कथासंग्रह Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथासंग्रह

रक्त पिणारी जात

ते घर.........आज त्या घराला घरपण नव्हतं. कारण त्या ठिकाणी जी माणसं पुर्वी राहात होती. ती माणसं आता दिसत नव्हती. आता त्या माणसांमध्ये गोडवा नव्हता, ओलावा व जिव्हाळाही नव्हता.
ते संयुक्त कुटूंब. त्या कुटूंबात माहिरा आपल्या दोन बहिणी व दोन भावासमवेत राहात होती. त्या कुटूंबात काकाकाकू व आजीआजोबाही अगदी गुण्यागोविंदानं राहात होते. घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं.
माहिराही शाळा शिकत होती. ती लहान होती. ती शाळेत जात असतांना तिला तिच्याच बहिणी शाळेत नेवून देत असत नव्हे तर तिला मदत करीत.
आज माहिरा मोठी झाली होती. तिचा विवाहही झाला होता. त्याचबरोबर तिच्या बहिण भावाचाही विवाह झाला होता. तेही आपआपल्या परीवारात अगदी गुण्यागोविंदानं राहात होते.
तोच काळ.........आता माहिराचे आईवडील म्हातारे झाले होते. आजीआजोबा मरुन गेले होते. काकाकाकूही आता वेगळे राहात होते.
घरानं नातेपण संपवलं होतं. सगळेजण आपआपल्या परीनं आपलं संसारसुख पाहात होते. पण ते घर........त्या घरात आज कोणीच राहात नव्हतं.
माहिराच्या भावाबहिणींचे झालेले विवाह. त्यातच घरी आलेल्या सुना. त्यांचा स्वभाव काही चांगला नव्हता. त्या सुना भांडत होत्या. त्या हिस्स्याची मागणी करीत होत्या. त्यातच जावईही काही कमजोर नव्हते. तेही हिस्सा घ्यायला तयारच होते. ती सर्व मंडळी आपल्या आईवडीलाच्या म्हातारपणाचा विचार करीत नव्हते. माहिराच्याही कुवारपणाचा विचार करीत नव्हते. त्यांना फक्त वाटणी प्रिय होती.
ते घर खुप मोठं होतं. त्या घरात आता कोणी राहात जरी नसलं तरी त्या घराची जागा लय किमतीची होती. त्या जागेचे भाव खुप वाढले होते. त्यामुळं माहिराचे भाऊबहिण हे त्या घराची वाटणी करु पाहात होते. पण वाटणी होणार कशी?
वाटणी होणार कशी? सर्वजण विचार करीत होते की मायबाप त्या घरी आहेत. मायबाप असल्यावर कशी वाटणी करायची? मायबाप वाटणीला तयार नव्हते.
ते घर.........त्या घरात माय बाप व माहिरा. जेव्हापर्यंत माहिराचा विवाह होत नाही, तोपर्यंत घराची वाटणी होणार नाही असं वडीलांनी जाम सांगून टाकलं. पण मुलं ऐकायला तयार नव्हती. ती म्हणायची की आम्ही शहरात राहतो. शहरात सगळ्या वस्तू ह्या महागच असतात. त्यातच किरायाही महागच आहे. तेव्हा माहिराचा विवाह कोणं पाहिला. त्यापुर्वीच आम्हाला घराची वाटणी हवी.
बहिणीही काही चांगल्या नव्हत्या. त्याही नित्यनेमानं भांडण करण्यासाठी येत. अशाच भांडणानं माहिराच्या मायबापाचा जीव किटकिटत असे. त्यांना आत्महत्या करावीशी वाटत असे. पण कसे करणार. माहिराचा विचार मनात होता. आपण अशी आत्महत्या केल्यावर आपली माहिरा अनाथ होणार. तिला हे भाऊबहिण जगूच देणार नाही असं माहिराच्या मायबापांना वाटत होतं.
त्यातच एकदाचा तो दिवस उजळला. शेवटी मायबापांनी नकार दिला. त्यातच त्या दोन्ही जावई व दोन्ही भावांमध्ये एक दिवस तो कट शिजला. उद्या सर्वजण जायचं. बापाशी भांडायचं. नाही दिल्यास मारुन टाकायचं त्या तिघांना. म्हणजे वाटणी सहज सुलभ होईल.
