मल्ल प्रेमयुद्ध - भाग 47 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 47

मल्ल प्रेमयुद्ध


गोंधळ - पूजा सर्व काही उत्तम पार पडले. आई दादा, रत्ना संतु सगळे पूजेला आले होते. चिनू आजू अशी थांबली होती पाठराखण होती. सगळ्या देवांना जाऊन येणार होते. त्याशिवाय वीर चिनूला सोडणार नव्हता कारण कोणताही असो.. लक्ष्य ऋषि होता हे मात्र नक्की...

"मग आज दादा वहिनीची पहिली रात्र आहे. पूजा झाली आता तयारी करावी लागणार..." ऋषि म्हणाला
"हे... हे तुझं कायतरीच तुझ्या वहिनीन सगळं मटेरियल आधीच आणून ठेवलय..."संग्राम कॉलर टाईट करत म्हणाला.
"अरे वा वहिनी भारीच हुशार..."स्वप्ना
"मग मी पण होतो सगळं घेताना..." भूषण
"मग ह्यांची काळजी मिटली." ऋषि म्हणाला.
"तुम्हाला काय माहित हो..." चिनू
"तुला माहीत आहे का?" ऋषि रोमँटिक मूड मध्ये म्हणाला.
"चला आपण निघायचं का?" संग्राम हसत म्हणाला.
"दाजी..." चिनू लाजली.
"तेजुला बोलावं..." संग्राम ऋषीला म्हणाला.
ऋषि खाली गेला. तेजश्री कामत होती.
"वहिनी..." ऋषि हळू आवाजात तेजश्रीला हाक मारत होता.
तिला आवाज जात नव्हता. सुलोचनाबाईनी त्याची हाक ऐकली.
"काय रे ऋषि?"
"मामी अग वहिनीकडे काम होत."
"काय?"
"अsss संग्राम दादाने बोलवलाय..."
"त्याला सांग घरात लय पावणे हायत तुझ्या हाताखाली राबायला ती मोकळी न्हाय..."
"अग मामी महत्त्वाचे काम आहे.."
"मला म्हायती काय महत्त्वाच काम हाय मी त्याला ऐकणार नाय म्हणून तुला पाठवला व्हय..." तेव्हढ्यात तेजश्री आली.
"काय भाऊजी?काय झालं???"
"दादा बोलावतोय.."
"काय जाऊ नको ग... उगाच कामाला लावल..." सुलोचनाबाई ठसक्यात म्हणाल्या
"भाऊजी जा सांगा त्यांना सगळं मटेरियल मधल्या कप्यात कपाटात ठेवलेत..."
"बर वहिनी पण तुम्ही कधी...?"
"यील यील जा तू..."
"वहिनी लवकर जरा.." ऋषि एवढं बोलून निघून पळून गेला.
"हा या पोरंच काय चाललंय काय म्हायती..."
"आत्या आज पूजा झाली..."
"मग...काय???"
"काय न्हाय..."
तेजश्रीने विषय टाळला.


"दादा मामी वहिनीला पाठवत नाही."
"असुदे आपण करू तोपर्यंत नंतर यील ती..."
"काय रे संग्रामदादा तुला तुंमची रात्र आठवत असलं ना...?" स्वप्ना म्हणाली
"खरं तर ... व्हय...पण वाईट" संग्राम
"का...?"ऋषिने विचारले.
"दादा कशाला जुन्या आठवणी यांच्याबरोबर तुमची पण करायची का???" भूषण म्हणाला
"अरे पण काय झालं होतं.. तेवढा तर मोठा आहे न मी... मला समजेल..." ऋषीला नक्की काय झालं होतं हे जाणून घ्यायचं होत.
"ऋषि मी नंतर सांगीन तुला..." ऋषीला भूषण समजावत बोलला. खरं तर थोडाफार स्वप्नाला माहीत होते. तरी तिला नक्की काय झाले होते हे जाणून घ्यायचे होते.
"जाऊदे रे भूषण्या त्यांना नंतर सांगितलं काय आणि आत्ता सांगितले तर काय फरक पडणारे.... ऋषि बाबा पहिली रात्र असती नवरा बायकोनं एकमेकांना जाणून घ्यायची, गप्पा मारायची, समजून घ्यायची पण आम्ही कस बोलणार??? " सगळे ऐकत बसले होते स्वप्ना आणि भूषण गुलाबाच्या पाकळ्या बेडवर टाकत होते. ऋषि सगळ्या बेडच्या भोवतीने वर चढून फुलांच्या माळा सोडत होता. काम करत सगळे मन लावून ऐकत होते. तेवढ्यात चिनू आली आणि ती ऋषीच्या हातात फुलांच्या माळा द्यायला लागली. तिला एकंदरीत विषय समजला होता.
"मग दादा..." ऋषि
"मग काय ह्या भूषन्यांन अन वीरन अशीच सगळी तयारी केली व्हती. पण आम्ही कुठं जाग्यावर व्हतो. माझी बायको वाट बघून तशीच झोपून गेली. पण वीरच्या लक्षात आलं की बहुतेक मी घरात न्हाय... तवा मग तो सरळ मला शोधायला भायर पडला. भूषण्या व्हायचं तवा आम्ही टिंग व्हवून फिरत व्हतो. वीरला आमची हालत बघवली न्हाय त्यान मला धरून आणलं अन आमची रात अशी गेली... बिना शुद्धीत..."

"दादा सॉरी..." ऋषि
"सॉरी काय बाबा जे झालं ते झालं.. काय झालं तरी तुझ्या वहिनीन शेवटपर्यंत साथ न्हाय सोडली." तेजश्री दारामागून सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यांमधून पाणी यायला लागले.
तिने अलगत डोळे पुसले आणि आत आली.
"अर। वा झाल का सगळं मस्त केलंय एकदम..." तेजश्री
"बर पण अजून काहीतरी राहिलंय..." चिनू म्हणाली.
"काय...?"
"दादाने गंमत आणली तुमच्यासाठी..." ऋषि
"माझ्यासाठी?? मला कशाला आज?"
"कारण ही रात्र आपण माझ्यामुळ मुकवली...हे घे..." संग्रामने तिच्या हातात एक बॉक्स दिला.
"इथं नको बघू ही सगळी आगाऊ पोर हायत ह्यांनीच हे उद्योग केलेत." संग्राम म्हणाला. तेजश्रीने लाजून खाली बघितले.


"चला आता आपलं काम वाढलं वाटत..." भूषण
"का???" स्वप्ना
"आग आता ह्यांची पण रूम सजवायला लागणार वाटत..." सगळे हसायला लागले तेजश्री हसत निघून गेली. फुलांच्या माळा लावता लावता ऋषीने चिनूचा हात पकडला. चिनू एकदम घाबरली. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण ऋषीने अजूनच घट्ट हात पकडला.

गुलाबाच्या काही पाकळ्या स्वप्नाच्या डोक्यावर पडत होत्या.

"मग मी जाऊ का बायर..." संग्राम बोलला पण कोणाचे लक्ष असेल तर ना...कोणी काहीच बोलायला तयार नव्हते.

"अरे आज क्रांतिवीरची पहिली रात्र हाय तुमाला येळ हाय..." संग्राम जोरात बोलला. तोच चौघे भानावर आले.

"सगळं झालं चला जेवायला आता... भूषण्या रुम लॉक करून हे..." संग्राम बाहेर गेला. ऋषि अन चिनू सुद्धा बाहेर पडले.
भूषण आणि स्वप्ना अजून एकमेकांच्यामध्ये हरवले होते.

आजूबाजूला कोणीही नाही हे स्वप्नाच्या लक्षात आले ती निघायला लागली आणि तिचा हात पटकन भूषणने पकडला.
"अहो कुठं निघाला. " भूषण
"सगळे गेले आपल्याला निघायला हवं..."
"का?"
"असं काय करताय?"
"मग तुमच्या मनात जे हाय ते कधी बोलणार?"
"काय?"
"काय नाय का मनात आमच्याविषयी...?"
स्वप्ना शांत बसली.
"आम्हाला तुम्ही लय आवडता पण हे अजून तुम्ही आम्हाला सांगितलं न्हाय... तोपर्यंत आंम्हाला तुमचा हात मागता येणार न्हाय."
"बर पण हे म्हणावच लागेल का? तर आमचं तुमच्यावर पत्रेम आहे हे खरं होईल." स्वप्ना हसत म्हणाली. भूषणने पकडलेल्या हाताने स्वप्नाला स्वतःकडे खेचले. स्वप्ना त्याच्या कवेत आली.
"अहो हे काय? कोणी येईल ना..."
"येऊद्या आम्ही सोडणार नाही तुम्हाला." त्याचा तो रानटी स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. त्याची मजबूत मिठी तिला सुरक्षित वाटत होती. ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली. त्याने त्याचे ओठ तिच्या कानामागे टेकवले. ती शहारली आणि भानावर येत त्याला ढकलून पळणार तोच..." आज आम्हाला जर तुम्ही ते तीन शब्द बोलला नाहीत तर....
"तर काय???"
"आम्ही समजू की शिकलेल्या पोरी अडाणी माणसांना फसवतात." स्वप्नाच्या डोळ्यात पाणी आले. ती पटकन म्हणाली.
"हेच ओळखले का तुम्ही मला एवढ्या दिवसात... आता वाट बघा..." स्वप्ना निघून गेली. भूषणला कळून चुकले की आपण असे बोलायला नको होते.


खाली सगळे जेवायला बसले होते. आधी पुरुषांच्या पंगती पडल्या. भूषण मात्र जेवायला बसत नव्हता.
"ये भूषण्या आर बस की.... काय झालंय?" वीर म्हणाला.
"भूक न्हाय..."
"लेका मला न्हाईत हाय तुला भूक लागली. उगाच नाटक करतोय." तेवढ्यात तेजश्री बाहेर आली.
"आपणच राहिलोय सगळे जेवायचे. सगळेच बसू... बाकी सगळे जेवले." तेजश्रीने आणखी पान घेतली. कटांती आणि चिनू तिला मदत करू लागल्या.
"अग क्रांती तू बस बाजूला... आम्ही करतो..." तेजश्रीने तिला वीरशेजारी बसायला सांगितले. क्रांती त्याच्या शेजारी बसली.
"तेजु अग त्यांना कशाला वेगळं ताट ते दोघ बसतील एक ताटात..." सगळे हसायला लागले. वीरने त्याचे ताट तिच्याकडे सरकवले. आणि दोघ जेवायला लागली.
स्वप्ना आली आणि तेजश्री शेजारी जेवायला बसली. तिने भूषणकडे न बघता जेवायला सुरुवात केली.
"वहिनी मला पण वाढा..." भूषण रागाने म्हणाला
"आर आतातर म्हणाला मला जेवायचं न्हाय..."वीर चिडवत म्हणाला.
"मला आता भूक लागली." भूषण स्वप्नाकडे बघत म्हणाला.
आणि जेवयाला सुरुवात केली.
इकडे चिनू आणि ऋषि एकमेकांकडे बघत जेवत होते. ऋषीने हळूच त्याचा अर्धा उष्टा लाडू चिनुच्या ताटात टाकला. चिनूने त्याला गुपचूप दाखवत तो लाडू खाल्ला.



जेवण झाली. बाकी सगळे झोपायला गेले. आता... भूषण, स्वप्ना, चिनू, ऋषि, संग्राम आणि तेजश्री बाकी होते.
"जा भाऊजी तुम्ही, ऋषि आणि दादा तुमच्या रूममध्ये झोपा मी, चिनू,स्वप्ना आणि क्रांती आमच्या रूममध्ये झोपतो
"का???" वीर पटकन म्हणाला.
"का म्हणजे...अजून कोल्हापूरला कुठं जाऊन आलोय...?" संग्राम
"दादा चल..." भुषण आणि वीर वरती गेले त्यांच्या पाठोपाठ भूषण ऋषि गेले.
"दादा आर तुझ्यावेळी कुठं कोल्हापूरला गेलो होतो. जवळजवळ 15 दिवसानंतर गेलो ना... मग आज झाली की पूजा..."
"व्हय... तुला घाई ती कसली?" संग्रामने दरवाजा उघडला. त्याने सजवलेली रूम दाखवली.
"दादा आर..." वीर खुश झाला. त्या मागून महिला मंडळी आल्या. हळूहळू पण हास्याचा कल्लोळ सुरू झाला. क्रांती लाजून चुर झाली होती.
सगळेजण एकेक करत बाहेर पडले. वीरला बेस्ट लक् दिले.
क्रांतीला एवढं बोलायची सवय पण आज काय बोलावे हे समजत नव्हते. ती तिच्या साडीसोबत खेळत होती.
वीरने तिच्या हाताला धरले आणि बेडवर बसायला नेले.
"एक मिनिटं थांबा या लोक काय करतील सांगता येणार न्हाय.

वीरने बेड चेक करून बघितला पण बेडला काहीही नव्हते त्याने सगळीकडे चेक केले.
"कोणी करणार नाय काय उगच का टेन्शन घेता...?"
"हा तुम्हाला न्हाय म्हायती ही लोक मी लय वर्ष ओळ्खतोय ह्यांना..."
"चिनू होती ना काय असत तर तीन मला गपचुप सांगितलं असत..."
"असं..." वीरने तिचा हात पकडला आणि जवळ घेतले.
"अहो..." तेवढ्यात कुठेतरी मोबाईल वाजला. दोघेही इकडे तिकडे बघायला लागले. वीरने फोन उचलला.
"हॅलो..." वीर
"हॅलो अरे स्वप्ना चा फोन तिथंच राहिला वाटत दरवाजा उघड..." भूषण आला. वीरने दरवाजा उघडला आणि कमरेवर हात ठेवून त्याच्याकडं बघितलं.
"आर बघत काय बसलायस फोन दे..." भूषण
"बघा तुम्हाला म्हंटल होत ना दिसतायत तेवढे शहाणे न्हाईत... हे सगळं मुद्दाम सुरू हाय..." भूषणने मोबाईल घेतला आणि निघून गेला. तिथेच लपून बाकी सगळे बसले होते.

पुन्हा वीरने दरवाजा लावून घेतला.
"हे काय आजची रात्र सुखाची जाऊ देणार न्हाईत.." वीर बेडवर क्रांतिशेजारी जाऊन बसला.
ऋषिने फोन केला. वीरने इकडेतिकडे शोधला. उशीखाली पुन्हा फोन सापडला.
"चिनूचा फोन राहिला." ऋषि म्हणाला.
"एक काम करा सगळे इथंच बसा कशाला फोनच निमित्त करून येताय सारख..." वीर चिडला. सगळे खो खो करून हसत होत.
" बघितलं का तुमची चांगली माणस..." वीर क्रांतीला म्हणाला.
स्वप्ना भूषणकडे बघटसुद्धा नव्हती. तिने वीरच्या हातात एक बॅग दिली. वीरने ती बाजूला ठेवली.
"वीर..." स्वप्ना
"I love you..." स्वप्ना म्हणाली. सगळे तिच्याकडे बघायला लागले. भूषणला काही सुचत नव्हते. वीरसुद्धा अवाक होऊन तिच्याकडं बघत होता.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


( स्वप्नाच्या काय असेल नक्की डोक्यात.... अशी का वागली असेल ती... नक्की वाचा पुढच्या भागात.)