मल्ल प्रेमयुध्द
स्वप्ना आज गावाला जायला निघणार होती म्हणून आज भूषणच्या घरी ती त्याला भेटायला आली होती.
आल्या आल्या तिने भूषणच्या आईला नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली. भूषणच्या आईने तिचे कष्टाने खडबडीत झालेले हात तिच्या गालावरून फिरवले. भूषणच्या बहिणीने स्वप्नाला चहा आणून दिला.
"वैनी कधी येताय एकदाच अस झालंय..."
स्वप्ना वाजणारी न्हवती ती पटकन म्हणाली
"तुझा दादाने मनावर घेतलं की मी आलेच लगेच..."
"व्हय न वैनी मग तूच मनव दादाला त्याला आधी माझं लग्न करायचंय न मग तुमचं पण मला माझ्या वैनीबर रहायचं हाय थोडं दिस..." भूषणची बहीण वर्षा जरा नाराजीने बोलत होती.
"गप ग तुला अशी घालवणार मग माझ्या बायकोला आणणार न्हायतर नणंद म्हण मिरवशील अन माझ्या बायकोला कमला लावशील."
"व्हय तर आता बघू किती दिस थांबतोयस???"
"आर भांडू नका बाबांनो लहान हाय का आता? भूषणची आई वैतागत म्हणाली. पोरी मला वाटतय की तू एकदा इचार करावास प्रेम किती असलं तरीबी नंतर लै प्रश्न उभा राहत्यात... तू श्रीमंतघरची पोर तुला झेपणार हाय का ? भूषण चार खोल्यांचा आत्ता बंगला बांधला हाय... तू मोठ्या वाड्यात राहिलेली पोर...मला माहीत हाय तुमचं प्रेम हाय एकमेकांवर पण काय व्हत लग्नाआधी सगळं भारी वाटतं हा माझ्यासाठी एवढं करतोय मला त्यो आवडतोय पण जव जगायची येळ येती ना तवा सगळ्या चूका दिसायला सुरवात व्हती. मग वाटत की आपण ह्या गोष्टींचा इचार आधी का नाय केला. म्हणून मी तुम्हाला दोघांना पण सांगती प्रेमपूरता इचार नका करू आयुष्यभर तुम्ही एकत्र राहू शकणार हाय का याचा इचार करा न मग ठरावा. बाई माझी रागावू नकस बघ बाईच्या जातीत लै सहनशक्ती भरलेली असती.ती सगळ्या बऱ्या वाईट गोष्टींचा सामना करू शक्ती तिच्यात तेवढी ताकत असती पण गरीबघरची पोर श्रीमंत घरी नांदू शकती पण श्रीमंतघरच्या पोरीला गरिबाघरी जुळवून घ्यायला जमतच अस न्हाय. माझा भूषण कमी न्हाय पडणार कशात मला ठाव हाय पण मला वाटतं आई वडिलांशी तू बोल आधी मग भूषणला कळव तू इचार कर मग आम्ही रितसर मागणी घालायला येतो."
भूषणची आई अडाणी असली तरी स्वप्नाला त्यांचे म्हणणे पटले होते. तिला त्यांच्या एवढ्या विचारी समजवण्याचं कौतुक वाटत होतं.
"आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्ही बोलल्याचा विचार करून मगच काय तो निर्णय घेईन प्रेमात आहे म्हणून मी भविष्याचा विचार करणार नाही असं नाही आधी सगळा विचार करेन मग आई बाबांशी बोलून तुम्हाला कळवेन." स्वप्ना
समजूतदारपणे बोललेलं बघून भूषणच्या आईला बरं वाटलं.
"व्हय आई त्यांच्या घरच्यांशी बोलल्याशिवाय मी पण कोणता निर्णय न्हय घेणार अन आता ह्या वीरच्या बघून तर मी अजिबात लग्नाची घाई करणार न्हाय." भूषण पटकन बोलून गेला आणि आईला झालेली गोष्ट सांगितली.
"भूषण फक्त तूच समजवू शकतो बाबा त्याला एकदा मनात काय हाय हे तर बघा त्याच्या सोन्यासारख्या पोरीचं मात्र केलं र..."
"आई मी बोलीन बघू.. चला स्वप्ना घर दाखवतो तुमाला." भूषण उठला. बंगला चार रूमचा असला तरी प्रशस्त खोल्या होत्या. फर्निचर नसलं तरी सगळं सामान नीटनेटक्या पद्धतीने मांडलेले होते. स्वयंपाकघरात पाऊल ठेवले तेंव्हा स्वप्नाला एकदम प्रसन्न वाटले . अर्ध्यावर पितलेची अन तांब्याची भांडी स्वछ चकचकीत लावलेली होती. ती फक्त घर डोळ्यात साठवत होती. शेवटी भूषणने त्याच्या खोलीत आणले.
"हे बघा ही माझी खोली."
"वा...! "
"मुळात निसर्ग मला आवडतो म्हणून मी माझी खोली मागच्या बाजूला घेतली हाय अन ही खिडकी अशी मोठी बसवून घेतली हाय. "
"किती भारी हाय हे सगळं खरंच... किती विचार करून हे घर बांधले तुम्ही..."
"घर प्रत्येकाचं स्वप्न असत स्वप्ना... ते मी पूर्ण केल हाय अजून वाढवायला जागा ठिवली हाय बघु..." अस म्हणत भूषण आणि स्वप्ना खिडकीत बसले.
"स्वप्ना वीर अस का वागला हा गोंधळ सुरू हाय माझ्या मनात... मला राहवत न्हाय ... मी उद्या मुंबईला निघतो अन त्याच्याशी बोलतो."
"तुम्ही बोलून वीर ऐकेल?"
"मला त्याचा हा स्वभाव म्हैत व्हता. राग धरून ठेवतो मनात.. मी त्याला इचारले पण व्हते की सुदी भावनेन लग्न करायचा इचार न्हय ना तुझ्या डोक्यात तर त्यानं माझं म्हणणं हसून निस्तारल... मला वाटलं की सुधारला असलं.. खर्च क्रांती वाहिनी वर त्याच प्रेम हाय... बघा काय हुन बसलं."
"तुम्ही ज एकदा बोला बघा आपल्याकडून झालं चांगलं तर ठीक ." स्वप्ना म्हणाली
"हम्मम वाहिनीवर काय परिणाम झाला असलं ना ह्या सगळ्याचा."
"मी कालच फोन केला होता. बोलण्यावरून ठीक वाटली. झालं ते स्वीकारून ती पुढे चालली आहे. पण तिने मनापासून प्रेम केले होते वीरवर तिच्या मनातून सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी नाही जाणार."
"क्रांती मस्त प्रोउड ऑफ यु..अग अस सिलेक्शनला घेललीस तर कोणीच तुला ओलॉम्पिक पर्यंत जायला अडवू शकणार नाही. फक्त काळजी घे हा राग बाहेर येतो की खर्च तू मनापासून खेळतेस."
"सर माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आणि माझं करियर वेगळे मला सिलेक्ट व्हायचं आहे म्हणून मी आत्तापसन तयारी करती." तेवढ्यात रत्ना आली.
"अरे यादी हायस का तू कसलं चितपट केलंस त्या पोरीला... भारी खेळलीस."
मागून समीर आला.
"सर मला वाटलं की ही तुमच्याकडे पाचएक वर्ष खेळत असेल नक्की." समीर
"नाही बाबा आत्ता आली अन मी ट्रेन केलेल्या पोरींना हरवते." सर हसायला लागले.
"सर अहो तुम्ही शिकवलेल्या नि माझ्या आधीच्या गुरूंनी शिकवलेलं सगळं मी।लक्षात ठिवून खेळती."
साठेसर हसत निघून गेले।
"मग सिलेक्शन झाल की मॅडम आमच्याशी बोलायला सुध्दा वेळ मिळणार नाही हो न रत्ना?"
"रत्ना अग तू पण सिलेक्शनला उतरणार हायस ना?"
"व्हय तर..." रत्ना ठसक्यात म्हणाली.
"अरे बापरे।म्हणजे माझ्या दोन्हीही मैत्रिणी पसार..."
"पसार काय र तू प्रॅक्टिसकड लक्ष दे आता..." क्रांती म्हणाली.
तिघेही हसत बाहेर निघून गेले.
वीरने सगळे लक्ष त्या तिघांकडे होते. क्रांतीने हा आठ दिवसांत त्याच्याकडे एकदाही बघितले नव्हते. ठरवून....
पण हे खोटं होत कारण तिला त्याच्याकड बघू वाटत होतं तीच लै प्रेम व्हत त्याच्यावर...
वीर रूममध्ये एकटा बसला होता.
"इतकं लगीच ह्यांनी मला सोडूनपण दिल??? साधं बघत न्हाईत माझ्याकडं... मी जे केले ते बघून कोण माझ्याकडं बघल म्हणा.. पण आता त्यांना जो धक्का दिलाय तो अपमानाचा बफला घ्यायचा व्हता म्हणून झालं... पण मग त्या दुसऱ्या कुणाशी बोलतायत तर मला का तरास व्हतोय. मला काय करायचं हाय म्या तर फक्त अद्दल घडवायला लग्न केलं व्हत. सहा महिन्यांनी डीओर्स मग सामील त्यांचानी माझा इशय..." तेवढ्यात त्याला आर्याचा फोन आला.
"हॅलो वीर भेटायला येताय ना?"
"का?"
"का म्हणजे आपण रोज ह्या वेळेला भेटतो म्हणून.."
"आर्या मला आज न्हाय जमणार अन असा मी रोज भेटेन अशी अपेक्षाही करू नका." वीरने रागाने फोन ठेवला.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत