Bhagy Dile tu Mala - 9 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ९


स्वराचा वाढदिवस तर झाला होता पण त्यादिवशी स्वयम काही आपल्या विचारातून बाहेर आला नाही. ती वाढदिवसाच्या दिवशी आनंदी होती म्हणून त्याने तिचा आनंद हिरावून घेतला नाही पण हे खरं की त्याच्या डोक्यातुन तो विचार पूर्णता गेला नव्हता. वाढदिवसानंतर सुद्धा तो त्याबद्दलच विचार करत असे पण तिला कळलं असत की एवढं सर्व स्पेशल त्याने नाही केलं तर ती आणखीच जास्त दुखावली जाईल त्यामुळे तेरीभी चुप मेरीभी चुप म्हणत त्याने तो विषय तिथेच सोडून दिला.

इकडे स्वरा खूप खुश होती. तो हेल्पफुल आहे, त्याच्यात हजार चांगले गुण आहेत हे तिला माहिती होत पण इतका रोमँटिक स्वयम तिने कधीच बघितला नव्हता त्यामुळे ती अधिकच त्याच्या जवळ जाऊ लागली. ती आयुष्याचे सर्वात सुंदर क्षण जगत होती अस म्हणू शकता किंवा तिच्या आयुष्याच जगत असलेल ते सर्वात सुंदर पर्व होत अस म्हणूही शकता. जिथे प्रेम, करिअर, यश हे सर्व तिच्या हाती येऊ लागलं होतं. आता फक्त तिला आपल्या मनातल्या प्रेमाला नाव द्यायचं होत. तिला आपल्या भावना स्वतःच्या मनातच दडवून कंटाळा आला होता. जस तो वाढदिवसाला गिफ्ट्स मधून मुक्त झाला होता तसच तिलाही काहीतरी स्पेशल करून मुक्त व्हायचं होत.

काही दिवस आणखी गेले. स्वरा योग्य संधीची वाट पाहत होती. अलीकडेच त्यांच्या पहिल्या सेमचा निकाल लागला होता आणि स्वतःच्या इंग्लिश वर मात करत ती क्लासमध्ये प्रथम आली होती. सर्वांनी तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. तिची आता एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.

एके दिवसाची गोष्ट. स्वराला आज कुठलेतरी बुक्स अभ्यास करायला हवे होते. तिने हॉस्टेलमध्ये सर्वांची विचारपूस केली होती पण तिला कुणाकडून मिळालेच नाही. तिला सरांनी अभ्यास करायला स्पेशली ते बुक्स रेफर केले होते त्यामुळे ती सकाळपासून त्याबद्दल सर्वांकडे चौकशी करत होती. तिला कुणाकडेच बुक्स मिळाले नाही म्हणून स्वारी वळाली शेवटी लायब्ररीकडे. तिने लायब्ररीमध्ये बुक्स बद्दल माहिती विचारली पण तीच नशीब बहुतेक खराब होत त्यामुळे ते बुक्स आधीच काही मुलांनी स्वतःकडे घेऊन ठेवले होते. लायब्ररीमध्ये सुद्धा ते बुक्स उपलब्ध नसल्याने स्वराचा चेहरा आज पडला होता. आता फक्त तिच्याकडे शेवटचा पर्याय होता तो म्हणजे स्वयम. स्वयमला क्लासमध्ये जाताच तिने बुक्स बद्दल विचारले आणि त्याचही तेच उत्तर आलं. आज तिला मनासारखं काहीच मिळालं नाही म्हणून ती दिवसभर दुःखी होती. मार्केट मध्ये ते बुक्स उपलब्ध होते पण तिला ते घेणं परवंडणार नव्हतं म्हणून ती तोंड पाडूनच दिवसभर क्लास करू लागली. स्वयमला तिचं अस उदास असणं आवडलं नव्हतं त्यामुळे तिला बुक्स खरेदी करून सरप्राइज द्यायचं त्याने ठरवलं.

त्याच दिवशीची सायंकाळ. पूजा, स्वरा त्यांच्या रूमवर पोहोचलेच होते की दारावर त्यांना एक पिशिवी दिसली. पूजाने ती हातात घेतली आणि आत काय आहे म्हणून ती उघडून पाहू लागली. पूजाला त्यात काही बुक्स दिसले. ती बुक्सचे नाव वाचू लागली. बुक्स बघून स्वराचा चेहरा एकदम खुलला होता. कारण ती जे बुक्स दिवसभर शोधत होती तेच बुक्स तिला दारासमोर मिळाले होते. आपण सकाळीच स्वयमशी बोललो होतो तेव्हा त्यानेच हे बुक्स पाठवले असतील ह्याचा विश्वास तिला बसला. तीच प्रेम त्याच्यावर आणखिच वाढलं होत. तिला खर तर तेव्हाच कॉल करून त्याच्याशी बोलायच होत पण दिवसभर थकल्याने ती आधी फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये पोहोचली. ती फ्रेश होऊन बाहेर आलीच होती की तिचा फोन रिंग करू लागला. तिने फोनकडे बघितलं तर त्यावर स्वयमच नाव फ्लॅश होऊ लागलं. तिने स्वतःवर हसतच आता फोन उचलून कानाला धरला आणि उत्साहाच्या भरात बोलून गेली, " स्वयम तुला शंभर वर्षे आयुष्य आहे बघ! "

त्याला तिची मराठी काही समजली नाही म्हणून थोडा गोंधळत बोलून गेला, " क्या? कुछ समझा नही. "

ती पटकन मराठीत बोलून गेली आणि तिची चूक आता तिच्या लक्षात आली. क्षणभर स्वतःवरच हसत, स्वतःच्याच कपाळावर हात मारत ती म्हणाली, " आय मीन टू से की मै अभि तुम्हारे बारे मेही सोच रही थि. "

तीच उत्तर ऐकून तो क्षणभर हसलाच. खर तर ती सतत त्याच्याबद्दलच विचार करत असे त्यामुळे अस पटकन बोलून गेल्यावर तिला स्वतःचीच लज्जा वाटली पण त्याला जास्त काही वाटू नये म्हणून जरा इटकावत ती पुढे म्हणाली, " स्वयम ज्यादा इतराओ मत. याद कर रही थि मतलब तुम्हे थॅंक्यु बोलणा था! "

तो पटकन उत्तरला, " किस बात के लिये? "

ती आता हसत - हसतच उत्तरली, " बुक्स के लिये. मैने तुम्हे आजही बताया और तुम लेकर भी आये. थॅंक्यु सो मच स्वयम. पता नही तुम नही होते तो मेरा क्या होता? "

त्याच्या चेहऱ्यावर आता हसू पसरल होत कारण त्याने खरच तिच्यासाठी ते बुक्स खरेदी केले होते. हातात असलेल्या बुक्सकडे तो बघून हसतच होता की ती पुन्हा म्हणाली, " पर स्वयम इतनी भी क्या जलदी थि भेजने की ? सुबहँ तो भी दे सकते थे ना. बिना वजहँ क्यू तकलीफ उठायी और रूम के सामने लाकर रखं दिये. कोई और ले जाता तो? "

तीच बोलणं ऐकून आता तो शांतच झाला कारण त्याने बुक्स तर घेतले होते पण ते अजूनही त्याच्या हातातच होते. त्याने तिला कॉल हे सांगायला केला होता की तो बुक्स उद्या देईल आज टेन्शन नको घेऊस पण ती जे काही बोलून गेली ते ऐकल्यावर त्याची बोलतीच बंद झाली. काही क्षण तर त्याला नक्की काय बोलू तेच कळत नव्हतं म्हणून तो शांत बसला. त्याला आता मागचाही किस्सा आठवला आणि त्याला आता शांत बसन जमणार नव्हतं म्हणून त्याने पटकन म्हटले, " सॉरी स्वरा लेकिन वो किताब मैने नही दिये. मेरे बुक्स मेरे हात मे है. "

त्याच उत्तर ऐकताच स्वरा मोठ्याने हसू लागली. तिला अचानक काय झालं ते तिलाच कळत नव्हतं. तो शांतच झाला आणि ती हसतच म्हणाली, " कितना डरते हो यार तुम स्वयम ! पिछली बार प्रॅक्टिकल के टाइम थोडा डांट क्या दिया तुम तो घाबराणे लगे मुझसेे. इतना भी क्या डरणा. वैसे भी सॉरी तो बोला था. पर सच मे थॅंक्यु तुम्हारे वजहसे आज मेरा थोडा टेन्शन कम हुवा है. "

ती हसत - हसतच बोलत होती तर तो पुन्हा एकदा म्हणाला, " सच मे मैने नही दिये! "

स्वरा आता जरा चिडलीच होती. तीच हसू आपोआप गायब झाल होत आणि ती रागावतच म्हणाली, " ठीक है मान लेती हु लेकिन एक बताओ अगर तुमने नही दिये तो और किसने दिये? क्योकी तुम्हीसेही मैने इस बारे मे बात की है और दुसरा होता तो तू दरवाजे के सामने बुक्स लाकर नही रखता. अब दो जवाब? "

त्याला उत्तर काय द्यावं तेच कळत नव्हतं त्यामुळे थोडा वेळ तो शांत होता. ती आताही उत्तराची प्रतीक्षा करत होती आणि तो चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, " होगा कोई दिवाना? वैसे भी तुम्हारे फॅन क्या कम है कॉलेजमे? "

तो गमतीत बोलला होता आणि तीही हसतच म्हणाली , " यार स्वयम तुम सच केह रहे हो! मुझे लगता है सच मे कोई दिवाना है! कुछ दिनो पेहले मुझे अचानक नीट अँड क्लिन रूम मिल गयी, फिर सबको जो मिलता है उससे कुछ अलग खाना मिलणे लगा और अब देखो ना किताबे भी बिना मांगे आग गयी. ये दिवाना नही तो और कोण है. मुझे ना ऊस दिवाने का नाम भी पता है? "

स्वयम हळूच उत्तरला, " कोण? "

आणि तीही हसतच बोलून गेली, " मिस्टर स्वयम अगरवाल. वन अँड ओन्ली दिवाना!! "

ती आज आपल्या मनातलं एवढ्या सहज बोलून गेली की त्याला समोर काही विचारायचं उरलच नाही. तोही आता तिच्यासोबत हसू लागला होता. त्यांच्यात आणखी बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. दोघेही एकमेकांसोबत बोलून खुश होते. कितीतरी वेळ त्यांचं बोलणं सुरू होत. कुणाचंच थांबायचं मन नव्हतं पण स्वयमला मागून आईचा आवाज आला आणि त्याने घाबरतच मोबाइल ठेवुन दिला.

स्वराचा आज आनंद गगनात मावत नव्हता. स्वयमची काळजी, स्वयमच प्रेम बघून तिचा उर भरून आला होता आणि ती आणखीच त्याच्या प्रेमात धुंद राहू लागली तर स्वयमने तिच्याशीही बोलताना तेच फिल केलं. तीच आज एवढ्या बिनधास्त बोलणं त्याला फार आवडल होत. आपण जे फिल करतोय तेच तीही फिल करतेय हे ऐकल्यावर कुणाला आनंद होणार नाही? त्यामुळे तोही आनंदी होता.

स्वयमच्या तिच्याशी बोलताना हसला तर होता पण नंतर तिने गमतीत बोललेल्या शब्दांनी त्याच्या मनात आणखी जागा निर्माण केली. त्याला तेच विचार करून करून आज झोप येत नव्हती. त्याने आज जे तिच्या तोंडून एकल होत तेच त्याने पूजाच्या तोंडून ऐकलं होतं अस त्याला आठवू लागलं. वाढदिवसाच्या दिवशीचे क्षण तो तर कधीच विसरू शकला नव्हता. सोन्याची चैन कोण देऊ शकतो हा विचार करून त्याच रात्रीच चैन गेलं होत आणि त्याच्या मनात शंका घर करू लागली. एकदा शंका मनात आली की नाती कशी कोलमडून पडतात ह्याबद्दल त्याला अंदाज नव्हता पण हेही खर की तो आज आपल्या मनात शंकेला येऊ देण्यापासून थांबावु शकला नव्हता. आता ही शंका पुढे काय रूप घेणार होती काय माहिती ? आणि नेमकी ही शंका कुणावर होती ? स्वरावर की ? त्याची हीच शंकाच आता त्यांच्या नात्यांची सीमा बदलणार होती .

क्रमशा...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED