कुसंस्कार कसे येतात? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कुसंस्कार कसे येतात?

मित्रांच्या संगतीनंही येवू शकतात कुसंस्कार?

संस्कार.......आदर्श संस्कार.......संस्काराच्या बाबतीत कोणीही म्हणतात की माणसानं आदर्शवादी बनावे आदर्श संस्कार ठेवावे. आदर्श असावे.
आदर्श, आदर्श, आदर्श......नक्कीच या शब्दाची कोणालाही चीड येईल. कारण आज आदर्शपणा तरी आहे समाजात का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. आजचा समाज हा आदर्श दिसत नाही. आदर्श वाटत नाही. अन् आदर्श बनायचा विचारही करीत नाही. कारण आज अशी आदर्श बनविणारी केंद्र नाहीत. अपवाद शाळा.
शाळा हे आदर्श बनविण्याचे केंद्र आहे. असे मानले जाते. तिथं संस्कार फुलवले जातात असं मानलं जातं. परंतु अलिकडील काळात शाळेनंही आपले नियम बनवले आहेत. शाळेशाळेत आज स्नेहसंमेलन होत आहेत व त्या स्नेहसंमेलनातून अलिकडे ढिंग क चिका किंवा विभत्स स्वरुपाची गाणी लावून त्यावर नृत्य बसवलं जातं व त्या नृत्यावर भोळ्याभाबड्या मुलांना नाचवलं जातं. कारण विचारताच सांगीतलं जातं की आता समाजाची मांग आहे तशी. समाजाच्या मागणीनुसार आम्हाला शाळेतील स्नेहसंमेलनातून अशा गाण्यावर नृत्य बसवावं लागतं. तसाच हा प्रश्न ज्यानं विचारला. त्याची अशा स्वरुपाचं उत्तर देवून टिंगल टवाळकी केली जाते. म्हटलं जातं की हा व्यक्ती किती जमान्याच्या मागं आहे.
शाळा......शाळा हे संस्कार निर्माण करणारं केंद्र. त्या शाळेतून कुसंस्कार फुलवलेच जात नाहीत. मग जिथं कुसंस्कार फुलवले जात नाहीत. तिथं अशी विभत्स स्वरुपाची गाणी का बरं लावावीत? असा प्रश्न पडतो. खरं तर शाळेतील जाणाऱ्या प्रत्येक मुलांचं वेळापत्रक तयार केलं असता दिवसाच्या चोवीस तासातून अगदी दोन ते तीन वर्षाचे असणारी शाळेत जाणारी मुलं त्या शाळेतील शिक्षकांच्या सानिध्यात पाच ते सहा तास राहतात. ती पालकांच्या सानिध्यात पाच ते सहा तास राहतात. उरलेल्या बाकी तासात ती मित्रांसोबत राहतात व काही तास ते झोप घेत असतात. अलिकडे तर असा काळ आला आहे की त्या काळात मुलं हे झोपण्याच्या काही वेळेचा उपयोग मित्रांशी मोबाईलवर बोलण्यात घालवतात काही मुलं मायबापासमोर बोलतात तर काही मुलं मायबापामागं. कधी ते व्हाट्सअपवर बोलत असतात तर कधी ते मेसेंजरवर बोलत असतात. काही मुलं तर फोन लावूनही बोलतात. व्हाट्सअप किंवा मेसेंजरवर बोलणं सोपं असतं. ते कुणाला दिसतही नाही आणि पटकन डीलीट मारता येतं. असली हुशार पिढी. आज या पिढीची मुलं थोडीशी मोठी झाली आणि ती शाळेत जावू लागली आणि शाळेत समजा स्नेहसंमेलन असलं की त्यांना मजा येते. त्याचं कारण असतं त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर पडणं. ती दाखविण्याची संधी असते त्या मुलांना. त्यातच ती मुलं स्वतः आपल्या शिक्षकांनी कोणत्या गाण्यावर नृत्य बसवावं याची आवड करीत असतात आणि शिक्षकही त्यांना निराश न करता त्यांच्या गाण्याची आवड जोपासत असतात. त्याचं कारण असतं त्यांना राग येवू न देणं. मग मुलं वात्रट गाणंच शोधतात व शिक्षकही शाळेत वर्षातून एकदाच ते संमेलन होतं म्हणून त्या गाण्यांना मंजूरी देत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की अशी गाणी लावली तरी त्यातून काय शिकता येतं? सुसंस्कार की कुसंस्कार? नक्कीच बिभत्स स्वरुपाची गाणी स्नेहसंमेलनातून लावली गेली तर त्यातून कुसंस्कारच वाढीस लागतील. सुसंस्कार नाही. मग हे कुसंस्काराचे गाणे लावायला मुलं शाळेतील शिक्षकांना सांगतात कसे? त्या गाण्यांची निवड पालक करतात का? त्या गाण्यांची निवड शिक्षक करतात का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. कोणताही शिक्षक हा शिलाकी जवानी वा काटा लगा वा डोला रे डोला या गाण्यांची निवड स्नेहसंमेलनाच्या नृत्यासाठी करीत नाही. जरी ती मुक्त अभिव्यक्ती असली तरी. मग ह्या गाण्याची निवड कोण करतो? अर्थातच मुलं. मुलांना अशी गाणी फार आवडतात. मग तीच गाणी त्या मुलांना का आवडतात? मायबाप तसे सांगतात का? शिक्षक तसे सांगतात का? नाही, ते सांगत नाहीत. जरी बालपणापासूनच मुलं आईच्या सानिध्यात पाच ते सहा तास असली तरी. तीन वर्षानंतर तीच मुलं पाच ते सहा तास शिक्षकांच्या सानिध्यात असली तरी. मग कोण सांगतं ती गाणी निवडायला? तर त्याचं उत्तर आहे आपले मित्र आणि हेच उत्तर शंभर प्रतिशत खरं आहे.
आपला विकास चांगला व्हावा. आपण आदर्श बनावं. आपल्यात चांगले विचार यावेत. चांगले संस्कार फुलावेत यासाठी आपल्याला स्वतःला तसा विचार करण्याची गरज आहे. हे आदर्शपण आपल्याला ना कोणी मायबाप जपायला शिकवणार नाहीत कोणता शिक्षक. आपण बिघडलो तर नुकसान आपलंच होणार. आपल्या मायबापाचंही नाही आणि आपल्या शिक्षकांचही नाही ना आपल्या मित्राचं. कुसंस्कार फुलवायचेच असेल आपल्यात तर शाळेत जाण्याची गरज नाही. जास्त शिकण्याचीही गरज नाही व आपल्या मायबापाचा पैसाही विनाकारण खर्च करण्याची गरज नाही. आपले मायबाप आपल्याला शाळेत टाकतात. आपण चांगले बनावं म्हणून. अन् शिक्षक आपल्याला शिकवतात. कारण आपण कोणत्याच क्षेत्रात मागं पडू नये म्हणून. त्याचा मोबदला शिक्षकांना मिळतो. परंतु आपण जर चांगले निपजलो ना अन् सुसंस्कार आपल्यात फुलले तर त्याचा आनंद मायबापांना तर होतो. व्यतिरिक्त शिक्षकांनाही त्याचा आनंद होतो. आपल्यावर कुसंस्कार फुलण्यासाठी आपणच स्वतः दोषी असतो. ना आपले आईवडील ना आपले शिक्षक. महत्वाचं असते आपली संगत. आपली संगत कुणाशी आहे.
पुर्वी स्नेहसंमेलनातून चांगल्या गाण्यावर मुलं नृत्य करायची. जे गाणे शिक्षकांनी निवडलेले असायचे व त्या काळातील शिक्षकही तसेच असायचे. त्यांचा पेहराव, केससज्जा चांगली असायची. त्यात बिभत्सपणा व आतितायीपणा नसायचा. तसेच मायबापही तसेच असायचे. त्यांचा पोशाखही साधा आणि केससज्जाही. त्यांना कोणी अडाणी म्हटलं तरी चालेल. तसंच त्या शिक्षकांना जुन्या पिढीतील शिक्षक म्हटलं तरी चालेल. आज काळ बदलला व बदलत्या काळानुसार आपल्या संगती बदलल्या व संगतीचा परिणाम असा की स्नेहसंमेलनातून बिभत्स गाणी गायली जावू लागली. त्यावर नृत्य केले जावू लागले. आजच्या या बदलत्या काळानुसार शिक्षकानं आपला पेहराव बदलवणे गरजेचे नव्हते संस्कार फुलवतांना. परंतु आजचा शिक्षक तेही विसरला. विसरला की आपण शिक्षक आहोत. बऱ्याचशा शिक्षकांची शाळेत केससज्जा, पोशाख रुपरेषा, वाखाणण्याजोगं असतं. ते असा विचारच करीत नाहीत की आपण असा पेहराव केल्यास मुलंही तसाच पेहराव करतील. जो पेहराव भविष्यात गुन्हेगारी घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल.
विशेष सांगायचं म्हणजे मुलांवर संस्कार टाकणारी तीन माध्यमं अगदी महत्वाची आहेत. पहिलं माध्यम म्हणजे त्यांचे आईवडील. आईवडील जर चांगले असतील. ते चांगले वागत असतील. तर मुलं चांगली होतीलच. याचाच अर्थ असा की ते संस्कारी निघतीलच. तशीच त्यांची शिक्षकमंडळी जर चांगली असली तरही त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होणार व ते संस्कारी बनतील आणि तिसरा परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मित्र. ज्या गोष्टी मुलं शाळेतून शिकत नाहीत. ज्या गोष्टी मुलं मायबापांकडून शिकत नाहीत. त्या गोष्टी ते मित्रांकडून शिकत असतात. कारण मायबाप जीवनभर पुरत नाहीत. शाळेतील शिक्षकही जीवनभर पुरत नाहीत. परंतु मित्र हे मरेपर्यंत सोबत असतात. ते जर चांगले असतील तरच आपले दिवस चांगले जातात. जर मित्र वाईट असतील तर आपले दिवसही वाईटच जातात. म्हणूनच मित्र चांगले हवे. मित्र जर दारु पिणारे असतील. तर आपण कितीही विचार केला की मी दारु पिणार नाही. तरीही कधी ना कधी माणूस दारुच्या आहारी जातो. तसाच तो जर शिव्या देत असेल, गांज्या फुकत असेल तर त्याचा मित्र देखील एक ना एक दिवस गांज्या फुकेलच. शिव्या देईलच यात शंका नाही. म्हणतात की हंसानं कावळ्याची संगत करु नये. कारण कावळा केव्हा मांसाच्या आवडीनं हंसाचा जीव घेईल ते काही सांगता येत नाही. दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास सापाचं देता येईल. साप हा असा प्राणी आहे की त्याची दोस्ती परवडत नाही. तो केव्हा दंश करेल वा केव्हा गिळंकृत करेल हे सांगता येणे कठीण आहे. म्हणूनच आपले मित्रही अशा सापासारखे वा कावळ्यांसारखे नसावेत की आपल्याला वाईट गोष्टी शिकवतील व ज्यातून आपलाच विनाश होईल. आपले मित्र मांजरीसारखेही नसावेत की जे स्वतःचाच स्वार्थ पाहतील. महत्वाचं म्हणजे आपले मित्र हे हंसासारखे वा श्वानासारखे असावेत. कारण ते प्रामाणिक असतात व आपल्याला संकटातून वाचवत असतात नव्हे तर आपली सुरक्षा करीत असतात.
विशेष बाब अशी की आपले मित्र हे आदर्श असावेत की ज्या मित्रांच्या संगतीनं आपल्याला आदर्श बनता येईल. आपले मित्र जर आदर्श नसतील तर आपल्यातही आदर्शपणा येणार नाही व आपला कार्यभाग बुडेल. मित्लाःच्या संगतीनेही कुसंस्कार येतील. तेव्हा तसं होवू नये म्हणून आपण त्याच गोष्टीचा स्वतः विचार करुन मैत्री करायची झाल्यास आदर्श मित्राशीच करावी. जेणेकरुन आपल्यातील आदर्शपण आपल्याला सिद्ध करता येवू शकेल हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०