घेतलेला निर्णय व केलेला कट. त्या कटाला आकार देण्याचा दिवस उजळला. ते सर्वजण त्या घरी आले. मायबापानं नकार देताच सर्वजण भांडू लागले. त्यातच त्यांचं चित्त अनावर गेलं व रात्रीच्या अंधारात घेतलेल्या निर्णयानुसार त्यांनी मायबापावरच हल्ला चढवला.
मायबापच ते.......म्हातारे होते. ते पाहिजे त्या प्रमाणात प्रतिकार करु शकले नाही. त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांनी माहिरालाही शोधलं. पण ती शाळेत गेली होती. त्यातच कुणीतरी शाळेत ती खुनाची सुचना दिली आणि सांगीतलं की माहिराचाही जीव धोक्यात आहे. त्यातच शाळेच्या शिक्षकांनी एक फोन पोलिसांना लावला. पोलिसयंत्रणा ताबडतोब घटनास्थळावर आली. लवकरच घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्यांनी ताबडतोब त्यांना ताब्यात घेतले. माहिराला अभय देत तिला आधार नसल्यानं तिला शहरातील आश्रमशाळेत टाकलं. सरतेशेवटी ती केस कोर्टात गेली. कोर्टानं न्याय करुन सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यातच सांगीतलं की माहिरा अठरा वर्षाची झाल्यावर तिला ते संपूर्ण घर देण्यात यावं. या घरावर कोणाचाही ताबा उरणार नाही.
माहिराला आज अठरा वर्ष पूर्ण होणार होती. आज तिला तिच्या ताब्यात घर मिळणार होतं. त्यावर कुणाचाही ताबा असणार नव्हता. त्यातच ती विचार करीत होती.
तिला विचार होता की जर मी या घराचा ताबा घेतलाही. पण हे घर आयुष्यभर माझ्याच ताब्यात राहिल कशावरुन? ती रक्त पिणारी माणसं, कधीतरी जन्मठेपेच्या त्या शिक्षेतून सुटतील. ती बदला घेण्यासाठी परत डाव रचतील. पण माझ्यावर हमला करतील. कदाचित मी विवाह केल्यानंतरही ते हमला करु शकतात. मग ज्या माझ्या मुलाचा व माझ्या पतीचा दोष नसेल, त्यांनाही ती मारुन टाकतील. यापेक्षा आपण हे घर ठेवायला नको. आपण हे घर दान द्यावं.
तो अठरा वर्ष झाल्यानंतरचा आनंद. तो घर मिळण्याचा आनंद. शेवटी माहिरानं निर्णय घेतला. घर दान द्यायचं. ती गावाला आली. ग्रामपंचायतमध्ये गेली. तिनं आपला विचार मांडला. तो विचार सर्वांना पटला, आवडलाही. ग्रामपंचायतनं त्यावर सभा घेतली. सभेत ठराव मंजूर झाला व तशी लिखावट करुन ते घर ग्रामपंचायतीनं ताब्यात घेतलं. पुढं त्या ग्रामपंचायतीनं त्या जागेवर एक वाचनालय उभारलं. जे वाचनालय तिच्या मायबापाची आठवण म्हणून उभं होतं. ज्या वाचनालयातून तशी रक्त पिणारी माणसं तयार होत नव्हती.
माहिराचं पुढं लग्न झालं. ती कधीकधी गावाला येत असे. आवर्जून घराला भेट देत असे. त्या वाचनालयालाही भेट देत असे. तिला क्षणभर आनंद वाटत असे. पण क्षणातच मायबापाची आठवत येत असे आणि तिचा आनंद त्याच अश्रूत रुपांतरीत होत असे. ज्या अश्रूंना आनंदाश्रू म्हणत असत. पुढं जन्मठेपेच्या शिक्षेतून तिचे भाऊबहिण सुटले. पण ते या गावात भटकले नाहीत. त्यांनी कायमचं गाव सोडलं होतं नव्हे तर त्यांना गावाला येतांना फार लाजही वाटत असे.
ती रक्त पिणारीच माणसं होती की ज्यांनी आपले रक्तसंबंध पाहिले नाही. पडताळले नाही. त्या रक्तसंबंधाचा विच्छेद केला नव्हे तर ते नात्याचेच नाही तर रक्ताचे संबंध संपविले होते. काय भेटलं त्यांना आपल्या जन्मदात्यांचा खुन करुन. काहीच नाही. पण स्वार्थ आणि लालसेनं त्यांनी रक्तसंबंधही पाहिले नव्हते. स्वतःच्याच जन्मदात्यांचे जणू त्यांनी रक्त प्राशन केले होते.

आश्वासनाचं भूत

सोनाली, अमृता व काजल तीन मैत्रीणी. तिघींही एकमेकांवर प्रेम करीत असत. शाळेतही ते मिळून मिसळून राहात असत. एकमेकांचा डबाही खात असत.
काजल आणि सोनाली या सख्ख्या बहिणी होत्या. दोघींचही एकमेकांवर अतूट प्रेम होतं. त्या दोघीही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हत्या. त्यातच त्या केव्हा मोठ्या झाल्या ते कळलच नाही.
काजल वयानं लहान होती. तर सोनाली वयानं मोठी होती. त्यातच आता सोनाली लग्नाची झाली होती. ती वयात आली होती. त्यातच ती सुंदरही दिसत होती.
अमृता सोनालीच्याच वयाची होती. तिही उपवर झाली होती. मात्र काजल लहान होती. तिच्या विवाहाला अजून दोनचार वर्ष वेळ होता.
मुलगी वयात आली की मायबापांना जशी चिंता असते. तशी चिंता सोनालीची तिच्या मायबापाला पडली. तेच अमृताच्याही घरी झालं. मात्र दोघींचंही नशीब हे फुटकं निघालं. अमृताला निकम्मा व दारुडा पती मिळाला. त्यातच सोनालीचा पती हा दारु पिणारा असला तरी काम करणारा होता. अमृताचा पती हा अरेंज मैरेजचा होता. तर सोनालीचा पती हा लव्हमैरेज. सोनालीनं घरातून पळून जावून विवाह केला होता.
आज देश विकासाच्या क्षेत्रात मोठमोठ्या पाय-या चढत आहे. लोकं मोठमोठ्या गोष्टी सांगतात. पाश्चीमात्यांचा राजरोषपणे गवगवा करतात. मात्र मुलानं किंवा मुलीनं आंतरजातीय विवाह केलाच तर तो दोन्हीकडील मायबापांना सहन होत नाही. त्यातच त्याची परियंती सैराट चित्रपटातील कथानकासारखी होते. सोनालीचंही तेच झालं.
सोनाली उपवर झाली. त्याचबरोबर तिच्या मायबापानं तिच्यासाठी वर शोधणं आवश्यक होतं. पण ते शक्य तितक्या लवकर वर शोधतील तेव्हा ना. त्यांना वाटत होतं की काजलला विवाहाला दोनचार वर्षच तेवढे बाकी असल्यानं सोनालीचा व काजलचा विवाह एकाच मंडपात करु.
मायबापानं केलेला विचार हा रास्त जरी असला तरी तो विचार सोनालीला पटला नाही. तसा तिनं त्यावर कोणताच विरोधही दर्शवला नाही. परंतू ती काजलच्या विवाहापर्यंत थांबेल तेव्हा ना. त्यातच अमृताचा विवाह झाला होता.
अमृताचा विवाह झाला होता. तिचं अरेंज मैरेज होतं. ती काही सुखी नव्हती. तशी सोनाली अमृताकडं जायची. हालहवाल विचारायची. तिलाही विवाह करावासा वाटत नव्हता. पण काय करणार. देशात मुलींचं काही ऐकतील तेव्हा ना. त्यातच सोनाली ही एक मुलगीच होती.
सोनालाही विवाह करावासा वाटत होता. तसं तिचं एका तरुणावर प्रेम निर्माण झालं. तो तरुण.....तो तरुण वरवर चांगला दिसत होता. पण आतमधून सोनाली काही त्याला चाचपडून पाहू शकली नाही. त्यातच सोनालीला तो आश्वासनासह प्रलोभनही देत असे.
दोघांचं आपापसात निर्माण झालेलं प्रेम. त्यातच त्यांचं तासन् तास मोबाइलवर बोलणं, चाणाक्ष मायबापानं हे बोलणं हेरलं. त्यांनी सोनालीला चांगलं फटकारलं. त्याचं सोनालीला फार वाईट वाटलं. ते मायबापाचं बोलणं तिनं आपल्या प्रियकराला सांगीतलं. त्यातच तो प्रियकर विचार करु लागला. त्यानं तिला समजविण्याऐवजी तिला भडकवलं. त्यातच त्याच्या आश्वासनाची बळी ठरत सोनालीनं त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.
असाच तो दिवस उगवला. मध्यरात्र ओलांडली होती. त्यातच कुत्रीही भुंकत होती. बाहेर अंधार पसरलेला होता. भयंकर भीती वाटत होती. तसं सोनालीचं त्या मुलांवर प्रेम........तिला प्रेमानं त्या अंधाराची काहीच भीती वाटली नाही.
घरात सर्वजण झोपले होते. अशातच सोनाली उठली. तिनं आजुबाजूला पाहिलं. आजुबाजूला सगळे गाढ झोपेत होते. पळून जाण्यासाठी संधी नामी होती. तसं सोनालीनं आपलं सामान बांधलं. सर्वांकडं एक कटाक्ष टाकला व गुपचूपपणे घराचा दरवाजा उघडला व घरातून बाहेर पडली.
सोनाली घरातून बाहेर पडली. थोडी चालत गेली. तसा दूर अंतरावर तिचा प्रेमी उभा होता. ती त्याचेजवळ गेली. तसं त्यानं तिला पळवून नेलं नव्हे तर ती राजीखुशीनं पळून गेली.
दुसरा दिवस उजळला. सोनालीचे मायबाप उठले. त्याचबरोबर काजलंही. त्यांनी सोनालीला अंथरुणावर पाहिलं. सोनाली काही अंथरुणावर दिसली नाही. तसा त्यांनी दिवसभर तिचा शोधाशोध केला. पण सोनाली काही गवसेना. त्यानंतर शेवटी त्यांनी पोलिसस्टेशनला तक्रारही दाखल केली.
पुरते आठ दिवस झाले होते. सोनाली काही दिसली नाही, हे पाहून सोनालीचे मायबाप चूप बसले. सोनालीचं प्रकरण बंद झालं. त्याचबरोबर तिच्या आठवणीही मायबापांनी बंद केल्या. मात्र ह्रृदयावर जे घाव सोनालीनं दिले होते. ते घाव जरी बसले असले तरी त्याचे व्रण तेवढे शिल्लक होते. ते व्रण त्या मायबापांना कासावीस करीत होते.
पळून जाणं ही गोष्ट स्वाभावीक आहे. पण ते पळून गेल्यावर संसार थाटणं कठीण गोष्ट आहे. सोनाली पळून तर गेली खरी. पण ती जेव्हा संसारात पडली. तो संसार आता करणं कठीण जात होतं. तो शहराचा नवीन भाग. त्या भागात सोनाली व तिचा पती किरायाचा कमरा घेवून तर राहले. पण सोनालीचा पती हा निकम्मा होता. त्याचं नाव रोहित होतं.
रोहितनं आश्वासन देवून तिला पळवून तर नेलं खरं. पण तिला पोषणं त्याला जड जात होतं. सोनालीजवळ जेवढा पैसा होता. त्या पैशात तिनं घरसंसार चालवला. पण जेव्हा पैसे संपले. तेव्हा उपाशी राहायची पाळी आली. त्यातच सोनालीला आता कामाला निघणं भाग होतं.
सोनाली त्या शहरातल्या गल्लीगल्लीत फिरुन काम शोधू लागली. त्यातच तिला कामंही मिळालं. तशी ती त्या कामावर आता रोज जावू लागली होती.
सोनाली नित्य कामाला जात असे. कमवून आणलेले पैसे हे एखाद्या डब्यात ठेवत असे. मात्र रोहित कामावर अजिबात जातच नव्हता. त्यातच तो तिनं कमावून आणलेले पैसे चोरायचा व त्याची तो दिवसभर दारु ढोकसायचा. तो दिवसभर कामाला न जावूनही सायंकाळी सोनाली घरी येताच भांडणंही करायचा. त्यातच दररोजच मारझोडंही करायचा. शेवटी ती कंटाळली व तिनं त्याला सोडून बापाकडं जाण्याचा निर्णय घेतला. त्यातच माफी मागण्याचाही निर्णय घेतला.
एक दिवस सोनाली त्याला सोडून मायबापाच्या घरी गेली. माफीही मागीतली. पण तिला पाहताच मायबापाला तिचा राग आला. त्यांना वाटायला लागलं होतं की सोनालीनं घोडचूक केली. तिला माफी देणं नाही.
मायबापानं सोनालीला माफ केलं नाही वा तिचे लाडंही पुरवले नाही. त्यामुळं सोनाली तिथून निघाली. ती आपल्या सासूसास-याच्या घरी गेली. त्यांना रोहितची कैफियत सांगीतली. पण त्यांनीही तिला तिचीच चूक दाखवून घरातून हाकलून दिले.
सोनाली सासरवरुनही निघाली. तिच्या डोक्यातील आश्वासनाचं भूत उतरलं होतं. तिला तिची चूक लक्षात आली होती. तशी ती त्या जीवनाला कंटाळलीच होती. ती तशी हताश झाली व तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले.
ते आत्महत्येचे विचार. त्यातच त्या विचारांची परियंती वास्तवतेत झाली. सोनालीला आपला जीव संपवासा वाटला. त्यातच तिनं चिठ्ठी लिहिली. चिठ्ठीत लिहिलं,
' मी आत्महत्या करीत आहे. पण त्यात माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी समजू नये. त्यात कोणाचाही दोष नसून मी स्वखुशीनं आत्महत्या करीत आहे.' त्यानंतर सोनालीनं आत्महत्या केली.
सोनालीनं आत्महत्या केली खरी. पण तिनं काही त्यात दोष रोहितचा दाखवला नाही. कारण तिला तिचीच चूक दिसत होती. तसं तिचं आजही रोहितवर जास्तच प्रेम होतं.
सोनाली मरण पावली होती. तीन चार दिवस झाले होते. सोनालीबद्दल कोणीच दखल घेतली नाही. सासूसास-यांना व मायबापाला वाटलं की ती रोहितकडं गेली असेल. तर रोहितला वाटलं की ती मायबापाकडं गेली असेल. पण तीनचार दिवसानं तिचं प्रेत जेव्हा त्या गावच्या विहिरीत दिसलं. त्यानंतर त्या प्रेताची तपासणी करण्यासाठी ते प्रेत तपासणीला पाठवलं व संशयावरुन रोहितला पोलिसांनी पकडून नेलं.
तपासणीत रोहितनं गुन्हा कबूल केला. त्यातच तो गुन्हेगार ठरला. अशातच तपासणीचा अहवाल आला. तिनं जी चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी तिच्या तोंडात होती. ज्या चिठ्ठीत लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरु नये. त्यात तिचाच दोष असून इतर कोणाचाही दोष नाही. ती स्वखुशीनं आत्महत्या करीत आहे. त्या इच्छानुसार व चिठ्ठीनुसार रोहितला सोडून देण्यात आले. आता तिचा पश्चाताप तिच्या मायबापांना होत होता. तिच्या सासरच्या मंडळींनाही होत होता, नव्हे तर रोहितलाही. पण आज जगात सोनाली नव्हती.
अमृताच्याही बाबतीत तेच घडलं होतं. तिचाही पती दारु पिणाराच होता. तोही निकम्माच होता. तिनंही त्याला सोडायचा निर्णय घेतला होता. तिही मायबापाकडं आली. पण तिचं अरेंज मैरेज असल्यानं की काय, तिला मायबापानं जवळ केलं. तिला पोषायचं आश्वासन दिलं नव्हे तर मायबाप पोषू लागले. आज अमृता मायबापाच्या घरी होती. ती खुश होती. तिला जेव्हा सोनालीबद्दल माहित झालं. तेव्हा तिला वाटलं की मीही जर पळून गेले असते, तर माझीही गत सोनालीसारखीच झाली असती. तिनंही सोनालीचा धसका घेतला खरा. पण सोनालीसारखं तिनं केलं नसल्यामुळं आजही अमृता खुश होती.
काजलनं मात्र सोनालीच्याच आत्महत्येचा धसका घेतला होता. तिला वाटत होतं की जर तिला पती असा निकम्मा व पियक्कड मिळाला तर........आज ती उपवर झाली होती. पण विवाह करण्यासाठी मागंपुढं पाहात होती. कधी कधी तिला तिची बहिणच भूत म्हणून दिसत होती नव्हे तर तेच भूत तिला विवाह करु नको म्हणून खुणावत होती असे वाटत होते.
तशी काजल विवाह करण्याच्या प्रयत्नात तर नव्हतीच. पण समजा विवाह केलाच तर तो असा पळून जावून करु नये असे तिला वाटत होते. तिला असंही वाटत होते की जर सोनाली पळून गेली नसती तर माझ्या मायबापानं तिला जवळ केलं असतं. तिला प्रेमानं कुरवाळलं असतं अगदी अमृतासारखं. ती पळून गेली नसती तर आज सोनाली जीवंत असती.
सोनालीच्या आश्वासनाचं हे भूत हे आज काजललाच नाही तर रोहितलाही सतावत होतं. काजलचा विवाह झाला नव्हता. तसेच रोहित जास्त प्यायला लागला होता. काजलची विवाह करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तर रोहितही सुधरायचे नावच घेत नव्हता. अमृता मात्र सुखी होती. तिनं योग्य निर्णय घेतला होता विवाहाच्या बाबतीत. आज ती मायबापाच्या घरी राहून दिवसभर काम करुन रातच्याला सुखाची झोप घेत होती. तिला कधीकधी सोनालीची आठवण यायची. जेव्हा काजल तिच्या घरी यायची. पण तिनं कधीच आपल्या आयुष्यात अशा आश्वासनाचं भूत डोक्यावर चढू दिलं नव्हतं. तिनं योग्यवेळी योग्य निर्णय घेतला होता. त्यामुळंच ती आज सुखी होती.
विवाह हा क्षणभराचा आनंद देणारा सोहळा असला करी विवाह करतांना वरवधूंनी योग्य चौकशी करुनच निर्णय घ्यावा व त्यानंतरच विवाह करावा. सोनालीनं काही चुकीचे निर्णय विवाह करतांना घेतल्यामुळं त्याची परियंती आत्महत्येत झाली. जर तिनं विवाह करण्यापुर्वीच आश्वासनाच्या भुताला थोडं बाजूला सारुन योग्य निर्णय घेतला असता तर आज तिची जी गत झाली. त्याचे परीणाम काजलला भोगावे लागले नसते व आज काजलही विवाहबद्ध होवून संसारात रममाण झाली असती. आज सोनालीच्या निर्णयानं काजल बरीच मोठी होवूनही विवाह करण्यास धजत नव्हती नव्हे तर तिला विवाहाची भीती वाटत होती. पती कसा निघेल याची चिंता करीत. कारण तिनं अमृता व सोनालीचे पती पाहिले होते. जे निकम्मे तर होतेच. शिवाय दारु पिणारे व मारझोड करणारेही होतेच.

वाढदिवस

त्याचं नाव संदेश होतं. तो मायबापाचा एकुलता एक मुलगा होता. दरवर्षी त्याचा वाढदिवस यायचा व त्याचे मायबाप त्याचा वाढदिवस साजरा करायचे. त्यांना वाढदिवस साजरा करतांना मोठा आनंद वाटायचा. तसा आज संदेश उपवर झाला होता. याही वर्षी दरवर्षीप्रमाणे तो वाढदिवस साजरा करणार होता. अशातच यावर्षी कोरोना आला होता. त्यानं फारच धुमाकुळ घातला होता. अशातच संदेशचा वाढदिवस होता.
संदेश थाटामाटात वाढदिवस साजरा करणार होता. त्यानं त्यासाठी जय्यत तयारीही केली होती. पत्रीका छापल्या होत्या. जेवणासाठी चांगला आचारीही पाहिला होता. नव्हे तर मंडप वाल्यालाही आर्डर दिली होती.
सरकारी आदेश होता की कार्यक्रम करु नका आणि करायचाच झाला तर फक्त पन्नासच लोकं कार्यक्रमाला बोलवा. सरकार त्यासाठी लक्ष ठेवून होतं. त्यांना वाटत होतं की कोरोनाचा प्रसार होवू नये.
संदेश हा अहंकारी पुरुष होता. त्याला वाटत होतं की त्याला कोरोना होवूच शकत नाही. शिवाय वाढदिवसाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. त्यामुळं त्याला सरकारी आदेशाशी काही लेनदेन नव्हतं. सरकार काय फुकटच आदेश काढतं आणि मरण येणारच, मग ते काचेच्या महालात जरी स्वतःला बंदिस्त करुन घेतलं तरी. असं तो म्हणत असे.
असाच तो वाढदिवसाचा दिवस उजळला आणि संदेशनं मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. स्वयंपाकात पाची पक्वान बनवले. चांगलं सर्वांना खावू पिवू घातलं.
संदेशच्या वाढदिवसालाही लोकांनी फार मोठी गर्दी केली होती. लोकंही भरपूर आले होते. त्यांनी मास्कही लावला नव्हता. पुरेसं अंतरही पाळलं नव्हतं. त्यातच लोकांनी संदेशला बक्षीसही दिलेत तेव्हाही सुरक्षितता पाळली नव्हती.
वाढदिवस साजरा करुन लोकं आपल्या आपल्या घरी निघून गेले. त्यातच दुसरा दिवस उजळला. संदेशला आज मात्र थकल्याथकल्यासारखं वाटायला लागलं. हलकासा ताप, सर्दी जाणवायला लागला. तरीही तो उठला. त्यानं घरची जी कामं होती. ती पूर्ण केली. त्यातच ते काम करीत असतांनाही थकवा वाटतच होता. ते पाहून त्याला वाटलं की काल वाढदिवसाच्या दगदगीनं असं अस्वस्थ वाटत असावं.
सकाळचे दहा वाजले होते. तशी त्याला चक्कर यायला लागली. त्यातच आराम करावसं वाटत होतं. तसा तो अंथरुणावर पहूडला. तसं त्याच्या आईनं विचारलं,
"बाळ काय झालंय."
"काही नाही गं. कालच्या कामानं थोडं अस्वस्थ वाटतेय. अगदी थकल्यासारखं. म्हणून पहूडलो थोडासा."
आईलाही वाटलं की काल जी बाळानं कामं केली, त्यामुळं कदाचित अस्वस्थ वाटत असेल. म्हणून तो झोपला असेल. तसं तिनं त्याकडं दुर्लक्ष केलं.
संदेश मायबापाचा एकुलता एक मुलगा. तो उपवर झाला होता.,पण दरवर्षी तो न चुकता आपला वाढदिवस साजरा करायचा. तो एकुलता एक असल्यानं मायबापही त्याचे लाड पुरवायचे. त्यातच घरातील वाढदिवसाकरिता करण्यात येणारी सर्व कामे तोच करायचा. त्यामुळं तो थकायचाही दरवर्षी. तीच गत त्याची याहीवर्षी होती. त्यामुळं कदाचित त्याच्या आईनं त्यावर दुर्लक्ष केलं होतं.
दुपारचे तीन वाजले होते. आता संदेशला फारच थकल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं की संदेशला कोरोना झालाय. तसा आता त्याला खोकलाही जाणवत होता.
संदेशचे मायबाप पैसेवालेच होते. त्यामुळं प्रकृती अशी अस्वास्थ वाटताच त्याच्या मायबापानं त्याला खाजगी दवाखान्यात नेलं. खाजगी डॉक्टरानं त्याला काही औषधी दिली आणि सांगीतलं की आराम लागेल.
दुसरा दिवस उजळला. संदेशची प्रकृती जास्तच खराब वाटत होती. कालच्या औषधानं काही आराम झाला नव्हता. परत त्याला डॉक्टरकडं नेण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगीतलं की तुम्ही याची कोरोना तपासणी करुन पाहा.
डॉक्टरांनी कोरोना तपासणी करायला सांगताच त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. तसा कोरोना तपासणी अहवाल येण्यापुर्वीच संदेशला दवाखाण्यात भर्ती करावं लागलं.
कोरोना तपासणीचा अहवाल आला होता. त्याला कोरोना झाला होता. कोरोना जलदगतीवर होता. डॉक्टरांनी सांगीतलं. कोणाच्या तरी संपर्कात आल्यानं याला कोरोना झाला असावा. तसे संदेश व संदेशचे मायबाप विचार करु लागले. आपण वाढदिवस सादरा केला. त्यातूनच कोणाच्या तरी संपर्कात आपला मुलगा आला असावा.
डाक्टरांनी संदेशवर उपचार करणे सुरु केले होते. तसा तो कोमातच गेल्यासारखा निपचीत पडला होता. त्याचं जेवनखावण सलाईननच देणं सुरु होतं. अशातच तो एक काळा दिवस उजळला.
आज तो काळा दिवस होता. संदेश कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नव्हता. असं वाटत होतं की तो या जगातून निघून गेला. तशी सुचनाही डॉक्टरांनी त्याच्या वडीलांना दिली होती. मायबाप रडत होते एकुलत्या एक पुत्राच्या वियोगानं. कारण त्यांना त्यांचा संदेश मरण पावल्याचाच निरोप मिळाला होता. तो वाढदिवस साजरा करणं आपल्या जीवावर बेतलं असं त्यांना वाटायला लागलं होतं. डॉक्टरांनी तर परिचारीकेला त्याचं शरीर शयनकक्षात पाठवायला सांगीतलं होतं. अशातच त्याला लावलेल्या एकेक नळ्या काढणं सुरु झालं आणि काय आश्चर्य. संदेशच्या शरीरानं थोडासा प्रतिसाद देणं सुरु केलं.
संदेशच्या शरीरानं दिलेला थोडासा प्रतिसाद........परिचारीकेनं तशी सुचना डॉक्टरांना दिली. ताबडतोब डॉक्टर धावून आले. त्यांनी ताबडतोब पुन्हा संदेशला त्या नळ्या जोडल्या. हळूहळू त्याचं शरीर चांगलंच प्रतिसाद द्यायला लागलं व लवकरच संदेश या कोरोनाच्या आजारातून बरा झाला.
संदेशच्या आईवडीलांनी विधात्याचे आभार मानले. कोरोनाच्या साथीत शरीरातून निघून गेलेला जीव आज शरीरातून निघून गेलेला असूनही परत आला होता. जणू ही निसर्गाचीच लीला वाटत होती. जणू निसर्गानं कोरोना आजाराच्या रुपानं त्याला शिकवण दिली होती की कोरोना आजार महाभयंकर आहे. त्यामुळं कोरोनाच नाही तर जगातील कोणत्याही आजाराबाबत काळजी घ्यायला हवी. गर्दी करु नये. मास्क बांधावे, सुरक्षीत अंतर ठेवावे. चांगल्या वस्तू खाव्यात. जेणेकरुन आरोग्य चांगलं राहिल. हाच संदेश कोरोनानं संदेशला दिला होता.
आता संदेश कधीच आपला वाढदिवस साजरा करीत नव्हता. कधीच गर्दीच्या ठिकाणी जात नव्हता. विना मास्कनं कधीच प्रवास करीत नव्हता. बाहेरचं फास्टफुड जास्त करुन खात नव्हता. तसंच घरी जेवणापुर्वी आधी हात स्वच्छ करुनच नंतर जेवन करीत होता. कोरोना आजारानं त्याला या सर्व सवयी लावल्या होत्या. आता तो जास्त करुन आजारी पडत नव्हता. तसंच रुग्णालयातही भर्ती होत नव्हता. कारण आजार हे त्याला कधी शिवत नव्हते. हे सर्व त्याला कोरोनानंच शिकवलं होतं.