मल्ल प्रेमयुद्ध - भाग 64 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 64

मल्ल प्रेमयुद्ध






क्रांती भल्या सकाळी येऊन कोर्टवर प्रॅक्टिस करत होती. घामाने डबडबलेल्या क्रांतीला स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा पराभव करून नव्याने सुरुवात करायचा विचार करत होती. तिला कशाचेच भान नव्हते. पंचिंग बॅग एका ठिकाणी राहतच नव्हती. एवढ्या जोराने ती त्या बॅगवर पंचिंग करत होती.

वीर तिला एकटक बघत होता. घामाने डबडबलेली क्रांती त्याला आणखी आवडू लागली. आपण का वागलो या पोरीशी अस त्याला वाटले. तो लांबून बघता बघता कधी तिच्या जवळ आला त्याच त्यालाच समजलं नाही. आजूनसुद्धा क्रांती तिच्याच नादात होती. वीर एवढ्या जवळ येवुनसुद्धा तिला काहीच जाणवलं नाही. वीर अजूनच तिच्या जवळ जात होता. क्रांतीला चाहूल लागली आणि तिने बॉक्सिंग थांबवली. घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने हलक्या हाताने बाजूला केले आणि तिच्या चेहऱ्यावरून हॅट फिरवला. क्रांतीच्या डोळ्यात तो हरवला. क्रांतीच्या वीर एवढा जवळ होता की क्रांती काहीच करू शकत नव्हती. तिला वीर जवळ हवा होता. पण अचानक तिने वीरच्या छातीवर दोन्ही हाताने जोरात मारले आणि त्याला ढकलले.

"हिम्मत कशी झाली तुमची माझ्या एवढ्या जवळ यायची... आता कोणता नवीन प्लॅन करताय तुमी...? ही अशी खेळी कायुन मी तुमच्या जाळ्यात अडकीन वाटलं का? आधी लांब व्हा माझ्यापासन... " क्रांती जवळपास जोरात ओरडली. वीर गालात हसत मागे सरकला आणि बाहेर गेला. तेवढ्यात त्याला भूषणच्या फोन आला.

"भूषण्या सकाळी सकाळी फोन केलास?"
"व्हय बातमी तशी हाय..."
"काय र काय झालं?"
"आनंदाची हाय घाबरू नकस."
"आता बोलशील का पटकन..."
"पुढच्या आठवड्यात लग्नाची तारीख काढली तू उद्याच निघ.."
"का र अस अचानक एवढ्या लवकर..."
"आर आई एकना तिला स्वप्ना लवकर घरात पाहिजे. महिनाभरपण थांबायला तयार नाय.. मग तुझे आत्या न मामा पण तयार झाले. आबांना ईचारल तर म्हणाले चाललं अमी भूषणच्या बाजूनं तयारीला लागतो. अन मग रात्री तारीख काढली लै उशीर झाला म्हण रात्री फोन केला न्हाय, म्हण सकाळ सकाळ...तुला म्हायती हाय रात्रभर मला डोळा लागला न्हाय कधी एकदा तुला सांगतोय अस झाललं.."
"आर वा पण स्वप्नानी पण मला फोन न्हाय का मेसेज पण न्हय केला?"
"ती तुला न्हाय तर क्रांतीवहिणीला तिच्या बाजूनं बोलावून घेणार हाय चार दिस आधी.. अन लग्न आपल्याकड ठिवलंय चार दिस आधीच व्हाराड आपल्याकडं येणार हाय.."
"लग्न आपल्याकडं???"
"आर तिकडं लग्न ठेवलं तर तेजु वैनीला येत येणार न्हाय महान आपल्याकडं ठेवलंय मग काय क्रांतीवैनी आपल्याकडं येणार..."
"ती परत वाड्यावर उएन शक्य न्हाय..."
"वऱ्हाड वाड्यावर रहाणार न्हाय तुमच्या वाड्याचा मागचा वाडा आबा नीट स्वछ करून घेणार हायत पाहुण्यांना राहायला..."
"आर वा...मी निघतो उद्या लै काम असत्याल अन तुझं नि स्वप्नाच लग्न माझ्याशिवाय शक्य न्हाय... पण स्वप्नाला सांग रत्नाला पण बोलावं म्हणावं र क्रांती यील."
"व्हय व्हय..." भूषणने फोन ठेवला.

"ह्यांनी काय ठरवलंय नक्की.. का मला त्रास देत्यात झालाय ना त्यांचा मनासारख् मग जगू देत ना मला... भूतकाळ विसरायचा प्रयत्न करती पण हे मला विसरू देत न्हाईत..." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आले.


आणि रत्ना येऊन बसली बाजूला.
"काय झालं?"
"काय सांगू... भूतकाळ इसरायचा प्रयत्न करतो पण ओट परत तो येऊन माह्या पुढ्यात उभं राहतोय..."
"वीर आला व्हता?"
"हम्मम... त्यांना समोर बघून माझं भान हरपलं ग... अगदी जवळ येऊन उभ राहील व्हत... एक क्षणात आमची पहिली रात्र डोळ्यासमोर आली. अस का इसरुन जाईन इतक्या लवकर... "
"पण त्यांना आता काय करायचं हाय??"
"म्हैत न्हायनपन मी म्हणाले कीI आता माझ्या आयुष्यात येऊन काय प्लॅन करू नका. पण रत्ना माझ्या अंगातल अवसान जात ग ते समोर आले की अन आता येऊन नुसतं बसत्यात प्रॅक्टिस करत न्हाईत की काय नाय मला भूषण भाऊजीशी बोलायला पाहिजे."
"क्रांते तुला काय करायच ते त्यांचं बघत्याल तुझा न त्यांच्या आता काय संबंध ? अजिबात कोणाला फोन करू नकोस आता."
क्रांतीचा फोन वाजला.
"स्वप्नाचा फोन...?"
"घे बघ काय म्हणती?"
"हॅलो..."
"क्रांती..."
"बोल ना..."
"क्रांती लग्नाची तारीख काढली... पुढच्या आठवड्यात... तू आणि रत्ना 4 दिवस आधी यायचं आहे. लग्न भूषणच्या गावाला ठेवलं."
"आर वा मस्त बातमी दिलीस. रत्नाला सांगते मी. चार दिवस न्हाय जमणार पण मी लग्नाला नक्की येईन कारण आता लगीच सुट्ट्या मिळणार न्हाईत."
"मला काहीएक सांगायचं नाही. तू जर आली नाहीस तर मी मुंबईत येईन."
"बर मी विचारून सांगते तुला..."
"रत्नाला नक्की सांग की मी फोन करू..."
"थांब हाय इथंच देते तिला."
रातनाशी बोलून फोन ठेवला. अन दोन मिनिटं झाले की तेजश्रीचा फोन आला तिचा आवाज एकदम बारीक होता.
"जाऊबाई काय झालं? बऱ्या हाय न तुम्ही?"
"लै बरी हाय."
"म्हंजी...?"
"तू काकू व्हानारेस ना म्हणून..."
क्रांती आनंदाने जागेवरून उठली.
"काय म्हणाला वैनी बापरे किती आनंद झालाय मला... वैनी मी आले की भेटायला येते तुमाला... तुमाला काय पाहिजे तेवढं सांगा... व्हय म्हणून भूषण आणि स्वप्नाच लग्न गावी ठेवलं व्हय?"
"व्हय क्रांती... किती आनंद झाला न तुला आता तशी तू कुणीच राहिली नाहीस आमची तरी...?"
"जाऊबाई पण माणस कशी इसरू मी... बर ते जाऊदे अत्याबाई खुश असत्याल ना..."
"तर सगळं हातात देत्यात अन तुमचे भाऊजी कूस सुद्धा बदलू देत नाहीत."
"वैनी मला स्वप्नाचा फोन आला होता."
"काय करू?"
"क्रांती माणसं नको तोडू... कधी कोण कस बदललं सांगता येत न्हाय ये तू... मी हाय तुझ्याबर..."
क्रांतीने फोन ठेवला आणि आनंदाची बातमी रत्नाला सांगितली.
तेवढ्यात साठेसर आले.

"क्रांती..."
"हा सर..."
"पुढच्या आठवड्यात मी बंगलोरला निघालो आहे ट्रेनिंग साठी.. म्हणून कोर्टसुद्धा बंद ठेवणार आहे. तुम्हाला गावाला जाऊबी यायचं असेल तर या करण आता दुसरा कोच मॅनेज होत नाही."
"बर सर. ."
"जाऊ शकतो आपण चार दिवस आधी..." रत्ना म्हणाली.


साठेसरांनी वीरला बाहेर भेटले अन म्हणाले,
"झालं काम..."
"थँक यु सर...पण क्रांतीच नुकसान व्हता काम नये..."
"मी आल्यावर डबल प्रॅक्टिस घेईन न एक अटीवर... तू पुन्हा जॉईन व्हायचं..."
"माझं काम झालं की नक्की...न्हायतर कधीच न्हाय.."


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.