स्वतःला अपडेट करणे गरजेचे? Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वतःला अपडेट करणे गरजेचे?

*आज अपडेट होणे गरजेचे आहे?*

*अलिकडे काळ बदलला आहे. बदलत आहे. अशा काळात नवनवीन गोष्टी देशात येवू घातलेल्या आहेत. येत आहेत. नवीन तंत्रज्ञानही येत आहे. अशा बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. त्यालाच अपडेट होणं म्हणता येईल. ज्याला असं अपडेट होणं जमत नसेल, त्यानं मेलेलं बरं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.*
शिक्षकाची नोकरी. अलिकडे सर्वांना शिक्षकाच्या नोकरीचा वीट आलेला दिसतोय. ती कराविशी वाटत नाही. त्याचं कारण आहे त्याला असणारी अशैक्षणिक कामं. त्यातच प्रशिक्षणाचीही रेलचेल असते.
आजवर आपण पाहिलं की शिक्षकासाठीच नाही तर जगातील सर्वच बाबींसाठी सरकारनं लोकांना प्रशिक्षीत केलं. त्याला इंग्रजीत मिटींग अर्थात आणि मराठीत सभा असं नाव दिलं. कोणतेही प्रशिक्षण यातूनच साकार झालं. शिवाय या माध्यमातून प्रशिक्षण साकार होत असतांना त्यात चहापाण्याची भर घातली गेली व हा चहापानाचा खर्च अधिकारी वर्गानं आपल्या खिशातून काढला नाही तर तो शासनाच्या तिजोरीत टाकला व शासनानंही तो खर्च स्वतः केला नाही तर तो जनतेच्या खिशात टाकला असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण जनताच सरकारचा खर्च उचलते आपल्या खिशातून कोण्या ना कोण्या बाबींतून कर भरुन. मात्र यात सरकारच्या या सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होते हे न सांगायला नको. तसं पाहिल्यास आजपर्यंत आलेली प्रशिक्षणं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर महत्वाची नव्हतीच.
निपुण भारत योजना. ही सरकारची योजना आहे व ती साकार करणं हाच सरकारचा उद्देश आहे. कारण त्यातून एक व्यक्ती नाही तर गावं न् गाव निपुण बनणार आहे. एक गावंच नाही तर शहर, राज्य व देशही निपुण बनणार आहे. मग जग बनो की न बनो. ते बनवीत असतांना सरकारसमोर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीचं उदाहरण आहे की ज्या जपानच्या या दोन्ही संपन्न शहरावर दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकल्या गेला. तेव्हा संपुर्ण जपान बेचिराख झाला. तसेच तिथं भुकंपाचे कधीमधी धक्केही लागतात. त्यातही जपान बेचिराख होतं. असं असतांना आजही हा जपान देश अलीकडील काळात संपन्न देश म्हणून ओळखला जातो. त्याचा अभ्यास केला सरकारनं व ठरवलं की आपल्या या देशाला सक्षम बनवायचं. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करायचं. मग ते जर करायचं असेल तर काय करायला हवं? असा विचार करुन सरकारनं निपुण भारत योजना आणली.
निपुण भारत योजना. ती आणताच ती कार्यान्वीत कशी करता येईल याचा विचार झाला. त्यासाठी ती राबवणे गरजेचे. परंतु राबविण्याच्या त्या गोष्टी मोठ्या व्यक्तीला सांगीतल्यास तो व्यक्ती ऐकेल काय की चालढकल करेल? हाही एक प्रश्न पडला. त्यानंतर सरकारनं विचार केला की याला लायक कोण? तसा विचार करताच त्यांच्या डोळ्यासमोर आला शिक्षक व शिक्षणक्षेत्र. कारण शिक्षक हा इमानदार व अतिशय मेहनत घेणारा. मग आठवलं की हे तंत्रज्ञान बालपणापासूनच शिकवायला हवं. तरंच देश निपुण होईल. मग काय, तेथूनच सुरुवात करायची सरकारनं ठरवलं व सरकारनं निपुण भारतचं हत्यार शिक्षणक्षेत्रापुढं टाकलं व सांगीतलं की याचा वापर करायचा आहे. मग तो कसा करायचा ते पाहा. प्रशिक्षणं द्या. नाहीतर अजुन काही करा. फक्त देश निपुण बनायला हवा. नाहीतर तुमची काही खैर नाही. शेवटी त्यानंतर शिक्षणक्षेत्रानं निर्णय घेतला की आता काही बरं नाही. आता आपण शिक्षकांच्या माथी निपुण भारतची योजना टाकायला हवी. तेच खऱ्या अर्थानं इंद्रधनुष्य पेलवणारे असतात.
शिक्षणक्षेत्र.......त्यांनी तसं ठरवताच अभ्यासक्रम तयार केल्या गेला. त्या अभ्यासक्रमात नवनवीन गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. त्यानंतर तो अभ्यासक्रम राबविण्यासाठी शिक्षकाला प्रशिक्षण देण्यासाठी बोलावलं गेलं व नेहमीच्या प्रशिक्षणासारखं हेही एक प्रशिक्षण समजून शिक्षक नावाचा प्राणी उपस्थीत झाला तोही नेहमीप्रमाणेच. चालढकल करुन प्रशिक्षण पुर्ण करावं असा त्यांचा विचार होताच. परंतु नाही.
ही प्रशिक्षणं इतर प्रशिक्षणासारखी नव्हती. कारण यात सुरुवातीलाच शिक्षकांनी ऐकलं की आता शिकवायचं अजिबात नाही. त्यामुळंच शिक्षकांना ते प्रशिक्षण आवडलं. कारण कोणतीही गोष्ट करु नका म्हटलं तर त्या गोष्टीत कोणीही जास्त लक्ष जसं घालतो. तेच या निपुण भारत प्रशिक्षण देतांना घडलं.
निपुण भारत प्रशिक्षण चांगल्यासाठी आहे. ते प्रत्येकानं घ्यावं. शिक्षकानंच नाही तर पालकांनीही घ्यावं. तसं पाहिल्यास ती आजची गरज आहे. शिवाय याबाबतीत काही व्हिडीओ यु ट्युबवर अपलोड आहेत. फक्त आपल्याला यु ट्युबवर निपुण भारत असं टाईप करुन विषय टाकायचे आहेत. आपोआपच साईट खुलेल. थोडा नेट कव्हरेज असावा. त्यात आपल्याला निपुण भारत योजनेत काय काय करता येईल. त्याची इत्यंभूत माहिती आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास निपुण भारत ही सरकारची योजना अतिशय सुंदर असून देश कसा विकसीत करायचा याची ही योजना आहे. त्याची प्रशिक्षणही चांगली आहेत. शिक्षकांसाठी तर ही योजना अतिशय सुंदर योजना आहे. त्यातच भविष्यवेधी शिक्षण अभ्यासक्रमही शिक्षकांसाठी चांगला आहे. मात्र ते भविष्यवेधी शिक्षण कसं विद्यार्थ्यांना देता येईल? त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक. ते युट्यूबच्या माध्यमातून मिळू शकतं. तसं पाहता सर्वांना अपडेट होण्याची गरज आहे. जसं व्हाट्सअप, फेसबुक वा इतर ॲप आपण अपडेट करतो तसे. बदलाव गरजेचा. ज्यात बदलाव होत नसेल. तो नष्ट होतो. त्याची गरज संपते. निपुण भारत वा भविष्यवेधी शिक्षण हेच सांगतं की स्वतःला अपडेट करा. मगच तुम्ही जगाच्या स्पर्धेत टिकाल. नाहीतर तुमचा या जगात असण्याचा काहीही अधिकार नाही. त्यापेक्षा तुम्ही मेलेले बरे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०