Mall Premyuddh - 65 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 65

मल्ल प्रेम युद्ध



रत्ना आणि क्रांती बॅग भरत होत्या.
"अस कधीच झालं नाय की आठ दिवस सरांनी सुट्टी दिली. मला कायतरी गडबड वाटती." क्रांती म्हणाली.
"अस काय नसलं खरच त्यांचा प्रॉब्लेम असलं."

"असला तरी चार दिवस ठीक हाय पण एवढे दिवस साठेसर आपले नुकसान करणार न्हाईत."
"व्हय मग बोलयच का सरांबरोबर.."
"नको मग अस व्हईल की आपला त्यांच्यावर विश्वास न्हाय..."
"मग???"
"काय न्हाय आता गावाला जायचं अशी आपण आपलं प्रॅक्टिस सुरू ठेवतोच की..."
"हो आपल्याला बोलावलंय स्वप्नान लग्नाला पण दादा अन हे पाठवत्याल का लग्नाला?"
"अन तिथं परत तीच चर्चा नको वाटतय मला सगळं परत परत... पण न्हय गेलं तर स्वप्ना अन भूषण भाऊजीना वाईट वाटलं ... पण मी दादांशी बोलीन अन मगच ठरविन जायचं की नाय ते.." दोघीही बॅग भरून झोपल्या. क्रांतीला झोप लागत नव्हती.
"रत्ना वीरच्या मनात आता काय असलं... ते माझ्या एवढं जवळ होत की मला कायच सुचत नव्हतं."
"विसरू न्हय शकत न तू अजून त्यांना..."
"माहीत नाही काय झालं मी थांबवू न्हय शकले त्यांना...".
"का??"क्रांतिकडे उत्तर नव्हते.
"नाय ना उत्तर... भविष्य काय या नात्याचं... ?"
"नात न्हायच राहील आता.. अन ठेवायचं पण न्हाय..."
"क्रांती अन समीरच काय?".
"त्याच मग आता.."
"तुला न्हाय जाणवत का की तो सतत माग पुढं करतो ते..."
"तो चांगला मित्र हाय माझा त्यापलीकड मी न्हाय बघितलं त्याच्याकड अजून.."
"तू न्हाई बघत पण तो.. त्याला किती वेळ बघितलंय मी तुझ्याकड बघताना..."
क्रांतीच्या डोक्यात विषयांचा गोंधळ सुरू झाला. विचार करता करता ती झोपून गेली.


आर्या तापाने फणफणली होती.पद्मा आणि विजय तिच्या बाजूला बसले होते डॉक्टर येवून गेले होते पण तिचा टॅप काही कमी झाला नव्हता. पद्मा आर्याचा डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. तेवढ्यात आलोक आला.
"ममा डॉक्टर काय म्हणाले?"
"अरे औषध दिलेत उतरेल ताप म्हणाले."
"बर जा तुम्ही मी बसतो तिच्याजवळ."
"नाही तू आताच आला न जा फ्रेश हो.. जेव आधी मग बस इथे.."
"ममा पण हे अचानक कसे झाले? सकाळी बाहेर पडली तेंव्हा तर ठीक होती."
"वीर वीर मला सोडून जाऊ नकोस प्लिज... वीरssss"
आर्या तापाच्या भरात बोलली.
"अच्छा हे अस आहे का तर?"
"किती समजून सांगायचं या मुलीला पण ही ऐकेल तेंव्हा न..."
"अहो प्रेम आहे तीच वीर वर.." विजय म्हणाले.
"डॅड अहो किती पाठीशी घालता तिला... म्हणूनच हट्टी झाली एवढी कोणाच ऐकत नाही. त्या मुलाला नाही पडायचं याच्यात तर का जबरदस्ती करताय त्याला?" आलोक रागाने बोलला.

"आलोक हेच मी याआधी सांगत होते यांना पण काही ऐकलं नाही. आणि बघ काय परिणाम झाले ते.."
"त्यांनी कधी सांगून ऐकलय का कोणाचं." आलोक रागातच बोलला.
"आलोक डॅड सोबत बोलतोयस तू.." विजय म्हणाले.
"मग मला माहित आहे आणि यानंतरच्या आर्याचा निर्णय सगळे माझे मी घेईन तुम्ही नाही पडायचं यात. मॉम तू सांग ह्यांना ह्यांचा प्रत्येक निर्णय चुकत आलाय आत्तापर्यंतचा... आता नाही. आता नाही हा डॅड तुम्ही आर्याचा निर्णय घ्यायचा."
"बाप आहे मी तिचा..."
"मग..?" आलोक रागात बाहेर पडला.
"पद्मा हा घरचा मालक मी आहे. ह्या घरातले सगळे निर्णय मी घेणार.."
"घर जाता जाता आलोकने वाचवलंय. एवढं कर्ज करून ठेवला होत तुम्ही.. चांगल्या वाईटची आता तरी जण ठेवा हो... आणि आलोकच म्हणाल तर मी त्याला काहीही सांगणार नाही. करण तो जे काही निर्णय गेहेली ते कधीच चुकीचे नसतील."
"एकदा माणूस चुकला म्हणून सारख तेच एकवायची गरज नाही पद्मा.." विजयचा आवाज चढला.
"हळू ओरडा आर्या झोपली. आणि ओरडून चुका विसरून जाता येत नाहीत." विजय ताडताड उठून बाहेर गेले.



सकाळ झाली होती. चिनूने डालग्यातल्या सगळ्या कोंबड्या अंगणात सोडल्या होत्या. चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला होता. सूर्य पूर्ण दिसत नव्हता पण उजाडलं होत. बायकांची शेण काढायची, धारा काढायची घाई सुरू होती. सरसर खराट्याच्या आवाजाने कचरा सारा साफ होत होता. चिनूने सगळा कचरा एक जागेवर गोळा केला नी काढेपेटीने पेटवला. सुकी पान वाऱ्याने उडून आलेला कडबा असल्यामुळे कचऱ्याने लगेच पेट घेतला. गारवा चांगलाच जाणवत होता म्हणून चिनू तिथेच उभी राहून हात शेकत बसली आणि आजूबाजूला पडलेली काटक ती त्या जाळत टाकत व्हती.तेवढ्यात दादा तिच्या बाजूला येऊन उभे राहिले.
"चिनू ...बाई तू लग्नाचा निर्णय घेतला हायस व्हय."
"दादा हे काय अचानक ? अन मी तुमाच्या निर्णया बाहेर हाय का? मी का माझा निर्णय मी घिन..."
"क्रांतीच अस झालाय भिती वाटती बाई कोण माणसाच्या मनात काय असलं काय बी सांगता येत नाय."
"दादा ऋषीच्या घरचे असे न्हाईत हो.."
"रक्त तेच हाय ना?"
"पण दादा तुम्ही सांगा मी काय करू तेच करेन तुम्ही न्हाय म्हणाला तर मी आहे इथंच थांबीन."
"असो अजून लै येळ हाय बघू आणि ठरवू..."
"दादा ताई येणार हाय आज.."
"लग्नाचं निमंत्रण आलंय. भूषणराव स्वतः आले व्हते काल सांगायला. म्हणाले जे झालं ते झालं पण त्यांच्यामुळं आपलं संबंध बिघडायला नकोत"
"बरोबर हाय दादा त्यांचं आपण जाऊ सगळे लग्नाला. मला, ताई नि रत्नाला तर आधीच बोलवलय. आता ताई काय म्हणतीये ते माहिती नाय."
"बघ घेऊन जा तिला... वाटतय आपल्याला पण ह्या सगळ्यामुळ ती खचून गेली हाय जरा तिला पण बर वाटल."
"पण दादा..."
"मला माहित हाय की वीर राव असत्याल तिथं अन सगळं परत तिच्या डोक्यात तेच तेच यील. पणत्यांच्यापेक्षा तुमी हाय ना तिच्या आजूबाजूला सगळेजण मग ह्या बाकीच्या लोकांनचा इचार कशाला कारायचा.."
"दादा लग्न जरी त्यांच्या गावात असलं तरी मुलीकडच्या लोकांची राहायची सोया वेगळीकड केली हाय त्यामुळे तुम्ही नका काळजी करू मी घेईन तायडीची काळजी नीट."

"दादा दाजीची चूक झाली हे त्यांना जाणवलं हाय.ते स्वतः स्वप्नाताईंना तसं म्हणाले."
"पण हे आत्ता जाणवून काय उपयोग हाय का? हे वाईट वागायच्या आधी का काळात न्हाय. माझ्या पोरीची अवस्था बघायला नव्हते ते... नंतर वाईट वाटुन उपयोग काय? "
"दादा तुमाला वाटतय का की त्यांना एम संधी मिळायला पाहिजे."
"न्हाय... पोरींच्या आयुष्याशी जो खेळलं त्याला कशाला पाहिजे दुसरी संधी. माझ्या लेकीवर जो आघात झाला तो भरून निघणार हाय का?"
"दादा अन तायडीची इच्छा झाली तर???"

दादा काहीही न बोलता निघून गेले.
माणसांकडून चुका होत्यात... मी कितीही म्हंटले तरी दादा म्हणत्यात म्हणून ऋषीला सोडू शकते व्हय? त्यांची इच्छा न्हाय म्हणून मी माझं प्रेम सोडू का? आणि सोडले तर ऋषीच् काय? एकदा दाजी ताईशी अस वागलं म्हणून त्यांच्यातले सगळेच तसे असतील व्हय? ऋषी पण तसाच असला तर???




क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED