चुका होवू देवू नये Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चुका होवू देवू नये

चुका शक्यतोवर होवू देवू नयेत

चूक कबूल करतांना चुका होतच असतात. ज्यांच्या चुका होणार नाहीत, तो मानव कसला? परंतु प्राणीमात्रांकडं पाहता त्यांच्या कोणत्याच चुका होतांना दिसत नाहीत. ते जेवनासाठी टाळाटाळ करीत नाहीत. कोणतंही काम मालक म्हणेल, त्यापद्धतीनं करतात. जेव्हा त्यांना वखर, नांगर वा बैलगाडीला जुंपलं, तेव्हा ते तयार असतात. परंतु मनुष्यप्राण्यांचं तसं नाही. म्हणूनच मनुष्यप्राण्यांच्या नेहमी चुका होत असतात.
चुका या नेहमीच होतात. नाही होत असं नाही. तसं पाहता चूक करणारा महान असतो. जर त्याच्यात चूक कबूल करायची क्षमता असेल तर........जो चूक करतो. परंतु झालेली चूक जो कबूलच करीत नाही. तो कधीच महान ठरु शकत नाही हे निर्विवाद सत्य गोष्ट आहे.
चूक होते, परंतु ती कबूल करतांना हिंमत लागते. चूक झाल्यावर आपल्याला असं वाटतं की पुढील व्यक्ती आपल्याला काय म्हणेल? तो रागवेल तर नाही ना? मारणार तर नाही ना? शिक्षा तर नाही ना करणार? याच भीतीपोटी कोणताच व्यक्ती चूक सढळ मतानं कबूल करीत नाही, तर चक्कं खोटं बोलतो. तसं पाहता चूक कबूल करणं हा गुन्हाच वाटतो प्रत्येकांना. कारण चूक कबूल केल्यास न्यायालयात शिक्षा होवू शकते. जसे. एखाद्यानं एखाद्याचा खुन केला असेल तर तो गुन्हा तो व्यक्ती सरासरी कबूल करीत नाही. आढेवेढे घेतो. कारण त्याला माहीत आहे की त्यानं सरासरी गुन्हा कबूल केल्यास त्याला शिक्षाच होते. मात्र त्यानं तो गुन्हा कबूल केल्यास त्याची शिक्षा माफ होत नाही वा त्यानं तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत केला हे विचारात घेतले जात नाही. जसे एखाद्या माणसानं एखाद्या स्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडून जर त्याचा खुन झाला. त्यात तिनं गुन्हा जरी कबूल केला आणि विस्तृत वर्णन केलं तरीही तिला शिक्षा होत असते. तसेच एखाद्यानं आपली सुरक्षा वा आपल्या परिवाराची सुरक्षा करतांना चोराचा केलेला खुन हा खुनच ठरतो. जरी तो चोर त्याच्या घरी चोरी करायला आला असला तरी.
चूक......चूक कोणी कबूल केल्यास त्याचं स्वागत करायला हवं. कारण चूक कबूल करायला हिंमत लागते. परंतु शिक्षा होते व शिक्षेच्या धाकानं कोणि चूक कबूल करीत नाहीत. तसं जर झालं असतं, तर आज ना न्यायालयात खटले असते. ना खटल्याचे प्रमाण वाढले असते. प्रत्येकाने चूक झाल्यास माफी मागीतली असती व मोकळे झाले असते. आज चुका होतात व त्याच चुका कबूल करवून घेण्यासाठी न्यायालयात खटले दाखल होतात. बरेच दिवस ते खटले चालतात. परंतु आरोपी त्याच्या हातून झालेल्या चुका कबूल करीत नाहीत. शेवटी त्या चुका कशा झाल्या, यासाठी पक्षकार वकील पुराव्यासह न्यायालयात न्यायाधीश महोदयांना समजावून सांगतो. मग सिद्ध होतं की संबंधीत चुकांचा मालक अमुक अमुक व्यक्ती आहे व तोच गुन्हेगार आहे. मग तसं सिद्ध झाल्यावर शिक्षा केली जाते. तोपर्यंत वेळ व पैसा खर्च करत आहेत वाया घालवत खटला सुरु असतो. त्या प्रक्रियेला बराच अवधी लागतो. अशा अवधीत कधीकधी साक्षीदार व पुरावे नष्ट होतात व आरोपी सुटत असतो. म्हणूनच सहजासहजी कोणी चुका कबूल करीत नाहीत.
अलिकडील काळात तर मोठमोठी माणसं चुका करतात. त्याही मोठमोठ्या चुका करीत असतांना आढळतात. तशी लहान मुलं तर जास्त चुका करतात. परंतु त्या क्षम्य असतात.
चुका बऱ्याच जणांकडून होत असतात. काही गंभीर असतात तर काही किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्याचे परिणामही त्या त्या चुकांच्या पद्धतीनुसार वा स्वरूपानुसार प्रत्येकाला भोगावेच लागते. उदाहरणार्थ चौसरचा खेळ खेळल्यावर द्रौपदीचे अपहरण करण्याची जि चूक कौरवांनी केली होती. त्याचे गंभीर परिणाम म्हणून कौरवांचा पुर्ण वंशच नष्ट झाला होता. आजही तेच घडते. आजच्या काळात आपल्याही हातून जी चूक होते, त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. जर या मानवरुपी देशानं जर त्या चुकांवर न्यायालयात खटले दाखल केले नाही तरी नियती सोडत नाही. नियती त्या चुकांवर आपल्याला कधी नेस्तनाबूत करेल ते सांगता येत नाही. म्हणूनच चुका शक्यतोवर टाळलेल्या बऱ्या. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०