मल्ल प्रेमयुद्ध - भाग 59 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 59

मल्ल प्रेमयुध्द


संग्रामने भूषणला फोन केला.
"भूषण्या वीर घरी आलाय.."
"का?"
"माहिती न्हाय.. काय बोलला न्हाय आला तसा रूममधी बसलाय."
"बर..."
"तू येतोस का?"
"न्हाय... त्याच आयुष्य हाय मी न्हाय येणार आता... त्याच ठरवलं काय ते?"
"अरर...?"
"दादा लै ऐकलं र त्याच... मित्रत्वाच नात संपलं आमचं.."
"तू वाटतय तसं..?"
"दादा जिथं आपल्या शब्दाला किंमत व्हती ती संपली मला वाटतय मग परत अपमान करून घ्यायला का येऊ?"
"मला म्हायती हाय तू दुखावला हायस पण हे सुद्धा म्हायीत हाय दोघांच्या मनात एकमेकांविषयी अजूनपण तेवढीच आस्था अन प्रेम हाय."
"दादा.. म्हायीत न्हाय पण आजूनपण मन दुःखी हाय... तू बोलून घे त्याच्याशी त्याच मन मोकळं व्हायला पाहिजे न्हायतर तसा तो कुणाशी बोलणार न्हाय."
"म्हणूनच म्हणलं तू ये..."
"दादा आत्ता नको तू बोल... काय व्हत तसं कळव मग मी यीन... दादा वैनीचा फोन येतोय तिला सांगू का वीर घरी हाय म्हणून..."
"व्हय तिला फोन आला असलं कुणाचीतरी न्हय म्हंटल तरी तिला काळजी वाटत असलं... बोल तू मी ठेवतो.." संग्रामने फोन ठेवला भूषणने क्रांतीला फोन केला.


"हॅलो हा वैनी..."
"भाऊजी आर्याचा फोन आला व्हता. म्हणाली वीर न्हाय तिकडं.. कुठं असत्याल? भाऊजी तुमाला फोन आला व्हता का?"
"वैनी शांत हो... तुला काळजी हाय त्याची पण तो तुझा थोडातरी इचार करत असल का ग?"
"भाऊजी आत्ता मला ते महत्त्वाच वाटत न्हाय मला ... ते कुठं असत्याल."
"तो घरी आलाय..."
"काय??? कधी?"
"आत्ता संग्रामदादाचा फोन आला व्हता."
"बर बस ते सुखरूप हायत हे महत्त्वाच..बर तुमी जाणार हाय का?"
"कशाला वैनी परत अपमान करून घ्यायला जाऊ का?"
"नाय व भाऊजी मला तसं म्हणायचं नव्हतं. तुमचा जीव राहणार न्हाय म्हणून ईचारल.."
"जीव तर न्हाय राहत पण न्हाय जाणार मी..."
"बर ठीक हाय... भाऊजी कोर्टात बोलावत्याल एवढ्या 2 दिवसात.. येत्यात ना ते..."
"म्हायीत न्हय वैनी.. पण नोटीस जेल न त्याला.
"हो जाईल माझ्या वकिलांकडून.."
"त्याच आता काय म्हणणं हाय ते संग्रामदादाचा फोन इल तवाच समजलं...तू परत कधी जाणार मुंबईला?"
"कोर्टाची तारीख झाल्यावर..."
"बर...तुला मी कळवतो फोन करून तू नको काळजी करू ठेवतो.."
"हो भाऊजी..."


