मल्ल प्रेमयुद्ध - भाग 60 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 60

मल्ल प्रेमयुद्ध







भूषण संग्रामला भेटायला वाड्यात गेला. तेजश्रीने त्याला पाणी दिले.

"भाऊजी बसा हे येत्यात मी चहा आणते."

"वैनी चहा नक दादाला लवकर बोलावं फक्त."
तेवढ्यात संग्राम आला.
"आलो आलो... कसली घाई एवढी?"
"दादा आर स्वप्नाच्या आईचा फोन आला व्हता ते म्हणत्यात लग्न ठरवायला या उद्या कारण उद्या स्वप्नाचा वाढदिवस हाय म्हणून त्या निमित्ताने लग्नाची बोलणी करू. तू अन वैनी चला बरोबर."
तेजश्री आणि संग्राम एकमेकांकडे बघायला लागले.
"काय झालं दादा?"
"उद्या घटस्फोटाची तारीख हाय... आम्हाला जावं लागलं वीर बर."
"व्हय का? मला न्हाईत नव्हतं कस म्हायीत असलं"
"मग तू जाऊन ये बोलणी करून.." संग्राम
"वीरचा इकडं घटस्फोट व्हनार अन मी माझ्या लग्नाची बोलणी करायला जाउ का? न्हय दादा अशायेळला मी त्याच्या बरोबर असणं महत्वाच हाय."
"आर पण.." तेवढ्यात वीरने भूषणला बघितलं आणि तो दारामाग उभा राहिला.
"हे बघ दादा आयुष्यात प्रत्येक येळी मी त्याच्या बरोबर व्हतो. आता त्याची चूक असली तरी मला त्याच्या मग उभं राहिलं पाहिजे अपमान बाजूला सारून अन वाढदिवस पुढच्यावर्षी यील लग्न ठरवायला तोच मुहूर्त असावा असं हाय व्हय थोडं."
वीर ऐकत होता त्याचे डोळे पाण्याने भरले. त्याला जाणवले भूषणला आपण दुखावलं पण तो किती विचार करतोय आपला...

"एक तू जा स्वप्नाला वाईट वाटलं आर.."
"न्हाय तिला नव्हतं म्हायीत मी येणार हाय ते उद्या, अन आत्याना फोन करून कळवीन.." .
"तू काय ऐकणार न्हाईस..."
"किती वाजता जायचंय उद्या.."
"11 वाजता."
"तुम्ही जा पुढं मी मागून येतो वीर ला आवडलं न्हय आवडलं मी आलेलं म्हैत न्हाय परत त्याचा गैरसमज व्हायचा की मी वैनीसाठी आलो म्हणून.." भूषण बोलला तोच वीर भायर आला.

"न्हाय माझा न्हाय गैरसमज व्हायचा,तुझ्यासारख्या मित्राला मी दुखावलं यापेक्षा वाईट गोष्ट ती काय र??? भूषण्या लेका माफ कर मला." वीरने हात जोडले.

"हे लेका काय करतोयस ? माणूस बिथरल्यावर काय करणार ना? चल जरा चक्कर मारून येवू तुला बर वाटल."
"भायर यायची इच्छा न्हाय बघ."
"आर आपल्या नेहमीच्या जाग्यावर गेल्यावर शांत वाटलं तुला."
"बर...आलो आवरून.." वीर वर गेला.
"बर वाटल र वीरला समजून घेतलंस न्हायतर एवढा अपमान केल्यावर कोण परत एवढं प्रेमान बोललं असत..ह्यालाच तर मित्र म्हणत्यात ना.. ना रक्ताचं, ना नात्याचं पण सगळं कळतं..."
"दादा मी इतरांच्या बाबतीत कठोर आशीन पण वीरच्या न्हाय..."



क्रांती भाकरी थापत होती. दादांनी आईचा चेहरा उतरला व्हता.
"दादा कशाला तोंड बारीक करून बसला हाय? जे व्हत ते चांगल्यासाठी व्हत तुमचं म्हणता ना?"
"व्हय बाय पण तुझ्याबाबतीत अस व्हइल अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं ना... "
"क्रांते एकदा बोल पाहुण्यांशी बघ मगर घेतायत का?" आई
"त्यांनी माघार घेतली तरी मन जुळायला पाहिजे न परत... तीच न्हाईत जुळली तर एकत्र राहण्याला काय अर्थ हाय... समाजाचा इचार करून मला माझ्या पोरीचं वाटुळ करायचं न्हाय.."
"आव पण एकदा बोलली तर..."
"त्यांना वाटत असत तर त्यांनी एकदा तरी फोन केला असता न्हवं तुलना जर एकत्र राहायचंच नाय तर आपण का आग्रह करायचा."
"दादा मला पण वाटलं व्हत की त्यांना काहीतरी वाटत असेल माझ्याविषयी पण आता वाटतय तो माणूस नंतर वागला तेच खर व्हत... मी ज्या माणसावर प्रेम केलं तो हा माणूस नव्हता. फसले मी माणूस ओळखायला."

"तुला वाटतय तर एकदा बोल ग... संसार वाचला तर..."
"आई चूक त्यांची व्हती अस वाटलं बोलण्यानं प्रश्न सुटतील एकदा बोलायला पाहिजे. पण मुंबईला त्यांचं वागणं बघून नको झालं. जे व्हनार ते चुकणार न्हाय आपण आता काय करू शकणार न्हाय. मी खंबीर हाय तुम्ही अस तोंड पाडून बसू नका मग मला तरास व्हतो. आणि होमी उद्या कोर्टातल काम झालं की लागलीच निघीन मुंबईला आता मला थांबायला न्हाय जमणार, साठेसर सारख फोन करतायत. जायला पाहिजे."

"आग पण लगीच ?"
"आई आता किती दिवस राहिली ग..."
"पण व्हतीस कुठं घरी,सतत व्यायाम अन वस्ताद व्हतीस का घरी?"
"आई संसार न्हाय नशिबात आता आयुष्य घडवायला पाहिजे तुझं न दादांच नाव मोठं करायच हाय मला."

"नशिबात का न्हाय, आपण बघू तू अजिबात काळजी करू नकोस."
"हा तुम्ही काय दुसरं लग्न बिगण लावायचं म्हणताय का आपल्यात न्हय चालत बर... पोर अशी राहिली तरी चालल पण लग्न दुसरं न्हय करायचं.."
"आग लोक कुठं पोहचल्यात आशा अन तू काय घिऊन बसली या..."
"दादा आता हा इशय नको मलाच... मला न्हाय वाटत आता आयुष्यात मी परत लगीन करीन..."


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत