मल्ल प्रेमयुद्ध - भाग 72 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 72

मल्ल प्रेमयुद्ध





अजून काय हवं होतं वीरला... वीर जोमाने तयारीला लागले होता.
हीच्या मनात अजूनही हेच होत की," का झालं असं???"
रत्नाला तिच्यामधला बदल जाणवला होता.
"क्रांते दोन दिवस झालं बघती तुझं कायतरी बिनसलं हाय... तिकडं मात्र वीरचा उत्साह वाढला हाय...अन तुझं काय...?तुझं अजिबात प्रॅक्टिस मधी लक्ष नाय..."

"काय नाय..."
"कुणाला फसवतीस... कायतरी झालाय नक्की... "
काय नाय म्हंटल ना तुला ..."
"बघ नसल सांगायचं नको सांगूस..." रत्ना थोडस फुगून बसली.
"अग काय नाय ग... माझाच मला समजत नाय मी काय करती तुला काय सांगू...?"
"मला सांगण्यापेक्षा त्या समीरला दोन शब्द सांग... तुला कळत नाय का ग तो कसा बघत असतो तुझ्याकड."
"समजत पण काय सांगणार ज्या माणसाला आपण सांगितलेलं समजून घ्यायच नसलं तर."
"प्रकरण वाढत गेल्यावर काय व्हनार नाय तू आजच समिरशी बोल."
क्रांती शांत होती.



समीर येऊन बराच वेळ झाला होता. आज काहीही करून क्रांती बरोबर बोलायचे हे ठरवलं होतं. दुसऱ्या बाजूला वीर त्याला मनापासून प्रॅक्टिस करताना दिसत होता. त्याला पटकन परवा घडलेला प्रसंग आठवला.

"क्रांतीने माझ्या प्रेमाला मान्य केलं तर ह्याचे काहीही चालणार नाही. मी खूप प्रेम करतो क्रांती तुझ्यावर... या वीरने तुला किती दुःख दिल त्याहीपेक्षा जास्त सुखात ठेवेन मी तुला....काटा टोचू देणार नाही तुला तू एकदा माझ्या प्रेमाचा स्वीकार कर... अश्या छप्पन वीरच प्रेम हा एकटा समीर तुझ्यावर करेल. काय आहे या माणसात प्रेम करण्यासारखं??? वीर तिच्यालायक नव्हता , नाही आणि नसेल..."

क्रांती त्याच्याजवळ येऊन बसली तरी त्याचे लक्ष नव्हते.
"कसला विचार करतोयस मित्रा... प्रॅक्टिस नाय करायची का?"
"अरे तू आलीस...?"
"हो..."
"मला तुझ्याशी बोलायचं..."
"मलापण..."
"इथं नको आपण बाहेर जाऊयात का.."
क्रांती काहीही न बोलता उठली आणि समीरसोबत बाहेर पडली. वीर मनापासून प्रॅक्टिस करत असाल तरी त्याचे लक्ष सगळे क्रांतीकडे होते आणि विश्वाससुद्धा..."


समीर आणि क्रांती समोरच्या एक कॉफीशॉपमध्ये गेले.
"बोल समीर.."
"आधी तू बोल..."
"हे बघ तुझं माझ्यावर..."
"माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे क्रांती.. मी तुला आयुष्यभर सुखी ठेवेन."
"समीर..?"
"हो क्रांती प्लिज... खूप दिवस झाले या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. आज तुला ही हेच बोलायचे होते ना...?"
"समीर... माझं तुझ्यावर प्रेम नाही. वीर आणि माझा जरी घटस्फोट झाला असला तरी माझं वीरवर अजून तेवढंच प्रेम आहे."
"क्रांती... काय आहे त्या गावठी पोरात...? एवढा मोठा गेम खेळला तो तुझ्याशी आणि तू अजूनही त्याच्या मागे... मी काय विचार केला होता अग."


"प्रेम करतो तेंव्हा कुठली व्यक्ती जात, रंग रूप बघते...ते आपोआप होत समीर..."
"पण ज्या व्यक्तीने आपल्याला अस उचलून त्याच्या आयुष्यातन बाहेर काढलं त्याचा विचार अजूनही तुझ्या मनात आहे? विशेष आहे तुझं. डिओर्स झाल्यानंतर मी तुला रडताना बघितलंय अग त्याला त्रास झाला का?"
"झाला असल कदाचित..."
"कदाचित... इथं मी तुला आयुष्यभर फुलासारखी जपण्याची स्वप्न बघतोय अन तू..."
"मी कुठं तुला सांगितलं की माझी स्वप्न बघ. त्यांच्याकडे मी प्रेमाची कबुली दिन का मलापण न्हाईत नाय अजून पण हो आजूनपन माझं वीरवर प्रेम हाय. मी त्यांच्याशिवाय कुठल्याच पुरुषचा माझ्या आयुष्यात विचार करू शकत नाय. आणि हो समीर तुझी भावना तुझं प्रेम मी याचा आदर करते. पण तुझ्या डोक्यात, मनात हे माझं खूळ बसलाय ना ते काढून टाक."

"क्रांती अस कस काढून टाकायचं पहिला दिवस तुला बघितलं अन तुझंब्या पर्वम पडलो. मला तेंव्हा टिझही हिष्ट्री माहितीसुद्धा नव्हती. तुझा डिओर्स झालाय हे समजलं तरी मी तेवढंच प्रेम करत राहिलो. वीरसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली."

"आपल्या प्रेमाची.. समीर मी कधीच तुझ्याकडं मित्राच्या पलीकड बघितलं नाय... का कधी मनात इचार आला."

"क्रांती घाई करू नकोस पण एकदा विचार कर."
"समजुतीचा सल्ला देऊ... बघ मी काहीच म्हणणार नाय का करणार नाय पण वीरने तुला काय केलं तर आता मी त्यांना समजवायला सुद्धा जाणार नाय."

क्रांती तिथून बाहेर पडली. समीरच्या मनात एवढं चालू आहे हे तिला कधी कस समजलं नाही याचं आश्चर्य वाटलं.


संग्रामच्या वागण्यात बदल झालेला होता. तो तेजश्री बरोबर घरची बाहेरची सगळी कमी बघत होता. पण आबांसोबत तो एक शब्दानेही बोलत नव्हता.
आबांना त्याचं वाईट वाटायचं. बायको म्हणून सुलोचनाबाई बोलायच्या मात्र तेही वरवर.. पण संग्राम नाही.
संग्राम जिन्यावरून येताना हळूहळू तेजश्रीला पायऱ्या उतरायला मदत करत होता.
"मला वाटतय आता तुमी दोघे खालच्या रूममधी या .. सूनबाईना तरास नक..."
"व्हय संग्राम म्या पर तेच म्हणणार व्हते."
"व्हय आई मी उद्याच सगळं समान खाली आणतो."
"संग्राम आम्हाला बोलायचं तुमच्याशी..."
"लोक भायर पैशाला थांबल्यात... आठवडा भरात न त्यांचा मला जायचंय."
"आव थांबतील पण मला महत्त्वाच बोलायचं."
"अब राग नका मनू पण एक मुलं तुमचं ऐकलं काय झालं हो त्याच... म्हणून मला न्हाय बोलयच तुमच्याशी ना ऐकायचं."
"त्याविषयी बोलायचं हाय... संग्राम आज आपण दादांकड जाऊन येऊ त्यांना परत सूनबाईंचा हात मागू.."
"आबा किती अपमान सहन करून घेणार आताच लग्नात किती बोलले ते तुमास्नी तरी परत.."
"मग मला वाचन द्या... वीरच्या आयुष्यात सूनबाईना परत आना... माझ्यासाठी नाय भावासाठी एवढं कराल का?"
"आबा त्या पोरीं कायकाय सहन केलंय किती त्रास झालाय तिला हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अन आता वीर नीट वागलं ह्याची काय गॅरंटी मी देणार... अब या गोष्टी करताना दहावेळा तरी इचार करायला पाहिजे व्हता..."

आबांशी ह्या आवाजात संग्राम पहिल्यांदा बोलत होता. पण आबांची चूक दाखवून देण्याची हीच योग्य वेळ होती. मुलींना मन सन्मान असतो. त्यांचा आदर करायलाच पाहिजे.
"तुमची शिस्त भिस्त घेऊन आई आतापर्यंत जगली. तुमची शिस्त वाईट नव्हती आबा पण भिस्त भयानक होती. भीती वाटावी अस वाटायचं पण कारण नसताना जेंव्हा तुम्ही ओरडायचा तेंव्हा मात्र लै तरास व्हायचा. वीरच्या चांगलं व्हावं मलापण वाटतय पण त्याने मला वचन दिले तर मी नक्की प्रयत्न करीन आणि हो ते पण क्रांतीची इच्छा असल अन तिच्या घरच्यांना मान्य असलं तर..."


दादांना काहीतरी बोलायचं होत. पण ते का शांत बसलेत?
"दादा गेला अर्धा तास झालं आपण असच नुसतं बसून हाय...काय बोलायचंय?"
"व्हय न दादा काय झालंय का?"
"संतु अन चिनू मला वाटतय तुमच्या दोघांच्या लग्नाची लवकर तारीख काढावी."
"दादा माझं शिक्षण.." चिनू
"तुझं शिक्षण तुझ्या सासरी गेल्यावर कर... संतु तू रत्नाच्या वडिलांना बोलवून घे अन मी ऋषीच्या आई वडिलांना बोलवून घेतो."
"दादा एवढ्या घाईत कशाला सगळं?"
"आर मला वाटत की, माझ्या क्रांतीच अस झालाय तर तुमच्या दोघांचं चांगलं व्हावं...लोक काय बाई बोलायला लागल्यात."
"लोक ती बोलणारच तुमी कशाला मनाला लावून घेताय. आव रत्ना मुंबईत तीच सगळं अस अर्धवट व्हाईल अन चिनूच शिक्षण पण सुरू हाय. ऋषी अजून कमवत नाय."
"संतु मला समजत जाऊ वाटत नाय..."
"आपल्याला खऱ्या गोष्टी म्हैत असताना का इचार करायचा समाजाचा...?"
"संतु तुमाला के पण वाटुदया पण माह्यासाठी ही दोन्ही लग्न लवकरातलवकर व्हायला पाहिजे."
"बर दादा मी बोलवून घेतो रत्नाच्या घरच्यांना..."

संग्राम,भूषण, स्वप्ना, ऋषी, चिनू, संतु सगळे वीरच्या मॅच बघायला मुंबईला आले होते. आयुष्यात वीर पुन्हा उभा राहतोय याचा सगळ्यांना आनंद होता.सगळेजण खुश होते.


संध्याकाळी वीर ग्राऊंडवर संधी मिळताच क्रांतीसोबत बोलायला गेला.
"क्रांती उद्या मॅच हाय..."
"व्हय..मला म्हायीत हाय"
"मला परत तुम्ही माझ्या आयुष्यात पाहिजे."
"कशाला? अस सतत सोडून जायला."
"क्रांती उद्या सामना बघायला आला तर मी तुमचा होकार समजीन."
क्रांती काहीही न बोलता तिथून निघून आली.

रात्रभर विचार करून क्रांतीला झोप लागत नव्हती.
"क्रांती मी जाणार हाय मॅच बघायला तुला यायचं असलं तर चल...बाकी सगळेजण उद्या सकाळ पर्यंत पोहत्याल इथं"
"म्हंजी..."
"हो आपली गॅंग येणार हाय उद्यावीरची मॅच बघायला. तुझ्या मनात काय नाय न मग नको विचार करुस चल आता झोप...उद्या जाऊ..."

तरीही क्रांती ह्या कुशिवरून त्या कुशीवर होत होती.


तिला निर्णय घ्यायला जमत नव्हते का?
तिने जायला हवं का?
तिने तिच्या प्रेमाची पुन्हा कबुली द्यायला हवी का?





क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत