Mall Premyuddh - 71 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 71






मल्ल प्रेमयुद्ध



समीरचा चेहरा सुजला होता. क्रांतीपासून तो लपवत होता.

इतकं ते काय प्रेम की एकजण तिच्यासाठी मर खून घेतो आणि दुसरा तिच्यासाठी मारतो. काय होत असे वेगळं तिच्यात?

रत्ना समीरकडे रोखून बघत होती.
एक मित्र म्हणण्यासारखा होता का तो?
त्याला सगळं माहीत होतं तरी तो क्रांतीच्या आयुष्यात पुन्हा वादळ निर्माण करणारी होता याची जाणीव रत्नाला झाली होती पण एक मैत्रीण होणारी वहिनी म्हणून तिला ते वादळ थांबवायचे होते. तिला क्रांतीच्या आयुष्यात वीर हवा होता.
पण पुन्हा ते घडणार होत का?

वीर का अस करताय?
का माझ्या आयुष्यात नको असताना परत येतायत?
त्याला मी पाहिजे होते तसच झालं न त्यान केल त्याच्या मनासारख मग का त्रास आता हा? त्यांना जाब विचारायला पाहिजेत. त्याआधी नक्की काय झालं हे समीरला विचारायला पाहिजे.
"समीर तोंड का सुजलाय?"
"खरं सांगू की।खोटं?"
"खोट्याची मला भयंकर चीड हाय जे असलं ते स्पष्ट बोल."
"मला तू आवडतेस... मनापासुन..आणि हेस मी वीरला समजवायला गेलो तर त्याने मला ..."
"त्यांना सांगायच्या आधी एकदा माझ्याशी बोलायचं होत.." क्रांतीने धाडकन समीरच्या एक कानाखाली लगावली. कोर्टमध्ये आवाज घुमला. सगळेजण समीरकडे बघायला लागले.
क्रांती बाहेर पडली.

"तुला सांगितलं व्हत समीर तीन प्रेम केलंय त्याच्यावर ना ती कुणाची व्हणार ना तो तिला कुणाची होऊन देणारं.. कशाला उगाच पर्वमच्या भानगडी करतोस नि यापुढं लक्षात ठेव एक मित्र म्हणून आम्ही दोघीनी तुला मनापासून मानलं व्हत तू काय केलंस? हे चुकीच हाय वेळीच सांगितलं होतं. पण तू ऐकायला तयार नाहीस. बघ अजून वेळ गेली न्हाय न्हायतर दोघांचा एकत्र मर खाशील. आणि।मित्र म्हणून सांग न काय करू? करू आम्ही तुझ्यासाठी. पण जर तुला सगळं माहिती असेल न तू असा वागत असशील तर मार खाणारच ना...?"


क्रांती वीरच्या रूमवर पोहचली. वीर प्रॅक्टिसहुन येऊन अंघोळीला गेला होता. दोन तीन वेळेस दरवाजा वाजवला. बेल वाजवली आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. तिला काळजी वाटायला लागली. पुन्हा एकदा दोनदा दरवाजा वाजवला. त्येंही आतून काहीच आवाज येत नव्हता. क्रांतीच्या मनात काहीही यायला लागलं.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
अहो तुमचं नि आमचं सेम असतं...


एखाद्याच्या न येणारा प्रतिसाद एवढा त्रासदायक असतो का? की हे प्रेम... तीच मन भलतीकडे पळत होत. मनात काहीही विचार येत होते. डोळ्यात पाणी आलं अन तिने पुन्हा जोरजोरात बेल वाजावली.
वीरने घाई घाईत टॉवेल गुंडाळला आणि दरवाजाकडे गेला.

दरवाजा उघडला. वीरच्या लक्ष तिच्या डबडबलेल्या डोळ्यांकडे केले. तिने जवळजवळ त्याला आतमध्ये ढकलला.

"ही कसली पद्धत एवढा वेळ कुणी अंघोळ करत व्हय. तुमाला काळात कास नी वो कुणीतरी आपली काळजी करतय? एवढा वेळ लागतो व्हय दरवाजा उघडायला? वीरने पुढे येऊन आधी दरवाजा बंद केला.

"क्रांती अहो आत्ता अंघोळीला गेलो व्हतो. बर रूममधी दुसरं कुणीच न्हाय दरवाजा उघडायला. मी अर्धवट कसा भायर येणार...?काय झालं?" ती जवळ गेली खूप हळवी झाली होती. तिने त्याच्या उघड्या छातीवर डोकं ठेवलं आणि बराच वेळ रडून घेतलं. त्याची उघड्या देहाला जणू तिने तिच्या अश्रूंचा अभिषेक घातला होता. त्यानेही तिला रडु दिल.पाठीवरून हात फिरवला.
"क्रांती मी बरा हाय... मला कायच झालं नाय."
"तुमाला सगळं बर वाटत. तुम्ही करता ते सगळं बरोबर आणि खरं असत आणि मी करती त्याच काय? दरवेळी माझी चूक नसताना मी हे सगळं सहन करायचं व्हय? कशासाठी फक्त तुमच्यावर प्रेम हाय म्हणून का? का अस वागताय? क्रांती अजूनही ठाच्या बाहुपाशात होती. आणि यो तिला कुरवाळत सगळं शांतपणे एकून घेत होता.तुला मोकळं होऊन देत होता. त्याला हे सगळं ऐकून घेणं भाग होत कारण चूक त्याची होती आणि तिला काहीही बोलून त्याला दुखवायच नव्हतं. तिला शांत करणं गरजेचं होतं.
ती रडत होती....
फक्त रडत होती...
एवढ्यादिवस जे साठलेल होत ते रिकाम करत होती.

"आता बोला गप्प का बसलाय. अहो अस बाजूला केलं न तुम्ही मला तुमच्या आयुष्यातन आणि आता मी परत तुमाला तुमच्या आयुष्यात पाहिजे अरेरावी... वा..." अजूनही घट्ट मिठीत राहूनच ती बोलत होती. त्यालाही इच्छा होत नवहती की तिला बाजूला करावे. त्याच्या ओल्या अंगाने तीसुद्धा भिजली होती.
आणि तो तिच्या अश्रूंनी... त्याने तिला हळुवार बाजूला केले. तिचे डोळे पुसले. त्याने त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर ठेवले.
"इथंन पुढं कधीच तुमच्या डोळ्यात पाणी येणार न्हाय..."
तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून त्याने तिला त्याच्या जवळ खेचलं नि ओठांवर ओठ टेकले. तिचे नाक, डोळे, गाल लालबुंद झाले होते. ती त्याला प्रतिकार करू शकत नव्हती की नाही म्हणू शकत नव्हती. तिने त्याला घट्ट पकडले.


वीरने तिला अलगत उचलले आणि आतमध्ये नेल. तिला बेडवर बसवले. किचनमधून पाणी आणून तिला प्यायला दिले. ती शांत झाली. तिच्या बाजूला जाऊन तो बसला.
"काय झालं सांगाल?"
तिने त्याच्याकडे बघितले आणि दोन्ही हाताने त्याच्या छातीवर मयू लागली. तिचे बळकट हात त्याला लागत नव्हते पण तिच्या डोळ्यातली काळजी त्याला सुखावत होती.
"का ??? का...? का???"
त्याने तिची दोन्ही हात पकडले आणि तिला घट्ट कुशीत घेतले.
"मी बरा हाय क्रांती... मला काय पण झालं नाय... लै जवळ हाय तुमच्या... अन आता आयुष्यभर असंच राहायचं हाय..."

तिने पटकन त्याला जवळ ओढले आणि त्याच्या ओठांवरती तुटून पडली. हे प्रेम व्यक्त होत होत... व्हायला हवं होतं. आणि झालं.

थोड्या वेळाने ती बाजूला झाली.
परत हे अस का घडलं?
मी कोणत्या गोष्टीत वाहवत जाती?
का?

ती निघायला लागली.त्याने तिचा हात घट्ट पकडला. तिने त्याच्याकडे बघितले. अजून तो तसाच टॉवेलवर होता. त्याच्या डोळ्यातून प्रेम व्यक्त होत होते. तो सुखावला होता. क्रांतीच अजूनही तितकच प्रेम होतं.
"नका जाऊ... आता सोडून..."
"मी कधीच गेली नव्हती... जाऊदे मला..."
"का आला व्हता?"
"समीरला का मारलं?"
"त्यानं कारण न्हय का सांगितलं." बोलता बोलता त्याने अंगावर टीशर्ट चढवला.
"न्हाय ... पण ही अरेरावी झाली ना?"
"त्याच अन तुमचं एकमेकांवर प्रेम हाय का?"
"काय बोलताय तुमी?"
"हे मी नाय... तो मला सांगत व्हता अन म्हणूनच माझं डोकं फिरल आणि हात उचलला."
"पण मला मत हाय का न्हय माझं कुणावर प्रेम हाय."
"ते मी अनुभवलं आत्ताच न मला म्हायीत हाय तुमचं कुणावर प्रेम हाय." क्रांती शांत बसली.
"ड्रेस सगळं भिजलाय. आत एखादा। ड्रेस असलं तुमचा तो घाला अश्या ओल्या जाऊ नका."
तिच्या एव्हढ्यावेळ लक्षात नव्हतं आलं. की वीरच्या ती एवढी जवळ गेली होती की त्याच्या अंगावरच्या पाण्याने ती अर्धीओली झाली होती.
तिची मन शरमेने खाली गेली. आत जाऊन कपाट उघडलं. जसे होते तसे एकदोन ड्रेस तिचे होते.
त्यातला एक घेतला नि दरवाजा लावून तिने ड्रेस बदलला.
"क्रांती मला भूक लागली. कायतरी बनवाल जेवायला...?"
"मला रूमवर जायचं हाय..."
"ठीक हाय..."
तिचा पाय निघत नव्हता ती किचनमध्ये गेली. भाकरी आणि भाजी बनवत होती. तो फक्त तिच्याकडे बघायचं काम करत होता.
"का ह्यांना बाजूला केलं आयुष्यातन..."
तिला कसतरी होत होत.
"तुमी भायर बसताय का ? मी झालं की आणून देत्व.
"न्हाय.. तुमाला काय लागलं तर मी देतो."
"मला काम करता येत न्हाय..."
"का??"
वीरने तिचे केस बाजूला केले आणि तिला काम करताना पुन्हा जवळ घेतले.
"वीर आता आपण नवरा बायको न्हाय..."
"परत एकत्र येऊ.."
"आता मला शक्य नाय..." वीर तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. वीरने तिच्या कमरेत हात घातले तिचे संपूर्ण अंग त्याला बिलगले होते.

"वीर सोडा..."
"नाय..."
"वीर मला सोडा..." आणि ती आणखी त्याच्या जवळ जात होती.

💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


कशी वाटतेय कथा???? प्लिज आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा. स्टार द्या आणि हो स्टिकर्स सुद्धा द्या.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED