कोहीनूर Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोहीनूर

मनोगत

कोहीनूर नावाची कादंबरी वाचकांना देत असतांना मला अतिशय आनंद होत आहे. कोहीनूर लिहिण्यामागे प्रेरणा ही माझे मित्र सुनिल वाडे यांची असून मी यापुर्वी भानुमती कादंबरी लिहिल्यानंतर सहज माझे मित्र सुनिल वाडे यांना फोन केला आणि सहजच विषय विचारला असता त्यांनी सांगीतलं की कोहीनूर या विषयावर एखादी कादंबरी लिहा. मी लगेच मनात ठाणलं की आपण कोहीनूर या विषयावर कादंबरी लिहावी. लगेच विचार करुन मी त्याचं कथानक मनात तयार केलं व ही कादंबरी साकार केली.
खरं तर मी ही कादंबरी लिहिली असली तरी तो विषय देणं आणि त्या विषयासंदर्भात प्रेरणा देणं महत्वाचं असतं. ते काम सुनिल वाडे यांच्या रुपानं झालं. त्यांचे विशेष आभार.
मी यापुर्वी सहासष्ट पुस्तके लिहून प्रकाशीत केलेली असून त्यात कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णनं, नाटूकली यांचा समावेश आहे. मी जास्तीत जास्त कादंब-या लिहिलेल्या असून या पुस्तकाला धरुन ही चाळीसवी कादंबरी आहे. मी esahitya.com या वेबसाईटचे विशेषतः आभार मानतो की त्यांनी माझ्या एकुण सत्तावीस पुस्तका ऑनलाईन केल्या. तसेच विशेषतः विनंती करतो की कोणी प्रकाशक असेल तर सांगावं. कारण माझ्या पुस्तकाला अजूनही बाजारपेठ उपलब्ध नाही. तशी मला एक खंत आहे की मी स्वतः माझ्याकडे असलेल्या तुटपुंज्या पैशात कमी अधीक खर्च करतो व साहित्य वाचकांना पुस्तके देतो. परंतू ते सहज सोपं काम नाही. म्हणून प्रकाशक महत्वाचा की जो बाजारपेठेत माझ्याही साहित्याला स्थान मिळवून देईल.
माझ्या साहित्याबाबत सांगतांना मी एवढंच सांगेन की माझ्या साहित्यात वेगळंच कथानक मांडत असून भन्नाट विषय आणि संशोधन असतं. पालापोचोळा विशेषकरुन नसतोच. काही ऐतिहासीक पुस्तके अशी काढली की ज्यात मला फारच काटकसर करावी लागली व ज्यांचा इतिहास उपलब्ध नव्हताच. जसे. गोविंदा गायकवाड, राजा दाहीर, बाप्पा रावल, सुजाता, शांता, उर्मीला व आता एकलव्य, भानुमती आणि ही कोहीनूर.
कोहीनूरचं कथानकही तेवढ्याच ताकदीनं बनवलं असून तो एक हिरा आहे. जो सध्या भारतात नाही. तो इंग्लंडला आहे. याच विषयावर मी कोहीनूर ही काल्पनीक पुस्तक लिहिली. कथानकानुसार कोहीनूरचा इतिहास काय? कोहीनूरसाठी काय काय करावं लागलं? तो खरंच इंग्लंडमधून भारतात आणला गेला का? वैगेरे प्रश्न आहेत.
वरील प्रश्नांची उत्तरे जर जाणून घ्यायची असेल तर कोहीनूर वाचा व आवर्जून प्रतिक्रिया द्या. रास्त प्रतिक्रिया द्या. कारण तुमच्या रास्त प्रतिक्रियेनं माझ्या अनेक पुस्तका तयार होतील. माझा आनंद द्विगुणीत होईल आणि तुमचाही. कारण तुम्हालाही नवनवीन कथानकासह माझ्या मनातील अनेक विषय वाचायला मिळतील. बाकी काय लिहू. पुनश्च सर्वांचेच आभार. वाचक, प्रकाशक आणि इतर सहकारीवर्गाचं. कृपया आपण ही पुस्तक वाचावी. माहिती घ्यावी आणि माहिती नसेल घेता येत तर केवळ मनोरंजन म्हणून तरी ही पुस्तक वाचावी एवढीच विनंती आहे.
धन्यवाद!
आपला नम्र
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०






कोहीनूर कादंबरी
अंकुश शिंगाडे

"मम्मी, मले कोहीनूर आणून दे." त्या लहानग्या बाळाचं म्हणणं होतं. ते लहानगं बाळ ग्रामीण भागात राहात होतं. त्याला काय माहित होतं की कोहीनूर म्हणजे काय? ते कुठं मिळतं?
कोहीनूर त्याला व्हाट्सअपवर मोठ्या मुलांनी दाखवला होता. तो व्हाट्सअपवर पाहताच त्याच्या त्या अद्वितीय गुणांमुळं तो एखादा चॉकलेटच असावा असं त्या बाळाला वाटलं व तसं वाटणं साहजीकच होतं. म्हणून तो आईसमोर जिद्द करीत होता.
भोळाभाबडा तो मुलगा. तो मुलगा आईजवळ हट्टच करीत होता. तो रडतही होता त्यासाठी. त्याला समजावणं कठीण होतं. कारण कोहीनूर काही खाण्याचा पदार्थ नव्हता. तो एक हिरा होता.
कोहीनूर एक हिरा होता भारतात सापडलेला. परंतू आज त्यालाही गुलाम केलं होतं लोकांनी. प्रत्येक शतकात त्याचा हवा तसा उपभोग घेतला होता प्रत्येक शासकांनी. त्याला ते आवडत नसतांनाही. यातच तो जेव्हा जेव्हा स्री शासकाजवळ गेला. तेव्हा तेव्हा त्या राज्याचा विकासच झाला. कारण स्रिया त्याला मुकूटावर सजवीत व सन्मान देत. परंतू तो ज्या ज्या राजांच्या हाती लागला, त्या राज्याचा त्यानं विनाशच केला. कारण ते बसायच्या सिंहासनाला लावत असत. तो सन्मान नसे कोहीनूरचा. तर त्या सिंहासनावर बसताच कोहीनूरला वाटायचं की हा राजा आपल्याच पाठीवर बसलेला आहे.
ते ग्रामीण भागातील आईजवळ हट्ट करणारे बाळ. आईनं काही त्याला कोहीनूर नावाचं चॉकलेट आणून दिलं नाही. तसा काही वेळानं थकताच तो दमला व रडत रडत झोपी गेला. नाईलाजानं त्याला त्याची इच्छाही मारावी लागली.
तो मुलगा.........त्या मुलाचं नाव गोवर्धन होतं. गोवर्धन लहानाचं मोठा होवू लागला. तो थोडासा मोठा झाला. तेव्हा त्याचं नाव शाळेत घालण्यात आलं. तसं त्याला कोहीनूर म्हणजे काय? हे याही वयात माहित नव्हतं. एकदा वर्गाच्या तासामध्ये त्याच्या शिक्षीकेनी सांगीतलं की कोहीनूर हा एक हिरा आहे व तो इंग्रजांच्या ताब्यात आहे. तेव्हा त्याला माहित झालं की कोहीनूर हे एका हि-याचं नाव. ते जेव्हा त्याला त्याच्या बालवयात माहित झालं, तेव्हा तो त्या हि-याबद्दल माहिती मिळवू लागला.
गोवर्धन एका शेतक-यांचा मुलगा होता. त्याच्या वडीलाजवळ दोनच एकर शेती होती. त्याचे मायबाप गरीब होते. त्यांना त्या शेतीत पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न येत नव्हतं. त्यातच त्या दोन एकर शेतीसोबतच त्याचे मायबाप इंतरांचीही शेती करीत. ती शेती मुक्ताबटईनं करीत असत. तसेच ते कामालाही जात असत इतरांच्या. त्यावर त्यांची गुजराण चालत असे.
गोवर्धन मायबापाचा एकुलता एक मुलगा होता. तो आता शिकत होता शाळेत. हुशारही होता. त्याची कोहीनूरबाबतची जिज्ञासा वाढत चालली होती. तो शाळेतच त्यांच्या शिक्षकांना त्याबद्दल नाना त-हेचे प्रश्न विचारत असे. परंतू त्याच्या शिक्षकांना त्याबद्दल तेवढं फारसं माहित नसल्यानं ते सांगणार तरी कसे. शेवटी ते गप्प राहायचे व गोवर्धनलाच म्हणायचे की असले फालतूचे प्रश्न त्यानं त्यांना विचारु नयेत. त्यानं त्यांचं मस्तक गोंधळतं. त्यामुळं शिक्षकांनी तसं म्हणताच तो अगदी गप्प बसायचा हिरमुसला होवून. कारण त्या लहानशा वयात त्याला शिक्षकांचाही धाकच वाटायचा.
ती शाळा व तो बालवर्ग.........गोवर्धननं शाळेत असे कोहीनूरबाबतचे प्रश्न विचारताच आणि शिक्षकांनी त्याला गप्प करताच तो चूप बसायचा. परंतू त्यावर तो, अख्खा वर्ग हसायचा आणि शिक्षकही हसायचे. शेवटी गोवर्धनला तसं वर्गात घडताच वाईट वाटायचं. त्याचा भ्रमनिराश व्हायचा. अपेक्षा मारल्या जात होत्या. काय करावं सुचत नव्हतं.
ते बालवय.........त्या बालवयात त्याचे मित्रमंडळ रंगीबेरंगी फुलपाखरं मारायची. ते पाहात असतांना गोवर्धनला तसं त्या मुलांनी करणं आवडायचं नाही. त्याला वाटायचं की ह्या फुलपाखरांना विधात्यानं कोहीनूरसारखा रंग देवून पाठवलं असावं. कारण कोहीनूरचं कोणाला दर्शन होत नाही म्हणून. ते दर्शन सर्वांना व्हावं म्हणून ही फुलपाखरं. त्यामुळं त्यांचा जीव घेणं बरोबर नाही. तरीही ती मुलं त्या फुलपाखरांना मारायचीच.
ती मुलं गोवर्धन जे काही बोलतो. त्याला रास्त मानत नव्हती. ती मुलं त्या गोष्टीला महत्वही देत नव्हती. त्यामुळं गोवर्धन जे काही करतो, ते वेड्यागत करीत असून तो वेडाच आहे असं त्याच्या मित्रमंडळींना वाटायचं. शेवटी ते त्याचं बरोबर असले तरी ते त्याला टाळायचे. कारण तो अशाही काही कोहीनूरबद्दलच्या गोष्टी करुन जायचा. ज्या गोष्टी मुलांना कळायच्या नाहीत. त्यामुळं जणू गोवर्धन वेडाच आहे असं त्याच्या मित्रमंडळींना वाटायचं. तसं त्याच्या मित्रमंडळींचं वागणंही साहजीकच होतं.
गोवर्धनच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. कारण त्याच्या वडीलांकडे असलेली शेती ही कमी असल्यानं त्यांचं त्या तुटपुंज्या पैशानं भागत नव्हतं. आज तरीही त्याचे मायबाप त्याला शिकवीत होते.
गोवर्धनची कोहीनूरची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो त्या कोहीनूरची माहिती मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होता. अशातच त्याला कोणीतरी सांगीतलं. कोहीनूर हिरा इंग्रजांनी नेला. जेव्हा भारतावर आक्रमण त्यांनी केलं होतं. अजूनही तो हिरा त्यांच्या ताब्यात आहे.
कोहीनूर .......एका काळात तो भारताची शान होता. म्हणतात की कोहीनूरचा जन्म एका खाणीत झाला. त्या खाणीचं नाव गोलगुंडा. ज्याला आज गोवळकोंडा म्हणतात. ही खाण कर्नाटकात होती.
ज्यावेळी हा हिरा मिळाला आणि त्याचे गुण पाहिले तर तो हिरा भल्याभल्यांना आपले वेड लावत होता. त्याची चमकदार शैली आणि त्यातून निघणारा प्रकाश हा एखाद्या पर्वतासम भासत होता. हा हिरा फारसी व मुघल सल्तनतकडून प्रवास करीत करीत जेव्हा इंग्रज भारतात आले, रुळावले. तेव्हा त्यांच्याकडे गेला नव्हे तर त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी त्याला आपल्या खजिन्यात टाकलं. ही घटना सन १८७७ मध्ये घडली.

************************************************************************************************

हिरा........त्या हि-याच्या मागे आणखी एक कहाणी दडलेली आहे. ती कहाणी अशी.
स्यमंतक मणी........या हि-याला पुर्वी स्यमंतक मणीही म्हणत. हा मणी सुक्ष्म शक्ती प्रदान करतो अशी लोकांची भावना होती. त्यातच हा मणी सांसरीक प्रगतीही करतो असेही लोकं सांगतात. या स्यमंतक मण्याची पुरातन कहाणी पुढीलप्रमाणे आहे.
एकदा जरासंधाच्या सतत युद्धाला त्रासून श्रीक्रिष्णानं आपली नगरी समुद्राच्या मध्यंतरी वसवली व ते तिथं राहू लागले. त्या नगरीचं नाव द्वारकापुरी होतं. या द्वारकापुरीत एक सत्यजीत नावाचा व्यक्ती राहात होता. त्याला अतिशय त्रास होता. म्हणतात की या सत्यजीतनं तो त्रास दूर व्हायला हवा म्हणून सुर्याची आराधना केली. त्यावेळी त्याच्या आराधनेवर प्रसन्न होवून सुर्यानं सत्यजीतला आपल्या गळ्यातील माळ उतरवून दिली. हाच तो स्यमंतक मणी. ज्याला आपण कोसीनूर हिरा म्हणतो.
सत्यजीत जेव्हा सुर्य आराधना समाप्त होताच समाजात विहार करु लागला. तेव्हा ती माळ सत्यजीताच्या गळ्यात चमकती दिसत असल्यानं भगवान श्रीक्रिष्णानं ती मागण्याचा प्रयत्न केला. परंतू सत्यजीतनं भगवान श्रीक्रिष्णाला ती माळ न देता, ती माळ आपला भाऊ प्रसेनजीत याला दिली.
काही आख्यायीकानुसार एक दिवस प्रसेनजीत घोड्यावर बसून वनविहाराला गेला. तेव्हा शिकारीदरम्यान एका सिंहानं प्रसेनजीतला मारुन टाकलं व ती माळ त्यानं आपल्या गृहेत नेली. हे दृश्य अश्वलाचा राजा जांबवतानं पाहिलं. त्याला ते सिंहाचं कृत्य आवडलं नाही व त्यानंही सिंहाला मारुन ती माळ आपल्या ताब्यात घेतली. तोही ती माळ घेवून आपल्या गृहेत गेला. परंतू रस्त्यात जांताना ती माळ तुटली असल्यानं ते मणी जागोजागी विखूरले. हेच आजचे हिरे असावेत. कालपरत्वे त्याचे पाऊस, वादळ, तापमान याचा परिणाम त्या हि-यांवर होवून त्याचे तुकडे झाले असावेत. ते विखूरले असावेत व त्याचे वजनही कमी झाले असावेव ते दुभंगले जावून त्याचे तुकडे अर्थात लहान लहान स्फटीक तयार झाले असावेत. असा अंदाज बांधता येतो. हेच मणी, जे जे मणी ज्या ज्या भागात विखूरले. त्या त्या भागात ते कालपरत्वे मातीत गाडले गेले असावेत. ज्या ठिकाणी आज हि-याच्या खाणी बनल्या आहेत.
प्रसेनजीतला सिंहानं ठार केल्यावर व त्या सिंहाला जांबवंतानं, ठार केल्यावर जो, एक मणी उरला होता. तो जांबवंतानं आपल्या गृहेत नेला होता. इकडे प्रसेनजीत परत घरी न आल्याचे पाहून सत्यजीतला चिंता पडली. त्याला वाटलं की ही मण्याची जी माळ माझ्या भावाला दिली होती. ती माळ श्रीक्रिष्णानंही मागीतली होती. कदाचित क्रिष्णानंच तर ती माळ हस्तगत करण्यासाठी माझ्या भावाला ठार केलं असावं. असं त्याला वाटलं. त्यानंतर विना चौकशी करता त्यानं राज्यात श्रीक्रिष्णाचा अपप्रचार सुरू केला की त्यानं स्यमंतक मणी चोरलेला असून तो मणी प्राप्त करण्यासाठी प्रसेनजीतची हत्याही केली आहे.
ही लोकनिंदा होती. त्यालोकनिंदेतून स्वतःवरील कलंक मिटविण्यासाठी ती मण्यांची माळ शोधण्यासाठी श्रीक्रिष्ण अनेकदा वनात गेला. परंतू त्याला ती माळ काही गवसली नाही. परंतू ते सिंहाचं मारणं आणि सिंहालाही अश्वलाचं मारणं त्याला समजलं. त्यानंतर श्रीक्रिष्ण त्या मण्याचा शोध घेत घेत पाऊलखुणेनं तो जांबवंताच्या गृहेत पोहोचला. तिथे त्यान, पाहिलं की जांबवंताची मुलगी त्या मण्यासोबत खेळत आहे.
श्रीक्रिष्णानं ते पाहताच तो जाबवंताला म्हणाला,
"हा मणी सत्यजीताला सुर्यानं दान दिलेला असून तो सत्यजीताचा आहे. त्यामुळं त्या मण्याचा तोच हकदार असल्यानं त्याला परत करावा. त्यासाठीच मी आलेलो आहे. कारण तो मणी चोरल्याचा आरोप माझ्यावर आहे. त्याला या लोकनिंदेतून मोकळं व्हायचं आहे."
क्रिष्णानं तसं सांगितलं खरं. परंतू ते ऐकल्यानंतरही जांबवंत तो मणी द्यायला तयार नव्हता. शेवटी तो श्रीक्रिष्णाला म्हणाला,
"मणी जर पाहिजे असेल तर युद्ध कर."
श्रीक्रिष्णानं लोकनिंदेतून वाचण्यासाठी जांबवंताशी युद्ध केलं. हे युद्ध एकवीस दिवस चाललं. शेवटी जांबवंत थकला व त्याचा पराभव झाला. शेवटी पराभव होताच जांबवंतानं म्हटल्यानुसार तो मणी श्रीक्रिष्णाकडे सोपवला व म्हटलं की प्रभो, माझी मुलगी ही या मण्याशिवाय राहू शकणार नाही. ती आधीन झाली आहे त्या मण्याच्या. तेव्हा आपण या माझ्या मुलीशी विवाह करा. ती आपल्यासोबत आपल्या राज्यात राहील व त्या मण्यासोबतही. परंतू श्रीक्रिष्ण म्हणाला,
"हा मणी काही माझा नाही. तो सत्यजीतचा आहे. तेव्हा तो माझ्या राजमहालात नाही तर तो मणी सत्यजीतकडे राहील. मी येथून परत जाताच हा मणी त्याला देणार आहे."
श्रीक्रिष्णाच्या बोलण्यावर जांबवंत काय समजायचं ते समजला. मात्र त्याचा नाद सोडून तो म्हणाला,
"जावू द्या प्रभो, मणी तुमच्याकडे राहो अगर न राहो, माझी मुलगी राहू द्या तुमच्याकडे म्हणजे झालं."
श्रीक्रिष्णानं त्या जांबवंताच्या प्रस्तावाचा स्विकार केला व तो मणी आणि जांबवंतीला घेवून आपल्या राज्यात आला.
स्यमंतक मणी घेवून श्रीक्रिष्ण आपल्या राज्यात जेव्हा परत आला. त्यावेळी तो मणी परत करतांना त्या सत्यजीतला त्या मण्याची सत्य कहाणी माहित झाली. तो लज्जीत झाला. त्याच लज्जेतून मुक्त होण्यासाठी त्यानंही आपली मुलगी श्रीक्रिष्णाला दिली. परंतू तो मणी त्यानं आपल्याच जवळ ठेवला. कारण तो मणी श्रीक्रिष्ण स्विकारायला तयार नव्हता.
एकदा श्रीक्रिष्ण इंद्रप्रस्थला गेला असतांना अक्रूर व त्रुतूवर्मा यांच्या म्हणण्यानुसार शतधन्वानं सत्यजीतला ठार केलं व मणी आपल्या ताब्यात घेतला. ही घटना जेव्हा श्रीक्रिष्णाला माहित झाली. तेव्हा तो परत द्वारकेत आला. त्यावेळी तो मणी अक्रूरला देवून शतधन्वा पळून गेला. कारण त्याला भीती होती की श्रीक्रिष्ण आपल्याला ठार करेल व मणी हिसकावून घेईल. शेवटी तेच घडलं. श्रीक्रिष्णानं शतधन्वाला ठार केलं. परंतू मणी काही त्यालाही मिळाला नाही. शेवटी बलराम तिथे पोहोचले, त्यांना श्रीक्रिष्णानं ती गोष्ट सांगीतली. परंतू मणी सापडला नाही हेही सांगीतले. त्यानंतर बलराम प्रसन्न होवून विदर्भात गेले व श्रीक्रिष्ण द्वारकेत. परंतू याहीवेळी मणी लालसेनं, श्रीक्रिष्णानं आपल्या भावाला ठार केलं. हा अपप्रचार होवू लागला.
हाच अपप्रचार.........श्रीक्रिष्ण लज्जीत होवून फिरु लागला. त्यावेळी अचानक नारद तिथे आले. त्यांनी सांगीतलं की तुम्ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा चंद्रमा पाहिला असल्यानं आपल्यावर अशी वेळ आली आहे.
श्रीक्रिष्णानं नारदाला त्यावर उपाय विचारला व नारदानं तो उपाय सांगताच व तो उपाय करताच ते पुढील काळात त्या कलंकातून मुक्त झाले होते.
अक्रूरजीनं हिरा लपवून ठेवला होता. तसे ते सात्वीक स्वभावाचे होते. ती गोष्ट क्रिष्णालाही माहित झाली होती.
तो स्यमंतक मणी जिथे पुजला जात होता. तिथं तो दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसीक व शारिरीक व्यथा आणत होता. जर तो पुरुषांच्या जवळ असेल तर. परंतू स्रियांजवळ असतांना तो मणी वरील सर्व आधारावर व संकटांना मात करुन त्यांचं जीवनच नाही तर राज्यही सुशोभीत करीत होता.

************************************************

स्यमंतक मणी जांबवंताकडून परत आणताच व सत्यजीतचा भ्रम क्रिष्णानं दूर करताच सत्यजीतनं राजगादीवर बसलेल्या उग्रसेन आणि दरबारीगणांना विचारलं की मी काय करावं ज्यानं क्रिष्ण प्रसन्न होईल. तेव्हा सर्वजण म्हणाले,
"आपली मुलगी देवून टाक क्रिष्णाला."
त्यानंतर सत्यजीतनं आपली मुलगी सत्यभामा व स्ययंतक मणी क्रिष्णाला दिली. परंतू क्रिष्ण म्हणाला,
"मी तुमच्या मुलीचा स्विकार करतो. परंतू मण्यांचा स्विकार करीत नाही. तो आपल्याकडेच ठेवा."
त्यानंतर सत्यजीतनं तो मणी आपल्याकडेच ठेवला होता.
सत्यजीतला ठार करताच शतधन्वा तेथून पळाला. त्यानं तो मणी आपल्याकडेच न ठेवता भितीनं तो अक्रूरकडे दिला. ज्यावेळी अक्रूरला माहित झालं की क्रिष्ण इंद्रप्रस्थवरुन द्वारकेत येत आहे, तेव्हा तेही घाबरले. आता आपण क्रिष्णाचा सामना कसे करणार, या भयाने तेही राज्य सोडून चालते झाले. कारण त्यांनी साखरझोपेत असलेल्या सत्यजीतला ठार मारणा-या शतधन्वाला मदत केली होती.
अक्रूर राज्यातून निघून जाताच म्हणतात की द्वारकेत भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी कोणीतरी वयस्क व्यक्तींनं सुचवलं की ज्यावेळी काशीमध्ये दुष्काळ पडला, तेव्हा अक्रूरच्या वडीलांना काशी नरेशनं आपली मुलगी दिली. जिचे नाव गान्दिनी होते. अक्रूरजी हेही त्याचे वडील श्वफल्कचे वारस आहेत. कदाचित ते हा पडलेला दुष्काळही दूर करतील.
श्रीकृष्णानं ते ऐकताच ते अक्रूरकडे गेले. त्यांना आपली कैफियत सांगीतली आणि सांगीतलं की तेही राज्य तुमचंच असून तुम्ही त्या राज्याला संकटापासून वाचवा. मी हवं तर माफी मागतो. श्रीकृष्णाच्या याच वक्तव्यावर विश्वास करुन अक्रूरजी द्वारकेत परत आले. त्यांनी स्ययंतक मणी क्रिष्णाला दिला. परंतू क्रिष्ण म्हणाला,
"अक्रूरजी हा मणी आपल्याकडेच ठेवा. या मण्याचे खरे वारसदार आपणच आहात. आपण सात्वीक आहात. हा मणी आपणच सांभाळून ठेवू शकता." असे म्हणत क्रिष्णानं तो मणी अक्रूरकडे दिला व अक्रूरनही त्या मण्याला सांभाळून ठेवलं होतं.
स्यमंतक मणी.........असे मानले जाते की स्यमंतक मणी अक्रूरजीनं सुर्याला परत केला. परंतू सुर्यानं तो मणी स्वतःजवळ न ठेवता तो कर्णाला दिला व कर्णानंतर तो मणी अर्जुनाला व त्यानंतर तो मणी युधीष्ठीरजवळ आला. तो मणी पुढे पिढ्या दरपिढ्या चालत चालत युधीष्ठीर वारसांकडून मगधचा सम्राट धनानंदकडे आला. त्यानंतर तो सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक व त्यानंतर आलेले गुप्त घराणे. ज्या घराण्याचा प्रमुख होता चंद्रगुप्त. त्यानंतर तो मणी सम्राट हर्षवर्धनकडेही गेला. पुढे हाच मणी मालव्याचा राजा रामदेव याचेजवळ मिळाला. काही लोकं म्हणतात की जेव्हा द्वापरयुग गेलं. कलीयुग आलं, त्या कलीयुगात तो मणी आंध्रप्रदेशातील गोलकुंडाच्या अर्थात गोवळकोंडाच्या खाणीत सापडला होता. कोणी म्हणतात की हाच तो स्वमंतक मणी की ज्याला आज कोहीनूर नाव आहे.

***********************************************

गोवर्धन अभ्यास करीत होता कोहिनूर हि-याचा. कोहीनूर हिरा गोलकुंड्याच्या खाणीत सापडला. जी खाण भारतात आहे, हेही त्याला माहित झालं होतं. याचाच अर्थ कोहीनूर हि-यावर भारताचा ताबा आहे. परंतू तो आता इग्लंडच्या ताब्यात असून तो इंग्लंडनं पळवला हेही त्याला माहित झालं होतं. त्यातच त्याला वाटत होतं की तो हिरा भारतात यावा. त्यासाठी तो अभ्यास करीत होता.
हळूहळू तो मोठा होवू लागला. त्यातच तो शिक्षणही घेवू लागला होता. त्याचं स्वप्न होतं की कोहीनूरला परत आणणं. त्याला वाटत होतं की भारत स्वतंत्र्य झाला. परंतू कोहीनूर काही स्वतंत्र्य झाला नाही. तो अजूनही त्या इंग्रजांच्या गुलामगीरीत होता. कधी सिंहासनात तर कधी महाराणी एलिझाबेथच्या मुकूटाची शान वाढवीत होता.
गोवर्धन कोहीनूर हि-याची माहिती मिळवत असतांना अचानक त्याला माहित पडलं. ते म्हणजे कोहीनूरचं नामकरण. कोहीनूर ज्यावेळी सापडला होता. त्यावेळी त्याला कोहीनूर नाव नव्हतं.
भारतात अनेक हिरे होते. तेही कोहीनूरसारखेच होते. परंतू त्यांना त्यांचं स्वतःचं नाव होतं. परंतू कोहीनूरला स्वतःचं नाव नव्हतं.
ते हिरे होते. ग्रेट मुगल, ओरलोव, द रिजेंट, ब्रोलिटी ऑफ इंडीया, अहमदाबाद डायमंड, द ब्लू होप, आगरा डायमंड, द नेपाल. तसा कोहीनूरही भारतीयच हिरा होता. कोहीनूरसह बाकी सर्वच हिरे विदेशी लोकांनी भारतातून नेले होते.
कोहीनूर हिरा हा जगातील सर्व हि-यांपैकी एक मोठा हिरा होता. ह्या हि-याला कोणीच कधी कोणाला विकले नाही. परंतू तत्कालीन शासकांनी हा हिरा मिळविण्यासाठी लढाया केल्या. त्यातूनच शासकाचा पराभव करुन त्या हि-याचे ते ते मालक बनले होते.
इसवीसनाच्या सोळाव्या शतकात म्हणजेच १५२६ मध्ये बाबर हा आग्रा इथे आला. तेव्हा त्याला तेथील राजा विक्रमादित्यने तो हिरा बाबराला दिला. त्यानंतर बाबरानं हुमायून. त्यापुर्वी त्याला हिराच म्हटलं जात असे. त्यावेळपर्यंत त्याचा रंग पिवळा होता. तसाच तो फारसा चमकदार नव्हता. परंतू नंतर त्याला चमकविण्यासाठी त्याची घसाई करण्यात आली व हिरा चमकला.
बाबराला ज्यावेळी राजा विक्रमादित्यानं हिरा दिला. त्यावेळी त्याला नाव दिलं गेलं होतं बाबरचा हिरा. असं नाव मिळताच त्या हि-याचं नाव पडलं बाबरचा हिरा. हुमायूननंतर हा हिरा त्याचे वारसदार असलेल्या शहाजहान व औरंगजेब यांच्याकडे तो हिरा आला. पुढे इराणचा राजा नादिरशहानं भारतावर आक्रमण केलं व त्यानं आग्रा आणि दिल्ली शहरं लुटली. त्यावेळी त्यानं हा बाबर हिरा व मयूर सिंहासन आपल्या देशात नेलं. त्यानं हा हिरा आपल्या देशात नेताच त्यानं त्या हि-याला पाहिलं.
नादिरशहानं तो हिरा पाहताच व त्याचे चमकणे पाहताच त्याला आश्चर्य वाटलं व त्याच्या तोंडून सहज शब्द फुटले. कोह इ नूर. याचा अर्थ असा होतो, प्रकाशाचा पर्वत. तो हिरा प्रकाशाच्या पर्वतासारखा चमकत होता. बस, तेव्हापासून लोकांनी या हि-याला नाव दिलं होतं कोहीनूर.
इस १७४७ मध्ये नादिरशहाचा खुन झाला. तो खुन अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीनं केला. त्यामुळे आपोआपच तो हिरा अहमदशहा अब्दालीकडे आला. त्यानंतर अफगाणिस्तान मध्ये १८०९ मध्ये गादीवर आलेल्या शाह शुजाला पदच्यूत केले गेले. परंतू शाह शुजा तो हिरा घेवून पळाला. तो भारतात आला. त्यानं पंजाबच्या रणजीतसिंगाची मदत घेतली व १८३९ मध्ये पुन्हा तो अफगाणिस्तानच्या गादीवर बसला. त्यानंतर त्यानं हाच कोहीनूर हिरा रणजीतसिंगाला आदरपुर्वक परत केला. कारण तो हिरा भारतीय आहे. हे शाह शुजाला माहित झाले होते. कोहिनूर हिरा हा पुढे रणजीतसिंगाचा अल्पवयीन मुलगा दलिपसिंग यांच्याकडे गेला. जो अल्पवयीन होता.
इंग्रज भारतात आले. त्यांनी पुढे या रणजीतसिंगाचा लाहोर इथे पराभव केला व त्यांनी हा हिरा १८४९ मध्ये इंग्लंडला नेवून राणी व्हिक्टोरीयाला दिला. सोबतच दलिपसिंगलाही त्यांनी इंग्लंडला नेले होते.
इंग्लंडमध्ये व्हिक्टोरीयाच्या पतीने १८५३ मध्ये या हि-याला पैलू पाडण्याचा विचार केला व त्या नादात या हि-याचे तुकडे तुकडे झाले व हिरा लहान झाला. आज तो हिरा इंग्लंडच्या ताब्यात असून जगाची शान आहे.
गोवर्धनला हि-याचं नाव कसं पडलं. याची माहिती झाली होती. परंतू तो भारतात राजा विक्रमादित्याच्या पुर्वी कोणाकडे होता, ते माहिती पडलं नव्हतं. तसे त्याने बरेचवेळ संदर्भग्रंथ चाळले. परंतू त्याला काहीच माहिती मिळत नव्हती. अशातच त्याच्या हातात एक पुस्तक पडलं. त्या पुस्तकात तेराव्या शतकाचा इतिहास होता.
इस १३२० मध्ये दिल्लीत खिलजी वंश अस्तास आला होता. त्यानंतर मोहम्मद तुघलक दिल्लीच्या गादीवर बसला. त्याला गियासुद्दीन तुघलकही म्हणत. त्यानं आपला पुत्र उलुघ खानला १३२३ मध्ये काकातीय वंशाचा राजा प्रतापरुद्र यांच्याशी युद्ध करायला पाठवले. त्यानं त्याला वारंगलमध्ये झालेल्या युद्धात हारवलं. त्यानंतर त्यानं पूर्ण माल लुटला व तो माल लुटून तो माल दिल्लीला आणला. त्यात कोहीनूर हिरा देखील होता. हा हिरा तुघलकाच्या वंशजांनी सांभाळून ठेवला होता. परंतू पुढे दिल्लीवर बाबराचं आक्रमण झालं व १५२६ मध्ये हिरा बाबराच्या ताब्यात आला.
एवढाच तो इतिहास गोवर्धनच्या हाती लागला होता व तो वाचण्यात आला होता. परंतू त्याचं मन भरलं नव्हतं. त्यानं त्या पुर्वीचाही इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याला आढळलं की इस १२९४ मध्ये हा हिरा मालव्याच्या एका राज्याच्या ताब्यात होता. परंतू मालव्याच्या राजाला त्याची राजगादी जबरदस्तीनं अलाउद्दीन खिलजीला द्यावी लागली व हिरा खिलजी वंशाच्या ताब्यात गेला.
************************************************************************************************

गोवर्धनला कोहीनूरची संपूर्ण माहिती झाली होती. आता तो विचार करु लागला की कोहीनूर आपल्या देशात कसा आणायचा. त्याला वाटत होतं की कोहीनूर हा भारताचाच एक अंग आहे. ते भारतातच परत यावे.
याच बाबतीत विचार करता करता त्यानं विचार केला की कोहीनूरला गत राजकारणी लोकांनी आणण्याचा प्रयत्न केला नाही का? विचार करता करता तो शोधू लागला कोहीनूरच्या परत आणण्यासाठी झालेले प्रयत्न. तसा विचार करता करता त्याला शेरखान आठवला.
शेरखान........ज्यानं फूलन देवीचा खुन केला होता. त्याला तिच्या खुनात शिक्षा झाली होती. तो शिक्षा भोगत असतांना त्याच्या मनात वेगळेच विचार चालत होते. त्यानं कुठंतरी ऐकलं होतं की ज्या भारताचा राजा गतकाळातील एक महान राजा होवून गेला. त्या राजाच्या समाधीला, त्या समाधीचे दर्शन घेतांना विदेशात चप्पलनं मारतात. हा आपलाच नाही तर आपल्या देशाचा अपमान आहे. त्याला असं घडू नये असं वाटत होतं. परंतू त्याच्याजवळ आज उपाय नव्हता. कारण तो तुरुंगात होता आणि तुरुंगात तो शिक्षा भोगत होता आपल्यावरील आरोपाची. विचार करता करता त्यानं योजना बनवली व योजनेनुसार तो तुरुंग तोडून पळाला. त्यानं व्हिसा बनवला व तो थेट योजनेनुसार जिथे समाधी होती पृथ्वीराज चव्हाणची. तिथे गेला.
तिथे जाताच त्यानं ती कबर खोदली व त्यातून त्यानं पृथ्वीराज चव्हाणच्या अस्थी भारतात आणल्या. त्यावेळी त्यानं, मोठी हिंमत दाखवली होती.
गोवर्धन विचार करु लागला कोहीनूरबाबत की कोहीनूर भारतात आणायचा कसा? कोहीनूर आणतांना मोठं संकट आहे. तसं चोरी करणंही पापच आहे. तरीही कोहीनूर आणतांना देशासाठी चोरी केली तरी त्यात वाईट नाही. परंतू यात जीव गेला तर........तर आपलं उद्दीष्ट कसं साकार होईल! त्याच्यासमोर प्रश्न होता. त्याला काय करावे सुचत नव्हते. कारण तो वयानेही लहान होता.
गोवर्धन आज तरुण झाला होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते. तसा तो नोकरीच्या शोधात होता.
देशात बेरोजगारी वाढली होती. देश बेरोजगारीच्या बाबतीत चरणसीमेवर पोहोचला होता. अशातच त्याच्यासमोर कोहीनूरचाही विचार होता.
देशात खाजीकरणाचं वादळ सुरु झालं होतं. वीज, रेल्वे आणि तत्सम क्षेत्राचं आता खाजगीकरण झालं होतं आणि आता शिक्षणक्षेत्रही खाजगी होवू पाहात होते. ती अगदी जमेची बाजू होती. कारण यातून त्या त्या क्षेत्राचा विकास होवू शकतो आणि देशाचाही. असं सरकारला वाटत होतं. कारण त्याचा देशाला कराच्या स्वरुपात फायदा होत होता. परंतू यामधून एक सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे गरीबांची मुलं उच्च शिक्षण घेवू शकणार नव्हती. तसेच खाजगी नोक-याही गरीबांच्या वाट्याला येणार नव्हत्या. जरी त्यांच्यात कौशल्य असले तरीही.......हाच संभाव्य धोका होता देशाच्या खाजगीकरणात.
बेरोजगारी वाढली होती. देश चरणसीमेला पोहोचलेला होता बेरोजगारीच्या बाबतीत. लोकांना शिकावंसं वाटत होतं. लोकं शिकत होते. उच्च शिक्षण घेत होते. परंतू हे शिक्षण घेत होते नोकरीच्या अपेक्षेनं. कोणीही साधा धंदा लावायचा विचार करीत नव्हता. त्यांना असं वाटत होतं की नोकरी करणे हे उच्च शिक्षण घेणा-यांचे काम आणि धंदा करणे हे निरक्षरांचे काम आहे. मग मी जर निरक्षर नाही तर मी धंदा कशाला करु? शेवटी याच प्रश्नांच्या चक्रव्युहात फसून लोकं उच्च शिक्षण तर घेत होते. परंतू नोकरी व्यतिरिक्त इतर कामे करायला धजत नव्हते. मग बेरोजगारी वाढणार नाही तर काय?

************************************************

अलीकडे नोकरीमध्येही स्पर्धा आहेत. नोकरी नोकरी करता करता वय निघून जातं. परंतू नोकरी मिळत नाही. तसेच नोकरी मिळवीत असतांना लाखो रुपये डोनेशन म्हणून द्यावं लागतं. शिवाय शिफारशीही भरपूर लागतात. शेवटी या कितीही शिफारशी असल्या तरी भागत नाही. जवळचा नातेवाईक व जवळची ओळखही असते नोकरी मिळवायला. ती नसल्यानेही नोकरी लागत नाही.
आजच्या परिस्थितीत असा विचार केला तर नोक-याच अलीकडे संपलेल्या आहेत. लोकं उच्च शिक्षण घेत आहेत. परंतू नोकरी न मिळाल्यानं ते आत्महत्याही करीत आहेत. कारण उच्च शिक्षण घेत असतांना घरी आलेली डबघाईची परिस्थिती.
अलीकडचं शिक्षण एवढं महाग झालं आहे की त्याचा विचारच आपण करु शकत नाही. कोणताही मुलगा सहजपणे दहावी, बारावीपर्यंत शिकू शकतो. कारण तेवढं शिकायला तेवढा पैसा लागत नाही. परंतू पुढे मात्र भरपूर पैसा लागतो. कारण सर्व शैक्षणीक संस्था ह्या खाजगी आहेत. याचाच अर्थ असा की मालीक मौजाच्या आहेत. त्या संस्थेचे मालक विद्यार्थ्यांकडून अतोनात शुल्क गोळा करतात नव्हे तर शिक्षण देण्यासाठी व्यापार करतात. मग एवढा पैसा गरीबांजवळ कुठून? तरीही त्यांची मुलं उच्च शिक्षण शिकता यावं म्हणून शिकतात. त्यामुळं आलेली डबघाईची परिस्थिती. त्यातच मुलं शिकली की त्यांना वाटणारी लाज. उच्च शिक्षीत मुलांना कोणतेही काम करायला शरमच वाटते.
विद्यार्थ्यांना शिक्षण शिकतांना शिकायला शिष्यवृत्तीही मिळते. परंतू किती? तिही अत्यल्प अशीच असते. त्या शिष्यवृत्तीनं त्या विद्यार्थ्यांचं पुरेसं शिक्षणच होत नाही.
आज अशा काही बेरोजगाराच्या देशात आत्महत्या सुरु झालेल्या असून त्याचे प्रमाण वाढू नये. यासाठी सरकार प्रयत्नशील नाही. परंतू ते प्रयत्नशील असल्याचा देखावा करीत आहे. त्याच अनुषंगानं त्यांनी नवीन शैक्षणीक धोरण आखलं.
सरकार उच्च शिक्षण तर देत आहे. व्यतिरीक्त सरकार उच्च शिक्षणाबरोबरच तंत्रशिक्षण देत नाही. ज्याला आपण कौशल्याधिष्ठीत शिक्षण म्हणतो ते. त्यामुळं मुलं उच्च शिक्षण शिकतीलच. परंतू ते शिक्षण घेतल्याबरोबर त्यांना कोणतेही काम करायला लाज वाटू नये ह्या बाबतीतील शिक्षण विद्यार्थ्यांना नाही. सरकारचा उद्देश आहे की बेरोजगारांच्या आत्महत्या घडू नये. मग देशातील नोक-यांची 'माय मरो मावशी जगो' अशी अवस्था का असावी? मावशी अर्थात सरकारी नोकरी व माय अर्थात खाजगी काम. सरकार यासाठीच सर्व क्षेत्राचं खाजगीकरण करीत आहे. कोणालाच राग नाही आणि कोणालाच लोभ नाही.
सरकारचा नोकरीसंदर्भात असलेला खाजगीकरणाचा उद्देश अतिशय सुंदर विचार वाटत असून तो विचार देशातील तरुणांमध्ये भेदभाव शिकविणारा उद्देश वाटत नाही. तो सरकारी अन् आम्ही खाजगी. हा जो भेदभाव आहे. तो नक्कीच या उद्देशानं बंद होईल. यामध्ये अनेक फायदे आहेत. प्रत्येक कार्यालयात कामे जोमानं होतील. भ्रष्टाचाराला वावच राहणार नाही. बेरोजगाराच्या होणा-या आत्महत्याही थांबतील. लोकांच्या अनुभवाला व क्रियाशीलतेला प्राधान्य येईल. कुणावर अन्याय होणार नाही वा कोणीही माझ्यावर अन्याय झाला असं वक्तव्य करणार नाही. देशाचा विकास होईल. आपलाही विकास होईल. परंतू यात काही दुष्परिणामही आहेत. गरीबांची मुलं जास्त शिकू शकणार नाहीत. तसेच नातेवाईक व ओळखीच्या माणसांना वरीष्ठ जागा मिळतील. ते नाही शिकले तरी आणि जे शिकले. परंतू ज्यांची ओळख नाही, जे नातेवाईक नाही. अशांना अशा खाजगीकरणाच्या वादळात गुलामासारखं नक्कीच वागवलं जाईल यात काही शंका नाही.
गोवर्धन भरपूर शिकला होता. तो समजदार होता. परंतू तोही सरकारी नोकरीची वाट पाहात होता. परंतू त्याला सरकारी नोकरी लागत नव्हती. काय करावं असं त्याला सुचत नव्हतं. त्यातच कोहीनूरचा विचारही त्याच्या मनात होता.
कोहीनूरचा विचार मनात असतांना त्याला वाटत होतं की आपण इंग्लंडला जावं आणि कोहीनूरला परत मिळविण्याबाबत प्रयत्न करावा. तसा तो कोहीनूरच्या परती निमित्यानं इंग्लंडला जाण्याचा विचार करु लागला.
तो विचार येताच त्याला वाटलं की आपल्याला कोहीनूर मिळविण्यासाठी इंग्लंडला जातांना बराच पैसा लागणार. काय करावं. शेवटी तो पैसा कमविण्यासाठी हि-याला पैलू पाडण्याच्या दुकानात तो कामाला लागला.
गोवर्धनला इतर ठिकाणीही काम मिळू शकत होतं. परंतू त्याला हि-याबद्दलची माहिती जाणून घ्यायची होती. म्हणून तो हि-याला पैलू पाडण्याच्या दुकानात लागला.
या दुकानात हि-याला पैलू पाडण्याचं काम करु लागला. त्यातच तो त्या दुकानात त्या हि-याबाबतचे काही बारकावेही शिकू लागला.
तो कारखाना....... त्या दुकानात खाणीतून सापडलेल्या हि-याला शुद्ध करुन त्याला कसोटीनं बरोबर पैलू पाडून व त्याला घासून त्याला चमकवलं जात असे. तसा गोवर्धन आधीपासूनच हूशार होता. त्यातच तो ती कला लवकरच शिकला. अशातच हळूहळू त्याचेजवळ पैसाही गोळा झाला.
लवकरच त्यानं इंग्लंडला जाण्याची योजना बनवली व त्यानं त्याची रितसर कागदपत्रे तयार केली. तसा तो इंग्लंडला निघाला होता.
तो प्रवास मोठा खडतर होता. परंतू तो प्रवास त्या कोहीनूरच्या हि-यासमोर कठीणाईचा वाटत नव्हता. त्याचा एकच उद्देश होता कोहीनूरला प्राप्त करणं आणि तोही सनदशीर मार्गानं.
इंग्लंडचा प्रवास करीत करीत गोवर्धन इंग्लंडला पोहोचला. त्यानं आपण भारतीय असल्याची नोंद इंग्लंडमध्ये केली व उद्देश सांगीतला की आपण कोहीनूर पाहायला आलो आहे. फक्त आपल्याला तो हिरा भारतीय असल्यानं व त्याची आपल्याला पाहायची उत्सूकता असल्यानं आपण त्याला पाहण्यासाठी आलो आहे. तसा त्याचा उद्देश रास्त उद्देश आहे. दुसरा कुठलाही उद्देश नाही.
तो इंग्लंडमध्ये उतरला. तशी त्याची ओळख एका जेनिफर नावाच्या सुंदर मुलीशी झाली. जेनिफर त्याला बीचवर गवसलेली मुलगी. ती मुलगी सुंदर होती. व्यतिरीक्त तिचा स्वभावही. त्यातच ती घरी एकटीच होती. कारण तिचे मायबाप अकाली मरण पावले होते. आप्तही कधी येत नव्हते आणि ती दुःखीही होती. तसा तो काही दिवस तिथेच रमला.
जेनिफरची जशी गोवर्धनशी ओळख होताच तो तिला त्या बीचवर भेटू लागला. आता रोजच त्याचे भेटणे सुरु झाले होते. तसं तिनं त्याला आपल्या घरीही नेणं सुरु केलं होतं.
तो एकदाचा दिवस. सायंकाळ झाली होती. तसा तो त्या बीचवरच गोवर्धन जेनिफरला भेटला. जेनिफरला गोवर्धन म्हणाला,
"मी कोहीनूरला पाहायला आलो आहे. का तू मला त्याचं दर्शन करवशील?"
"कोहीनूर? कोण कोहीनूर?"
"कोहीनूर......भारतीय वंशाचा हिरा."
"ओहो, ओहो, कोहीनूर. कोहीनूर हिरा. ठीक आहे. परंतू तिथं जाणं सहज शक्य नाही मित्रा. अन् कोणत्याच भारतीय माणसाला तिथं जावू देत नाहीत."
"मग त्यासाठी काय करावं लागेल?"
"तुला नागरीकत्व मिळवावं लागेल इंग्लंडचं."
जेनिफर बोलली व चूप झाली. ते बराच वेळ बोलत होते. तशी रात्र झाली होती आणि आता घरी परतणेही आवश्यक होते. तसा तो जेनिफरला बाय बाय करुन आपल्या घरी परतला.
गोवर्धन घरी परतला. तसं त्यानं रात्रीचं जेवन आटोपवलं व तो बिछाण्यावर आडवा झाला. परंतू आज त्याला झोप येत नव्हती. तो विचार करीत होता की कोहीनूरला पाहण्यासाठी इंग्लंडचं नागरीकत्व हवं. परंतू ते कसं मिळवायचं. तसं क्षणातच त्याला आठवलं व तो विचार आला जेनिफरचा.
जेनिफरचे आईबाबा हयात नव्हते. ते एकदा कार अपघातात मरण पावले होते. ती दुःखी होती. तशी ती कुणाशी तरी मैत्री करण्याची वाटच पाहात होती. परंतू तिला असा कोणी चांगल्या स्वभावाचा व्यक्ती मिळत नव्हता.
तिनं ऐकलं होतं की भारतीय वंशाचे लोकं फारच चांगले असतात व ते चांगल्या विचारांचे असतात. ते सहिष्णू असतात आणि एकमेकांचा आदर करतात. त्यातच ते जेव्हा पती पत्नी बनतात. तेव्हा ते जीवनभर जोडीदाराच्या सोबतीनं राहतात. त्याला कधीच दगा देत नाहीत.
तिनं प्रत्यक्ष अनुभवलं होतं की इंग्लंडचे लोकं हे जोडीदाराशी विवाह तर करतात. परंतू ते जीवनभर सोबत राहात नाहीत. पत्नीशी एकनिष्ठही राहात नाहीत. अनेक पत्न्या करतात. त्यामुळं जेव्हा जेनिफरची गोवर्धनशी ओळख झाली. त्यावेळी त्यानं तो भारतीय आहे असं सांगताच तिला फार आनंद वाटला व ती आनंदाच्या भरात म्हणाली,
"माझ्याशी मैत्री करशील?"
गोवर्धननं जेनिफरचा ऐकलेला प्रस्ताव. त्यातच त्यालाही इंग्लंडमध्ये तसं ओळखीचं कोणीच नव्हतं. तसा तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला,
"होय."
जेनिफरची ती मैत्री वाढत चालली होती. ती त्याला भेटतही होती रोज. परंतू विवाह कर म्हणायची हिंमत ना जेनिफरला झाली ना गोवर्धनला. मात्र मैत्रीच्या भावनेने ते वावरत होते.
आज अंथरुणात असतांना गोवर्धनला विचार आला की जर त्यानं जेनिफरशी विवाह केला तर........तसं त्यानं वाचलं होतं पुस्तकात की विवाह केल्यानं त्या देशातील नागरीकत्व मिळू शकतं. जेनिफर तशीही इंग्लंडची रहिवाशी होती.
त्याच्या मनातील विवाहाचा विचार. परंतू हे जेनिफरशी बोलायचं कसं? ती खरंच विवाह करेल का आपल्याशी की आपली मैत्री तोडून टाकेल? इत्यादी प्रश्न आज त्याच्या मनात होते. काय करावं त्याला सुचत नव्हतं. शेवटी विचार पक्का केला. तुटेल तर तुटेल मैत्री. परंतू जर जेनिफरनं होकार दिलाच. तर कदाचित आपलाच फायदा होईल. आपल्याला इंग्लंडचं नागरीकत्व मिळेल व कोहीनूरला पाहता येईल. तसेच त्याला मिळविण्याचे प्रयत्नही करता येईल.
विचारांचे हे चक्रव्यूह. त्याला त्या चक्रव्यूहानं झोप येत नव्हती. मध्यरात्र उलटून गेली होती.
तो विचार करीतच होता. शेवटी झोप केव्हा आली, ते कळलंंच नाही.
दुसरा दिवस उजळला होता. पाखरांची किलबिल सुरु झाली होती. तसा डोळा उघडला. तशी आठवण आली जेनिफरची. तिला आज केव्हा भेटतो आणि केव्हा नाही असं होवून गेलं होतं. परंतू तो भेटणार कसा? ती तर त्याला सायंकाळी भेटत होती.
आजचा दिवस कंटाळवाणा वाटत होता त्याला. सारखी त्याला जेनिफरचीच आठवण येत होती. तशी सायंकाळ झाली व तो सायंकाळी लवकरच बीचवर गेला. जेनिफर यायचीच होती. तसा तो तिची वाट पाहात बसला.
थोड्याच वेळात जेनिफर आली. तसे ते दोघंही त्या बीचवर गोष्टी सांगत बसले. गोवर्धन तशी संधी पाहातच होता. त्याला विवाहाचं बोलायचं होतं. तशी संधी मिळताच तो जेनिफरला म्हणाला,
"जेनिफर, एक गोष्ट विचारु?"
"विचार. एक नाही, शंभर गोष्टी विचार."
"रागवशील तर नाही?"
"कशाला रागवणार. विचार. अगदी निर्भय होवून विचार."
"तू माझ्याशी विवाह करशील?"
जेनिफर चूप होती. तिच्याही मनात होतं विवाह करायचं. परंतू तिला असं काही वाटलं नव्हतं की तो अचानक तिला विवाहाबद्दल विचारेल. तसं विवाहाबद्दल विचारताच व जेनिफर चूप राहताच तो म्हणाला,
"जेनिफर, तू सांगीतलं नाहीस?"
"इश्य. मला लाज वाटते." असं म्हणत जेनिफरनं दोन्ही हाताचे तळवे डोळ्याला लावले व डोळे झाकून घेतले. तसा तिच्याकडे पाहात व तिचे झाकलेले डोळे हाताने हळूवार उघडत गोवर्धन म्हणाला,
"जेनिफर, रागवलीस."
जेनिफर काहीच बोलली नाही. मात्र तिनं डोळ्यावरील हात बाजूला करीत त्याला घट्ट मिठी मारली व रडत रडत ती म्हणाली,
"ओ माय गॉड, तू माझ्या भावना ओळखल्या. मी तुझे उपकार कसे फेडणार."
तो स्पर्श...... .तो स्पर्श गोवर्धनला सुखकारक वाटत होता. तिनं त्याला घट्ट मिठी मारताच त्यानंही आपला एक हात घट्ट केला व दुस-या हात तिच्या पाठीवर फिरवून तो म्हणाला,
"जेनिफर, तुझ्याशी विवाह केल्याने माझे तीन फायदे होतील. पहिला म्हणजे मला तुझ्यासारखी जोडीदार मिळेल व दुसरा म्हणजे मला तुझ्या घरी राहता येईल. अर्थात हक्काचं घर मिळेल आणि तिसरा म्हणजे मला कोहीनूरचं दर्शन घेता येईल."
जेनिफरनं ते ऐकलं. तशी ती म्हणाली,
"तथास्तू, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील."
जेनिफरनं तथास्तू म्हणत आलिंगण सोडलं. ती हसली. तशी ती म्हणाली,
"तुमच्याकडे तथास्तू म्हणतात ना. मिही तेच म्हटले. हा तथास्तू काय आहे?"
"तथास्तू याचा अर्थ तुझ्यासर्व मनोकामना पूर्ण होवोत."
"ओके ओके. असा त्याचा अर्थ होय तर......."
सायंकाळ केव्हाचीच निघून गेली होती. बरीच रात्र झाली होती. तसा जेनिफरला बाय करीत गोवर्धन निघाला. वाटेत त्याच्या मनात बराच विचार होता. तसा तो त्या अंधाराला चिरत चिरत विचार करीत करीत रस्ता पार करीत होता. त्यातच त्याची रुम केव्हा आली ते कळलंच नाही.

************************************************************************************************

ती रात्र.....त्यानं तिला होकार दिला होता. तिनंही त्याला होकार दिला होता. त्यामुळे दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं.
त्या कित्येक रात्री....त्या रात्री त्यांना झोप घेवू देत नव्हत्या. असं वाटत होतं की दिवस केव्हा उगवतो. परंतू दिवस काही लवकर उगवत नव्हते. त्यातच त्यांचं विवाह करण्याचं ठरलं असलं तरी तो विवाह केव्हा होणार याची चिंता दोघांनाही लागली होती. ते भेटत होते एकमेकांना. परंतू गोष्ट काढत नव्हते.
आज मनात गोवर्धननं विचारच केला होता की ती जेनिफर भेटायला येताच तिला विवाहाचं विचारणे. तसा आज तो लवकर बागेत गेला आणि वाट पाहात बसला जेनिफरची. थोड्या वेळाचा अवकाश. जेनिफर आली.
जेनिफर आली, तसा गोवर्धन तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलायला लागला. तसा आज तो म्हणाला.
"जेनिफर, आपण तर विवाह करायचा ठरवलाय. परंतू आपण केव्हा विवाह करायचा?"
जेनिफर अगदी गप्प होती. तसा गोवर्धन म्हणाला,
"जेनिफर, आपण विवाह केव्हा करावा? तू बोलत का नाहीस?"
"उद्या करावे काय विवाह. तू म्हणत असशील तर उद्याच करायचा."
"जेनिफर, माझं म्हणणं तसं नाही."
"मग कसं? तुला कोणाला बोलवायचे आहे काय?"
"नाही, नाही. एवढ्या दुरुन कोणीच येवू शकत नाही. "
"मग काहीच प्रॉब्लेम नाही तर. उद्या चर्चला ये. करुन घेवू विवाह."
".........." गोवर्धन चूप बसला. तशी ती म्हणाली.
"येशील ना उद्या चर्चला?"
"हो नक्कीच येईल."
तिही रात्र. तिही रात्र, आठवणीचीच रात्र होती. अशातच तिची ती आठवण त्याच्या ह्रृदयात होती. ती आठवण दुस- या दिवसाची वाट पाहात होती. अशाच आठवणीत तो दिवस उजळला होता. त्यामुळे झोपही पुरेशी झालेली नव्हती.
आज तो लवकर उठला. नेहमीप्रमाणे आपल्या देवालयात गेला. त्यानं पुजाविधी केला. तशी दुपार झाली व तो चर्चकडे निघाला.
ती चर्च. त्या चर्चमध्ये काही प्रेमीयुगुल होते. तर काही म्हातारेही. ते एकमेकांशी बोलत होते. एकमेकांची इज्जत करीत होते. अशातच जेनिफरही तिथं पोहोचली. तसा तो म्हणाला,
"जेनिफर, बराच वेळ लावला. कुठं होती एवढा वेळ. अगं मला किती वेध लागले होते तुझे. माहिती नाही तुला."
"हो काय." ती म्हणाली व थोडी हसली.
जेनिफर आली होती. तिच्या जवळ दोन फुलांचे गुलदस्ते होते. त्याला घेवून ती चर्चच्या आतमध्ये गेली. तिथं त्यानं पाहिलं एक दाढीवाला गृहस्थ होता. एक उभी मुर्त होती.
ती येशूची मुर्ती. तशी जेनिफर त्या दाढीवाल्याजवळ गेली. त्याच्याजवळ काहीतरी कुजबुजली. तसं त्यानं त्या दोघांना त्या प्रभू येशूच्या मुर्तीपुढे उभं केलं व तो काहीतरी पुटपुटला. त्यानंतर त्यानं एकमेकांना गुलदस्ते द्यायला लावले. सोबतच अंगठ्या एकमेकांना घालायला लावल्या. तसेच पेढाही एकमेकांना भरवायला लावला. म्हणाला.
"झाला तुमचा विवाह."
गोवर्धनचा जेनिफरसोबत विवाह झाला होता. जेनिफर आता रितीनुसार त्याची पत्नी झाली होती. तसं त्याला घर नव्हतंच. त्यामुळे तो तिच्या घरी राहायला आला.
काही दिवस बरे गेले. तसा त्याला कोहीनूरचा विसरही पडला होता. परंतू एक दिवस त्याला कोहीनुरची आठवण आली व त्याला आठवलं की आपल्याला या देशाचं नागरीकत्व मिळवायचंय. त्याशिवाय आपण कोहीनूर पर्यंत पोहोचू शकणार नाही. तशी आठवण येताच तो कामाला लागला इंग्लंडमधील नागरीकत्व मिळविण्यासाठी.
काही दिवस असेच गेले. गोवर्धननं जेनिफरशी विवाह करताच व काही दिवस मजा मारताच त्याला आठवण आली. ती म्हणजे इंग्लंडमधील नागरिकत्वाची. त्यातच त्यानं जेनिफरशी केलेल्या विवाहाचं प्रमाणपत्र लावून इंग्लंडच्या नागरिकत्वाचं प्रमाणपत्र बनवलं. त्यानंतर तो एक दिवस जेनिफरला म्हणाला,
"जेनिफर, मी आता इंग्लंडचं नागरिकत्व मिळवलं आहे. तू आता एक काम कर. तू आता माझ्या सोबत चल. आपण कोहीनूरला पाहून येवू."
गोवर्धननं तसं म्हणताच जेनिफर त्याच्यासोबत निघाली. तसे ते दोघंही इंग्लंडला ज्या ठिकाणी कोहीनूर हिरा ठेवला होता, तिथे पोहोचले. तिथे कोहीनर हिरा प्रदर्शनाप्रमाणे ठेवला होता. त्यातच त्या प्रदर्शनात पोलिस बंदोबस्त होता. त्यातच तो हिरा दृष्टीक्षेपात येईल, अशाप्रकारे हि-यावर सीसीटिव्ही कैमेरे मारले होते. ते जेव्हा तिथे पोहोचले. तेव्हा फक्त दुरुन त्याला पाहता येत होतं. त्या हि-याला स्पर्श करता येत नव्हता.
गोवर्धननं तो हिरा पाहिला. परंतू तो हिरा पाहताबरोबर तो चक्रावला. कारण तो हिरा चमकत होता आणि त्या हि-यातून लख्खं प्रकाश पसरला होता. ज्या प्रकाशाचा पर्वत तयार झाला होता. असं वाटत होतं की तो प्रकाश त्या हि-याचा नसून जणू तिथं सुर्यच निघाला की काय?
तो हिरा चमकत होता आणि त्यातून रंगीत आभा निघाली होती. तसा तिथं काही वेळानं अंधार झाला.
तिथं अंधार झाला होता. तशी ती अंधारलेली प्रकाशखोली प्रकाशमान झाली होती. त्यातच त्या हि-यातून वेगवेगळे रंगकिरण निघाले होते. तसे गोवर्धनच्या तोंडून शब्द फूटले. 'बापरे!' किती छान हिरा आहे. म्हणूनच याला कोहीनूर म्हणतात. म्हणूनच या कोहीनूरला मिळविण्यासाठी कित्येक राजे शहीद झाले.'
आज कोहीनूर प्रसिद्ध होता आपल्या खास अंगानं. आज त्याचे खास अंग अगदी प्रत्यक्ष पाहण्यावरुन दिसून येत होते. त्याच्या विलक्षण छटा मनाला मोहून टाकत होत्या.
गोवर्धननं प्रत्यक्ष पाहिलं की तो हिरा चोरता येवूच शकत नाही. कारण त्याची सुरक्षाच अशा ढंगानं केली गेली आहे. तिथे पशूपक्षीच नाही तर मुंगीही प्रवेश करु शकत नाही. मात्र एक की तो हिरा बनवता येवू शकतो व त्याचे महत्व कमी करता येवू शकते. तसा तो जेनिफरला म्हणाला,
"जेनिफर, तू यापुर्वी कधी हिरा पाहिला होता का?"
"होय, परंतू बरेचदा नाही. कारण आम्हाला त्याचं महत्व वाटत नाही. कारण आज तो आमच्या देशात आहे."
जेनिफरनं बोलणं बंद केलं. त्याचबरोबर तो विचार करु लागला की जेनिफरचं बरोबर आहे. ज्या देशात जी वस्तू असते. त्या वस्तूचं चेवढं महत्व आपल्याला वाटत नसतं. आमच्या देशातही ताजमहाल आहे. कुतूबमिनार आहे आणि लाल किल्लाही आहे. परंतू आम्हाला त्याचं महत्व पाहिजे तेवढं वाटत नाही. परंतू त्याच जर वस्तू दुस-या देशात असत्या तर त्याचं महत्व विशेष करुन वाटलं असतं. आज आम्हाला अभिमान वाटायला हवा की हा हिरा आमच्या देशातील आहे. परंतू आज हा हिरा या देशात असल्यामुळे त्याचे विशेष महत्व आम्हाला वाटत आहे.
आपण जर असाच हिरा निर्माण केला तर..........तर याचं महत्व नक्कीच कमी होवू शकतं व या देशालाही हा हिरा भारतातून आणल्याची लाज वाटू शकते. परंंतू त्यासाठी आपल्याला पूरेपूर तंत्रज्ञान शिकायला हवं.
कोहीनूर हिरा त्यानं अगदी नजरभर पाहिला होता. तो संपूर्ण डोळ्यात भरवला होता. कारण त्याला तो हिरा बनवायचा होता. तो हिरा......ज्या हि-याला आज जगमान्यता होती.
गोवर्धन जेनिफरला घेवून त्या कोहीनूर हि-याच्या प्रदर्शनीतून घरी आला व त्यानं काच कंपनीत नोकरी पकडली.
गोवर्धननं इंग्लंडमध्ये राहून काच कंपनीत नोकरी पकडली होती. त्यातच ती नोकरी करता करता त्यानं अनेक लोकांशी ओळख केली. तसं पाहता त्या काच कंपनीत काचावर प्रक्रिया करुन नवा काच बनविण्यात येत असे. तसेच रेतीपासून नवीन काच बनविण्यात येत असे.
गोवर्धन काच बनविण्याचं कसब शिकू लागला. त्यातच त्या काचाला हवा तसा आकार देण्याचं कसब शिकू लागला. तसा तो त्या काचात रंग कसा भरायचा तेही शिकला. तसाच त्यानं त्या काचाला कसं चमकवायचं हेही कसब जाणून घेतलं होतं.
गोवर्धन ज्याप्रमाणे काचापासून वस्तू कशा बनवतात. याचं कसब शिकला. त्याचप्रमाणे तो मुख्य म्हणजे तो काच बनविण्यासाठी लागणा-या उपकरणाची नावेही शिकला. ती नावं त्यानं नोंद करुन ठेवली होती.
हळूहळू गोवर्धन काचाला आकार देण्याचं तंत्रज्ञान शिकत होता. काही दिवसानंतर तो त्यात तरबेज झाला होता. काही दिवसानंतर मात्र त्या कारखान्यावर गदा आली.
कारखान्यावर जशी काही दिवसानंतर गदा आली व कारखाना चालेनासा झाला. तसं मालकानं ती कंपनी बंद करायचं ठरवलं. शेवटी एक दिवस त्यानं कंपनी बंदच केली.
कंपनी बंद झाली होती. कंपनी मालकावर उतरती कळा आली होती. त्यातच त्या कंपनी मालकावर कर्जाचे हप्तेही चढत होते. शेवटी कंपनी मालकानं ती कंपनी विकायचं ठरवलं.
कंपनी मालकानं ती कंपनी विकायचं ठरवताच गोवर्धन जेनिफरला म्हणाला,
"जेनिफर, आपण कंपनी घेवूया का?"
गोवर्धननं तसं म्हणताच जेनिफर म्हणाली,
"आपण पैसे कुठून आणणार? अन् आधीच बुडीत असलेली कंपनी पुढे चालेल काय?"
"जेनिफर, ती कंपनी कशी चालवायची. ते मला माहित आहे. परंतू ती कशी घ्यावी हा विचार होता. तू मदत करशील का?"
"कशी करणार!"
"तुझी सर्व मालमत्ता विकून."
"मग आपण राहणार कुठे? खाणार काय?"
"जेनिफर, आपण कारखाण्यात राहू आणि मिळेल ते खावू."
जेनिफरला ती गोष्ट पटत नव्हती. ती नकार देत होती. परंतू पतीची इच्छा. त्या इच्छेपुढं जेनिफरचं काहीही चाललं नाही व तिला तिची मालमत्ता विकायला भाग पाडलं त्यानं.
इंग्लंडमध्ये जेनिफरचं मोठं घर होतं. त्यातच शेतीवाडीही होती. ती सर्व जेनिफरनं विकली व त्यानं त्या कारखान्याचा जो लिलाव झाला. त्यात तो कारखाना विकत घेतला. तसे ते कारखान्यात राहू लागले. त्यानंतर तो कारखानाही सुरु केला गेला. परंतू तो कारखाना आता चालेना, कारण काच बनविण्याचे कारखाने इंग्लंडमध्ये भरपूर होते. त्यातच इंग्लंडमध्ये आर्थीक मंदी आली होती.
गोवर्धनजवळ जेनिफरची मालमत्ता विकून भरपूर पैसा तर आला होता. परंतू जर हा कारखाना चालला नाही तर आपण नक्कीच भिकेला लागू असा विचार करुन गोवर्धन म्हणाला,
"जेनिफर, इंग्लंडमध्ये आर्थीक मंदी आहे. पैसा आपल्याजवळ भरपूर आहे. कारखाना चालत नाही. आपण जर असाच कारखाना सुरु ठेवला तर एक दिवस नक्कीच आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. यावर काही उपाय आहे काय?"
गोवर्धननं विचारलेला प्रश्न. जेनिफर म्हणाली,
"तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण असाच जर कारखाना सुरु ठेवला तर एक दिवस आपल्याला भिक्षा नक्कीच मागावी लागणार. परंतू मला काही यावर उपाय सापडत नाही. हं, एक उपाय आहे."
"कोणता? लवकर सांग." गोवर्धन उतावीळपणानं म्हणाला.
"आपण कारखाना बंद करायचा."
"मग काय करायचं?"
"भारतात जायचं. मला तुमचा भारत पाहायची मोठी इच्छा आहे. दाखवाल ना भारत?"
"वेडी कुठली? मला इथे प्रश्न पडलाय की आता काय करायचं आणि तू मिश्कीलपणा करतेय?"
"हा मिश्कीलपणा नाही. मी अगदी खरं बोलतेय. आपण भारतात जायचं. भारतात एखादा कारखाना उभा करायचा. त्यानंतर कधीतरी येवू इथे. मग इथला विचार करु. तेव्हापर्यंत इंग्लंडमधील आर्थीक मंदीचे सावटही निघून जातील."
"व्वा, भन्नाट युक्ती जेनिफर. आपण तसंच करु. भारतात जावू. तिथे एखादा उद्योग उघडू व पैसे कमवू. मग आपण इथे येवू. त्यानंतर या कारखान्याचं काय करायचं ते करु."
गोवर्धननं तसं म्हणताच तिलाही ती गोष्ट पटली व ती ते सर्व काही तसंच ठेवून भारतात यायला तयार झाली. त्यापुर्वी त्यांनी आपला कारखाना बंद केला होता.
जेनिफरजवळ आजमितीला भरपूर पैसा होता. तो पैसा घेवून ती गोवर्धनसोबत भारतात आली होती. ती त्यावेळी भारतात आली. ज्यावेळी भारतात मंदी नव्हती. काही दिवसानंतर गोवर्धननं आपल्या शेतीतच कारखाना उभा केला. त्यानं त्याच्या गावात चॉकलेट कंपनी उभी केली होती. त्याला नाव दिलं होतं. कोहीनूर चॉकलेट.
कारखान्याला जेनिफरचंच नाव होतं. परंतू कंपनीतून जे चॉकलेट निघायचे. त्या चॉकलेटला कोहीनूर नाव पाहून वेगळंसं नाव वाटून लोकं ती चॉकलेट विकत घ्यायचे. हळूहळू त्यानं लोकांची मांग लक्षात घेता त्याच कारखान्यात बिस्किट व इतर पदार्थ बनवले जावू लागले. त्यालाही नाव दिलं गेलं कोहीनूर.
कोहीनूर नावाचे पदार्थ कारखान्यातून तयार होताच ते कोहीनूर नाव लोकांमध्ये प्रचलीत झालं होतं. कारखाना चांगला चालत होता. कारण लोकांना त्या कारखान्यातील चव चांगली दिसत होती. लोकं आवर्जून त्या कारखान्यातील पदार्थ विकत घेत व ते पदार्थ आवडीनं खात. त्यातच ते नाव फारच प्रसिद्ध झाल्यानं ते त्या कारखान्याचे प्रॉडक्टही विदेशात विकले जावू लागले. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही. इंग्लंडमध्ये तर कोहीनूर नाव असल्यानं लोकं जास्तीत जास्त आवडीनं ते पदार्थ घेत असत. आता गोवर्धननं तो कारखानाही मोठा केला होता.
जेनिफर खुश होती. कारण कारखाना चांगला चालत होता भारतात. सगळं सुरळीत होतं व त्या कारखान्यातील पदार्थही खपत होते. अशातच तिला भारतात असतांना दोन मुलंही झाली. मुलंही लहानाची मोठी होवू लागली.
जेनिफर भारतात खुश होती. मुलं काहीशी मोठी झाली होती. कारखानाही चांगला चालू लागला होता. तोच तिला इंग्लंडची आठवण आली. ती आठवण तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती. तशी एक दिवस ती आपल्या पतीला म्हणजे गोवर्धनला म्हणाली,
"मला, माझ्या मायदेशाची आठवण येते. मी आजपर्यंत बरीच मनात दाबली. परंतू आता मला राहावत नाही. काय करावं?"
"जेनिफर, आता कसं शक्य आहे? आपला कारखाना चालायला लागला आणि आता तूझा मधातच हा उपक्रम. विचार कर. विचार कर की याचा आपल्या धंद्यावर किती परिणाम होईल?"
गोवर्धनचं ते बोलणं. जेनिफर चूप बसली होती. परंतू तिला ती तिच्या मायदेशाची आठवण सतावतच होती. त्यातच त्यांची किरकोळ स्वरुपात भांडणंही व्हायची. सुचायचं नाही, काय करावं ते. तशी एक दिवस ती बोलूनच गेली.
"गोवर्धन मला तुझ्याकडून फारकत हवी. तू तुझं आयुष्य जग. मी माझं. मी इंग्लंडला जाणार."
गोवर्धन चूप बसला होता. त्याला त्या बोलण्यावर काय करावं सुचत नव्हतं. त्याची रोजरोजची भांडणं त्या बोलण्यानं संपली होती.
गोवर्धननं ते बोलणं ऐकलं. तसा तो विचार करु लागला. 'ही जेनिफर, हिला आपण त्रासच द्यायला नको मुळात. कारण याच जेनिफरनं आपलं आयुष्य घडवलं. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर या जेनिफरनं आपल्याशी विवाह करुन आधार दिला नव्हे तर या जेनिफरनं मला हा कारखानाही उभारायला पैसे दिले आणि आता दोन पैसे आले. म्हणून काय तिला आपलं गुलाम करावं काय?'
गोवर्धनचा तो विचार. तो हळूच जेनिफरजवळ गेला. ती बसली होती काहीशी नाराजीतच. तसा त्यानं तिच्या पाठीवर हात ठेवला. तो हात तिनं, अगदी झटक्यानं दूर सारला. परत त्यानं हात ठेवला. पुन्हा तिनं तो हात दूर सारला. तसा तो म्हणाला,
"जेनिफर, काय झालं? एवढ्याशा बोलण्यानं तू नाराज झाली. अगं निराश होवू नकोस. आपण जावूया तुझ्या इग्लंडमध्येच. तिथेच स्थायीक होवूया. परंतू या कारखान्याची बागडौर कुणाच्या हाती देवून. मला माहित आहे की तू माझ्यासाठी किती केलं. घर विकलं आणि शेतीही. परंतू मी तुला वचन देतो की तुझं ते घर आणि तुझी शेतीही मी तुला मिळवून देईल. परंतू मला थोडी सवड दे."
एवढं बोलून होताच जेनिफरचा राग मावळला व तिनं त्याला स्वारी म्हटलं. तसा त्यानं तिच्या पाठीवर हात ठेवला. क्षणातच भावना वळवळल्या व जेनिफरनं त्याला आलिंगण दिलं. त्याचबरोबर ते जुने दिवस आठवले. गत दिवसातही त्या बागेत तिनं विवाहाबद्दल गोवर्धननं होकार देताच असंच आलिंगण दिलं होतं.
ते एकमेकांना बाहूपाशात घेवून घट्ट मिठी मारत होते. तोच त्यांची मुलं आली. त्यांनी आवाज दिला. तोच भानावर येत तिनं त्याचं आलिंगण सोडलं व ती स्वयंपाक करायला आतमध्ये निघून गेली. कारण सायंकाळ केव्हाचीच निघून गेली होती व रात्रही बरीच झाली होती.
ती तिची मायदेशची आठवण. गोवर्धनलाही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच एक दिवस त्यानं तो कारखाना मैनेजरच्या स्वाधीन करुन तो इंग्लंडला निघाला. वाटेत कसं होईल, काय होईल कारखान्याचं हा विचार मनात होताच. तसा तो आज अगदी श्रीमंतही बनला होता.

********************************************************************************

आज गोवर्धन एवढा श्रीमंत बनला होता की त्याचेसाठी इंग्लंड आणि भारत घर अंगणच होतं. त्यातच तो आता त्या स्वरुपानं वावरत होता. तो इंग्लंडला स्थायीक झाला होता.
भारतातील त्याचा चॉकलेटचा कारखाना जोमात चालत होता. त्याच्या चॉकलेटला देश विदेशात चांगली मागणी होती. विशेषतः त्याचं कोहीनूर नाव ठेवल्यानं ते नाव देश विदेशात चालत होते.
ज्यावेळी तो जेनिफरला घेवून इंग्लंडला पोहोचला. त्यावेळी त्यानं तेथे असलेल्या व बंद पडलेल्या कारखान्याची चांगली पाहणी केली. त्या मशीन आज धूळ खात होत्या. काही गंजल्याही होत्या.
तो बंद पडलेला कारखाना आज त्याच्या आगमनाची जणू वाट पाहात होता. त्या कारखान्यात जागोजागी उंदरानं खोदकाम केलं होतं. तसेच काही ठिकाणी कातिणीनं जाळंही पकडलं होतं.
गोवर्धननं त्या कारखान्याची पाहणी करताच त्यानं तो कारखाना मजूरांकरवी आधी स्वच्छ करवून घेतला. त्यानंतर त्या कारखान्यात असलेलं संपुर्ण सामान स्वच्छ धुवून घेतलं. ज्याला गंज चढला होता. त्याला तेलपाणी दिलं. त्यानंतर तिथं पुजाविधी रितीरीवाजानं उरकवला व प्रार्थना केली की हाही कारखाना सुरु व्हायला हवा.
गोवर्धननं त्या कारखान्याची पाहणी केली. तसं त्यानं ठरवलं की आपण हा कारखाना सुरु करावा. परंतू काच तर चालत नाही. काय लावावं? कोणता पदार्थ काढावा यामधून की हा कारखाना चालू शकेल. तसं पाहता चॉकलेटचा कारखाना त्याचा भारतात होताच.
तसा अचानक त्याच्या मनात विचार आला. 'आपण इथे चॉकलेटचा कारखाना उभारला तर........तर कदाचीत तो चालू शकेल. परंतू आपल्या कोहीनूरचं काय? कोहीनूर नावानं आपण प्रॉडक्ट काढलं. परंतू आपण समाधानी आहोत काय? आपण समाधानी केव्हा होणार? वैगेरे प्रश्न त्याच्या मनात होते. आपण समाधानी तेव्हाच होणार. जेव्हा कोहीनूरचं महत्व कमी होणार वा कोहीनूर आपल्या भारतात परत जाणार.'
काय करावं, काय करु नये. या चक्रव्युहात त्याला आठवलं की ह्या कोहीनूरला नेण्यासाठी भारताकडून काहीच प्रयत्न झाले नसेल काय? झाले असेल. परंतू या चालाख इंग्लंडनं आपल्या भारताचे प्रयत्न हाणून पाडले असेल कदाचीत. तसा तो भारतानं कोहीनूरविषयी कोणते प्रयत्न केले. ते शोधू लागला. अचानक त्याला तिही माहिती गवसली. माहितीपुस्तीकेत कोहीनूर हा भारताचा हिरा आहे असे काही राजकारणी म्हणत होते. तर काही राजकारणी कोहीनूर हा पाकिस्तानचा हिरा आहे असं मानत होते. इ स १९७६ मध्ये पाकिस्तानी प्रधानमंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांनी इंग्लंडचे प्रधानमंत्री जिम कैलेघन यांना तो हिरा पाकिस्तानचा असून तो पाकिस्तानला परत करा असा दावा केला. त्यावर पाकिस्तानला तत्कालीन प्रधानमंत्री जिम कैलेघन यांनी नकार दर्शवून तो दावा फेटाळून लावला.
कोहीनूर हिरा हा दोन हजार सात पर्यंत इंग्लंडच्या टॉवर ऑफ लंदन इथे ठेवण्यात आला होता. तो परत करा म्हणून भारतानं अनेक दावे केले होते.
भारतानं केलेला पहिला दावा हा १९४७ ला केला. त्यानुसार १९४७ ला कोहीनूर परत करु असा दावा ब्रिटीशांनी केला होता. परंतू तो कोहीनूर अजूनही त्यांनी परत केला नाही. त्यानंतर १९५३ ला दुस-यांना कोहीनूर परत करण्याबाबत दावा केला गेला. परंतू त्याहीवेळी दावा फेटाळला गेला. त्यानंतर २००० मध्ये पुन्हा एकदा कोहीनूर हि-याची मांग झाली होती. यावेळी सरकारनं ब्रिटीश सरकारला एक चिठ्ठी लिहिली आणि कोहीनूर देण्याविषयी मागणी केली. परंतू ब्रिटीश सरकारनं म्हटलं की या कोहीनूरचा मालक कोणीच नाही. म्हणून तो परत करता येवू शकत नाही. इंग्लंडनं त्यावेळी म्हटलं होतं की हा कोहीनूर एकशे पन्नास वर्षापासून इंग्लंडमध्ये असून तो इंग्लंडचा हिस्सा आहे.
सन दोनहजार दहा मध्ये ब्रिटीश प्रधानमंत्री डेव्हिड कैमरुन हा भारत दौ-यावर आला. तेव्हाही कोहीनूरची मागणी केली गेली. परंतू कैमरुननं म्हटलं की जर हा हिरा आम्ही परत केला तर आमचं संग्रहालय खाली होईल. दोन हजार तेराला जेव्हा हाच प्रधानमंत्री भारतात आला होता. त्यावेळीही त्यानं कोहीनूर हि-याला परत करण्याचा विचार त्यागून म्हटलं की हा कोहीनूर हिरा लाहौर संधीनुसार आमचाच आहे. ज्यावेळी महाराज रणजीतसिंगाचं युद्ध झालं होतं. त्यावेळी त्याच्या पुत्रानं, म्हणजेच दलिपसिंगानं तो हिरा आम्हाला १८५६ ला दिला होता. त्यानुसार तो हिरा आमचाच असून तो आता यापुढे परत करता येणार नाही. तसेच यानंतर आपण तशी कोहीनूरच्या मागणीची यापुढे शिफारसही करु नये वा तशी मागणी करु नये. परंतू भारताचं म्हणणं असं की हा हिरा जेव्हा ब्रिटनच्या महाराण्यांच्या ताजवर दिसतो, तेव्हा आम्हाला तो, आमचा अपमान झाल्यासारखा वाटतो. कारण हा हिरा इंग्लंडनं अतिशय अपमानजनकरितीनं भारतातून नेला. तोही आपल्या पाचवर्षीय राजकुमारला खेळण्यासाठी. परंतू तो कोहीनूर होता. खेळण्याची वस्तू नव्हती वा खेळायला देण्यासाठी तो हिरा नव्हता.
गोवर्धनला माहित झाले होते भारतानं केलेले प्रयत्न. इंग्लंड काही भारताचं ऐकत नाही व भारताला काही कोहीनूर परत करीत नाही हे त्याला माहित झालं होतं. त्यावर काय करावं वा काय करता येईल. याचा तो विचार करीत होता. शेवटी विचार करता करता त्याच्या डोक्यात योजना आली की आपण काचापासून हिरे बनवायचे. कुत्रीम हिरे. जे हिरे पाहताक्षणी कोहीनूरसारखेच वाटतील. त्यातच असे हिरे बनताच व ते हिरे लोकं वापरताच त्या कोहीनूरचं महत्व कदाचीत नष्ट होईल व तो कोहीनूर हिरा सामान्य हि-यासारखा होईल. यामुळं भारतच नाही तर सर्व जगच कोहीनूरला विचारणार नाही वा महत्व देणार नाही.
कोहीनूर बनविण्याची कल्पना....... ती कल्पना त्यानं आपल्या पत्नीजवळ बोलून दाखवली होती. तसेच कोहीनूर हिरा आपल्या भारताला का हवं आहे. याचंही महत्व तिनं पटवून दाखवलं होतं. त्यातच तो हिरा कसा बनविणार, तेही तिला समजावून सांगीतलं होतं. ते तिला पटलं होतं.
कोहीनूरची भारतानं केलेली ब्रिटीशांना मागणी. कोहीनूर भारताचा हिरा असूनही तो पळवून नेणारा ब्रिटन. तो कोहीनूर परत करतांना लाहोरची संधी सांगत होता. आम्ही कोहीनूर पळवून आणला नाही तर लाहोर संधीतून दलिपसिंगानं तो आम्हाला प्रदान केला असं ब्रिटनचं म्हणणं होतं. त्यामुळं तो हिरा आता आपल्याला पुन्हा परत मिळेल. या आशा एकदाच्या मावळल्या होत्या. त्यातच काय करावं सुचत नव्हतं भारताला. अशावेळी भारताचाच एक नागरीक असलेला व सध्या इंग्लंडचं नागरीकत्व प्राप्त केलेला गोवर्धन, ही कोहीनूर परत न होण्याची बाब लक्षात घेवून त्या हि-याचं महत्व कमी करण्याचे स्वप्न पाहात होता. तो विचार करीत असतांना त्यालाही गवसलं होतं की जर आपण त्या कोहीनूरसारखेच दिसणारे हिरे उत्पादित केले तर....... विचाराचा अवकाश तो तसं उत्पादन करण्यासाठी विचार करु लागला. क्षणातच त्याला आठवलं की आपला कारखाना आज धूळ खात पडला आहे. तिथं काच उत्पादन चाललं नसल्यानं आपण तो बंद केला होता. परंतू आता पर्याय म्हणून हा कोहीनूर उत्पादीत करता येईल. तसं पाहता आपल्याला काचाचे पदार्थ बनविण्याचीही युक्ती अवगत आहे.
विचारांचा अवकाश. तो तसा विचार करु लागताच त्यानं ठरवलं की आपण हिरे उत्पादन करायचे. त्याला तसा विचार येताच तो कारखान्यात गेला. पुन्हा लागलेली धूळ स्वच्छ केली व प्रायोगीक तत्वावर त्यानं काचेचा एक हिरा बनवून पाहिला. तसं त्यानं कोहीनूर पाहून तो डोळ्यात भरलाच होता.
गोवर्धननं कोहीनूर हि-यासारखाच दिसणारा हिरा बनवून पाहिला. तो हिरा बनला होता व हुबेहूब तो कोहीनूरसारखाच दिसत होता. मात्र त्यात एक गोष्ट कमी होती. ती म्हणजे तो पाहिजे तेवढा चमकत नव्हता.
गोवर्धन विचार करु लागला त्याला चमकंवायचे कसे? तो प्रश्न त्याच्याही पुढे पडला. तशी पुन्हा तो त्या काचेच्या हि-यावर त्याला चमकविण्यासाठी क्रिया प्रक्रिया करु लागला. परंतू ते काही त्याला बरोबर जमत नव्हतं.
आपण या काचावर क्रिया प्रक्रिया करुनही हा हिरा चमकत नाही असा विचार करुन तो त्यावर अभ्यास करु लागला. त्यातच त्याला गवसलं की हा हिरा गोल न ठेवता त्याला प्रत्येक कोनात दुभंगलं आणि त्यावर न दिसणारा अपारदर्शक पदडा टाकला तर कदाचित त्यावर पडणारे सुर्याचे कीरण हे परीवर्तीत होवून लोकांच्या डोळ्याचा वेध घेतील व तो चमकल्यासारखा दिसेल.
विचारांचा अवकाश.......त्यानं लगेच त्या काचाला षष्टकोनी आकारात तयार केले व त्याच्या आत असा अपारदर्शक पदडा टाकला की तो लोकांना दिसणार नाही. त्यातच त्यावर सुर्याचे प्रकाशकीरण पडताच ते परावर्तीत होवून ते लोकांच्या डोळ्यात जातील व लोकांना तो हिरा चमकल्याचा भाष होईल. तो हिरा बनला होता. परंतू तो हिरा षटकोणी होता. परंतू पुरातन हिरा हा अंडाकार आकाराचा होता. त्यामुळे तो हुबेहूब कोहीनूरसारखा दिसत नव्हता. शेवटी गोवर्धननं त्या षटकोणी हि-याला पुर्ववत ठेवून त्यावर अंडाकार काचेचा लेप चढवला होता. आता तो हिरा हुबेहूब जुन्या कोहीनूरसारखा दिसत होता.
गोवर्धननं केलेली काचावरची ही प्रक्रिया. आता हिरा चमकत होता. परंतू तो एकाच रंगात चमकत होता. बाकीचे रंग दिसत नव्हते. तसा तो पुन्हा विचार करु लागला की वेगवेगळ्या रंगात याला कसे चमकवावे. शेवटी त्यानं प्रयोग करता करता त्या काचेला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रंग दिले. आता तो हिरा वेगवेगळ्या दिशांमध्ये वेगवेगळे रंग दाखवीत होता. मात्र त्याला ते रंग पाहतांना स्वतःला गोलगोल फिरवावे लागत होते किंवा त्या हि-यालाच फिरवावे लागत होते. परंतू यात एक समस्या सुटली नव्हती. ती म्हणजे हा हिरा रात्रीच्या अंधारात चमकत नव्हता.
तो काचेचा हिरा. तो हिरा हुबेहूब कोहीनूर सारखाच बनला होता. परंतू तो हिरा रात्रीला चमकत नव्हता. तसा तो अभ्यास करीतच होता हु-याबाबतचा. कारण त्याला माहित होते की कितीही प्रयत्न केले तरी ब्रिटन कोहीनूर हिरा भारताला परत देत नाही. तेव्हा आपणच त्याच्यासारखा हुबेहूब दिसणारा हिरा निर्माण करुन त्याचं महत्व कमी करावं.
हिरा तयार झाला होता काचेपासून. परंतू तो रात्रीच्या अंधारात चमकत नव्हता. रात्रीच्या अंधारात हि-याला चमकवणारं तंत्रज्ञान पुस्तकात नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. अशावेळी त्याला आठवलं की रात्रीच्या भीषण अंधारातही काजवे आपल्या शरीरातून प्रकाशझोत काढतात. त्यामूळं रात्रीच्या अंधारात काजव्याचा प्रकाश निघतो व चमकल्याचा भाष होतो. परंतू ते काजवे तसा प्रकाश कसा काढतात. यासाठी त्यानं काही काजवे पकडले व ते काजवे एका काचेच्या भरणीत ठेवून त्याचं रात्रीच्या वेळी निरीक्षण करु लागला. परंतू ते काही जमलं नाही. त्याला ते तंत्रज्ञान समजूच आलं नाही. शेवटी त्याला आठवलं की रेडीअम नावाचा घटक हा रात्रीलाही चमकतो. अगदी अंधारातही चमकतो. शेवटी त्यानं ह्या रेडीअम पदार्थाचा वापर हि-यात करायचं ठरवलं व तो यशस्वी झाला. आता तो हिरा रात्रीलाही अंधारात चमकत होता. आता तो दिवसाही चमकायचा व रात्रीच्या अंधारातही. तो काचेचा हिरा बनावटी का असेना, पुर्ववत असलेल्या कोहीनूरसारखाच वाटत होता.
गोवर्धननं हा काचेपासून बनविलेला हिरा अगदी हुबेहूब कोहीनूरसारखाच दिसत होता. त्यातच त्या हि-याचे पूर्ण गुण त्याच्यात होते नव्हे तर तो हिरा तयार होताच तो आपण कसे तयार केले. हे तंत्रज्ञान त्यानं एका वहीत टिपण म्हणून लिहून ठेवले होते. आता त्यानं विचार केला की आपण असे हिरे तयार करावेत आणि हे हिरे जगात पसरवावेत. जेणेकरुन ब्रिटनमधील कोहीनूरचे महत्वच कमी होईल.
************************************************************

गोवर्धननं हिरा बनवला व त्याचे तंत्रज्ञानही आपल्या पत्नीला जेनिफरला सांगीतले. तसं तिला ते तंत्रज्ञान आपण एका वहीतही लिहिले आहे असंही सांगीतलं होतं. ती वही त्यानं आपल्या पत्नीलाही दिली. परंतू ना तिनं त्या गोष्टीकडं लक्ष दिलं ना त्या टिपण वहीकडं. ती वही तिनं, एका अडगळीच्या पेटीत टाकून दिली. तसे काही दिवस बरे गेले.
आपण हा हि-याचा कारखाना सुरु करावा असा तो विचार करु लागला. त्यातच त्यानं ठरवलं की आपण एकदा भारतात जावून कोहीनूर चॉकलेटचा कारखाना पाहून यावा. त्यानंतर परत इंग्लंडला आल्यावर आपण या हि-याचा कारखाना उभारावा.
त्यानं तसं आपल्या मनात ठरवताच तो भारतात यायला निघाला. परंतू दुर्दैवच होतं ते. तो भारतात यायला निघाला खरा. परंतू त्या विमानाला अपघात झाला. अगदी उंचावर अपघात. त्यातच तो मरण पावला की नाही हे कळलंच नाही. कारण सर्वांची प्रेतं सापडली. त्याचं प्रेत सापडलं नाही.
निसर्गाचा चमत्कारच तो. तो वाचला होता की नाही हे काही समजले नाही. परंतू तो सापडला नव्हता. त्याचं प्रेतही नाही. त्यामुळं साहजीकच तो मरण पावल्याची पुष्टी झाली.
त्या विमानाला अपघात झाल्याची घटना सा-या जगात पसरली. त्यातच गोवर्धनही मरण पावल्याची गोष्ट सा-या जगात पसरली. त्याचबरोबर त्याचं तंत्रज्ञानही त्याच्या मृत्यूसोबत दफन झालं होतं. ती घटना अतिशय दुखद होती. काचेपासून निर्माण होणा-या कोहीनूरचं तंत्रज्ञान त्याच्या मृत्यूबरोबर दफन होताच ते जगाच्याही दृष्टीकोनातून आणि नजरेतून निघून गेलं होतं. तसं सर्वात जास्त दुःख जेनिफरला झालं होतं. कारण तो तिला जेव्हा भेटला होता. तेव्हा तिला मायबाप नव्हते. ते मायबापाचं प्रेम त्यानं तिला दिलं होतं.
जेनिफरचं निरतिशय प्रेम होतं त्याचेवर. तिला भारत पाहण्याची जी अगदी लहानपणापासून इच्छा होती. तिही पूर्ण झाली होती. तिला आजपर्यंत कोणतीच चिंता नव्हती. कारण कोहीनूर बिस्कीट व चॉकलेटचा कारखाना तोच सांभाळत होता आजपर्यंत. आता तो कारखाना तिलाच सांभाळावा लागणार होता. तिलाच सगळीकडं लक्ष द्यावं लागणार होती.
ती आता चिंतेत होती. सारखी त्याची आठवण येत होती तिला. ती पहिली भेट. ते मिलनाचे प्रसंग सारंच आठवत होते तिला.
काळ हळूहळू सरकत होता. तशी ती हळूहळू त्यालाही विसरली. त्यासोबतच त्यानं सांगीतलेलं तंत्रज्ञानही. मुलांना मोठं करता करता तिकडं लक्षच गेलं नाही. त्यातच त्या कारखान्याकडही. मात्र त्या कारखान्यानं तिला दगा दिला नाही. तो काचेचा कारखाना आज तिच्या येण्याची वाट पाहात होता.
तिची ती मुलं. गोवर्धन पासून झालेली. वैधव्याचं जीणं ती जगली. तिथं पती मरण पावल्यानंतर दुस-या विवाहाचं प्रावधान असूनही तिनं पुनर्विवाह केला नाही नव्हे तर एखादा मदतीसाठी तिनं कोणी सोबतीही पकडला नाही. ती अगदी भारतीय तत्वज्ञानानुसार व संस्कारानुसार जगली. त्याची आठवण करीत करीत.
तिची मुलं इंजिनीअर झाली होती. ती नोकरीला लागली होती. तशी ती घरी एकटीच राहात होती. मुलं कामाला जात होती.
एक दिवस ती अचानक बसली असतांना ती कोणतीतरी वस्तू पाहण्यासाठी काहीतरी शोधत होती. अशातच तिचं लक्ष त्या पेटीकडं गेलं. ज्या पेटीत ती वही होती. शोधता शोधता तिला ती वही सापडली. ज्या वहीत काचेपासून हिरा कसा तयार करायचा. याचं तंत्रज्ञान व पद्धत लिहिली होती.
जेनिफरच्या हातात ती वही लागताच तिनं त्या वहीचं वाचन केलं. त्या वाचनानुसार तिच्या गतकाळाच्या आठवणी ताज्या झाल्या.
ती वही वाचतांना येणा-या आठवणी. ती वाचत असतांना तिला आठवत होता तो प्रयोग. काचेचा हिरा आपण कसा बनवला हे सांगीतलं होतं त्यानं नव्हे तर त्यानं तिला प्रत्यक्ष तो हिराही बनवून दाखवला होता आणि सांगीतलं होतं की आपण त्या कोहीनूरसारखाचा हिरा बनवणार आणि या इंग्लंडमधील कोहीनूरचं महत्व कमी करणार. कारण कोहीनूर हा भारतीय हिरा असून त्याची मातृभुमी भारतीय आहे. तो भारतातच असावा. परंतू इंग्लंड ते मानत नसल्यानं नाईलाजानं आपल्याला असा काचेचा बनावटी हिराही बनवावा लागत आहे. काय करावं उपाय नाही.
तिची ती गतकाळातील आठवण ताजी झाली. तिला आज गोवर्धन आठवायला लागला. त्यातच ते तंत्रज्ञानही. काल जीवंत असेपर्यंत गोवर्धनचं तंत्रज्ञान तिला आवडत नव्हतं. परंतू आज तो जगात नसल्यानं तिला तो आवडायला लागला होता.
क्षणातच ती पुस्तक वाचतांना जसा गोवर्धन तिच्या नजरेखालून गेला. तसं ते तंत्रज्ञानंही. त्या बारीक सारीक गोष्टी त्याला आज आठवायला लागल्या होत्या. त्यातच आठवत होती ती मुले. गोवर्धन मरण पावल्यानंतर तिनं कसं त्या मुलांना लहानाचं मोठं केलं, ते यथोचीत आठवत होतं.
हळूहळू सगळी पुस्तक तिनं पालथी केली. त्याचबरोबर ती आपल्या कारखान्याकडं वळली. आज दोन्ही मुलं तिची नोकरीवर गेली होती.
तशी ती सर्वांना नोकरीवर जावू देवून आज ती कारखान्यात जाणार होती. त्यासाठी ती, ती मुलं नोकरीवर जाण्याची वाटच पाहात होती.
मुलं नोकरीवर निघून जाताच ती तातडीनं उठली. तिनं कारखान्यातील कुलपाच्या किल्लीचा तातडीनं शोध घेतला. तसा तिनं ड्रायव्हरला आवाज दिला व ती त्या कारखान्याच्या दिशेनं निघाली. क्षणातच तो कारखानाही आला होता.
तो कारखाना..........ती त्या कारखान्याचं गंजलेलं कुलूप काढून हळूच ती कारखान्यात शिरली. तसा तो कारखाना तिची वाटच पाहात होता नव्हे तर जणू तिला आवाज देत होता. असं तिलाही वाटत होतं. हळूच ती कारखान्यात शिरली व शिरता बरोबर तिला जाणवलं की त्या कारखान्यात गोवर्धनची आत्मा असून ती आत्मा तिला आवाज देत आहे. म्हणत आहे की हा कारखाना सुरु कर.
जेनिफर कारखान्यात शिरली. तिनं पाहिलं की त्या कारखान्याला कातिणीचे जाळे पकडले आहेत व सर्वत्र धूळ साचली आहे. आजुबाजूला उंदरांनी उकीरडे काढलेले असून भिंती जागोजागी खचलेल्या आहेत. काचावरही धूळ साचलेली आहे.
जेनिफरनं कारखाना पाहिला व तिनं ठरवलं की आपणही कारखाना सुरु करायचा. तिनं त्यासाठी मजूर लावून मजूरांकरवी तो कारखाना स्वच्छ केला. त्याच्या खचलेल्या भिंतीची डागडूगी केली. तसेच जाळे काढले. काही ठिकाणचे उंदरांचे उकीरडे साफ करुन त्या जागेवर सिमेंटचं खडीकरण केलं. कारखान्यातील मशिनीला तेलपाणी लावून मशिनी अद्ययावत केल्या. तसा तो कारखाना उत्पादनासाठी सज्ज झाला.
तिनं त्या कारखान्याची डागडूगी करीत असतांना आपल्या मुलांनाही तिनं कारखान्यात नेलं. तो कारखाना त्यांना दाखवला व त्या कारखान्याविषयी असलेलं त्यांच्या वडीलाचं मत सांगीतलं. ते ऐकताच तो कारखाना चालविण्यासाठी जेनिफरनं आपल्या मुलांची मानसीक तयारी करुन घेतली होती.
कारखाना सुरु करण्यापुर्वी तिनं, आपल्यालाही खरंच काचापासून हिरा तयार करता येतो का हे तपासून पाहिलं होतं. त्याचं प्रात्यक्षीक तिनं केलं होतं. ते प्रात्यक्षीक तिला जमलंही होतं. तसं प्रात्यक्षीक तिच्या मुलांनीही करुन पाहिलं होतं. त्यांनाही ते जमलं होतं. तिला आठवत होतं ते तंत्रज्ञान. त्यातच त्या तंत्रज्ञानानुसार त्याचं बोलणंही आठवत होतं की आपल्याला हिरा बनवायचाय. त्यानुसार तिलाही वाटलं की आपल्या पतीची इच्छा अधूरी असून आपण जेव्हा काचेपासून हिरा बनवू. अगदी हुबेहूब कोहीनूरसारखा. तेव्हाच आपल्या पतीच्या आत्म्याला ख-या अर्थानं शांती मिळेल. त्यासाठीच ती हिरा तयार करणार होती.
थोड्याच दिवसात तिनं तो कारखाना सुरू केला व तिला अवगत असलेल्या तंत्रज्ञानानुसार कोहीनूरसारखेच दिसणारे हिरे, ती काचांपासून तयार करु लागली व थोड्याच दिवसात ते हिरे प्रचलीत झाले. कारण ते हिरे जरी मुळ कोहीनूर नसले तरी हुबेहूब कोहीनूरसारखेच होते. आता ते हिरे सर्वसामान्य जनमाणसंही अगदी आवडीनं घेत होते नव्हे तर आपल्या टोपीवर, खिशावर आवडीनं मिळवीत होते. त्या हि-याचे आकारही लहानमोठे होते.
आज ब्रिटनमध्ये, असलेला कोहीनूर हिरा पाहिजे त्या प्रमाणात पुर्वीपेक्षा जास्त प्रमाणात चमकत नव्हता. कारण त्याचा आकार बदलला होता. त्याला अंडाकृती आकार आला होता. अल्बर्ट कैमरुननं त्याचा आकार बदलवला होता. तसेच त्याचा आकारही लहान केला होता. त्यानंच त्या हि-याला अंडाकृती आकार दिला होता. तसेच त्यानंच भारताला तो न देण्याचं वक्तव्य केलं होत.
आज गोवर्धन व जेनिफरच्या कारखान्यातून लहानमोठे हिरे बनत होते. ते हुबेहूब कोहीनूर सारखे. हळूहळू जेनिफरचे ते हिरे ब्रिटनच्या बाजारात रस्त्यारस्त्यावर, गल्लीगल्लीत विकले जावू लागले. त्यातच ते कोहीनूरसारखे दिसत असल्यानं त्याला विशेष मागणी होती. तसे ते हिरे ब्रिटनबाहेरही विकले जावू लागले होते.
जेनिफरच्या हि-याचा व्यापार चांगलाच वाढला होता. तिचे दोन्ही मुलं तिच्याच कारखान्यात काम करीत होते. हिरे ब्रिटनबाहेरही विकले जावू लागले होते. त्यातच त्या ब्रिटनमध्ये असलेल्या कोहीनूर हि-याचं महत्व कमी झालं होतं. कारण जेनिफरनं त्या हि-याला कोहीनूरच नाव दिलं होतं.
हळूहळू ब्रिटन सरकारला माहित झालं की जेनिफर कोहीनूरला अगदी साजेसा, त्याचेच परिपुर्ण गुण असलेला हिरा काचेपासून तयार करीत असून त्या हि-याला विशेषतः ब्रिटनमध्येच नाही तर ब्रिटनबाहेरही मागणी आहे. असंच जर सुरु राहिलं तर उद्या भारतातही हे काचेचे हिरे जातील व भारतासमोर आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल. शेवटी विचारांचा अवकाश. ब्रिटन सरकारनं, एका पत्रकाद्वारे जेनिफरला सांगीतलं की तिनं ह्या काचेच्या हि-याचा व्यापार बंद करावा. कारण ती निर्माण करीत असलेला हिरा हा कोहीनूर सारखाच असून त्यानं त्यांच्या देशातील कोहीनूरचं महत्व कमी केलेलं आहे. ते महत्व तेव्हाच वाढेल, जेव्हा तसे हिरे बनवणं जेनिफर बंद करेल. ही हिरे बनविण्याची गोष्ट संदिग्ध वाटत आहे आणि ती देशहिताच्या दृष्टीनं अतिशय हानीकारक आहे.
सरकारचं ते पत्र. पत्र पाहताच जेनिफरनं अतिशय हिमतीनं सरकारला पत्राचं उत्तर दिलं. उत्तरात लिहिलं की व्यापाराचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार देशविरोधी वस्तूंचं उत्पादन करणं. त्या वस्तू विक्री करणं. जसे. ड्रग्स, अफीमची विक्री. ज्यामुळं मुलं बिघडतात व त्याच्या सेवनानं आपल्या आयुष्याचं नुकसान करुन बसतात. जो व्यापार खरंच देशविरोधी असतो. त्यानंतर व्यापाराचा दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे देशाच्या हिताच्या दृष्टीकोणातून केलेला व्यापार. ज्या व्यापारातून देशाचं महत्व वाढवणं हा उद्देश असतो. कोणताही व्यापार हा व्यापार असतो. जो व्यापार देशाचा दर्जा आणि महत्व वाढवीत असतो. त्याला देशविरोधी व्यापार म्हणता येत नाही. आपला व्यापार हा देशविरोधी नसून देशाला हितकारक ठरणारा असाच व्यापार आहे. आपण माझ्या व्यापाराला देशविरोधी ठरवू नये.
जेनिफरनं सरकारच्या पत्रावर दिलेलं प्रतिउत्तर, ते सरकारला पसंत पडले नाही. त्यातच सरकार आपल्या मतावर ठाम होतं. ते म्हणत होतं जेनिफरला की तिनं तो हि-याचा कारखाना बंद करावा. परंतू तिही काही ऐकत नव्हती सरकारचं. तिला वाटत होतं की आपण कोणताच गुन्हा केलेला नसून आपण सरकारच्या मतानुसार चालू नये. व्यापार करणे हा गुन्हा आहे. परंतू जो व्यापार देशविरोधी आहे. आपण असा देशहिताला घातक अशा कृत्यातून व्यापार करीत नसून आपला व्यापार हा रास्त आणि विधायक स्वरुपाचा आहे.
जेनिफरचा तो विचार. तो सत्य विचार होता. त्यामुळं जेनिफरनं काही हार मानली नाही. शेवटी जेनिफरनं त्या सरकारचं न ऐकल्यानं त्या सरकारनं तिच्यावर ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल केला व त्यानंतर तिचा व्यापार रास्त असूनही तिला जबरन न्यायालयात ओढलं गेलं.
जेनिफरच्या विरोधात ब्रिटनमध्ये खटला दाखल झाला होता. ती खटला लढणार होती नव्हे तर लढायला तयार झाली होती. फैरीच्या फैरी झडत होत्या. तारीखवर तारीख सुरु होती. तसं पाहता सरकारही त्यांचच होतं आणि न्यायालयही त्यांचंच होतं. शेवटी पराभव तो होणारच. त्यामुळं शेवटी निकालही त्यांच्याच बाजूनं लागला. न्यायालयानं निकाल दिला की जेनिफरनं आपला कारखाना बंद करावा. कारण तिनंं केलेली कृती योग्य नाही. ती कृती देशहिताच्या विरोधी आहे.
न्यायालयानं दिलेला निकाल पाहता जेनिफरनं कारखाना अतिशय दुःखद अंतःकरणानं बंद केला. ज्यावेळी तिनं तो कारखाना बंद केला होता. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती आठवण होती गोवर्धनची. ज्याची अजूनही इच्छा पूर्ण झाली नव्हती.

************************************************************************************************

भाग दुसरा

जेनिफरनं न्यायालयाचा निकाल पाहिला. तो तिच्या विरोधात लागला होता नव्हे तर लावला गेला होता. कारखाना बंद झाला होता. इंग्लंडमधील तिच्या उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं होतं. त्यातच भारतात तिचा कोहीनूर बिस्कीट आणि कोहीनूर चॉकलेटचा कारखाना होता. तेथूनही तूटपुंजा पैसा येत होता. मैनेजर म्हणत होता की तोही कारखाना आता चालत नसून तोही कारखाना बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कारखाना बंद झाला होता. याचा धक्का तिच्या मुलांना बसला. तिही आता व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळं तिला काय करावं सुचत नव्हतं. जवळ होता नव्हता, तेवढा पैसा संपत आला होता. पूर्ण पैसा तिनं कोहीनूरसाठी लढलेल्या खटल्यात गमावला होता. कारण त्या इंग्लंडमध्ये न्यायाधीशानं तिला दंड जबरदस्त आणि जबरदस्तीनं लावला होता.
खटला हारल्याचा वैताग तिच्या मुलांना आला होता. एकंदरीत सांगायचं झाल्यास ती हताश झाली होती व तिला काहीही सुचेनासं झालं होतं. शेवटी तिनं निर्णय घेतला. आपण भारतात परत जावं. इथं राहून काही उपयोग नाही. तसे तिला ते जुने दिवस आठवले.
गोवर्धन सांगत होता त्या भारतभुमीची कहाणी. तो भारतदेश कसा आहे. याचा परिपाठ नव्हे तर इतिहास त्यानं पुर्णपणे तिच्यासमोर उलगडून टाकला होता.
भारतभुमी........भारतभुमी ही देवादिकांची भुमी होती. तेथील लोकं आधीपासूनच मुर्तीपूजक होते. त्यातच ते सहिष्णू होते. इथे सर्व धर्म आधीपासूनच एकत्र नांदत होते. तसेच येथील धर्म प्राचीन होते. त्या त्या धर्मानं आपल्या आचरणानं विदेशातही मजल मारली होती. इथे मुख्यतः हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, मुस्लीम व पारशी असे वेगवेगळे धर्म आजही गुण्यागोविंदानं नांदतात हेही तिला गोवर्धनमुळं ज्ञात झालं होतं.
येथील लोकं शांत होते. युद्धही लढले असतील, परंतू ते लोकं विदेशी लोकांबद्दल आदर बाळगून होते. ते शूरवीर होते. काटकही तेवढेच होते. ज्या ज्या वेळी विदेशी लोकांनी आक्रमण केलं, त्या त्या वेळी त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता ते लढले होते व आपले प्राण गमावून बसले होते. परंतू त्यांनी शरणागती स्विकारली नव्हती.
येथील स्रियाही काटकच होत्या. त्यांनीही जोहार केला होता. परंतू स्वतः कोणत्याही राजांपुढं शरणागती पत्करली नव्हती.
भारत आपल्या दर्शन, कला, संगीत, नृत्य व पर्यटन क्षेत्रात प्रसिद्ध होता. इथे महिला आणि पुरुषांना समान स्थान होते. अगदी आदि काळापासून. येथील स्रिया गार्गी, मैत्रेयी व अहिल्या फारच गाजल्या होत्या.
गोवर्धननं सांगीतलं होतं की आमच्या मातृभुमीनं आम्हाला झाडं, झुडपं, झरे, नद्या पर्वत आणि पशूपक्षी भेट म्हणून दिलेले असून इथे आम्हाला कोणाचीच भिती नाही. आमचा भारत आसेतूहिमाचल म्हणजे कन्याकुमारीपासून तर हिमालय पर्वतापर्यंत पसरलेला आहे असे सांगीतले होते. तसेच ह्या हिमालय पर्वताला पूर्ण जग ओळखतं हेही सांगीतलं होतं. इथे असलेला माऊँट एव्हरेस्ट पर्वत जगातील सर्वात उंच पर्वत आहे, हेही सांगीतलं होतं. तसेच ह्या हिमालयाचा काही भाग वर्षभरच बर्फाच्छादीत राहात असून तिथे अनेक साधू व संत तपश्चर्या करतात हेही सांगीतलं होतं. गोवर्धननं सांगीतलेल्या कितीतरी गोष्टी तिला आठवत होत्या.
भारतातील तिनही भागाला समुद्र आहे, दक्षीण भागास भारतीय महासागर, पुर्वेला बंगालची खाडी व पश्चीमेला अरबी सागर असून आमच्या भारतात आजही अनेक मंदिरं आहेत. कोणार्कचं सुर्यमंदिर हे जगातील शान असून तुमच्या या कोहीनूरला याच सुर्यानं दान दिलं असा आमचा इतिहास सांगतो. आमच्या भारतात आजही जगप्रसिद्ध आग्रयाचा ताजमहाल आहे. तसेच येथील कुतूबमिनार, लालकिल्ला, सोमनाथ मंदिर ही येथील शान आहे. ज्या सोमनाथ मंदिराला तुमच्या विदेशी लोकांनी कित्येकदा लुटून नेलं.
आमच्या भारतावर सिकंदरापासून तर आजच्या तुमच्या इंग्रज लोकांपर्यंत कित्येकांनी लुट लुट लुटलं. परंतू आमच्या देशातील खजिना काही कमी झाला नाही. तुम्ही आम्हाला लुटता, हे माहित असूनही आम्ही त्यापासून बोध घेतला नाही. कारण आमच्यात दया आणि माणूसकी आहे. आम्ही कित्येकांची दया घेतो. त्यांना राहायला जागा देतो. त्यांना खायचं प्यायचं पुरवतो. आमच्या भारताचा अभ्यास करण्यासाठी तर कित्येक विदेशी आले आणि वर्णन लिहून गेले. ते वर्णन वाचूनच तुमच्या देशातील लोकंही व्यापारी म्हणून आले आणि आमचा मायदेशचा असलेला कोहीनूर लुटून नेला.
गोवर्धन सांगत होता तिला की कोहीनूर आज तुमच्याकडे आहे, म्हणून एवढे वर्ष तरी सुरक्षीत राहिला. नाहीतर तो भारतात असता तर येथील लोकांनी त्याला केव्हाच विकून टाकलं असतं एखाद्या राष्ट्राला. ज्याचा कधीच अता पताही लागला नसता. तसं पाहिलं तर आम्ही कोहीनूर तुम्हाला मागू नये. परंतू काय करणार. तो आमचा आज जीव की प्राण वाटू लागला आहे. आम्हालाही वाटते की आम्ही तुमच्यापासून स्वतंत्र्य झालो, परंतू आमचा कोहीनूर, आमचा कोहीनूर आजही गुलाम आहे, त्याचं काय? तो स्वतंत्र्य झाला पाहिजे की नाही? हेच प्रश्न असतात आमच्या भारतीयांच्या मनात.
आमच्या भारतात जन्म झालेल्या रामाची भुमी आहे. क्रिष्णाचाही जन्म इथेच झाला आहे. इथंच जैन धर्माची निर्मीती झाली आहे. तसेच इथेच बौद्ध धर्म प्रस्थापीत झाला आहे. याचाच अर्थ असा की जगातील जेवढेही धर्म आज अस्तित्वात असतील, त्यापैकी अर्ध्यांचं जन्मस्थान भारतभुमीच आहे.
आमच्या भारताला ऐतिहासीक धर्माचीही परंपरा लाभली आहे. ज्या गणपती, दुर्गेला संपूर्ण जग मानतं ना. त्यांचाही जन्म आमच्या भारतातीलच आहे.
गोवर्धनच्या एकएक गोष्टी आज तिला आठवत होत्या. तो म्हणत होता की आमच्या भारतात सोन्याची खाण आहे. म्हणतात की ज्यावेळी क्रिष्णाचा जन्म झाला, त्यावेळी इथे सोन्याचा पाऊस पडला होता. इथे निव्वळ सोन्याचाच पाऊस पडला नाही तर इथे कित्येक महापुरुषही जन्मास आले. तसेच काही प्रज्ञावंत शास्रज्ञही. झाडांना जीव असतो असं सांगणारा जगदिशचंद्र बोस आमच्या भारतातीलच. तसेच आमच्या भारतानं पुर्वीपासूनच मोठमोठे शास्रज्ञ दिले. आकडेमोड सांगणारा वराहमिहीर व औषधाचा जनक जीवक तसेच खगोलशास्रज्ञ आर्यभट्ट, ज्यांना आज देश ओळखतो, ते भारतातीलच आहेत.
आमच्या भारतात अनेक नद्याही आहेत. इथे असणा-या नर्मदा, गोदावरी, तापी, सतलज, ब्रम्हपुत्रा, कृष्णा, कावेरी नद्या बारामाही वाहात असून या नद्यांना वर्षभर पाणी असतं. त्यामुळं इथं पीकणारं अन्नधान्य हे विपूल प्रमाणात पीकत असतं. माहित आहे जेनिफर, आमच्या भारतात पुर्वी मसाल्याचे पदार्थ पुष्कळ पिकायचे व येथील मातीच्या विशिष्ट प्रकारामुळे त्या पदार्थांना मोठी चव असायची. ते घेण्यासाठी तुमची विदेशी मंडळी भरपूर येत. त्याच दृष्टीकोणातून आमच्या भारतातील मूळ लोकांंना गुलाम करीत गेले तुमच्यासारखे विदेशी लोकं. प्रथम अरबांनी गुलाम केलं आम्हाला. त्यांनीही आमच्या भारतातील कच्चा माल लूटलूट लूटला आणि आता तुम्ही. तुम्हीही गुलाम केलं आम्हाला. तुम्हीही आम्हाला लूटलूट लूटलं. तुमच्या पुर्वजांनी येथील कच्चा माल लांब धाग्याचा कापूस आपल्या देशात अतिशय कमी किंमतीत नेला व त्यावर आधारीत व त्यापासून बनविलेला पक्का माल अतिशय जास्त किमतीत आपल्या देशात आणला.
आमचा भारत देश भारतीय इतिहासातील प्राचीन देशांच्या पंगतीत बसतो असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आमचा लिहिलेला इतिहास हा २,५०० वर्षांपूर्वीचा असून भारतीय पुराव्यांनुसार आमच्या भारतात पन्नास हजार वर्षांपूर्वीपासून असलेले आमचे अस्तित्व आणि आमचा इतिहास आमच्या भारताला वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली बनवत आहे. असाच आमचा इतिहास आहे.
आमच्या भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनीक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या. या राजवटीने आमच्या भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं. यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य. ज्या मौर्य साम्राज्याचा प्रमुख चंद्रगुप्त मौर्य होता. हे आमच्या भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते. ही सत्ताही भारतामध्ये मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली. देशातील ही पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होती. या काळामध्ये राज्यकर्त्यांनी एक मोठा भूप्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला आणि प्रजेत चांगली शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अजिंठा-वेरूळची भित्तीचित्रे,
मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे, हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने नमुने. इतिहासकारानुसार आदिमानवाने भारतात पन्नास हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ५००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती प्रस्थापीत झाली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले. इसवी सन पूर्व ३५०० च्या कालखंडाला सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात आहेत. परंतू तोही भारतीय इतिहासच आहे. ह्याचं उत्खनन दयाराम सहानी यांनी केले. काही इतिहासकार म्हणतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणं करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू केला. पूर्वीच्या काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार प्राचीन हडप्पा व मोहेंनजोदाडोची संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या. यातील सरस्वती नदी काळाच्या ओघात भुपृष्ठीय बदलांमुळे लुप्त झाली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ, गुजरातमधून वाहत होती. हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. अशाच काही कारणानं कोहीनूरही द्वापरयुगात जमीनीत गाडला गेला असेल असे साहजीकच म्हणता येते, जो गोवळकोंड्याच्या खाणीत मिळाला.
वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू नदीच्या काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली होती. साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय. या जनसमूहांचे रावी नदीच्या तीरावर झालेले 'दशयज्ञ युद्ध' प्रसिद्ध आहे. या वैदिक लोकांच्या जनसमुहांसोबत 'दास' किंवा 'दस्यू' लोकांचे वास्तव्य होते.
आमच्या भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला असलेल्या बिहार, बंगाल, ओडीसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिण महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे दिसतात. विदेशी ग्रीकांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही अस्तित्वात होती, तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती. त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात होती. गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा ज्या ठिकाणी होत. त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई. गौतम बुद्ध हे नेपाळमधील शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते.
प्रत्येक जनपदाची स्वतंत्र अशी नाणी प्रचलनात होती. जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून दिसून येतो. बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध हे संनस्थ अवस्थेत श्रावस्थीमध्ये चेतवणी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते. कोसल राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.
कोसलप्रमाणेच वत्स, अवंती आणि मगध हीदेखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती. मगधच्या उत्तरेस लिच्छवीचे व्रुज्जी हे गणराज्य होते. वैशाली ही त्याची राजधानी होती. मगधचा राजा अजातशत्रूने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये विलीन करून घेतले होते. वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता. कोसल म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी, हे एक महत्त्वाचे प्राचीन व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा होता. राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले.
प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थानं महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. या काळातील जनपदांच्या उदयातूनच सार्वभौम सत्ता ह्या आकाराला आल्या होत्या. त्यांच्या प्रदेशांमध्ये त्या त्या सत्तांचा मोठा विस्तार घडून आला. अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक सम्राट सिकंदरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली. सिकंदराने गंगेच्या खोऱ्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले. भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा मृत्यू झाला. सिकंदराच्या मृत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय प्रदेशात उठाव सुरू झाले. भारताच्या चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्याच्या मदतीने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा पराभव केला. त्यानंतर मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाने कळस गाठला. भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्यानं साम्राज्यविस्तार केला. त्यानंतर कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.
अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरू झाले. शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने हत्या केली आणि शुंग घराण्याची सत्ता स्थापन केली. पुढे काही काळानंतर शुंग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व याने शुंग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग गेला होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. त्यानंतर सातवाहनांची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले होते.
हा काळ भारताचा सुवर्णयुग मानला जातो. या काळातच दिर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगवेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी केली गेली. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान आजचे पैठण, ही त्यांची राजधानी होती.
इ.स. नवव्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर प्रतिहारांची राजवट स्थापन झाली. कन्नोज ही त्यांची राजधानी होती. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली होती. भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील पांड्य, चोल साम्राज्य, चेरा, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन, यादव, विदर्भ या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती पाहता आजही तिथे असलेली भरभराट दिसून येते. अजिंठा, वेरूळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली आहेत.
चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता. चालुक्य, राष्ट्रकूट, परमार, काकतीय, होयसळ राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच शक, हूण, कुषाणानीही भारतावर आक्रमणे केली. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत.
सातव्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील राजा दाहीर राजाचा पराभव करून तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे झाली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. परंतू त्याला बाप्पा रावलनं शह देत इस्लामी सत्ता भारतातून हुसकावून लावली पुढे मोहम्मद घोरीचं राज्य येईपर्यंत.
भारताचे अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका महमूद नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. मंगोल सम्राट तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती. असे इतिहासकार म्हणतात.
अफगाण शासक मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा (अजमेर) एक राजपूत राजा पृथ्वीराज चौहानशी त्याचा संघर्ष झाला. तो त्यावेळी दिल्लीचा शासक होता. त्याचेसोबत आठ युद्धे झाली. त्या आठ युद्धानंतर पृथ्वीराज चौहानचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहम्मद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारताच्या जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले. तो मोहम्मद घोरी त्यानंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.
मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित करुन दिल्लीचे राज्य हस्तगत केले. त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले. नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्याविरुद्ध उठाव करून सत्ता बळकावली नव्हे तर हस्तगत केली.
इस तेराव्या शतकात त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत शासन केले. यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा होता. दिल्ली सल्तनत ते मुघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.
महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली. उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात समाविष्ट होता. बहामनी साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य यात नेहमी संघर्ष होत. पुढे बहामनी साम्राज्याची पाच शकले झाली. त्यात अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतूबशाही, एलिचपूरची इमादशाही, बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती. त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत. या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.
आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कळाच्या ओघात नष्ट झाली. त्यानंतर मुघल बादशाहा शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.
मुघल आणि दक्षिण भारताच्या इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत. मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगगांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली असलेले मराठी साम्राज्य, त्याची महाराष्ट्रात स्थापना झाली, ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. परंतू शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारताच्या विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला. त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाने मराठा राज्यावर आक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला. त्यानंतर औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले. त्यानंतर मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगड वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून तामिळनाडूतील जिंजीला पलायन करावे लागले. तिथेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजीची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले.
औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूची व येसूबाईची मुक्तता केली. गादीसाठी शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युद्धात शाहूने ताराबाईचा पराभव केला. मराठा राज्याची वाटणी झाली. त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू केला. मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. त्यानंतर महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.
पेशवे मराठेशाहीचे सत्ताधीश बनले. ते पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते. त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते. परंतू पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारुण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजीकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू आमच्या भारताची सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठी साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख साम्राज्य व जाट साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.
ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थीक शोषण केले. त्यानंतर फ्रेंचानी पाँडेचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले. भारतात त्यांची मांडलीक संस्थाने दत्तक वारस नामंजूर करून खालसा केली.
१८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची उर्मी भारतीय लोकांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला. याच काळात कोहीनूरही भारतातून गेला.
इ.स. १९३७ साली महात्मा गांधी सोबत पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या. तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या. सरते शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतू त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे झाले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक होता. आधुनीक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने तीन वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले. त्यासाठी त्यांना त्यांची पत्नी सविता हिने मदत केली. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे. भारत संघराज्य बनले.
भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली. फ्राॅन्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहती वसाहतीमध्ये सार्वमत घेऊन भारताकडे सोपवल्या. त्यासाठी पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले. १९६१ मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा, दीव, दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थीक व सामाजीक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर, पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या आतंकवाद, दहशतवाद हा एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारताच्या विविध शहरात आतंकवादी, दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत. त्यातून १९६२, १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरून सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीय कामगीरी केली आहे.

************************************************************************************************

सिंधू संस्कृती ही भारताच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी, सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी पंजाबातील ५ मुख्य नद्यांच्याकाठी अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहरली. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले. रखवालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दाडोचा शोध लावला. यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल पुरातत्त्वविभागाचे महासंचालक, इ.स. १९०२ ते १९२८, इ. जे. एच. मॅके, माधोस्वरूप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. त्यानंतर सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात विद्यमान पाकिस्तान सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले. सिंधू संस्कृती आधुनीक भारत जसे. पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत या भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनीक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व तो इतिहास भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृती इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सुरू केला. मोहेंनजोदाडो, हडप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरून सिंधू संस्कृतीची ओळख मिळते.
सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का? याबाबत तज्ञांमध्ये काही वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत. परंतू कालांतराने गावं बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली. वैदिक संस्कृती संदर्भात खूप साहित्य आहे परंतू पुरातत्त्वीय पुरावे नाहीत व सिंधू संस्कृतीबद्दल भरपूर पुरातत्त्वीय पुरावे आहेत परंतू त्या संदर्भात कोणतेही साहित्य नाही.
वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी होते. वेद हे अनादी होते. या प्रश्नाची चर्चा आधुनीक कालखंडात सुरू झाली. विशेषतः वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांनी आपले लक्ष वळविले, तेव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली. ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधीक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची विशिष्ट अशी भाषा संस्कृती होतीे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा होता. या वेदांच्या ग्रथाना 'संहिता' असे म्हणत. 'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा याचा अर्थ. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले. भारतात पुर्वी गाजलेली विद्यापीठंही होती. आजच्या बिहारमधील नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले बौद्धविद्यापीठ मानले जाते. नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले विद्यापीठ मानले जाते.
वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे. अशी प्राचीन भारताच्या राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध, काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनीक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले. या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशीक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक होत्या. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती, मगध व वत्स.
वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता, वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते. वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शवतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्वीक बांधणी याच सर्व तत्कालीन उहापोहाचा निकाल आहे असे मानतात. हे भारताचे वैचारीक सुवर्णयुग होते असे मानतात.
गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली. जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो. बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती, ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिख्खूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली.
इस पूर्व ३२६ च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट याने आपल्या जग जिंकायच्या मोहिमेअंतर्गत भारतावर आक्रमण केले. भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकीय आक्रमणांची नांदी अलेक्झांडरच्या आक्रमणानिमित्त झाली. झेलम नदीच्या लढाईत त्याने पोरस राजाचा पराभव केला परंतू अलेक्झांडरला बरेच नुकसान सहन करावे लागले. पुढील एका लहान लढाईत अलेक्झांडर चांगलाच जखमी झाला होता. ११ वर्षांच्या सातत्याचा लढाईंमुळे अलेक्झांडरची सेना चांगलीच कंटाळली होती व तत्कालीन मगध साम्राज्याची ताकद अलेक्झांडरच्या सैन्याच्या तुलनेत जास्त होती व भारतीयांशी पहिल्या काही लढायातील अनुभवांमुळे मगधशी टक्कर महाग पडेल या कल्पनेने अलेक्झांडरच्या सैन्यात परतीची लाट उफाळून आली. सैन्यात फूट उफाळू नये, यासाठी अलेक्झांडरने प‍रतीचा निर्णय घेतला. अलेक्झांडर परतीच्या प्रवासात आजारपणाने मरण पावला. त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. अलेक्झांड‍रने भारताचा थोडाच भाग जिंकला असला तरी त्याच्या आक्रमणाने भारतात मोठी राजकीय उलथापालथ झाली.
अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. चंद्रगुप्त मौर्यने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्याखाली आणला, तो विस्तार त्याचा पुत्र बिंदुसाराच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकाच्या काळात इसपूर्व २७३ ते २३२ त्या विस्ताराने कळस केला. या काळात कोहीनूर सम्राट अशोकाच्या हातात होता.
त्यानंतर जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा आजचा म्यानमारचा काही भाग इतका मोठा भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकाने कलिंग राज्य मौर्य साम्राज्याला जोडला. परंतू झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्विकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती, तर विदिशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती.
अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील अशोकस्तंभ आज आधुनीक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा मोठा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि कारले तसेच नाशिक व अजिंठा-वेरूळ येथील ठिकाणांच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसीत होत गेली असे दिसून येते. गुप्तकाळात भारतीय मूर्ती कलेचा मोठा विकास झाला. दक्षीण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदीर स्थापत्याचा विकास झाला तामीळनाडूमधील महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देणारी आहेत. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली होती. दिल्लीजवळ नेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारीत प्राचीन भारतीयांचे धातू शास्त्राचे ज्ञान हे किती प्रगत होते हे समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती. भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम हे देखील यावरून लक्षात घेण्यासारखे आहे.
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्यकर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले .परंतू कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहद्रथ याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वत: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व सनातन वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व बौद्ध धर्मियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुष्यमित्रच्या पुढील पिढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करून धार्मीक शांतता टिकवून ठेवली. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारताच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतीक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे. याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते.
भारतीय-ग्रीक राज्यकर्ता डेमेट्रीयस पहिला, इस पूर्व २०५ ते १७१ अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्यांच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड मौर्य साम्राज्य काळातच ढिली पडली. परंतू भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया (इराण) व बॅक्ट्रीया, अफगाणिस्तान मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अशा प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला वायव्य प्रांत सांस्कृतीक दृष्ट्या वेगळा बनू लागला. डेमेट्रीयस या ग्रीक राजाने इ.स. पूर्व १८० मध्ये भारतीय-ग्रीक राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार अफगाणिस्तान, पाकिस्तान, पंजाब प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये दोन शतकापर्यंत टिकली. या काळात तीस पेक्षा अधिक ग्रीक राज्यकर्त्यांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच भारतीय राज्यकर्त्यांशी लढत. मिलिंद अथवा मिनॅंडर हा एक महान ग्रीक भारतीय राज्यकर्ता होऊन गेला. ग्रीक राज्यकर्त्यांनंतर इस पूर्व शतकात या भागात शक राज्यकर्त्यांचे वर्चस्व वाढले. शक हे मूळतः दक्षिण सायबेरियातून स्थलांतरीत झालेले लोक होते. सर्वप्रथम बॅक्ट्रीय (अफगाणिस्तान), काश्मीर, गांधार, पंजाब असा प्रवास करत भारतात शक टोळ्यांनी प्रवेश केला व पश्चिम भागात आपले प्रस्थ वाढवले. यानंतरच्या काळात कुषाण हे वायव्य भागात प्रभावी बनले. कुशाण राज्यकर्त्यांचे एके काळी कझाकस्तानापासून ते मथुरेपर्यंत राज्य होते.
दक्षीण भारताच्या पुड्डूकोटाई येथे सापडलेले रोमन नाणे. यावरुन पहिल्या शतकात रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला. रोमन साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते. इस १३० मध्ये सुरू झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला. हा व्यापार मुख्यत्वे रोमशी सरळपणे न होता, मध्य आशियातील अरब, इजिप्त या मधल्या व्यापारांमार्फत होत असे. ऑगस्टस या रोमन सम्राटाच्या काळापर्यंत प्रतिवर्षी १२० जहाजे मायोस होर्मोस पासून ते भारतापर्यंत ये जा करत. या काळात येणाऱ्या सोन्याचा उपयोग भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या नावाच्या सोन्याच्या मोहरा पाडण्यात केलेला दिसतो.
गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकीय, आर्थीक सामाजीक व लष्करी स्थैर्य लाभले. याकाळात भारताने गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात मोठी मजल मारली. गुप्त साम्राज्याच्या शासकांनी आपल्या सैन्य शक्तीच्या जोरावर भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. श्रीगुप्त या गुप्त राज्यकर्त्याने गुप्त राज्याची स्थापना केली. त्यानंतर काही वर्षातच चंद्रगुप्त ने गुप्त राज्याचे साम्राज्य बनवले. समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य यांसारख्या महान राज्यकर्त्यांनी गुप्त साम्राज्य वाढवले. गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इस २४० ते ५५० पर्यंत मानला जातो. कालिदास हा महान कवी गुप्त सम्राटांच्या दरबारी होता असे मानतात. पुराणांची रचना याच काळात झाली असेही मानतात. याच काळात कोहीनूर गुप्त घराण्यांकडे होता असेही मानले जाते. साम्राज्याच्या नंतरच्या काळात पश्चिम अशियातील हूण आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांनी गुप्त साम्राज्य क्षीण झाले.
गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्य हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौजच्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणले. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले. परंतू प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. कोहीनूर या काळात हर्षवर्धनाकडे होता असे मानले जाते.
सातव्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येवून लयाला गेली. १३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले. आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारताच्या बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षीण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले. ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले. जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात, त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.
कनौज त्रिकोण हा तीन साम्राज्यांचा केंद्रबिंदू होता. दख्खनचे राष्ट्रकूट, माळव्याचे प्रतिहार व बंगालचे पाल साम्राज्य या राजपूत राज्यांनी उत्तर भारताच्या मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली. भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्ध्यांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घोरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला. तेव्हा कोहीनूर हिरा पृथ्वीराजकडे होता. तो मोहम्मद घोरीनं हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यापुर्वीच पृथ्वीराजनं तो हिरा माळव्याच्या राजाकडे सुरक्षीत ठेवला होता. जो युद्धानंतर अलल्लाउद्दीन खिलजीनं हस्तगत केला. मोहम्मद घोरी स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली. पुढे ते राज्य त्याचा गुलाम असलेला कुतूबुद्दीन ऐबकला मिळाले होते.

*******************************************

मध्ययुगीन काळात दक्षीण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता. चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती. आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखील याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. अजिंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधली असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले. तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीच्या यादवांनी चालुक्य राज्य चालवले, तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला. चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले. राजा राज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली. या काळात दक्षीण भारताच्या राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली. या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
इ. स. वी सन १७५७ रोजी झालेली प्लासीची लढाई अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. यात विचारात घेण्यासारखी गोष्ट अशी की येथूनच ख-या अर्थानं भारताला आपलं अस्तित्व कळलं व त्यांनी पुढे जावून इंग्रजांच्या स्थापन झालेल्या साम्राज्याचा विरोध केला. ते स्वातंत्र्यासाठी लढ लढ लढले.
गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर व दक्षीण भारतात अनेक हिंदू साम्राज्ये उदयास आली. उत्तरेस प्रतिहार, पाल, वर्धन, गहडवाल इत्यादी तर दक्षिणेस राष्ट्रकूट, होयसळ, पांड्य, चेर, कदंब, यादव इत्यादी साम्राज्ये होऊन गेली.
अरबस्तानात सहाव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी स्पेन, उत्तर अफ्रिका, तुर्कस्तान ते इराण बलुचिस्तानपर्यंतचा भाग इस्लाममय करून टाकला होता. उमय्यद खलीफाच्या काळात बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व भारतात इस्लामी राज्याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इस्लामी आक्रमकांना प्रतिहारीं कडून मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे इस्लामी राज्याचा पूर्वेकडचा विस्तार थांबला. परंतू भारताशेजारील इराण तोवर पूर्णपणे इस्लाममय झाला होता. शेजारील संपन्न व गैर इस्लामी राज्य आक्रमणासाठी खूणवत होते. दहाव्या शतकात इस्लामी आक्रमणांची व्याप्ती वाढली व भारतात लहान इस्लामी सल्तनते तयार होवू लागली. या आक्रमणांच्या आगोदरही भारतात अरबी व्यापाऱ्यामार्फत इस्लाम पश्चीम किनारपट्टीच्या प्रदेशात पोहोचला होता. सुरुवातीची इस्लामी आक्रमणे प्रामुख्याने लूटीवर आधारीत होती. या लूटींचे मुख्य लक्ष्य मंदिरे व संपन्न शहरे होती. गझनीचा महमूदने भारतावर लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या.
१२ व्या शतकात पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घोरीने पराभव केला व भारतात अधिकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घोरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली. भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजीक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो. तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिलजी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारताची अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. शेरशहा सूरीने बांधलेला कलकत्ता काबूल रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले. १४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील तैमूरलंग या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते. त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहीक हत्या करण्यात आली. तैमूरलंगच्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षीण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजामशाही, विजापूर येथील अदिलशाही व गोवळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये बाबर या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानीपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला.

************************************************
इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता. त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानीपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली. जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले. मुघल साम्राज्याने १७ व्या शतकात भारताच्या बहुतेक भागावर राज्य केले व १७०७ नंतर औरंगजेबच्या मृत्यूनंतर या साम्राज्याची घसरण चालू झाली. सरतेशेवटी १८५७ पर्यंत एका लहान संस्थानिकाच्या आकारापर्यंत मर्यादीत राहून टिकली. त्यानंतर १८५७ मध्ये ब्रिटीशांनी मुघल राज्य खालसा करून टाकले. या काळात उत्तर भारतात मोगलांचे व दक्षीण भारतात विविध शाहींची राज्ये होती. १६८८ पर्यंत मोघलांच्या राज्याचा विस्तार प्राचीन मौर्य साम्राज्याच्या विस्ताराएवढा होता. दिल्ली सल्तनतींच्या तुलनेत मुघल साम्राज्याने धार्मीक सलोखा ठेवला. यात सम्राट अकबराने पुढाकार घेतला होता. त्याने स्वत:ही दिन-ए-इलाही हा धर्मही चालू केला होता. तसेच हिंदूंवर लादला जाणारा जिजीया करही माफ करून टाकला होता. मोगलांनी भारतीय स्थापत्यामध्ये परीवर्तन आणले व आजच्या भारतीय स्थापत्याची ओळख प्रामुख्याने मुघली स्थापत्यावरून होते. जगप्रसिद्ध ताजमहाल मोघल सम्राट शहाजहानने बांधला. तसेच फत्तेपूर सिक्री हे पूर्ण शहर वसवले. दिल्ली व आग्रामधील मधील बहुतेक जुन्या वास्तू या मोघल स्थापत्याची ओळख करून देतात. हिंदूच्या बरोबर सलोखा वाढवला. तरीही शाहजहान व औरंगजेबाच्या काळात हा धार्मीक सलोखा खालवला. औरंगजेबाने हिंदूंविषयी दाखवलेल्या कडवट धोरणांमुळे मराठे, राजपूत व शीख दुखावले व मुघल राज्याविरुद्ध बंडाळी वाढली व मुघल साम्राज्याचे पतन होण्यास कारणीभूत ठरले. खासकरून शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याकडून मोठा प्रतिकार झाला. औरंगजेबाने आपल्या आयुष्याची शेवटची २७ वर्षे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यात घालवली, जे साध्य झाले नाही. औरंगजेबच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार वाढला व मोघलांचा क्षीण झाला व दिल्ली आग्रापुरते त्यांचे राज्य मर्यादीत राहिले. हा काळ मुघलांच्या दृष्टीने खूपच अस्थैर्याचा राहिला. ५० वर्षांच्या काळात १७ मुघल राजे होऊन गेले.
१७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राज्यकर्त्यांचे वर्चस्व झाले होते. अनेक राजपूत हिंदू संस्थाने अस्तित्वात असली तरी मुघलराज्यकर्त्यांना अंकीत होती. महाराष्ट्रातही मराठा सरदार हे निजाम व आदीलशाहीच्या पदरी काम करत. या परिस्थितीत १६४७ मध्ये महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय राज्यकर्त्यांचे वर्चस्व झुगारून देवून पुण्याजवळील किल्यांवर स्वतंत्र राज्याची स्थापना केली, जे पुढे मराठा साम्राज्य म्हणून विकसीत झाले. मराठा राज्याची सुरुवात मोघल व आदीलशाहीशी सघर्षरत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रभावी नेतृत्वाखाली मराठी सेनेने आदिलशाहीचे वर्चस्व नमवले व मोघलांशी उघड-उघड वैर पत्करले. मोघलांशी झालेल्या पहिल्या मोठ्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती जयसिंग यांच्याबरोबर तह केला व आग्रा येथे औरंगजेबाशी बैठकीचे निमंत्रण मान्य केले. औरंगजेबाशी झालेल्या भेटीत औरंगजेबाने शिवाजींचा अपमान केला व नजरकैदेत ठेवले. या कैदेतून छत्रपती शिवाजींनी सहीसलामत सुटका करून घेतली, जी औरंगजेबाच्या जिव्हारी लागली. १६७४ मध्ये शिवाजींनी अधिकृतरित्या राज्याभिषेक करवून घेवून मराठा साम्राज्याची स्थापना केली. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर काही अस्थीर काळानंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सुत्रे घेतली. परंतू औरंगजेबाने मराठा राज्य संपवायचा निर्णय घेतला व सर्वशक्तीनीशी तो दक्षिणेत आला. त्यानंतर १६८९ मध्ये संभाजी महाराजांना अटक करण्यात औरंगजेबाला यश आले व अतीशय मारहानी करून संभाजी महाराजांची हत्या केली. यानंतर राजाराम महाराजांनी सुत्रे घेतली व दक्षिणेत जिंजी येथून औरंगजेबाविरुद्ध लढा चालू ठेवला. १७०७ पर्यंत मराठ्यांनी अतीशय चिकाटीने हा लढा चालू ठेवत मुघल साम्राज्याचा पायाच खिळखिळा केला. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा लढा संपला. पण तोपर्यंत मराठ्यांनी विस्तार सुरू केला होता व मुघलांची उत्तर भारतातून माघार सुरू झाली होती. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार सूरु झाला. भोसले घराणे अधिकृतरित्या राज्यकर्ते असले तरी खरी सुत्रे पेशव्यांच्याकडे आली. पहिला बाजीराव, शिंदे व होळकरांनी मिळून भारताचा मोठा भूभाग मराठ्यांच्या अख्यत्यारीत आणला. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पेशव्यांचा दारुण पराभव झाला व साम्राज्याचे पतन चालू झाले. यामुळे इंग्रजांचे चांगलेच फावले व त्यांनी विस्तार चालू केला. १७७७ ते १८१८ पर्यंत इंग्रजांशी तीन युद्धे झाली व शेवटी १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावचा पराभव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला.

*****************************************
ऑटोमन साम्राज्याने भारताशी व्यापाराचे मार्ग बंद केल्यानंतर अनेक धाडशी दर्यावर्दींनी भारतातील मार्ग शोधण्याचे प्रयत्न सूरु केले. या प्रयत्नात अमेरिका खंडाचा शोध लागला, वास्को दा गामाने दक्षीण अफ्रिकेहून वळसा घालून भारताला येण्याचा मार्ग शोधला व युरोपीयन साम्राज्य वाद सूरु झाला असे मानतात. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताशी व्यापार करण्यात रस दाखवला. सुरुवातीला १६ व्या शतकात या युरोपीयन देशांनी मुघल व इतर स्थानीक राज्यकर्त्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. नंतर आपल्या व्यापारी मालाचे संरक्षण व वाहतुकीसाठी व्यवस्था म्हणून यांनी भारताच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी वखारी व लहान किल्ले उभारले. उदा. पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण येथे तर इंग्रजांनी मुंबई व सुरत येथे आपली केंद्रे स्थापिली होती. भा‍रतीय राज्यकर्त्यांना आधुनीक शस्त्रास्त्रे व युद्धतंत्रे देण्यात इंग्रज व फ्रेंचांमध्ये चढाओढ चालली होती. या प्रयत्नात इंग्रज फ्रेंच यांच्यात स्पर्धा तीव्र होती. संरक्षणाच्या नावाखाली छोट्या छोट्या क्षेत्रावर त्यांनी नियंत्रण मिळवले. १७५७ मध्ये प्लासी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. त्यामुळे प्रथमच युरोपीयांना मोठ्या भागावर राज्य करायला मिळाले व त्यानंतर विस्तार धोरण चालू ठेवले. पानीपतच्या लढाईनंतर मराठ्यांचे सत्ताकेंद्र विभागले. याचा चांगलाच फायदा इंग्रजांनी घेतला. प्रमुख संस्थानिकांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्यांनी वर्चस्व मिळवायला सुरुवात केली. या राज्यांना एकमेकांविरुद्ध लढण्यास तैनाती फौजेची आमिषे दिली. अशा रितीने फोडा व राज्य करा, या नीतीचा वापर करुन मराठी साम्राज्य इंग्रजांनी पुर्णतः घशात टाकले कोहीनूरसकट. मराठे व म्हैसूरचा टिपू सुलतान यांच्याशी युद्धे करून ती राज्ये संपवली व १८१८ पर्यंत भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले. इंग्रजांची आधुनीक युद्धतंत्र व शस्त्रात्रे यांचा सामना करण्यात भारतीयांना सपशेल अपयश आले.
१८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणल्यावर ब्रिटिशांची भारताच्या मोठ्या भागावर सत्ता स्थापन झाली. त्यातच भारतावर त्यांनी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात अत्याचार केलेत. आमच्या भारतीयांसमोर कोहीनूरचा प्रश्न होता. परंतू हा अत्याचार पाहून आमच्या भारतीयांनी तो ध्यास सोडला. शेवटी आमच्या भारतीयांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेवून तोच नाद धरला. हि-याचं नंतर पाहू असा विचार करीत प्रथम स्वातंत्र्य मिळवलं. त्यानंतर हि-याच्या प्रश्नांच्या ते मागे लागले.
गोवर्धन म्हणत होता,
"जेनिफर, आता मला सांग की यात आमच्या भारताचं काय चुकलं."
आज गोवर्धन नव्हता, परंतू त्याचे बोल सर्वतोपरी आठवत होते. त्यानं सांगीतलेला इतिहासही. जेनिफरला सर्व आठवत होतं. त्यातच आता तिनं भारतात जायचं ठरलं व एक दिवस तिनं तो काचेचा कारखाना विकला. तशी सर्व पैसा घेवून ती भारतात आली.
काही दिवस बरे गेले. त्यातच एक दिवस तिच्या मनात सहज विचार आला की जर आपण या भारतात हिरे बनविण्याचा कारखाना उघडला तर........विचारांचा अवकाश. तिनं कारखाना उघडला. तो कारखाना चालायला लागला होता व एवढंच नाही तर त्या कारखान्याचं भारतीयांनी कौतूक केलं होतं.
कारखाना हळूहळू चालत होता. गोवर्धनचं स्वप्न साकार झालं होतं. कित्येक लोकं आनंदी झाले होते. कारण त्यांना मूळ रुपात जरी कोहीनूर मिळाला नसला तरी कोहीनूर मिळाल्याचा आनंद प्राप्त होत होता.
मूळ कोहीनूर आज लोकांना मिळाला नव्हता. लोकं तरीही समाधानी होते. परंतू आजही एक खंत मनात होती. ती म्हणजे कोहीनूर इंग्लंडला असल्याची. कारण आज कित्येक दशके ओलांडली, तरी इंग्लंडनं कोहीनूर परत केला नव्हता.
कोहीनूर आज बनावटीचा का असेना, परंतू आज तो फारच प्रचलीत झाला होता. अनेक देशाचा त्या बनावटी हि-याने प्रवास केला होता. लोकांना कोहीनूर वापरायला जरी मिळाला नसेल, परंतू हा बनावटी कोहीनूर का असेना, तो वापरल्याने अपार सुख मिळाले होते. मानसीक समाधानही मिळाले होते.
कोहीनूरचा कारखाना जोरात चालत होता. जनसामांन्यांना आज कोहीनूर वापरायला मिळत होता. कारण त्याचे मुल्य फारच कमी होते. त्यातच भारतीयांनाही एक अभिमान होता की कोहीनूरच्या मूळ रुपाचा जन्म भारतात झाला आणि आता बनावटी कोहीनूरचाही. त्यांना कदाचीत माहीत नव्हते की ह्या कोहीनूरनं याआधी विदेशात जन्म घेतला होता.
जेनिफरची दोनही मुलं सुधारली होती. ती आता व्यसन करीत नव्हती तर ती आता आपल्या आईच्या व्यापाराकडे लक्ष देत होती नव्हे तर आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करीत होती. त्यांनी भारतातील मुली पाहिल्या होत्या व ते आता संसारात रमले होते. तसेच जेनिफरही नातवंड पाहात पाहात परिवारात खुश होती.

**********************************************************

एकदाचा तो दिवस. एक व्यक्ती भीक मागत मागत तिच्या घरी आला. त्याचे कपडे फाटले होते. त्यावर मळ साचलेलं होतं. त्याला करड्या रंगाची लांबलचक दाढी होती. डोक्यावरचे केसं पीकलेले होते. चेहराही मळकट होता. कितीतरी दिवस आंघोळ न केल्याने त्याच्या अंगावर मळाचा थर साचला होता.
तो व्यक्ती....... त्यानं भीक मागीतली. तशी जेनिफर पीठ घेवून बाहेर आली. तिनं त्या भिका-याला पीठ दिलं. परंतू तो जाईना. तो सारखा जेनिफरकडे पाहात होता. तशी जेनिफर त्याला म्हणाली,
"काय, झालं बाबा, तुम्ही जात का नाही?"
"तू जेनिफर ना."
जेनिफरचं नाव त्या भिका-याच्या तोंडातून ऐकताच जेनिफरला आश्चर्य वाटलं. तशी ती म्हणाली,
"होय, मी जेनिफरच. का बरं? काय झालं?"
"मला ओळखलं नाहीस?"
"नाही. नाही ओळखलं बाबा. जरा ओळख सांग."
तो व्यक्ती थोडा थांबला. कशी ओळख सांगावी याचा तो विचार करु लागला. तशी जेनिफर म्हणाली,
"सांग बाबा, जरा ओळख सांग. असा घाबरु नकोस. अन् शरम बाळगू नकोस. तुला कोणीही काहीही करणार नाही. कोणीही काहीही म्हणणार नाही. सांग, लवकर सांग."
"जेनिफर, तुला कसं सांगू. मी......मी......."
तो थांबला. तशी जेनिफर म्हणाली,
"सांग बाबा लवकर. मलाही कामं आहेत. जायचं आहे."
"तू इंग्लंडचीच जेनिफर आहे ना?"
"होय. मी इंग्लंडचीच जेनिफर."
"गोवर्धनला ओळखते का?"
"होय."
"कोण होते ते?"
"माझे पती. परंतू तुला काय करायचं बाबा?"
ते ऐकताच तो व्यक्ती सांगू लागला आपली ओळख.
"जेनिफर, मी.....मी गोवर्धन. तूझा पती. इंग्लंडमधून निघतांना जो विमानाला अपघात झाला, त्यातून मी वाचलो. इंग्लंडला येईल म्हटलं, परंतू तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. गावला जाईल म्हटलं तर रास्तही वाटत नव्हतं. शेवटी मी जगत राहिलो भीक मागत मागत. अतीशय लाचारीचं जीवन.
गोवर्धननं सांगीतल. तसं जेनिफरनंही त्याला ओळखलं. तिचे डोळे पानावले. त्यातच तिच्या डोळ्यातून अश्रूधारा टपकायला लागल्या. तशी ती म्हणाली,
"तुम्ही होय. माहित आहे, तुम्ही नसतांना आमच्या किती हालअपेष्टा झाल्या त्या? कितीतरी दिवसं तर उपासातच काढावे लागले आम्हाला."
ती हुंदके देत देत रडत म्हणाली. तसा तिनं शोषलेल्या वेदनांचा भूतकाळ तिला आठवायला लागला.
तो विमान अपघात. तो होताच जेनिफरवर संकट कोसळलं होतं. गोवर्धनची भारतात एक कंपनी होती. त्या कंपनीच्या मैनेजरनं काही दिवसानंतर तिला पैसा पाठवणं बंद केलं होतं. तसं पाहता जवळ पैसा होता. परंतू पुरेसं पाठबळ नसल्यानं व इंग्लंडमधील कारखाना बंद असल्यानं ती आपले दिवस उद्विग्नतेत काढत होती. काय करावं ते तिला सुचत नव्हतं. शेवटी कसेतरी दिवस काढत तिनं आपल्या मुलांना शिकवलं. खावूपिवू घातलं. तसेच त्यांना कपडालत्ताही पुरवला. जेनिफरनं स्वतः नवा पोशाख घेतले नाहीत. ना कोणताही साजश्रृंगार केला नाही. परंतू तिनं मुलांचं जीवन फुलविण्यासाठी संघर्ष केला होता आणि जेव्हा मुलं मोठी झाली होती, तेव्हा जवळ असलेल्या पैशाचा योग्य वापर करुन तिनंं काचेपासून हिरा बनविण्याचा कारखाना सुरु केला होता.
गोवर्धन मरण पावल्यानंतरही तिच्याजवळ बराच पैसा होता. परंतू त्या पैशाचा योग्य वापर करता येत असूनही ती करु शकत नव्हती. कारण तिला आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं होतं.
गोवर्धनच्या मृत्यूची बातमी कळताच तिचं काही दिवस तर अवसानच गळलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. तिचं त्याचेवर निरतिशय प्रेम होतं आणि ते प्रेम वृद्धींगत जाणारं होतं. परंतू गोवर्धन तिच्याजवळ नसल्यानं आज त्याचा दुरावा तिला सतावत होता. जेव्हा तिला त्याची आठवण येत असे. तेव्हा तिला तिचा जीव कासावीस झाल्यासारखं वाटत असे. ती वेळ तिला अगदी बेचैन करुन टाकत असे.
आज जेनिफरला तो दिसताच आनंद झाला होता नव्हे तर काही प्रमाणात गतकाळातील वेदनांचं दुःखंही. तो दिसताच जेनिफरनं त्याला आत घेतलं. त्याला गरम गरम पाणी दिलं. चांगली अंघोळ करायला लावली. स्वच्छ कपडे दिले. दाढी करायला लावली व त्याचं रुप पालटवलं. गोवर्धन त्यांना सापडताच परिवारात आनंदी आनंद झाला. एवढ्या वर्षानंतर का होईना, जेनिफरला तिचा पती सापडला होता.
गोवर्धन आता भिकारी अवस्थेत नव्हता. तो आता माणसात आला होता. आता त्याला कोणाहीसमोर कोणत्याही स्वरुपाची भीक मागावी लागत नव्हती. तो स्वतः त्यानं लावलेल्या रोपट्याला पाणी घालत होता आणि त्या रोपट्याला वाढवत होता. त्याचं वृक्षामध्ये रुपांतर करण्यासाठी. आज त्याच्या कारखान्यात निर्माण होणारा हिरा घरोघरी जात होता. लोकं समाधानी होते. त्याचबरोबर तोही.
तो एकदाचा दिवस. जेनिफरला घेवून गोवर्धन एका बागेत फिरायला गेला. तेव्हा ती सायंकाळची वेळ होती. गार गार वारा सुटला होता. तशी त्याला इंग्लंडची आठवण आली. त्या इंग्लंडमध्ये तारुण्यात असतांना तो जेनिफरसोबत असाच फिरायला जात होता. तेव्हा ती म्हणत असे. 'मला भारत पाहायचा आहे. जरा दाखवाल का?' तो प्रसंग आठवताच तिची थोडी गंमत करावी. म्हणून तो म्हणाला,
"आपण इंग्लंडला जावूया का?"
त्याचा तो प्रश्न. तो ऐकताच ती अबोल झाली. थोड्या वेळानं ती म्हणाली,
"नको आमचा इंग्लंड. यापेक्षा भारतच बरा. भारतात जसे सहिष्णू लोकं आहेत. जे एकमेकांना घेवून चालतात. तसे इंग्लंडमध्ये नाही. भारत सोने की चिडीया आहे. असं म्हटलं जातं. ते अगदी बरोबर आहे. कारण भारतात सोन्याची चिडीया नाही तर सोन्याला जशी किंमत असते. तशा सोन्यासारख्या स्वभावाची माणसं आहेत भारतात. आता मी इंग्लंडची रहिवासी नाही तर मिही भारताची रहिवाशी झाली असून आज मी भारत माझा देश आहे. अशी हक्कानं म्हणेल."
तिच्या बोलण्याचा अर्थ होता तो त्याला समजला नाही. परंतू एक मात्र लक्षात आलं की जी कालपर्यंत इंग्लंडचं गुण गात होती. तिच्या मनात आज असं भारताविषयीचं प्रेम फुललंच कसं? याचं गोवर्धनला आश्चर्य वाटत होतं. तसा तो तिला म्हणाला,
"असं काय घडलं की तुला इंग्लंडविषयी तिटकारा वाटायला लागला?"
त्याचा तो प्रश्न. त्यावर उत्तर देत ती म्हणाली,
"काय नाही घडलं हे विचारा. त्या इंग्लंडची मी रहिवासी असूनही तेथील सरकारनं मला न्यायालयात खिचलं. माझ्या विरोधात न्यायालयातून निकाल आणला आणि माझा व्यापार बुडवला. काय गुन्हा होता माझा ते कळू न देता.......काय गुन्हा होता? मी त्या कोहीनूरसारखे दिसणारे हिरे निर्माण केले. हा गुन्हा होता काय माझा? की मी इंग्लंडची प्रतिष्ठा धुळीस मिळवली होती. हा गुन्हा होता? गोवर्धन, माझा गुन्हा कोणताच नव्हता. परंतू त्या इंग्लंड सरकारच्या मनात स्वतःला श्रेष्ठ समजण्याची जी वृत्ती होती. तीच त्यांना मारक ठरली. खावूनही गेली."
गोवर्धन काय समजायचं ते समजला. तसा तो म्हणाला,
"ते सर्व जावू दे. माझा भारत बरा वाटत आहे की नाही आज. वाटते ना. मग झालं. आता पुन्हा कधी इंग्लंडचं नाव काढशील नको म्हणजे झालं."
त्याच्या बोलण्यावर ती गप्प होती. तशी सायंकाळ झाली होती. पावसाचे थेंब पडायला लागले होते. तसा तो म्हणाला,
"सायंकाळ झाली आहे. गार वारा सुटलाय. पावसाचीही येण्याची चिन्हं दिसत आहेत. आपल्याला घराला जावं लागणार."
त्यानं तसं म्हणताच ती उठली व तिनं त्याचं बोट धरलं. जसं लहान बाळ आपल्या वडीलाचं बोट धरतं तसं व ती त्याच्याबरोबर चालू लागली. तो रस्ता चालतांना जाता जाता तिच्या मनात अनंत आठवणी होत्या. त्यातच एक समाधान होतं की आपण काचेचा हुबेहूब दिसणारा कोहीनूर निर्माण करुन आपण जुन्या कोहीनूरलाच नाही तर इंग्लंडलाही हारवलं आहे. तेव्हाच तर त्यांनी माझ्या व्यापाराला न्यायालयात खीचलं होतं.
आज गोवर्धन व जेनिफर आनंदानं जीवन कंठत होते. जेनिफर इंग्लंडला पुर्णपणे विसरली होती. त्यासोबतच त्यांची दोन मुलं आणि त्यांच्या भार्याही. सोबतच नातंवंडही. ते सर्व त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. तसं पाहता सर्व परिवारच आज इंग्लंडची आठवण विसरला होता.
आज कोहीनूर नावाचा गोवर्धन आणि जेनिफरचा हिरा जगप्रवास करीत करीत इंग्लंडलाही पोहोचला होता. त्यातच तो बंकीमहम पैलेशमध्येही. आज हा काचेचा बनावटी कोहीनूर हिराही त्याच हि-याच्या बाजूच्या कम-यात स्थानापन्न झाला होता. ज्या बंकीगहम पैलेशमध्ये ओरीजनल कोहीनूर हिरा कोणता व डुप्लीकेट कोहीनूर हिरा कोणता हे ओळखणे कठीण झाले होते. कोहीनूरच्या या प्रतिरुपानं त्या बंकीगहम पैलेशमध्ये स्वतःची जागा निर्माण केली होती नव्हे तर स्वतंत्र्य अस्तित्व निर्माण केले होते. ज्यामध्ये जेनिफरचा आणि गोवर्धनचा सिंहाचा वाटा होता.
**********************************************************

तो एकदाचा दिवस. इंग्लंडने आज एक समारोह आयोजीत केला होता. त्या आयोजनानुसार जेनिफर व गोवर्धनला आवर्जून बोलावलं होतं. तिथं त्यांचा सत्कार होणार होता. तसे ते त्या समारोहाच्या कार्यक्रमात इंग्लंडला पोहोचले.
कार्यक्रमाची वेळ झाली. त्यातच त्या कार्यक्रमात जेनिफर आणि गोवर्धनचा सत्कार करण्यात आला. तसं मनोगतासाठी जेनिफरला बोलावण्यात आलं. मनोगतात जेनिफर म्हणाली,
"आज मी ज्या स्थितीवर उभी आहे. तिथंपर्यंत जाण्यासाठी मला भारतानं मदत केली. आज भारत जर नसता तर मी कदाचीत संपून गेले असते. भारतानं मला सावरलं आहे.
मला माहित आहे की माझा जन्म इंग्लंडचा आहे. मी इंग्लंडची रहिवासी आहे. परंतू मी हेही विसरु शकत नाही की माझ्या हिरे बनविण्याला वाव भारतानं दिला. त्यांच्याचमुळं मी हिरे बनवीत आहे. कोहीनूरसारखे हुबेहूब दिसणारे हिरे. याचा अर्थ असा नाही की मी इंग्लंडला विसरली. मी इंग्लंडलाही विसरु शकत नाही. ज्याप्रमाणे भारत माझा देश आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडही माझाच देश आहे. शेवटी मी एकच विनंती करेल की आता आपल्या देशात मी निर्माण केलेला कोहीनूर सारखा हुबेहूब दिसणारा हिरा आहे ना. मग त्यांचा हिरा त्यांना परत करुन द्या. दानानं माणसाची किंमत कमी होत नाही. कोहीनूरचीही किंमत कमी होणार नाही."
समारोह पार पडला. तिच्या भाषणादरम्यान कोणीच त्या विषयावर काहीही बोलले नाही. ते भारतातही परत आले. परंतू तिच्या बोलण्याचा परिणाम एवढा झाला की इंग्लंडमध्ये बैठक बसली व कोहीनूर परत करण्याचा त्यांच्या बैठकीत सूर गाजला. त्यानुसार त्यांनी भारताचा कोहीनूर हिरा भारताला परत दिला होता. त्यासोबतच दोन्ही देशाचे संबंध सुधारले होते.
भारताला कोहीनूर हिरा मिळाला होता. एक त्याच्याचसारखा हुबेहूब दिसणारा कोहीनूर बंकीगहम पैलेशमध्ये ठेवून. हा ओरीजनल होता. तरी पाहिजे तेवढा चमकत नव्हता. परंतू तो डुप्लीकेट असूनही कोहीनूरपेक्षा जास्त चमकत होता. कारण त्यात जेनिफर आणि गोवर्धनने आपले प्राण ओतले होते. परंतू सोना तो सोना होता व पीतळ ते पीतळच. तेच कोहीनूरबाबतही घडणार होते. ओरीजनल हिरा जास्त चमकत नसला तरी त्याचं चमकणं कधीच संपणारं नव्हतं. अगदी सोन्यासारखं. परंतू डुप्लीकेट हि-याचे चमकणे कधीतरी संपेलच याची भिती वाटत होती. अगदी पीतळेसारखी. ते इंग्लंडलाही माहित होते. परंतू आज ते इंग्लंड त्याचा विचार करीत नव्हते. त्यांना हि-याचा व जेनिफरचा अभिमान होता. कारण कोहीनूर नावाचा एकच हिरा भारतात सापडला होता. तेही एका खाणीत. परंतू जेनिफरनं आपल्या मेहनतीनं कारखान्यात कित्येक कोहीनूर निर्माण केले होते. ते आपल्या पतीच्या गोवर्धनच्या मदतीनं. तो जर नसता तर ना काचेपासून निर्माण होणा-या कोहीनूरला जेनिफर जन्म देवू शकली असती. ना तिनं कित्येक कोहीनूरसारखे दिसणारे हिरे निर्माण केले असते. तिनं आणि त्यानं कोहीनूर निर्माण करण्यासाठी अपार परिश्रम केले होते. ज्यांचा इंग्लंड आणि भारतालाच नाही तर जगाला गर्व होता.

**********************************************************************************समाप्त *******