संग्राम रुममध्ये फेऱ्या मारत होता तेवढ्यात तेजश्री आली.
"आव काय झालं? अश्या सैरभैर हुन का फेऱ्या मारताय? कसला एवढा इचार करताय?"
"वीरशी बोलावं का न्हाय ग? के पण कळना?"
"त्यात एवढं के इचार करायचा हाय भाऊ न तुमी त्यांचे मग बोला त्यांच्याशी.. आता त्यांना समजून घेणार कोण हाय बर. आबा जेई त्यांच्या माग उभं असलं तरी त्यांच्याशी मनातल्या काय गोष्टी न्हय बोलू शकणार ना...? ज बोला तुमी ते न्हाय बोलले तर मग बघू पण आपण समजून घ्यायला पाहिजे ना त्यांना... ते चुकीचे वागले याचा पश्चाताप झाला असलं त्यांना... किंवा अजून कोणत्यातरी अडचणीत असलं तर आपल्या माणसाला आपणच समजून घ्यायला पाहिजे ना.."
"तेजु मनातल्या घालमेलीला बरोबर थांबवती तू..जातो मी..."
"ज तुम्ही लवकर नाय आला तर मग मी जेवणाचं ताट घिऊन येते कधी खाल्लय के म्हायीत, जेवू घालू त्यासनी."

संग्राम वीरच्या रूममध्ये गेला. वीर पलंगला टेकून एकटक नजर रोखून विचार करत होता.
"वीर येऊ का?" वीर दचकला मानेनेच ये म्हणाला.

"काय झालंय अस विचारायचं का तू का आलास हे इचारायचं?" संग्राम त्याच्या जवळ बसत म्हणाला. वीरने संग्रामकडे बघितलं.
"दादा मी कुस्ती सोडली. आता मी कधीच न्हय खेळणार."
"काय??" संग्राम दचकला.
" व्हय दादा आता संपलं सगळं... माझा विचार घाण हायत, मी एका पोरीचं आयुष्य बरबाद केलंय मी चांगला माणूस न्हाय, आता कुस्ती हा इशय माझ्यासाठी संपला."
"वीर हे काय बोलतोयस तू...? तू कुस्ती खेळणार न्हाईस... आर काय डोक्यात घेतलंयस हे..." तेजश्री वरती अली तिच्या हातात एक पाकीट होत.
"अहो हे आत्ता पोस्टमन देऊन गेलत... भाऊजींसाठी हाय" तेजश्रीने ते पाकीट वीरकडे दिले. वीरने पाकीट उघडून वाचले.

"कोर्टाची तारीख हाय उद्या... बोलावलंय... सहा महिने इचार करायला येळ दिला व्हता."
"आता कायच व्हवू शकत न्हय का?"
"व्हईल की पण मला काय करायचं न्हाय... उद्या व्हईल घटस्फोट..."
"तुमच्या मनात असलं तर मी बोलू का क्रांतीबर..."
"न्हाय वैनी..."
"मग आता काय ठरवलं हायस? आर्या???"
"दादा ती पोरगी अन तिचा बाप मला त्यांच्या घरजावई करायचं म्हणत्यात. ते माझा वापर करतायत हे सुद्धा माहीत झालाय मला. दादा मला शेती करण्याची माझी त्याशिवाय आता काय बी इच्छा न्हाय.. साधा सेमिफायनलला पोहचू शकलो न्हाय मी, आता मी कुस्ती न्हय खेळू शकणार. "
"असा इचार नको करू तू हार मानणारा न्हाईस माझा भाऊ असा नव्हता अन न्हाई.."
"दादा माझी शपथ हाय ही गोष्ट कुणालासुद्धा सांगू नका सध्या मला एकट्याला राहायच हाय थोडं दिवस... एकटं..."
"वीर आर...?"
"न्हाय दादा माझ आयुष्य कुस्ती असलं तरी मी आता खेळू शकणार न्हाय मला जबरदस्ती करू नका."

"पण आर्या आली इथपर्यंत तर?"
"तिला काय सांगायचं ते मी बघतो. तुमी नका तिची काळजी करू..." संग्रामने तेजश्रीला खुणावल दोघे बाहेर गेले. वीर पुन्हा विचारात गुंतून गेला.



स्वप्ना खुश आहे बघून आईने विषय काढला.
"स्वप्ना अग भूषणच्या आईला कधी भेटायला जायचं?
"काय घाई आहे आई..? जाऊ की अजून आम्ही एकमेकांना समजून घेतोय."
"आता आणखी किती समजून घ्यायचा लावून दे बर मला फोन मी बोलते."
"आई अग एवढी घाई का?"
"हे बघ 24 वर्षाची होशील उद्या... गावात लोक चर्चा करतात तुझ्या बाबांना विचार."
"आई हा नंबर घे अन बोलून घे तू.." एवढं बोलून स्वप्ना फोन ठेवून निघून गेली.
तिच्या फोनवरून स्वप्नाच्या आईने फोन केला.
"हॅलो स्वप्ना बोल की.."
"मी स्वप्नाची आई बोलती."
"आई बोला की?"
"मला तुमच्या आईसोबत बोलायचे होते."
"हा देतोय..." भूषणने फोनवर हात ठेवला आणि आईला हळू आवाजात स्वप्नाच्या आईचा फोन हाय हे सांगितले.
"नमस्कार बोला ताईसाब..."
"नमस्कार वहिनी... मला महत्वाच बोलायचं होत. म्हणजे ह्या पोरांच्या लग्नाविषयी कारण अहो हे फक्त भेटतात, बोलतात पण आत्ता लग्न करायचं नाही म्हणतात. उद्या स्वप्ना 24 वर्षांची होईल.."
"व्हय मी सुदा भूषणला तेच सांगत व्हते.. उद्या आमी येतो स्वप्नाचा पण वाढदिवस हाय तर साली बोलणी करून घेऊ..."
"बर पण वहिनी एवढ्या लांबचा प्रवास झेपेल ना तुम्हाला नाहीतर आम्ही येतो."
"के पण तरास न्हय व्हणार , पण हे माझ्या लाडक्या सुनेला सांगू नका आम्ही येणार हाय ते.."
"मनापासून खुश केलं वहिनी तुम्ही मला.. सावकाश या. वाट बघतो." फोन ठेवला तसा भूषण म्हणाला.


"आई आग काय मला तरी ईचारायचं..?"
"तुला न्हय जायचं का उद्या?"
"तसं न्हय आई पण आम्हसनी घाई न्हय लग्नाची..."
"पण आम्हसनी हाय ना.. एक काम कर संग्रामला अन तेजश्रीला सांग उद्या जायचं हाय ते..."
"त्यांना कशाला?"
"आर न्हय म्हंटल तरी ते आधी त्याचे नात्यातले. आपलं सांगायचं कर्तव्य हाय."
"आई वीर आलाय पण मी भेटायला गेलो न्हाय त्याला.."
"हे बघ तो बोलला असलं तुला पण कस हाय की तुमी लहानपणापासूनच मित्र तो बोलला म्हणून तुला वाईट वाटलं खरं पण तुमाला एकमेकाची काळजी वाटत न्हाय का?"
"आई जाऊदे तो इशय मी नंतर इचार करीन त्यावर, मी चिनूला घिऊन येतो तिला पण घिऊन जाऊ आपल्याबर."
"तिला?"
"असुदे ग क्रांती येणार न्हाय तर माझ्या लहान बहिणीला घिऊन जाऊ..."
"बर बर.."
भूषणने पटकन शर्ट अडकवला आणि बाहेर पडला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
पुणे

मैत्री या शब्दावर विश्वास असावा कारण आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळत नाही तेवढं मित्र किंवा मैत्रिणीला समजते. मित्र बोलला तर आपणं नाराज होतो हे जरी खरं असलं तरी त्यामागे कारण प्रेम हेच असत ना...
वीर कुस्तीच्या खेळातून माघार घेतोय. पण त्याच क्रांतीवर प्रेम आहे ह्याची जाणीव अजून झाली नाही. तो घटस्फोट घेतोय खरा पण तो राहू शकेल क्रांतीशिवाय आणि कुस्तीशिवाय????