अशीही एक शाळा Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अशीही एक शाळा

मनोगत

अशीही एक शाळा या नावाची कादंबरी वाचकांसमोर सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या कादंबरीच्या रुपानं मी एक शिकवण देत आहे की माणसानं चांगले कर्म करावे नव्हे तर करीत जावे. त्याचं कारण असं आहे की ज्या निसर्गचक्राला आपण अज्ञात शक्ती म्हणतो. ती शक्ती त्या त्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असते.
कादंबरीतील विषयांश असा. एक मुख्याध्यापक एका काळात चांगला सुस्वभावी असतो. परंतू शाळेला जेव्हा अनुदान प्राप्त होते, तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो. स्वार्थ शिरतो त्याच्या मनात. मग तो सर्वच घटकांना त्रास देत असतो. त्याचा परीणाम वाईटच निघतो. तेव्हा तो कोणता परीणाम आहे आणि तो कसा वाईट निघतो? यावर आधारीत माझी ही कादंबरी. आपण ती कादंबरी अवश्य वाचावी व आवडल्यास मला एक फोन अवश्य करावा ही विनंती.
कादंबरी लिहिणे हा माझा छंद असून मला त्या कादंब-या लिहायला आवडतात. ही कादंबरी साहित्य विश्वातील तेहतिसावी कादंबरी असून त्रेसष्ठवी पुस्तक आहे. मी काही कथाही लिहिलेल्या आहेत व कथासंग्रह देखील काढले आहे. परंतू कादंबरी यासाठी लिहितो की लेखकाला त्यात पुरेपूर व्यक्त होता येते. कथानक काल्पनीक आहे. छान आहे. आपण वाचावं व बोध घ्यावा हाच एकमेव उद्देश.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०

अशीही एक शाळा (कादंबरी)
अंकुश शिंगाडे

ती शाळा अमरला साजेशी मिळालेली नव्हती. भेदभावाच्या शृंखलेत अडकला होता तो. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं.
प्रारब्धच ते........कोणी त्याला नशीब समजत होतं. तर कोणी त्याला नशीब समजतच नव्हतं. कोणी म्हणायचे की त्यानं जिल्हापरीषद शाळेत जाण्याचा प्रयत्न केला नसेल. म्हणून त्याच्या वाट्याला असलं जगणं आलं.
अमरचं काही चुकलं नव्हतं. त्यानं जिल्हा परीषदेतही नोकरीसाठी प्रयत्न केला. परंतू त्याला काहीही यश मिळालं नाही. उलट ज्या ठिकाणी त्याला यश मिळालं त्या ठिकाणी नंतरच्या काळात अशा गर्ताही मिळाल्या.
विकासपूर अशा नावाचं ते गाव. गाव लई पुढारलेलं होतं. जसं त्या गावाचं नाव होतं, तसा त्या गावाचा विकासही तेवढ्याच प्रमाणात झाला होता. त्यामुळंच त्या गावाचं नाव विकासपूर. तेथे गावाचा विकास झाल्यानं व शिक्षणाच्या सोयी असल्यानं अमरला उच्च शिक्षणाची संधी मिळाली. परंतू तेही खस्ता खात खात.
अमरचं गाव. सरसगाव. ते गाव दूर डोंगरात वसलेलं. तेथून विकासपूरचं दोन किलोमीटरचं अंतर होतं. ज्याला उच्च शिक्षण शिकायचं असेल, त्याला पायी पायी विकासपूरला यावं लागायचं. कारण विकासपूरला आजूबाजूच्या खेड्यातून जायला रस्ताच नव्हता. पायी पायी डोंगर उतरुन जावं लागायचं.
विकासपूर हे गाव डोंगराच्या पायथ्याशी असून मुख्य रस्त्यांना जोडलेलं होतं. त्यातच त्या गावातून शहरात गेलेले अनेक सारे रस्ते होते. परंतू विकासपूरच्या आजूबाजूचा भाग हा विकास न झालेलाच होता.
विकासपूरच्या आजूबाजूला जी खेडी होती. त्या खेड्यात शिक्षणाची ज्ञानगंगाच नव्हती. मुलं कितीही हूशार असली तरी मुलं शिकत नव्हती. कारण शिक्षणासाठी पायी पायी दोन किमी कोण जाणार? हा प्रश्न होता. कारण त्या दोन किमीच्या अंतरात फार मोठ्या अडचणी होत्या.
तो दोन किमीचा रस्ता. रस्ता फारच भयाण होता. त्या रस्त्यानं कोणीही जात येत नसत. तो रस्ता.......त्या रस्त्यानं साप, विंचवासारखे अनेक प्राणी निघत. ते शाळेतील मुलांना आडवे होत. त्यामुळं ते पाहिले की मनात मोठी धडकी भरत असे. ते भयाण जंगल......त्या जंगलात वाघ सिंहासारखेही प्राणी कधी रस्ता अडवून असायचे. त्यातच ते केव्हा आपल्या अंगावर हल्ला करतील याचा काही नेम नसायचा. बरीचशी मुलं शिक्षणाला उच्च दर्जा न देता आपला जीव जपत असत व पालक वर्गही आपल्या मुलांचा जीव सांभाळत असत. त्यातच पालकांना वाटे की आपल्या मुलाचा जीव वाचला तेवढंचबरं.शिक्षण नाही शिकला एखादा मुलगा तरी तो उपाशी राहणार नाही.
तो रस्ता डोंगरातून जाणारा असून एकेरी होता. त्यातच एक नदीही त्यांना ओलांडावी लागायची. ती ओलांडतांना पावसाळ्यात त्रेधातिरपीट मचायची. कारण त्या नदीवर जो सांकव होता, तो सांकव पुरेसा मजबूत नव्हताच. तोल गेल्यास त्या नदीच्या पुराच्या पाण्यात सरळ पडण्याची भीती होती. त्यातच काही लोकं म्हणायचे की पावसाळ्यात हा सांकव पार करण्याचा प्रयत्न करु नये. कारण या सांकवावर पावसाळ्यात पाणबुड्या नावाचा दैत्य बसलेला असतो. हा पाणबुड्या माणसाला छळतो. त्यातच तो या सांकवावरुन पाडून पाण्यात बुडवतो. कारण पाण्यात असलेला भोवरा त्या पाण्यात पडलेल्या जीवाला वरच येवू देत नाही.
रोजचा असा विद्यार्थ्यांच्या जीवाचा त्रास.......... रोजच कधी वाघ, सिंह तर कधी साप विंचू यांचं दर्शन. त्यामुळं शाळेत जाणं व्हायचं नाही. त्यातच त्यांना वाटायचं की शाळा शिकून काय उपयोग. त्यापेक्षा रानात गेलेलं बरं. कारण त्यांना वडीलांसोबत शेतात जातांना मजा वाटत होती.
पावसाळ्याचे चार महिने या ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असायचे. त्यातच त्यांना शिक्षणाबद्दल आसक्तीही नव्हती. शिक्षणाचं महत्व वा शिक्षणाची ओढ या विद्यार्थ्यांना मुळातच नव्हती. त्यामुळं कोणीही या ग्रामीण भागात शिकत नव्हतं. त्यातच शिक्षणाच्या कक्षेत ग्रामीण भागातील मुलं शिकत नसली तरी एखाद्या शिकणा-या मुलाला विशेष असं आरक्षण नव्हतं. त्यामुळं शिक्षणाची ज्ञानगंगा या भागात पोहोचतच नव्हती.
अशाच या सरसगावच्या खेड्यात अमर नावाचा मुलगा शिक्षणासाठी कष्ट करीत होता. रोजची साप, विंचू आणि रोजचे वाघ, सिंह अगदी अंगवळणी पडले होते. आज ते वाघ सिंह नव्हते. परंतू तो त्या शाळेतील संस्थाचालक आणि ते शिक्षणाधिकारी साहेब आणि त्या शिक्षणखात्यातील बरेचसे अधिकारी त्या वाघ, सिंहापेक्षाही महाभयंकर होते. तेे वाघ, सिंह, साप विंचू परवडले. परंतू हे अधिकारी परवडत नव्हते.
अमर गावात चांभार जातीचा होता. ते गाव जरी खोबणीत असलं तरी गावात महार, चांभाराची संख्या जास्त असल्यानं गावात पाहिजे त्या प्रमाणात भेदभाव झाला नाही. त्यामुळं साहजिकच जात वा विटाळाचे फटके अमरला बालपणात पडले नाही. परंतू जसजसा को मोठा झाला आणि शहरात आला. तसा विटाळ म्हणजे काय हे सहजच अमरला समजायला लागलं होतं. त्यामुळं मनात जो विचार होता की शहरात जातीभेद नसेल, तो विचार अगदी फोल ठरला होता. त्याच्या गावापेक्षा शहरातच विटाळ जास्त होता.
ते गाव.........अमरचे बाबा जातीनं चांभार असले तरी त्याचे बाबा चांभारकीचा व्यवसाय करीत नसत. त्याचं कारणही तसंच होतं. त्या गावात बाबासाहेबांच्या विचाराचा पगडा होता. गावात जरी लोकसंख्या कमी असली तरी गाव अशा विटाळाच्या बाबतीत सुधारलेलं होतं. त्यामुळं साहजीकच डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलं पुर्वापार चालत आलेले धंदे गावानं सोडलेले होते. गाव जरी खोबणीत असलं तरी काही गावातील लोकं सांगायचे की एकदा बाबासाहेब या गावात आले होते महाडच्या चवदार तळ्यातील आंदोलनापुर्वी. महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात अमरचा आजोबा देखील होता असं गावातील म्हाता-याचं म्हणणं होतं. त्यातच गावातील बरीचशी मंडळी बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला काठी टेकत टेकत गेली होती असं गावातील लोकांचं म्हणणं होतं.
ते गाव........त्या गावात बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा असल्यानं फक्त गावातील एकट्या महार जातीचीच मुलं शिकत होती. तिही आपल्या शहरात राहणा-या नातेवाईकांच्या घरी राहून. इतर जातीची मुलं शिकत नव्हती. ती मुलं जंगलात जायची. लहान लहान प्राण्यांची शिकार करायची नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसात ती मुलं पाण्यात मासोळ्या पकडायला जायची. त्याच इतर जातीच्या मुलांसोबत चांभार, मांग, खाटीक आणि इतर तत्सम अनुसूचित जाती जमातीची मुलंही जात असत. ना गावात मोठी माणसं विटाळ मानत. ना लहान मुलं. गाव हा समतेचा पुरस्कर्ता आहे असं म्हटल्या जात होतं.
अशा या गावातून अमरनं शिक्षण शिकण्याचा निर्धार केला. त्याचे कारण म्हणजे त्याला शिकविणारी शिक्षीका. त्या शिक्षीकेची गावात बदली झाली होती. ती अतिशय प्रेमळ होती. तिही महार जातीचीच होती. आरक्षणातून तिची नियुक्ती थेट सरसगावात झाली होती. ज्या गावातील शाळेत अमरही शिकत होता नव्हे तर शिक्षणाचं बाळकडू पीत होता.
सदर शिक्षीका गावात येताच आणि की वर्गात येताच त्या शाळेतील मुख्याध्यापकानं तिचा परीचय विद्यार्थ्यांना करुन दिला. त्यावेळी अमर दुसरीत होता. परीचय करुन देताच बाई अमरसह इतरही विद्यार्थ्यांना शिकवायला लागल्या. त्यातच अमर सारखी काही मुलं अभ्यासात हूशार असल्यानं त्या बाई त्या विद्यार्थ्यांचा जास्त लाड करीत असत. त्यातच त्या अमरचाही लाड करीत.
गावात शाळा चौथीपर्यंतच होती. पाचवीपासून विकासपूरला जावं लागत असे. परंतू शाळा जरी गावात चौथीपर्यंत असली तरी त्या शिक्षीकेच्या प्रेमानं शिक्षणाबद्दलचं स्फुर्लिंग अमरमध्ये उमटलं की अमरच्या मनात आपोआपच शिक्षणाबद्दलची आसक्ती निर्माण झाली होती.
ती शिक्षीका शिकवणं कमी परंतू महत्वाकांक्षाच जास्त भरत असे मनात. त्या महत्वाकांक्षेतूनच अमर घडत होता. त्यालाही आता शिकावसं वाटत होतं. अशातच तो चौथी पास झाला.
अमर चौथी पास झाला खरा. परंतू पुढील शिक्षण घ्यावं कसं? अमरसमोर मोठा बिकट प्रश्न होता. कारण विकासपूर दोन किमी होतं. त्यातच वाघ सिंह हे प्राणी रस्त्यातून आडवे होत. तसेच साप विंचूही. त्यामुळं त्या विकासपूरला जावं कसं असा प्रश्न पडायचा. शिवाय तो नदी पार करतानाचा सांकव.......
अमर चौथी पास झाला. परंतू त्याच्या वडीलाची त्याला शिकविण्याची इच्छा नव्हती. त्यामुळं ते अमरला शिकवू पाहात नव्हते. परंतू त्या शाळेतील शिक्षीकेमुळे प्रेरीत झालेला अमर आपल्या वडीलांसमोर शिकण्याचा हट्ट धरुन होता. त्यातच त्याची पत्नीही आपल्या पतीला अमरच्या शिकण्याच्या हट्टाविषयी बोलू लागली. त्यामुळं त्याचे वडील त्याला शिकवायला तयार झाले.
अमरच्या वडीलानं दिलेला होकार. पाहून अमर पुढील शिक्षण घ्यायला तयार झाला. परंतू पुढील शिक्षण घ्यायचं कुठं? कारण शहरात त्याच्या वडीलाच्या ओळखीचं कोणीही नव्हतं. त्यामुळं विकासपूरला पायी जाण्याखेरीज मार्गच नव्हता. परंतू एक अडचण होती ती म्हणजे तो विकासपूरला जाईल कसा? कारण विकासपूरला शिकायला कोणीही गावातलं जात नव्हतं. दोनचार मुलं ती असायची. परंतू तिही मुलं कधीकधी शाळेला बुट्टी मारायचीच. शेवटी ठरलं. विकासपूरला शिकायचं तो अति भयाण जंगलाचा रस्ता पायी चालत जायचं.
अमरच्या हट्टापायी त्याच्या वडीलानं त्याचं नाव विकासपूरला टाकलं होतं. तसा आता त्याचं नाव विकासपूरला शाळेत टाकताच अमर पायी पायी त्या भयाण रस्त्यानं विकासपूरला जावू लागला.
अमर विकासपूरला जावू लागताच त्याला कधी एकटंही जावं लागायचं. कारण कधीकधी गावातील इतर मुलं सोबतीला नसायची. त्याचंही कारण असायचं. कधी पाऊस दिवसभर असायचा. मुलं शाळेला सुट्टी मारायचे. परंतू सुट्टी मारायचा नाही अमर. कारण त्याला शिक्षणाच्या ध्येयानं छळलं होतं.
ती खाजगी शाळा........ती शाळा कोण्यातरी ओबीसी माणसाची होती. ते शहर......ते शहर सुधारलेलं वाटत होतं. परंतू ती सुधारणा वरवरच होती. आतून अमरचं गाव बरं होतं. परंतू ते शहर नाही. अशी ती शहराची स्थिती होती. त्यातच तो ओबीसी संस्थाचालक........ती शाळा..... त्या शाळेत मोठा स्टॉफ होता. तोही उच्चशिक्षीत आणि सर्व ओबीसी वर्गातलेच. दोनचार होते अनुसूचीत जाती अन् एसटी प्रवर्गातील. परंतू त्यांना स्वतःचे असे मतच नव्हते. काही एससी प्रवर्गातीलही शिक्षक होते. परंतू ते स्वार्थी होते. त्यांना कोणी भेदभाव करो की काहीही करो. त्यांना त्याचं काहीही वाटत नव्हतं. कारण त्यांनी तशी आपली मानसिकताच बनवली होती.
ते शिक्षणाचं ध्येय. अमरला ते ध्येय गुपचूप बसू देत नव्हतं. त्यातच त्या शिक्षणातून अमर शिक्षीत होवू इच्छीत होता. कारण त्याला त्याला शिकविणा-या शिक्षीकेकरवी शिक्षणाचं महत्व पटलं होतं.
अमर पाण्यापावसातही ते वाघ, सिंह वा ते संकट न पाहता शाळेला जात होता नव्हे तर तो खाचखळग्याचा रस्ता पार करीत होता. कारण त्याला शिक्षण शिकायचं होतं कुण्याही परीस्थीतीत.

****************************************

अमर दोन किमीचा पायी प्रवास करुन शिकला. आज तो शालान्त पास झाला होता. तसा तो आज महाविद्यालयाला गेला.
विकासपूर........तिथं दहावीपर्यंतच शाळा होती. परंतू अमर आता अकरावीला गेला होता. त्यामुळं पुढील शिक्षण कुठं घ्यायचं हा प्रश्न होता. काय करावं ते सुचत नव्हतं. तसे अमरचे बाबा अनपढच होते. त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता. त्यामुळं आपल्या अमरनं पुढं शिकावं असं त्यांना वाटत होतं. परंतू ती लहाणपणची महत्वाकांक्षा. त्या शिक्षीकेनं अमरच्या मनात भरलेली. त्या महत्वाकांक्षेपुढं अमरचे बाबाही नापास झाले होते.
अमरसोबतच काही गावची ती मुलं पास झाली होती दहावी. परंतू शिकायला मार्ग नसल्यानं ती शिकत नव्हती. परंतू अमरला शिकावंसं वाटत होतं. तसा विचार करीत असतांना त्याला लहाणपणी बाईनं शाळेत सांगीतलेली गोष्ट आठवली. ती वसतीगृहातील गोष्ट होती. तसा तो ती गोष्ट आठवताच आपल्या ध्येयाला लागला. तसा आज संधी पाहून तो बापाला म्हणाला,
"बाबा, मले शिकायचंय. पुळलं शिक्सन शिकायचंय."
ते अमरचं बोलणं. गोविंदाला ते बोलणं समजलं नाही. तसा तो म्हणाला,
"बेटा, शिकशीन कसा? गावची समदी पोरं दाहावी पास होतेत. आन् कास्तकारी करतेत. आन् तू शिकतो म्हणतेस. काय सोय बी हाय का आपल्याकडं?"
गोविंदा अमरचा बाप. तो अनपढच होता. त्याला काय माहित होतं की शिक्षण वाघिणीचं दूध ठरणार. त्याला काय माहित होतं की शिक्षणच पुढं आपल्या मुलाची ताकद बनणार. ते अमरच्या शिक्षणाला नकारच देत होते.
अमर त्याच्या बाचा एकुलता एक मुलगा. त्याला चार मुली होत्या. मुलासाठी त्यानं चार चार मुली जन्मास घातल्या. तशी पोरगा जन्माची आस बाळगलेल्या गोविंदाचं आपल्या लेकरावर म्हणजे अमरवर निरतिशय प्रेम होतं. त्याच्या मुली ह्या चौथी शिकलेल्या होत्या. त्यातच गावात शिक्षणाची सोय नसल्यानं त्या पुढील शिक्षण शिकल्या नाही. त्यांनाही शिकावंसं वाटत होतं. परंतू त्या ठरल्या मुलींच्या जाती. मुलींना गाव दुय्यम दर्जाचं मानत होतं.
गाव जरी पुढारलेलं असलं तरी त्या गावात मुलींना मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक. बाबासाहेब गावात येवून गेले. त्यांनी गावात शिक्षणाचा श्रीगणेशा केला तरी गाव मुलींना अजिबात शिकवीत नव्हतं. तेच काम केलं गोविंदानंही. त्यानंही मुलींना शिकवलं नाही. अशातच त्याच्या दोन मुलींचा विवाह झाला होता. दोन अजूनही अविवाहीत होत्या. त्या मुलींना जवळच्याच गावात दिलं होतं. तसा गोविंदा आपल्या मुलाला अमरलाही दहावीनंतर शिकवायला तयार नव्हता. कारण शिक्षणाची सोय. अशातच अमर म्हणाला,
"बाबा, मी शिकणार. पुळचंबी शिक्सन शिकणार."
"कसं शिकशीन. गावात शिक्सनाची सोय हाये का?"
"मी शयरात जाईन. आन् तेथं शिकीन."
"तू शयरात जाणार होय. आरं तुले येड गी लागलं का? त्या शयरात आपलं कोणी वळखीचं नाय. मंग रायशीन कोठं? इकडं आपलं वावर पीकत नाय आन् मी तुले पैसा देईन कोठून?"
"बाबा, मी होस्टलले राईन. म्हणतेत का होस्टलले पैसे नाय लागत. पण रायता येते."
गोविंदाचं पोरावर जास्त प्रेम होतं. तसा त्यानं आपल्या लेकराच्या जिद्दीपुढं हार मानत होकार दिला नव्हे तर तोही आपल्या लेकरासोबत शहरात आला. थोडी विचारपुस केली वलतीगृहाचा फार्म भरला व अमर पुढील शिक्षण घ्यायला सज्ज झाला.
अमर शिकत होता पुढील शिक्षण. हळूहळू तो बारावी पास झाला व लवकरच त्याचा नंबर त्याला गुण चांगले असल्यानं डि एडला लागला व आज तो डि एड होवून एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागला.
शाळा समता पेरण्याचं केंद्र आहे असे म्हटल्या आतिशयोक्ती होणार नाही. कारण सुरुवातीला जी मुलं शाळेत येतात. त्यांना कोणताच भेदभाव माहित नसतो. हळूहळू हा भेदभाव माहित होतो तो घरुन नाही तर शाळेतूनच. कारण मुलं ही अनुकरण प्रिय असतात. ती आपल्या शिक्षकांचं अनुकरण करीत असतात. तो शिक्षण आपल्याप्रती व्यवस्थीत वागतो का? आपला लाड करतो का? याचा विचार करीत तो वागत असतो. यात जर आपण आपल्या शाळेत संस्थाचालकाच्या वा मुख्याध्यापकाच्या दबावात काम करीत असू तर आपण आपल्या शिक्षकी पेशाला न्यायच देवू शकत नाही. म्हणून निदान शिक्षकांनी तरी कोणाच्या दबावात काम करु नये. विद्यार्थ्यांचा लाड करावा. त्यांना अपशब्द बोलू नये. त्यांना समानतेच्या गोष्टी सांगाव्यात. जेणेकरुन तेच समानतेचे संस्कार त्यांच्यावर होतील व जीवनात ते कोणालाही असमान लेखणार नाहीत. अपशब्द बोलणार नाहीत. कारण बालपणातच झालेले संस्कार हे चिरकाल टिकत असतात. जात, स्री पुरुष समानता हे मुल्य अगदी या कोवळ्या बालवयापासूनच मुलांच्या मनात बिंबवायला हवी. त्यादृष्टीनं प्रयत्न व्हायला हवा.
शाळा........एक समता पेरणारं दालन. या ठिकाणी लहान लहान मुलं येत असतात. त्यांचं वय कोवळं असतं. त्यांना साधं त्यांच्या बाबाचंच नाव माहित नसतं तर जात कशी काय जात कशी काय माहित असणार. लहान मुलांना माहित नसते जात. ते वेगळ्याच विश्वात जगत असतात. परंतू कालांतरानं त्यांना जात माहित होते शिक्षक विचारतात तेव्हा.
शिक्षक विचारतात, ''हं, सांगा आपल्या वर्गात अनुसूचीत जातीचे कोण कोण आहेत?''
विद्यार्थ्यांना ते कळत नाही. तेव्हा शिक्षक विचारतात,
''हं, सांगा, कोणाचे वडील कार्पोरेशनला कामाला जातात? कोणाचे वडील बकरे कापतात? कोणाचे वडील वाजा वाजवतात तसेच कोणाचे वडील चपला विकतात शिवतात बनवतात?' वैगेरेवैगेरे नानात-हेचे शिक्षकांचे प्रश्न. विद्यार्थ्यांना त्यांचे वडील कोणती कामे करतात ते अगदी चांगलं माहित असतं. त्यातूनच जात माहित होतं विद्यार्थ्यांना. तसेच शिष्यवृत्तीचे फार्म भरीत पालकही आपल्या पाल्यांना जातीचा हवाला देवून सांगतात की अमूक फार्म भरायचा आहे. मैडमला विचारशील.''
मुले मैडमला विचारतात. येथूनच मुलांच्या मनात जातीचा उगम होतो. मुले जसजशी मोठी होतात. तशी जात व धर्म विद्यार्थ्यांना कळतो. मग हा अमूक जातीचा हा तमूक जातीचा असा भेदभाव तयार होतो.
ती मुलगी आहे. मी मुलगा आहे. मुलीसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती मुलांना दुसरी. या सर्व गोष्टी समता पेरणा-या गोष्टी नाहीत. मुळात विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी जातीची गरज नाही. तसेच सर्व वर्गखोल्यातून समताच विकसीत व्हायला हवी. परंतू कोण करणार? अजून तरी एकदा डॉक्टर बाबासाहेबांना जन्म घ्यावा लागेल. परंतू तसे होणे शक्य नाही. कारण पुनर्जन्म अशक्य अशी बाब आहे.
हा आमचा देश. आम्ही दररोज वर्गावर्गात संविधान म्हणतो. समता, बंधूता आणि न्याय तोही समान जोपासण्याची प्रार्थना नव्हे तर शपथ घेतो. परंतू असा समान न्याय जोपासतो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आम्ही देशात तर राहतो खरे. परंतू माणसाला माणसासारखं आजही वागवीत नाही. जात जात करीत करीत आजही जातीच्याच बुगड्यानं चालतो. आपलीच जात कशी श्रेष्ठ हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. इतर जातींना कनिष्ठ समजतो. अनुसूचीत जातीची तर पर्वाच नाही. प्रसंगी आदिवासींना आपण जवळ करतो. परंतू अनुसूचीत जातींना नाही.
डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान बनवलं म्हणून थोडासा फरक पडला. आता इतर समाजाच्या बरोबरीनं बसता येते. त्यांच्यासोबत जेवनही करता येते. व्यवहार देखील. नाहीतर संविधानापुर्वी माणसाची स्थिती पशूसारखीच होती. पशूला जसं आज आपण गुलामासारखं कैद करतो. त्याला बरं वाटो की नको, कामाला लावतो. अशीच स्थिती. आज ती स्थिती बदलली असली तरी पुर्णतः बदललेली नाही. ब-याच ठिकाणी असा जातीचा भेदाभेद आहे आणि महिला पुरुषांचाही.
हा अमूक जातीचा हा तमूक जातीचा असा भेदभाव आजही आहे आणि तो प्रकर्षानं जाणवतो. परंतू अशी कोणाची जात काढणं म्हणजे गुन्हा असल्यानं कोणी कोणाची जात काढत नाहीत. समतेनं वागण्याचा दिखावा करतात. यात अपवादात्मक काहीजण नक्कीच चांगले आहेत. ते समजून घेवून वागतात. परंतू काहीजण नक्कीच चांगले नाहीत. ते तर जे चांगले वागतात. त्यांनाही बिघडविण्याचा प्रयत्न करतात. मुळात जातीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आरक्षण आहे. म्हणून इतर जातींना नोकरी, शिक्षण तसेच इतर ठिकाणच्या संध्या आहेत. नाहीतर कोणीही इतर मागासलेल्या जातींना विचारलं नसतं व हा समाज आज शिक्षण घेवू शकला नसता आणिनोक-याही मिळवू शकला नसता. आज सरकारी कार्यालयात नियुक्त्या करतांना बिंदू नामावली पाहिली जाते. अनुसूचीत जातीचे किती? अनुसूचीत जमातीचे किती? त्यावरच आधारीत अनुदान दिलं जातं. नाहीतर अनुदानही दिलं जात नाही. परंतू आजही हा बिंदू नामावलीचा नियम धाब्यावर बसवून ब-याच सरकारी शाळेत अनुसूचीत जाती जमातीची पदं न भरता केवळ आणि केवळ इतर एकाच समाजाची पदं भरलेली आहेत. हे विशेषतः शाळेच्या बाबतीत घडलेले आहे. ज्या ज्या शाळा ओबीसीच्या आहेत. तिथे बरेच कर्मचारी ओबीसी आहेत आणि ज्या शाळा एससी संस्थाचालकाच्या आहेत. तिथे बरेच कर्मचारी एससी. संस्थाचालकाची जी जात असेल, तीच जात जास्त. कारण त्याला घरच्या, तसेच जवळच्या सर्व नातेवाईकांना नोकरीला लावायचे असते. इतर जातींना नाही. अनुसूचीत जाती जमातींना तर नाहीच नाही. ती संचालक मंडळी रोस्टर पुर्ण करायचा असल्यानं केवळ नावापुरतं अनुसूचीत जातींना प्राधान्य देतात वा जमातींना. त्यातच एक पळवाट काढतात. ती म्हणजे संबंधीत उमेदवार मिळाला नाही. म्हणून आपल्याच जातीतील उमेदवाराची नियुक्ती. यात म्हणायचं एवढंच की रोस्टर पुर्ण करतांना संबंधीत उमेदवार का मिळत नाही. मिळतो, परंतू आपल्या नातेवाईकाची पदभर्ती करायची असल्यानं तो उमेदवार न मिळाल्याचा दाखला देवून बिंदू नामावलीला छेद दिला जातो. हे झालं अनुसूचीत जातीजमातीबाबत.
मुळात स्रीयाबाबतही सरकारी क्षेत्रात अशीच मानसिकता आहे. स्रियांनी नोकरी करु नये म्हणून तिलाही अशा प्रशासकीय ठिकाणी बराच त्रास दिला जातो. तिला टोमणे, मारणे, छेडछाड करणे, टाँगटिंग करणे इत्यादी सर्व गोष्टी. काही ठिकाणी असे संस्थाचालक स्रियांचे लपूनछपून फोटोही काढतात. काही ठिकाणी स्रिया शारिरीकदृष्ट्या शिकविण्यास सक्षम नाही म्हणून त्यांना मेडीकल तपासणी करायला जाणूनबुजून पाठवलं जातं. अशी दुर्बल मानसिकता. तसेच ज्या ज्या ठिकाणी शाळा नाही, फक्त कार्यालय आहे. तिथे तर काही औरच प्रकार घडतात. जे स्री चरित्राला शोभत नाहीत. हा मानसीक छळच असतो स्रियांचा. परंतू नोकरी आहे आपली. वेतन कोण देणार. नोकरी जाईल विनाकारण. म्हणून सा-या महिला गप्प असतात. निमूटपणे आपल्यावर होणारा अत्याचार सहन करतात. आपल्या बॉसबद्दल कधी ब्र देखील काढत नाहीत आणि काढलाच तर त्याचे परिणामही गंभीर स्वरुपाचे आढळून येत असतात.
महत्वाचं म्हणजे भारतासारख्या विकसीत देशात अशी परिस्थीती का निर्माण व्हावी? लोकांनी माणसाला माणसासारखं का वागू देवू नये? स्रियांनाही कार्यालयात समानतेनं का वागवू नये आणि अनुसूचीत जाती जमातींना का समस्या निर्माण व्हावी? याला जबाबबदार कोण?
आज याबाबत सांगायचं झाल्यास याला जबाबदार न्यायालय आहे. न्यायालयातून अशी विकृत मानसिकता जोपासणा-या घटकाला दंड होत नाही. म्हणूनच अशा प्रकरणात त्यांची हिंमत वाढते व ते गुन्ह्यावर गुन्हे करीत जातात. याबाबतीत एक प्रकरण सांगतो. प्रकरण आहे एका शाळेतील मुख्याध्यापकाचं. त्याचं एका शिक्षक कर्मचा-यासोबत भांडण झालं. तो शिक्षक कर्मचारी अनुसूचीत जातीतील होता. पर्यायानं या भांडणात शिवीगाळही झाली. त्यातच जातीवाचक शिव्याही निघाल्या. मग काय जाती काढण्यावरुन मारपीटही.
सदर शिक्षकानं त्या मुख्याध्यापकाची तक्रार पोलिस स्टेशनला टाकली. पोलिसांनी चौकशीअंती तो खटला न्यायालयात नेला. शेवटी खटला सुरु झाला.
खटल्यामध्ये आरोपीच्या बाजूने खाजगी वकील होता व सदर शिक्षकाच्या बाजूनं सरकारी वकील. सरकारी वकील संबंधीत पार्टीला पैक झाला. त्यातच त्या खटल्याचा न्याय न्यायालयातून पक्षकाराच्या बाजूनं गेला.
आपल्याला न्यायालयातही न्याय मिळाला नाही म्हणून पक्षकारानं तो खटला उच्च न्यायालयात टाकला नाही. तो चूप बसला. परंतू आरोपी चूप बसला नाही. त्यानं उलट अपील दाखल केली आणि कोर्टाला सांगीतलं की असं प्रकरण घडलंच नाही. हे सर्व थोतांड आहे. तो खटला न्यायालयात सुरु असतांना संबंधीत व्यक्ती मरण पावला. त्यावर वारसांनी तो खटला लढण्यासाठी अर्ज केला.
महत्वाचं म्हणजे खटल्यांचा निकाल काय लागो ते लागो. परंतू असे जर खटले उभे राहात असतील आणि न्यायालयातून असा संबंधीत ज्या व्यक्तीवर अत्याचार झाला, त्याला न्याय जर मिळत नसेल. शिवाय त्या व्यक्तीला पराभवाचा सामना करावा लागत असेल. व्यतिरीक्त त्याच पराभवी व्यक्तीवर पुन्हा परत खटला दाखल करुन त्याची प्रताडणा केली जात असेल, तर त्यानं जगायचं कसं? का? त्याचा दोष आहे का की त्याचा जन्म अनुसूचीत जातीत झाला? का, अशावर अत्याचार झाल्यावर त्यानं न्यायालयात दाद मागू नये? त्यानं निमुटपणे अत्याचार लहन करावे? इतर लोकांनी त्याचेवर अत्याचारच करीत जावेत. इत्यादी गोष्टी आज सर्रासपणे समाजात घडत असल्यानं आजही जातीजातीतील अत्याचार दूर होत नाहीत. उच्च जातीवंतांना माहित असतं की आपण एकदा का सुटलो की आपणच संबंधीत पक्षकारावर खटला दाखल करु. मग कसे अत्याचार दूर होतील अनुसूचीत जाती आणि जमातीवरील? कसे अत्याचार दूर होतील स्रियांवरील. इथे तर बलत्कार करुनही न्यायालयातून निर्दोषता सिद्ध करणारे घटक बरेच आहेत आणि त्यांना निर्दोष बाइज्जत बरी करणारेही घटक न्यायालयात भरपूर आहेत. जे वकील म्हणून काम करतात. खरं तर त्यांना झालेल्या अत्याचाराचं काही घेणंदेणं नसतं. फक्त पैसा कमवणं हाच उद्देश असतो. मग कसा आज भेदभाव दूर होईल आणि कशी भेदभावाची मानसिकता नष्ट करता येईल? ती मानसिकता बदलविताच येणे शक्य नाही.
विशेष म्हणजे ज्या शाळेतून विद्यार्थी मनात समता पेरली जावी. त्याच विद्यार्थ्यांच्या मनात जातीभेदाचं स्फुर्लिंग फुलवलं जातं. त्यांना जात शिकवली जाते. त्यांना जातीची वैलेडीटी (जात पडताळणी) मागीतली जाते नव्हे तर जातीला जीवंत ठेवले जाते.
महत्वाचं म्हणजे कशाला हव्या जाती? का, जात काढून जातीजातीत कलह माजविण्यासाठी जाती असाव्यात का? का, स्वार्थ साधून घेण्यासाठी जाती असाव्यात का? का, निवडणूकीत जातीची गलेलठ्ठ मते मिळविण्यासाठी जात असावी का? जर यासाठी जात हवी असेल तर खुशाल ठेवावी जात आणि भेदभावही खुशाल होवू द्यावा. तसेच जातीवाचक शिवीगाळही. त्यातच कोणीही खटले दाखल करु नये आणि न्यायालयानेही वेळ जातो फालतूचा म्हणून असे अनुसूचीत जातीचे, खटलेच दाखल करुन घेवू नये. तसेच ज्या न्यायालयातून स्रियांनाही न्याय दिला जात नसेल, त्याही न्यायालयानं अशा स्री अत्याचाराचे खटलेच दाखल करु नये. होवू द्यावे अनुसूचीत जाती जमातीसारखेच त्यांचेवर अत्याचार. दररोज निरनिराळ्या मुलींवर अत्याचार व्हावेत. असंच न्यायालयाला वाटतं का? आज अरुणा शानबाग जीवंत नाही. परंतू प्रकरण मात्र जीवंत आहे. तिच्यावर बावीसव्या वर्षी बलत्कार झाला. त्यात ती बेशुद्ध झाली. ती तब्बल बेचाळीस वर्ष कोमात होती. त्यानंतर ती कोमातल्या अवस्थेतच मरण पावली. एवढा क्रुर बलत्कार! बलत्काराची शिक्षा झालेला तिचा बलत्कारी........बलत्काराची सात वर्षे शिक्षेची पुर्ण होताच तो सुटला. त्यानं दुसरी पत्नीही केली. परंतू अरुणा मरतपर्यंत त्या शिक्षेतून सुटली नाही. का? तिचाच गुन्हा होता का? खरं तर ती होशमध्ये येईपर्यंत तो आरोपी सुटायला हवा नव्हता. शिवाय सोडलेच तर न्यायालयानं तिची काळजी घ्यायचं बंधन त्याचेवर लावायला हवं होतं. परंतू न्यायालयानं असं केलं नसल्यानं तो बाइज्जत बरी झाला. त्यानंतर अशा बलत्कारात फक्त सातच वर्षाची शिक्षा होते. दुसरं काहीच होत नाही. असं समजणारी माणसं बलत्कार करीत राहिली. त्यातच दिल्लीचं निर्भया प्रकरण घडलं. उन्नावचं प्रकरण घडलं. खैरलांजी प्रकरण घडलं आणि आणखी बरीच प्रकरणं घडत आहेत. आज पाहिजे त्या प्रमाणात शिक्षेचं प्रावधान नसल्यानं गुन्हेगार चार वर्षाच्याही मुलींवर बलत्कार करीत आहेत. मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. तसेच आज कार्यालयातील बॉस वा इतर माणसेही महिलांकडे तिरप्या नजरेनं पाहात आहेत. छळत आहेत. कारण आजच्या काळात पोलिसस्टेशन वा न्यायालयातून वा समाज घटकातून दादच मिळत नाही. ते सर्व घटक मौसेरे भाऊ असल्यागत वागत असतात. आजही स्रियांना घरी दारी दुय्यमच स्थान असून स्री जन्माचा आनंद व्यक्त होत नाही. मुली जन्मास आल्यास मुलगा जन्माची वाट पाहिली जाते. परंतू मुलींवर काही लोकं कुटूंबनियोजन करीत नाहीत. प्रसंगी चारचार मुली जन्मास घातल्या जातात पुत्रप्राप्तीसाठी. काही ठिकाणी तर भ्रृण तपासले जातात. मुलगी आहे का मुलगा हे पाहण्यासाठी. मुलगा असेल तर भ्रृण ठेवला जातो आणि ते भ्रृण मुलगी असेल तर सर्रासपणे नष्ट केलं जातं आजही. कारण कुटूंबात स्रीला दुय्यम स्थान असणं. आजही मुली घरची सगळी कामं करतात आणि मुलं ठोंब्यासारखी बसून राहतात. काही ठिकाणी नोकरी करणा-या मुली जरी असल्या, तरी घरी गेल्यावर त्यांना राबावंच लागतं. मात्र पुरुष घरी जाताच तो पाहिजे त्या प्रमाणात राबत नाही. ही वास्तविकता आहे.
ही असमानता आहे. ह्याच गोष्टी शाळेत वर्गावर्गात शिकवायची गरज आहे. मुले मुली समान आहेत. हाच मंत्र. तसेच जातीजातीत भेदभाव करु नये हाही मंत्र. परंतू ते न शिकवता आपण स्वतःच असं भेदभावानं वागत राहिलो. अनुसूचीत जाती जमातींना हिन लेखत राहिलो, तर विद्यार्थ्यांना कोणते धडे देणार! आपणच कार्यालयात बॉसच्या हो ला हो मिरवीत राहिलो तर ही समता कार्यालयात कशी प्रस्थापीत करणार. तसेच शाळेतही संस्थाचालकाच्या अत्याचाराचे आपण जर बळी ठरत असू तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय न्याय देणार. तेव्हा आपणच बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पावले असंच वागावं. घरी दारी अन् कार्यालयातही. तेव्हाच आपण ख-या अर्थानं समता प्रस्थापीत करु शकू. अन्यथा नाही. हे तेवढंच खरं आहे.
विशेष सांगायचं म्हणजे अनुसूचीत जाती जमाती प्रवर्ग व महिला वर्ग. यांना आज दुय्यम गणलं जात असून त्यांना समानतेच्या कक्षेत मोजलं जात नाही. फक्त वरवर दाखवलं जातं की आम्ही आपल्याला समान लेखतो. मानतो वैगेरे वैगेरे. परंतू प्रत्यक्षात तसं काहीही नाही. फक्त तो एक दिखावा आहे. हा दिखावेपणा जेव्हापर्यंत समाजातून वा समाजाच्या मनातून दूर होणार नाही. तोपर्यंत समाजातून या दोन्ही घटकाबद्दल आदर निर्माण होणार नाही आणि जेव्हा असा आदर निर्माण होईल. तेव्हाच ख-या अर्थानं समाज बदलेल. असे बलत्कारं घडणार नाही. अनुसूचीत जातीव
जमातीवरही अत्याचार होणार नाही. कोणी अत्याचार करणार नाही. कोणी कोणाला जातीवाचक शिव्याही देणार नाही. असंच घडायला हवं. तेव्हाच सक्षम भारत घडवता येईल. न्यायालयानंही याबाबतीत पुढाकार घ्यावा. चालढकलपणा करु नये. जे संविधानात लिहिलं आहे की कायद्यासमोर सर्व समान आहेत. त्याचं पालन व्हावं. त्याचं जेव्हा पालन होईल. त्या गोष्टी जेव्हा अगदी बालवयापासून शाळेत शिकवल्या जातील. स्री मनात रुजविल्या जातील. तसेच अनुसूचीत जात जमातच नाही तर इतर तमाम सर्व जातीधर्माच्या व्यक्तींच्याही मनातून रुजतील. तेव्हाच हा स्री भेदाभेद, अनुसूचीत जाती भेदाभेद आणि इतर सर्व प्रकारचा भेदाभेद दूर होईल. जात नष्ट झाली नाही तरी........फक्त सक्षम देशासाठी आणि देशाला मजबूत करण्यासाठी माणसानं माणसाला माणसासारखं वागवायला हवं. माणसासारखं जगवायला हवं. मनात कुटील भाव न ठेवता. तसेच अहंकारी वृत्ती न ठेवता.........
अमर नित्यनेमानं शाळेत जात होता. परंतू तो अनुसूचीत जातीचा असल्यानं त्याला त्या शाळेत फार त्रास होत होता. त्यातच ती शाळा विटाळाच्याच गोष्टी करायची नव्हे तर तो त्या जातीचा असल्यानं भेदभावही करायची.
सुरुवातीला तो काही म्हणेल म्हणून शाळेतील लोकं भीत भीत विटाळ आणि जातीभेदाच्या गोष्टी करायचे. परंतू त्यांचे टोमणे सुरुच असायचे. त्यावेळी राग असा यायचा की स्वतः मरुन जावं किंवा त्यांना मारावं. परंतू काही उपाय नव्हता. कारण त्याला नोकरी करायची होती. तसेच त्या नोकरीवर त्याचं पोटपाणी होतं.
संस्थाचालक हा उच्च जातीतील असून त्यानं आपल्याच नातेवाईकाची नियुक्ती मुख्याध्यापक म्हणून केली होती. तो संस्थाचालक मुख्याध्यापकाकरवी अमरला त्रास देत होता. कधीमधी मधामधात जातही काढत होता. त्यातच सर्वच त्या शाळेतील नियुक्तीधारक हे उच्च जातीतील असून त्यांनाही नोकरीचं महत्व होतं. त्यांचंही त्यावर पोटपाणी अवलंबून होतं.
या सर्वच शाळेतील उच्च जातीच्या माणसांपैकी काही काही त्या मुख्याध्यापकालाही समजवत की त्यानं असा प्रकार निदान शाळेत तरी करु नये. कारण अशा टाँगटिंगनं त्याचा अपमान होतो. असं बरेचदा घडलं होतं. परंतू मुख्याध्यापक सुधरण्याचं नावच घेत नव्हता.
सततचे टोमणे व सततचा अपमान गिळंकृत करत करत अमर त्या शाळेत नोकरी करीत होता. ज्या शाळेच्या वर्गखोल्यातून समतेचे वारे वाहावेत. तसा अमर कधी कधी विचार करायचा की ही शाळा. शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. तिथं समता असणं गरजेचं आहे. आपण जर शाळेतच विषमता पाळत असलो तर ती विषमता आपल्या वागण्यातून नक्की दिसेल. कारण जसं बीज आपण पेरतो. तेच बीज पुढंं अंकुरतं. पेरुच्या झाडाला कधीही आंबे लागत नाही. तिच ठेवण असते त्यांची. कारण निसर्गानं त्या झाडाला तसं बनवलं आहे. माणसाचंही तसंच आहे. जर एखाद्या माणसाच्या मनात कुविचार शिरलेच तर त्याच्या मनात सुविचार शिरायला वेळच लागतो. सुविचार लवकर येत नाही माणसाच्या मनात. तेच संस्काराचं आहे. शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. असे असतांना सर्व विद्यार्थ्यांसमोर आपण समतेनं नजरेत आलो नाही आणि आपण जर विषमतेननं वागत असलो तर विद्यार्थी मनात समस्या निर्माण होतात. जरी आपण विद्यार्थ्यांसमोर समता वापरत असलो आणि इतर ठिकाणी विषमेनं अधिवास करीत असलो, आपले आचारविचार तसेच ठेवत असलो, तरी आपण वर्गात जाताच आपल्या वागण्यातून पदोपदी विषमता दिसेल. म्हणून लोकांनी विशेषतः शिक्षकांनी तरी विद्यार्थ्यांसमोरच नाही तर इतरत्रही विषमतेनं वागू नये. समतेनंच वागावं.
उदाहरण डॉक्टर बाबासाहेबांचं देता येईल. बाबासाहेब जेव्हा शिकत होते, तेव्हा त्यांना शिकविणारे शिक्षक आंबावडेकर हे विशेेषता विषमता पाळणारेच होते. परंतू ते तेवढ्या प्रमाणात विषमता पाळणारे नसतील. म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकर नाव दिलं.
शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. तिथं समता असणं गरजेचं आहे. आपण जर शाळेतच विषमता पाळत असलो तर ती विषमता आपल्या वागण्यातून नक्की दिसेल. कारण जसं बीज आपण पेरतो. तेच बीज पुढंं अंकुरतं. पेरुच्या झाडाला कधीही आंबे लागत नाही. तिच ठेवण असते त्यांची. कारण निसर्गानं त्या झाडाला तसं बनवलं आहे. माणसाचंही तसंच आहे. जर एखाद्या माणसाच्या मनात कुविचार शिरलेच तर त्याच्या मनात सुविचार शिरायला वेळच लागतो. सुविचार लवकर येत नाही माणसाच्या मनात. तेच संस्काराचं आहे. शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. असे असतांना सर्व विद्यार्थ्यांसमोर आपण समतेनं नजरेत आलो नाही आणि आपण जर विषमतेननं वागत असलो तर विद्यार्थी मनात समस्या निर्माण होतात. जरी आपण विद्यार्थ्यांसमोर समता वापरत असलो आणि इतर ठिकाणी विषमेनं अधिवास करीत असलो, आपले आचारविचार तसेच ठेवत असलो, तरी आपण वर्गात जाताच आपल्या वागण्यातून पदोपदी विषमता दिसेल. म्हणून लोकांनी विशेषतः शिक्षकांनी तरी विद्यार्थ्यांसमोरच नाही तर इतरत्रही विषमतेनं वागू नये. समतेनंच वागावं.
उदाहरण डॉक्टर बाबासाहेबांचं देता येईल. बाबासाहेब जेव्हा शिकत होते, तेव्हा त्यांना शिकविणारे शिक्षक आंबावडेकर हे विशेेषता विषमता पाळणारेच होते. परंतू ते तेवढ्या प्रमाणात विषमता पाळणारे नसतील. म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकर नाव दिलं.
गुरु हा मुख्यतः जातीभेद पाळणारा नसावा. तसेच मुलंमुली हाही भेदभाव पाळणारा नसावा.
अलिकडे शिक्षकांच्या शिकवणूकीचं निरीक्षण केल्यास असं निदर्शनास येतं की काही शिक्षकांना मुली जास्त आवडतात. त्याचं कारण म्हणजे मुली अभ्यासाच्या गोष्टी पटकन ऐकतात. लवकर स्वाध्याय सोडवतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास मुली या अभ्यासात हुशार असतात. त्या अभ्यासात हुशार असल्यामुळं शिक्षकांना आवडतीलच. याचाच अर्थ असा की जी मुलं कमकुवत असतात. त्या मुलांकडे दुर्लक्ष होते.
शिक्षक तिही मुलं आपलीच समजून तिही मुलं पुढं जायला हवी असा विचार न करता त्या मुलांना शिकविण्यातून मागे पाडतात. त्या मुलांकडे लक्ष देत नाहीत. का? तर ते ऐकत नाहीत. अभ्यास करीत नाहीत. वारंवार सांगूनही कंटाळा येतो. परंतू मार्ग नसतो. शेवटी त्याच मुलांकडे दुर्लक्ष होवून ती मुलं मागे पडण्यामागे महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे आपलं प्रेम. आपण ती मुलं अभ्यास करीत नाही. म्हणून त्यांचा राग करतो. त्या मुलांना कधी जवळ घेत नाही. सारखे रागावतो. अलिकडे शिक्षणात रागावण्यावर बंदी घातली आहे तरी. हा आपला भेदभावच आहे. समजा आपल्याच घरात असा एखादा मंदबुद्धी मुलगा जन्मास आला तर आपण त्यांना फेकून देतो का? कधी रागावतो का? नाही ना. मग अशा मुलांची आपण हेळसांड का करावी. तेही आपलेच विद्यार्थी ना हुशार मुलांसारखेच. मग त्याचा अजिबात राग करु नये. त्याला जवळ घ्यावे. कुरवाळावे व कोणताही भाग त्याला आपलंसं करुन समजावून द्यावा. जेव्हा त्या मुलाला आपण जवळ घेवू. कुरवाळू. प्रेम देवू. तेव्हाच तो मुलगा तुम्हालाही आपला समजेल. अभ्या करेल व शिकेल. त्याला समस्या येणार नाही. त्याला तुम्ही आवडाल. जवळच्या वाटाल. हवं तर तो तुम्हाला चांगला प्रतिसाद देईल. हुशार बनेल व साहजीकच पुढं जाईल.
आज काळ तंत्रज्ञानाचा आहे. जुनं पिढीजात शिक्षण आज कालबाह्य झालं आहे. ते मागे पडलं आहे. त्या शिक्षणाला आता कोणीही विचारत नाही. अगदी डीजीटल शिक्षणाला आज विचारलं जातं. आपण नेहमी पाहतो की घराघरातील लहान मुलं मोबाईल बघतात. मोबाईल न दिल्यास ती मुलं रडतात. त्यांना मोबाईलवरचे खेळ आवडतात. कार्टून शो आवडतात. त्यांना मोबाईलच्या दुष्पपरीणामाचं काही घेणं देणं नाही. मोबाईलनं डोळे खराब होतात. कान खराब होतात. हे काही त्यांना कळत नाही. फक्त मोबाईलवर दिसणारी दृश्य ती मग कितीही वाईट असली तरी ती मुलांना आवडत असतात. तशीच ती विद्यार्थ्यांनाही आवडतात. तेव्हा हाच दृष्टीकोन अंगीकारुन शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवितांना मोबाईलचा शैक्षणीक साहित्य म्हणून वापर करावा. शासनानंही त्याला परवानगी द्यावी. तसेच जी परवानगी शासन देईल. त्या परवानगी स्वरुपात शिक्षकांनी मोबाईलचा अतिवापर वा गैरवापर टाळावा. हे झालं डीजीटल शिक्षण. यासोबतच शिक्षकांनी खेळ शिकवावे. खेळ विशेषतः मुलांना जास्त आवडतात. स्पर्धा घ्याव्यात. स्पर्धेत मुलांना जिकीरीने भाग घ्यायला आवडते. तसेच वेगवेगळे उपक्रम घ्यावेत.
हे सर्व ठीक आहे. परंतू हे तेव्हाच साध्य होईल, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर प्रेम कराल. तुम्ही जेव्हा त्यांच्या र प्रेम कराल, तेव्हा तिही मुलं तुमच्यावर प्रेम करतील. मग तुमचं सर्वच ऐकतील. तुम्ही जे सांगाल ते.
आज स्पर्धेचा काळ आहे. लोकं पुर्वीसारखे अनाडी राहिलेले नाही. अगदी थोड्या थोड्या कारणासाठी मुलांचे पालक शाळेत येत असतात. अगदी थोडंसं रागावलं तरीही. तेव्हा अशा काळात शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे कसे हा प्रश्न पडलेला आहे. तेव्हा अशा खेळाच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना शिकवले. तर विद्यार्थी शिकतील. ते केवळ शिकतीलच नाही तर चांगलं अर्थपुर्ण शिकतील. खेळातून व्यायाम होतो. बुद्धीचा विकास होतो. जिद्द, चिकाटी वाढीस लागते व हव्या तशा ज्ञानाचीही माहिती होते. परंतू यामध्ये विद्यार्थ्यांना भेदभाव दिसायला नको. कारण खेळत असतांना काही मुलं बाहेर राहतात सहभागी होत नाही. कारण मर्यादा असते. तेव्हा असे खेळ शिकवितांना सर्वांना सहभागी करुन घ्यावं. एकही सुटता कामा नये. विशेषतः त्यासाठी गट करावेत. तेव्हाच सर्व मुलांना शिकता येईल. काही करुन दाखविण्याची संधी मिळेल व भेदभावही दिसणार नाही. त्यानंतर कोणालाही विद्यार्थी शिकेल, पण.......असं म्हणण्याचीही वेळ येणार नाही.
अमरचं बरोबर होतं. कारण काही काही शिक्षकांना शिकवताच येत नव्हतं. विद्यार्थ्यांनी अभ्यास न केल्यास त्याचा राग शिक्षक मनात धरत व त्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत असत. पर्यायानं असे विद्यार्थी अभ्यासात खुप मागे पडत असत.
अमर आपल्या वर्गात इमानी इतबारे शिकवीत होता. त्याचा शिकविण्याच्या बाबतीत त्या शाळेत कोणी हात पकडत नव्हतं. पालकवर्गही त्याच्या शिकविण्यावर ताशेरे ओढत नसत. विद्यार्थीही त्याच्या शिकविण्यावर संतुष्ट होते. परंतू त्याच्या त्या चांगल्या शिकविण्याच्या गुणांची त्या शाळेत प्रसंशा होत नव्हती. त्याचे चांगले विचार.......ती उमेदीची भाषा आज ओस पडली होती. कारण त्या शाळेचा संस्थाचालकच मुळात भेदभावी धोरण ठेवत होता.
अमरची जातच मुळात चांभार. गावाला त्यानं तसा भेदभाव कधीही पाहिला नाही. परंतू शाळेत असे विषमतेचे वारे वाहू लागले होते. चांभार, मांग, महार जातीची मुलं होती शाळेत. त्याच्याशीही भेदभाव होतच होता. परंतू अनुदान मिळतं म्हणून ती मुलं होती व त्यांचे प्रवेश होत होते. वास्तविक शिकविण्यातही भेदभाव होताच. फरक एवढाच की डॉक्टर बाबासाहेबांसारखं त्या मुलांना व्हरांड्यात बसायला लावत नव्हते. तसेच त्यांना जेवायलाही वेगळं बसवावं लागत नव्हतं. तसंच शिकवितांनाही. मात्र अंतर्मनात जळफळाट होता तत्सम एस एसटीच्या जातीबाबत.
अमर जेव्हा शाळेत शिकवायचा. तेव्हा त्याला बालपणीचे दिवस आठवायचे. ते गाव आठवायचं. त्यासोबतच तो पावसाळाही आठवायचा. ती घराशेजारीच डराव डराव करणारी बेडकं आठवायची. त्यातच त्या पावसाची संततधार. पाऊस सुरु असतांना आई म्हणायची, 'बाहेर जावू नगं. सर्दी पकडल.' परंतू तशी आई का म्हणते. ते त्यावेळी कळायचं नाही. मग हळूच तो बाहेर पडायचा. त्या पावसात भिजायचा. मग भिजून घरी आल्यावर आई रागवायची. कधी कधी मारायचीही. परंतू तो त्यापासून बोध घ्यायचा नाही. सुधरायचाही नाही. पुन्हा तो हळूच बाहेर पडायचा आणि मित्रांसमवेत तो त्या पुराच्या पाण्याजवळ जायचा.
अमरला सुरुवातीला पोहणं येत नव्हतं. कालांतरानं तो हळूहळू पोहणंही शिकला होता. परंतू सुरुवातीला त्या बंद्या पावसात भिजत तो गावच्या ओढ्याजवळ काठावर उभा राहायचा आणि पोहणा-यांची मस्त मजा पाहायचा. ती मुलं त्या ओढ्याला तीव्र धार असूनही त्यात पोहायची.
त्याची आई मात्र त्या ओढ्याजवळ जायला रागवायची. कारण गत काही दिवसापुर्वी त्याच गावातला एक तरुण त्या ओढ्यात पोहायला गेला असतांना वाहात गेला होता. तरीही आजही त्या गोष्टीची भीती न बाळगता ती मुलं ओढ्यावर पोहायला जायची नव्हे तर पोहायची.
गुरं चारायला जातांना तर पावसात मजाच यायची. आई म्हणायची, 'बेटा, पावसात झाडात उभं राहायचं नाय. इज कोसळते.' परंतू पाऊस आला की ती जनावरं झाडातच आसरा घ्यायची. त्यामुळं नाईलाजानं त्यालाही झाडात उभं राहावं लागायचं. परंतू तो,झाडात उभा असतांना कधीही वीज कोसळली नाही.
अमरचं ते बालपण..... ते गावातील जीवन. त्यात काही औरच मजा भरलेली होती. परंतू आता बालपण संपलं होतं. आता खांद्यावर जबाबदारी आली होती.
कारण त्याचे मायबाप आज वृद्धावस्थेकडे चालले होते. आता तो तरुणही झाला होता.
शाळेतील टोमणे. त्या टोमण्याची त्याला सवय झाली होती. राग यायचा. परंतू तो राग मनातच गाडून अमर आपली दिनचर्या सांभाळत होता. कधी गावच्या आठवणी यायच्या. परंतू त्या गावच्या आठवणीवर मात करुन अमर पुढे वाटचाल करीत होता.
जात पात भेदाभेद करणारी ती शाळा आणि त्या शाळेतील माणसं. आज उच्च शिकली असली तरी अज्ञानीच वाटत होती. त्यातच असं वाटत होतं की हे मुलांना शिकविण्याच्या लायकीचे नाहीत. परंतू तो तसे म्हणूही शकत नव्हता. ती शाळा.......त्या शाळेत नातेवाईक भरपूर होते. जणू त्या संस्थाचालकानं आपल्या नातेवाईकासाठीच ती शाळा काढलेली असावी. ते नातेवाईक काही त्या शाळेत शिकवीत नव्हते. ते बसून राहायचे. परंतू त्यांना त्या शाळेतील मुख्याध्यापक काहीही म्हणायचा नाही. कारण त्याचेवर त्या संस्थाचालकाचा वरदहस्त होता. जर त्यानं काही म्हटल्यास त्या मुख्याध्यापकालाच निलंबीत करण्याच्या धमक्या दिल्या जात असत. त्या शाळेला कोणत्या अवमुल्यानं परवानगी दिली होती. ते कळायला मार्ग नव्हता. कारण ना त्या शाळेत सरकारी सुविधा होत्या. ना खाजगी.
शाळेसाठी सुविधांचा विचार करतांना ना बसायला डेक्स बेंच होते त्या शाळेत. ना चटया नीट होत्या. ना शौचालय होतं त्या शाळेत. ना क्रिडांगण होतं खेळायला. ना धड कार्यालय होतं. ना रंगरंगोटी. ना मुलांना ड्रेश मिळत होता. ना नोटबुकं. ना मध्यान्ह जेवन मिळत होतं. ना तांदूळ. ना पाठ्यपुस्तकही. कालांतरानं काही दिवस गेल्यावर शाळेत तांदूळ वाटप योजना सुरु झाली. पुढे या तांदळाची खिचडी बनविणे सुरु झाले. पुढे कालांतरानं पाठ्यपुस्तकंही मिळायला लागलीत.
अलिकडे देश डिजीटल झाला होता. बहुतःश सगळी कामं मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून केली जात होती. वर्गावर्गात कैमेरे लावणे सक्तीचे झाले होते. त्यातच समावेशीत शिक्षण योजनाही आली होती. या समावेशीत शिक्षण योजनेनुसार शाळेशाळेत विद्यार्थ्यांसाठी रँम्प लावणे गरजेचे होते. शाळेत दिव्यांग मुलांचाही प्रवेश करणे अनिवार्य होते. तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांचाही शिक्षणात समावेश करणे गरजेचे होते. त्यासाठी संस्थाचालक व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद डीजीटल असणं गरजेचं होतं. परंतू त्या शाळेचा चालक मालकच डीजीटल नव्हता. मग मुख्याध्यापक डीजीटल कुठून असणार. तोही तसाच होता. ना तो उच्च शिकलेला होता. ना त्यानं कोणता कोर्स केलेला होता. तो साधारणपणे दहावी शिकलेला असून त्यानं शिक्षकी पेशाचा कोर्स करुन नातेवाईकाची शाळा असल्यानं त्याला त्या शाळेत मुख्याध्यापक पद मिळाले होते. ती शाळा नातेवाईकांची असल्यामुळंच तो खपला होता. अलिकडं काळ डीजीटल झाला असला नव्हे तर बदलला असला तरी तो बदलायला तयार नव्हता. साहजीकच त्यामुळं शाळा मागं राहिली होती.
शाळेत पटसंख्या भरपूर होती. त्याचं कारण म्हणजे ती झोपडपट्टी. त्या शाळेला लागूनच झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमुळं व आता शाळेत खिचडी मिळत असल्यामुळं शाळेत मुलं येत होती. त्या पालकांना शिक्षणाचं काही लेनदेन नव्हतं. मुलं दिवसभर आपल्याला त्रास देत असतांना आपल्या नजरेच्या आड राहतात. याचेच त्यांना सोयरसुतक होते.
मुलांची पटसंख्या जास्त राहण्यामागे अाणखी एक कारण होते. ते म्हणजे कुटूंबनियोजन. ती झोपडपट्टी........त्या झोपडपट्टीत शिक्षणाचा बहुतःश अंश नव्हता. त्यामुळं त्यांना मुलं पैदा न करण्याचं महत्व माहित नव्हतं. त्यामुळं ते मुलं पैदा करतांना मुलांना इश्वराची देन समजून मुलं पैदा करीत. त्यामुळं एकाएका घरी पाच पाच मुलं असत. त्यातच मुलगा हा वंशाचा वारस समजून मुलगा जेव्हापर्यंत जन्मास येत नाही तेव्हापर्यंत ती मंडळी मुलांना जन्माला घालत असत.
मुलं या शाळेत भरपूर होती. त्याचं अाणखी एक कारण होतं. ते म्हणजे त्या शाळेच्या आजुबाजूला शाळा नव्हत्या. त्यामुळं लोकांना आपली मुलं दूर टाकणंही आवडत नसे. शेवटी ती मुलं त्याच शाळेत येत असल्यानं त्या शाळेतील संस्थाचालक अगदी माजून गेला होता.
ती माणसं काबाडकष्ट करायची. घरचे दोघंही जण अर्थात पती पत्नी कामाला जायचे. ते कमवून आणायचे. त्यांना कोणतंही काम करण्यात लाज वाटायची नाही. कोणी फोटो विकायचे काम करीत तर कोणी इमारती बांधकामाला जात. परंतू त्या झोपडपट्टीत कोणीही उच्चशिक्षीत शिकला सवरला नव्हता.
शिक्षक जेव्हा उन्हाळ्यात विद्यार्थी शोधायला जात. तेव्हा ते विद्यार्थी शोधत असतांना ते त्या झोपडपट्टीतही जात. त्यावेळी ती झोपडपट्टीतील मंडळी कोणत्याही अवस्थेत झोपलेले असायचे. त्याच ते रस्ते एवढे घाणेरडे असायचे की त्या रस्त्यानं चालायलाही किळस यायची. परंतू शाळा प्रवेशासाठी नाईलाजानं पालक संपर्क म्हणून जावं लागायचं. तसं शाळेत विद्यार्थी असल्यानं त्या भागात जायची गरज नव्हतीच.
पालक आपल्या मुलांना घेवून शाळेत येत असत. तसेच ते मध्यान्हवेळीही शाळेत यायचे. तेव्हा शाळेत येतांना ते अर्धनग्न अवस्थेत येत. त्यांना जर पोशाखाविषयी बोललाच कोणता शिक्षक तर त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं, 'घेवून द्या ना.' या उत्तरावर कोण घेवून देणार. म्हणून त्यांच्या त्या उत्तरानं कोणीही त्यांना उलट बोलत नसे.
शाळेतील अशी अवस्था......सगळी तानाशाही चाललेली. कारण संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांचे हितसंबंध नव्हे तर नातेवाईकपण. त्या नातेसंबंंधामुळं सगळं चांगलं चाललेलं. मुलं शिको अगर न शिको. त्यांना काही समस्याच नव्हती. तसेच मुलांना प्यायला पाणी असो वा नसो, शाळेत शौचालय असो वा नसो, शाळेत क्रिडांगण असो वा नसो. त्याचंही त्यांना उहापोह नव्हता. नशिबानं सगळं व्यवस्थीत चाललं होतं. तसेच जे घरचे होते अर्थात जे नात्यातील होते, ते मजा मारत होते. बाकीचे जे नात्यातील नव्हते. त्यांना मजा मारताच येत नव्हती. तसेच नात्यातील मंडळी कोणताच पैसा संस्थाचालकाला देत नव्हते. परंतू जे नात्यातील नव्हते. त्यांच्याकडून संस्थाचालक बळजबरीनं पैसा वसूल करीत होता.
ही परिस्थिती होती शाळेतील. संस्थाचालक आपली शाळा म्हणून त्या शाळेवर जीव लावत नव्हता. जसं आपण आपलं घर सजवतो. तशी ती शाळा तो सजवीत नव्हता. शिक्षकांचा देणगी स्वरुपात पैसा आला. परंतू त्या पैशानं त्यानं शाळेत कोणत्याच सुविधा केल्या नाहीत. तसेच तो पैसा आपल्या घरासाठी. मुलाबाळाच्या शिक्षणासाठी वापरला. त्यामुळं बराच पैसा वाचला. यातच तो पैशानं गलेलठ्ठ झाला होता.
आज तो गलेलठ्ठ झालेला संस्थाचालक अगदी माजून गेला होता. कारण आजच्या तारखेला त्यानं नियुक्त केलेला मुख्याध्यापक आणि त्याचे सर्व नातेवाईक त्याच्या सोबतीला होते. तसा काळ झपाट्यानं चालला होता. तो पलटवारी करणार होता. परंतू संस्थाचालक भ्रमातच होता.

****************************************
सगळं व्यवस्थीत चाललं होतं. त्यातच काळानं पलटी मारली. अचानक मुख्याध्यापक पदावर असलेल्या त्या शाळेतील मुख्याध्यापकाला त्याचे जुने दिवस आठवले. त्याचबरोबर त्याला आठवलं की आपण या शाळेसाठी घोर मेहनत केलीय. आपण जर नसतो तर ती शाळा वाढलीही नसती. त्यामुळं संस्थाचालकाचा ही शाळा वाढविण्यात काहीही रोल नाही. त्यानं फक्त जागा उपलब्ध करुन दिली. एक लहानशी इमारत बांधून दिली. परंतू पाहिजे त्या प्रमाणात सुविधा शाळेत केल्या नाहीत. फक्त पैसा कमवीत आहे. तो पैसा आज त्या मुख्याध्यापकासमोर संस्थाचालक आपल्या घरी नेत होता. तसेच तो पैसा पोत्यात भरुन नेत होता. हा पैसा शिक्षकांचा होता.
मुख्याध्यापकाच्या मनात द्वेषभावना निर्माण झाली होती. अन् का नाही होणार. जसा देवकीनं क्रिष्णाला जन्म दिला होता. परंतू पालनपोषण यशोदेनं केलं होतं. यामध्ये देवकीचं क्रिष्णजन्मात जसं महत्व होतं. तसंच आणि तेवढंच महत्व यशोदेचंही होतं. ती जर नसती तर क्रिष्ण कोणालाच दिसला नसता. काळाच्या ओघात तोही कंसाचा शिकार झाला असता. तीच भुमिका मुख्याध्यापकाची होती. संस्थाचालकानं शाळा रुपानं रोपटं जरी लावलं असलं तरी त्याला खतपाणी घालण्याचं काम मुख्याध्यापकानं केलं होतं. त्यामुळं ती शाळा वाढली होती. त्यातच आज रोपट्यातून मोठ्या झालेल्या या शाळेरुपी झाडाची फळं पैशाच्या रुपानं एकटाच संस्थाचालक चाखू पाहात होता. तीच गोष्ट मुख्याध्यापकाच्या मनात आठवताच ती त्याच्या डोळ्यात खुपली अर्थातच अंतर्मनाला बोचली. त्याला वाटलं की जरी संस्थाचालकानं रोपटं लावलं असेल, परंतू मी खतपाणी टाकलं आहे. तेव्हा या वाढलेल्या शाळेतील वाढलेल्या कमाईत अर्धा वाटा माझाच आहे. मग काय तो संस्थाचालकाला अर्धा वाटा मागू लागला. येथूनच शाळेची अधोगती सुरु झाली. त्या अधोगतीचे परिणाम संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांनाच भोगावे लागले.
मुख्याध्यापकाने संस्थाचालकाला शाळेच्या मिळकतीतील अर्धा वाटा मागतला. त्यातच संस्थाचालकानं तो वाटा देण्यास नकार दिला. तसं पाहता तो कसा देणार. कारण मुख्याध्यापक हा त्यानं नियुक्त केलेला नोकर होता. परंतू तो त्याचा नातेवाईक असल्यामुळं त्या मुख्याध्यापकाची वाटा मागणी त्यालाच शोभत होती. तसं पाहता मुख्याध्यापकाचं बरोबर होतं. कारण त्या शाळेत आता मेहनत करे मुर्गा व अंडा खाये फकीर अशी अवस्था झाली होती.
संस्थाचालकानं मुख्याध्यापकाला अर्धा वाटा द्यायला नकार देताच मुख्याध्यापकाला भयंकर राग आला. त्यातच त्याचा स्वभाव त्या दिवसापासून चिडचिडा बनला. तो विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून विद्यार्थ्यांना काहीबाही बोलू लागला. त्यातच पालकांनाही आणि शिक्षकांनाही. पालकांना लहान लहान गोष्टीसाठीी त्रास देवू लागला. त्याला वाटत होतं की अशानं तरी पालकवर्ग आपली मुलं शाळेतून काढून नेतील. तो विद्यार्थ्यांनाही त्रास देवू लागला. कारण ती मुलं घरी जावून आपल्या पालकांना सांगतील व पालक नाव काढून नेतील. असे मुख्याध्यापकाला वाटू लागले. त्यातच तो शिक्षकांनाही त्रास देवू लागला. कारण त्याला वाटत होते की अशानं तरी हे शिक्षक वर्गात शिकवणार नाहीत व शाळा बुडेल.
मुख्याध्यापकाचं असं बेताल वर्तन. विद्यार्थी आपल्या पालकांना त्या बेताल वर्तनाची कल्पना द्त. परंतू काही पालक त्याकडे दुर्लक्ष करीत असत. त्यांना मुख्याध्यापकाचं वर्तन माहित होतं. कारण आतापर्यंत त्यानं शाळा वाढविण्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या. त्या पालकांना माहित होत्या. त्यामुळं ते आपल्या पाल्यांच्या बोलण्यावर विश्वास करीत नव्हते. परंतू ते जेव्हा शाळेत कोणत्या कामानिमीत्य यायचे आणि मुख्याध्यापकाचं बेताल वर्तन पाहायचे. तेव्हा त्यांना शंका यायची की पाणी कुठंतरी मुरत आहे. काही ना काही घडलं आहे. मुख्याध्यापकाच्या डोक्यात थोडासाफरक पडला आहे. त्यातच जसा अनुभव पालकांना आला. तसे ते आपल्या परीसरात ती चर्चा पसरवू लागले. त्यातच काहीजण आपल्या पाल्यांनाही शाळेतून काढू लागले. काहींनी तर दूरच्या शाळेत आपली मुलं टाकणे पसंत केले. परंतू या शाळेत नाव टाकायला नकार देवू लागले.
ती विद्यार्थी पटसंख्या काही एकाएकी कमी झाले नाही. त्या विद्यार्थी पटसंख्येला कमी व्हायला बराच अवधी लागला. कारण मुख्याध्यापकाचे पुर्वी बनलेले हितसंबंध. ते हितसंबंध पालकासोबत चांगलेच होते. तसंच शाळेची पटसंख्या कमी व्हायला आणखी काही कारणं होती. त्यातील पहिलं कारण होतं कुटूंबनियोजन.
लोकं अनाडी होते हे बरोबर होतं. परंतू पालक आपल्या पाल्यांना शिकवीत होते. त्यातच टिव्ही व मोबाईलच्या माध्यमातून कुटूंबनियोजनाचा प्रसार झाला होता. त्यातच त्या कुटूंबनियोजनाचे फायदे तोटेही लोकांना माहित झाले होते. त्यामुळे आता त्या परीसरात पालकांनी मानसिकता ठरवली होती. ते आता मुलं जन्मास घालतांना पुर्वीसारखे न घालता एक किंवा दोनच जन्माला घालत असत. काही काही जण तर एकाच मुलावर कुटूंबनियोजन शस्रक्रिया करीत असे. आता मुलगा मुलगी एकसमानचा काळ होता. समजा एखाद्याच्या घरी सलग दोन मुलीही जन्मल्या असल्या तरी ते मुलाची वाट न पाहता कुटूंबनियोजन शस्रक्रिया करुन मुल जन्मावर पाबंदी घालत. त्यातच आता या भागाची पटसंख्या पाहता काही काही संस्थाचालकांनी या भागात शाळा स्थानांतरीत केल्या होत्या. अशा ब-याच शाळा जवळजवळ आल्या होत्या. तर काही संस्थाचालकांनी या भागात गाड्या लावून त्या गाड्यातून मुलांची त्यांच्या शाळेत नेण्या आणण्याची वाहतूक करीत होते. मुलांनाही असं गाडीत बसून जायला आनंद वाटत होता. काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलेलं होतं. त्यामुळं साहजीकच काही मुलं काँन्व्हेंटलाही नाव टाकत. त्यात बरेचसे रिक्षेवाले व कित्येक कामकरी लोकंही होते. त्यामुळं साहजीकच शाळेची पटसंख्या कमी झाली. ती इतकी कमी झाली की शिक्षकांना दुसरीकडे नाईलाजानं पाठवावे लागले. त्याचबरोबर विद्यार्थीपाठोपाठ शिक्षकही कमी झाले होते.
विद्यार्थी पटसंख्या कमी झाली होती. ती मुख्याध्यापकाच्या कार्यकर्तृत्वानं कमी झाली होती. परंतू त्याचं खापर मुख्याध्यापक शिक्षकांवर फोडत होता. शिक्षक आता मुळात शाळेत बरोबर काम करीत नाही असं त्याचं म्हणणं होतं. त्यातच त्याचे शिक्षकांचे वाद निर्माण झाले. आता शिक्षक त्यांचं काही चुकलं नसल्यास ते मुख्याध्यापकाशी भांडण करीत. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना वेतनवाढी न लावणे, वरीष्ठ श्रेण्या न लावणे, वेतनप्रमाणपत्र न देणे, जाणूनबुजून एल डब्लू पी लावणे, जाणूनबुजून वेतन थांबवणे, शाळेत हजर असतांनाही जाणूनबुजून वेतन न काढणे, सुट्यांचे अर्ज न स्विकारणे, शिक्षकहजेरीवर गैरहजर लिहिणे, जी पी एफ न देणे, कर्ज मिळू न देणे, तसेच जाणूनबुजून सी आर खराब करणे व मिळत असलेल्या पगारातून जाणूनबुजून पैसा कापणे यामध्ये झाला व शाळेची होती नव्हती तेवढी बदनामी होत गेली.याचाच अर्थ असा की लवकरच शाळा तुटली. आता नेमकी पटसंख्या राहिली होती.
मुख्याध्यापकाचा स्वभाव हा काही दिवस चांगला होता. परंतू काही दिवसानंतर केवळ आपल्या स्वार्थापायी त्यानं स्वभाव बदलवला होता. त्यातच तो शिक्षकांनाही त्रास देवू लागला होता.
तो जसा शिक्षकांना त्रास देत होता. तसा तो अमरलाही त्रास देवू लागला. त्यातच एकदा तात्कालिक कारण घडलं.
संस्थाचालक आपल्या मिळकतीतून पैसा देत नाही हे पाहून मुख्याध्यापक दुस-या अनैतिक मार्गानं पैसा कमवू लागला होता. तो मार्ग रास्त नव्हता. तो कोणावरही हात उचलत असे वा कोणाचेही वेतन बंद करीत असे व त्यांची केस पोलिस स्टेशन वा न्यायालयात टाकत असे. नंतर त्या केसला पैसा लागतो म्हणून तो शिक्षकांकडून खंडणी वसूल करीत असे. ही खंडणी जशी गोळा झाली. तसं त्या खंडणीतून पाव भाग वकीलाला देत असे आणि बाकी रक्कम आपल्या घशात घालत असे. असे कितीतरी खटले त्यानं न्यायालयात नेले होते व कितीतरी खटल्यात त्यानं शिक्षकांकडून पैसा लुटला होता.
मुख्याध्यापक या ना त्या प्रकारे शिक्षकाकडून पैसा लुटत होता. त्यांना वेगवेगळ्या धमक्याही देत होता. त्यांचे ते नोकरीवर असतांनाच वेतनही बंद करीत होता. अशातच ते तात्कालिक कारण घडलं.
अमरला मुख्याध्यापकानं वरीष्ठ श्रेणी लावली नव्हती. असे शाळेतील तीन चार शिक्षक होते की ज्यांना वरीष्ठ श्रेणी लागली नव्हती. त्यातच मुख्याध्यापकानं वरीष्ठ श्रेणीसाठी काही पैसे लाच म्हणून घेतले आणि सांगीतलं की वरीष्ठ श्रेणी लावतो.
शिक्षकांनी पैसे दिले होते. परंतू वरीष्ठ श्रेणी बरेच दिवस होवूनही लागली नव्हती. वरीष्ठ श्रेणीचं बोलायला गेल्यास मुख्याध्यापक बावचळून जात असे व उलट उत्तरे देत असे. त्यातच वेतन बंद करण्याच्याही धमक्या देत असे. यातूनच शिक्षक मंडळी दहशतीत आली होती.
या वरीष्ठ श्रेणी लावण्याच्या भानगडीत अमरचाही पैसा होता. त्यानं अमरकडूनही वरीष्ठ श्रेणी लावून देणार म्हणून पैसा घेतला होता. परंतू बरेच दिवस होवूनही त्यानं त्याला वरीष्ठ श्रेणी लावली नव्हती. उलट अमरला तो त्याचा पगार बंद करण्याच्या धमक्याही देत होता. त्यामुळं संतापून गेलेला अमर एक दिवस त्याला त्याविषयी विचारणा करु लागला.
अमरनं विचारणा केली. हे त्याचं चुकलेलं पाऊल नव्हतं. परंतू त्याला चुकलेलं पाऊल समजून मुख्याध्यापक त्याच्या अंगावर धावून गेला. हेच तात्कालिक कारण.......
दोघांमध्ये मारापिटी झाली व अमरनं त्या मारापिटीची केस पोलिस स्टेशनला टाकली. त्यातच पोलिस ठाण्यात त्याचे हितसंबंध असल्यानं त्यानं ती केस पैशानं दाबून टाकली.
मुख्याध्यापकानं ती केस पैशानं पोलिसस्टेशनमधून दाबून धरली खरी. परंतू अमरही काही कच्च्या गुरुचा शिष्य नव्हता. त्यानं ती केस उचलली व सरतेशेवटी तो खटला कोर्टात गेला.
अमरनं टाकलेली कोर्टातील केस.......त्यातच बावचळून गेलेला मुख्याध्यापक..........त्यानं ती केस जिंकण्यासाठी पुरेपूर जोर लावला. त्यातच त्यानं अमर नोकरीवर असतांना त्याचं वेतनही बंद केलं होतं.
अमरचं वेतन बंद होतं. त्याची बायकापोरं उपाशी होते. पोरांचं शिक्षण होतं, कपडालत्ता होता. वरुन खायलाही पैसे लागत होते. त्यातच ती कोर्टाची केस. सगळं सांभाळता सांभाळता नाकी नव येत होतं. काय करावं सुचत नव्हतं. मात्र त्याची पत्नी त्याला हिंमत देत होती आणि हिंमत देत होते त्या शाळेतील काही शिक्षक. त्यामुळं तो खंबीरपणे उभा होता. आपला धीर न ढासळत. ते त्याचे शाळेतील काही शिक्षक मित्र म्हणायचे, 'यार अमर,कधी पैसे लागलेच तर खुशाल माग.' त्याच हिंमतीच्या भरवशावर तो आपले दिवस काढत होता. जगत होता. अशातच काही घटक त्याचा धीरही खचवीत होते.
याच शाळेत असा एक घटक होता की जो त्याचा खास मित्र होता. त्याला त्यानं दोन चार वेळा पैशाचीही मदत केली होती. एकदा अमरला पैसे हवे होते. त्यानं त्या मित्राला पैसे मागून पाहिले. परंतू ते देण्याऐवजी व मदत करण्याऐवजी तो मित्र त्याला उलट सल्ला देवू लागला. तो म्हणाला,
''अमर, तू एक काम कर. राॅकेल तेल आपल्या अंगावर ओत आणि याच शाळेसमोर स्वतःला जाळून घे."
अमरला त्याचा राग आला खरा.परंतू राग न दाखवता अतिशय संयमानं तो म्हणाला,
" मग मी मेलो तर.......तर माझा परीवार कसा जगणार."
" तू नाही मरणार."
"का बरे नाही मरणार?" अमर म्हणाला.
"अरे, मी येईल ना धावत बँल्केट घेवून."
अमर चूप बसला. तसा विचार करु लागला. की यालाच म्हणतात नशीब. नशीब आपल्याला कुठे कुठे घेवून जाते. ज्या मित्राला मी जीवनात मदत केली. त्याचा संसार बसवला. तोच मित्र मला जाळायचं सोचतोय. ज्या मित्राला त्याच्या संकटात मी मदत केली. तो मित्र मला पैसे देण्याऐवजी बँल्केट घेवून येईल म्हणतो. हिच का मदत. माझं पुण्य कर्म सर्व पाण्यात गेलं. यापेक्षा माझी पत्नी बरी की जी आज मला हिंमत देते आणि ते शाळेतील काही शिक्षक बरे की मी त्यांना काहीही मदत केली नसतांना ते हिंमत देतात. म्हणतात की गरज पडली तर खुशाल माग. लाजू नकोस व घाबरु नकोस.'
अमरचा विचार बरोबर होता. कारण अमरनं त्याचा संसारच बसवला होता. तसा अमरला त्याचा भूतकाळ आठवला. तशी ती एका गावची इंटरव्ह्यू आठवली.
ती गावची इंटरव्ह्यू. अमर या शाळेत काम करीत होता. परंतू तो कायम स्वरुपी झाला नव्हता. तेव्हा तो एका गावला शिक्षक म्हणून इंटरव्ह्यूला गेला होता. त्याचवेळी तोही बँल्केटवाला मित्र आला होता. दोघांची ओळख झाली. दोघंही एकाच महाविद्यालयात शिकलेले. त्यामुळं ओळख गहरी झाली. हळूहळू एकमेकांच्या घरी जाणे, उठणे, बसणे सारं काही. त्यातच त्या मित्राला नोकरी नव्हती. तेव्हा अमर म्हणाला,
''मी ज्या शाळेत नोकरी करतो, तिथे करशील नोकरी?''
''होय.'' तो मित्र म्हणाला.
त्या मित्राचे नाव सुहास होते. तो सुरुवातीला स्वभावानं चांगला होता. सुरुवातीचा काळ तो अमरला मदतही करीत असे. तो कधी जेवायलाही लावत असे.
सुहास अगदी श्रीमंत कुटूंबातील होता. त्याला तशी पाहता नोकरीची गरज नव्हती. परंतू सरकारी नोकरीचा लोभ कोणी सोडला तर तो सोडणार. अशातच त्यानं शिक्षकी पेशातील पदवी मिळवली. परंतू काही दिवस नोकरी न मिळाल्यानं तो खाली होता. गावाकडं भरमसाठ शेती होती. परंतू बापाला वाटलं की माझ्या मुलानं शेती करु नये. म्हणून त्याला शहरात शिक्षणासाठी पाठवलं. त्यातच त्यानं शिक्षकाची पदवी मिळवली. परंतू नोकरीचं काय? प्रश्न होता. अशातच अमरनं सांगीतलेला सल्ला. सुहासनं पटकन होकार दिला व म्हणाला,
''विचार लवकर आणि मला सांग."
अमरनं तसं त्या शाळेतील मुख्याध्यापकाला विचारलं. तसं मुख्याध्यापकानं होकार देताच अमरनं सुहासला सांगीतलं व सुहास अमरच्या शाळेतील दुस-या संस्थेत नोकरीवर रुजू झाला.
काही दिवस बरे गेले. या शाळेतील संस्थाचालक तसा धुर्त स्वभावाचा होता. तो म्हणाला,
"मला तुमचं काम करायचं आहे. तुम्ही दोघांपैकी ठरवा. कोणाचं काम करु? पण एक अट आहे."
अमर त्यावर क्षणाचाही वेळ न दवडता ताबडतोब म्हणाला,
"कोणती अट?"
"एक लाख रुपये द्यावे लागतील. मंजूर असेल तर सांगा. मी त्या सरांनाही तसंच विचारलंं. त्यांनी होकार दिलाय. परंतू तुम्ही आणलं त्याला. तुम्ही प्रथम आले म्हणून पहिला मान तुमचा. लवकर सांग. हवं तर उद्या सांगा. मी असं ऐकलं आहे की गावाकडं तुमची शेती आहे. शेतीतील एक एकड जागा संस्थेच्या नावानं करा. नाहीतर कोणालाही विकून टाका. अहो नोकरी लागली तर दुसरी घेता येईल तुम्हाला. विचार करा अन् सांगा लवकर."
संस्थाचालक भराभर जे बोलायचे ते बोलला. तसा तो निघून गेला. त्यावर अमर विचार करु लागला. तसा तो गरीबच होता.
अमर गरीब होता. त्याचे वडील गावाला अल्पभूधारक होते. शेती विकून पैसे आले असते. ते देताही आले असते संस्थाचालकाला. परंतू का बरं द्यायचे. लागेल नोकरी नाही तर नाही लागणार. शेती जीवाचा तुकडा आहे. माझ्या बापानं अन् आईनं आपल्या लेकरागत जपलंय शेतीला. आपण शेती विकायची नाही. हं, मित्राचंच काम होईल ना. होवू दे. आपण त्यातच सुख पाहायचं. अमरचा तो विचार. तो विचार रास्त होता. अमरनं आपला स्वार्थ पाहिला नव्हता. ही शेती.........शेती शेतक-यांचं जीवनच होतं.
****************************************

अमरनं त्या दिवशी रात्रभर विचार केला. तसा दुसरा दिवस उजळला. तसा अमर संस्थाचालकाच्या घरी जावून त्यांना म्हणाला,
"तुम्ही त्याचंच काम करा. माझं नको."
"का बरं? अहो नोकरी नोकरी होते. जीवनात पैसा कमवताही येईल. परंतू नोकरी मिळणार नाही. देशातील बरेच लोकं नोकरीच्या मागे धावतात आणि तुम्ही! तुम्हाला संधी चालून आलेली धुडकावताय."
"पण माझ्याकडे पैसे नाहीत पुरेसे."
"हवं तर पन्नास द्या."
"नाही. मी एक छदामही देवू शकत नाही. मी उगीच कशाला आश्वासन देवू."
"शेतीचा पर्याय आहे तुमच्याकडे."
"नाही. आम्ही शेती विकू शकत नाही. ती माझ्या वडीलाची आहे. ते परवानगी देणार नाही."
"विचारुन पाहा."
"नाही नाही. मी विचारतही नाही."
"हवं तर अप्रुअल निघाल्यावर द्या."
"नाही नाही. तुम्ही त्याचंच काम करा."
संस्थाचालकानं अमरचं मन वळविण्याचा खुप प्रयत्न केला. परंतू पैशापुढं हार झाली होती. शेतीला आईगत समजून अमरनं आपल्या मनात शेती विकण्याचा विचार आणलाच नव्हता. त्याला त्याला वाटत होतं की आपण आपल्या आईला जसं विकू शकत नाही. तशी शेती का विकावी. त्याचं म्हणणं आणि मानणं बरोबर होतं. कारण अलिकडे लोकं सर्रासपणे शेती विकत होते. परंतू अमरला वाटत होतं की शेती ही आपली माय आहे. त्या शेतीवर आपण आईगत प्रेम करायला हवं. जेव्हा आपण असं आईगत प्रेम शेतीवर करु. तेव्हा ही शेती आपल्याला भरभरुन देईल. हे तेवढंच खरं आहे.
आज शेतीवर प्रेम करणारे कमी झालेत. कारण अलिकडे लोकं सर्रासपणे शेती विकतात. कोणी शेती पीकत नाही म्हणून. कोणी शेतीचे पैसे जास्त येतात म्हणून तर कोणी नोकरी लागत आहे म्हणून. कोणी कर्ज झालं आहे म्हणूनही शेती विकत असतात. परंतू हा विचार कोणीही करीत नाही की शेती आपली माय आहे. जसा आपण आपल्या आईचा सौदा करु शकत नाही. तसा शेतीचाही सौदा कोणीही करु नये.
शेती करणे पुर्वापार चालत आलेली परंपरा. अलिकडे लोकं रिकामटेकडे फिरतील. या पानठेल्यावर त्या पानठेल्यावर, कधी या चौकात तर कधी त्या चौकात. दिवसभर कॅरमबोर्डवर बोटाच्या हालचाली करीत सगळी तरुणाई दिसते. खेड्यात दिवसभर हेच चित्र दिसतं.
आजची ग्रामीण भागातील तरुणाई शिक्षणानं वाया गेलेली दिसून येत आहे. ती चार दोन वर्ग का जास्त शिकली की अंगात आल्यागत करीत असून त्या तरुणाईला निव्वळ हुंडडणं, कॅरम खेळणं आवडतं. कोण करेल शेती? असा भाव या तरुणाईच्या अंतर्मनात असतो. यापेक्षा नोकरी बरी असं समजून बाप मेला की ही तरुणाई बापाच्या इस्टेटीला पार विकून टाकून ती शहरात येते. मग शहरात मिळेल त्या वेठबिगारकीच्या कामाला लागून आपलं जीवन उध्वस्थ करीत असते. कामंही कोणते तर ज्या कामात आपल्याला इज्जत नाही.
खरंच शेती आपली माय आहे. कारण ती आपल्याला पोसते. आपलं पालन करते. परंतू तिची निगा घेतली तर........ज्याप्रमाणे आपली आई असते.
आपली आई........आपण आपल्या आईची काळजी घेतो ना. तिची सेवा करतो ना. तिला कधी दुखलं खुपलं तर दवाखान्यात नेतो ना. ती बेडवर असतांना तिची मालिश करुन देतो ना की तिलाही त्या दुखल्या खुपल्या अवस्थेत ठेवतो. तसंच नाही ठेवत ना. आईला त्रास देतो का आपण? याचं उत्तर नाही असंच येईल. तसंच शेतीचं आहे. शेतावर तण झालं की ते काढायला हवं की नाही अर्थात तिला स्वच्छ ठेवायला हवं की नाही. ज्याप्रमाणे आई म्हातारी होते. उठू बसू शकत नाही. तेव्हा तिची अंघोळ करुन देतो ना आपण तशी. तसंच शेतीचं करायचं असतं. तसेच वर्षादोनवर्षातून शेतीची फेरफार करावी लागते. याचाच अर्थ असा की ट्रॅक्टरनं किंवा नांगरानं खालची माती वर काढावी लागते. जसे आपण कपडे धुतो तसे.
ज्या म्हातारपणी वा तरुणपणीही आपण जशी आईची सेवा करतो. मग आई आपल्याला भरभरुन आशिर्वाद देते. अगदी तसाच आशिर्वाद आपण शेतीची सेवा केल्यास ती देत असते. शेतीची उत्तम मशागत केल्यास अर्थात शेतमाऊलीची उत्तम सेवा केल्यास शेतमाऊली आपल्याला भरभरुन पीकांच्या रुपानं आशिर्वादच देत असते.
शेती आपलं जीवन आहे. ती भरभरुन पीकली तर संपूर्ण मानवजात सुखी होईल नाहीतर नाही होणार ही सत्यता आहे. ही सत्यता नाकारता येत नाही.
महत्वाचं म्हणजे शेती आपली माय आहे. त्या शेतीवर आपण आपल्या आईगत प्रेम करायला हवं . जेव्हा आपण आपल्याा आईगत शेतीवर प्रेम करु. तेव्हा ही शेती आपल्याला भरभरुन देईल हेही तेवढंच खरं आहे. परंतू आजची तरुणाई त्या गोष्टीला न ओळखता काहीच वर्ग शिकून अर्ध्या हळकंडात पिवळे झाल्यावर वागत असते.
शेती विकता येते. मग त्या तरुणाईची अवस्था शेती गेल्यावर धोबी का कुत्ता, न घर का न घाट का अशी होते. मुळात तरुणांनीच शेती करायला हवी. खासकरुन शिकल्या सवरल्या लोकांनी. तेव्हाच खरं तंत्रज्ञान शेतीत पोहोचेल. कारण ते मोबाईलच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग शेतीत करुन शेतीचं उत्पन्न वाढवू शकतात व देशातील शेती विकसीत करुन देशाला उच्च स्थानावर पोहोचवू शकतात. परंतू आज तसं होत नाही.
विशेष सांगायचं म्हणजे जेव्हा ही तरुणाई तेही शिकलेल्या स्वरुपात जेव्हा पुढे येईल आणि शेती करेल. तेव्हाच शेतीची भरभराट होईल. त्याचबरोबर देशाचीही. शेतकरी आत्महत्या कायमच्या बंद होतील. नाहीतर थोडेसे शिकून आम्ही शिकलो असे जर तरुणाई मानायला लागली आणि आम्ही शिकलेली माणसं का बरं शेती करावी. शेती करणं हे निरक्षरांचं काम असं जर तरुणाई मानायला लागली तर तो दिवस दूर नाही की संबंध देशात आत्महत्येचे सत्र सुरु होईल व संबंध देशातील शेतकरीच आत्महत्या करायला लागतील. मग कोणीही शेती करणार नाही आणि शेतीत कोणीही खपणार नाही. संपूर्ण देशातील जमीन ओसाड आणि जंगलानं वेष्ठीलेला असेल. जिथे प्राण्यांचं राज्य असेल. माणसांचं नसेल. ही शक्यता नाकारता येत नाही.
अमरनं आपलं काम संस्थाचालकाकडून करवून न घेता व खोटं आश्वासन न देता संस्थाचलकाला अगदी खरं खरं सांगीतलं व आपलं काम नाकारलं. साहजीकच संस्थाचालकानं सुहासचं काम केलं. त्याला सहा महिण्यानं परवानगी मिळाली व तो सरकारचा सरकारी वेतन घेण्याचा हकदार बनला.
मध्यंतरीचा काळ.......संस्थाचालक तिनशे रुपये पगार देत होता. सुहासलाही आणि अमरलाही. अमरचं आणि सुहासचं भागत नव्हतं त्या तेवढ्याशा पगारानं परंतू अमर तग धरुन होता. कारण त्याला दुसरा उपाय नव्हता. पर्यायही नव्हता. सुहासचा प्रस्ताव शासनदरबारी टाकला होता. कारण त्यानं पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतू त्या तिनशे रुपयात भागत नाही म्हणून सुहास शेती करायला गावाला निघून गेला होता. अशातच त्याचं अप्रुअल आलं. तसा संस्थाचालक अमरकडे आला. म्हणाला,
"तुमचा मित्र कुठाय? संपर्क करा. त्यानं पैसे द्यायचे कबूल केले आणि आता प्रस्ताव मंजूर झाल्यावर गायब झाला." तेव्हा सुहासचा पत्ता अमरनं संस्थाचालकाला दिला. कारण अमरच सुहासच्या संपर्कात होता.
पैशाच्या लालसेपोटी संस्थाचालक सुहासशी बोलणी करायला अमरनं दिलेल्या पत्त्यावर गेला असता सुहास म्हणाला,
"मला नोकरीची गरज नाही व मी कबूल केलेले पैसेही देवू शकत नाही. तुम्ही हवं तर माझं अप्रुअल कँन्सल करा. हं, वाटल्यास एक करु शकतो. मी नोकरी करतो व आलेल्या वेतनातून पैसा देवू शकतो."
संस्थाचालकानं ते बोलणं ऐकलं. लाचार संस्थाचालक त्या बोलण्यानं आणखी लाचार झाला. तसा त्याला अमर आठवला व ते अमरचं बोलणंही. कारण अमरनं सर्रास खरं खरं सांगून प्रस्ताव नाकारला होता. पैसे देण्याचं खोटं आश्वासन दिलं नव्हतं.
संस्थाचालकाचे प्रस्ताव आणतांना पैसे खर्च झाले होते. त्यामुळं संस्थाचालक दुःखी झाला होता. परंतू आता उपाय नव्हता. कारण प्रस्ताव मंजूर करुन आणायला अतोनात पैसा खर्च झाला होता. त्यातच तो वसूलही करायचा होता. म्हणून की काय, नाईलाजानं त्या सुहासच्या निश्चयापुढं त्याला हार मानावी लागली. तसा होकार देत संस्थाचालक माघारी फिरला. मनात त्याच्या तीव्र विचार होता की यापेक्षा अमरचं काम केलं असतं तर बरं झालं असतं.

*****************************************

शेतीवर निरतिशय प्रेम करणारा अमर आईवरही निरतिशय प्रेम करीत होता. त्याचबरोबर बापावरही. अशातच त्याचा बाप गेला. शेती ओस पडली. आता मात्र दिवस मोठे हलाखीचे आले होते. एक एक दिवस मोठा कठीण जात होता. त्यातच कधीही न गेलेली त्याची आई कामाला जात होती. तो मात्र तिनशेच रुपये कमवीत होता. कसं जगावं आणि कसं नाही असं होवून गेलं होतं.
सुहासचे मात्र सुगीचे दिवस आले होते. त्याचं लग्न झालं होतं. त्यातच त्याला नोकरी करणारी मुलगी मिळाली होती. अमर मात्र कधीकधी तिथे जायचा.
काही दिवस बरे गेले. एक दिवस अमर त्याचे घरी गेला असता त्याच्या पत्नीची दिलेवरी झाल्याचं कळलं. त्यातच त्याच्याजवळ पैसा नसेल तेव्हा त्याची आई म्हणाली की अमरचं संस्थाचालकाशी चांगलं जमतं. त्यानं काही पैसा संस्थाचालकाला मागून द्यावा.
अमरनं होकार दिला. तशी मित्राला संकटसमयी मदत करावी म्हणून तो संस्थाचालकाजवळ गेला. त्याला सुहासची कैफियत सांगीतली. तसा संस्थाचालक म्हणाला की त्याचे पैसे काही त्याचेजवळ जमा नाहीत. तरीही तो देणार. परंतू त्याला तसे पैसे देण्याची काही इच्छा नाही. कारण त्यानं धोका दिलाय. थोडा वेळ द्यावा त्यानं.
त्या बोलण्यानंतर अमर काय समजायचं ते समजला. तोही तसा दुःखीच होता.
अमर संस्थाचालकाचा निरोप घेवून सुहासच्या घरी आला व त्यानं संस्थाचालकाचं बोलणं जसंच्या तसं कथन केलं. परंतू त्याची पत्नी व आई समजदार नव्हती. ती अमरलाच वेडीवाकडी बोलली. त्यावेळी सुहास त्यांना न थांबवता गुपचूप होता.
अमरला फार वाईट वाटत होतं. त्यातच त्याला वाटत होतं की बेकारच याला मी माझ्या शाळेत नेलं आणि बेकारच याचं काम माझ्याआधी संस्थाचालकाला करायला लावलं. हं, पन्नास हजार जमवायचे होते ना. जमवले असते आणि स्वतःची नोकरी पक्की केली असती. परंतू मी याचं जीवन पाहिलं. चांगलं करुन देण्यासाठी स्वप्न पाहिली. ज्याची पत्नी आणि आई आज मला बोललीय आणि हा त्यावर प्रतिक्रिया न देता गुपचूप आहे. ही नोकरीवाली पत्नी त्याला मिळालीही असेल, परंतू ती माझीच देण आहे. हे यानं विसरायला नको होतं आणि हेच त्याच्या आईनं व पत्नीनही.
विचाराच्याच चक्रव्युहात अमर त्याच्या घरुन बाहेर पडला. तो रस्त्यानं जात असतांनाही त्याच्या मनात असंख्य विचारच होते. ते विचार तोपर्यंत होते जोपर्यंत घर आलं नाही. त्यातच रस्त्यात त्याला मागून एका सायकलवाल्यानं हलकीशी धडक दिली होती.
सुहासची पत्नी आणि आई अमरला बोलताच तो त्यांच्या घरी जात नव्हता. कारण त्याला तो त्याचा अपमानच वाटत होता. सुहासशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. परंतू तो कधीमधी बोलायचा. सुहास मात्र घमंडात चढला होता. तो अजिबात स्वतः होवून बोलत नव्हता. त्यावर मानअपमानाचे घास गिळत गिळत अमरच बोलत होता स्वतःचा अहंपणा गहाण टाकून. अशातच दोनतीन वर्ष निघून गेले होते.
दोनतीन वर्ष अमरनं कसे काढले हे त्याचं त्यालाच माहित. अशातच शाळा संस्थाचालकानं त्याचं काम केलं व तोही सुहाससारखा सरकारी कर्मचारी बनला.
अमरही सरकारी कर्मचारी बनला हे काही दिवस जाताच सुहासला माहित झालं व एक दिवस तो अमरजवळ आला. म्हणाला,
"तुझं काम झाल्याचं कळलं "
"होय."
"तू सांगीतलं नाहीस."
"........" अमर चूप होता. तसा सुहास म्हणाला,
''मला माहित झालं. मी तुझ्या वहिणीलाही सांगीतलंय. तुला वहिणीनं बोलावलंय."
तसा अमर म्हणाला,
"ठीक आहे. येईल म्हणून सांग." अमरनं म्हटलं तसा तो मनात विचार करीत निघून गेला.
मनात विचार होता की ती वहिणीनं आजपर्यंत नोकरी नव्हती, तेव्हा एका शब्दानंही विचारलं नाही आणि आज नोकरी लागताच चक्क भेटायला बोलावलंय. किती मतलबी आणि स्वार्थी स्वभाव आहे या परीवारांचा. जग असंच आहे. मेलेल्यांना वरणपोळी खावू घालतात आणि जीत्यांना लाथंनं मारतात. परंतू आपल्याला काय करायचं. आपण आपला राग सोडायचा व तिला भेटायला जायचं.
असा विचार करीत अमर आपल्या वर्गाची वाट चालू लागला. तसा त्याचा वर्ग आला व जसा त्यानं वर्गात प्रवेश केला. तसा त्यानं तो विचार पुरता त्यागला होता. कारण त्याला वर्ग शिकवायचा होता, विचार करायचा नव्हता.
दोनतीन दिवस निघून गेले. तशी अमरला वहिणीला भेटायची आठवण आली. तसा तो सुहासच्या पत्नीला भेटायला गेला. त्यावेळी सुहासची पत्नी मोठी गोड गोड बोलत असलेली दिसली व कळून चुकलं की आज जमाना पैसेवाल्यांचा आहे. त्यामुळं वाटत होतं की काल अमरला नोकरी नव्हती तेव्हा कोणी विचारत नव्हतं. आज मात्र सगळे विचारत होते.

**********************************************

काळ हळूहळू सरकत होता. तशी वेतनाची चिंता अमरला सतावत होती. तसं त्याच्या आठवणीतून सुहासचं प्रकरण बंद झालं होतं. सुहासचा सल्ला त्याला पटला नाही. तशी त्यानं खिल्ली उडविल्याची खंत अमरच्या मनात घर करुन गेली.
काही दिवस असेच गेले. त्याला त्याची पत्नी खांद्याला खांदा लावून मदत करीत होती. तसा त्याला एका शाळेतील शिक्षक आठवला. त्याचाही पगार बंद असतांना अचानक तो चिंतेनं पाय घसरुन पडला. तेव्हा तो कोमात गेला होता. ते पाहून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्याची पत्नी निरतिशय काम करीत असून तीच त्याला आज पोषत होती.
अमरची पत्नी काम करीत असतांना अमरला तसा त्याच्या पत्नीचा भुतकाळ आठवला. ती पत्नी त्याच्याच शाळेतील होती.
ते सुरुवातीचे दिवस. त्याला ते दिवस आठवायला लागले. ती नवनवीन मुलगी. शाळेत शिकवायला आली होती. तशी तिची चौकशी करावी म्हणून अमर तिच्या वर्गाजवळ गेला. विचारु लागला. तिचे नाव, गाव, पता वैगेरे. तेव्हा तिनं कोणाला तरी म्हटलं होतं की तो चपराशी माझी नुसती चौकशी करतो. त्यावर कोणीतरी म्हणालं,
"तो चपराशी नाही. शिक्षक आहे."
अमर दिसायला सुंदर होता. परंतू तो पोशाखानं चांगला राहात नव्हता. त्यातच त्याच्या घरी त्याची म्हातारी आई राहात होती. जिच्या मनगटात जोर नव्हता. त्यामुळं तिला कपडे बरोबर धुताच येत नव्हते. तसंच त्यालाही बरोबर कपडे धुता येत नव्हते. म्हणून त्याचे कपडे थोडे काळपट झाले होते. त्यातच तो चपराश्यासारखा दिसत होता.
बाप मरुन गेल्यानंतर त्याला मिळणा-या तुटपुंज्या पगारावर तो सगळा कारभार करीत होता. अशातच जिथे खायची गत नव्हती. तिथे कपडे व्यवस्थीत कसे राहणार.
ती नवीन मुलगी. पाहायला देखणी होती. तिचं नाव होतं सुचेता. सुचेता त्याला तशी आवडली नव्हती.
ज्याप्रमाणे अमरच्या घरची परिस्थीती नाजूक होती. तशीच नाजूक परिस्थीती सुचेताच्याही घरची होती. तिचीही आई मरुन गेली होती. बाप पायानं अपंग होता. सगळी जबाबदारी तिच्यावर होती. ती परमानंट नव्हती. तिला संस्थाचालक पाचशे रुपये महिना देत होता. त्या तेवढ्याशा पैशानं तिचा घरखर्च पुर्ण होत नव्हता. अशातच त्याची आणि सुचेताची ओळख झाली.
अमर दुःखी होता. त्यालाही आधाराची गरज होती. तशी तिलाही आधाराची गरज होती. तिही दुःखीच होती. अशातच दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली व दोघंही एकमेकांच्या घरी जायला लागले. त्यातच तिचीही करमणूक होवू लागली व त्याचीही. त्यातच पुढे जावून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले व दोघांनी विवाह करण्याचं ठरवलं. परंतू विवाह करणार कसा? शाळा प्रशासन काढून टाकणार तर नाही. कारण भीती होती. त्यातच भीती होती जातीची. ती उच्च जातीची होती आणि अमर कनिष्ठ. त्यामुळं ती उच्च जातीची असल्यानं त्याचा त्या शाळेतील इतर उच्चवर्णीयांनी तिरस्कार केला असता.
सुचेताला अमर पसंत होता. दोघंही एकमेकांना भेटत होते. परंतू त्यांचं भेटणं लपूनछपून होतं. कारण ते राजरोषपणे भेटू शकत नव्हते.
विवाह झाला होता. परंतू ते शाळेचं मैनेजमेंट त्याला लायक नव्हतं. त्यातच त्यानं आपला विवाह एक वर्षपर्यंत लपवून ठेवला होता.
अमरचा विवाह.......तो एक रहस्यच होता. त्याचं झालं असं की नवीन वर्ष उजळलं होतं. तसं अमरनं एका शिक्षकाला विचारलं की नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या. तेव्हा तो शिक्षक म्होमाला,
"आलिंगण देवून."
अमरचा मित्र. त्यानं बोललेलं वाक्य. त्यावेळी सुचेता व एक तरुण शिक्षीका तिथे बसली होती. सुचेता हसली. परंतू सुचेता काहीही बोलली नाही. परंतू ते आलिंगणाचे शब्द त्या शिक्षीकेला झोंबले. तसे तीनचार दिवस निघून गेले.
तीनचार दिवस झाल्यानंतर ती शिक्षीका अमरची वाट पाहात बसली. अमर शाळेत यायचाच होता. अमर शाळेत येताच ती म्हणाली,
"सर, एक गोष्ट बोलायचीय."
"बोला."
"सर, आपलं वागणं सुधरवा."
अमरनं तो प्रश्न ऐकला. तसं त्याला आश्चर्य वाटलं. तसा तो म्हणाला,
"काय म्हटलं?"
"म्हटलं की सर, आपलं वागणं सुधरवा."
"म्हणजे?"
"त्या दिवशी तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा आलिंगण देवून द्याव्या लागतात असं म्हटलं होतं. हे असे शब्द का बोलले आपण?
"मी नाही बोललो तसं. तसं बोलणारे ते दुसरे सर आहेत."
"नाही, तुम्हीच आहात. अन् हे सगळं तुम्ही सुचेताला पाहून बोलले."
अमरला आश्चर्य वाटत होतं. कारण तो तसं बोललाच नव्हता. परंतू त्याचं त्या तरुण शिक्षीकेसमोर काहीच चाललं नाही. ती त्याच गोष्टीवर व प्रसंगावर जास्त ट्रेस होत होती. तसा तो म्हणाला,
" मैडम, तुम्ही म्हणत आहात ना की सुचेताला पाहून मी ते म्हटलं तर बघाच तुम्ही आजपासून एक वर्षपर्यंतचा वेळ. पुढल्या वर्षी सुचेता माझ्या घरीच दिसणार."
"हो, हो पाहून घेवू."
"ते त्वेषाचे शब्द. ना प्रेम होतं सुचेतावर ना सुचेता त्याला आवडत होती. असेच ते शालेय सहकारी म्हणून बोलत होते. त्यातच ती शिक्षीका तसे बोलून गेली. तसा अमर जिद्दीत चढला होता.
आपण बोलले नसल्यानं अमरला वाईट वाटत होतं. तसा अमर काही बोललाच नव्हता. ते शब्द दुसरेच सर बोलले होते. परंतू आता तो बोलला होता ते शब्द. पुढील वर्षी सुचेता माझ्या घरी दिसणार. त्यानं जणू प्रतिज्ञाच केली होती. ती भिष्मप्रतिज्ञा. तशी तो संधी शोधू लागला. मात्र हलकंफुलकं बोलणं होतं तिच्यासोबत.
सुचेताला नोकरी लागायची होती. त्यातच तिची जात पडताळणी आली. जात पडताळणीसाठी बाहेर गावून तिच्या बापाच्या शाळेचा दाखला आणायचा होता. त्यातच सुचेताजवळ पैसे नव्हते. अशातच मुख्याध्यापकानं सुचेताला सल्ला दिला की तिनं अमरला न्यावं तिच्या बापाचा शाळेचा दाखला आणायला. तो पैसेही घेणार नाही. बस, अमरला संधी मिळाली.
मुख्याध्यापकाच्या सुचनेनुसार सुचेता अमरशी बोलली. तसा अमर सुचेतासोबत जायला तयार झाला.
अमरची सरकारी नोकरी आता पक्की झाली होती. त्यातच त्यानं आता बाईक घेतली होती.
ते बाहेरगावचं ठिकाण. अमर सुचेताबरोबर त्या गावला गेला. दोघंही एकाच गाडीवर होते. तसा अमर सुचेतासोबत बोलत होता. सुचेताही अमरसोबत बोलत होती.
ते एक दिवसचं जाणं.......हळूहळू सुचेताशी प्रेम निर्माण करणारं ठरलं. त्यातच पुढे तो लपूनछपून भेटायला लागला होता. ते एक दिवसचं जाणं. त्यापुर्वी तशी सुचेताशी ओळख होतीच. परंतू ते सुचेतासोबतचं जाणं अमरच्या आयुष्यातील एक महत्वाचं पाऊल ठरलं व त्या जाण्यातून सुचेताला वाटलं की अमर पुष्कळ कामाचा असून तो जीवनातही तिला दगा देणार नाही.
सुचेता वयानं वाढली होती. तिचं वय वाढलं होतं. कारण ती गरीब होती. आजच्या महागाईच्या काळात तिचा बाप हुंडा देवू शकत नव्हता. हुंडा कुप्रथा होती. परंतू देणे घेणे सुरुच होते. लोकांना हुंडा देणे वा घेणे यात लाज वाटत नव्हती.
अलिकडे हुंड्याची प्रथा जोर धरु लागली आहे. हुंडा दिला नाही तर ती मुलगी मागायला लोकं कचरत आहेत. त्यातच मंगळ वैगेरेचे दोष काढून हुंड्याला अति तीव्र करुन टाकले आहे.
हुंडा घेणा-याला घेतांना थोडीशीही लाज वाटत नाही. त्याच्या मतानुसार ती एक फैशन असून तो घेणे म्हणजे समाजात फार मोठी इज्जत मिळवणे असा त्याचा अर्थ होय.
पुर्वीही हुंडा प्रथा नव्हती असे नाही. होती, परंतू ती वस्तू विनीमयाची होती. बहुतःश ठिकाणी वरपक्ष वधूपक्षाला हुंडा देत असत. त्याचं कारण म्हणजे तिचं महत्व. पुर्वी स्रीजातीला जास्त महत्व असून स्रीजातीचे स्वयंवर होत असत. त्यातच ह्या स्रीचं जेव्हा जेव्हा स्वयंवर असायचं, तेव्हा तेव्हा तिला स्वयंवरात जिंकण्यासाठी गावोगावचे राजकुमार यायचे. ते राजकुमार राजकुमारीला स्वयंवरात जिंकल्यानंतर तिला खुप सारे दागीणे बक्षीस महणून द्यायचे. तसेच द्रव्य म्हणून जिनसा द्यायचे. त्यात धान्य, फळ इत्यादी गोष्टींचा समावेश होता.
कालांतरानं काळ बदलला. स्रीजातीचं स्थान बदललं. तिला दुय्यम स्थान प्राप्त झालं. तसं हुंड्याचं स्वरुपही बदललं. यापुढे स्वयंवर प्रथा बंद झाली व हुंड्याला महत्व प्राप्त झालं. हुंडा हा स्रीजातीकडून घेतला जावू लागला.
ज्यावेळी हुंडा हा स्रीजातीकडून घेतला जावू लागला. तेव्हा वधुपित्यांची कंबर मोडली जावू लागली. कारण ज्यावेळी स्वयंवर पद्धती अस्तित्वात होती. तेव्हा वरपिते स्वइच्छेनं स्रीला देण्यासाठी भेटवस्तू आणत. परंतू आता काळ बदलल्यानं हेच वरपिते स्रीजातीकडून बळजबरीनं खंडणी वसूल करु लागले. त्याला हुंडा असं नाव दिलं.
अलिकडे हुंडा सर्रास मागीतला जातो. दिला जातो. कायद्यानुसार हुंडा देणे वा घेणे हा गुन्हाच आहे. परंतू त्याला वधुपिते आणि वरपिते गुन्हा मानत नाही.
अलिकडे हुंडा हा प्रतिष्ठेचा मानला जावून या हुंड्यामध्ये शिक्षणालाही जास्त महत्व आलेले आहे. जसा आणि जेवढा मुलगा शिकलेला असेल, तेवढा हुंडा मागीतला जातो. त्यातच त्या हुंड्याच्या स्वरुपात मुलाची खानदानं मुलाची कमाई व मुलाचे घरदार पाहून वाढ केली जाते. तसेच वरील प्रकारानुसार त्यात वाढ केली जाते.
महत्वाचं म्हणजे आज हुंडा हा देणे घेणे ही समाजात प्रतिष्ठेची प्रथा वाटत असली तरी या प्रथेनं अनेक स्रीयांचे संसार उघड्यावर पाडलेले आहेत. अनेकांना आत्महत्या करायला भाग पाडलेलं आहे. कधी त्या मुलींचा बाप आत्महत्या करतो तर कधी ती उपवर मुलगी. माझ्या वडीलांना माझ्यासाठी हुंडा द्यावा लागू नये. माझ्या बहिणीचे विवाह व्हावे यासाठी तिची आत्महत्या. त्यातच लग्न करतांना हुंड्यासाठी काढलेले कर्ज त्यातच त्या कर्जाचा होणारा व्याज. हा व्याज सरळव्याज मार्गानं न वाढता चक्रवाढव्याज मार्गानं वाढत असतो. काही काही लोकांनी हुंड्यासाठी कर्ज घेतलं. परंतू काहींनी तर हुड्यासाठी आपल्या श्त्या विकल्या व ते वेठबिगार झाले. वधुपित्यांना एकतर शिक्षणासाठी करावा लागणारा खर्च. त्यातच लग्नाला लागणारा खर्च आणि हुंड्याचा खर्च. हा खर्च अतोनात असतो. मुळात शिक्षणासाठी खर्च करीत असतांना आधीच कंबरडं मोडलेला माणूस लग्नासाठी पैसा कोठून जमविणार हा प्रश्न आहे. त्यातच हुंड्यासाठी पैसे कोठून आणणार हाही एक प्रश्नच आहे. मग मुलींच्या वा वधुपित्यांना आत्महत्या कराव्या लागणार नाही तर काय?
विशेष सांगायचं म्हणजे हुंडा देणे घेणे या कुप्रथाच आहेत. तेव्हा हुंड्याची ही कुप्रथा कायद्यानुसार जरी गुन्हा ठरवलेली आहे. परंतू तिला समाजानं अवैध ठरवलेलं नाही. तिला समाजानं अवैध ठरवावं. कारण असली कुप्रथा सुरु असल्यानं चांगल्या चांगल्या मुली पडून राहतात. विवाह जुळत नाहीत. वय वाढून जातात. तसेच आत्महत्या होतात वेगळ्या. म्हणून हुंडा पद्धती ही वाईट असून ती देणे घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळं कायदा तर दुरच, त्यासाठी समाजानं पुढाकार घ्यावा व ज्या भागात एखाद्यानं हुंडा घेतला असेल वा दिला असेल, अशा परीवाराचा विरोध करावा. त्यांना वाळीत टाकावे. तसेच त्यांची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनलाही करावी. तसेच पोलिसांनी त्यावर गुन्हा नोंदवून हुंडा देणाघेणा-यांना अटक करावी. जेणेकरुन ही कुप्रथा समाजातून हद्दपार होईल व कित्येक आत्महत्या वाचतील व जो समाज वा व्यक्तीसमुदाय पुढाकार घेईल. त्याला जीव वाचविल्याचं पुण्य लाभेल. महत्वाचं सांगायचं म्हणजे हुंडा ही कुप्रथा असून तो कोणीही घेवू नये व देवू नये म्हणजे झालं.
सुचेताचा बाप हा गरीब होता. त्यातच त्याला गुडघ्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळं घरी पैसा येणं बंद झालं होतं. घरचं पोटपाणीच चालवणं बंद झालं होतं. मग सुचेताचा विवाह कसा होणार. त्यातच तिचं वाढतं वय व वाढत्या वयाबरोबर विवाहाचा प्रश्न....... नोकरी लागेल अशी मनात आशा. त्यामुळं वाढलेलं वय. शेवटी आपला विवाह होणार नाही असं वाटल्यानं व आपल्याजवळ पैसाही नाही. घर चालवायला नाहीच नाही. व्यतिरिक्त विवाह करायलाही नाही. त्यातच अमरनं तिला केलेली मदत. त्यामुळं सुचेता अमरच्या प्रेमात पडली व अमरनं त्या आलिंगणाचा प्रश्न विचारणा-या तरुण शिक्षीकेला तिच्याशी विवाह करुन चपराक दिली. कारण हळूहळू प्रेमाचं रुपांतरण विवाहात झालं होतं.
सुचेता अमरच्या प्रेमात पडली. तशी ती त्याला भेटूही लागली. कधी दुकानात कधी घरी तर कधी बागेत तो जावू लागला होता. हे मुख्याध्यापकाला माहित झालं होतं. त्यातच तो रस्त्यानं जातांना वा बागबगीच्यात दिसतो का वा खरंच अमरच्या प्रेमात सुचेता पडली का? हे तपासून पाहण्यासाठी मुख्याध्यापकानं काही गुप्तहेर ठेवले होते. हे गुप्तहेर त्याच्या पाळतीवर राहात. ते गुप्तहेर अमर कुठे जातो, कुठे नाही. तो सुचेताशी बोलतो की नाही. अमर सुचेताच्या घरी जातो की नाही हे पाहात होते. परंतू अमरही हुशार होता. तो ना शाळेत सुचेताशी बोलत होता. ना नेहमी नेहमी बागेत तिच्यासोबत फिरायला जात होता. ना नेहमी नेहमी तिच्या घरी. तो काही त्या गुप्तहेरांना सापडत नव्हता. मात्र कोणालाही संशय येवू न देता त्यानं आपलं प्रेम अतिशय गुप्तपणे सुरु ठेवले होते.

****************************************

अमरनं सुचेताशी विवाह केला होता. परंतू त्यानं ती बातमी वर्षभर लपवून ठेवली होती. कदाचित त्याला वाटत होतं की ज्या शाळेत जातीभेद मानतात. त्याच शाळेत आपला प्रेमविवाह माहित झाल्यास आपल्याला शाळेतून काढून टाकतील. परंतू एकवर्ष झाल्यावर त्याला कळलं की 'मिया बिबी राजी तो क्या करे राजी' शेवटी विवाहच तो किती दिवस लपवून ठेवणार. शेवटी दुस-या वर्षाला त्यानं आपला विवाह जाहिर केला होता.
विवाहाचंही ते गुपीत. सुचेता अमरच्या गाडीवर शाळेत येत होती व शाळा थोडीसी दूर अंतरावर असतांनाच ती उतरुन जात होती. त्यातच घरी मंगळसुत्र घालत होती. मात्र शाळेत जातांना मंगळसुत्र काढून ठेवत होती. जसा तो विवाह कोणालाही माहित होवू नये. मात्र त्याला एक भीती होती, ती म्हणजे मुलं जन्मास घालण्याची. समजा ती एखाद्या वेळी गरोदर राहिली तर आपण काय करु. असं त्याला वाटत होतं. शेवटी याच भीतीनं त्याला दुस-या वर्षी विवाह जाहिर करावा लागला होता.

***************************************

सुचेता गरोदर होती. तसा त्यानं ती गरोदर राहण्यापुर्वी आपला विवाह जाहिर केला होता. त्याची विवाहाची भीती दूर झाली होती. कारण शाळा प्रशासनानं त्याचेवर कोणतंच वेडंवाकडं पाऊल उचललं नाही. परंतू त्यांच्या मनात काय होतं माहित नाही. अशातच सुचेताचं गरोदरपण.
अमर व सुचेता एकाच शाळेतील. सुचेता गरोदर होती. तशी दोघांनाही शाळा एकाच पाळीत हवी होती. परंतू शाळा प्रशासनानं वा मुख्याध्यापकानं त्याला ती गरोदर असतांनाही सकाळ पाळीत दिली नाही. त्यातच सुचेता सकाळी चार वाजता उठायची. ती स्वयंपाक करुन शाळेची तयारी करायची व अमर तिला शाळेत नेवून द्यायचा. तिला दुपारी बारा वाजता सुटी व्हायची. आमरची शाळा साडे दहाला भरायची. त्याला सायंकाळी साडेपाचला सुटी व्हायची.
घर थोडं दूर होतं. त्यामुळं सुचेताला दुपारी बारा वाजता सुटी होत असली तरी ती घरी कशी जाणार. कारण अमरचं घर आडमार्गावर होतं. तिथे ऑटो वा रिक्षा जात नव्हता. शिवाय मनात एक नोकरीची आस होती. त्यामुळं त्यावर उपाय म्हणून ती शाळेच्या जवळच वस्तीत राहणा-या एका वर्गात शिकणा-या मैत्रीणीच्या घरी दिवसभर राहू लागली. तिथंच आरामही करु लागली.
ते गरोदरपण........ आरामाची सक्त गरज असते गरोदरपणात जेवढा आराम होईल, तेवढं बरं असतं बाळाला. परंतू शाळा प्रशासनानं त्यांना शाळा एकाच पाळीत न दिल्यानं सुचेताचा आराम होत नव्हता. कारण ते मैत्रीणीचं घर असलं तरी ते दुस-याचंच घर होतं. शिवाय मुख्याध्यापक अतीव त्रास दिला त्याला. त्यांनी तिला नऊ महिने होवूनही सुटी दिली नाही. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या नुकसानीचा हवाला देत होते आणि आपली नोकरी जाईल या भीतीनं सुचेता आणि अमर सुटी घेण्याचा निर्णय घेवू शकत नव्हते. अशातच नववा महिना पूर्ण झाला. दिलेवरीला फक्त नऊ दिवस उरले होते. तरीही मुख्याध्यापक तिला सुटी द्यायला तयार नव्हते. शेवटी नोकरी जाईल तर जाईल असा विचार करुन अमरनं जबरदस्तीनं सुट्ट्या घेतल्या. त्यातच सुट्ट्या घेतल्याच्या पाच दिवसानंतर सुचेताची दिलेवरी झाली. तिनं एका गोंडस बाळीला जन्म दिला होता.
सुचेताचं बाळंतपण झालं खरं आणि तिनं एका गोंडस बाळीला जन्म दिला खरा. परंतू त्या बाळीला सुचेताला गरोदरपणात आराम न मिळाल्यानं समस्या आली होती. तिची आतडी छातीत गेली होती.समस्या गंभीर स्वरुपाची असल्यानं डॉक्टरांनी तिचं ताबडतोब ऑपरेशन करण्यास सांगीतलं होतं. त्यातच सुचेताला बाळंतपणानंतर पुन्हा आराम मिळालाच नाही. बाळी भरती होती रुग्णालयात. कमीतकमी सव्वा महिना. अमरही बाळीच्या देखभालीसाठी रुग्णालयातच होता. तिथं मुख्याध्यापक येत होते. म्हणत होते,
"ही जगणार आहे का? विद्यार्थ्यांचं नुकसान होते. शाळेत या."
स्वतःचं मुल. त्यातच सुचेताच्या गरोदरपणात तिला आणि तिच्या पतीला पुरेसा आराम न मिळाल्यानं अशी आलेली समस्या. त्यातच मुख्याध्यापकाचं असं वात्रट बोलणं.........अमरला भयंकर राग येत होता मुख्याध्यापकाचा. त्याचबरोबर सुचेतालाही. कारण तो नेहमी नेहमी रुग्णालयात येत असे व विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत बोलत असे व अमरला त्याची मुलगी वाचणार नाही असंच बोलत असे. ते शब्द अमरच्या मनात मुख्याध्यापकाविषयी विष पेरत होते. परंतू तरीही तो संयम ठेवून होता.
हळूहळू काळ सरकत होता. त्याचबरोबर अमरचे दिवसंही. आज बाळीचं ऑपरेशन झालं होतं. बाळी वाचली होती. अमर आणि सुचेताला हायसं वाटलं. परंतू मुख्याध्यापकाला हायसं वाटलं नाही.
बाळीचं ऑपरेशन सुखरुपपणे पार पडताच सुचेता आणि अमर बाळीला घेवून घरी आले. अमर शाळेत जावू लागला. तशी सुचेता बाळीला सांभाळू लागली. परंतू सुचेताचं आराम भोगणं........मुख्याध्यापकाच्या मनात खुपत होतं की काय कुणास ठाऊक. तीन महिने झाले होते. मुख्याध्यापक म्हणत होता. अमरनं तिला नोकरीवर आणावं. नाहीतर नोकरी सोडून द्यावी. अशातच विचारांच्या चक्रव्युहात असतांना अमरनं तिला नोकरीवर नेण्याचा निर्णय घेतला.
तीन महिने होताच सुचेता नोकरीवर रुजू झाली. ती बाळी सुचेताचा बाप सांभाळत होता. तशी ती नोकरी करु लागली होती. जशी ती तिची कायम स्वरुपाची नोकरी होती असंच वाटत होतं. त्यातच मुख्याध्यापक त्याच्यासोबत जातीय शत्रू असल्यागत वागत होता. तो अमर आणि सुचेताला त्रासच देत होता.
मुख्याध्यापक देत असलेला त्रास सहन होत नव्हता. त्यातच बाळीचं ऑपरेशन झालं असल्यानं त्या जखमा तीन महिने झाल्यानंतरही दुखतच असतील बहुतेक. बाळीही रडत असे. डॉक्टरांनी सांगीतलं होतं की बाळीला जास्त रडू द्यायचं नाही. सुचेताचा बाप होता सांभाळायला. परंतू आई आईच असते शेवटी. त्यामुळं शेवटी अमरनं निर्णय घेतला. सुचेताची नोकरी सोडायची. तसंही सुचेताला शाळा प्रशासन एक छदामही फेकून मारत नव्हतं. उलट जास्तीत जास्त प्रमाणात त्रास देत होता. एवढं सगळं सहन करावं लागत होतं. शेवटी विचार केला आणि निर्णय घेवून नोकरी सोडून दिली कायमची.
आज सुचेता आणि अमर आपल्या संसारात सुखी होते.नोकझोक थोडी फार होतच होती मुख्याध्यापकाशी. तसं अमरला ते सगळं आठवत होतं. ते शाळा प्रशासन व त्या मुख्याध्यापकाचं वागणं. आज मुख्याध्यापक जीवंत नव्हता. परंतू त्यानं दिलेला त्रास अजूनही जीवंत होता. तो मुख्याध्यापक त्रासाच्या स्वरुपात जीवंत होता.
अमरचा मारपिटीचा खटला न्यायालयात सुरु होता. वेतन मात्र बंद होतं. सारखी उपासमार होत होती. अशातच कोणीतरी सुचवलं. 'तू न्यायालयात जा. त्याशिवाय तुझं वेतन निघणारच नाही.' त्या व्यक्तीचंही बरोबरच होतं. कारण मुख्याध्यापक चिडला होता. एरवी त्याचेवर मारपिटीचा खटला सुरु होता. त्यातच तो खटला जर सिद्ध झालाच तर आपल्याला शिक्षा होवू शकते. आपली नोकरीही जावू शकते. असं मुख्याध्यापकाला वाटत होतं. त्यामुळं तो वेतन काढणं अशक्य होतं. त्यातच त्या सल्ल्यानुसार अमरनं वेतनाचीही दुसरी केस न्यायालयात टाकली.
दोन्ही खटले........जवळ पैसा नाही. दोन खटल्यापैकी एक खटला तोही वेतनाचा कोणत्याही परिस्थीतीत जिंकणं आवश्यक बाब होती. म्हणून तो त्या खटल्यावर लक्ष केंद्रीत करुन जोर लावत होता. तर मारपिटीच्या खटल्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत होता. त्याला मारपिटीच्या खटल्याबाबत वाटत होतं की अहंकारी मुख्याध्यापकाचा अहंकार कमी झाला अाहे. हिच पुरेशी शिक्षा आहे. तसेच त्याच्या बायकापोरांचा कोणता दोष की त्यांना त्याच्या चुकांची शिक्षा व्हावी. यासाठी तो त्या खटल्याकडं दुर्लक्ष करीत होता. अशातच त्या खटल्याचा निकाल आला. न्यायालयानं त्याला बा इज्जत बरी केलं होतं. परंतू वेतनाच्या खटल्याचा अजूनपर्यंत निकाल आला नव्हता.
अमर शाळेत काहीही बोलत नव्हता. कोणाशीही बोलत नव्हता. कोणीही त्याचेशी बोलत नव्हते. त्यांचंही बरोबर होतं. कारण मुख्याध्यापक सांगत होते. त्याचेशी बोलायचं नाही आणि बोललेच तर तुमचंही वेतन बंद करणार. अशी धमकी. मग कोण बोलणार. त्यामुळं शाळेत अमर अगदी मौन बाळगून होता. जणू त्याला त्या शाळेत वाळीत टाकलं असं वाटत होतं.
अमरला त्याच्या ओळखीचे जेव्हा शाळेत भेटायला येत. तेव्हा त्यांना त्या शाळेतील सर्वच कर्मचारी अमर या शाळेत नोकरीच करीत नाही असं सांगत होते. कारण जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते त्याबद्दल आवर्जून सांगत असत.
काही दिवस असेच गेले. न्यायालयानं मारपिटीच्या खटल्याचा निकाल तर दिला. परंतू वकील काही वेतनाच्या केसची तारीख लावत नव्हता. त्यातच अमर खुप परेशान होता. काय करावं सुचत नव्हतं. अशातच तारीख लागली व पहिला आदेश निघाला. तो म्हणजे त्याचं चालू महिण्याचं वेतन टाकावं. त्यात थोडं अमरला बरं वाटलं. कारण त्याचं चालू महिण्याचं वेतन सुरु झालं होतं.
चालू महिण्याचं वेतन तर टाकलं व अमरचं या महिण्यापासून वेतन सुरुही झालं असलं तरी जुन्या वेतनाचं काय? हा प्रश्न अमरसमोर आ वासून उभा होता. त्यातच न्यायालयाला मुख्याध्यापक वेतन टाकल्याचा हवाला देत होता.
त्यातच एक दिवस अमरच्या वकीलानं विचारलं की तुझं वेतन टाकलं की नाही.
अमरला वकीलानं विचारलेला प्रश्न. अमरनं अगदी खरं खरं उत्तर दिलं. बँक पासबुक दाखवलं. त्यानुसार वकीलानं ते बँक पासबुक न्यायालयात सादर केलं.अंती न्यायालयालाही माहिती पडलं की प्रतिपक्ष जरा जास्तच हुशार असून ते चाणाक्ष खेळी खेळत आहेत. त्यानुसार खटल्यामध्ये आणखी रंग भरला गेला. तशी त्या खटल्यालाही जास्त रंगत आली. मग रोजच्या तारखा लागू लागल्या. शेवटी वकीलानं जोर लावून त्या खटल्याचा निकाल लावला व वरीष्ठ श्रेणी पाठोपाठ सर्वच लाभ अमरला मिळाले.
अमरला वकील चांगला मिळाला होता. कारण त्यानं निकाल लागेपर्यंत एकही रुपया अमरकडून घेतला नव्हता.
खटल्याचा निकाल लागला. सर्व पैसा बँकेत आला. तसा तो पैसा बँकेत येताच ताबडतोब अमर वकीलाकडे गेला. कारण त्यांचं शुल्क द्यायचं होतं. तसं त्यानं विचारलं,
"साहेब, शुल्क किती झालं?"
"पन्नास हजार." वकील म्हणाले.
".........." अमर काहीही बोलला नाही.तसे वकीलसाहेब म्हणाले.
"काय जास्त झालेत काय?"
"नाही साहेब. आपण खटला सुरु असेपर्यंत एकही रुपया मागीतला नाही. तेव्हा हे पैसे काही माझ्यासाठी जास्त नाहीत. बरं येतो उद्याला आणि तुमचं शुल्क आणून देतो." अमर बोलून गेला.
अमर माघारी फिरला. तसं त्यालाही माहित होतं की वकीलाची फीच तेवढी आहे. त्यांनी काही जास्त मागीतली नाही.
दुसरा दिवस उजळला. अमर ताबडतोब बँकेत गेला. त्यानं पन्नास हजार रुपये काढले व सायंकाळी वकीलाकडे जावून ताबडतोब ते पैसे दिले व परत माघारी फिरला. तसंच त्याला जो काही पुरेसा पैसा आला होता. त्या पैशात त्यान एक लहानसं मकान विकत घेतलं. जे मकान त्याच्या संकट काळाची निशाणी होती.
****************************************

खटल्याचा निकाल लागला होता. अमर एक खटला हारला होता. तर दुसरा खटला जिंकला होता. त्यातच त्या मुख्याध्यापकाला एक खटला जिंकल्याचं समाधान नव्हतं तर दुसरा खटला हारल्याचं दुःख होतं. त्यामुळं तो अजून चिडला व दुस-याच वर्षी त्यानं अमरच्या शिकविण्यावर संशय घेवून त्याला वर्गच शिकवायला दिला नाही. तब्बल दिड वर्ष त्यानं अमरला वर्ग दिला नव्हता. मात्र अमरही अगदी वैतागून न जाता लढत होता कागदपत्राने. ती त्याची कागदपत्रच तलवारीसारखी मुख्याध्यापकाच्या छाताडावर वार करीत होती. अशातच शासनाचं एक पत्र आलं व मुख्याध्यापकानं अमरला वर्ग दिला नव्हे तर त्याला वर्ग शिकवायला देण्यास भाग पाडलं.
असे एक नाही तर अनेक प्रसंग. मुख्याध्यापक अमरला त्रास देत राहिला व अमर मुख्याध्यापकाच्या प्रत्येक तिक्ष्ण वारावर अतिशय संयमानं, मौन बाळगून, वैतागून न जाता लढत देत राहिला. तो कंटाळला नाही वा मागं पाऊलही घेतलेलं नाही वा त्यानं आपली निष्ठा ढळू दिली नाही. वेळ लागला. परंतू हळूहळू निकाल मिळत गेले. मात्र त्या निकालावर मुख्याध्यापक बावचळून जावून अमरचा शेवटपर्यंत क्रोधच करीत राहिला. त्याचा परीणाम हा झाला की मुख्याध्यापकाच्या मनात विचारचक्र सुरु झाले. त्या विचारचक्रानं गती घेतली. त्यातच तो चिडून जावून अमरसारखा इतर कर्मचा-यांनाही त्रास देवू लागला. त्यातच ती सतत विचाराची चक्र. तो घरी दारी आणि कुठेही असतांना त्याला तिच चक्र परेशान करीत होती. तसा काळंही त्याचे अपराधी कृत्य पाहातच होता व अचानक काळ चालून आला.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. आज सकाळीच मुख्याध्यापक झोपेतून उठला. त्यानं सकाळीच अांघोळ केली. देवघरात देवांची पुजा केली व नोकरीच्या मुख्यालयी गेला. तिथं हजेरीपटावर सही केली व मुख्यालय सोडलं. तसा तो दररोजच हजेरीपटावर सही करुन बिनधास्त फिरायला जात असे. शाळेत अजिबात राहात नसे. तसा नेहमीप्रमाणे तो फिरायला निघाला. तसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं कोणीही शाळेत नव्हतं.
मुख्याध्यापकानं मुख्यालय सोडलं व तो मोठ्या बाजारपेठेत गेला. तेथून परत येत असता काळानं झडप घातली आणि त्याचा एकाएकी चार चाकी गाडीनं अपघात झाला. अपघातात मुख्याध्यापक जागीच ठार झाला. तेव्हा सकाळचे साडे आठ वाजले होते.
तोच दिवस. दुपार झाली होती. तसा अमरचा फोन खणखणला. कोण्यातरी शिक्षकाचा फोन होता.
"हैलो."
"कोण?"
"मी..........मी शाळेतील एक शिक्षक."
"बोला, काय काम आहे?"
"तुम्हाला माहित झालं का? आपले मुख्याध्यापक जगात नाहीत."
"म्हणजे?"
"अहो, ते देवाघरी गेलेत."
"म्हणजे?
"अहो, ते मरण पावलेत."
"कसे काय?"
"अपघात झाला त्याचा."
"कशानं?"
"एका चार चाकी गाडीनं. म्हणतात की त्यांनी जागीच दम सोडला."
मुख्याध्यापक मरण पावला होता. तो जागीच ठार झाला होता. काळानं त्याला पाणीही मिळू दिलं नाही ना नातेवाईकाची भेट होवू दिली. बायकापोरंही अंतिम समयी त्याचेशी बोलू शकली नाही. त्यामुळं त्यानं एवढं सगळं कृत्य केलं होतं, त्या कृत्याचा त्याला कोणता लाभ झाला होता. कोणताच नाही. ते त्याचं मरण आज बोध घेण्यालायक होतं. काळ सांगत होता की जे जे आपण कर्म करतो, त्याची शिक्षा तशीच केलेल्या कर्मानुसार मिळते. कारण त्या मुख्याध्यापकानं हळहळ करीत वा याला त्याला त्रास देत देत भरपूर मालमत्ता गोळा केली होती. परंतू उपयोग काय होता. ना त्यानं त्या संपत्तीचा उपभोग घेतला होता. ना त्या संपत्तीनं आपल्या लेकराचे त्यानं विवाह केले होते. ना त्या संपत्तीनं आपल्या लेकरांना नोकरी लावून दिली होती.
तो असाच दुर्दैवी, अतृप्ततेनं, तोंंडात पाण्याचा एक थेंब प्राशन न करता, नातेवाईक वा आपल्या बायकापोरांची अखेरची भेट न घेता या जगातून निघून गेला होता.
अमरला त्या शिक्षकाचा तो फोन. त्यानंतर बरेच फोन आले. सर्वांनी म्हटलं की तुमचा शत्रू गेला. परंतू अमरला आनंद वाटला नाही. त्याला अतिव दुःख झालं. कारण त्यानं प्रसंगी त्याला त्रासही दिला असेल, परंतू त्यानं जर त्याला शाळेत घेतलं नसतं आणि आपल्या सहीनं त्याचं अप्रुअल काढलं नसतं, तर आज अमर शिक्षक झाला नसता. ती घटना माहित झाली अमरला. तसा तो आनंदीत झाला नाही. उलट त्याला वाटत होतं की तो जीवंत राहायला हवा होता. वाटल्यास नियतीनं त्याचे हातपाय तोडून अपंग केले असते तरी चालले असते. निदान तो परीवाराच्या समक्ष तर दिसला असता. परंतू ती नियती होती शंभर गुन्हे माफ करणारी. मुख्याध्यापक गुन्हे करीतच गेला. त्यातच नियतीनं एकशेएकव्या गुन्ह्यात माफ केलं नाही. पुरतं त्याला संपवूनच टाकलं.
आज मुख्याध्यापक मरुन गेला होता. परंतू त्याची एक केस अजूनही सुरु होती. मारपिटीची. जी केस अमर हारला होता. वेतनाअभावी आणि त्याच्या पारीवारीक सुखासाठी अमरनं ज्या केसकडे लक्ष दिलं नव्हतं. परंतू वेतनाची केस अमर जिंकल्यानं बावचळून जावून मुख्याध्यापकानं मारपिटीची केस उलटफेर अमरवर टाकली होती. आज ती केस न्यायालयात सुरु होती. कोणी म्हणत होते की तो मरण पावला आहे. केस संपणार. परंतू असं काही घडलं नव्हतं. केस संपण्याची चिन्हं दिसत नव्हती. त्यातच आज केसमध्ये त्याची बायको व पोरं सहभागी झाले होते.
आज मुख्याध्यापक मरण पावला होता. परंतू त्यानंतर अमरच त्या शाळेचा मुख्याध्यापक बनला होता. आज ज्याचेशी कालपर्यंत दिवंगत मुख्याध्यापकाच्या धाकानं शाळेतील कोणीही बोलत नव्हते. त्यांना आज मुख्याध्यापक म्हणून अमर हवाहवासा वाटत होता. तसंच अमरलाही वाटत होतं की कालपर्यंत ती कर्मचारी मंडळी वागलीही असतील आपल्याशी वाईट. कारण त्यांची मजबुरी होती. दिवंगत मुख्याध्यापकाचा त्रास होता त्यांना. परंतू त्यात त्यांचा गुन्हा नव्हता. तो त्यांच्याशी अतिशय सौजन्यपुर्वक, सौहार्दायानं तसेच प्रेमपुर्वक वागत होता. कारण त्याला माहित होते की नियती ही दिवंगत मुख्याध्यापकासारखी आपलीही गत करु शकेल. आपण जर तसे वागलो तर आपल्याही तोंडात दिवंगत मुख्याध्यापकासारखे पाणी पडणार नाही व आपली बायकापोरं, आप्तेष्ट आपल्याला मरतांना मरणापुर्वी भेटणार नाही. आपल्याही मुलांचे विवाह होणार नाही. कदाचित नोकरीचे प्रश्नही उपस्थीत राहतील. आज तो त्या कर्मचा-यांना देत असलेली प्रेमळ वागणूक त्याच्याच जीवनात रंगत आणमत होती नव्हे तर कोर्टात खटला सुरु असूनही जगण्याची नवी उमेद निर्माण करीत होती. मात्र दिवंगत मुख्याध्यापकाला संस्थाचालकानं जसा त्रास दिला. तसाच त्रास अमर मुख्याध्यापक बनल्यावर त्यालाही होतच होता आणि तो प्रकर्षानं जाणवत होता.
मुख्याध्यापक मरण पावला होता. परंतू त्याच्या चांगल्या वाईट आठवणी अमरसमोर उभ्या होत्या. त्याला दिवंगत मुख्याध्यापकाशी लढण्याचा अनुभव पाठीशी होता. त्याच अनुभवाच्या जोरावर तो संस्थाचालकाशी लढत होता नव्हे तर सामना घेत होता.
मुख्याध्यापक मरण पावला होता. परंतू तो मरण पावताच संस्थाचालक वरचढ झाला. जणू त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाचीच आत्मा शिरल्यागत तो वागत होता. तसा तो आग ओकायला लागला होता.
संस्थाचालक शाळेत येत होता. परंतू तो कधी शांततेत बोलल्यीचं कधी आठवतच नाही. तो भांडणं लावायचे कामं करीत असे. परंतू कधी भांडणं सोडवायचा प्रयत्न त्यानं कधी केलाच नाही.
संस्थाचालक जसा शाळेत यायचा. तसा तो धमक्या द्यायचा की दोन वर्ष वेतन नाही झालं तरी चालेल. मला तुमच्या वेतनाची गरज नाही. तसेच मी ज्याला पद देणार. त्यानंच घ्यावं. कुणालाही ब्र काढता येणार नाही. तसेच ज्याला मी पद देणार. त्यानं काहीही करायची गरज नाही. फक्त सही करायची. बाकी सगळं मीच करणार. कोणाला बोलायची काही गरज नाही.
मुख्याध्यापक मरण पावले होते. तसे दोन तीन महिने वेतन बंद होते. परंतू संस्थाचालक आपल्या एकतर्फी निर्णयावर अडलेला होता. त्यानं एका जेष्ठ स्री शिक्षीकेच्या नावानं पदभार आणला होता. परंतू ती शिक्षीका पदभार घ्यायला तयार नव्हती. त्याचं कारणही तसंच होतं. तो संस्थाचालक सर्वांना धमक्या द्यायचा. तशाच तिलाही धमक्या द्यायचा. त्यातच तो म्हणायचा की काही वाचायचं नाही. काहीही लिहिलं असलं तरी डोळे लावून सह्या करायच्या. त्यामुळं कोणाचीही पदभार स्विकारण्याची हिंमत होत नव्हती.
अमर.........त्याच शाळेतील शिक्षक. सेवाजेष्ठतेनुसार पाचवा क्रमांक होता त्याचा. त्याला पदभार मिळेल हे त्यालाही माहित नव्हतं. तसं सर्वांचंच वेतन बंद होतं.
सर्वांचं वेतन बंद होतं. त्यामुळं सर्व शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. त्यांनी आपली कैफियत मांडली व कैफियतीनुसार शिक्षणाधिकारी साहेबांनी अमरला मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवली. मात्र या घटनेनं संस्थाचालक निराश झाला. कारण संस्थाचालक हा आधीच भेदभाव करणारा असून अमर हा कनिष्ठ जातीचा असल्यानं त्याला चालत नव्हता. शिवाय त्याला माहित होते की अमरला पुरेसं शाळेबद्दलचं ज्ञान आहे. तो आपलं कोणतीही गोष्ट विचार केल्याशिवाय ऐकून घेणार नाही. तसेच को-या कागदावर कधीच सह्या करणार नाही.
संस्थाचालकाचं बरोबर होतं. कारण अमर मुख्याध्यापक पदी रुजू झाल्यानंतर संस्थाचालकानं त्याच्या को-या कागदावर सह्या घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतू अमरनं अतिशय दक्ष राहून कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत. त्यामुळं तो संस्थाचालकाला अप्रिय होता. परंतू शिक्षकांचा चाहता होता. कारण त्यानं सर्वांना प्रेमळव वागणूक दिली होती. कारण वाईट कर्माचा अंत वाईटच होतोय हे त्याला माहित होते नव्हे तर त्यानं त्याचा दाखला प्रत्यक्ष दिवंगत मुख्याध्यापकाच्या स्वरुपात पाहिला होता.
काही दिवस शाळेचा कारभार व्यवस्थीत चालला. पटसंख्याही वाढली होती. वाढत होती. शिक्षक खुश होते. ते मन लावून अगदी हिरीरीनं काम करीत होते. त्यातच जनमाणसात शाळेचं नाव होत होतं नव्हे तर त्यांच्या मनपटलावर कोरलं जात होतं. परंतू संस्थाचालक स्वतःला मालक समजत असून तो अजूनही अमरच्या विरोधात होता. त्याला शााळेचा विकास नको होता तर स्वतःचा विकास हवा होता. मात्र त्या विकासाला अमरचा विरोधच होता. त्याला वाटत होते की गरीब घरची मुलं शिकावी, तिही पुढे जावी.
अमर शाळेच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष देत असे. तसा अलिकडे काळ बदलला होता. डीजीटल काळ आला होता. सगळी कामं अॉनलाईन झाली होती. तसा अमरही शाळा डीजीटल करु पाहात होता. परंतू तो हतबल होता. कारण त्याच्या कर्तृत्वाला संस्थाचालकाची दृष्ट नजर लागली होती. त्यामुळं विद्यार्थी दृष्टीकोणातून शाळेच्या विकासात बाधा निर्माण झाली होती. तरीही शाळा बरीचशी पुढे होती. कारण ते शिक्षक........ते शिक्षक शाळेत अतिशय मेहनतीनं शिकवीत होते नव्हेतर अमरच्या नेतृत्वात संस्थाचालकाशीही लढत होते आपल्या हक्कासाठी. जे हक्क संस्थाचालक नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत होता.
काही दिवस असेच गेले. अमरचा मुख्याध्यापक पदाचा काळ संपला होता. त्यातच संस्थाचालकाची पुन्हा वाईट नजर शाळेवर पडली. तसा तो पुन्हा आग ओकू लागला. परंतू नियती ते सर्व पाहात होती. त्यातच सर्व शिक्षकांनी एकत्र येवून पुन्हा संस्थाचालकाविरोधात केस टाकली आणि त्या केसच्या रुपानं आणखी एक खटला अमरच्या आयुष्यात निर्माण झाला.
ते खटले........ते खटले लढता लढता अमरला नाकीनव आलं होतं. पहिला दिवंगत मुख्याध्यापकाचा खटला संपला नव्हता. तोच पुन्हा नवीन खटला उभा राहिला होता. त्यामुळं थोडीशी चिंता अमरला होतीच. परंतू त्याही चिंतेवर मात करुन अमर जगत होता. त्यातच तो चांगल्या आयुष्याची स्वप्न पाहात होता. ती शाळा.......ती शाळा त्या शाळेच्या संस्थाचालकाच्या गैरप्रकारामुळं बुडत चालली होती. जणू सुर्य मावळतो तशी. संपूर्ण शिक्षकं पालक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात अंधार करण्यासाठी. परंतू त्या शाळेला शाळेचा चंद्र बनून अमर वाचवत होता बुडण्यापासून. कारण त्याच्या सोबतीला त्या चांदण्या होत्या आणि तो शुक्रतारा होता. ज्यांच्या प्रकाशानं शाळेचा झगमगाट होत होता अंधारापासून. त्या चांदण्या आणि तो शुक्रतारा असल्यामुळं अमररुपी चंद्राचं अस्तित्व तेवत दिसत होतं. नाहीतर त्या संस्थाचालकरुपी काळोखानं केव्हाच त्याचं अस्तित्व समाप्त करुन टाकलं असतं हे अमरला स्वतःलाही कळलं नसतं. हे तेवढंच सत्य होतं.

************************************************************************************************


ती कोर्टाची केस. अमरसोबत सर्व शिक्षगण कोर्टाचा दरवाजा खटखटायला गेले. परंतू कोर्टाची अवस्था सत्य जाणून घेणारी नव्हती. पुरावेही पाहणारी होती. ती पहिलीच तारीख. अजूनही अमरला मुख्याध्यापक पद मिळालं नव्हतं. परंतू तोच मुख्याध्यापक पदाचा दावेदार होता. कारण त्याच्यापेक्षा जेष्ठ असलेल्या शिक्षकांनी ते पद नाकारलं होतं.
ती न्यायालयातील केस. त्यातच संस्थाचालकानं बाजू मांडली. ती बाजू होती की शाळेत मुख्याध्यापक नियुक्त केलेला असून शाळेचा कारभार व्यवस्थीत आहे. अशाप्रकारे त्यानं कोर्टाची दिशाभूल करीत कोर्टाला फसवलं होतं. परंतू कोर्टानं त्यावर आर्डर स्वरुपात कोणतेच पुरावे मागीतले नव्हते.
संस्थाचालकानं त्यादिवशी कोर्टाला उत्तर सादर करायला दोन आठवड्याचा वेळ मागीतला होता. सिनीअर जेष्ठ शिक्षकांना तो ते पद देवू पाहात होता.
दोन आठवडे झाले होते. त्यातच संस्थाचालकानं खेळी करीत सिनीअर जेष्ठ शिक्षीकेच्या नावानं आर्डर न्यायालयात सादर केला. आपलं स्वतःचं साक्षांकन कोर्टाला दिलं. त्यानुसार सिनीअर जेष्ठ शिक्षकांच्या नावानं आर्डर दिला होता न्यायालयानं. त्यातच अमरला ती केस हारावी लागली होती. कोर्ट म्हणालं,
"आम्ही प्रत्यक्ष पुरावे तपासले. पुराव्याअंती न्यायालय निष्कर्षापर्यंतही पोहोचलं. त्यानुसार ठरवलं आहे की सदर शिक्षीका जेष्ठ असून शासनाचा उत्स्फुर्तपणे लाभ घेत आहे. घेतलेला आहे. तेव्हा हे मुख्याध्यापक पदही त्यांनाच घेणं बाध्य असून न्यायालय त्यांच्या लाभ घेण्यानुसार सदर शिक्षीकांचं म्हणणं ऐकायला तयार नाही. त्याच निष्कर्षानुसार मी स्वतः कोर्टाचा न्यायाधीश सदर जेष्ठ शिक्षीकेला मुख्याध्यापक पदाचा पदभार देत अाहे. तो त्यांनी स्विकारावा. जर हा पदभार नाही स्विकारल्यास न्यायालय त्याला अवमान समजेल व सदर शिक्षीकेविरोधात पुर्ण स्वरुपात कारवाई करुन सदर लाभाची रक्कमही परत मागण्याचा अधिकार न्यायालयाला असेल. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय असून न्यायालय ही केस समाप्त करीत आहे."
न्यायालयानं आपला निष्कर्ष ऐकवला होता. तशी केस बंदही झाली होती. असं वाटत होतं की न्यायाधीशानंच सेटींग केली की काय? कारण सदर खटल्यात न्यायच बरोबर मिळाला नव्हता. तसं अमरला वाटत होतं की ही केस म्हणजे ज्याला मटन आवडत नाही त्याला मटन खावू घालणे किंवा जबरदस्तीनं एखादी वस्तू खाण्याची एखाद्याची इच्छा नसली तरी त्याला एखादी वस्तू जबरदस्तीनं खावू घालणं. ही घटना प्रत्यक्ष त्या जेष्ठ शिक्षीकेला विष पाजण्यासारखी झाली होती.
सिनीअर जेष्ठ शिक्षीका पद सांभाळण्यास सक्षम नव्हती. परंतू न्यायालयाचा आदेश. अवमान करता येत नव्हता. त्यातच तिनं मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळला.
सदर शिक्षीकेनं मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळला. परंतू तिला स्वतंत्र्य असं अस्तित्व नव्हतं. त्यातच संस्थाचालक तिच्यावर जबरदस्ती करुन व प्रत्यक्ष धमकी देवून तिला त्रस्त करीत असे. तिला पेन्शन मिळू देणार नाही अशाही धमक्या देत असे. त्यातच ती घाबरत होती. त्याच धाकानं त्या शिक्षीकेनं संस्थाचालकाच्या को-या कागदावर सह्या केल्या होत्या व संस्थाचालकाच्या डावात फसली होती. त्यातच आता ती संस्थाचालकाला विरोध करु शकत नव्हती. कारण संस्थाचालक तिला तशी फसविण्याची धमकीच देत असे.
अमर मात्र आज खुश होता. तो आता दुस-या शाळेत होता. दोनचार वर्ष संस्थाचालकानं अमरलाही सदर शिक्षीकेमार्फत त्रास देवून पाहिला. परंतू अमर त्यातून तरुन निघाला होता. त्यातच तो आता दबत नाही. आपण त्याला दाबू शकत नाही असा विचार करुन संस्थाचालकानं त्याला अतिरिक्त ठरवलं होतं. त्यामुळं तो आता दुस-या शाळेत गेला होता. ज्या शाळेत त्याला चांगलं म्हणणं जात होतं नव्हे तर त्याच्या अनुभवाचा फायदा घेतला जात होता.
अमरची मागील शाळा पुर्णतः बुडाली होती. त्या शाळेत आता विद्यार्थी संख्या नव्हती. विद्यार्थी कमी झाले होते. कारण संस्थाचालकाला शाळेशी काही लेनदेन नव्हतं. लेनदेन होतं ते पैशाशी. त्यातच त्याला इतरांना त्रास देण्यास मजा वाटत होती. त्याला शाळेचा विकास हवा नव्हता. तसेच त्याला शाळा डिजीटल बनवायची नव्हती.
आज ती शाळा बुडाली होती तर अमर ज्या शाळेत होता. ती शाळा उसळला होता. तेथील संस्थाचालकही चांगला होता.
काही दिवस असेच गेले. त्यातच अमर ज्या शाळेत होता. त्या शाळेतील जेष्ठ शिक्षक रिटायर्ड झाले होते. त्यातच अमरला मुख्याध्यापक पद पर्यायानं चालून आले व अमर या शाळेत मुख्याध्यापक बनला. त्यामुळं त्याची जी मुख्याध्यापक बनायची जी इच्छा होती. ती पुर्ण झाली होती. सदर शाळेचा संस्थाचालक चांगला असून त्यानं त्याला मुख्याध्यापक पद दिलं होतं नव्हे तर ती शाळा अमरची इज्जतही करीत होती.
अमर दुस-या शाळेत त्या शाळेचा मुख्याध्यापक बनला होता. त्यातच त्याला निर्भयपणे काही करुन दाखविण्याची संधीही होती.
अमर तसा हुशारच. शिवाय त्याला अनुभवही होता. तसा तो वेगवेगळे उपक्रम करण्यात आणि राबविण्यात माहिर होता. त्यातच त्याला या शाळेत काही करुन दाखविण्याची संधी उपलब्ध झाली होती.
अमरच्या हातात जशी शाळा आली. तशी त्यानं आपल्या कुवतीनुसार शाळा डीजीटल बनविण्यास प्रारंभ केला होता. स्मार्टफोनचा काळ आला होता. सर्व कामकाज तसे ऑनलाईनच झाले होते. त्यातच अमरनं सर्व शाळेतील मुलांना टैब विकत घेवून दिले. शिक्षकांनाही त्यानं डीजीटल बनवलं होतं.
जुनी सगळी मंडळी निवृत्त झाली होती. नव्या दमाची सर्व तरुण मंडळी शिक्षक म्हणून रुजू झाली होती. त्या नवीन शिक्षक मंडळी नव काही करण्याचा उत्साह होता. दसं नव काही करुन घेण्याचा उत्साह अमरमध्येही होता. अमर राबत होता. त्या संस्थाचालकासाठी नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना धड पायात चप्पलही घालायला मिळत नव्हती.
अमर त्या नव्या शाळेत होता. एक दिवस अमर घरात पायरीवर बसला होता. तसं त्याला त्याचा भुतकाळ आठवला की नव्या शाळेला डीजीटल करायचं कसं? त्यावेळी शाळा संस्थाचालकानं शाळा तर त्याला मुख्याध्यापक बनवून त्याच्या हातात दिली. परंतू ती शाळा डीजीटल बनवीत असतांना सर्वप्रथम आड येत होता तो पैसा. तो पैसा कसा उभारायचा. प्रश्न होता. त्यातच अनुदानातूनही एवढी रक्कम गोळा होत नव्हती की प्रत्येक विद्यार्थ्यांना काम्प्यूटर टैब विकत घेवून देता येईल. ते शक्यच नव्हतं. तसा विचार करीत असतांना त्याला विचार आला की आपण शाळेचॉ बिलबुक छापायचं. त्यातच मोठ्या उद्योगपतीकडं जासचं. नेत्यांकडं जायचं. संबंधीत शिक्षणप्रेमींकडं जायचं की ज्याला त्यात आवड आहे. तसा विचार येताच तो त्या सर्व शिक्षणप्रेमींकडं गेला. त्यांना आपली कैफियत सांगीतली. म्हटलं की शाळेत मुलं गरीबाची आहेत. तेव्हा आपण मदत केल्यास आपल्याला पुण्य लागेल. त्यातच काही जणांनी त्याचा अपमान केला. परंतू काही जणांनी त्याच्या विचाराचे स्वागत करुन त्याला सढळ हातानं मदत केली. त्यामुळं भरपूर पैसा गोळा झाला होता. त्यातच काही पैसा जे श्रीमंत पालक होते. त्यांच्याकडूनही गोळा केला.
भरपूर पैसा गोळा झाला होता. आलेला सर्व पैसा फालतूच्या कामात खर्च न करता त्यानं त्या पैशात सर्व विद्यार्थ्यांसाठी होलसेल भावात काम्प्यूटर टैब विकत घेतले व शाळेचा वर्ग डीजीटल बनविण्यास प्रारंभ केला.
सर्व विद्यार्थ्यांना काम्प्यूटर टैब मिळाले होते. त्यातच त्यांना अगदी आनंद वाटत होता. तसा आणखी भरपूर पैसा वाचला होता. त्यातच त्या पैशानं त्यानं शाळेची रंगरंगोटी केली होती. त्यातच भिंतीवर चित्रही काढले होते. ते चित्र निसर्गाचे होते.
आता ती शाळा पाहायला चांगली दिसत होती. त्याचा प्रयोग फसला नव्हता. तसं पाहता ती शाळा डीजीटल बनविण्यात त्याची जिद्द व चिकाटी कामात आली होती.
महत्वाचं म्हणजे काही केलं तर ते बरोबर होतं. त्यासाठी तुमचा विचार रास्त हवा. तो विचार रास्त जर असेल आणि तुमच्या मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर ते ध्येय, मग ते ध्येय कठीणात कठीण का असेना, साध्य होत असते. अमरचा उद्देश रास्त होता. त्याचा स्वार्थ नव्हता त्यात. तसेच तो हेतू साध्य करण्याची उर्मी होती अंगात.
अमरनं शाळा तर डीजीटल बनवली होती. त्यातच सर्वांना काम्प्यूटर टैबही दिलं होतं. परंतू ते शिकविण्यासाठी लागणारा प्रशिक्षीत वर्ग. तो त्याच्याकडे नव्हता. त्यातच त्यानं आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना डीजीटल प्रशिक्षणालाही पाठवलं नव्हे तर आधी ते प्रशिक्षण स्वतः करुन घेतलं.
आज ती शाळा उच्चतम श्रेणीत गेली होती. त्यातच त्या शाळेची आजची पटसंख्याही व्यवस्थीत होती. लोकांना आवडत होती डीजीटल शाळा.
शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात चाललेली त्रेधातिरपीट बंद झाली होती. ज्या भटकंतीने शिक्षकांची गोची व्हायची. तरीही विद्यार्थी सापडायचे नाहीत. तो सर्व प्रकार बंद झाला होता. आता या शाळेत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात भटकंती न करता विद्यार्थी स्वतः शाळेत येत असत. विद्यार्थ्यांसाठी भटकंती करण्याची गरज उरली नव्हती.
मुलांच्या दप्तराचे ओझे बंद झाले होते. मुलांना फक्त शाळेतच प्रत्यक्षदर्शी जीवंत अनुभव डीजीटल माध्यमातून दिला जात होता. जो अनुभव चित्राच्या साहाय्यानं घेतांना विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होत होता. ते अगदी आनंदानं शिकत होते. तसेच शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना शिकवितांना आनंदच वाटत होता. तेही अगदी आनंदानं शिकवीत असत. त्यातच त्यांना तशा ध्वनीफितीच्या माध्यमातून शिकवितांना जास्त तारेवरची कसरत करावी लागत नव्हती.
टैब शाळेतच दिलं जाई विद्यार्थ्यांना आणि सायंकाळी सुटी होताच ते त्यांच्याकडून परत घेतलं जाई. ते टैब शाळेतच ठेवलं जाई. तसेच ते टैब ठेवण्याचीही व्यवस्था शाळेतच केली होती. विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी झाल्यानं विद्यार्थी विना ओझ्यानं शाळेत येत व विना ओझ्यानं शाळेतून जात. त्यातच त्यांचे सतत रात्रीला खांदे वा हातपाय दुखण्याची कुरकूर बंद झाली होती. तसेच शाळेतच खिचडी मिळत असल्यानं व शुद्ध पाण्याची व्यवस्था असल्यानं मुलांना घरुन काहीही आणावं लागत नव्हतं.
विद्यार्थ्यांना शाळेत असं रुपेरी पडद्यावरचं ज्ञान मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची हौस होती. तसेच विद्यार्थ्यापाठोपाठ पालकांनाही या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेशीत करायला आनॉद वाटत असे.
अमरनं केवळ विद्यार्थ्यांना काम्प्यूटर टैबच दिलं नाही. त्याच माध्यमातून केवळ शिकवणं सुरु केलं नाही.व्यतिरीक्त त्यानं शाळेत हसतखेळत शिकविण्याच्या पद्धतीचा अवलंब केला. त्याच्या शाळेतील सर्व मुलं अतिशय आनंदात हसतखेळत शिकत असत. त्यांना अभ्यासाचा कधी कंटाळा येत नसे. मुख्य म्हणजे त्यांना शाळेतून घरीच जावंसं वाटत नव्हतं.
शिक्षणापाठोपाठ अमर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचंही आयोजन करीत असे. सहल व शिबीरही आयोजन करीत असे. तसेच शाळेत स्नेहसंमेलनाचेही आयोजन केले जाई. या स्नेहसंमेलन वा शिबीरात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाई. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही दिला जात असे. अगदी शेवटच्या दिवशी नाटक दाखवलं जाई प्रेक्षकांना. ते नाटक त्या शाळेतील विद्यार्थी स्वतः करीत व पालक हे त्यांचे प्रेक्षक असायचे. तसेच शाळेत स्पर्धात्मक उपक्रमही राबवले जात होते. स्पर्धेत निबंधस्पर्धा, चित्रकलास्पर्धा व रांगोळी स्पर्धा आवर्जून होत. या स्पर्धेत विद्यार्थांना बक्षीस दिलं जाई. बक्षीसांमध्ये थोर नेत्यांच्या संस्काराच्या पुस्तका दिल्या जात असे. तसंच परीक्षाही वस्तूनिष्ठ स्वरुपाची होती. त्यामुळं विद्यार्थ्यांवर असं कोणतंच टेन्शन नसल्यानं विद्यार्थी अगदी आनंदानं मौजमजा करीत शिकत होती. आपलं जीवनच नाही तर जीवनातलं महत्व शिकत होती. कारण त्यांना आयुष्य बनवायचं होतं. या डीजीटल युगात स्वतःला डीजीटलतेच्या ढाच्यात ढाळायचं होतं आणि स्व मेंदूला या डीजीटल युगात डीजीटलरितीनं सक्षम बनवायचं होतं. त्यासाठीच अमरची ही डीजीटल शाळा होती.
जुन्या संस्थाचालकाची शाळा पटसंख्येअभावी बंद झाली होती. तो संस्थाचालक आज पश्चाताप करीत होता. कारण त्याच्याजवळ पश्चातापाशिवाय मार्गच नव्हता. त्याला वाटत होतं की जर त्यानं अमरच्या कार्यकर्तृत्वावर शंका न घेता त्यालाच मुख्याध्यापक ठेवलं असतं तर आज त्याचीच शाळा डीजीटल बनली असती. बंद झाली नसती वा बुडाली नसती. परंतू आता पश्चाताप करुन उपयोग नव्हता. कारण ती वेळ........ती वेळ आज निघून गेली होती.
अमर नित्यनेमानं शाळेत जात होता. त्यातच तो शाळेत जातीनं लक्ष देवून वर्गाचे निरीक्षण करीत असे. त्या निरीक्षणातून त्याला काही शिक्षक दोषीही आढळत असत. परंतू तो त्यांचं म्हणणं विचारात घेता, त्यांतयावर कारवाई करीत नसे. अत्यंत प्रेमानं त्यांना समजावून सांगत असे.
अमर जेव्हा जेव्हा या शाळेची प्रगती पाहात असे. तेव्हा तेव्हा त्याला जुनी शाळा आठवत असे आणि आठवत असत त्या आठवणी. ज्या आठवणी त्याला बेजार करुन टाकत. आज त्याला त्या आठवणी झपाटून टाकत असत. अशीच एकदा त्याला त्या प्रभारी पदाची आठवण आली. ते प्रभारी पद. ना त्या पदात पैसा मिळत होता ना राहत. उलट त्रासच जास्त होता. असा त्रास की ज्या त्रासापायी तो कंटाळला होता. नुकतंच त्याचं प्रभारी मुख्याध्यापकाचं पद संपलं होतं. त्यातच पुन्हा आपल्यालाच पदभार मिळावा म्हणून त्यानं शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. ज्याला शिक्षण विभाग नकार देत होता. तसाच नकार संस्थाचालकही. मात्र त्याचं शालेय प्रशासन व्यवस्थीत असल्यानं सर्व शिक्षक मंडळी त्याचे बाजूनं होते. ते स्वतः धावपळ करीत आणि पदभार आणत असत. अशातच आज एक महिना झाला होता. अजुनही पदभार मिळाला नव्हता. त्यातच विचार येत होता.
पालक मंडळी शाळेत येत. टिसीसाठी अर्ज आणत. परंतू त्या पालकांना विना पदानं अमर टिसीही देवू शकत नव्हता. कारण टिसी जर द्यायची झाल्यास त्यासाठी अधिकार हवा तसाच पदभारही. तो पदभार त्याचेकडे नसल्यानं टिस्या कशा द्याव्या हा विचार होता अमरच्या मनात. मात्र पालक येत व टिस्यासाठीआववर्जून भांडणं करुन जात असत. तसं पाहता त्यांचंही म्हणणं बरोबर होतं. कारण ते मुलांचे नाव टाकतांना मुख्याध्यापकाला दाखले द्यायचे. शिक्षणाधिकारी साहेबाला नाही. त्यामुळं साराच गोंधळ झाला होता. एक अधिकारपत्र न मिळाल्यामुळे.
पदभार देणा-या अधिका-यांना याचं काहीच सोयरसुतक नव्हतं. कारण त्यांच्याशी पालकांचा थेट संबंध येत नव्हता. तोच गोंधळ होता शाळेचे प्रवेश करण्याच्या बाबतीत. कारण नुकतीच शाळा सुरु व्हायची आणि याच कारकिर्दीत पदभार नसायचा. त्यामुळं अशा संकटकाळात मुलांचे प्रवेश कसे करायचे हा विचार अमरपुढे उभा राहायचा. त्यातच शाळा सुरु होत असतांना शाळासिद्धी, युडायस प्लस, रिक्वेस्ट पाठवणे, शाळेची मुलं आऊट ऑफ स्कूल करणे, आय डी नंबर लिहिणे इत्यादी कामं असायची. ती सारी कामं खोळंबळायची. त्यामुळं अमरच्याही मनात गोंधळच निर्माण होवून राहात असे. त्यामुळं ती सर्व कामं पूर्ण करण्यासाठी अमरला पदभाराची आवश्यकता असायची. परंतू ते न मिळाल्यानं अमर चिंतीत असायचा. त्यातच तो आपल्या शाळेकडे दुर्लक्ष करुन शिक्षणाधिकारी कार्यालयात जायचा. जिथे साहेब म्हणायचे की थांबा थोडावेळ. आज आदेश देतो. परंतू रात्रीचे नऊ वाजायचे. तरीही आदेश मिळायचे नाहीत. शेवटी कंटाळून जावून लहानसं तोंड करुन हिरमुसल्या तोंडानं तो घरी परत यायचा. हा त्याचा नित्याचाच आणि रोजचा क्रम होता. असे दिवसामागून दिवस जात होते. परंतू त्याला राहत मिळत नव्हती. तो लढत होता त्या संस्थाचालकाशी. त्या संस्थाचालकाशी नाही तर आपल्याच प्रारब्धाशी. कारण त्याला माहित होते की आपल्याला वेळ आल्याशिवाय आणि नशीब फळफळल्याशिवाय कधीच पदभार मिळणार नाही. आज त्याला तिस-यांदा प्रभारी मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळाली होती. परंतू ती दोनच महिण्याची होती. त्यातच त्यात ती मान्यता दोन महिण्याची असूनही फक्त त्यानं एकाच महिण्याचे वेतन टाकायचे. दोन महिण्याचे टाकायचे नाही. असा स्पष्ट आदेश होता. तो आदेश पाहताच अमर चक्रावून गेला. त्याला वाटत होतं की शासनाची कामं दोन महिण्याची करायची आणि मोबदला फक्त एकाच महिण्याचा घ्यायचा. हे काही बरोबर नव्हतं. परंतू तो शासनाचा आदेश. त्याला कोण का म्हणणार. सगळा गोंधळ आणि सावळा गोंधळ.
अमरला त्याच्या जुन्या शाळेनं बरंच छळलं होतं. त्या जेव्हा आठवणी यायच्या. तेव्हा काळीज भरुन यायचं. वाटायचं की कोणतं पाप केलं होतं की मी या शाळेत आलो. परंतू ते पापच असेल अमरचं कदाचित. त्याला ते भोगावं लागत होतं. प्रारब्ध समजून की पाप समजून ते कळत नव्हतं.
आज तो सुखी होता. कारण नशीबानं पलटी घेतली होती. त्यामुळं त्याला चांगल्या शाळेत जागा मिळाली व त्याला त्या चांगल्या शाळेत आपल्या कलागुणांना वाव देता आलं. नाहीतर ते कलागुण जसेच्या तसेच दबून राहिले असते. त्यांना कधीच वर काढता आलं नसतं.
अमरनं आपल्या त्या जुन्या शाळेसाठीही बरीच मेहनत केली होती. सुरुवातीला धुळ असलेली ती शाळा. विद्यार्थ्यांना बसायला नीट चटयाही नव्हत्या. त्यातच पुरेशा भिंतीही नव्हत्या. एक फाटलेली ताडपत्री होती. त्या ताडपत्रीवर मुलं बसत व सायंकाळी पाच वाजता सुटी झाल्यावर घरी जात. त्यातच वर्ग वेगवेगळे असले तरी सटर लावलेले नसल्यानं वा आडप केलेला नसल्यानं वर्गात पुरेसा गोंधळच चालत असे. क्रमवार वर्गरचना असून पहिलीच्या वर्गातील मुलांना चौथीची मुलं दिसत. त्यातच खाली धुळ असे. ती धुळ मधल्या सुटीत मुलांच्या खेळण्यानं उडत असे. तसेच रात्री या जागेवर ती जागा मोकळी असल्यानं परीसरातील जनावरं बसत असत. ती मुकी जनावरं शौच करुन ठेवत. ही विष्ठा सकाळी शाळा भरताच स्वच्छ केली जात असे व तिथे शाळा भरवली जात असे.
सुरुवातीला गाईच्या गोठ्यातच शाळा,भरल्यागत शाळा भरत होती. त्यातच या शाळेत पटसंख्या फार होती. आजुबाजूला शाळा नसल्यानं लोकं आपल्या मुलांना याच शाळेत पाठवायचे.
शाळेला जेव्हा अनुदान प्राप्त झालं, तेव्हा या शाळेचं बांधकाम सुरु असतांना अमर इमारतीचा मसाला भिजवून द्यायचं काम करायचा. व्यतिरीक्त शाळेच्या इमारतीच्या भिंती मजबूत व्हाव्यात यासाठी त्या भिंतीवर पाणीही मारण्याचं काम अमर करीत असे.
अमरनं कर्तृत्व केलं होतं या शाळेसाठी. परंतू त्या कर्तृत्वाचं चीज झालं नव्हतं. कारण संस्थाचालक अमरनं केलेली मेहनत विसरला होता. त्यातच आता त्याला त्याचे नातेवाईक प्रिय झाले होते.
अमर इमानदार होता. कोणाचा एक रुपया खात नव्हता ना खावूही देत होता. संस्थाचालक काळे कामं करायचा. त्यातच असे काळे कामं करीत असतांना त्या कामाला अमर नाहीच म्हणत असे. तसा तो प्रसंग.
अमर प्रभारी मुख्याध्यापक होता. तोच मिटींग बोलवू शकत असे व तोच मिटींग बरखास्त करीत असे. अमर मुख्याध्यापक तर होता. व्यतिरीक्त शाळेचा सचिवही होता. त्यातच सुरुवातीला अमरला पदप्राप्ती होताच संस्थाचालक खवळला व ताबडतोब आपले नातेवाईक घेवून शाळेत आला व मिटींग आहे असे शिपायाला सांगून त्यान, अमरला बोलावून घेतले.
ती मिटींग. ती मिटींग बोलाविण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला होता शाळेचा सचिव या नात्याने. परंतू संस्थाचालकानं ती मिटींग बोलावली होती. आपलेच नातेवाईक बोलावून व अमरवर दबाव टाकण्यासाठी. त्यातच जे नातेेवाईक त्या संस्थेच्या पदावर नव्हते तेही त्या ठिकाणी आले होते.
मिटींग भरली व संस्थाचालकानं एक बुक अमरच्या हातात देत म्हटलं,
"यावर सही करा."
अमरनं ते बुक हातात घेतलं. त्यात काहीतरी लिहिलं होतं. तसा अमर वाचायला लागला. परंतू संस्थाचालक म्हणाला,
"काही वाचायचं नाही. चुपचाप सही करायची."
त्यावर अमर म्हणाला,
"मी वाचल्याशिवाय सही करीत नाही. तेव्हा मी वाचणारच."
"नाही, मी वाचून दाखवतो." संस्थाचालक म्हणाला व वाचाला लागला.
"मी वाचल्याशिवाय सही करीत नाही. तेव्हा मी वाचणारच."
"नाही, मी वाचून दाखवतो." संस्थाचालक म्हणाला व वाचायला लागला.
तो मैटर वाचून होताच संस्थाचालक म्हणाला, "आता मारा सही. मी वाचून दाखवलं आहे."
अमरनं ते बुक पुन्हा हातात घेतलं. तसा तो पुन्हा वाचू लागला. तसा संस्थाचालक पुन्हा म्हणाला, "मी वाचून दाखवल ना. आता काय वाचायची गरज आहे."
तसा अमर पुन्हा म्हणाला,
"नाही, मी वाचल्याशिवाय तर सही करीत नाही. मी आधी वाचणारच."
अमरनं म्हटलेलं वाक्य. तसा अमर वाचायला लागला. ते पाहून संस्थाचालक समजला की अमर हुशार व्यक्ती असून हा पुढील काळात आपल्यावर भारी होवू शकतो. त्यामुळं की काय तो विरोध करु लागला अमरचा. अमर व त्याचं पुढील काळात पटेनासं झालं होतं.
जुना संस्थाचालक फारच हुशार होता. तोही एका शाळेचा मुख्याध्यापक होता. त्यानं त्या काळात जास्त मुख्याध्यापकपणा केला नाही. आपली शाळा वाढविण्याच्या चक्करमध्ये हिच शाळा पाहात राहिला. याच शाळेकडे लक्ष केंद्रीत केले. तो मुख्याध्यापक कमी व संस्थाचालक जास्त होता. तसा त्याचेजवळ अनुभवाचा साठाच होता. त्यातच त्यानं शाळा वीद्यार्थी घडविण्यासाठी उघडली असली तरी त्याला शाळेचे हित कमी व पैसा कमविण्याचा उद्देश जास्त होता. परिणामी आज त्याचेजवळ पैसा पुष्कळ होता. परंतू त्या पैशाला पाहिजे त्या प्रमाणात किंमत नव्हती.
अफाट असलेली पटसंख्या एवढ्या वेगानं कमी झाली की ती प्रयत्न करुनही वाढली नाही. त्याचे कारण होते त्याचे वागणे. त्यानं पैसा कमवून आपली मुलं डॉक्टर, इंजीनीयर बनवली. त्यातच जावई डॉक्टर व सुन इंजीनीयर शोधले. मपलगी विदेशात वास्तव्याला होता. शाळेत सख्खं कोणीही नव्हतं. त्यामुळं त्याला शाळेविषयी आत्मीयता नव्हती. अमरच्या वेतन बंदच्या प्रक्रियेत मा. शिक्षणाधिकारी साहेबासमोर तो म्हणाला होता की शाळा माझी गाजराची पुंगी आहे. मी वाजवीन तेव्हापर्यंत वाजवीन. नाही वाजली तर खावून टाकीन. त्यातच जुन्या मुख्याध्यापकाला पदावरुन का हटवत नाही विचारताच तो म्हणाला होता की लेकरानं मांडीवर विष्ठा केली तर ती मांडी कापायची नसते. असे त्याचे बेताल वागणे व बेताल आणि वाचाळ बोलणे. मग शाळा कशी टिकेल. त्यातच त्यानं त्या शाळेची धुराही अशा माणसांच्या खांद्यावर दिली होती की ज्यांना शाळेचं अजीबात हित नव्हतं. त्यांचाही उद्देश पैसा कमवुणं हाच होता. त्यामुळं जुना मुख्याध्यापक शाळेत शाळा वाढविण्याबाबत टक्केवारी मागत होता. ती न दिल्यामुळं त्यानं पूर्ण शाळाच बुडवून टाकली होती. तो जर जीवंत असता तर त्याच्या हयातीतच ती पुर्णतः बंद झाली असती. अशी स्थिती त्याच्या मरण्याच्या कालावधीपर्यंत येवून ठेपली होती.
धुर्त, कावेबाज संस्थाचालकाला फक्त शाळेत मुख्याध्यापक म्हणून रबरस्टँपवाला व्यक्ती हवा होता की जो पैसे कमवू देईल. विरोध करणार नाही. स्वतः फसेल, पण त्याला फसविणार नाही. त्यामुळंच त्या शाळेत कोणीही मुख्याध्यापक पदाचा चार्ज घ्यायला तयार नव्हते आणि मा. शिक्षणाधिकारी कार्यालयही प्रत्येक वेळी सुनावणी घेत. परंतू सहजपणे अमरला पदभार देत नसत. त्यामुळं मुख्याध्यापक पद घेतलं तरी ना वेतन असायचं. ना कोणते भत्ते. उलट हमाली असायची. म्हणून अमरच्याही ते मुख्याध्यापक पद नाकीनव येणं साहजीकच होतं. परंतू नाईलाज असल्यानं नाईलाजास्तव त्यानं ते पद कार्यालय देत असतं. म्हणून स्विकारलं होतं. जे पद काही काळानं न्यायालयानं रद्दबादल ठरवलं होतं. आज त्याला ते सगळं आठवत होतं.
त्या शाळेच्या अनेक आठवणी. कारण ती आस्थापनाची शाळा होती. त्या शाळेनं फक्त नी फक्त अमरला त्रासच दिला. परंतू त्याच त्रासाच्या भरवशावर अमर अनुभवसंपन्न झाला होता. त्याला पुढील जीवनात यशस्वी वाटचाल करतांना व ही शाळा वाढवितांना त्याच अनुभवाचा फायदा होत होता.
आज अमरचं वय झालं होतं. तो निवृत्त होत होता. परंतू तो निवृत्त होतांना त्या नव्या शाळेतील सर्व स्टॉफ रडत होता. त्यातच संस्थाचालकही. त्या संस्थाचालकानं निरोप प्रसंगी केलेल्या भाषणातून सर्वांना रडायला भावविवश केले होते.
अमर नव्या शाळेतून निवृत्त झाला होता. परंतू त्याचा अनुभव दांडगा होता. त्यातच त्याचं कर्तृत्व माहित असलेल्या शाळा त्याला आवर्जून पाहूणा म्हणून बोलवत व शाळा व्यवस्थीत कशी करावी. याचं मार्गदर्शन त्याचेकडून घेत. त्यातच अमरही निःशुल्क विद्यार्थ्यांना व त्या शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना मार्गदरिशन करुन शाळा वाढविण्याला मदत करीत असे.
एकदा त्याच शाळेतील संस्थाचालकाला वाटलंं की अमरला इतर शाळेवाले पाहूणा म्हणून बोलवतात. त्याचं मार्गदर्शन घेतात. तसेच त्याच्या अनुभवाचा फायदा स्वतःची शाळा उभारणी करण्यासाठी करुन घेतात. असं जेव्हा त्या नव्या संस्थाचालकाला माहित झालं, तेव्हा तो अमरच्या घरी आला. तसा तो म्हणाला,
"आम्ही तुम्हाला आमच्या सल्लागार बॉडीमध्ये घेण्याचा विचार करीत आहोत. कृपया नाही म्हणू नका."
अनरनं त्या संस्थाचालकाचं ते बोलणं आकलं तसं त्याला गहिवरुन आलं. परंतू तो म्हणाला,
" कृपया मला माफ करा. मी तुमच्या लायकीचा नाही."
तसा संस्थाचालक म्हणाला,
" नाही नाही. तुम्ही कृपया नाही म्हणू नका. आम्हाला शाळा जी वाढली आहे. तिचा दर्जा टिकवून ठेवायचा आहे. तो तुमच्याच सल्ल्यानं टिकवून ठेवता येवू शकतो. तुम्हाला भरपूर अनुभव आहे आणि काही करुन दाखविण्याची चिकाटी व जिद्द आहे. आम्ही तुमच्या प्रत्येक सल्ल्याचं पालन करु. हवं तर पैसेही देवू."
" नाही नाही. पैसे नकोत मला. बस माझी एवढीच अट आहे की मी माझ्या कामाच्या वेळेस तुम्हाला वेळ देणार नाही."
"एवढंच ना. मग ठीक आहे. तसं पाहता तुमच्या सर्वच अटी आम्हाला मान्य आहेत."
" तसं नाही हो. तुमच्या शाळेनं मला बरंच काही दिलं. प्रेम, माया, प्रतिष्ठा आणि पदही. न मागता सर्व मिळालं. नाहीतर काही काही संस्थाचालक. गुणांचा विचार करीतच नाही. ते फक्त नातेवाईकपणा पाहतात. त्यातच रबरस्टँप. मी म्हणेल तसा मुख्याध्यापक वागायला हवा. अशानं शाळा वाढत नाही. वाढते तो पैसा. इज्जतही वाढत नाही. वाढते तो अपमान. माणसानं दोन पैसे कमी कमवले तरी चालेल. परंतू माणसं जोडली पाहिजेत. जोडायला हवीत. ते शाळेसाठी महत्वाचं आहे आणि एक गोष्ट महत्वाची आहे. ती म्हणजे शाळा वाढवायची असेल तर नातेवाईकपण संपवून व रबरस्टँपपणा संपवून गुणवान व्यक्तीच्या हातात शाळेची सुत्रे द्यायला हवीत. त्यासाठी सेवाजेष्ठपणाही नको."
अमर बोलत होता. संस्थाचालक लक्ष देवून ऐकत होता. तेही एक मार्गदर्शनच होतं त्या संस्थाचालकासाठी. पुढं त्या संस्थाचालकानं अमरला सल्लागारपदी घेतलं.
अमर त्या शाळेचा सल्लागार बनला होता. तशी ती शाळा वाढलीच होती. शाळेत नाव टाकायला पालक स्वतः रांगा लावत. ते अमर मुख्याध्यापक असतांनाच साध्य झालं होतं. परंतू आता सल्लागार बनून तो शाळेची प्रत राखून ठेवत होता. त्याचे पैसेही घेत नव्हता. कारण त्याचे मनात स्वार्थ नव्हता, तर प्रेम होतं आणि आपुलकी व जिव्हाळाही होता शाळेबद्दल.