Mall Premyuddh - 66 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 66

मल्ल प्रेमयुद्ध


जेवण झाल्यावर दादा बाहेर अंगणातल्या खाटेवर बसले होते. थंडी बोचरी होती म्हणूनच खाटेच्या बाजूला शेकोटी लावली होती. क्रांती येऊन त्यांच्या बाजूला बसली.
"क्रांते.." दादांचा आवाज हळवा होता.
"दादा मी बरी हाय... माझं लक्ष आता फक्त खेळावर हाय.."
"लग्नाला जाणार हायस?"
"तुम्ही म्हणाला तर?"
"माझा इश्वास हाय तुझ्यावर पण इश्वासघात करू नकोस.."
"दादा..." क्रांती मनापासून कळवली.
"तर न्हाय क्रांते... आता तुझ्या आयुष्यात वादळ आलं तर मला सहन व्हणार न्हाय, आता तुझ्या बाबतीत तुझा बाप लै हळवा झालाय... आधी वाटत व्हत की, पावन समजून घेऊन घटस्फोट टाळत्याल पण न्हाय त्याच्या मनानी ठरवलं व्हत ते केलं. क्रांते त्यांना पश्चाताप झालाय हे सांगितलं मला चिनू न.. पण परत अस वागणार न्हाईत कशावरन? मला वाटत तू त्यांच्यापासन चार हात लांब राहिलेली बर..."
"दादा मला समजतंय तुमाला काय म्हणायचं हाय... आता त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होऊन काय फायदा न्हाय आता... दादा इतकं वाईट वागल्यावर कोण परत त्या माणसाच्या सावलीला उभं राहिलं?"
"जा तुमी मी लग्नाच्या दिवशी यिन.. संतुला बरोबर घेऊन जा..."
"व्हय दादा.."



जुना असला तरी आबांनी वाडा सजवलेला बघून अस वाटतच नव्हतं की हा सत्तर वर्षांपूर्वीचा वाडा आहे. मजबूत दगडी बांधकाम असल्यामुळे वाद जसाच्या तसा पाय रोवून उभा होता. फुलांनी सजवलेला वाद बघून स्वप्नाचे भान हरपले. मामा, मामी, तेजश्री, संग्राम, वीर सगळे स्वागतासाठी येऊन थांबले होते. स्वप्ना, स्वप्नाच्या घरचे सगळे आज वाड्यात पोहचले होते. सुलोचनाबाईनी स्वप्नाचे औक्षण केले अन मग तिला वाड्यात घेतले.
वीरला मात्र वेगळेच वेध लागले होते.
"दादा माझी जी अवस्था आहे तीच तुझी दिसती वाटत?" ऋषी हसत म्हणाला.
"ऋषी... मी वाट बघतोय पण समोरच माणूस सुदा तेवढाच उत्साही असलं तर त्या वाट बघण्याला अर्थ हाय ना.. अमी।माती खाल्ली त्यामुळ ही हुरहूर एक बाजूनं हाय फक्त."
"दादा यार का तुला देवाण ही दुर्बुद्धी दिली रे... आयुष्यातील लक्ष्मी तू हाकलून लावलीस."
"ऋषी चुकलो लेका मी माझं काय व्हईल ते मी ठरवलं हाय पण तू कधी चिनूला अंतर देऊ नकस.."
"दादा... "ऋषीन वीरला खुणावले. वाड्याच्या बाहेर क्रांती, चिनू, संतु, रत्ना उभे होते.
ऋषीची चिनूला बघून विकेट पडली. बीतरुठ कलरचा चुडीदार तिच्या गोऱ्या कांतीवर खुलून दिसत होता. तो वीरजवळ न थांबता चुनुकडे धावत गेला.
वीरच्या नजर मात्र किंचितसुद्धा क्रांतीवरून हलत नव्हती. गळ्यात अजून असलेलं छोटा मंगळसूत्र तीन काढलेलं नव्हतं.
"तिच्या लक्षात नसलं की मला अजून ती विसरली न्हाय..." वीरला प्रश्न पडला.. हिरव्या रंगाचे काठ असलेली जांभळी साडीत तीच रूप खुलल होत. रिकामे लांबसडक केस का सोडले असतील? मी घायाळ व्हावं म्हणून...

स्वप्ना, आत्या , ऋषी सगळे एकमेकांना भेटत होते. क्रांतीबद्दल वाटणारी सहानुभूती त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती. तेजु क्रांतीला भेटायला पळत आली.
"जाउबाई अहो हळू... मी इथंच हाय दोन दिवस अस पळत का आला बर?" क्रांतीने त्यांना जवळ घेत म्हणाली.
"आग तुला कधी भेटींन अस झालं व्हत... मला न तुझ्या हातची काळ्या घेवड्याची आमटी आणि गरमागरम भट खायची इच्छा झाली. देशील बनवून?"
"व्हय दिन की..."
तेवढ्यात सुलोचनाबाई आल्या...
"माझी लेक आली." क्रांतीला त्यांनी कुशीत घेतले . दोघींच्या डोळ्यात पाणी आले. आजूबाजूला सगळे होते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. लांब उभा राहिलेला वीरला गहिवरून आले.
"काय केलं आपण हे...? एवढ्या सगळ्यांसोबत असलेलं नात एक कागदावर मोडलं?"
"अरे सगळे माझ्यामुळ चांगल्या क्षणी रडताय का? मी सतत आशीन सगळ्यांबर...चला काय काय करायचंय ? आत्या काम सांगा?"
"आधी मला भात आणि आमटी खायला घाल."
"पण इथं अजून काहीच न्हाय आणलं??"
"घरी जाऊ की.." तेजश्री म्हणाली तसे सगळे जण शांत झाले.
"व्हय जा तिकडं तोपर्यंत इकडेच समान मी भरते." आत्या म्हणाल्या.
"तेजश्री तू अन क्रांती जा कुणीच न्हाय घरात परत लग्नाच्या गडबडीत तुला जमणार न्हाय..." तेजश्री क्रांतीला घेऊन वाड्यात गेली. सगळेजण आपापले समान घेऊन रूममध्ये ठेवायला गेले.
"रत्ना मी जरा भूषणकड जाऊन येतो तिकडं सुद्धा मदत पाहिजे का काय ते ईचारतो... तुम्ही सगळे हायत न इथंच मी जरा त्यांना हातभार लागतो." संतु रत्नाला सांगून बाहेर पडला.
चिनूची बॅग घेऊन ऋषी तिला एकटक बघत तिच्यासोबत येत होता.
"ऋषी अस काय बघतोयस? अरे कोणी बघल ना..."
"आता दिसती एवढी सुंदर मग नजरेला टतरी कसं समजवाव...एकतर एवष सुंदर दिसायचं अन त्यात बघू नकोस अस कोड घालायचं हे...कस शक्य आहे."
"ऋषी खोली आली..."
"हाय का एवढ्या लवकर आली? कधी भेटशील?"
"आता मी इथंच हाय..."
"अस सगळ्यांच्यात नाही एवढ्या दिवसांनी भेटतोय तर आज रात्री बाहेर भेटूया...?"
"कस शक्य हाय मला न्हाय भायर पडता येणार..."
"प्लिज..."
"बघते..."
"वाट बघतोय.."
ऋषी एवढं बोलून निघून गेला. जशी त्याला भेटायची ओढ होती तशी तिलाही होतीच की...



वाड्यात कोणी न्हवत. क्रांतीने काळ्या घेवड्याची डाळ छोट्या कुकरला शिजायला घेतली. आणि एका बाजूला इंद्रायणी तांदूळ धून पातेल्यात शिजायला लागला. जर भाताने उकळी घेतली तास संपूर्ण वाड्याभर घमघमाट सुटला.
"एवढा भात लावलास?"
"जाउबाई सगळेच भुकेले हायत सगळ्यांसाठी करी अन दहा बारा भाकरी पण करते. म्हणजे सगळे जेवण करून कामाला लागतील. तुम्ही ज बर वर जाऊन अराम करा मी झालं सगळं की आणून देते तुम्हाला भट अन आमटी."
"क्रांती अग केल असत मावशींनी आल्यावर... तू कशाला करत बसती. मला म्हायती हाय तुला वाड्यात येण्याची इच्छा पण नसलं तरी पण मला खाऊशी वाटलं म्हणून आलीस."
"मावशी मागच आवरत्याल...सगळे भुकेले हायती मला म्हायती हाय..."
"एवढं हुन सुद्धा तुला सगळ्यांवही किती काळजी हाय ग... क्रांती मी समजावलं न्हाय भाऊजीना का आम्हाला यातलं काहीच म्हायती नव्हतं. सगळं मनात ठिवून केलं त्यांनी. न्हायतर ह्यांनी अन मी हे हुच दिल नसत."
"जे झालं ते झालं ना माझ्या नशिबात व्हत ते.."
"पण मला एक सांगायचंय तुला तुझ्यासाठी ते किती महत्त्वाच हाय हे मला म्हायीत नाय पण मला वाटतय हे तुला सांगणं महत्वाच हाय..."
"काय झालं जाउबाई.."
"भाऊजी कुस्ती सोडणार हायत..."
"का??"
"कुस्तीच्यामूळ सगळं झालं असं त्यांना वाटतय म्हणून..."
तेजश्री एवढं बोलून वर गेली. क्रांतीने भाकरी करायला घेतल्या. तेवढ्यात वीर आला. क्रांतीने त्याच्याकड बघितलं सुद्धा नाही.
"मला म्हायीत नव्हतं तुमी इथं हाय ते..." क्रांतीने एक शब्द सुद्धा काढला नाही. उलट भाकरी जोरात थापू लागली.
"पाणी प्यायला आलो व्हतो." क्रांती शांत होती.
क्रांतीने गॅस मोठा केला आणि तव्यावर भाकरी टाकली. तिला जोरात चटका बसला.
"आईग..." क्रांती कळवळली.
वीर पळत तिच्याजवळ आला आजी तिचा हात हातात घेतला.
"बघू..." क्रांतीने हात त्याच्या हातातून काढून घेतला.
"लांब व्हायचं हा माझ्यापासन..."
"अहो तुमाला भाजलय क्रांती... जर राग बाजूला ठेवा."
"मी बघीन माझं मी..."
वीरने तिचा हात हक्काने परत हातात घेतला आणि थंड पाणी मनगटावर भाजलेल्या ठिकाणी ओतले. क्रांतीला कळ बसत होती. हळुवार कापडाने त्याने मनगट पुसले आणि फुंकर घातली.क्रांतीने पुन्हा हात मागे घेतला आणि भाकरी करायला घेतली.
"मी मावशींना बोलावतो तुम्हाला भाजलय... तुम्ही नका करू भाकरी."क्रांती एक शब्दाने काहीही बोलली नाही.
वीर वर गेला आणि क्रीम तिच्या मनगटावर लावली.
"झालं आता गेला तरी चाललं... आणि हो माझ्या माग माग करू नका त्यामुळं माझ्यावर काहीएक परिणाम व्हानार नाही..."
"हे केलं एक माणुसकी म्हणून फक्त..."
"व्हय माणुसकी हाय का तुमच्यात...? माणुसकी म्हण.."
वीर तिथून लांब गेला आणि दुरून तिच्या रंगीत चेहऱ्याकडे बघत बसला. लांब असलेले केलंस पुन्हा तिला त्रास देत होते. रागाने लाल चेहरा आणि चेहऱ्यावर आलेले काळेभोर केस.
"वा...!" ऋषी मागे येऊन वीरच्या कानात बोलला.
"जा मागे घे केस..."
"हा म्हंजी मार खायला पाठव मला.. आधीच रागानं लाल झालेला चेहरा बघितलास ना...?"




क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


इतर रसदार पर्याय