भाग्य दिले तू मला - भाग ५ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ५

वेडावले मन माझे
क्षणभर तुला पाहण्या
होतोय भावनांचा गुंता
बोल ना वेड्या मना !

गुंतण्यात तुझ्या मी
माझे भाग्यच जाणिले
वाट पाहता तू मिळे ना
मी अधीर अशी जाहले
का मजवरी तरी माझे
भान उरले आज नाही
होतोय भावनांचा गुंता
बोल ना वेड्या मना !

मी निशाचर रागिणी
स्वप्न - स्वप्नांत रमनारी
पिऊन प्रेमजल पिरमाचे
बेधुंद वाऱ्याशी बोलणारी
कैद केलेस कधीच तू मला
सोड ना हा अबोला
होतोय भावनांचा गुंता
बोल ना वेड्या मना !

नयनी तुझ्या काल
मी पाहिले तुला स्पष्ट
हरविले तुझ्यात मी अन
जगले क्षणभर तुझे स्वप्न
तू लाजेचा प्याला हा
आता तरी सोड ना
होतोय भावनांचा गुंता
बोल ना वेड्या मना !

वेडावले मन माझे
क्षणभर तुला पाहण्या
होतोय भावनांचा गुंता
बोल ना वेड्या मना !

स्वरा मोबाइल मध्ये कविता वाचतच बसली होती की पूजाही तिच्या बाजूला येऊन बसली. स्वरा कवितेत किंबहुना स्वयमच्या विचारात इतकी हरवली होती की पूजा बाजूला येऊन बसली आहे हे सुद्धा लक्षात आलं नाही. पूजानेही काही क्षण तिला बघताना डिस्टर्ब केलं नाही. तिने कविता वाचलीच होती की ती स्वराच्या कानात हळूच म्हणाली, " स्वयमला मिस करते आहेस? "

पूजाच्या आवाजाने ती भानावर आली. ती पूजा पासून काहीच लपवत नव्हती म्हणून तिने स्माईल करतच उत्तर दिले. आता स्वराला समोर काही बोलायची गरजच नव्हती. सकाळी - सकाळीच त्याच्या विचाराने तिचे गाल लाल झालं होतें. पूजा काही क्षण तिला बघतच म्हणाली, " बर झालं देवाने मला प्रेमात पाडल नाही. किती मूर्खासारखे वागतात ना प्रेमात पडणारे. अगदी कालच त्याच्याशी भेटलीस तरीही त्याची आठवण येते म्हणे. वेडे असतात बाबा हे लोक ! "

पूजा हसतच बोलून गेली तर स्वरा नम्रपणे उत्तर देत म्हणाली, " ज्यादिवशी होईल ना प्रेम तेव्हा कळेल तुला. मग मीही अशीच म्हणेल. पण प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर नक्की म्हणेन प्रेमातला प्रत्येक अनुभव सुखद असतो मग वाट पाहणे असो की त्याची सतत आठवण करणे. मी तर लकी आहे की माझ्या नशिबी त्याच्यासारखा व्यक्ती आला आहे. "

पूजा समोर काही बोलणारच तेवढ्यात कियारा, शोभनाच्या आवाजाने पूजा, स्वराच लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांची नुसती धांदल सुरू होती. त्यांची मस्ती बघूनही काही वेळ पूजा शांत होती. पूजा म्हणजे सतत बडबड करत राहणारी तेव्हा ती जास्त वेळ शांत बसने म्हणजे चमत्कारच..!! काही क्षण तिने त्यांची मस्ती बघितली आणि मोठ्यानेच ओरडत म्हणाली, " कियारा ये क्या चल रहा है . तुम दोनो इतने सारे ड्रेस क्यू ट्राय कर रहे हो. किसीं की शादी मे तो नही जाना है न? वो भी अकेले अकेले! बहुत बुरे हो यार तुम लोग हमे भूल गये ना! "

पूजा जशी बोलून गेली तशीच कियारा आनंदातच उत्तरली, " अच्छा हुआ तुमने पुछ लिया मै तो भूलही गयी थी. स्वयमने आज हमे सब को लंच पे इनवाइट किया है. सो चलो जलदी से तैयार हो जाओ. हमे जलदीही निकलना है. हरी अप गर्ल्स.!!"

स्वयमच्या घरी लंच म्हटल्यावर स्वरा खाडकन उठून कपडे शोधू लागली. जसा त्या आतापर्यंत त्याच्या घरी काय घालून जाऊ म्हणून विचार करत होत्या अगदी तसच तीही विचार करू लागली. ती आपल्या कामात व्यस्तच होती की पूजाने कियाराला विचारलं, " किस खुशी मे? शादी तो नही है ना उसकी आज? "

कियारा कपडे निवडताना अचानक थांबली. काही क्षण तिने पॉज घेतला आणि दुःखी स्वरातच म्हणाली, " क्या बताऊ पूजा तुम्हे ! बताने को तो दिलं नही कर रहा है फिर भी बताना तो पडेगा ही. तो सुनो, शादी नही पर आज उसकी एंगेजमेंट हैं इसलीये तो उसने सिधे स्वरा को नही बताया. बिचारी सेह नही पाती ना! और देखो अब उसीको उसके घर मे खाना खाणे ले जाना पड रहा है. घोर कलियुग है पर हम कर भी क्या सकते है?"

कियारा एवढ्या शांतपणे बोलून गेली की काही क्षण रूममध्ये पिनड्रॉप सायलन्स झाला. स्वराचे कपडे स्वराच्या हातातच राहिले. ही बातमी ऐकून ती कुठेतरी हरवली तर तिघीही तिच्याकडे शांतपणे बघू लागल्या. काही क्षण एकदम शांततेत गेले आणि कियारा मोठ्याने हसू लागली. त्या पाठोपाठ दोघीही हसू लागल्या. स्वराला त्या का हसत आहेत काहीच कळत नव्हतं आणि कियारा शोभनाला टाळी देत म्हणाली, " शोभना देख तो इसका चेहरा ! उसकी एंगेजमेंट के बारे मे ही सूनकर कैसा हो गया है. स्वरा मेरी जाण आज ऐसेंही बुलाया है लेकिन कुछ दिनो मे अगर तुने उसको बताया नही ना तो सच मे उसकी शादी हो जायेगी. बेटा ये दिल्ली है दिली तेरा नागपूर नही. यहा लोग इंतजार करते नही. अब जलदी से बता दे उसे वरना कोई और ले जायेगी. फिर सचमे उसके शादी मे खाना खाना पडेगा. "

कियाराच बोलणं ऐकून तिघीही खूप हसत होत्या. जरी त्या स्वरावर हसत होत्या तरीही त्या स्वयमबद्दल गंमत करत आहेत हे ऐकून तिच्या जीवात जीव आला.

आज संडे म्हणजेच फंडे. त्यांची तयारी झाली आणि त्या सर्व हॉस्टेलच्या खाली पोहोचल्या. कियाराने कॅब बुक केली होती आणि कॅब ड्राइवरचा फोन तिला येऊन गेला होता. तो कॉलेजच्या गेटवर त्यांची वाट बघत होता म्हणूनच त्या चौघीही पटापट गेटवर पोहोचल्या. स्वरा आज पिवळ्या कलरचा सलवार सूट घालून तयार झाली होती. ती जरी दिल्लीत राहायला आली असली तरीही तिने ती आपली सिम्प्लिसिटी, ते कल्चर बदलले नव्हते म्हणून ती आज पण साध्याच पद्धतीने तयार झाली होती तर बाकी तिघीही जीन्स, टीशर्ट घालून तयार झाल्या होत्या. कॅब समोर दिसताच सर्वच कॅबमध्ये बसले आणि एकदाची कॅब सुरू झाली. कियारा समोर तर बाकी सर्व मागे बसल्या होत्या . कॅब सुरू झाल्यापासून असा एकही क्षण नव्हता जेव्हा त्या तिघी गप्पा मारत नव्हत्या तर स्वरा आज पहिल्यांदाच त्याच्या घरी जाणार असल्याने थोडी नर्व्हस होती. तिच्या चेहऱ्यावरुन ते स्पष्ट जाणवत होतं. कॅब सुरू होऊन काही वेळच झाला होता. कियाराला स्वराची ही स्थिती लक्षात आली. तिने हळूच पूजाला डोळा मारला. पूजाला कियारा काय म्हणत आहे ते सहज लक्षात आलं होतं. तर शोभनाही त्यासाठी तयार होती. काही क्षण शांत राहिल्यावर कियारा हळूच बोलून गेली, " पूजा तुझे पता है? स्वयम की मॉमना बहोत स्ट्रिक्ट है. उन्हे अगर पता चल गया ना की उसे कोई लडकी पसंद है तो उसे भी नही छोडेंगी और स्वराको भी नही. मुझे तो अभि से डर लग रहा है. "

स्वरा ते सर्व गुपचूप ऐकत होती. तिघांनीही पुन्हा एकदा हळूच तिच्यावर नजर टाकली आणि पूजा खूप भीती वाटत असल्यासारखी म्हणाली, " फिर? हम स्वरा को ले जाये या नही? इनके बारे मे पता चल गया तो? हमे मार तो नही खाना पडेगा ना?"

कियाराने पुन्हा एकदा स्वराकडे पाहिले. स्वराच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या आणि कियारा धीरगंभीर चेहरा करत म्हणाली, " ले चलते है लेकिन इसे बोल दे की उसे हमेशा की तरहँ चुपके - चुपके देखणा नही वरणा वही लाशे बिछ जायेगी हम सबकी. दो प्यार करणे वालो मे बेवजह हम शहीद हो जायेंगे और ये दिल्ली है दिल्ली. यहा तो लाशे भी घरवालो को नही मिलती. "

स्वरा त्यांचं बोलणं ऐकून आता एकदमच शांत झाली होती. दोघांच बोलणं झालंच होत की शोभना त्यांना जॉईन होत म्हणाली, " हा कियारा मैनेभी सुना है की उसकी मॉम ने पिछली बार एक लडकी को बाल पकड पकडकर मारा था क्यूकी वो सिर्फ स्वयम को देख रही थी. अब हमको सिर्फ भगवान बचा सकते है. स्वरा सून गलती से भी देखणा नही उसकी तरफ वरणा हमारी खैर नही. "

प्रत्येक व्यक्ती कॅबमध्ये काहीतरी बोलत होता. तिला अस वाटत होतं की ह्या आपली गंमत करत आहे म्हणून तिने त्यांच्याकडे पाहिलं पण त्यांचे चेहरे खूपच सिरीयस होते त्यामुळे त्या खर बोलत आहेत ह्याबद्दल तिला शंका नव्हती. तिने मानेनेच होकार दिला आणि स्वरा आता आपल्याच विचारात हरवली होती. ती मनातून खूप घाबरली होती. तर सर्वांनी आपले चेहरे बाजूला करून हळूच हसायला सुरुवात केली. स्वराला कळू नये म्हणून त्या मोठ्याने हसल्या नव्हत्या.

जवळपास पाऊणतास झाला होता. कॅबमधील वातावरण अजूनही सिरीयस होत. काहीच क्षणात कॅब थांबली. कियाराने पैसे पे करून सर्वाना उतरायला सांगितलं. समोरच स्वयमच घर होत. त्या तिघी फास्ट फास्ट चालत होत्या तर भीतीने स्वराचे पाय पूढे जात नव्हते. ती कासवाच्या गतीने समोर चालू लागली होती. त्या तिघांच्याही ते लक्षात यायला फार वेळ लागला नाही म्हणू त्या स्वतातच हसत होत्या. काही क्षण गेले आणि सर्वच दारावर उभे झाले. कियाराने डोरबेल वाजवली आणि दार उघडण्याची वाट पाहू लागल्या. स्वरा तर समोर काय होईल म्हणून घाबरलीच होती. समोरून हळूच दार खोलल्या गेलं आणि एक गोरी पान गोल चेहरा आणि शरीराने बारीक अशी स्त्री बाहेर आली. तिने कियाराला पाहताच पटकन मिठी मारली आणि हळूच हसत म्हणाली, " फायनली मेरी बहु मेरे घर आ ही गयी. "
कियाराला त्या बाई अस बोलून गेल्या आणि पूजा, स्वरा एकटक कियाराकडे बघू लागल्या. कियाराही थोडी गमतीशीर स्वभावाची म्हणून पटकन म्हणाली, " आंटी मै तो तयार हु आपकी बहु बनणे के लिये पर आपके लडकेने दुसरी बहु धुंड ली है उसका क्या करे? मै तो कंवारी ही मरने वाली हु शायद."

तिच्या बोलण्याने पुन्हा एकदा हसण्याच वातावरण निर्माण झालं. त्यांनी तिला मिठी मारली होती आणि कियाराच्या बोलण्यावरून त्या स्वयमच्या आई आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. त्यांनी गप्पा बाजूला ठेवून सर्वाना आतमध्ये घेतलं. त्या सोफ्यावर जाऊन बसल्या. तेवढ्यात स्वयम आपल्या रूममधून बाहेर आला. स्वयम समोर आला तरीही स्वरा अजूनही मान वर करायला तयार नव्हती. स्वयमला तिला नक्की काय झालं कळत नव्हत. त्याला बघताच कियाराने पुन्हा विषय सुरू केला, " आंटी पूछो अपणे लाल पिलेसे मुझे छोडकर वो किसीं और से प्यार करता है या नही. "

स्वयम अगदी जाळ्यात सापडला होता. स्वरा आणि स्वयम दोघेही शांत होते. ते आपली नजर वर करत नव्हते. हा नक्की काय विषय सुरू आहे त्यांना कळत नव्हत. स्वराची तर शिट्टी बिट्टी गुल झाली होती. कियाराने विषय सुरू केला आणि बाकी सर्व त्यांना बघून हसू लागले. स्वयम, स्वराला सोडून तिथे सर्वच हसत होते आणि काकू म्हणाल्या, " बेटा इसे तो कबसे बोल रही हु की लेकर आ किसीं को भी पर ये सुनता नही तो क्या करू? ये मेरा लाल लडकी को देखकर पिला हो जाता है. ये क्या किसींसे बात करेंगा? कियारा तुम भी ना बस मजा लेती हो मेरे लाल का? "

काकूनेही संधी शोधून त्यांची खेचायला सुरुवात केली. गप्प असलेला स्वयमही आता हळूच हसत म्हणाला, " माँ और कियारा आप दोनो को मेरी खिंचने के अलावा कुछ सुझता नही क्या? हा माँ आपको बहु चाहीये ना तो ठीक आहे आपकी ये विश भी पुरी करुंगा. पेहले मेहमान नवाजी करे या नही? "

त्याच बोलणं ऐकताच काकू आतमध्ये पाणी आणायला गेल्या आणि सर्वांची पहिल्यांदा नजर गेली ती स्वरावर. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि कितीतरी वेळेच हसू दाबून बसलेल्या त्या जोराने हसू लागल्या. स्वयमला त्या का हसत आहेत कळत नव्हतं तर तिघी पोट दुःखेपर्यंत हसत होत्या. काहीच वेळात काकू किचनमधून बाहेर आल्या तरीही त्यांचं हसन बंद झालं नव्हतं आणि काकूने हसतच विचारले, " क्या हुआ कियारा इतना हस क्यू रहे हो? "

कियाराने हसतच उत्तर दिले, " कुछ नही आंटी मैने इन दोनो को बताया की आप बहोत गुस्से वाली हो और ये आपको देख के घबरा गयी थी. इनको लगा की आप हिटलर जैसी है और यहा आकर कुछ और ही दिख रहा है. इसलीये इस स्वरा को देखकर थोडा हस रहे है. देखो तो इसका चेहरा कैसे हो गया है?"

काकू क्षणभर हसतच म्हणाल्या, " बदमाश ! मै तुम्ही किसीं किनारे से खडूस लगती हु क्या? मै तो अभिभी स्वीट सिक्सटीन हु. नाजूक सी परी हु. "

काकूंच्या विनोदी स्वभावाने वातावरण आणखीच आनंदी झालं होतं. काहीच क्षणात स्वयमने आईची दोघींशी ओळख करून दिली आणि स्वराही आता फ्री वाटत होती. स्वराने तर त्याना नमस्कार करूनच ओळख केली होती त्यामुळे त्याची आई तिच्यावर खुश झाली होती. काही वेळ ते सर्वच गप्पा मारत होते. नंतर जेवणाला उशीर होईल म्हणून काकू सरळ किचन रूम मध्ये गेल्या. आता सर्वांच्या मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या. कियारा स्वयमच्या फॅमिलीला खूप चांगल्याने ओळखत होती म्हणून त्यांच्याबद्दल ती सांगू लागली. स्वराही त्यांच्याबद्दल मन लावून ऐकत होती. त्यांच्या गप्पा होत्या की संपतच नव्हत्या.

काही वेळ आणखी गेला. स्वराला तहान लागली होती म्हणून ती सरळ पाणी प्यायला किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्यावर तिला जाणवलं की काकू एकट्याच सर्व काम आवरत आहेत. स्वराला स्वयंपाक उत्तम जमायचा शिवाय स्वयमच्या आईला त्रास झालेला बघणे तिला आवडले नव्हते. त्यामुळे ती किचन मध्ये जाताच कामावर भिडली. स्वयमची आई तिला नको नको म्हणत होती पण स्वरा सुद्धा ऐकणार नव्हती शेवटी स्वयमच्या आईला तिच्या हट्टासमोर हार मानावीच लागली. इकडे सर्वाच्या गप्पा सुरु होत्या तर तिकडे दोघीही काम करतच आपल्या गप्पा मारू लागल्या. स्वयमची आई काम करता - करताच तिच्याबद्दल माहिती काढत होती तर स्वराही काही क्षणातच त्यांच्याशी एकरूप झाली होती. स्वयमच्या आईचा स्वभाव खूपच सुंदर होता त्यामुळे अगदी काही वेळातच त्यांची छान गट्टी जमली तर पहिल्या भेटीतच स्वयमच्या आईला स्वराचा स्वभाव आवडला होता. सुमारे दोन तास त्यांचे काम सुरू होते. जवळपास सर्वच काम झाले म्हणून ती हात धुवून बाहेर पडली. आता बाकीच सर्व काकूच आवरतो म्हणाल्या आणि स्वराला त्यांच्या हट्टासमोर काहीच बोलता आलं नाही. स्वरा आज काम करताना घामाघूम झाली होती म्हणून फ्रेश व्हायला वॉशरूम शोधू लागली. काकूंना त्रास होऊ नये म्हणून तिने त्यांना वॉशरूमबद्दल विचारले नव्हते. ती शोधता - शोधता एका दारावर पोहोचली. तिला वाटलं की कदाचित इथे वॉशरूम असावं म्हणून ती दार उघडत आतमध्ये जाऊ लागली आणि स्वयम त्यांच वेळी दारावर उभा झाला. काही क्षण ते तसेच दारावर एकमेकांना बघत बसले होते पण स्वयम इतका लाजरा होता की त्याने पटकन आपली नजर खाली केली आणि म्हणाला, " स्वरा आओ ना.!! ये मेरा रूम है. अंदर आओ दिखाता हु तुम्हे. "

तिने त्याच बोलणं टाळल नाही आणि सरळच आतमध्ये गेली. आतमध्ये जाताच तिने त्याला वॉशरूमबद्दल विचारलं. त्याने माहिती देताच ती फ्रेश होऊन बाहेर पडली. आता तिला थोडं छान वाटत होतं. तिला बर वाटावं म्हणून त्याने एसी वाढवली होती. ती थोडी फ्रेश वाटू लागली आणि तीच लक्ष समोरच्या फोटोवर गेलं. त्याच्या बेडरूममध्ये कितीतरी फोटो लागले होते. प्राइज तर विचारूच नका. अगदी लहानपणापासून तर वयाच्या विशिपर्यंत एक एक फोटो त्याच्याकडे होता. हळूहळू त्याची पूर्ण रूम तिने नजरेखालून काढली आणि हळूच हसत म्हणाली, " स्वयम ते सब प्राइज तुम्हारे है? "

स्वयम हसतच उत्तरला, " हा ! कुछ पुराणी यादे ! मेरी मॉम और पापा को ये पल बहुत खास लगे इसलीये उनहोणे ये सब फोटो मे कैद करके रखे है. "

स्वराला ते सर्व बघून स्वयमचा खूप अभिमान वाटत होता. स्वयमची रूम सुद्धा शांत होती. त्यात फक्त कामाच्या वस्तू होत्या. पुस्तके तर किती होती ह्याचा अंदाजाच नव्हता. ती पुन्हा काही बोलणार तेवढ्यात पूजाने त्यांना आवाज दिला आणि ते दोघेही जेवायला खाली आले.

आज काकूने छान मटर पनीर, बुंदी रायता, मसाला वांगी, भात, पोळी सर्व बनवलं होत. सर्वांनी खाताच त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. काकूनी ह्यात स्वराचही क्रेडिट आहे ऐकल्यावर स्वयम थोडा खुश झाला होता. त्यामुळे दोन घास त्याच्या पोटात जास्तच गेले होते. त्यांचं जेवण आटोपलं त्यानंतरही त्यांच्यात बऱ्याच गप्पा सुरु होत्या. स्वराला बघून, स्वराबद्दल ऐकून तर काकू स्वराच्या फॅनच झाल्या होत्या. काकू स्वराच्या इतक्या फॅन झाल्या होत्या की त्या पूर्ण वेळ तिच्या शेजारीच बसल्या होत्या . स्वराही आज त्यांच्यासोबत बोलून सुखावली होती. आज गप्पाना उधाण आल होत. त्यात त्यांना वेळचही भान नव्हतं. बरोबर 6 ला त्यांना हॉस्टेलला पोहोचायच असल्याने त्यांनी शेवटीं तिथून प्रस्थान केले आणि स्वरा आयुष्याच्या खूप सुंदर आठवणी घेऊन तिथून निघाली.

आजचा दिवस तिच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण घेऊन आला होता. त्याच्या आईला भेटून त्याच्यावर किती उत्तम संस्कार करण्यात आले होते हे तिला जाणवलं आणि तिच्या स्वप्नांत आणखी एक भाग जुळला होता. ती आताही कॅबमधूनच जात होती पण ह्यावेळी ती वेगळ्याच विश्वात हरवली होती. ती शांत होती पण आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. ती त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडली होती पण त्याने तिला घरी बोलवुन, आईशी भेटवून तिच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास आणखीच जागृत केला. जो मुलगा मुलीला आपल्या घरी बोलावून तिला त्या फॅमिलीचा भाग बनवू इच्छितो हा विचार येताच ती मनोमन सुखावली. प्रेम तर आधीच होत पण एक पाऊल पुढे जात तिला त्याच्यावर विश्वासही बसला होता.

क्रमशा ......