Bhagwadgita - 3 books and stories free download online pdf in Marathi

भगवद्गीता - अध्याय ३

तृतीय अध्याय
कर्मयोग
अर्जुन म्हणाला, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असे सांगतोस, आणि मला युद्ध करण्यास सांगतोस हे कसे, माझे मन तुझ्या बोलण्यामुळे संभ्रमात सापडले आहे. तू कृपया माझ्या हिताचा स्पष्ट मार्ग सांग.
भगवान म्हणाले, माझ्या उपदेशात विरोधाभास नाही. बुद्धियोग सांगताना मी सांख्यमतही सांगितले. दोन्ही मार्ग एकच आहेत. कर्म केलेच नाही तर मुक्ति मिळणार नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म केेलेच पाहिजे. कर्म न करता आपण राहुच शकत नाही. जो मनुष्य कर्म करण्यास नाकारतो पण मनातुन विषयांचे चिंतन करत असतो तो स्वत:ला फसवत असतो. त्याला दांभिक म्हणावे.आसक्ति सोडुन कर्माचे आचरण करावे. स्वधर्माचे जो निष्काम वृत्तीने आचरण करतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. शास्त्राने नेमुन दिलेले कर्म करावे. कर्म करणे ‌हे निष्क्रियते पेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्याशिवाय माणूस स्वत:चा निर्वाह करू शकत नाही. कर्म हे यज्ञ म्हणून केले पाहिजे. स्वधर्माचे पालन श्री विष्णू साठी करावे .ब्रह्मदेवानी सांगीतले की स्वधर्माची पुजा कराल तर देव प्रसन्न होतील. यज्ञ, हवन न करणे ब्राह्मणाना भोजन न देणे याने पाप लागेल. ब्रह्मदेवाने आशिर्वाद दिला की यज्ञ केल्याने तुम्ही सुखी व्हाल व तुमची कामनापुर्ती होइल.यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला सुखी करतील. देवांना भाग न देता खाणारे चोर समजावे. यज्ञांमध्ये देउन राहिलले अन्न खाणारे व पापमुक्त होतात. स्वत:करीता अन्न बनवून खाणारे पापी होत.
अन्नापासून प्राणिमात्र जगतात, पावसामुळे अन्न तयार होते व पाऊस हा यज्ञापासुन निर्माण होतो आणि यज्ञ कर्तव्यापासून निर्माण होतो. वेदामध्ये कर्मे सांगितली आहेत , वेद भगवंतानी सांगितले, म्हणून सर्व व्यापी ब्रह्म हे यज्ञविषयक कर्माचे अधिप आहे. निष्काम कर्म करणे म्हणजेच यज्ञ असे समज. कर्माच्या आधारेच जग निर्माण झाले म्हणुन स्वधर्म सोडु नये. कर्म उद्भवले ब्रह्मातुन ब्रह्म परमचैतन्यातुन. जे भोग तृप्तीत समाधान मानतात. त्यांचे जीवन निरर्थक आहे. निष्कामतेने आचरण करुन मानवाला परमपद प्राप्त होते. कर्मानेच सिद्धी प्राप्त होते. जसे नेते किंवा श्रेष्ठ लोक वागतात त्यांचेच, अनुकरण इतर लोक करतात. मी पण माझे कर्तव्य करीत असतो. मी जर कर्म केले नाही तर लोक कल्याण होणार नाही. लोक आपली कर्तव्ये सोडतील व मी कर्म केले नाही तर लोकनाशास कारण होईन. जे अज्ञानी असतात ते इच्छा ठेवुन कर्मे करतात पण जे ज्ञानी असतात त्यानी आदर्श ठेवण्यासाठी निष्काम कर्म करावे. व ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना भक्तिभावाने कर्म करण्यास उत्तेजन द्यावे. माणसाला वाटत असते की मीच सर्व करीत आहे. पण असे मानणारा अज्ञानी असतो. ज्ञानी माणुस गुण, कर्मे ओलांडुन अलीप्तपणे राहतो.त्याला सकाम कर्म व भक्तियुक्त कर्मातला फरक समजतो. जो माणूस संतुष्ट असतो व आत्ममग्न असतो त्याचेसाठी कांहीं कर्तव्य राहत नाही. आत्मसाक्षात्कारी माणसाला कर्म न करणे चे कारण नसते व कर्म फलाची अपेक्षा नसते. निष्काम कर्म केले असता माणसाला परमपद मिळते. जनकादि राजांना कर्मानेच सिद्धी मिळाली. तू लोकांना समजण्यासाठी कर्म कर. अज्ञानी लोक भौतिक कर्मात मग्न राहतात त्याना विचलित करु नये. आत्मज्ञान जाणुन तु सर्व इच्छा सोडून लढाई करावी असे मी तुला सांगतो. जो या उपदेशाचे श्रद्धापूर्व अनुसरण करतो तो कर्मबंधनातुन मुक्तिमिळवतो. जे लोक या उपदेशा प्रमाणे वागत नाहीत ते मुढ व अज्ञानाने भ्रष्ट झाले आहेत असे समजावे. ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या प्रकृती प्रमाणे वागतो बळेच दडपण्याचा काय उपयोग. ज्ञानी लोक स्वत:ची कर्मे करतात. इंद्रियांच्या नादी लागु नये. विषयांची आशा ठेवशिल तर मोक्ष प्राप्त होणार नाही. परधर्म चांगला असला तरी स्वत:चा धर्मच पाळावा. स्वकर्म करताना आलेले मरण श्रेष्ठ. अर्जुन म्हणाला, पाप करण्याची इच्छा नसुन सुद्धा माणुस पापाचरण का करतो. श्री भगवान म्हणाले, रजोगुणातुन काम क्रोध ऊत्पन्न होतात. हे जीवाचे वैरी आहेत. यानेच जसे धुर अग्नीला, धुळ आरशाला व वार गर्भाला झाकते तसे ज्ञान झाकले जाते. काम हा अग्नीप्रमाणे असतो. तो कधीच संतुष्ट होत नाही. यानेच ज्ञान झाकले जाते. तो ज्ञानाचा वैरी आहे. मन, बुद्धि, अवयव हे त्यांचे निवासस्थान आहे व तो सर्वाना नियंत्रीत करुन ज्ञान झाकतो. यास्तव हे अर्जुना, इंद्रियांना आवरुन ज्ञान विज्ञान नाशक अशा पापी कामास तु मार. हा काम नावाचा शत्रु तु जिंकुन घे. तृतियोध्याय समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED