मल्ल प्रेमयुद्ध
साठेसरांना वीरला बघून आनंद झाला.
"व्हेरी गुड वीर तू परत आलास... आम्हाला वाटले आता तू पुन्हा येणार नाहीस."
"सर मी परत आलो नाय... मी यापुढं कधी खेळणार न्हाय... पण मी इथं आलो तर चाललं नव्ह?"
"म्हणजे???"
वीर बेंचवर बसला. साठेसर त्याच्या बाजूला बसले.
"वीर मक समजलो नाही. तू असा वागलास तर आर्या न तिचे पपा तुला शांत बसू देतील का? अरे या क्लबचा भावी मालक आहेस तू... तू इथं आळस तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझा अन आर्याचा संबंध आहे म्हंटल्यावर मी कोण नाही म्हणणारा..."
"सर माझा डिओर्स झाला. या सगळ्यात माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम न्हाय झाला. पण सर मी केलं ते चूक हाय अन ती चूक मला सुधारायची हाय. त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे."
"कसली? फक्त एक सांगतो मी आर्या अन तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन काही करणार नाही. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे."
"सर फक्त मला इथं येऊद्यात बस...आणि खेळ म्हणू नका."
"वीर तू मला संभ्रमात टाकतोयस तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे मला कळत नाही."
"प्रेम..."
वीर पुन्हा एक सांगू... आर्या अन तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन काही करू नकोस त्यांचे हात खूप वर पर्यंत आहेत."
"सर तुमी नका काळजी करू."
तेवढ्यात समीर आणि क्रांती समोरून आले. वीरने क्रांतीकडे बघितले पण क्रांती तिच्या विचारात पुढे निघून गेली. समीर एकटाच फक्त बडबड करत होता.
"हे यार तू असच शांत शांत राहणार आहेस का?" रत्ना त्यांना जॉईन झाली.
"समीर प्रेम न्हाय ना एक सहीमुळं संपत."
"मान्य पण आता भूतकाळ झाला गेला विसर..."
"मला न्हाय वाटत ती इसरल.."
" बर ... पण मग हे अस किती दिवस?"
"समीर मी हाय तशी हाय मला काय सूड फरक न्हय पडणार... मी मॅच चा इचार करत व्हते... माझं कोणावर सुद्धा प्रेम न्हाय अन व्हत ते संपलं."
"बर मग दोन दिवस झालं हसली न्हाईस ते.." क्रांती मोठ्याने हसली.
"बस ... हसली..बघ" क्रबती तणतणत बाहेर गेली. समीर तिच्या मागे जायला निघाला.
"समीर राहू दे जर येळ एकटं तिला दाखवत नसली तरी खचली ती आतन..."
"तू वहिनी न तिची मग अस कस तिला एकटीला सोडतेस."
"वाहिनींच्या आधी मैत्रीण हाय मी तिची वीस वर्षे एकमेकांना ओळ्खतोय.. समीर नको तिच्या मागपुढं करू मला म्हायीत हाय तू तिच्या प्रेमात पडलायस पण मित्रा मित्र म्हणून राहा कारण ती फक्त वीरच्या हाय.."
"रत्ना डिओर्स झालाय त्यांचा अन मी प्रेम करतो तिच्यावर अस तुला का वाटलं?"
"अरे सतत मागपुढं करतोस, तीन हसावं म्हणून किती प्रयत्न करतोयस, कितीतर येळ मी तिच्याकडं तुला एकटक बघताना बघितलंय मी. पण प्रेमाचा अन मैत्री खातर एक सल्ला देते नको प्रेमात पलूस तिच्या.. ती फकस्त वीरच्या हाय.." समीर काहीही न बोलता निघून गेला वीर तीच बोलणं ऐकलं होतं.
"तुला पण असच वाटत न रत्ना मग माझ्याशी बोलत का न्हाईस."
वीरला अचानक मागे बघून रत्ना आश्चर्यचकित झाली.
"म्हंजी...?"
"म्हंजी एक मैत्रीण म्हणून तिला अन एक भाऊ म्हण मला समजावून सांगितल असत तर..."
वीरच वाक्य अर्धवट तोडत रत्ना रागानं म्हणाली.
"व्हय आत्ता आठवली का बहीण? आव कितीवेळा बोलायचा प्रयत्न केला पण बदल्याच भूत इतकं डोक्यात बसल व्हत तुमच्या की तुमाला इतर माणस दिसत व्हती का? म्हणे सांगायचं भावाला... डोळ्यावर पट्टी बांधली व्हती. एवढा मोठा दगाफटका केला तुमी मग की माझ्या मैत्रिणीला काय समजावणार व्हते. ह्या दगेखोर माणसाबरोबर राहा म्हण... न्हाय हो हा सल्ला मी नसता दिला कारण दगड बांधून विहिरीत ढकलायला मी एडी न्हाय माझी मैत्रीण बुडणार हाय मला म्हायीत असताना मी काय समजवायचा तिला... अन हे जे वकील न तुम्ही हे खरं हाय बर कारण मला काय तुमच्या घरात सुध्दा सगळ्यांना म्हायीत हाय की तुमच्यावर तीच किती प्रेम हाय ते... सहजासहजी इसरण्याची गोष्ट न्हाय व ही... म्हणे आम्हाला सांगायला अन समजवायला पाहिजे व्हत...."
तेवढ्यात क्रांती तिथं आली तिने वीरला बघून नजर फिरवली वीर काहितरी बोलायला जाणार तेवढ्यात आर्याने वीरला मागून मिठी मारली.
"वीर कधी आलास एक फोन करायचास न..." क्रांती अन रत्ना तिथून निघून गेल्या.
"हे घर न्हाय... मग सरका... "वीरने तिला बाजूला केले.
"ओहहह हे आपलं आहे सो आपण जे मर्जी ते करू शकतो. ते जाऊदे तू चल घरी मला सगळं ऐकायचं आहे का झाली सगळी प्रोसेस.. तिने काही मागितले का?"
"आर्या हे सगळं एकूण तुम्ही काय करणार हाय..."
"मला काय करायचं म्हणा.. डॅड म्हणत होते की वीर आला की लगेच आपण लग्नाचा मुहूर्त काढू..जाऊयात घरी..."
"लग्न कुणाचं???"
"आपलं वीर..."
"जाऊन सांगा तुझ्या डॅडला हे लग्न व्हनार न्हाय...."
"वीर काय बोलतोयस कळतंय का? तू घरी चाल आपण नीट शांतपणे बोलूयात.."
"मी घेरी येणार न्हाय हात सोडा माझा."
"म्हणजे तू फसवल मला... तू फसवल मला... तुझ्या वडिलांनी मला प्रॉमिस केलं होतं तरी तू फसवल मला..." आर्या रडत बाहेर पडली. साठेसर मागून आले.
"वीर काय केलेस हे तू ....? आता प्लिज तू जा इथून... प्लिज जा नाहीतर..."
"न्हायतर काय व्हणार नाय सर..."
वीर शांतपणे बाहेर पडला.
सुलोचनाबाई संग्रामची वाट बघत बसल्या होत्या.
"संग्राम आलास तू ... डॉक्टर??"
"आल्यात डॉक्टर...या या डॉक्टर वर चला." डॉक्टर संग्रामच्या पाठीमागे त्यांच्या रूममध्ये आले त्या पाठोपाठ सुलोचनाबाई आल्या. डॉक्टरांनी तिला तपासले.
"काय त्रास होतोय...?"
"डॉक्टर नुसतं मळमळ व्हती खाल्लेलं सगळं उलटीन पडतंय... अन आज उभं सुद्धा राहवत न्हाय..."
"ही आनंदाची बातमी आहे... संग्राम तुम्ही बाबा होणार आहात..." डॉक्टरांनी हसून दोघांचे अभिनंदन केले.
"हो पण आता मी आलोय इथे काही औषधे लिहून देतो ती द्या अन दोन दिवसांनी सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये या..." डॉक्टर काय बोलत होते हे संग्रामला कळत होतं की नाही माहीत नव्हते एवढा आनंद झाला होता.
"व्हय डॉक्टर... "डॉक्टर गेले.
"तेजश्री... काय काय बातमी दिली तुम्ही... काय करावं समजना मला...? सुलोचनाबाई बाजूला उभ्या राहिल्या होत्या.
"पाहिलं जा अन तूझ्या आबांना सांग ही आनंदाची बातमी अन पेढे घेऊन ये... देवांना ठेव..."
"व्हय आई आत्ता जाऊन पेढे आणतो अन वीरला पहिला फोन करतो." संग्राम बाहेर गेला.सुलोचनाबाई तेजश्रीच्या शेजारी बसल्या.
"गेल्या काय दिसात लई वाईट घडलं...आता या बातमीन परत आनंद येणार घरात... तेजश्री तुम्हाला काय पाहिजे ते इथं आणून देते पण अराम करायचा अन काळजी घ्यायची...आता बाळाची चाहूल लागलीया पण आता दम धरवत न्हाय..."
"आई आव काय बी गरज न्हाय जाग्यावर सगळं आणून द्यायची मला म्हायीत हाय तुमास्नी आनंद झालाय पण मी आजारी न्हाय गरोदर हाय मला माझं बाळ आळशी नको म्हणून मी सगळी काम करीत पण स्वतःला व्यवस्थित सांभाळून अन तुम्ही हायत की 24 तास माझ्या संग..."
"व्हय मला समजावशील... पण तुझ्या नवऱ्याचं काय...? बघ जो तुला लग्नानंतर दिसला न्हाय ना तो आता दिसल तुला... हलवून सुद्धा द्यायचा न्हाय जाग्यावरण"
सुलोचनाबाई अन तेजश्री हसायला लागल्या.
"हॅलो हॅलो वीर ..."
"दादा काय झालं सगळं नीट हाय नव्ह???"
"व्हय व्हय आनंदची बातमी हाय..."
"काय???"
"तू काका व्हानार हायस..."
"काय???"
"व्हय मी बाबा व्हाणारे... वीर आत्ता तू माझ्याजवळ पाहिजे व्हतास मला कडकडीत मिठी मारावशी वाटती तुला..."
"व्हय... मला पण... दादा वैनीची काळजी घे...अन मी लवकर येतो भेटायला."
वीरने फोन ठेवला अन डोळे पुसले.
त्याला आनंद होत होता. आणि संग्राम आनंदाने वेडापिसा झाला व्हता.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.