोटाची जी प्रकरणं दाखल होत आहेत वा वाढत आहेत. त्याला खंड पडू शकतो वा पाडता येवू शकतो.
विशेष सांगायचं म्हणजे न्यायालयातील घटस्फोटाची प्रकरणं कमी व्हायला हवीत. कारण विवाह हा एक संस्कार आहे भारतीयांसाठी. ही बाब न्यायालयानंही लक्षात घ्यायला हवी व तसा बदल कायद्यात करायला हवा. जेणेकरुन विवाहानंतर लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत राहणाऱ्या लोकांवर जरब बसेल व तेव्हाच घटस्फोटाची प्रकरणं आपोआपच कमी होतील किंवा कमी तरी करता येतील यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED