मल्ल प्रेमयुद्ध - भाग 51 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 51

मल्ल प्रेमयुध्द









पहाटे क्रांती प्रॅक्टिसला आल्यापासून नॉर्मल वागत होती. साठे सर तिच्याजवळ आले.
"तुम्ही आणि वीर अजून आठ दिवसांनी येणार होता मग काल???"
"सर ओलॉम्पिकच सिलेक्शन जवळ आलंय सुट्ट्या नंतरसुद्धा घेता येत्यात आता फक्त प्रॅक्टिस करायची हाय..." क्रांती
"बर पण मग तुम्ही होस्टेलवर राहता?"
"हो सर..."
"बर..."
सरांना काय विचारायचं होत हे क्रांतीच्या लक्षात आलं होतं पण तिने थोडक्यात उत्तर देऊन टाळलं.

"पियू तुला माहितीये... वीर का आलाय परत लग्नाच्या बायकोला न घेता इथे???" आर्या क्रांतीला ऐकू जाईल अश्या आवाजात बोलत होती.
"का ग??? नाही माहीत..." पियू
"चल आत्ता मूड नाही माझा सांगायचा पण वेळ आल्यावर नक्की सांगेन... कारण मी जाम खुश आहे."
"मग चांगलीच न्यूज असणार..."
"चांगली .... अग ऐकशील तर पायाखालची जमीन हादरले तुझ्या... पण थांब मी नंतर सांगेन..."
क्रांती एक्सारसाईझ करून बेंचवर बसली.तिच्यामगून वीर आला.
"तू का आलीस अन आबांनी येऊ कस दिल तुला??"
वीर म्हणाला.
"कोण तुम्ही???मी न्हाय ओळखत?"
"ही हिम्मत???"
"तुमच्या हिमतीपेक्षा माझी हिम्मत कायच न्हाय...तुम्ही लय मोठी हिम्मत केली. मानलं तुमाला... आता जा..."
"क्रांती..." वीर आवाज मोठ्याने करून बोलला.
"आवाज मला पण वाढवता येतो साहेब.... मोठ्या घरचे तुम्ही म्हण सगळं तुमी करू शकता अस वाटतं न तुमास्नी.. वाटु द्या. मला तुमच्याशी बोलायची इच्छा न्हाय ज तुम्ही. आणि हो सहा महिन वाट बघा डीओर्ससाठी मग आर्याबर केलं लग्न तरी आवडलं मला..."
तेवढ्यात अकॅडमीमध्ये नवीनच ऍडमिशन घेतलेला समीर तिथे आला.
"हे हाय..." क्रांतीला बघून
"हाय पण तुम्ही?"
"हे मी समीर.... आत्ता आठ दिवसांपूर्वी जॉईन झालो. खूप ऐकल तुमच्याबद्दल... तुम्ही आलात समजलं म्हणून भेटावं म्हंटल. छान वाटलं भेटून..." समीरने तिच्यापुढे शेकहँड करायला हात पुढे केला. क्रांतीने एकदा वीरकडे पाहिले वीर रागात बघत होता. तिने हात पुढे केला आणि शेक हँड केले.
"हाय..." क्रांती.
"मेहेंदी वैगेरे अँड लग्न... वा एवढ्या लवकर...?" समीर क्रांतीच्या मेहेंदीकडे बघत म्हणाला
"चूक झाली." क्रांती
"मिन्स..." समीर

"म्हणजे एवढया लवकर लग्न करायचं नव्हतं." वीर तिच्या या उत्तराने रागाने लाल झाला होता.
"मग... हु इस लकी मॅन...?"
"मी वीर..." वीरने हात पुढे केला.
"समीर गैरसमज झालाय तुमचा... चला आपण दुसरीकडे बसून बोलू.." तीने समीरला वीरसोबत शेक हँड करू दिला नाही आणि ते तिथून निघून गेले. तेवढ्यात रत्ना आली वीरकडे न बघता निघणार तोच...
"रत्ना..."
"दादा मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाय ..." रत्ना काहीही न ऐकता तिथून गेली.



सुलोचनाबाई वैतागलेल्या होत्या.
"का तुम्ही वीरला समजून सांगितलं न्हाय...? आव त्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं तुमी... पोरगी सुखावली व्हती. तिचा झालेला पांढराफेक तोंड बघून जीवाला घोर लागला हाय... पोरगी काय करल आता नी कुठं जाईल? तिच्या आई बापाला काय सांगल? अन ते हित आले तर आपण काय सांगायचं? तेवढ्यात तेजश्री आत आली.
"आत येवू का आत्याबाई?"
"व्हय बाय ये ग."
"आत्या क्रांतीचा फोन हाय." तेजश्रीने चालू फोन सुलोचनाबाईकडे दिला.
"व्हय बाय बोल ग... पोचालिया ना नीट?"
"व्हय आत्या तुम्ही माझी काळजी करू नका मिइथिक हाय..."
"काळजी कशी करू नक? हे बघ डोक्यात काय बी घेयच न्हाय फक्त खेळावर लक्ष दे म्या हाय तुझ्या संग..." सुलोचनाबाईने रागात आबांकडे बघितले.
"आत्या तुम्ही माझ्यावरन आबांशी भांडू नका मला ते न्हाय आवडणार... आत्या मला हा धक्का मोठा व्हता पण माझ्या खेळापेक्षा आता काय बी मोठं न्हाय हे मला समजलंय ते तसे का वागलं? माझ्यावर खोटं प्रेम व्हत का? त्यांनी बदला का घेतला? लै प्रश्न डोक्यात व्हत अन हायत पण एक इचार केला ते जस वागायचं ते वागलतन म्हणून आपण पण वाईट वागायचं का? न्हाय न... आत्या तुम्ही अजिबातनाही राग धरू नका कोणावर मी पुढच्या महिन्यात यीन घरी अन हो सध्या आई दादांना काय बी सांगू नका. भाऊजीनी सांगितलंय त्यांना जे काय सांगायचं ते... आणि आत्या तुमी तुमच्या अन आबांच्या तब्बेतीची काळजी घ्या."

"वीर भेटला का?"
"व्हय आलं व्हत बायको म्हण हक्क गाजवत इथं का आलीस न आत्या अश्या माणसाशी बोलून काय फायदा मी सुनावलं पण प्रश्न पडला ज्या माणसावर मी मनापासन प्रेम केलं तो हाच व्हता का? आत्या मी यांच्यासाठी कोणाला दोषी मानणार न्हय शेवटी माझ्या नशिबाचा एक भाग हाय. तुमी पण नका इचार करू.. काळजी घ्या.ठेवते."
"व्हय ठेव अन तू पण काळजी घे दिवसात एकदा तरी मला खुशाली कळव. माझ्याशी दिवसात एकदा बोल मला समाधान वाटलं."
"व्हय आत्या ठेवते." क्रांतीने फोन ठेवला आणि डोळ्यात पाणी आलं.
"क्रांती अग कुणासाठी रडतीस?" रत्ना तिच्या जवळ येत म्हणाली.
"आग त्यांच्यासाठी जी लोक माझ्यावर मनापासन जीव लावत्यात."
"खर वाटत का तुला? मला तर सगळीच ह्यात सामावलली हयात अस वाटतय."
"असलं पण.. पण मला वाटतय तोपर्यंत मी त्याच्याबर बोलीन नंतर बघू जे काय असलं ते... आता अजून सहा महिने तरी वाट बघावी लागलं."
"कशाची?"
"डीओर्स"
"काय??? डीओर्स???"
"हो... मी बोलली स्वप्ना आणि ऋषिबर म्हंटले वकिलांनी सांगितलंय 6 महिने तरी थांबावं लागलं आणि सिलेक्शन पण जवळ आलेत तयारी करायला लागलाच न त्यापेक्ष आत्ता वीर हा विषय बंद फोकस फक्त सिलेक्शन आणि ओलॉम्पिक."


क्रांतीचा ठामपणा बगुरून रत्नाने डोक्याला हात लावला. संतुला सांगावं का हे सगळं या विचारात असतानाच...
"संतुला मी वेळ आली की सगळं सांगीन तू आत्ता काय सांगू नकोस."
"व्हय न्हय सांगत.पण मला वाटतय सांगाव सगळं उगाच अंधारात नको ठेवायला. आपल्या आधी बाहेरणं नको समजायला"
"आग खानदानी श्रीमंत आणि इज्जतदार लोक ती ते अस आपलं बिंग सहजासहजी बाहेरच्या लोकांना सांगत्याल का? न्हाय अजिबात न्हाय मला एवढ्या दिवसात समजल सगळं." क्रांती
"हम्मम ते पण खरच म्हणा पण मला अजून एक न्हाय समजलं आर्याला सगळं न्हाईत हाय कसं काय?"
"हे बघ मला त्यात काय पण रस न्हाय माझं वीर वर अजुन प्रेम हाय पण माणूस म्हणून तो आता माझ्या नजरेत उतरलाय त्यामुळे तो काय करतो? आता हे का केलं? आर्या अन त्याच्यामधी काय हाय का? मला न्हाय ऐकायच... मी पूर्ण तुटून गेली व्हती पण सावरलं मीच मला आता.... जी स्वप्न दादा बघत व्हत ती मला पूर्ण करायची हायत...बास यापुढ आपल्यात हा विषय कधीच नको."
"हो अजिबात न्हाय... फक्त तू डोळ्यातन पाणी काढायचं न्हाय एवढं लक्षात ठेव."
क्रांती शांत वाटत होती. तिला आता खेळावर लक्ष केंद्रित करायचं व्हत. तिला आई दादाची लय आठवण येत व्हती.





क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत