Netaji's sacrifice books and stories free download online pdf in Marathi

नेताजींचे बलिदान

नेताजीचे बलिदान व आजची तरुणाई

आजच्या जगतात लोकं स्वतःला नेते मनवितात.त्यांचं कार्य फारसं काहीही नसतं.पण आव नक्कीच आणत असतात.पण जगात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं.त्या नेत्यांपैकी नेताजीची ओळख काहीशी वेगळी आहे.
नेताजींचा जन्म १८९७ मध्ये बंगालमधील कटक येथे झाला.त्यांच्या आईचे नाव प्रभादेवी व वडीलाचे नाव जानकीनाथ होते.वडील व्यवसायानं वकील असून आधीपासूनच क्रांतिकारी रक्त त्यांच्या रक्तात सळसळत होते.त्याच्या आईला चौदा पुत्र झाली.त्यापैकी आठ मुले तर सहा मुली होत्या.नेताजी हे नवव्या क्रमांकाचे तर मुलांच्या क्रमांकानुसार पाचवा नंबर.म्हणतात की सर्वात लहान किंवा सर्वात मोठा हा विद्वान निपजतो.पण नेताजीच्या बाबतीत उलट झालं.नेताजी सर्वात लहान नाही मोठेही नाही.
नेताजींचं वयात आल्यापासुन तर पुढेही म.गांधीजींशी पटलं नाही.त्यांना अहिंसा आवडत नव्हती.देशासाठी स्वातंत्र्य मिळवित असतांना त्यांचा विचार वेगळा होता.त्यांना वाटत होतं की स्वातंत्र्य मिळविणे ही आमची भीक नाही.आम्हाला स्वातंत्र्य भीकेच्या रुपात नको.तो आमचा हक्क आहे.म्हणुन अहिंसेने स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही.जोेपर्यंत इंग्रजांना भारतीय त्रास देणार नाही.तोपर्यंत स्वातंत्र्यही मिळणार नाही.पण गांधीजींना हे मान्य नव्हतं.
१९३९ ला सार्वत्रीक निवडणुका पार पडल्या.त्यात नेताजींचा पक्ष निवडून आला.पुढे ते राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख बनले.त्याचवेळी जर्मनीचं युद्ध मित्रपक्षांसोबत सुरु झालं.पुढे काही कारणास्तव नेताजींनी राजीनामा दिला आणि ते जपानला गेले.तिथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना उभारली होती.त्यांच्यात ते सामील झाले.तिला मजबूत करायचे काम सुभाषबाबूंनी केले.या सेनेचे सुभाषबाबूनंतर कँप्टन लक्ष्मीनाथन हेही प्रमुख झाले.
युद्ध जेव्हा सुरु झालं.तेव्हा सुभाषबाबू जर्मनीच्या बाजूने लढत होते.या आझाद हिंद सेनेने मित्रपक्षाच्या सेनेचा धुव्वा उडवला.मित्रराष्टाशी लढत असतांना सेनेची ताकद लक्षात घेवुन ते जेव्हा भारतात आले,तेव्हा 'तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आजादी दुँगा' म्हणत येथील तरुणांना एक मोलाचा संदेश दिला.
आज सुभाषबाबू हयात नाहीत.पण त्यांचे विचार आजही भारतीयांना प्रेरणा देणारे आहे.येथील तरुण आजच्या काळात वाममार्गाला लागला आहे.नित्य दारुच्या भट्टीवर किंवा पानठेल्यावर दारु पित तसेच कँरम खेळत आपल्या आयुष्याची सांज करीत आहे.खर्रे खात खात आपल्या आरोग्याची धुळधानी करीत असतांना त्यांना महाभयंकर कँन्सरसारख्या रोगाशी लढावे लागत असतांना कँन्सर त्यांच्या जीवनाला समाप्त करीत आहे.महत्वाचं म्हणजे नेताजींपासून अशा तरुणांना एक गोष्ट शिकण्याची गरज आहे की लढा,पण कँन्सरसारख्या रोगांशी नाही तर देशाच्या शत्रुंशी लढा.व्यसनाला पदरी पाडून आपल्या आयुष्याची संध्याकाळ करण्यापेक्षा तसेच आपल्या शरीराचा दारु,खर्रा,गुटख्याने सापळा करण्यापेक्षा आणि त्या व्यसनाने मरण पदरी पाडण्यापेक्षा जर रणांगणात देशासाठी दोन हात करुन मेले तर तुमची गणती ही शहीदात होईल.अहो व्यसने ही आपल्या शरीराचा अंत करते नव्हे तर याच व्यसनातून ती पुर्ण करतांना आम्ही आमच्याच भावाला समाप्त करतो.पण जर का आम्ही आमच्या मनाला कन्ट्रोल करुन व्यसनं बंद केलीत.तर आम्हीही वाचू आमचा भाऊही वाचेल आणि आमचा देशही वाचेल.
देशाला आज नेताजींच्या विचारांची खरं तर गरज आहे.शत्रू चीन व शातिर शत्रू पाकिस्तान आजही आमच्या देशावर डाव रचून आहे.अशावेळी आम्ही व्यसनाधीन राहुन भागणार नाही.आमचे आपापसातील झगडणे परवडणार नाही.आमच्या शरीराचा सापळा करणे आम्हाला बरोबर वाटणार नाही.तसेच आम्हाला कँन्सरसारखा रोग होणेही बरे नाही.निदान त्यांना धडा शिकविण्यासाठी तरी आम्हाला आज नेताजी नाही तर त्यांचे विचार तरी अंगीकारण्याची गरज आहे.खरंच नेताजींनी म्हटले होते,तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दूँगा।ते अगदी बरोबर होते.कारण त्यांच्या आझाद हिंद सेनेने एवढे इंग्रज सरकारला सळो की पळो करुन सोडले की तद्नंतर इंग्रज या देशातून चालतेच झाले हे विसरुन चालणार नाही.खरंच मित्रांनो,नेताजींनी जे म्हटलं होतं ते अगदी खरं होतं हे यातून दिसून येते.
नेताजी जे बोलले. ते त्यांनी करुन दाखवलं. त्यांनी तुम मुझे खून दो म्हटलं. आणि मग तुम्हे आजादी दुँगा म्हटलं. ती आजादी ते असतांना मिळाली नाही. परंतु त्यांनी जी क्रांती भारतीय तरुणात भरली. त्यानुसार भारतीय तरुण पेटून उठले व त्याचा फायदा सन १९४७ च्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाला. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०©®©

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED