Author books and stories free download online pdf in Marathi

लेखक

लेखक कादंबरी
अंकुश शिंगाडे



भाग १

सारखा मुसळधार पाऊस कोसळत होता.सगळं जनजीवन विस्कळीत झालं होतं.पुष्कळ प्रमाणात झाडं पडली होती.
मागील वर्षीही असाच पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता.त्यात अख्खं गाव पाण्यात बुडलं होतं.तोच प्रकार आताही.पण कमी प्रमाणात.त्यातच ते गाव आज पावसाचा जोर पाहताच चूप बसलं होतं.याहीवर्षी गावच्या नदीला महापूर येईल की काय अशी शंका दिसत होती.तसेच हे पावसाचे स्वरुप कमी प्रमाणाचे असले तरी त्यात भीती मात्र लोकांना फार मोठी वाटत होतीच.
सावित्री,अर्जुना,शिवगंगा,वशिष्ठी या कोकणातल्या बहुतःश नद्यांना पूर होता.अगदी दुथडी भरुन वाहात होत्या त्या नद्या.त्यातच त्या नद्या ज्या भागात वाहात होत्या.त्या भागातील नद्यांच्या किना-यावर राहणा-या लोकांना अतिशय भीती वाटत असून त्यांना रात्ररात्र झोपही लागत नव्हती.
एकीकडे कोरोनानं थैमान घातलेले असतांना दुसरीकडे पाऊसही आपला इंगा दाखवतांना दिसत होता.त्यातच आमचा गुन्हा काय म्हणत लोकं एकीकडे कोरोनाशी तर दुसरीकडे या पावसाशी लढत होते.त्यामुळं हा पाऊस केव्हा जातो आणि केव्हा नाही असे येथील लोकांना वाटत होते.काय करावं याचा त्यांच्यासमोर उपाय नव्हता.
मागे असाच विदर्भात मोवाडला वर्धा नदीवर पूर आलेला होता.त्यात बरीचशी घरं तसेच लोकंही वाहून गेले होते.त्यामुळं बरीच धुळधानी झाली होती.नव्हे तर लोकांचं बरंच नुकसानही झालं होतं.त्यामुळं पाऊस केव्हा काय करेल?याचा नेम नव्हता.असे लोकांना वाटत असल्यानं लोकं धास्तावलेले होते.त्यातच कोकणात जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यानं कोकणात दरडी कोसळण्याच्या भीती निर्माण झाल्या होत्या.माळीण सारख्या भागात २०१४ मध्ये दरड कोसळून ११९ लोकं ठार झाले होते.
महत्वाचं म्हणजे पूर,वादळ,भुकंप ह्या नैसर्गीक गोष्टी.ह्या गोष्टी घडणारच.पण ह्या गोष्टीतून त्याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडून वागणे बरोबर नाही.
अलिकडे काही ठिकाणी असेही पाहायला मिळते की जर गावच्या नदीला पूर आलाच तर मंदीरात बकरा,कोंबडा भाव देवून कापतात.तसेच पाऊस यायला हवा म्हणून आषाढ महिण्यात बक-याची दावण देवीला चढवली जाते.
पाऊस येणे,पूर येणे,वादळ येणे,भूकंप येणे,त्सुनामी येणे,तसेच दरडी कोसळणे ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत.ह्या नैसर्गिक गोष्टी केव्हा होतील आणि केव्हा नाही हे सांगता येत नाही.कधी पाऊस भरपूर येतो,तर कधी कोरडा दुष्काळ पडतो.ह्या गोष्टी हवामानावर घडत असतात.पण काही लोकं अंधश्रद्धा बाळगताना दिसतात.
काही गावात आजही पाऊस येत नसल्यास गावातील लोकं शिवपींडीवर पाणी ओततात. शिवपींडीवर पाणी ओतलं की पाऊस पडतो असं गावक-यांचं मत असतं.काही लोकं गावात अशा प्रकारचं संकट येवू नये म्हणून देवीला कोंबडा कापतात.बकराही बळी देतात.नव्हे तर पुर्वीच्या काळी राज्यात संकट येवू नये म्हणून घोडा किंवा रेडा बळी देण्याची प्रथा होती.कधी कधी मेंढाही बळी देत असत.
काही काही ठिकाणी(जमातीत) परीवारातील मोठा मुलगा बळी देण्याची प्रथा होती.महत्वाचं म्हणजे असा बळी जर दिला नाही तर संकट येणार.असं लोकांचं मत होतं.
अलिकडे लोकं शिकत आहेत.संविधानानं सर्वांना शिक्षण घेण्याची व्यवस्था करुन दिली आहे.आता तर देवालाही काही करायचे असल्यास संविधानाची अर्थात कोर्टाची परवानगी घ्यावी लागते.एवढंच नाही तर आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.मागे तर आमच्या बहुतेक शहरात मंदिर पाडली.आता ही कोरोनाच्या काळात मंदीराना कुलपे असून देव कुलपात बंद ठेवला होता.मशिदीचेही तेच हाल होते.मशिदीतही नमाज पढण्यावर बंदी आलेली होती.पण हे सगळं कोरोना होता म्हणून.
बळी देणे ह्या कुप्रथा होत्या.मग तो कोंबड्या बक-याचा बळी असो की माणसाचा.हं बळी देतांना मोठ्या माणसाचा बळी देत होते.लहान मुलांचाही बळी दिला जात होता.ज्या,मुलांनी जग पाहिलेलं नव्हतं.कोंबड्या बक-याचा बळी दिला जात होता.त्या प्राण्यांना काही समजत नव्हतं म्हणून.अन् काही ठिकाणी लाचार माणसंही कापली जात होती.त्याचे हातपाय बांधून.ह्या प्रथा राजरोषपणे सुरु होत्या काही ठिकाणी.पण त्या प्रथांबाबत राजरोषपणे बोलता येत नव्हतं.कारण यात माणसांचा केव्हा बळी जाईल हेच सांगता येत नव्हतं.काही ठिकाणी बळीचे स्वरुप वेगळे होते.ते गुप्त धन मिळायला हवे म्हणून बळी द्यावा लागतो.असं त्यांचे म्हणणे होतं. खरंच असे बळी देण्यानं पाऊस पडतो का?
खरंच असा बळी देण्यानं गुप्त धन मिळतं का?तर याचं उत्तर नाही असंच होतं.असा बळी देण्यानं पाऊस थांबतो का?अन् असा बळी देण्यानं पाऊस येतो तरी का? जर असा बळी देण्यानं पूर,भूकंप,वादळं जर थांबली असती.तर कशाला झाडं लावावी लागली असती.ह्याचा विचार करण्याची गरज होती.पूर,भूकंप,वादळं तर येणारच.त्यासाठी अंधश्रद्धा बाळगायला नकोच.असंही सारखं वाटत होतं.
रामभाऊ नावाचा माणूस.तो ही याच भागात राहात होता.त्याचं घर तनामनाचंच होतं.कोकणात जास्त पाऊस पडतो म्हणून त्या रामभाऊचं घर कोकणच्या शहरात पाहिजे तेवढं मोठं नव्हतं.स्लँब होतं.पण ते एकच मजली घर बांधलं होतं.
रामभाऊ शहरात राहायला आला होता.त्यानं एकच मजली का होईना टिनाचं घर बांधलं होतं.त्यातच त्या टिनाच्या घरात पाऊस येताच पडणा-या पावसाच्या थेंबांच्या आवाजानं रात्रभर झोप यायची नाही.त्यातच त्या टिना जुन्या झाल्यानं त्यातून थेंब थेंब पाणी गळत होतं.हे थेंब थेंब पाणी गळत असतांना त्या पाण्याच्या खालची जमीन ओली होवू नये म्हणून गळतुनीवर घरची भांडी लावता लावता त्याचे दिवस जात होते.त्याला काय करावं ते सुचत नव्हतं.पत्नी मात्र सारखी भांडण करीत असे.परंतू तो तरी काय करणार?त्याची ही घरची परीस्थिती बेताचीच होती.
रामभाऊची पत्नी त्याला फार बोलायची.कधी टाँगटिंग मारायची.त्यातच त्यांची नेहमी भांडणं होत असत.त्यातच परीस्थितीनं गाजलेला रामभाऊ.......त्याला घरी राहाणं मोठं मुश्किल जात होतं.कधी कधी मरुनही जावंसं वाटत होतं.
रामभाऊ लेखक होता.त्याचे लेख मोठमोठ्या वर्तमानपत्रातून छापून येत होते.तसं पाहता रामभाऊला या लेखावर भरपूर फोन येत.पण पैशाचं काय?त्या त्याच्या शौकातून काहीच पैसे मिळत नसे.
रामभाऊच्या पत्नीचं नाव जानकी होतं.जानकीला ज्यावेळी पाऊस यायचा.त्यावेळी विचार यायचा की आपण या टिनातून थेंब थेंब पाणी थबकणा-या घरात राहायचं कसं?
रामभाऊचं घर जसं टिनाचं होतं.तसंच त्या घराला शौचालयही नव्हतं.त्यामुळं तर जानकी जास्तच ओरडायची अन् ओरडणार का नाही?तिला रामभाऊ कोणत्याच प्रकारचं सुख देत नव्हता.
रामभाऊ जरी लेखक होता.जरी त्याला दूरदुरुन फोन येत होते तरी,त्या लेखानं त्याचं पोट भरीत नव्हतं.
त्यामुळं जानकीचे त्याला खडे बोल बोलणे स्वाभाविक होते.तसे विचार त्याला यायचे.जे स्वातंत्र्य त्याच्या देशाला मिळाले होते.
तो कधीकधी भांडणावरुन उदास बसत असे.असंच आज शुल्लक कारणावरुन जानकीशी भांडण झालं होतं.तो निराशेत बसला होता.तसा एक विचार स्वातंत्र्याबद्दल त्याच्या मनात आला.
दरवर्षी देशात स्वातंत्र्यदिन साजरा होत असतो.लोकं तोरणा पताका लावून स्वातंत्र्यदिन साजरा करतात.मग हा दिवस साजरा करीत असतांना कोणी गालावर तिरंगा काढतात.कोणी हातावर तर कोणी चक्क डोक्याचे केस कर्तन करीत स्वातंत्र्यदिनाचा आनंद दाखवतात.सगळा आनंद.....चिकार आनंद.......
स्वातंत्र्यदिन साजरा करणे ही काही दाखवायची वस्तू आहे का की त्या स्वातंत्र्याला जे अभिप्रेत आहे.त्यानुसार वागण्याची गरज आहे.स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना काही तर असा आव आणतात की जणू त्यांनीच देश स्वातंत्र्य करतांना झुंज दिली.बाकीचे लढलेच नाही.
आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करतो.करायला पाहिजे.पण हा स्वातंत्र्यदिन केवळ साजरा करुन चालत नाही तर त्यानुसार वागलोही पाहिजे.तेव्हाच त्या स्वातंत्र्याला अर्थ येवू शकतो.पण निव्वळ स्वातंत्र्यदिन चांगला जोमात साजरा करीत असू आणि त्यानुसार वागत नसू, तर त्या स्वातंत्र्याचा अपमान असून आपण त्या स्वातंत्र्याची कत्तलच करीत आहोत असे वाटते.
१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र्य झाला आणि कित्येक वर्षाच्या गुलामगीरीतून देशाची मुक्तता झाली. काहींनी स्वतः स्वातंत्र्यासाठी लढता लढता स्वतः फाशी सहन केली.पण इंग्रजांसमोर झुकले नाहीत.काय त्यांच्यात स्वार्थ नव्हता काय? स्वार्थ जर नसता तर रघुनाथरावासारखी व मिरजाफरसारखी मंडळी इंग्रजांना शरण गेली नसती.इंग्रजांनी 'डाव्या हातानं खा की उजव्या हातानं खा' अर्थात त्यांना शरण जा की नका जावू,कोणालाच सोडलं नाही.म्हणूनच जो आपल्या देशाचा होवू शकला नाही,तो आपला कसा होवू शकतो, असा विचार करुन त्या शरण आलेल्या शरणार्थीचा पाहिजे तेवढा उपयोग करुन घेतला.शेवटी काय त्यांना कैदेत टाकणे तसेच त्यांची कत्तल करणे, याही गोष्टी त्यांनी केल्या.
१८५७ चा राष्ट्रीय उठाव सर्वांना माहीतच असेल.काय होतं तात्कालिक कारण?कुणाकुणाला माहितही नसेल कदाचित.तात्कालिक कारण होतं हिंदू मुस्लिमांच्या धर्मभावनांना ठेच देणे.अर्थात इंग्रजांकडे जे सैनिक होते.त्या सैनिकांमध्ये हिंदू आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्माचे सैनिक होते.मग इंग्रजांनी याचा विचार केला नाही की हे सैनिक म्हणजे भारतीय मंडळी.हे आपल्या राजसत्तेचे सैनिक बनून आपली सेवा करीत आहेत.नव्हे तर आपल्याला मदतच करीत आहेत.त्यांनी असा विचार केला नाही.उलट जे सैनिक म्हणून त्यांना मदत करीत होते.ते विसरुन त्यांना दिलेल्या बंदूकीला जे काडतूस लावलं होतं.ते त्यांचा धर्म विटाळविण्यासाठी लावलं होतं.अर्थात मुसलमानांना ज्या बंदूका दिल्या होत्या.त्या बंदूकीच्या काडतूसाला डुकराची चरबी व हिंदूंच्या बंदूकीला गाईची चरबी लावलेली होती.मुसलमानाला डुकर निषिद्ध होतं,तर हिंदूंना गाय पवित्र.हे जेव्हा माहित झालं,तेव्हा धर्मभावना भडकणार नाही तर काय?
आजही स्वातंत्र्य भारतात असेच लोकं आहेत.जे लोकं मदत करीत असतात.पण ते सर्वांना समान न लेखता आजही अशाच प्रकारचं वर्तन करीत असतात.फरक एवढाच पडला आहे की या ठिकाणी थोडासा धर्म बाजूला आहे.या दोन धर्माच्या जागी आपला आणि पराया असा भाव निर्माण झाला आहे.मग जे असे मिरजाफर,रघुनाथ सारखे लोकं आहेत.ते आज स्वतंत्र्य भारतातील राज्य करणा-या इंग्रजांना निंदेच्या स्वरुपात माहिती सांगत असल्यानं ते या स्वतंत्र्य भारतातील इंग्रजांना प्रिय आहेत.म्हणूनच आज नोकरी व्यवसाय असो की कारखानदारी.......या सर्वच श्रेत्रामध्ये बेवारस गुलामगीरी दिसते.आपलीच माणसं आपल्याच माणसांवर अत्याचार करतात.कोणी शारिरीक व लैंगीक शोषणही.भारत जरी स्वतंत्र्य असला तरी ती मंडळी आपल्याच माणसांना आपला समजत नाहीत.प्रसंगी अत्याचारच करीत असतात.मग विचार येतो की खरंच आपल्या हुतात्म्यांनी यासाठीच मिळवलं का स्वातंत्र्य? यासाठीच मरण पत्करलं का? यासाठीच प्राणाचं बलिदान दिलं? त्यापेक्षा नसते लढले ते तर बरं झालं असतं असंही वाटतं.
भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करणारी अशीच ती मंडळी स्वातंत्र्यदिन साजरा करतांना असे काही भाषणं ठोकतात की त्यांना भाषणं देतांना पाहून असं वाटतं की यांच्यासारखे आदर्श कोणी नसावे.पण जेव्हा त्यांच्या अंतरंगात जावून त्यांचा भुतकाळ पाहिल्यास त्यांनी जन्मापासून काय काय केले? किती योग्य आणि किती गोष्टी बरोबर केल्या याची खात्री पटते.खरं तर त्यांच्या हातूनच तिरंगा फडकविला जावू नये असा त्यांचा भुतकाळ असतो.कारण तो त्या तिरंग्याचा आणि भारतमातेचा अपमान असतो. ती मंडळी आपल्याच लेकराला लेकरु न समजणारी, तिरंगा फडकवितांना मी सर्व जगताचा पालनहार आहे हे दाखवतात.हेच वास्तविक सत्य आहे.
तो स्वातंत्र्याबद्दल विचार करीत असतांना त्याला रामायणातील एक प्रसंग आठवला.ज्यावेळी रावण मृत्यूसय्येवर चढला तो प्रसंग.क्षणात तो मरणार हे गृहीत धरुन रामानं लक्ष्मणाला म्हटलं,
''रावण महाज्ञानी आहे.त्यांच्याकडून मरतासमयी उपदेश घे.जो उपदेश तुला कोणी देवू शकणार नाही.हा उपदेश तुझ्या जीवनात मरेपर्यंत कामात येईल.''
लक्ष्मणाने सुरुवातीला नकार दिला.परंतू नंतर भावाची राजाज्ञा पाहून तो जेव्हा रावणाकडे गेला,तेव्हा डोक्याकडे उभे राहून त्याने रावणाला म्हटले,
''हे रावणा,तू तर मरतच चालला आहेस तेव्हा मी काय म्हणतो ते ऐक.मी माझ्या भावाच्या आदेशाने आलो आहे.मला लवकर ज्ञान दे.मग मर.''
ते पाहताच रावणानं उपदेश देणं टाळलं.ते पाहताच लक्ष्मण परत भावाकडे आला.भावाला घडलेली परीस्थिती कथन केली.तेव्हा स्वतः राम सोबत गेला.तो पायाजवळ बसला व त्याला नतमस्तक होवून त्यानं उपदेशाबाबत विनंती केली.
रामाचं नतमस्तक होणं रावणाला आवडलं.तो म्हणाला,
''राम,तू खरंच आदर्श आहेस.कारण विद्या घेतांना अतिशय नम्रतेने घ्यावी.कुणावर अत्याचार करुन किंवा चोरी करुन विद्या ग्रहण करु नये.तुझ्यात आणि माझ्यात एकच अंतर होतं. ते म्हणजे भाऊबंदूकीचं.तुझा भाऊ तुझ्या सोबत होता.अन् माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता.हाच माझा उपदेश आहे.माझा भाऊ विभीषण माझ्या सोबत नसल्यानं मी युद्ध हरलो.कारण मी कसा मरणार आहे.हे तुला माहित नव्हतं.हे माझ्या भावानं सांगीतलं.म्हणून तू मला मारु शकला.हेच ज्ञान तू जगाला दे.माझा उपदेश समजून.भावाला अंतर देवू नकोस.तसेच जगातील कोणत्याही भावाला असा अंतर द्यायला सांगू नकोस.कारण माझा भाऊ काय आणि इतरांचा भाऊ काय,या भावाच्याच विश्वासघातानं किंवा नात्यामधील लोकांच्या विस्फोटानंच माणुसकी हरते व माणुसकीचं युद्ध हारलं जातं.म्हणून काही का असेना,नातेच मजबूत असायला हवे.''
राम जे काही समजायचं ते समजला व आपल्या तीनही भावाला अंतिम घटकापर्यंत रामानं अंतर दिलं नाही.पण ज्यावेळी रामानं लक्ष्मणाला अंतर दिलं.त्यावेळी रामालाही आपलं जीवन संपवावं लागलं.
राम व रावण एकमेकांचे कट्टर शत्रू.पण तरीही शत्रूंवर प्रेम करायला शिका हे रामानं दाखवून दिलं.तर रावणानं आपल्या सर्व मित्रमंडळींवर भावासारखं प्रेम करा.अंतर देवू नका.हे सांगीतलं.
आम्ही काय करतो आमच्या स्वतंत्र्य भारतात? आम्ही शत्रूला तर सोडा,मित्रालाही संपविण्याचा विचार करतो.अगदी केसानं गळा कापतो.काल अगदी जीव लावून प्रेम करणारी सखी आज तिच्यावर पाशवी सामुहीक बलत्कार करतो.लहानपणी घासातला घास देणारा भाऊ,मोठेपणी एक फुट जागेसाठी त्याचा गळा कापतो.नव्हे तर उन्हातून सावलीत नेणारे मायबाप.लॉटरी खेळू दिली नाही म्हणून त्यांचा गळा आवरतो.एवढंच नाही तर माझ्या कारखान्याचा विकास तर माझ्या देशाचा विकास हे समजून काम करणा-या कामगारांचं शोषण करतो.त्याला गुलामासारखं वागवतो.ज्या शाळेतून विद्यार्थ्यापासून आदर्श नागरीक घडतात.त्याच शाळेतील शिक्षकांना छळण्यासाठी वेगवेगळी धोरणं बनवतो.जेणेकरुन त्यांच्या माणसीकतेवर परीणाम होवून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवू नये.मग त्या विद्यार्थ्यांपासून कसे बनतील आदर्श नागरिक? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.हेच शिक्षकांना छळणारे शिक्षणसम्राट १५ ऑगस्टच्या दिवशी शाळेच्या विचारपीठावरुन भाषणं ठोकतात.आव आणून म्हणतात, 'भारत माता की जय.' अन् प्रत्यक्षात कार्य मात्र शुन्य.शिक्षकांना छळून त्यांना मिळणा-या वेतनातून पैसा खाणं.एवढंच आजच्या शिक्षणसम्राटांना चांगलं कळतं.एवढंच नाही तर निष्पाप मुक्या प्राण्याचा बळी घेतो.
हे असे का घडते? तर ज्यावेळी भारत स्वतंत्र्य झाला.पण तो स्वतंत्र्य होत असतांना येथील तमाम भारतीयांना नव्हे तर आपल्या पुर्वजांना काय काय वेदना झाल्या.ते आपण विसरलो आहोत.आपल्याला फक्त इंग्रजांनीच दिलेल्या वेदना समजतात.पण त्यापुर्वी इथे असलेल्या राजेशाहीनं आपल्या सर्व पिढीला कसं छळलं, ते आपल्याला दिसत नाही.ते आठवणे गरजेचे आहे.
इथल्या तमाम राजांना जेव्हा कोणाचीही सुंदर मुलगी आवडलीच,तर तिची इच्छा नसतांना तिला आपली राणी बनवून घेण्याचा हक्क नसला तरी ते जबरदस्तीनं आपली राणी बनवीत.नव्हे तर त्यांची इच्छा नसतांना त्यांच्यावर बलत्कार करीत.काही राजे अशा स्रियांना राणी बनविण्याऐवजी तिला जनानखान्यात नेत व वेश्या म्हणून त्यांची इच्छा नसतांना त्यांचा वापर करीत.जे राजे राणी बनवत,तेही आपल्या जुन्या राण्यांचा हक्क डावलत.नव्हे तर त्यांच्यासमोर सवतीचा प्रश्न निर्माण करीत असत.
राजेशाहीनंतर मोगल आले.मोगलांनीही तेच केलं.मग इंग्रजांचं राज्य आलं.त्यांनीही तेच केलं.मात्र या इंग्रजांनी अशा मुलींना राणी बनवलं नाही.तर वेश्या म्हणून त्यांचा वापर केला.तिची बाजारात विक्री केली.
हे झालं स्रियांच्या बाबतीत.इथे तर या राजेरजवाड्यांच्या काळात माणसांना गुलामांची वागणूक दिली.नव्हे तर या गुलामांची खरेदी विक्रीही त्यांच्या काळात चालत असे.मग या गुलामाचा वापर कोलू चालवणे,अनैतिक कामे करुन घेणे.यासाठी केला जाई.शिवाय आपल्या राज्यात संकट येवू नये म्हणून हे तमाम राज्यकर्ते देवांना भाव म्हणून या गुलामांची आहूती चढवत अर्थात नरबळी देत.हे अघोरी प्रकार भारतीय स्वातंत्र्याच्या रुपाने बंद झाले.त्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्यविरांनी आपला जीव धोक्यात घातला.
आज स्वातंत्र्य मिळालं.पण गुलामी संपली का? तर याचं उत्तर नाही असंच आहे.आजच्या स्वतंत्र्य भारतातही स्रियांच्या इज्जती स्वस्त झाल्या आहेत.त्यांचं अपहरण होवून विकल्या जात आहे.लहान मुलांचंही अपहरण होत आहे.त्यांनाही विकलं जावून गुप्त धनासाठी तसेच बळी देण्यासाठी त्यांचा वापर होत आहे.तसेच आजही कारखान्यात बालकामगार म्हणून अशा लाचार मुलांचेच शोषण सुरु आहे.पण हे सगळं कृत्य पडद्याआड घडत आहे.आजही फटाके बनवितांना लहान मुलांनाच कामाला लावलं जातं.मायबापच कामाला लावतात.कारण पोटाची आग त्यांना सतावते आणि आजही स्वतः मायबाप याच पोटासाठी स्वतःच्या पोरीलाही विकतात.आजही माणसांना माणसांसारखं वागवलं जात नसल्यानं माणुसकीची धज्जी उडते.विचारपीठावरुन भाषणं देणं सोपं आहे.पण प्रत्यक्षात मात्र जीवन जगतांना तसं वागणं कठीण आहे.आजही न्यायालयात कोर्टाचे एवढे खटले पाहावयास मिळतात की असं वाटतं हा भारत स्वतंत्र्य आहे की नाही.कारण प्रत्येकांवर अन्याय.एकच अन्याय नाही तर अन्यायांची साखळीच.हे जर पाहिलं तर वाटतं की खरंच आपण स्वतंत्र्य आहोत का? की स्वतंत्र्यता मानणं हा फक्त एक दिखावाच आहे.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही स्वतंत्र्य झालो आहोत.आज त्या राजेशाहीचा आमच्यावर अत्याचार नाही.त्या इंग्रजांचाही नाही.आम्ही शेकडो वर्षाच्या प्रदीर्घ कालीवधीनंतर स्वतंत्र्य झालो आहोत.त्यासाठी कित्येक आपलेच पुर्वज बळी गेले आहेत.त्यांचे बलिदान आपण विसरु नये.तेव्हा या स्वातंत्र्याचा उपभोग सर्वांना घेवू द्यावा.माणसांना माणूस म्हणून वागवावे.त्यांना चांगलं जगता यावं म्हणून आपण प्रयत्न करायला हवा.महिलांची इज्जत करावी.लहान मुलांचाही आदर करावा.दलितांचाही सन्मान करावा नव्हे तर लोकांनी एकच अपत्य ठेवावं.जेणेकरुन पोटाच्या प्रश्नासाठी स्वलेकरांना कामगार बनवावे लागू नये.तसेच स्वमुलींना पोटासाठी विकावे लागू नये.
राज्यकर्त्यांनीही आपल्या राजधर्माचं पालन करावं.जे अत्याचार करतात,त्यांचे अत्याचार उघडकीस आल्यास त्यांना कडक शिक्षा द्याव्यात.शेतक-यांच्या मालांना योग्य भाव द्यावा.त्यांना आत्महत्या कराव्या लागू नये.त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावा.कारण शेती जर पिकली नाही तर काय खाणार.तसेच कारखानदारीचा विकास करावा.जेणेकरुन बेरोजगारी दूर करता येईल.एवढंच नाही तर मंदीर मज्जीदीचा विकास करण्याऐवजी आणि बांधण्याऐवजी विश्वविद्यालये उभारावीत.जेणेकरून देशात संशोधक,तंत्रज्ञ तयार होतील.आपण स्वावलंबी बनू.त्याचबरोबर आपला देशही स्वावलंबी बनेल.मग या आमच्या देशावर चीन,पाकिस्तानसारख्या कोणत्याच देशाची वाकडी नजर जाणार नाही.पण त्यापुर्वी देशातील तमाम नागरीकांना आपला भाऊ म्हणून समजण्याची गरज आहे.मोठा भाऊ नाही तर लहानपणचा भाऊ.त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही.देश स्वावलंबी बनणार नाही.




रामभाऊला सगळं वाटत होतं.देशातील अंधार दूर व्हावा.तसेच मुक्या जनावरांचा बळी जावू नये.त्यासाठीच तो लिहित होता वर्तमानपत्रातून.पण प्रत्यक्षात असा अंधार दूर होत नव्हता.त्यामुळं तो दुःखी होता.पत्नी नेहमी म्हणत असे.आधी आपल्या घरचा अंधार दूर कर.मग लोकांचा करशील.त्यावर जखमेवर मीठ चोळल्यागत रामभाऊचं मन उद्विग्न होत होतं.
माणसाच्या जन्माबद्दल विचार करताना तसेच विकासाबाबत विचार करीत असताना रामभाऊला वाटायचं. माणसाला काही इच्छा असतात.त्या इच्छा काही माणसात प्रगल्भ असतात,तर काहींमध्ये कमी प्रमाणात असतात.ज्यांच्या इच्छा जास्त असतात.तो तेवढंच परीश्रम करीत असतो.त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.त्या इच्छा पूर्ण न झाल्यास ज्या व्यक्तींकडून त्या इच्छा पुर्ण करायच्या असतात किंवा ज्या व्यक्तींकडून त्या इच्छा पूर्ण होणार असतात.त्याला त्रास देत असतो.त्यातूनच तो आपल्या इच्छा पूर्ण करीत असतो.
चांगल्या विचारांची सुरुवात गर्भातूनच व्हावी.कारण गर्भात बाळाच्या वाढीची प्रक्रिया सुरु असते.या दृष्टिकोणातून विचार केल्यास आबालवृद्ध बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात.त्यांचं काही खोटं नाही.
ज्याप्रमाणे बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवसानंतर ते बाळ आईच्या कुशीत स्थिरावतं.खेळतं हसतं, नव्हे तर एक वेळ अशी येते की ते बाळ आईशिवाय इतर कुणाजवळ राहात नाही.पण मोठे होताच ते बाळ आईला वृद्धावस्थेत वृद्धाश्रमातही पाठविल्याशिवाय राहात नाही.असे का होते?आई तर लहाणपणी चांगले संस्कार करते.मग हा मुलगा असा का निघतो तर याचा आढावा घेतल्यास असे जाणवते की हे मुल असे वागण्यामागे परीसराचा परीणाम झाला असावा किंवा गर्भातच या मुलांला आई नकोशी वाटली असावी.
आई नकोशी का वाटली असावी.त्याचेही कारण आहे.काही काही स्रीया ह्या उन्हाळ्यात फिरायला जातात.त्या मासीक पाळी वाढविण्याच्या गोळ्या खातात.यावेळी जर अचानक गर्भ राहून गेलाच तर त्या गर्भाला त्या गोळ्यांचा परीणाम सहन करावा लागतो.त्याच परीस्थितीत तो गर्भ वाढतो.पण त्या गर्भाला वाटते की केव्हा या जोखडातून बाहेर पडतो.अशावेळी तो गर्भ पुर्ण दिवस न घेता बाहेर येतो.शिवाय या गर्भालयात घडलेल्या गोष्टीचा परीणाम होतो आणि तो गर्भ पुढे आईचं न ऐकता आईविरोधी बनतो.कधीकधी मुलाच्या अट्टाहासाने मला मुलगाच हवा.मुलगी नको या पित्याच्या सासू सास-याच्या बोलण्याचा विचार सतत आई करीत असते.त्यातच पुढे गर्भलिंगनिदान झाले तर ठीक.नाहीतर याच विचारांचा परीणाम गर्भावर होतो.बाळ जन्माला आल्यानंतर तो चिडचिडा बनतो.त्याच्या मनात मायबापाविषयी प्रेम राहात नाही.आपल्याला वाटते की हा मुलगा ऐकत का नाही.
आईच्या गर्भात असलेला बाळ......पण जर का त्या आईला त्रास असेल(सासुरवास)तर ती त्याच गर्भारपणात आत्महत्येचा प्रयत्न करत असेल तर तो मुलगा जन्माला आल्यानंतर बदला घेणारा बनतो.अर्थात गुंड प्रवृत्तीचा.तो आईचे तर ऐकतच नाही.शिवाय कोणाचेही ऐकत नाही.जर आई तो सासुरवास सहन करीत असेल तर तो बाळ आईचं ऐकतो.पण इतर कोणाचेच ऐकत नाही.
महत्वाचे म्हणजे आपल्या बाळाला भविष्यात काय बनवायचे याचा विचार गर्भ ठेवण्यापुर्वी मायबापांनी करावा.जेणेकरुन तुम्हाला बाळाला घडवितांना जन्मानंतर जास्त मेहनत करावी लागणार नाही.बाळाचे भविष्य आपोआप बनेल फक्त थोडासा टेकू लावावा लागेल.कारण तो टेकू लावणे गरजेचे आहे.त्याशिवाय त्याचे आयुष्य घडणार नाही.
स्वातंत्र्योत्तर काळात पुर्ण देश स्वातंत्र्याच्या विचाराने ओतप्रोत असतांना स्रीयांमध्ये गर्भधारणा झालीच तरीही तिचे विचार स्वातंत्र्याशी संबंधीत असल्याने ती तसाच विचार गर्भ बाहेर पडेपर्यंत करायची.त्यामुळे त्या काळातील बहुतःश गर्भ (बाळ)हे मोठे झाल्यावर क्रांतिकारी विचाराचे निपजले.याबाबतीत जुन्या काळातील एक दंतकथा प्रसिद्ध आहे.भक्त प्रल्हादाच्या आईला नारदाने पळवून नेल्यानंतर तिला विष्णुदरबारी ठेवले.तिला त्या गर्भारपणातील काळात राक्षस मंडळी कसा अत्याचार करतात तेच शिकविण्यात आलं.पुढे बालक जन्मल्यानंतर तो जेव्हा हिरण्यकक्षपूच्या दरबारी आला.तेव्हा तो कट्टर विष्णुभक्त बनला.अशीच महाभारतातही एक कथा प्रसिद्ध आहे.वीर अभिमन्यू हा शुभद्रेच्या गर्भात असतांनाच त्याने श्रीकृष्णाकरवी चक्रव्युहात शिरण्याचा मार्ग ऐकला.पण निघण्याचा मार्ग ऐकला नव्हता.पुढे शुभद्रा झोपी गेल्याचे पाहून श्रीकृष्णाने आपली कथा अर्धवटच ठेवली.त्यामुळे अभिमन्यू मरण पावला.केवळ गर्भात चक्रव्युह शिकला.वास्तवात नाही.
गर्भात संस्कारच नाही तर ब-याच गोष्टी तुम्ही गर्भाला शिकवू शकता.चांगले वाईट ओळखण्याची ताकद गर्भाला शिकवू शकता.पण ते आईच्या माध्यमातून.कारण आईची नाळ बाळाला जोडलेली असते.आई जशी वागेल तसे संस्कार बाळावर होत असतात.म्हणून चांगल्या विचारांची सुरुवात गर्भातूनच व्हावी.चांगली पुस्तके वाचावीत.चांगल्या गोष्टी ऐकाव्यात.आराम करावा.तामसी पदार्थ खाणे टाळावे.सदैव आनंदी राहावे.हसतमुख राहावे.राग,लोभ, द्वेष, मध,मत्सर करु नये.चोरी करु नये.हिंसेचे पदार्थ खावू नये वा हिंसात्मक बोलून दुस-याची मनं दुखवू नये.जेणेकरुन तुमचा गर्भही चांगले संस्कार घेवून पैदा होईल.वास्तविकता अशी की शिवराय ज्यावेळी गर्भात होते.तेव्हा तो काळ धामधुमीचा होता.त्यासाठी जीजामातेला शिवनेरी किल्ल्यावर ठेवले.त्यातच शिवराय गर्भात असतांना स्वराज्यस्थापनेचे विचार जीजामातेच्या मनात घोळत होते.त्यामुळेच शिवरायांना स्वराज्य स्थापन करता आले.हे देखील गरोदर मातेने लक्षात घ्यावे.
पुरुषांनीही अशा मातेला त्रास देवू नये.आज महिलांची दिलेवरी साधारण होत नाही.सीझर होतो.पहिला सीझर असला तर दुस-या गर्भाच्या वेळी ते टाके ताणले गेल्याने त्रास होतो.अशावेळी तिचे दुःख तिलाच माहीत असते.याही गोष्टीचा पुरुषांनी बोध घ्यावा.जेणेकरुन गरोदर माता संतापू नये व त्याचा परीणाम गर्भावर होवू नये.
माणसाचा जन्म होण्यापुर्वी तो जेव्हा आईच्या गर्भात असतो,तेव्हाही त्याला गर्भातच काही इच्छा प्रगट होतात.पण त्या गर्भात तो कोणाला आपल्या इच्छा सांगू शकत नाही.पण त्याची जी नाळ आईच्या गर्भाशी जुळली असते,त्याद्वारे तो आपली इच्छा आईला प्रगट करीत असतो. त्यामुळे गरोदर महिला त्यांना कितीही अडवलं तरी केळी खाणे,खोबरे खाणे,आंबट खाणे,गोड खाणे इत्यादी गोष्टी करीत असतात.कोणी म्हणत असतं आंबट खाल्यानं गर्भार मातेला खोकला होईल.गर्भाचं नुकसान होईल.पण ती आवड त्या भ्रुणाचीच असते.यातच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे त्या आईच्या खाण्यातूनच तो कशा प्रकारच्या व्यक्तीमत्वाचा घडेल हे दिसून येते.जसे आंबट जास्त खात असेल तर तिचं बाळ तामसी गुणाचं होईल.खोबरं जर जास्त तिला आवडत असेल तर ते बाळ शांत स्वभावाचं होईल.
ज्यावेळी गरोदर मातेचा सातवा महिना असतो.त्यावेळी त्या मातेसमोर काही जिनसा झाकून ठेवलेल्या असतात.म्हटलं जातं की जी जीनस उघडेल,त्यावरुन त्या मातेला मुलगा होणार की मुलगी कळेल.मग अंदाजानं लाडवाचा जीनस उघडला की मुलगा आणि बर्फी जर उचलली तर मुलगी.कारण लाडू तापसी गुणाचं प्रतिक आहे.तर बर्फी सालस गुण दर्शविते.अर्थातच लाडू म्हणजे कडक स्वभावाचा आणि बर्फी म्हणजे नाजूक कोमल स्वभावाचं प्रतिक आहे.यामुळे मुलगी की मुलगा कळायला सोपं जातं.
आईच्या गर्भात बाळ असतांना आईचे हे आंबट पदार्थ खाणे,केळी खाणे किंवा वेगवेगळे पदार्थ खाणे या इच्छा जर पुर्ण झाल्या नाहीत,तर होणा-या बाळात त्यावेळेपासूनच राग,लोभ,द्वेष,मद आणि मत्सर निर्माण होत असतात.तसेच हिंसेची वृत्ती निर्माण होत असते.म्हणूनच कधीकधी मायबाप चांगले जरी असले तरी त्यांच्या पोटी जन्म घेणारी मुलं विचित्र पद्धतीची अर्थात विचित्र स्वभावगुणांची निपजतात.
मुलाचा ज्यावेळी जन्म होतो.तो लहानाचा मोठा होत असतो.त्याचबरोबर त्याच्या इच्छा ह्या अजून वाढत जातात.त्याला जेव्हा बोलता येत नाही,तेव्हा तो आपली इच्छा रडून व्यक्त करतो.पण मुळात जर त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर त्या बाळाच्या मनात असंतोष निर्माण होतो.पुढे मग जी वस्तू मिळत नाही.ती वस्तू हिसकावून घेण्याची वा चोरुन मिळविण्याची भावना मुलात निर्माण होते.अर्थात त्यावर पुढे कितीही संस्कार केले,तरी काही काही मुलात काहीच फरक पडत नाही.काही काही मुलात मात्र नेहमी फरक पडतो.
संस्कार ही विचार गाळण्याची छानणी आहे.संस्काराच्या माध्यमातून विचार गाळले जातात.मुलांवर चांगले संस्कार झाले,तर वाईट विचार गाळले जावून ते गळून पडतात.मग जे वाईट विचार गाळले जातात,त्यानंतर उरणा-या चांगल्या विचारात कितीही पुढे जावून वाईट विचार शिरले तरी ते त्या चांगल्या विचारात मिसळत नाहीत.जसं भक्त प्रल्हादाचं झालं.जर त्या चाळणीतून चांगले विचार गळले तर उरणा-या वाईट विचारात चांगले विचार शिरत नाहीत.जसं रावणाचं झालं.
पुढे मुलगा मोठा होतो.त्याची संगत लागते.ती संगत कोणाशी होते.यावरुनही त्या मुलात चांगल्या वाईट विचारांचा भरणा होत असतो.संगत जर चांगल्या मुलाशी असेल तर तो मुलगा चांगल्या पद्धतीचा तयार होतो.पण संगत जर वाईटांशी असेल तर त्या मुलात वाईट विचार जन्म घेत असतात.
तात्पर्य असं की मुळात आईच्या गर्भापासून झालेल्या वाईट विचारात पुढे त्याला संगत जर वाईट विचारांचीच मिळत गेली.तर स्वभावगुण पुर्णच बदलून जावून तो व्यक्ती हा गुन्हेगारी जगताकडे वळतो. आईच्या गर्भात झालेल्या संस्कारानंतर जर काही दिवस संगत जर चांगल्या गोष्टीची असलीे तर तो मुलगा चांगल्या संस्काराचा घडतो.म्हणून चांगल्या संस्कारासाठी गरोदर मातेच्या इच्छा पुर्ण करणे महत्वाचे आहे.तितकेच महत्वाचे आहे.त्याच्यावर परीणाम करणारे त्याच्या जन्मानंतरचे घटक.
मुलांच्या चांगल्या स्वभावगुणासाठी मुलांच्या जन्मानंतरच्या घटकात मायबापाचा सर्वात मोठा वाटा असतो.त्यानंतर त्याला मिळणारे शिक्षक व त्यानंतर त्याला असणारी मित्रमंडळी.ह्या तिनही घटकांपैकी जर एखादा घटक वाईट मिळाला की बस मुलांचे पाय आपोआपच वाईट विचाराकडे वळत असतात.
मायबाप सतत भांडत असतील तर मुलांवर परीणाम होतो.मायबाप चोरी करीत असतील तरही मुलांवर परीणाम होतो.तसेच बाप जर घरी दारु पिवून येत असेल तर त्याचाही मुलावर परीणाम होतो.इतकेच नाही तर आई कशी आहे? यावरुनही मुलांचे विचार बदलत असतात.ती जरी व्याभिचारी असेल किंवा तिचे कोणाशी अनैतिक संबंध असेल तर तिच्या त्या वागण्याचा परीणाम बाळावर होत असतो.
सर्वात जास्त मुलांवर संस्कार करते ती आई. कारण लहानपणापासून बाळ आईजवळच जास्त असते.बापाचे तेवढे लेकरु जास्त सानिध्यात येत नाही.पण आताची परीस्थीती पाहिली तर लहान मुले हे आईच्याच प्रेमाला पारखी झालेली दिसतात.कारण मायबाप दोघंही नोकरी करीत असल्यानं मुलांसाठी आया ठेवलेली असते.ती आया जर चांगल्या स्वभावाची असेल तर मुलांवर चांगले संस्कार होतात.जर वाईट असेल,मुलांवर सारखी रागवत असेल तर ती मुले वाईट विचाराची बनतात. ती मुले पुढील काळात त्या आयाला ओळखतात.ती आया जर चांगली असेल तर......पण मायबापाला ओळखायला तयार नसतात.
मुलांच्या संस्कारात मायबापाची भुमिका खुप मोठी असते.त्याचे वागणे,त्यांचे वर्तन मुले न्याहाळत असतात.जर मायबापानं त्यांच्या मायबापाला जर वृद्धाश्रमात ठेवलं तर त्याचा परीणाम त्या मुलांवर घट्ट होतो.आईचे सासू सास-याप्रति वागणेही मुलांच्या स्वभावाला वेगळे वळण देत असते.आई जर आजी आजोबांशी वाईट वागत असेल तर नातवाला त्यावेळी ती गंमत वाटते.तेही आपल्या आजी आजोबांना त्रास देतात.पण जेव्हा त्यांना समजदारीपणा येतो,तेव्हा मात्र त्यांना ते क्षण आठवतात.आपले मायबाप आजी आजोबांशी वागले कसे?ती मुले मोठी झाल्यावर आपले वर्तन तसेच करतात.तेही मग आपल्या मायबापांना त्रास देतात नव्हे तर वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकत असतात.मुलेही मायबापाच्या आजी आजोबाशी वागण्यावरुन तेव्हापासूनच विचार करीत असतात की आपण आपल्या आईबाबांशी कसं वागावं?ते पुढे तशाच स्वरुपाचं वर्तन ठेवण्याची गाठ मनाशी बांधत असतात.
मुलांच्या इच्छा,त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर त्या इच्छेचं रौद्ररुप माणसाला पाहायला मिळते.राग द्वेष ह्यासारख्या तत्सम गोष्टी माणसाच्या वाढायला लागत असतात.चांगल्या इच्छा माणसाला प्रेरणा देतात.तर वाईट इच्छा माणसाला नेस्तनाबूत करीत असतात.
साधारणतः मोठे झाल्यावर माणसाची इच्छा मोठमोठी घरं बांधण्याची असते.पुष्कळ पैसे कमविण्याची असते.लहानपणी आईच्या गर्भात असतांना ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत,त्या इच्छा पूर्ण करायची असते.पण जेव्हा त्या इच्छा पूर्ण होतांना दिसत नाही.तेव्हा माणूस त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार करीत असतो.दुस-यांकडून त्या इच्छा पुर्ण करण्यासाठी एखाद्या शैतानागत वागत असतो.पण त्याला ते कळत नाही की आपले अशा स्वरुपाचे वागणे बरे नाही.आपण मेल्यानंतर सगळं इथल्या इथंच राहणार आहे.आपण वर घेवून काही जाणार नाही.संपत्ती,मालमत्ता,पैसा,आडका, पशूधन,शेत्या सर्वकाही.
सगळं इथल्या इथंच राहातं.कोणीच मृत्यूनंतर आपल्या सोबत नेत नाहीत. मृत्यू अटळ आहे.तो केव्हा येईल हे सांगता येत नाही.तेव्हा आपण या जगतात जन्माला आलोच तर चांगले कर्म करुन जर मरण पावलो तर मरणोपरांत कोणीही चांगलं नाव तरी घेईल.पण आपण वाईट कृत्य करुन कितीही अमाप पैसा कमवला,तरी कोणीच आपलं नाव घेत नाही,नव्हे तर आपली रवानगी वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात करतात.स्वतःची आपली मुलं सुद्धा आपल्याला कितीही पैसा आपल्याजवळ असला तरी आपल्याला पोसायला तयार होत नाही.शिवाय आपलं नावंही घेत नाहीत.तेव्हा आपण जी कमाई करतो,जो पैसा कमवतो.तो कोणासाठी कमवतो? हा विचार येतो.का वृद्धापकाळी आपल्या पोटासाठी भाकर म्हणून.नाही.......हा भ्रष्टाचार रुपानं अर्थात वाईट मार्गानं मिळविलेला पैसा आपला होवूच शकत नाही.मग म्हातारपणात जो पैसा म्हातारपणी आपला होवू शकत नाही.आपल्याला चांगलं चांगलं जेवन देवू शकत नाही.तो पैसा कमविण्यासाठी एवढा हव्यास का? त्यापेक्षा अशा इच्छा न केलेल्या ब-या.हं कमवायचेच असेल तर चांगले संस्कार कमवावे.चांगले विचार कमवावे.चांगल्या इच्छा कमवाव्या.तसेच आपल्या मनातल्या इच्छेवर ताबा ठेवावा.ज्या चांगल्या इच्छा जीवन घडवू शकतील.आपले मुलबाळं व येणारी पिढी आपल्या चांगल्या इच्छेनं विचारानं व संस्कारानं आपली पिढी घडवू शकतील नव्हे तर आदर्श कुटूंबं तयार होतील.असेच आदर्श कुटूंबं तयार झालीत की आदर्श देश बनवायला वेळ लागणार नाही.म्हणून इच्छेवर सर्वांनी ताबा ठेवायला हवा.चांगल्या वाईट इच्छेचं परीक्षण करायला हवे.मगच निर्णय घ्यायला हवे आणि आदर्श वागण्याचा प्रयत्न करायला हवा.जेणेकरुन आपली भावी पिढीही चांगल्या स्वरुपाचं नाव घेतील.




रामभाऊ नास्तीक स्वभावाचा होता.तो देव धर्म काही पाळत नसे.त्याला देवांच्या नावानं कोणत्याही जीवांचा बळी देणे आवडत नसे.त्या गोष्टीचा तो विरोध करीत असायचा.त्याला वाटायचं की जर लोकं देव मानतात,तर ह्या सृष्टातील कोंबडे,बकरे,मेंढरं, रेडे,घोडे इत्यादी सगळे जीव ही देवांनेच निर्माण केलेले असतांना ती देवाची लेकरं झाली.अशावेळी त्याचा बळी देवाच्या निमित्यानं भाव म्हणून कापणं बरोबर नाही.खरंच कोणीतरी आपल्या लेकराचा जीव घेईल काय?अन् जर असा जीव देव मागत असेल,तर तो देव कसला? रामभाऊ तशा भाव घेणा-या देवाला देव मानत नव्हता.तो घरीही देवाची पुजा करीत नव्हता.
जानकी मात्र आस्तीक होती.ती नेहमी म्हणायची,
" तुम्ही पुजा करीत नाहीत.म्हणून आपल्यावर संकट येतात.संकटं आपल्या पाचवीला पुजलेली असतात."
पण तो मानत असे की या देवासाठी लागणा-या हार फुलात फालतूचा पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा शिक्षणासाठी खर्च करावा.एवढेच नाही तर त्याला हेही वाटत होतं की लोकं असे ऐकणार नाहीत.देवाच्या नावाने भाव म्हणून मुक्या प्राण्यांचे जीव घेतच राहतील राजरोषपणे.त्यासाठी कायदे बनायला हवेत.पशू पक्षांची हत्या होवू नये म्हणून कायदा.त्यांनाही आपल्या सारखाच जीव आहे असं त्याला वाटायचं.
रामभाऊ मायबापाच्याही पुजनाला महत्व द्यायचा नाही.त्याला वाटायचं की मायबाप काही मेल्यावर येवून पाहात नाही तर त्यांची सेवा जीवंतपणीच करावी.पण आजची पिढी म्हाता-या माणसांना जीवंतपणी वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकते व ते मेल्यावर त्यांची पुजा पाठ करते.त्यांच्या नावाने अक्षयतृतीयेला पात्र टाकते.खरंच ते महात्मे मेल्यावर खातात काय?रामभाऊचं तसं पाहिल्यास बरोबरही होतं.
अक्षय तृतीया देशात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण होता.हा सण हिंदूंचाच नव्हता तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करीत असत.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा होती.
या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा होती, ती म्हणजे या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जात होता.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व होते.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.असं पुराणात लिहिलं होतं.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व होते.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जात होता.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जात होते.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली होती.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास प्रारंभ केला होता.याच दिवशी युधीष्ठराला अक्षय पात्राची प्राप्ती झाली होती.ज्या पात्राने तो गरीबांना अन्न चारत असे.याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचे चिरहरण केले होते व याच दिवशी भगवान श्रीक्रिष्णाने कधीही न संपणारी अक्षय साडी द्रौपदीला पुरवली होती.याच दिवशी सुदामा क्रिष्णाचा मित्र क्रिष्णाला मदत मागायला द्वारकेला आला होता.याच दिवशी ओरीसामध्ये शेतीत वखर चालवला जात होता आणि याच दिवशी बंगालमध्ये व्यापारी वहीखात्याचा हिशोब केल्या जात होता.ज्याला हलखता म्हणत.
पंजाबमध्ये तर याच दिवशी सकाळी उठून शेतकरी शेतात जात होते.त्यांना रस्त्यात जे जे पशुपक्षी भेटत असत.त्यावरुन पावसाचा अंदाज लावला जात असे.
जैन धर्मामध्ये तर या दिवसाला वेगळे महत्व होते.जैन राजा ऋषभदेव याने आपली संपत्ती आपल्या एकशे एक पुत्राला दान देवून तो सुखप्राप्तीसाठी अरण्यात गेला होता.त्या काळात त्याने वर्षभर उपवास ठेवला होता.त्यामुळे त्याचा उपवास सोडण्यासाठी कोणी या राजाला कपडे लत्ते,कोणी घोडे,कोणी हत्ती,तर कोणी राजकन्याही दान दिल्या. पण राजा काही उपवास सोडायला तयार नव्हता.शेवटी अंतर्यामी राजा श्रेयांशस यांनी अंतर्ज्ञानाने ऋषभदेवाची इच्छा ओळखली व त्यांना याच दिवशी उपवासाला उसाचा रस दिला.याला जैन धर्मात पारणाा म्हणत.
आज लोक वास्तववादी जगत असले तरी त्या वास्तव्यवादी जगण्यात पौराणिकतेची जोड होती.म्हणूनच लोकं कितीही वास्तविकतेला मानत असली तरी नाईलाजानं हे सण उत्सव साजरे करीत असत.बौद्ध मंडळी बैशाखी,बुद्धपौर्णीमा मोठ्या उत्साहानं साजरी करत.तर हिंदू दिवाळी,होळी, दसरा इत्यादी सण साजरा करत. मुस्लीम ईद साजरी करत.ख्रिश्चन नाताळ आणि इस्टरडे.यापैकी अक्षय मात्यापित्यांच्या पुजणाचा एक दिवस म्हणून अक्षय तृतीयाही साजरा केला जात होता.
वर्तमानकाळात अक्षयतृतीयेला केवळ माय बापाचीच पुजा करणे तसेच आपआपल्या पिढीत जे पुर्वज झाले.त्यांना पात्रावळीत सुग्रास अन्न टाकून त्यांचं पुजन करणे बस एवढाच अर्थ घेतला जात होता.हे पित्तरांना दिलेले जेवण कदाचित या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही,या अर्थानं हा सण साजरा केला जात होता.तसेच ते पुण्यात्मे आशीर्वाद देतात या अर्थानहीे या दिवसाचे महत्व होते.या दिवशी कावळ्यांना काव काव ये असा आवाज देवून कावळ्यांना जेवण घालण्याचे महत्व होते नव्हे तर इतर दिवशी याच कावळ्याची कत्तलही केली जात असे.कावळा अन्नाला शिवला की बस आपले पित्तरं जेवले व आपल्याला पुण्य मिळाले असाही एक समज प्रचलित होता.
आमचे जीवंतपणी म्हाता-या मायबापाला वृद्धाश्रमात टाकणे आणि मेल्यावर त्यांची पुजा करणे रामभाऊला पसंत नव्हते.
सगळे पदार्थ पात्रावर टाकण्यासाठी लोकं बनवीत असत.त्यातच एखाद्या कावळ्याला भूक लागली आणि तो त्या पात्राला शिवलाच तर तो परीवार पुण्य परीवार असे समजत असत.यात कावळ्याचा आणि पुण्याचा संबंध आला कुठून? वर्षभर ज्या कावळ्याला हाकलत असत,कापत असत, तोच कावळा या दिवशी देव कसा?तरीही त्याला देव मानत लोकं संस्कृती जोपासत असत.कारण लोकांचे संस्कृतीवर प्रेम होते.म्हणून रामभाऊला वाटायचं की ज्या अर्थाने लोकांचे संस्कृतीवर प्रेम आहे.त्याच अर्थाने आमचे आमच्या मायबापावर प्रेम का नाही?आम्ही आमच्या मायबापावरही प्रेम करावे,त्यांना वृद्धावस्थेत त्रास देवू नये.जीवंतपणीच त्यांची फार सेवा करावी.मेल्यानंतर कोण पाहते.तरंच अक्षयतृतीयेला पुण्य घडेल.नाहीतर कितीही सुग्रास अन्न पित्तराच्या पात्रावर चढवलं.कितीही कावळ्यांनीे ते अन्न खाल्लं.तरीही पुण्य लाभणार नाही.कारण पाप आणि पुण्य ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
मायबापाच्या सेवेचे महत्व पुराणातही सापडत असत.ज्या महाभारत रामायणाला लोकं मानत,त्याच रामायणात मायबापाच्या सेवेचे दृष्टांत दिलेले होते.काशीला मायबापाची कावळ घेवून जाणारा श्रवण बाळ रामायणातीलच होता.तसेच पित्याला व मातेला दिलेले वचन पाळून चौदा वर्ष वनवास भोगणारा रामही रामायमातीलच होता.त्याही वरती जावून ज्या क्रिष्णाला जगात मानाचं स्थान होतं.त्या महाभारताची सुरुवातीती कहाणी अशीच होती.राजा शांतनूच्या दोन राण्या.गंगा आणि सत्यव्रती.भीष्म गंगेचा पुत्र.राजा शांतनूने भीष्माला युवराज घोषीत केलं होतं.तेव्हा राणी बनविण्याची भावना असणा-या शांतनुच्या बोलण्यावर सत्यव्रती निराश झाली.'तुमच्या पहिल्या पुत्राला राजगादी आणि मी मात्र दासी.मला दासत्व का? याच दासत्वासाठी मी तुमच्याशी विवाह करु काय?' म्हणून सत्यव्रती शांतनुला झिडकारु लागली होती.ही गोष्ट भीष्माला माहीत होताच त्याची मातृपितृभक्ती जागृत झाली व त्याने कधीही विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली.तीच भीष्मप्रतिज्ञा होय.या भीष्मप्रतिज्ञेच्या बदल्यात शांतनूने देवव्रताला(भीष्माला) इच्छामरणाचा वर दिला.
आई.......मग ती आपल्या आईची सवत का असेना.आई आईच असते.हे रामायण, महाभारत शिकवतं.आम्ही अक्षय तृतीया साजरा करतो.त्या दिवसापुरते मायबाप पित्तरं आठवतो.मोठ्यांची सेवा करावी हेही आठवतो.नव्हे तर या सेवेसाठी आणि पुण्य प्राप्त व्हावं म्हणून दानही करावे म्हणून करतो.पण हा दिवस निघून जाताच आम्ही ही सेवा विसरतो आणि मन मानेल तसे वागू लागतो.हे आमचे कितपत बरोबर आहे? हीच आमची मातृपितृभक्ती असावी काय?ज्या उदरातून आम्ही जन्म घेतो.त्याच उदराला पुढे त्रास देत लोभासाठी त्यांची हत्या करतो?तसेच जे मायबाप आम्हाला हा देव हा दानव हे अंकीत शिकवितात.त्याच मायबापाचं छायाचित्र भींतीवर लावून त्यांची पुजा करायलाही आम्ही लाजतो.नव्हे तर मायबापाची पुजा करु नका.हे धर्म शिकवितात का? नाही........तरीही आम्ही ते करतोच.हेही कितपत बरोबर आहे.ज्या दगडाला आम्ही देव मानतो.तोच दगड साक्षात आमच्या पुढे आल्यास आम्ही त्याला ठार करतो.हे तरी कितपत बरोबर आहे?(साप सापाला देव मानण्याची प्रथा)
ज्याप्रमाणे रामभाऊला मुक्या प्राण्यांबद्दल आणि आईवडीलांबाबत जिव्हाळा होता.तसंच त्याला आणखी एक गोष्ट पटत नसे.ती म्हणजे वैज्ञानिक जगतातील.तसा कधीकधी तो लोकांना उपदेश करीत असे.
''या वैज्ञानिक जगात या भौतिक साधनाला देव मानणे सोडा.ज्या पित्तरांसाठी हा दिवस साजरा करताय ना.खरंच सर्वांनी साजरा करा.बंधन नाही. पण......... त्याबरोबर आपल्या पितृमातृभक्तीला सदैव जागृत ठेवा.त्यांनी तुम्हाला उन्हातून सावलीत नेलंय.मृत्यूपुर्वी त्यांची सेवा या अक्षयतृतीयेनिमित्याने घडू द्या तुमच्या हातून.तेच सर्वात मोठे दान आहे.हे लक्षात घ्या.अक्षय तृतीया निमित्यानं केवळ पुजापाठच नको.कर्तृत्वही असावे हेही लक्षात असू द्या.त्यांना जीवंतपणी वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकत असाल आणि मेल्यावर कितीही त्यांना जिनस बनवून चारत असाल,कितीही पुजा करीत असाल तर ते लाभदायी नाही.''
रामभाऊचे विचार रास्त होते.सापाबद्दलही त्याला कळवळा वाटायचा.त्याला जीवंत सापाला मारणे आवडायचे नाही.
लोकं सापाला मारल्यानंतर व तो मेल्यानंतर त्याच्या पुजेला जास्त महत्व देत.मात्र जीवंत असल्यास त्याला तेवढे महत्व देत नसत.
नागपंचमी हा हिंदूचा सण म्हणून साजरा केला जात होता.पण हा हिंदूचाच सण नाही तर तो सर्व धर्मीयांचा सण होता.जे जे नागाला मानत असत.त्या त्या सर्वांचाच तो सण होता.पण लोकांनी तसे न समजता या सणाला हिंदूचा सण म्हणून मर्यादा घातलेली होती.
मुळात साप दिसला की माणसाच्या मनात धस्स होत होतं.कोणी धडधाकट असला तर त्याची मारायची इच्छा होत होती.कोणी म्हणत साप विषारी आहे.मारलेले बरे.असे असंख्य साप मारले जात होते.साप हा शेतक-यांचा मित्र असला तरी.
सापाच्या प्रजातीत नाग ही देखील प्रजाती मोडते.नाग हा सापाचा वंश. या भारतात पुर्वी नागवंश होता.या नागवंशीय लोकांचा व सापाचा काही संबंध जरी नसला तरी ही नागवंशीय मंडळी साप पालन करीत असल्याने या नागवंशीयांनाच पुढे सापाचे वंशज मानण्यात आले.
सापांना पुर्वी मारत असत.विषारी आहे हे पाहून.काही कालखंडानंतर समजलं की हे साप विषारी जरी असले तरी ते शेतक-यांचे मित्रच आहेत.म्हणून सापाला मारणे बंद करावे.तरीही सापाला मारणे बंद झाले नाही.म्हणून लोकांनी साप मारणे एक दिवस तरी बंद करावे यासाठी नागपंचमी उत्सव साजरा करण्यात येवू लागला.पण हे मुळ कारण जरी असलं तरी पुढील काळात याला आध्यात्मिक पार्श्वभूमी मिळाली.
नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे काही आध्यात्मिक पार्श्वभूमी होती.
१)श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करुन ज्या दिवशी परत आला.तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जात होता.
२)तक्षक नागाने अपराध केला.या अपराध्याला शिक्षा म्हणून राजा जनमेजयान याने सर्पयज्ञ केला,तेव्हा तक्षक इंद्राला शरण गेला.पुढे ओम इंद्राय स्वाहा म्हणत राजाने अग्नीत इंद्राचीही आहूती दिली.अर्थात अपराधीला शरण देणाराही तेवढाच दोषी समजत राजाने ते कृत्य केले.निश्चीतच सापाची संख्या कमी होत होती.हे अास्तीक मुनीच्या लक्षात येताच त्यांनी घोर तप केले.या तपातून त्यांनी राजा जनमेजयानला प्रसन्न केलं.राजा जनमेजयानने आस्तीक मुनीला वर मागायला लावला.त्यात या मुनींनी सर्पयज्ञ थांबवण्याची विनंती केली.तो दिवस नागपंचमी उत्सव म्हणून साजरा होत होता.
३) सत्येश्वरी नावाची कनिष्ठ देवी.सत्येश्वर नावाचा तिचा भाऊ.त्याला सापाने दंश करताच त्याचा मृत्यू झाला होता.दुस-या दिवशी ती भाऊ मरण पावल्याने शोकसागरात डुबली होती.पण प्रत्यक्ष नागराजाने सत्येश्वरीच्या रुपात येवून सत्येश्वरीला दर्शन दिले व घाबरु नको मी इथेच आहे म्हणत ते अंतर्धान पावले.त्यातच या सत्येश्वर रुपातील नागराजाने सत्येश्वरीला नवीन कपडे दिले.त्यामुळे या दिवशी स्रीया नवीन कपडे घालत असत.नागदेव प्रसन्न झाल्यावर सत्येश्वरीने वचन मागीतले.ते वचन सत्येश्वरीच्या हातावर उमटले.तीच मेहंदी.स्रीया या दिवशी मेहंदीही लावत.नागराज अंतर्धान पावत दुस-या दिवशी भेटण्याचे वचन देवून गेला.शोकसागरातून बाहेर निघताच सत्येश्वरी या नागराजाला शोधायला जंगलात गेली.तेव्हा जंगलात सत्येश्वराने दर्शन दिले.तेव्हा जंगलात वेलीवर आपल्या बहिणीला सत्येश्वराने झोकेही दिले.अर्थात या दिवशी स्रीया झोकेही खेळत.
४)चौथी आध्यात्मिक गोष्ट होती ती म्हणजे, एका शेतक-याने या दिवशी शेतीत नांगरणी केली.त्यात तीन सापाची पिल्लं मरण पावली.म्हणून क्रोधी झालेल्या नागीणीने बदल्याच्या भावनेने रात्री येवून दोन बहिणी,तो शेतकरी व त्याच्या पत्नीला चावा घेतला.पण एक बहिण सुटली.त्यामुळे तिलाही दंश करण्यासाठी ती नागीण दुस-या दिवशी आली.तेव्हा तिनं पाहिलं की या तिस-या मुलीनं आपल्यासाठी दुध ठेवलं आहे.पुजाविधीही केलेला आहे.इत्र फवारले आहे.हे पाहून नागीण खुश झाली व तिने तिच्या संपुर्ण परीवाराला जीवंत केलं.तो नागपंचमीचाच दिवस होता.
नागाला व नागपंचमीला रामभाऊ मानत होता.पण जीवंत सापाला मारणे त्याला आवडत नव्हते.नागपंचमीचं आध्यात्मिक महत्व सापाला लोकांनी मारु नये म्हणून होतं.लोकं पुजापाठ भरपूर करीत.कोणी कढया करीत.कोणी व्याख्याने देत की सापाला मारु नये. पण आजही सापं भयमुक्त नव्हते.सापाला लोकं मारतच.त्याची तेवढीच तस्करीही करत.त्याची कातडी विकत.नव्हे तर जहरही.त्या जहराचा वापर एक नशा म्हणून केला जात होता.
मुळात या नागपंचमीच्या दिवशी सापाला इजा होवू नये म्हणून लोकं भाजी चिरत नव्हते.कोणत्याही वस्तू चिरत नव्हते.नव्हे तर घनोले वा लाह्यांचा प्रसाद सापाला चढवत.एवढेच नाही तर या सापाला दूधही ठेवत.पण साप दूध पित नाही.पेल्यास त्याची पचनशक्ती कमजोर होवून त्याला फुफ्फुसाचा त्रास होतो.त्यातच साप मरतात हे लोकांना माहित नव्हते.अर्थात दूध हे सापासाठी विषारी होते.पण लोकांना मुळात आध्यात्मिकतेने भाळून ठेवले होते.सापाला थोडं दूध पाजायचं आहे असे म्हणत दूधासाठी सापाला घेवून फिरणारे गारुडी रस्त्यानं दिसत.हे गारुडी सापाचे तोंड शिवत व त्यांना घेवून फिरत.आलेल्या पैशातून दारु पित.गांज्या पित.नव्हे तर इतर काही शौकंही.म्हणून सरकारने साप पकडण्यावर बंदी घातली होती.आजही नागद्वारी वारीला जाणा-या कित्येक भक्तांना हे गारुडी सापाची भीती दाखवत अडवत आणि हवे तेवढे पैसे वसूल करीत.आजही अंधभक्त नागाच्या मंदीरात जात आणि घराकडे नाग निघाल्यास मारत.तर आजही नागपंचमी हिंदूचाच सण मानून ब-याच इतर धर्मातील लोकंही नागाला पूजत नव्हते.तर विदेशी या सापाकडे खाण्यायोग्य वस्तू म्हणून पाहात.मुळात साप हा विषारी जरी असला तरी तो शेतक-याचा मित्र आहे असे मानणारा समाज जिथे जिथे होता.मग ते विदेश का असेना.सापाची पुजा व सापासाठी एक दिवस तरी द्यायलाच हवा.असं रामभाऊला वाटायचं.मग तो नागपंचमी म्हणून नाही तर इतर दिवस म्हणून प्रत्येक धर्मीयांनी पाळण्याची गरज आहे असंही त्याला वाटायचं.निदान देशात तरी नागपंचमी म्हणून का असेना......या दिवशी सापाला इजा होवू नये म्हणून हा उत्सव पाळण्याचे बंधन असावे.नागपंचमी हिंदूचा सण म्हणून नाही तर एक उत्सव म्हणून तरी हा सण साजरा करावा.आपला एक शेतक-यांचा मित्र म्हणून........असंही रामभाऊला वाटत होतं.




सोनपूर नावाचं ते गाव.त्या गावात रामभाऊ लहानाचा मोठा झाला होता.त्याने भरपूर दिवस गावातच काढले होते.त्याला लहानपणी सण उत्सव फार आवडायचे.तसाच त्याला श्रावण महिना जास्त आवडायचा.कारण याच महिण्यात जास्त सण उत्सव येत.मग या सणाच्या निमित्यानं त्याला भरपूर खायला मिळायचं.
लहानपणी आई नागपंचमीला व कानोब्याला पु-या,करंज्या बनवीत असे.अनारसे बनवीत असे. श्रावण महिना आला की सुखसमृद्धी आणेल असं वाटायचं.
यावर्षी कोरोना आला होता.कारण आधीच कोरोनानं जनता त्रस्त होती.त्यामुळं राहत मिळेल असं वाटत होतं.शाळा सुरु होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टळेल असंही वाटलं होतं.पण लोकांचा भ्रमनिराश झाला.कारण लोकांना श्रावण उजळूनही राहत मिळाली नाही.विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु झाल्या नाही.त्यातच ब-याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलेलं दिसत होतं.
विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासाबाबत शिकविण्याचा विचार केल्यास असं जाणवत होतं की शिक्षकांनी ऑनलाइन शिकविणे सुरु करावे.त्यातच काही शिक्षक मोबाईलवर शिकवीत होते.मोबाईलवर मुले शिकत होती.पण ज्यांच्याकडे मोबाईलच नव्हता.त्यांची गोची होतांना दिसत होती.त्यांच्या अभ्यासाचं होणारं नुकसान कसं भरुन निघेल यावर प्रश्नचिन्ह लागलं होतं.
शिक्षक अभ्यास शिकवितांना ऑफलाईन शिकवायला तयार नव्हते.त्यामुळं अजून प्रश्न निर्माण झाले होते.कारण पालकांना दोन मुलं असल्यास व एकाच वेळेला दोन मुलांचे अभ्यास सुरु असल्यास एका मुलाचं या ऑनलाइन शिक्षणातून नुकसानच होत होतं.ते कधीच भरुन निघणार नव्हतं.
लॉकडाऊन मध्ये आधीच पैशानं तुटलेली मंडळी ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइल घेतील कुठून? जिथे पोट भरु शकत नाहीत.तिथे मोबाइलचा प्रश्न.अशातच लोकं कशीबशी कामाला लागलेली असताना दररोज सायंकाळी घरी कामावरुन आल्यावर मोबाईलसाठी मुलांचे ओरडणे तसेच पत्नीची कटकट ऐकून माणसांचा तिळपापड होत होता.त्यांनाही कळत होतं की मुलाचे नुकसान होत आहे.ते टाळावे कसे? शिक्षकांना विचारणा केल्यास तेही हेकड बोलून अपमानच करीत होते.मग अशावेळी नुकसानाचं काय?तो नुकसान कोण भरुन काढेल हा प्रश्न पालक वर्गाला पडलेला होता.
श्रावण जसा येत होता दरवर्षी. तसाच यावर्षीही तो दरवर्षीप्रमाणे आला होता.पण आनंद घेवून आलेला नव्हता.या महिण्यात येणारी सण जशी येत होती.तशीच आताही आली होती.पण जी मजा पुर्वी यायची.ती यावेळी नव्हती.कारण यावर्षी घरी करंज्या,अनारसे इत्यादी सणाचे पदार्थ बनवायला लोकांजवळ पैसे नव्हते.कारण लोकांना लॉकडाऊन मुळं रोजगारच नव्हता.लोकं आपआपल्या घरी खाली बसले होते.पोटंच भरणं मुश्किल झालं होतं.मग सण,उत्सव साजरे करणार कुठून?
लोकांचे हाल बेहाल होत होते.पण सरकारनं लोकांना सोडलं नव्हतं.मनमानेल तेवढं वीजेचं बिल पाठवलं होतं.
श्रावणाचं एक वैशिष्ट्य होतं,ते म्हणजे एक दोन सरी आल्या की ऊन दिसणे.ते कोवळे ऊन.अंगाला चटका जाणवू देत नसायचं.ज्याला या उन्हाचा त्रास व्हायचा.त्याच्यासारखा नाजूक नसायचा.
कधी कधी पाऊस जाताच कडेला लांब लचक इंद्रधनूही दिसत असे.तो पाहतांना फार मजा वाटत असे.त्यातच या श्रावणात नागपंचमी, तसेच राखीच्या यात्रा असत.नागद्वारच्या यात्रेतून परत आल्यानंतर राखीपासून लोकांच्या दरवर्षी कढया सुरु होत.मग जोरजोरात महादेवाची गाणी म्हटली जायची.ते यावेळी दिसत नव्हते.नागरंचमीच्या दिवशी म्हटल्या जाणा-या बा-या यावेळी दिसल्या नव्हत्या.नव्हे तर राखीला राखी बांधायला फिरणा-या बहिणी आता दिसल्या नव्हत्या.
या महिण्यात मांस खाणं काही लोकं टाळत.त्याचं कारणंही तसंच असायचं.रिमझीम येणारा पाऊस. ह्या पावसानं नदी नाल्यांना पूर असे.त्यामुळं लोकं मासे पकडायला जाऊ शकत नसत.वाहून जाण्याचा धोका असायचा.म्हणून मासेमारी बंद असे.तसेच प्राण्यांना पायखु-या,तोंडखु-या यासारखे आजारच असत,तसेच वेगवेगळे जास्तीत जास्त आजार असत.ज्या आजाराचे जंतू उष्णतेनतरंही मरु शकत नसत.नव्हे तर आजारी पाडणा-या सुक्ष्म जंतूनाही याच काळात सुगीचे दिवस असल्याने मांस या काळात वर्ज असे.
श्रावण महिण्यात होणारी दहीहंडी.त्या दहीहंडीला फार मजा यायची.पण यावर्षी कोरोमामुळं यावर्षी दहीहंडी दिसली नव्हती.कारण कोरोना गर्दीमध्ये जास्त वाढतो.असं प्रशासनाचं मत होतं.नव्हे तर पोळा भरवला जाणार नव्हता.तसेच पोळ्याला निघणारी मारबत तसेच बडग्यावरही याच काळात संक्रात अाली होती.
ज्याप्रमाणे श्रावणातल्या सणांना या कोरोनानं अडथडा आणला होता.त्याचप्रमाणे पावसाच्या उघडीपच्या प्रकारालाही या कोरोनानं ब्रेक लावला की काय असे वाटायला लागले होते.कारण या महिण्यात येणारे संततधार पाणी बहुतेक ठिकाणी दिसले नव्हते.तसेच वातावरणात या झाडावरुन त्या झाडावर उडणारी फुलपाखरे व फुलचुख्या यावर्षी दिसल्या नव्हत्या.याच काळात कानात गुंजणारे ते बेडकाचे डराव,डराव आवाज तसेच रस्त्यावरुन चालतांना अलगत आडवे जाणारे ते सापाचे पिल्लू दिसले नव्हते.बहुतःश त्या प्राण्यांनीही कोरोनाचा धसका घेतला असावा असं वाटत होतं.नव्हे तर पोळ्याला निघणारी घाणमाकडही यावर्षी दिसली नव्हती.पुढे श्रावण संपल्यावर काजळतीज आणि गणपती उत्सवही दिसला नव्हता.कारण ह्यावर कोरोनानं प्रश्नचिन्हच लावलं होतं.
नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहिला की काय?ते ऐकायला आले नव्हते.बहिणींचे सामुहीक मेहंदी लावणे अदृश्यच झाले की काय?असे वाटत होते.
एकंदरीत सांगायचं झाल्यास श्रावणाच्या ज्या विविध छटा होत्या.ज्या छटांनी माणसांना तसेच जगातील वेगवेगळ्या सुक्ष्म जीवापासून अवाढव्य प्राण्यांपर्यंतच्या जीवांना आनंद प्राप्त होत होता.तो आनंद या कोरोनानं लुटून नेला होता.साहजिकच लोकांचे फिरणे बंद असल्यानं घर एके घर व घर दुणे नुकसान हेच गणित लोकांना कळायला लागले होते.तेही या श्रावण महिण्यात.आषाढ गेलेला होता हिरमुसले तोंड करुन.आता श्रावणही उजळला होता नव्या आशा पल्लवीत करुन.पण ह्या श्रावणानेही निराश केले होते.कदाचित भाद्रपद कसा उजळतो ते माहित नव्हते.त्यामुळ लोकांना या कोरोनामुळं आला श्रावण गेला श्रावण म्हणण्याची वेळ आली होती.
श्रावण महिना नुकताच निघून गेला होता.भाद्रपद महिना नुकताच उजळला होता.लोकं मोठा नको तर लहानसा गणपती मांडणार होते.कोरोनाला गणपती बाप्पा समाप्त करेल असं लोकांना वाटत होतं.म्हणून काही आध्यात्मिक मंडळी गणपतीची आपल्या घरी प्राणप्रतिष्ठा करणार होते.
रामभाऊला गणपती उत्सव पटायचा.पण त्या गणपती उत्सवातील लोकांचे वागणे पटत नव्हते.
गणपती बाप्पा मोरया म्हणत आजकाल गणपती बापाची लोकांनी फँशनच निर्माण केली होती.लोकांना वाटत होते की गणपती बाप्पाला मांडले आणि दहा दिवस पुजा केली की बस झालं.सा-या समस्या चुटकीसरशी सुटतील.कोरोनाबाबतही लोकांचा हाच संकेत होता.पण गणपती मांडा की अजून काही.कोरोना कोणालाच घाबरत नव्हता.त्यामुळं रामभाऊला वाटायचं की आपण जर देवाची पुजा करतो,तर खरंच समस्या सुटतात का? याचे उत्तर नाही असंच होतं.पण तरीही लोकं मांडत होते गणपती.त्यासाठी लाखो रुपये खर्च करीत होते.का?तर स्वतःच्या सुखासाठी.आपल्या चेह-यावर आनंद झळकावा यासाठी.....क्षणभर का होईना स्वतःचे दुःख विसरता यावे यासाठी.......तसेच कोरोनाची भीती नष्ट करण्यासाठी.........
गणपतीची.......या दहा दिवसात मातीची मुर्ती जरी असला तरी तो सजीव वाटत होता.त्याच्यासाठी मग सर्वच काही करण्याच्या कला लोकं पणास लावत होते.वेगवेगळे प्रसाद बनवून त्याला भोग देत होते.तो खात नाही हे माहीत असूनही सारंच काही त्याच्यासाठी करीत होत आणि शेवटी दहाव्या दिवशी त्याचा विचार न करता,त्याची इच्छा नसतांनाही त्याला नाल्यात नेवून चाहत होते.हे त्यांचं वागणं बरोबर नव्हतं तरीही........
गणपती बाप्पा लोकांच्या श्रद्धेचा विषय असतांना त्याला नाल्यात नेवून टाकणे ही विचार करायला लावणारी बाब होती.खरं तर विघ्नविनाशक असलेल्या गणपती बाप्पाला लोकांनी एखादं मंदीर बांधून आपली श्रद्धा जोपासायला हवी होती.त्याला सुरक्षीत ठेवायला हवे होते.त्याची सुरक्षा करायला हवी होती.कारण त्याचं विसर्जन करतांना तळी बुजतात म्हणून शासन तळ्यात गणपती वित्सर्जन करु देत नसल्यानं लोकं तो गणपती रस्त्यावरच ठेवून मोकळे होत असत.हे रामभाऊला पटायचं नाही.
तसा त्यानं गणपतीचा इतिहास एकदा वर्तमान पत्रात कुठंतरी वाचला होता.गणपती हे पुर्वी पाण्यात बुडवीत नसत.त्याचा फार मोठा इतिहास होता.घरोघरी गणपती मांडले जात, नव्हे तर त्याची विल्हेवाट न लावता घरचा एक सदस्य म्हणून वर्षभर त्याची पुजा होत असे.एखाद्या वेळी त्याचा एखादा अवयव तुटलाच तर त्याला तुळशीजवळ ठेवून ती माती तुळशीच्या झाडाला अर्पण करीत असत.त्या मातीत झाडांची वाढ चांगली होते.हा लोकांचा उद्देश असायचा.लक्ष्मीच्या मुर्तीची जशी विल्हेवाट लावली जात होती तशी.तसं गणपतीचं केलं जात असे.
कालांतरानं लोकं शिकले.सवरले.मोठे झाले.लोकांच्या भावना मोठ्या झाल्या.त्याबरोबर लोकांमध्ये स्वार्थ शिरला.हा स्वार्थही मोठा झाला.चक्क यात लोकांनी गणपतीबाप्पालाच पैसे कमविण्याचं साधन बनवलं.मग लोकं वेगवेगळ्या स्पर्धा घेवू लागले.त्याचे शुल्कही ठरवू लागले आणि अमाप पैसा गोळा करुन ती रक्कम वाटून घेवून स्वतःचा चरितार्थ चालवू लागले.काही लोकं तर भरमसाठ वर्गणी गोळा करु लागले. खर्च करुन जी रक्कम उरेल.ती रक्कम सर्व सदस्य मंडळी एकमेकात वाटून घेवू लागले किंवा त्या रकमेतून दारु सुद्धा पिवू लागले होते.ही वास्तविकता कित्येक ठिकाणी अनुभवायला मिळत होती.
हे भरपुर ठिकाणी आजही घडत होते.एकंदरीत सांगायचे झाल्यास गणपती बाप्पाच्या नावावर लोकांनी तमाशा ऊभा केला होता.
गणपती बाप्पा बनवितांना कुंभार समाजाचे योगदान अनन्य साधारण होते.त्या समाजातील बहुतेक जणांना काम मिळत होतं.त्यांचं पोटही भरत होतं, नव्हे तर या गणपती उत्सवाच्या निमित्याने भरपूर लोकं आपले पोट भरीत असत.
गणपती बाप्पाच्या नावावर आजही ग्रामीण भागात तमाशाचे फड रंगत.ते पाहायला गावातील तरुण तरुणी आवडीने जात असत.त्यात स्रियांच्या वेशभुषेत पुरुष मंडळी नाचत असत.एकमेकांना चिमटे काढत असत.हे कलाकारांच्या कलात्मकतेचं प्रदर्शन जरी असलं आणि त्याची मजा गावातील लोकांना जरी येत असली तरी या तरुण तरुणींना बिघडविण्याच्या गोष्टी आज गणपतीच्या नावावर होत चाललेल्या होत्या.शालिनता पुर्णतः लयास गेली होती.अर्थात गणपतीबाप्पाच्या नावावर हे सारं खपविणा-या गोष्टी आज घडत होत्या.एवढेच नव्हे तर आजतरी या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणारी तरुण मुले मुली आपल्या आईवडीलांना विचारुन येतच नव्हती.मित्रांसोबत दोन दिवसासाठी फिरायला जात आहो असा बहाना करुन ही तरुण तरुणी दर्शनाच्या नावावर आजही येत असत आणि दर्शन घेण्याऐवजी रुम करुन मादकतेचा आनंद घेत असत.हे दृश्य मात्र गणपती बाप्पा नाईलाजानं सहन करीत होता.
रामभाऊला ते सारं आवडत नव्हतं. या सर्व गोष्टीचा विचार करण्याची आजतरी गरज आहे असं त्याला वाटायचं.
'गणपतीबाप्पाला जरुर बसवा.कामगारांना काम मिळू द्या.त्यांचेही पोट भरु द्या.बसवण्याला मनाई नाही.पण त्यांचे नावावर व्यापार करु नका.अश्लीलतेचं प्रदर्शन करु नका.देणगीच्या नावावर कोणावर बळजबरी करु नका वा कोणाला मुर्ख बनवू नका' असे तो लोकांना वारंवार सांगत असे.
गणपतीला विद्येची देवता समजत असत.त्याचे स्थान अबाधीत राहु द्यावे असे रामभाऊला वाटायचे.त्याच्या परिसरात घाण करु नये.तरुण तरुणींनी दर्शनाला अवश्य जावे.पण आपल्या आईवडीलांसोबत.उत्सव साजरा करायला.उत्सव साजरा केलाच पाहिजे.पण केवळ अंगप्रदर्शन करुन हातात हात ठेवून नाही.स्वतःचे गणपतीबाप्पासोबत सेल्फी काढून स्वतःचा जीव धोक्यात घालून नाही तर अगदी सोज्वळ पद्धतीनं असंही रामभाऊला वाटायचं.
गणपती विसर्जनाच्या वेळी नेहमी बातम्या येत.गणपती शिरवतांना अमुक अमुक मरण पावले.इतके मरण पावले.तितके मरण पावले.त्यावर रामभाऊला वाटायचं की असे व्हायला नको.गणपती शिरवावा.पण सावधानता बाळगायला हवी.पण आजची ही आईवडीलांना न जुमानणारी मुले.खरंच सेल्फी काढायला घाबरु कधीच घाबरत नाही.मग गणपती बाप्पा सोबतीला आहे असा विचार करुन सावधगीरी न बाळगता गणपती शिरवतात.त्यात चुकीनं स्वतःच मरतात.मात्र मायबाप बिचा-या गणपतीला दोष देतात.त्यात मातीच्या त्या गणपतीचा कोणता दोष?तो स्वतःची इच्छा नसतांनाही स्वतःचा जीव वाचवू शकत नाही.तो लोकांचा जीव कसा वाचविणार! म्हणून गणपती बाप्पाला जरुर बसवा.पण थोडी का होईना सावधानता जरुर बाळगा.त्यातच तुमचाच फायदा आहे.खबरदारी घ्या,जेणेकरुन कोणत्या ब-यावाईटपणाचे गणपती बाप्पावर लांछन लागायला नको.असेही तो लोकांना सांगत असे.
रामभाऊला सण,उत्सव आवडत होते.पण त्या सणाच्या मागे असणारा अंधविश्वास आवडत नव्हता.
रामभाऊ पाहात होता ते दृश्य की बरीच मंडळी अंधश्रद्धेच्या बुरख्यात जगतात. देवधर्म पाळतात.देवाच्या नावाने नवश कबूल करतात.लोकांना माणसात देव दिसत नाही.म्हणून लोकं दगडाला पुजतात.
रामभाऊला वाटायचं की देवाला दगडाचा देव चांगला वाटतो. कारण तो बोलत नाही.स्थित राहतो.अगदी मौन.पण माणसाचा देव बोलतो.कुरकूर करतो.म्हणून तो आवडत नाही.
मुके जनावरही देवच.तिही भावभावनेने प्रेरीत.पण लोकं त्यांना देव मानत नाही.देव माणणा-या निश्चल दगडावर बळी चढविण्यासाठी आम्ही घोर अपराध करीत पशुपक्षांचा बळी चढवतो.नव्हे तर त्या मुक्या प्राण्यांचा एवढासाही घटक दगड खात नसला तरी आम्हाला त्याचे नावाने खायला मिळत असल्याने आम्ही दगडावर प्रेम करतो.
दगडाला पुजणे ही अंधश्रद्धा असली तरी ती अंधश्रद्धा आम्हाला वाटत नाही.उलट त्याबद्दल कोणी काही बोलल्यास आम्हाला भयंकर राग येतो.
आम्ही एवढे मुर्ख आहोत की ज्या मायबापानं जन्म दिला. त्यांना देवस्थान न देता त्यांचे अनन्वीत हाल करतो.त्यांना मारतो, त्रास देतो.अन् मेल्यावर त्यांना फुले वाहतो.विविधरंगी पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य देतो.ते नैवेद्य गाईला चारुन गाईचेही पोट खराब करतो.कावळ्याला शिवायला लावतो पिंडाला.कावळा शिवला की बापाने माफ केले.नाहीतर बाप शाप देवून गेला असा समज.काही काही ठिकाणी कावळा शिवायचेही पैसे घेतले जातात. शिकवल्यागत ते कावळे जेव्हा पिंडाला शिवतात.मग जो जास्त पैसे देईल त्यांची मनोकामना पुर्ण.....
ह्या आपल्या अंधश्रद्धा.मुळात आपण आस्तीक.विश्वास ठेवणारे भोळेभाबडे लोक.आपल्याला कोणत्याही गोष्टीची एवढीशीही चिकीत्सा करायची सवय नाही.आपण चिकित्सक नाही असे म्हणता येईल.
आपण चिकित्सक नसल्याने परंपरा पाळतो.रुढीने चालतो.वागतो.त्यामुळे याचाच फायदा घेतला त्या बाबा लोकांनी.हाताची कला दाखवून,हातसफाई करुन हे लोक भोळ्याभाबड्या जनतेला फसवतात.स्थूल जनताही त्यांच्या तालावर चालते.मात्र ही बाबा मंडळी एकदा का त्यांच्या प्रेमात पडलो की बस मोहीनी संमोहन सारखं त्यांनी पश्चिम ला जरी पुर्व म्हटलं तरी आपणही विचार न करता पुर्व म्हणतो.
बाबांचा गंडविण्याचा पोरखेळ सुरु असतांना बाबा मग आपल्या मुख्य उद्देश्याकडे वळतात.आम्ही नाही त्यागावचे म्हणत-म्हणत इथल्या भोळ्या भाबड्या जनतेलाही फसवतात.कौमार्य मुलीवर बलत्कार करतात.कोणाची इस्टेट लुटुन नेतात.बकरे कोंबडे नवसासाठी काढून त्यांचा विनाकारण बळी चढवतात.नव्हे तर धन काढून देतो असे सांगून हे बाबा लहान स्व मुलांनाही नरबळी म्हणुन कापायला लावतात.तरीही बाबा ग्रेटच.
आज बाबांचं महापीक आलं होतं.स्वतःला बाबा समजणारे भोंदू हे या देशाचे शिल्पकारच ठरताना दिसत होते.खरा संविधान कर्ता देशाचा शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर दुरच राहिला होता.पण हे बाबा समोर आले होते.कोणी बलत्कार तर कोणी चो-या दरोडे घालून पुढे आलेली माणसे.अलिकडं भरपूर बाबा जेलमध्ये होते.अंधश्रद्धा फैलावणारे बाबा........जसा देव त्यांच्या मुठीत आहे! असे वागत होते.मग आज ते जेलमध्ये असतांना देव त्यांना का वाचवत नसावा? बाबा जर पॉवरफुल आहे तर त्यांनी पाकिस्तान चे आक्रमण होऊ देता कामा नये.चीनची दादागिरी समाप्त करावी.पण बाबा असे करीत नसत.त्यांना तसं करता येत नव्हत.कारण बाबा म्हणजे केवळ ढोंगीपणा होता.
आजही बाबा तुरुंगात असले तरी बाबांचे शुभचिंतक बाहेर अस्तीत्वात होते.बाबागिरी बंद झालेली नव्हती.हेच बाबा तुरुंगातूनही भोंदूगीरी करीत होते.लोकांना फसवीत होते.नव्हे तर गुप्त धनासाठी कोंबड्या बक-याचाच नाही तर लहान मुलांचाही बळी देत होते.
विद्वानांनी असंख्य शोध लावले तरी बाबागिरी संपली नव्हती.बाबागिरी संपवायची असेल तर अंधश्रद्धा आम्ही सोडायला हव्यात असे रामभाऊला वाटत होते.त्या लोकं सोडत नव्हते.लोकांच्याने त्या अंधश्रद्धा सोडवत नव्हत्या.लोकं मायबापाला तकलीफ देत.पण बाबाला पुजत असत.
बाबाला तसेच पाषाणाला पुजणारी आणि समजणारी ही कर्तव्य शुन्य माणसे.ह्या काळाचा महिमा न जाणल्यामुळे त्यांच्या मनात बाबांची, बाबांची भोंदूगिरी वाढली होती.बाबांची अंधश्रद्धेची कु-हाड कित्येकदा लोकांच्या मानेवर बसली होती.तरीही लोकांना जाग केव्हा येणार ते कळत नव्हते.
आजही काही बाबा तुरुंगात असले तरी आजही असे कितीतरी भोंदू भोळ्या भाबड्या कित्येक मुलींना बलत्काराच्या पिंज-यात अडकवत असत.याची कल्पना न केलेली बरी.असं रामभाऊला वाटत होतं.






रामभाऊला वाटायचं की लोकं देव पुजतात. महाशिवरात्र.भगवान शंकराचा दिवस.भगवान शंकर हेही एक दुःखी पात्र.सृष्टीनिर्माते म्हणून ब्रम्हा,पालनकर्ते म्हणून विष्णू तर समाप्त करणारा घटक म्हणून या शिवाला मानलं जातं.या शिवाला मानतांना सर्वप्रथम बेल वाहावं म्हणतात.त्या बेलानं शिव प्रसन्न होतो म्हणतात.पुराणात एक कथा आहे की एक शिकारी एका झाडावर बसून हरीणाची शिकार करण्याची वाट पाहात होता.ते झाड बेलाचे होते.मात्र वाट पाहता पाहता तो त्या बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला.तेव्हा ते बेलाचे पान खाली असलेल्या पिंडीवर पडू लागले.क्षणात त्याचा स्वभाव बदलला.त्याच्या शिकारीची भावना नष्ट झाली.
दरवर्षी लोक महाशिवरात्रीला यात्रेला जातात.जवळपासच्या गावाला यात्रेला जात असतांना ते म्हणजे भाविकांना अमरनाथच वाटते.एवढे प्रेम लोकं त्या दुरदूरुन जातात यात्रेला.भरपूर पैसा खर्च करुन.तो पैसा पोटाला खात नाहीत.प्रसंगी जेव्हा नवसं करतात.तेव्हा ते नवस फेडण्यासाठी कर्जही करतात.ज्यांच्याकडे पैसा नाही ते मात्र जवळपासच्या मंदीरात जातात.हरबोला हरहर महादेव म्हणत हे त्या टेकड्या चढत असतात.त्या टेकड्या चढतांना फार मजा वाटते.विशेष म्हणजे ह्या टेकड्या चढत असतांना महत्वाचा फायदाही होतो.अंगाची सर्वीसींग झाल्यागत वाटते.,
सा-या आजाराचं धन असलेलं शरीर रक्तात कोलेस्टेराल साठल्यानं मोठमोठ्या बिमा-या होत असतात.ही कोलेस्टेरालची समस्या रक्त घट्ट झाल्यानं होत असते.तेव्हा ते रक्त पातळ होण्यासाठी या भगवान शंकराची एकप्रकारे मदतच होते.कशी तर भगवान शंकर टेकडीवर वास करतात.अर्थात त्यांचं मंदीर टेकडीवर असते.या मंदीरावर जातांना चढाव चढावा लागतो.तो चढाव चढत असतांना रक्त हे धमणीतून सळसळ वेगाने धावत असते.कोलेस्टेराल च्या भागाला साफ करत.......त्यामुळे एकंदर यामुळे फायदाच होतो शरीराला.
भगवान शंकराची भक्ती करतांना कोणी ध्यान लावतात.त्यामुळे एकाग्रता वाढीस लागते.स्वभाव शांत होतो.तिथे फोडण्यासाठी वापरले गेलेले नारळ त्याचे खोबरे खावून शरीराला कँल्शीअम मिळत असते.पर्यायाने भाविकांना वाटो न् वाटो पण यामुळे रक्त पातळ झाल्याने मनात चैतन्य निर्माण होते.माणूस पुढील कामे सापाचे कात टाकल्यागत करीत असतो.
भगवान शंकराकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे.त्यांचे महाविराट रुप पाहून त्यागाची भावना वाढीस लागते.त्यांच्या शरीरावर वस्रे नव्हती.त्यावरुन त्याग परोपकारी वृत्ती दिसून येते.एवढेच नाही तर भगवान शिवाचा पुर्ण सृष्टीला केंद्रीत केलेला फोटो हा मुळात संदेश देतो की माणसाने राग, लोभ, द्वेष,मध, मत्सर यापासून दुर राहावे.
महत्वाचे सांगायचे झाल्यास कोणी भक्त मानो या न् मानो,भगवान शंकराची पुजा केल्याने अंगातील सारेच षडरिपू जे शरीराचे शत्रू असतात.ते दूर पळवायला मदतच होते.
मानवाच्या शरीरात बरेच शत्रू असतात.ते शत्रू माणसाच्या आयुष्याला नष्ट करीत असतात.तेव्हा हे शत्रू शांत करण्यापुर्वी आपण शांत होणे गरजेचे आहे.भगवान शंकराने दक्षाला ठार तर केले पण त्यांनी आपला क्रोध शांत करण्यासाठी कैलासावर तपश्चर्या केली.त्यांनी समुद्र मंथनातून निघालेले विष ग्रहण केले.त्यांनी चंद्राला डोक्यावर ठेवून त्याच्या वासनांध शक्तीला नियंत्रीत केले.तसेच स्वर्गातून आलेल्या गंगेलाही त्यांनी जटेमध्ये सामावून घेतले.संजीवन विद्येचा वापर करुन त्यांनी स्वपुत्राला जीवंत केले.त्यांचा वैराग्यपणा हा खरंच वाखाणण्याजोगा आहे.ते भाविक असो की नसो प्रत्येकासाठी ते वरदान आहेत.कारण त्यांच्या स्थळाला भेट देण्यासाठी डोंगर चढून जावे लागते.त्यामुळे कित्येक भावीकांच्या अंगाचे अवयव आपोआपच कामे करायला लागतात.माणसांना जगण्याची भीती असते.माणूस झोपतो.पण ज्याला जगण्याची भीती असेल तो झोपु शकत नाही सुखानं.माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती नसावी.कारण त्याला व्यवस्थीत झोपता येत नाही.झोप येत नाही.
जो चोर असतो,त्याच्या मनात भीती कायम जागा करुन असते.ज्याच्याकडे अति पैसा असतो.त्यालाही झोप येत नाही,तसं पाहिल्यास जो वाईट काम करीत असतो.त्यालाही झोप येत नाही.शिवाय ज्याला वाईट काम करायचे असते.तो रात्रभर विचार करीत असतो,आपण ऊद्या काय करु शकणार याचा.....
अरे कशाला कुणाचं वाईट करताय?कशाला आपला विचार बदलताय?कशाला जास्तीचा पैसा कमवताय?कशाला जास्त पैसे कमविण्याचा हव्यास करताय?पैसा तेवढाच कमवा.जेणेकरुन सांभाळता येईल.अतिरिक्त पैसा हा निद्रानाश करतो बरं का.समजा आपल्या घरी खुप धनसंपत्ती आहे.अन् अचानक ती चोरीला गेली.तर काय वाटतं,पश्चातापच की नाही.सुख समाधान आहे का त्यात.अन् हं,सुखसमाधानाचं सोडा,हा अतिरिक्त पैसा कमविलाही.पण तो येतो का आपल्यासोबत.नाही ना.अहो आपण बक्कळ पैसा कमविलाय.पण म्हातारपणात आपण जेव्हा खाटल्यावर पडतो,तेव्हा करायला कोणी नसेल तर तो पैसा आपल्या कोणत्या कामाचा.कोणत्याच नाही.मग आपली रवानगी त्या वृद्धाश्रमात.त्यापरस ते मजूर बरे.घरी सायंकाळी खायला जरी नसेल तरी लेकरं कसे पोट भरल्याचं समाधान करुन घेतात.रात्रीची झोप आपण उपाशी असलो तर येत नाही आपल्याला.पण त्यांना येते.का?ते गरीब आहेत म्हणून......नाही.ते गरीब आहेत म्हणून नाही,तर ते समाधानी आहेत म्हणून.
समाधान,ही फार मोठी शक्ती आहे जगण्याची.जगण्याच्या कसोटीत जो असंतुष्ट असतो,त्याच्या जीवनात कधीच समाधान नसते.पदोपदी अशा व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागतो.संस्कार कसे घडवावे?असा विचार येतो.आपण जे काही केले,ते आपण केले,आपल्या मुलांनी आपल्यासारखे वागू नये असे आपल्याला वाटते.पण आपण केलेल्या कर्माची फळं भोगल्यागत आपली मुलं आपल्याशी तसाच दुर्व्यवहार करु लागतात.तेव्हा निश्चितच आपल्याला पश्चातापाशिवाय काही सुचत नाही.पण पश्चाताप करुनही फायदा होत नाही,कारण तेव्हा वेळ गेलेली असते.
१) संस्कार कसे घडवावे?
संस्कार घडविणे खरं तर ही एक कलाच आहे.ज्यांच्यावर संस्कार नाही ती मुलं या देशाचे आधारस्तंभ बनू शकत नाहीत.म्हणून संस्काराला फार मोठे महत्व आहे.संस्कार ही आधारशिला असल्यामुळे संस्कार कसे घडवावे याला फार महत्व आहे.
अ)संस्कार घडवितांना प्रत्येक घटकांनी मग ते आईबाप असो की शिक्षक,शिक्षीका,त्यांनी लहान वयातच मुलांमध्ये त्यांच्या भावनेला वाढविण्यासाठी भर द्यावा.नवीन अभ्यासक्रम सांगतो की भीती दाखवू नये.कारण भीतीने मुलगा भित्रा बनतो.त्याची चौकसबुद्धी वाढण्यात मर्यादा पडतात.पण मीही याच मताचा.संस्कार फुलवितांना थोड्या फार भीतीची गरज आहे.जसे समजा मुलगा लहान असेल,त्याला साप म्हणजे काय हे माहीत नसेल तर त्याला नवीन विचारप्रवाहानुसार तो साप असून तो चावतो हे सांगण्याची गरजच आहे.कारण तसे न सांगितल्यास हा मुलगा भीतीअभावी त्याला हात लावेल व दुर्घटना होईल हे निश्चीत.म्हणून संस्कार फुलविण्याची पहिली पायरी म्हणजे भीती.पण ही भीती रास्त भावाची असावी.पाहिजे तेवढी नसावी.कारण भीती जर बाळगली असती तर थामस अल्वा एडीसन घडलाच नसता.त्याने आपल्या प्रयोगासाठी धानाची रास जाळली होती.वडीलांनी घरातून हाकलून दिल्यानंतर रेल्वेगाडीत प्रयोग करीत असतांना त्याला तिथूनही हाकलून दिले होते.कारण फाँस्फरस सांडल्याने रेल्वेच्या डब्याला आग लागली होती.त्याच्या मनात जर भीती राहिली असती तर तो महान शास्रज्ञ बनला नसता.
पाणी हे आग विझवते हे आपल्याला माहित आहे.पण ते कोणत्या घटकापासून बनते हे मात्र बहूतेकांना माहित नाही.पाणी हे H२O चं संक्षिप्त रुप.H म्हणजे हायड्रोजन व O म्हणजे आँक्सीजन.हायड्रोजन हा घटक स्वतः जळतो,तर आँक्सीजन हा घटक त्याला जाळतो.पण त्याच्यापासुन बनलेला घटक म्हणजे पाणी हे आग वाढविण्यासाठी काम करतं.हे आपल्याला माहित आहे.अगदी तसंच भीती बाबत आहे.भीती या संस्काराच्या पायरीतून विद्यार्थी मनाची नव्हे तर प्रत्येक मुलाची जडणघडण होत असते.पण ती वाट्टेल तेवढी मुलांना वाटू देवू नये.भीती वाटून घेवू नये. एक संस्कार फुलवीत असतांना श्यामचा एक प्रसंग ,श्यामला पोहण्याची फार भीती वाटायची.पण आईने संस्कार फुलवितांना त्याला चक्क पाण्यात ढकललं.त्यामुळे जी धिरता त्याच्या मनात निर्माण झाली,ती धिरता इंग्रजांना देशातून हाकलण्यासाठी कामात आली.
आ)मुलांमध्ये संस्कार फुलवितांना त्याला थोरांच्या कथा सांगाव्या.ते कसे घडले हे समजावून द्यावे.त्यांचे चरीत्र वाचायला द्यावे.त्यावर मार्गदर्शन करावे.हे काम फार कठीण आहे.असे नाही.पण पुरुषांसाठी कठीणच.पण रामजींनी भीमरायांना घडविण्यासाठी त्याला जी पुस्तकांची रसद पुरविली.त्यामुळे भीमराव घडले.जीजामातेने ही शिवरायांना लहाणपणी अशाच ज्ञानबा, तुकाराम,अभिमन्यु,राम क्रिष्णाच्या कथा सांगितल्या.
इ)फायद्या तोट्याचे तंत्र समजावून सांगावे.लहान मुले ही विनाकारण फुलपाखरांना छळत असतात.गाजर गवताच्या सहाय्याने या फुलपाखरांचा जीव घेतात.तेव्हा यात फायदा होत नाही.पण लहान मुलांना आनंद वाटतो.हीच बाब त्या मुलांना बालपणी समजावून सांगण्याची गरज आहे.पण मायबाप ह्याकडे दुर्लक्ष करतात.पुढे ही मुले आक्रमक बनून आपल्या वयात नक्कीच कोणाचा तरी मुडदा पाडतात.श्यामच्या आईने एकदा मुलाला अंघोळ घातल्यावर बाहेर ये म्हटले तेव्हा श्याम म्हणाला,
"आई,माझे पाय भरतील."
तिनं त्यानंतर पदर जमीनीवर पसरला आणि म्हटलं,
"श्याम पायाला घाण लागू नये म्हणून तू मला पदर पसरायला लावला.तेव्हा मनाला घाण अशीच लागू देशील नको."
श्याम त्या वयात समजला नसेल कदाचित.पण पुढील काळात हेच धोरण त्याच्यासाठी कामात आले.आज मात्र ह्या श्यामच्या संस्काराच्या गोष्टी अभ्यासक्रमात दिसत नाहीत.
मुक्या कळ्या ह्या फुलपाखरांना मारण्यासारखीच गोष्ट पण त्या तोडू नको असे आईने सांगितले.कारण त्यामुळे झाडांना त्रास होतो.
आजची आई अतिशय व्यस्त आहे.कामाचा व्याप वाढवेला आहे.मुलांकडे अजिबात लक्ष द्यायला तिला वेळ नाही.निव्वळ पैसा कमविण्याकडे कल.भरपूर पैसा.पण बाळाकडे दुर्लक्ष झाल्याने व संस्कार बाजारात विकत मिळत नसल्याने ही मुलं पुढील आयुष्यात गुंड बदमाश निघतात.अगदी पैसा कमविण्याचा सपाटा.....बाळाकडे वेळ न दिल्यानं हे घडतं.
ई)बाळावर जास्त प्रेम नसावंच.अति प्रेमानंही मुलगा वाया जातो.त्याला आई आपली काही म्हणत नाही असे वाटते.कधीकधी रागवावेही लागते.कारण आईचे रागावणेही बाळावर संस्काराचे बीजारोपण करीत असते.समजा एखाद्या मुलाने वर्गातील वस्तू चोरुन आणल्यास त्याला जर ती आई रागावली नाही तर तो मुलगा पुढे जावून कुख्यात चोर बनू शकतो यात शंकाच नाही.
उ)म्हातारी,आंधळे अपंग,दुर्बल,यांना आपण मदत करावी.आपली त्यांना केलेली मदत जेव्हा ही मुले पाहतात.तेव्हा त्यांनाही तशीच सवय लागते व तिही पुढील आयुष्यात आपल्या स्वकर्तृत्वानं अशा आंधळ्या,अपंग,दुर्बल,म्हाता-या माणसांना मदत करतात.पण आपण असे करीत नाही.उलट आपल्या मनात स्वार्थ असल्याने आम्ही मात्र ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन टाकतो.त्याचा परिणाम मात्र वाईट होतो.
खरं तर संस्कार फुलवीत असतांना अपत्यांची संख्या मर्यादित असावी.जास्त अपत्य असल्याने आपल्याला पाहिजे तसे संस्कार फुलविता येत नाहीत.भुतकाळात जास्त अपत्य होती.याचे मुख्य कारण निरक्षरता.शिवाय पाहिजे त्या प्रमाणात रुग्नालये नव्हती.त्यामुळे जर साथीचे रोग आलेच तर पुर्ण गावचे गाव साफ व्हायचे म्हणून जास्त अपत्य असायची.त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात संस्कार आपल्या मुलावर फुलविता यायचे नाहीत.शिवराय घडले याचे कारण थोरला संभाजी.हा तंजावरला बापासोबत राहात असल्याने जीजामातेला शिवबा घडविण्याशिवाय दुसरे कामच नव्हते.
आम्ही आज जीवन जगत असतांना शिवबा दुस-याचे घरात निर्माण व्हावा याचा प्रयत्न करतो.आम्ही आमच्या मुलांना शिवबा झालेले कधीच पाहात नाही.शिवबा घडावा आमच्याही झोपडीत.शिवबा हा केवळ क्रांतीचे प्रतिक नाही,त्याने तलवार हातात घेतलीच पाहिजे हे इथे अपेक्षीत नाही.तर त्या मुलाने लेखणी जरी हातात घेतली तरी आणि लोकांवरचा अन्याय जरी दूर केला तरी शिवबा घडविल्याचं समाधान प्राप्त होईल आपल्याला.त्या मुलाने आज स्वार्थासाठी किंवा पैसे कमविण्यासाठी डाँक्टर, इंजिनियर बनण्याची गरज नाही तर त्याने पत्रकार,शेतकरी,किंवा एखादा साधा वकील जरी बनले तरी मायबापांनी धन्य मानावे.मुलांकडून जास्त अपेक्षा करायला नको.कारण जास्त जर अपेक्षा केली तर त्याचा परिणाम मुलांच्या आत्महत्या घडण्यात होतो.
त्यासाठी मुलांना त्या गोष्टीची गरज समजून द्यावी.गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात.पण गरज ही शोधाचीच नाही तर मुलांवर संस्कार फुलवितांना ही कामात येणारी वस्तू आहे हे कदापिही विसरु नये.गरजेनुसार प्रत्येक घरात शिवबा घडला पाहिजे.त्यासाठी तलवार घेण्याची गरज नाही.
अलिकडे विदेशवारीचं फड निर्माण झालं आहे.जो तो विदेशात जाण्यासाठी आपली मानसिकता तयार करतो आहे.कोणी शौक म्हणून तर कोणी स्वतःचं करियर करण्यासाठी,कोणी भारतात इज्जत मिळत नाही हा बहाणा करुन तर कोणी आपलं संशोधन भारतात खपत नाही अर्थात या देशात आपलं कोणी ऐकत नाही म्हणून विदेशात गेली.काही घोटाळे करुन विदेशात गेली.सरकारमध्ये बसलेल्या बड्यी नेत्यानं म्हटलंच आहे की ज्यांना ज्यांना घोटाळे करुन विदेशात पळायचे असेल त्यांनी लवकर पळा.नाहीतर तुमची खैर नाही.
भारत कृषीप्रदान देश आहे.तसेच हा देश नवरत्नाची खाण आहे.आम्हीही म्हणतो.सगळेच म्हणतात.खरंच आहे.भारत कृषीप्रदानच देश आहे.तसेच नवरत्नाची खाण आहे.या देशात पिकणारा कापूस हा उच्च दर्जाचा असल्यामुळे त्या काळच्या इंग्रजांनी ह्याच देशातून कापूस कमी दामात आपल्या देशात नेला होता.हा इतिहास आहे.इथे पिकणा-या लांब धाग्याचा कापूस जगात कुठेच पिकत नाही.कारण इथली माती काळी कसदार असून कापूसच नाही तर इतरही जिनसासाठी अनुकूल आहे.इथले जमीनीतुन निघालेले पदार्थ जसे रुचकर लागतात.तसे रुचकर इतर भागातले लागत नाही.
आज भारत कृषीप्रदान जरी वाटत असला तरी आज भारतात कृषीची काय गत आहे?देशातील कृषीवर दुष्काळाचे सावट आहे.कधी सुका दुष्काळ तर कधीकधी ओला दुष्काळ शेतक-यांचा घात करीत आहे.आमचे सरकारही या शेतक-यांच्या पाठीशी नाही.तेही शेतक-यांचा घात करीत आहे.देशात शेतकरी आत्महत्या घडत आहेत.पण त्यावर तोडगा सरकार काढत नाही.निव्वळ आश्वासन फैरी....निव्वळ आश्वासनाच्या फैरी सरकार झाडत आहे.
भारत नवरत्नाची खाण आहे हेही बरोबर आहे.जे काही अठराव्या शतकात संशोधन झालं.त्याची पाळमुळं ब-याच वर्षापुर्वी भारतीय शास्रज्ञानी रोवली होती.ह्याचे दाखले आजही त्या काळात लिहीलेल्या धर्मग्रंथात आजही दिसतात.त्या काळात उच्चकोटीचे शिक्षण घ्यायचे असेल तर विदेशी लोकांना भारतात यावं लागायचं.तक्षशिला, नालंदा विद्यापीठात त्या काळी विदेशातून आलेली मंडळी शिकली.नव्हे तर मेगँस्थनीस, युवान श्वांग, ह्युएनत्संग ही भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेली मंडळी.त्यांनी आपल्या लेखनीने भारतीय संस्कृतीचे जे वर्णन लिहिले.ते पाहून मोगल,इंग्रज,फ्रेंच, डच,पोर्तुगीज या सर्वांना भारतात येण्याचा मोह आवरला नाही.तेही भारतात आले.भारताला गुलाम बनवून त्यांनी लुटलुट लुटले.येथील खजिना आपल्या देशात नेला.तरीही ही पवित्र भुमी नेता न आल्याने.या मातीत पिकणारे सोने त्यांना नेता आले नाही.महत्वाचे म्हणजे ह्या भुमीने जे ऐश्वर्य आपल्याला प्रदान केले.तेच ऐश्वर्य इतर कोणताही देश प्रदान करु शकत नाही.आजही देश सुजलाम सुफलाम आहे.
मोहम्मद गझनी पासून तर आजच्या निरव मोदी पर्यंत सगळ्यांनी भारताला लुटले.आपल्या देशात येथील पैसाच नाही तर सोनंही नेलं.कोहीनुर हिरा हा ह्या देशातील शान.पण तोही ब्रिटीशांनी आपल्या देशात नेला.सोमनाथांचं मंदीर हे सोन्यानी मढवलेलं होतं.तेही मंदीर गझनीनं लुटून नेलं.तरीही भारताला त्या काळीही क्षति पोहोचली नाही.आजही पोहोचत नाही.नीरव मोदी ललित मोदी विजय माल्यासारखे ऐरेगैरे नत्थु खैरे सारखे कितीही येवो.
खरंच भारतात इज्जत मिळत नाही.सामान्य लोकांना न्याय मिळत नाही.खुन करुन भारतातून पलायन करतात.कोणी पैसा घेवून भारतातून पलायन करतात.तर कोणी मनपसंद नोकरी मिळत नाही म्हणून जातात.तिथेच रमतात.त्या देशाचे नागरिकत्व स्विकारतात.रोजी रोटीसाठी सारखे वणवण भटकावे लागते तरीही.
इथली माती नवरत्न निर्माण करते.पण या नवरत्नांना देशात पाहिजे तो वाव मिळत नाही.नवरत्नांच्या मनपसंद काम मिळत नाही.नव्हे तर नवरत्नांनी कार्य करतो म्हटले तर त्यांचे पाय खिचले जातात.त्याला कार्य करुच दिले जात नाही.चापलुसी करणारा घटक हा चापलुसी करतो.त्याच्याजवळ गुणवत्ता नसल्याने तो राज्य करणा-या घटकाच्या अगदी जवळ चिपकून राहतो.त्यालाच सन्मानाची पदं मिळतात.कर्तृत्व नसेल तरीही.....गुणांची पारख न करता......त्यांना वाव न देता.......हिरे कोळश्याच्या खाणीत जन्मल्यासारखी विद्वानाची गत अाहे देशात.
आज या देशातील मोठमोठी विद्यापीठं बंद पडली.विद्यापीठातही गोंधळ निर्माण झाला आहे.नवरत्न एखाद्या झोपडीत जर जन्मला तर त्याला घडायला वाव नाही.कारण शिक्षणाचं खाजगीकपण झालं आहे.शिकायला भरपूर पैसा लागतो आहे.उद्योगपतींचीच वाहवा आहे.मोठमोठे श्रीमंत मंडळी आँक्सफोर्ड मध्ये जातात शिकायला.नालंदा तक्षशिलेची जागा आँक्सफोर्ड विद्यापीठाने घेतलेली आहे.
देशात संस्कृती उरलेली नाही.जी सिंधू संस्कृती संपूर्ण जगात प्रसिद्ध होती.ती संस्कृती दिसत नाही.संस्कृतीच्या नावानं भांडतात लोकं.त्यांना मजा वाटते.जात, धर्म ह्या गोष्टी विकासाला अडसर असल्या तरी त्याचाच बाऊ केला जात आहे.न्याय हा श्रीमंतापुरताच मर्यादित झाला आहे.गरीबीची गत एखाद्या किड्यामुंग्यांसारखी आहे.केव्हाही कुचलता येईल अशी.राम राज्याचा हव्यास आहे.लोकांना राम पाहिजे.पण त्यांचा विचार नको आहे.भीम पाहिजे त्यांचा विचार नको आहे.जातीजातीत राजकारण.गांधीनी अहिंसा मांडून देश एकत्र आणला.पण भारत पाकिस्तान फाळणीला त्यांनाच दोषी मानले जात आहे.लोकांना खिशातला गांधी हवा आहे.पण विचारात गांधी नको आहे.असा आमचा समाज.आजही अबलावर अत्याचार करतो आहे.हिस्यासाठी भाऊ बहिणीचा खुन करतो आहे.नव्हे तर हुंड्यासाठी महिलांना चक्क जीवंत जाळले जाते.सावकारी पद्धती काही अंशी बंद झाली असली तरी आजही शेतक-यांना कर्जात फसवून आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे.
देशातील अशी अवस्था पाहून इथली माणसे वैतागणार नाही तर काय?म्हणूनच ती माणसे विधात्याने दिलेला जन्म एकदाच मिळतो हा उद्देश गृहीत धरुन काहीअंशी आवरण या पृथ्वीचे देणे लागतो असा विचार करुन आपल्या देशात नाही तर कोणत्याही देशात कर्तृत्व बजावण्यासाठी जातात.तर काही या देशाला गहाण टाकून येथील मालमत्ता घेवुन पळून जातात.यात दोष कोणाचा?ते पळेपर्यंत सरकार झोपलं होतं का?असे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आजही उभे राहतात.
आज तरी देशाने जागृत व्हावे.व्हिसा बनवितांनाच त्याच्यावर किती कर्ज आहे हे तपासून पाहावे.विदेशात जावू देण्यापुर्वी जामीन म्हणून त्या परिवाराची संपूर्ण मालमत्ता जमा ठेवावी.नाही आल्यास इशारे देवून ती मालमत्ता विक्रीस काढता येईल.मग कोणीही असो.न्यायाचं सामान्यीकरण करावं.कोणालाही न्याय मिळेल.पैसा हा घटक चालणार नाही.हेही लक्षात घ्यावे.त्यासाठी वकील, दलालांची फौज नष्ट करावी.
प्रत्येक तक्रारीवर अंमल व्हावा.देशातील सर्व घटकांना आपल्या वरील अत्याचार दूर करता यावा.धोब्याच्या बोलण्यानंही नात्याला माफ करु नये.न्याय असाच असावा की ज्यामध्ये जनतेचेच नाही तर सामान्य लोकांचे हित दडलेले आहे.आईचे वचन प्रत्येक लेकराला शिरसावंद्य असावे.राजा विदेशात गेला तरी चालेल.पण जनता जाता कामा नये.पण राजाने विदेशात जातांनाही रामासारखं काही नेण्याची गरज नाही.राम जंगलात गेले,काहीही न नेता.......अगदी तसंच.हेच रामराज्य असेल.तुम्हा आम्हा सर्वांचं.
अलिकडे गावात रोजगार उरला नसल्याचे जाणवत आहे.असे दिसते आहे की सगळी मंडळी गावाकडून शहराकडे धाव घेत आहे.आम्ही रोजच असे अनुभवतो आहोत.
आता गावंही गावासारखं राहिलेलं नाही.या गावात आज शहरीकरणाचा आभास होत असून तिथे मिळत असलेल्या सोयी सुविधा ह्या काही अंशी सारख्याच वाटतात.अगदी पाण्याच्या नळापासून तर रस्त्यापर्यंतच्या सुविधा.....
गावातील रस्ते आता डांबरीकरणाचे उरलेले नाहीत.त्याची जागा आता सिमेंटीकरणानं घेतलेली आहे.गावागावात आता सिलेंडरही पोहोचलेला असून त्यांच्याही बँक खात्याला आधार जोडलेला आहे.फरक मात्र एकच दिसतो.तो म्हणजे स्नेहभाव.तो मात्र गावात निराळा आणि शहरात निराळा आहे.
शहरी भागातही पुर्वी स्नेहभाव होता.मानमरातबाने माणसे वावरत होती.सकाळी उठल्याबरोबर माणसे गुड मार्नींग न म्हणता नमस्कार म्हटल्याशिवाय आपल्या कामाची सुरुवातच करीत नसत.तसं पाहता हीच मानमरातबाची प्रथा ही ग्रामीण भागातही होती.पाहूण्यांचा पाहूणचार आठ आठ दिवसपर्यंत चालत होता.त्यांचं आठ आठ दिवसाचं जेवण खावण.त्यातही त्या पाहुण्यांना खारट तिखट,गोड या सर्व चवींचं चविष्ट भोजन दिलं जायचं.जेणेकरुन पाहूण्यांनी नाव ठेवून जावू नये.हा उद्देश होता.काळानुसार महागाई जरी वाढली तरी त्याची झळ गावात ब-याच उशिरापर्यंत पोहोचली नाही.आज मात्र गावात तेवढा मान सम्मान उरलेला नाही.आजचा पावणा गावात आठ दिवस सोडा,चार दिवसही टिकत नाही.कारण महागाई.
पुर्वी एका एका परीवारात दहा दहा मुलं राहायचे.या मुलांना जगवायला तेवढा नेट लागायचा नाही.सर्वांना पुर्ण कपडे मिळाले पाहिजेच याचं बंधन नव्हतं.कोणाला शर्ट मिळायचं तर कोणाला मिळायचा नाही.लोभ नव्हता.वासनाही नव्हती.लहान मुलांना तर वयाच्या दहा वर्षापर्यंत कपडेच मिळायचे नाहीत.त्यांच्या नाकातुन सतत शेंबुड वाहात राहायचं.पण त्यांना दवाखान्यात जायची गरज नव्हती.शिवाय साबण सोड्याचीही आवश्यकता नव्हती.जवळच्या नदीवर किंवा तलावावर जावून महिला वर्ग आपले कपडे धुवायच्या.साबण न वापरता त्याऐवजी रिठ्याचा वापर होत होता.त्या रिठ्याच्या परिसस्पर्शाने साबनाहूनही चांगले स्वच्छ कपडे धुतल्या जायचे.प्रेस नसल्याने प्रेसचे कपडे घातलेच पाहिजे असं बंधन नव्हतं.चार दोन श्रीमंताच्याच घरी प्रेसचे कपडे घालायची प्रथा होती.तीही मंडळी प्रेस करताना गडव्यामध्ये विस्तव भरुन ते गरम होताच त्यावर कापड बांधुन प्रेस करीत असत.
खर्रा,जुवा यांचा शौक नव्हता.ते शौकं फक्त श्रीमंत मंडळी करायची.दारुची तेवढी किल्लत नव्हती.हर गावागावात घरोघरी दारु काढली जायची.ह्यातील मद्य एक शौक म्हणून न पिता कुटूंबातील सर्वच सदस्य केवळ रोगरोधक पदार्थ म्हणून प्यायचे.मनोरंजनासाठी कोंबड्याची काती अर्थात कोंबडे लढविणे,रेड्याची झुंज.बैलाच्या शर्यती(शंकरपट) यासारख्या गोष्टी होत्या.अगदी आनंद वाटायचा ग्रामीण जीवन जगतांना.
मोटारगाड्यांचा शोध लागला.त्यानुसार गावातील माणसे शहरात येवू लागली.व्यापार करु लागली.व्यापार करता करता शहरी संस्कृतीही ते खेड्यात नेवू लागले.शहरातील लोकांच्या राहण्याच्या सवयी,पोशाख,मनोरंजन ह्या गोष्टी ग्रामीण भागातही आवडायला लागल्या.ते शंकरपट,कोंबड्याची झुंज कालबाह्य झाली.त्याची जागा क्रिकेटने घेतली.पोशाखातही तोकडे कपडे आले.दारु ही विदेशी झाली.ती आता रोगरोधक राहिली नाही तर तिची जागा शौक चैनीचं पेय म्हणून ठरली.त्यातुनच थोडी पिण्याऐवजी जास्त पिण्याला महत्व आलं.कबड्ड्या,लंगड्या,लगो-या सारे खेळ कालबाह्य झाले.
मानमरातब,आदर ह्याही गोष्टी नष्ट झाल्या.सरपणावर शिजणारं अन्न ही गायब झालं.तसेच मातग्यातील भाजीही गायब होवून त्याची जागा स्टील कलईने घेतली.सकाळी पेय म्हणून घेतला जाणारा दुध,त्याजागेवर चहा आला.रोगसंख्येत यामुळेच वाढ झाली आणि आता शहरातला डाँक्टर खेड्यातही आला.








पुर्वी खेड्यात जास्त बिमा-या नव्हत्या.आता मात्र बिमा-या वाढल्या.तसेच रिठ्याची जागा साबनाने घेतली.तसेच मुला मुलींच्या वासनेनेही रंग बदलले.शहरात बागेमध्ये फिरणारी तरुण तरुणी खेड्यात कानबैरीत,गव्हाच्या व तुरीच्या शेतात जावू लागली आणि भलत्याच नादात पडून कुवारपणी गर्भधारणा करुन घेवू लागले.खांद्यावरचा सेव गेला.लुगडे गेले.धोतर गेला.सा-याच गावच्या गोष्टी या शहराने खेचून नेल्या.एखाद्या स्मशानागत.....आज गाव,गाव राहिलेलं नाही.त्याचंही शहर झालं आहे.शहरातील मानमरातब खेड्यातुनही गहाळ झाला आहे.माणसे खेड्यातही विकली जात आहेत.शेते पिकत नाही.मुलं शेतावर काम करीत नाही.ते दारुच्या अड्ड्यावर,जुव्व्याच्या अड्ड्यावर,तसेच पानठेल्यावर दिवस रात्र दिसतात.हे सारं परीवर्तन केवळ शहरीकरणानं नाही तर महागाईच्या भष्मासुरानं केलं.शहरातील महागाई खेड्यात शिरल्यानच सारं खेड्याचं सुख नष्ट केलं.पुर्वीची वस्तुविनिमयाची पद्धती खेड्यातून नष्ट झाल्यानं सलोखा उरला नाही.मानमरातब तर नाहीच नाही.आता लग्नाचा एक दिवसाचा पाहूणा जड जातो.
आम्हाला आज शहर नको आहे.पुर्वीचे खेडे हवे आहे.जिथे मानमरातब होता.दुस-याच्या सुखदुःखात धावून जाणारी माणसे होती.एखाद्या गरीबाच्या घरी जर लग्न असलं तर परतफेडीचा हव्यास न करता सढळ हाताने गावातील श्रीमंत मंडळी त्या गरीबाला मदत करीत.गावातील एखादा वयस्क माणूस रस्त्याने जात असला तर त्याच्या पुढून महिला डोक्यावर पदर घेवून जायच्या.लहान मुलंही वयस्कासमोर तोंडाला तोंड देत नसत.त्यांच्या आज्ञेत वागत.नव्हे तर गावच्या मास्तरसमोर विद्यार्थी नतमस्तक होवून पुढे येत नसत.गावात पाहिजे तेवढा पैसा नव्हता.पण पाहिजे तेवढा सम्मान होता.
बदलत्या काळानुसार परीवर्तन झालं.पण बदलत्या काळानुसार काही खेडे आजही आपली प्रत टिकवून आहेत.आजही तिथे मानमरातब आहे.पण आम्ही त्यांच्याकडे अत्यंत हीन भावनेने पाहतो.त्यांची इज्जत करीत नाही.त्यांना मागासलेले समजतो.त्यांना आदिवासी म्हणून झिडकारतो.ते मानसन्मान करतात.पण आम्ही त्यांची भावना समजून न घेता त्यांच्या योजनाही गडप करुन आपल्या स्वार्थासाठी दोन चार शहरातल्या लोकांना त्या योजना देतो.
आमचे हे वागणे आम्हाला बरे वाटत असले तरी ते रास्तपणाचे नाही.आम्ही आमचे वागणे बदलवावे.आम्ही आमच्या सवयी बदलवाव्या. आम्ही आमचे जगणेही बदलवावे.जेणेकरुन संस्कार मुलांमध्ये पेरता येईल.मुली मुलांमध्ये प्रेम जरी झाले तरी ते प्रेम मर्यादा ओलांडणार नाही.कुमा-या माता बनणार नाही.देश स्वावलंबी बनेल.जेणेकरुन मानमरातब सगळीकडे निर्माण होईल.
आज खेड्याकडे पाहण्याची गरज आहे.त्यांच्याकडून बरंच काही शिकण्याची गरज आहे.त्यांना ब-याच गोष्टी देण्याची गरज आहे.केवळ त्यांना शहरी प्रवाहात आणून शहरातील विभत्स संस्कृती देण्याची गरज नाही.तर त्यांचा विकास व्हायला हवा म्हणून योजना देण्याची गरज आहे.याचा अर्थ असा नाही की ह्या शहराने खेड्यातील लोकांना गुलाम समजून त्यांना गुलामासारखे वागवावे.त्यांना हीन समजून नावे ठेवावीत नव्हे तर त्यांचे स्वातंत्र्य नष्ट करुन त्यांना जाणूबुजून आपल्यासारखे जगण्यास बाध्य करावे.तेही आपलेच भाऊबहीण असून भारतमातेची लेकरं आहेत.

आम्ही जीवन जगत असतांना एकदुस-यांची मदत करतोय.ते आम्ही आमचे कर्तव्य समजतोय.ही मदत करणे घरच्यांना आवडत नसल्याने आम्ही घरी खोटंही बोलतो.पण मदत करणे सोडत नाही.पण कधीकधी ही मदत आम्हाला फार डोईजड जाते.
एकदा एक व्यक्ती रस्त्याने जात असतांना एका अर्ध्या वयाच्या माणसाने त्याला हात दाखवला.थांबा असा इशारा होता.तो थांबला व त्याला बाईकवर बसवलं.काही अंतरावर जायचं होतं त्यांना.पण बस मिळाली नसल्याने व लवकर जायचे असल्याने ते गाडीवाल्यांना हात दाखवत होते.त्या व्यक्तीमध्ये परोपकाराची भावना वृद्धींगत झाल्याने त्यानं त्यांना लिफ्ट दिली व त्यांच्या गोष्टी सुरु झाल्या.त्यालाही त्याच रस्त्याने दूरच काम असल्याने त्यानंही त्याला लवकर उतरवायची सक्ती केली नाही.
तो म्हणाला,
"मी एका मुलीला हात दाखवला.पण ती थांबली नाही.ती मला माझ्या मुलासमान वाटत असतांनाही.अशी बरीचशी मंडळी गेली,पण थांबली नाहीत."
त्याच्या माहीतीनुसार त्याचं बरोबर होतं.पण लोकं कसे थांबणार.हवं तर तो अपंगही होता.एका पायाने हलकासा लंगडा.तरीही त्याची कोणाला दया आली नाही.त्यालाही नाही.तोही जरा पुढेच गेला न थांबता.कारणअलिकडे जमाना फार खराब आहे.
एकदा एका व्यक्तीने एका पोलिसाला रात्री अकरा वाजता आपल्या बाईकवर लिफ्ट दिली.पोलिस आपल्या ठाण्याचा गणवेश घालून नव्हता.म्हणून ओळखूही आला नाही.मग गोष्टी सुरु झाल्या.त्यातच पोलिसानं हेरलं की त्या गृहस्थाजवळ काही गाडीचे कागदपत्र नाहीत.मात्र तो दररोज त्याच रस्त्याने जायचा.त्याला वेटरची नोकरी होती.त्याला रात्री अकरा वाजता सुटी व्हायची.
इकडे वळा तिकडे वळा म्हणत पोलिसानं आपल्या नोकरी असलेल्या ठिकाणी त्याला आणून मागितलं.त्या व्यक्तीनंही परोपकारानं आणून दिलं.मात्र गाडीवरुन उतरताच त्याने शर्ट उतरवला व गाडीची स्लीप फाडत त्यानं गाडी चालन केली.ही माणुसकीची थट्टाच होती.कदाचित त्या गृहस्थाने त्याला लिफ्ट दिली नसती तर........
दुसरंही याच बाबतीतील उदाहरण असंच रामभाऊला आठवत होतं.असाच एक व्यक्ती रस्त्याने येत असतांना त्याला एका तरुणाने लिफ्ट मागितली.त्या गृहस्थाने लिफ्ट दिलीही.वाटेत तो घर जवळ येताच उतरला.तो आपल्या घरी गेला असेल, हा आपल्या घरी.दोन चार दिवसाचा अवकाश.दोन पोलिसवाले हातात एक कुत्रा घेवून त्याच्या घरी आले.त्याला पोलिसठाण्यात पकडून नेलं.गुन्हा होता की त्याने खुन केलाय.गृहस्थ विचारात पडला.कोणाचा खुन,केव्हा खुन? त्याला काही कळेना.पण श्वानाने मात्र त्याचं घर दाखवताच लक्षात येत होतं की त्याने खुन केलेला असेल.पत्नीही तसेच आजुबाजूची मंडळी विचारात पडली की साहेबाने खुन केलाच कसा?तरीही श्वानाची ग्वाही लक्षात घेता त्याला पकडून नेलं आजुबाजूचीही मंडळीही म्हणायला लागली की काही काही लोकं छुपे रुस्तम असतात.ते मात्र दिसत नाहीत.या व्यक्तीने खुन केलाच असेल.
त्याला पोलिसठाण्यात नेण्यात आलं.पकडलेल्या माणसाला ओळखायला लावलं.त्याला चेहराही स्पष्ट आठवत नव्हता.पण नंतर लक्षात आलं की तो तोच तरुण होता.ज्याला या गृहस्थाने लिफ्ट दिली होती.कदाचित त्याने केलेल्या खुनाचे दाग गाडीच्या सीटवर लागल्याने श्वानाने त्या खुनाचा वास घेत घेत त्याचं घर शोधलं होतं आणि आज त्याच्या परोपकारानं त्याला कैदी बनवलं होतं.
जमानत झाली होती.पण तो काही सुटला नव्हता.केस वर्षोगणिक चालत गेली.शिक्षाही झाली.उगाच निरपराध माणूस या जाळ्यात फसला.काही दिवसानंतर तो सुटलाही.पण परोपकाराची अशीही मिसाल पाहिली की विचार येतो की कोणाला मदत करावी की करु नये.
आम्हाला जीवन जगत असतांना पदोपदी अशी काही मंडळी नक्कीच दिसतात.वाटते मदत करावी.परोपकराच्या भावनेतून आम्हा मदतही करतो.आपल्याला माहीतही असते की जमाना खराब आहे.तरीही आमच्या मनातील ही सामाजिकतेची भावना आम्हाला स्वस्थ बसू देत नाही.मग आमचे नुकसान होईल तरी चालते.नुकसान होताच कधीकधी पश्चातापही होते.या असल्या चारदोन लोकांच्या अशा वागण्याने आमची मदतीची ताकत कमी होत चाललेली आहे.यात मग ऐनवेळी खरंच ज्याला मदतीची सक्त गरज आहे.त्यालाही आपण मदत करण्यासाठी पुढे येत नसल्याने प्रसंगी त्यावेळी एखाद्याचा नक्कीच जीव जावू शकतो.
आज जमाना एवढा खराब आहे की कोणाला खरंच लिफ्ट देणे फारच महागात पडते.कोणी अशी लिफ्ट घेवून सुनसान जागी चाकूच्या धाकावर घेवून जावून बलत्कार करतो.लुटपातही करतो.त्यात अपंग असल्याचं नाटक करणा-याची संख्या काही कमी नाही.
काळाच्या ओघात असे प्रसंग प्रत्येकालाही अनुभवावयास मिळाले असतीलच.म्हणून मदत करणे सोडायचे काय?मदत करणे सोडू नये.पण मदत द्या ती लाचारांना गोरगरीबांना.जे माणुसकी जपतात.ज्यांना खरंच मदतीची आवश्यकता आहे,अशांना मदत केलीच तर तो जीवनभर तुमचं नाव तरी घेईल.नाहीतर ज्याला मदतीची आवश्यकता नाही अशांना जर मदत केलीच तर त्याचे परिणाम हे वरील प्रकारे भोगावेच लागतील.फरक एवढाच असेल की स्वरुप थोडे वेगळे असेल.
लिफ्ट द्या,पण अनोळखी माणसांना नको.ओळखीच्या माणसांनाही नको.हं म्हाता-या माणसांना दिली तरी चालेल.पण विचारपुर्वक.नाहीतर स्वतःवरच अनर्थ ओढवून घेतल्यागत अवस्था होईल.मग कोणी आप्तही किंवा शेजारीही तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत.मग पश्चाताप होईल.कारण जमाना खराब आहे.
सर्वच मुलं मुली एका विशिष्ट काळात वयात येतात. ते ज्यावेळी वयात येतात.त्यावेळी मात्र त्या जास्त भावनाशिल बनतात.त्यानंतर भावनात्मक होवून त्या वागत असतात.भावनेच्या आहारी जावून ते विचार न करता आपले निर्णय घेत असतात.मग ते निर्णय योग्य की अयोग्य याचा विचारच ती मंडळी करीत नाहीत.अशातच घेतलेले काही निर्णय योग्य असतात.तर काही निर्णय हे फसवे ठरतात.
मुले जसजशी वयात येतात.त्यावेळी मायबापांना एक चिंता सतावत असते की आपल्या मुलांना कसं सांभाळावं.खरं तर ते त्या पातळीतून गेलेले असले तरी त्यांना आज पाल्यांना कसं हाताळावं हे सुचत नाही.नव्हे तर जेव्हा मुले मोठी होतात.तेव्हा मात्र तीच मुले मायबापाचं न ऐकता आपल्या मायबापांनाच ज्ञान देत असतात.त्यांची बोलतीच बंद करून टाकतात.मग मुले मन मानेल तशी वागतात आणि मायबाप मुकाट्यानं त्यांचं वागणं सहन करतात.
अलिकडे पाल्यमंडळी आपल्या मुलांचं ऐकत नाही.मोबाइल प्रत्येकाच्या हातात आल्यानं तर जास्त जमाना फॉरवर्ड झालाय.अगदी लहान मुलांपासून तर आबालवृद्धापर्यंत सगळे बोलत असतात.त्यांना व्हाट्सअप व मेसेंजरवर बोलणं फार आवडत असते.त्यांना आपल्या मित्रांशी बोलतांना विरंगुळा तर वाटतोच.चांगलंही वाटतं.शिवाय त्या आबालवृद्धांचं पाहुन ते चांगलं शिकत नाही.तर त्यांचच अनुकरण करतात.मग तेही मोबाईलवर तासन् तास बोलत असतात.अशावेळी ना बापाचं लक्ष जात पाल्यावर ना आईचं लक्ष जात.मग मुले बिघडणार नाही तर काय?महत्वाचं म्हणजे जे तरुण वय असतं उमेदीचं.......त्याच काळात पाल्यांना डोळ्यात तेल घालून जपावं लागतं.ते कसं जपावं याचा विचार होणे गरजेचे आहे.
१)वयात आल्यानंतर आईने मुलीला शरीरसंबंधाबाबत काही गोष्टींचे ज्ञान करुन द्यावे...
तसंच मुलालाही.
२)आपापल्या मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? कसे आहेत? यावर लक्ष द्यावे.....त्यांच्याशी मिळून मिसळून वागावे...
३)मुलामुलींना वाजवीपेक्षा जास्त सुट देवू नये...
४)मुलामुलींना पार्टी करायची झाल्यास स्वतःही त्यामध्ये सामील व्हावे.
५)मुलामुलींच्या मित्रमैत्रिणी यांच्या कुटूंबांच्या संपर्कात राहावे.
६) मुलामुलींना शारीरिक आकर्षक आणि मानसिक प्रेम यातील फरक समजावून सांगावा
७) मुलामुलींचे शिक्षण पुर्ण झाल्यावर लग्नासंबंधी त्यांच्याशी खुल्या मनाने चर्चा करावी.
८)मुलामुलींमध्ये असा विश्वास निर्माण करावा की तुमच्या निर्णयात आम्ही सहभागी आहोत म्हणून आयुष्यात घडणाऱ्या सर्व बाबींची माहिती प्रथम आम्हाला द्या नंतर इतरांना.कारण आयुष्यात काही वाईट झाले तर लोक फक्त हसतील आम्ही पालक आहोत म्हणून तुम्हाला मदत करु.असेही सांगावे.
आज मुले आपल्याला सांगतात की तो काळ तुमचा होता.आज बराच काळ बदललाय.तेव्हा तुम्ही तुमच्या जमान्यातलं आज आणू नका.घोटू नका.आमच्या जमान्यातील पाहा.पण जेव्हा ते फसतात.तेव्हा मात्र त्यांना कळतं की आम्हीच वाईट वागत होतो.आमचे मायबाप बरोबर होते.आपल्याला त्याचा पश्चाताप होत असतो.म्हणुन पश्चाताप होण्यापूर्वी नक्कीच समजून वागलो तर पश्चातापाची वेळ येत नाही.ह्याचा विचार करुन आपले वागणे लोकांनी सुधरविण्याची गरज आहे.कारण कधी ना कधी कोणाचे तरी मायबाप आपणही कोणाचे ना कोणाचे मायबाप आपणही होवू.
पालकांनीही आपलं वागणं सुधरंवावं.कारण त्यांची पिढी आज लहान असली तरी त्यांना पालकांचं वागणं दिसत आहे.ते अनुकरण करीत आहेत.नव्हे तर ते उद्या त्याचा जेव्हा जाबही विचारतील.तेव्हा तुम्ही सक्षम राहायला हवं.म्हणून आतापासूनच त्या गोष्टी विचारात घेवून वागण्याची गरज निर्माण झाली आहे.पालकांनी स्वतःही सुधरावं आणि आपल्या पाल्यांनाही सुधरवावं.कारण तेच त्यांचे भवितव्य आहेत.
काही लोकं गावात राहतात.गावात राबतात. असेच नाही तर गावात अतिशय गुण्यागोविंदानं राहतात.एकमेकांच्या सुखदुःखात धावून जातात.एकमेकांच्या भावना जोपासतात.नव्हे तर दुस-याच्या आनंदातही स्वतःचे सुख पाहतात.जी माणुसकी शहरात आम्हाला दिसत नाही.ती माणुसकी आज गावात दिसते.पण आज आमचा गाव पाहिला तर असं वाटते की आम्ही आमचा गाव हरवत चाललोय.
आज जसे लोकं गावात राहतात.तसेच पुर्वीही गावात राहात होते.ज्या गावात एखाद्या घरी जर विवाहसोहळा असेल तर पुर्ण गाव त्या परीवाराला मदत करायचा.कोणी धान्य आणून द्यायचा,तर कोणी भाजीपाला......पण गावाचा कोणताच पाहूणा उपाशी जात नव्हता.गावातील एका परीवाराच्या घरच्या विवाहाला ती मंडळी आपल्या घरचा विवाह सोहळा समजून मदत करीत असायचा.
शिक्षणाच्या क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास शिक्षकांचा मोठा रुतबा होता.एखाद्या अडचणीच्या प्रसंगीही सल्ला देण्याचे काम आमचे शिक्षक बंधू करायचे.शिवाय शिक्षकाला सरकारकडून पगार नसायचाच मुळी.तो पगार गावातील श्रीमंत मंडळी वर्गणी म्हणून गोळा करायचे.आपल्या पाल्यांला हे शिक्षक शिकवितात म्हणून मानसन्मानच्या रुपात पैसा द्यायचे.त्या कमी रकमेवरही शिक्षक खुश असायचा.शिक्षकाला गावात त्रास नसायचा.
काही दिवसानंतर शाळा सरकारी झाल्या.शिक्षकांची बदली होवू लागली.शिक्षक या गावातून त्या गावी स्थलांतरीत होवू लागला.शिक्षकांना बदलीचा त्रास होवू लागला.त्यातच एखादा शिक्षक चांगला असल्यास गाव मात्र त्याची बदली ताबडतोब रद्द करीत त्याला गावात टिकवून ठेवू लागले.महत्वाचं म्हणजे गावाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका मोलाची असायची.शिक्षकही त्याप्रमाणात इमानदार असायचा.मग हा शिक्षक विद्यार्थ्यांना मारतही असेल तर मुलांच्याच भवितव्यासाठी मारतो असा गावाचा समज असायचा.म्हणूनच गावात घडणारी विद्यार्थ्यांची पिढी ही चांगली संस्काराची निपजायची.
गावातील तरुणही संस्कारक्षम होते.ते तोकडे कपडे वापरत नसत.प्रेमविवाहाला थारा नव्हता.एखाद्याने प्रेमविवाह केलाच तर त्याला परीवारच नाही तर समाजही निष्कासीत करायचा.शिवाय संयुक्त कुटूंबपद्धती असल्याने नव-या मुलीवर वडीलधारी मंडळींचा धाक असायचा.यामुळे वडीलधारी मंडळींसमोर ती मुलगीही डोक्यावर पदर घेवून राहायची.जशी गुलाम असल्यासारखी.पण ते वातावरण गुलामीचं नसून एक संस्कारक्षम वातावरण होतं.कारण लहानपणापासूनच लहान मुले ते दृश्य पाहून संस्कारक्षम गोष्टी आपल्या मनावर बिंबवायचे.
आज काळ बदलला.शहरात पाश्चात्यीकरण आलं.त्याचबरोबर ते शहराच्याच माध्यमातून गावातही.आता डोक्यावरचा पदर गेला.संयुक्त कुटूंबपद्धती बदलली.त्यामुळे संस्कार राहिला नाही.त्याचबरोबर मानही.पुर्वी गावातील मानवाईक माणसाच्या समोर अदबीनं वागणारी गावातील सुन आता चक्क डोक्यावरील पदर खांद्यावर घेवून ऐटीत चालू लागली.गावातील वडीलधा-या माणसासमोरुन धाकानं पळणारं लहान बाळ आता आबालवृद्धांची टिंगल टवाळकी करु लागला.त्याचबरोबर पुर्वी गावातल्या मास्तरांना घाबरणारा विद्यार्थी आता मास्तरांना वाकवल्या दाखवू लागला.नव्हे तर वर्गातच शिक्षीकेंवर दबाव टाकून त्यांचा छळ करु लागला.एवढेच नाही तर त्या शिक्षीकेसमोर वर्गातल्या मुलांवरच चाकूचे वार करु लागला.लुगडी गेली,साडीही गेली.तो ओढणीवाला सलवारही बदलला.त्या जागेवर आता गावातही जीन्स अन् टी शर्ट आला.
आपल्या रुढी, परंपरा ज्या शहरात नव्हत्या.ज्या कमी प्रमाणात शहरात जोपासल्या जायच्या.त्या परंपरा गावात हमखासपणे जोपासल्या जायच्या.नव्हे तर त्यातूनच गावात संस्कार टिकायचा.आज गावातून त्या परंपरा कायमच्या हद्दपार झाल्या आहेत.गझला,पोवाडे,लावण्या,दंडारी यामधून शहीदांच्या ज्या आठवणी ताज्या केल्या जायच्या.त्या आठवणी आज गावात दिसत नाहीत.कबड्डी,खोखो, लंगडी,लगोरी,घाणमाकड,फुगडी,चक्करबिल्ला,कुस्ती इत्यादी देशी खेळासाठी प्रसिद्ध असलेले गाव संपलं आहे.त्याची जागा आता क्रिकेटने घेतलेली असून आज गाव हरवत चाललं आहे.महागाई तसेच लोकसंख्येची झळ गावालाही पोहोचल्याने आता विवाहप्रसंगी किंवा कोणत्या कार्यक्रम प्रसंगी गावातील मंडळींना कोणीही मदत करीत नाही.काही काही गावात थोड्या फार प्रमाणात किर्तनाचे कार्यक्रम होतात.तेही केव्हा संपतील.त्याचे काही खरे नाही.महत्वाचे म्हणजे आज गावात गावातल्या माणसांबद्दल आपुलकीपणा उरलेला नाही.
गावातही आमच्या आज शैतान शिरला आहे.सा-या गावातील आया बहिणींना, आईबहिण समजणारा गाव आज त्यांच्यावरच बलत्कार करु लागला आहे.माझा भाऊ,माझी बहिण,माझे आजीआजोबा,माझे आप्त म्हणून संयुक्त कुटूंबात राहणा-या गावाने विभक्त कुटूंबपद्धती स्विकारुन नातेसंबंधांचा खुनच केला आहे.नासुकल्या गोष्टीसाठी भाऊ भावाला,भाऊ बहिणीला,तसेच पुत्र बापाला,बाप लेकराला मारायला नव्हे तर खुन करायला मागे पुढे पाहात नाही.अपहरण,बलत्कार,खुन,आत्महत्या,लुटमार या सर्व गोष्टीचे सत्र गावातही हमखास राजरोषपणे सुरु झालेले आहे.
ज्या किर्तनाच्या माध्यमातून संतांनी समाजप्रबोधन केलं.ते संत गेले ज्यांनी आपला देह झिजवला.आज संत म्हणून बुरखा पांघरलेल्या भोंदू इत्यादी सारख्यांचे आश्रम गावात डोलू लागले आहेत.आज शहर तर सोडा, पुन्हा नव्याने गाव सुधारण्याची गरज आहे.त्यासाठी सुधारक निर्माण होण्याची गरज आहे.
आमचं गाव आज बिघडत चाललं तरी थोड्याफार प्रमाणात गावात मानमरातब अजुनही शिल्लक आहे.शहरात तर चक्क ओळखीचा माणूस पत्ता विचारत घरी आला तर त्याला नाही ओळखत म्हणून चक्क सांगणारा गृहस्थ गावात दिसत नाही.आजही काही गावात तहानलेल्या वाटसरुंना पाणी दिलं जातं.आजही गावातील लहान मुलं आपल्या शिक्षकाची थोडीफार इज्जत करतातच.त्याच तत्वावर आज चालून ग्रामस्वराज्य आणि आदर्श ग्राम बनवल्या जावू शकते.
आमचं गाव हागणदारीमुक्त झालं.गावात मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या.पेहराव बदलला.रोजगार मिळाला.पण जे संस्कार संस्कारक्षम वयात बालकावर होत होते.तेच संस्कार आज गावात होत नसल्याने आत्महत्येच्या सत्रात वाढ झाली.आमची मुलं शिकली.मोठी झाली.पण त्यांना आज शेती करण्याची,कामधंदा करण्याची जी लाज शहरात वाटू लागली.तिच लाज गावातही वाटू लागल्याने शेतीपासून तरुण मुले फारकत घेवू लागली.जंगलकटाईने तर माणसाच्या जीवनाचा -हासाच केला.पाऊस पडेनासा झाला.महत्वाचं म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून शेतक-यांनी कोंबडीपालन,गोठपालन,गाईम्हशीपालन,मशरुम शेती करणे,फळबागा लावणे गावात भाग होते.त्या गावातील तरुणाई अशी बेरोजगार निघाल्याने आमचं गाव गावगीरीपासून तुटत चालला आहे. सर्व मंडळी गावातून शहरात येत आहेत.गावं ओस पडत चालली आहेत.एकदंरीत सांगायचं झाल्यास आमचं गाव हरवत चाललं आहे.यावर उपाय सरकार करु शकते.पण सरकारही फक्त मतांचं राजकारण करीत आहे.गावाचे आरोग्यही मात्र बिघडत चालले आहे.
गावात आज नद्याजोड प्रकल्प राबवायला हवा.गावातल्या रस्त्यावर दुतर्फा झाडं लावायला हवी.काही शेतीत फळबागा विकसीत करायला हव्या.तरुणांना शेतीबाबत निःशुल्क माहीती देवून त्यांना शेतीकडे वळवायला हवं.गावातल्या ओसाड जागेवर सरकारी उद्योगाची निर्मीती करायला हवी.तसेच गावात संयुक्त कुटूंबपद्धती जी आधी होती.ती राबवायला हवी.जेणेकरुन आज आमचं गाव सुधारेल.जेणेकरुन शहराकडे जी आता मंडळी स्थलांतरीत होतात.तीच मंडळी पुढे शहराकडून गावाकडे स्थलांतरीत होतील हे सांगायला नको.
आपण जीवनाची जेव्हा वाटचाल करीत असतो.तेव्हा प्रत्येक पाऊल हे जपून टाकत असतो.त्यातच एखाद्या दिवशी आपल्याला मृत्यू येतो.कारण कोणीही पृथ्वीतलावर अमर होवून जन्म घेत नाही.
मृत्यु अटळ आहे.तो येणारच.कोणी कितीही नाही म्हटलं.कोणी कितीही लपून बसला आणि कोणी कितीही आपल्या प्रकृतीची काळजी घेतली तरी मृत्यू हा त्यांना सोडत नाही.मात्र मृत्यूलाही एक सांगावेसे वाटते ते असे सांगणे व्यर्थ ठरत नाही.
मृत्यू हे मोक्षप्राप्तीचे साधन आहे.दुःखाला कोणीही सोडलेले नाही.गौतम बुद्ध घडले ते दुःखामुळेच.त्यांनी सर्वप्रथम जेव्हा चार गोष्टी पाहिल्या.तेव्हा या चारही गोष्टीपासून त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.ते ज्ञान.ज्या ज्ञानापासून सुख प्राप्त करता येवू शकते.दुःख नाही.पण आमच्या ते लक्षात येतच नाही.आम्ही मात्र ते ज्ञान वृद्धींगत न करता केवळ स्वार्थी पणातून आणि लोभातून आपल्या जीवनाची राखरांगोळी करतो.नव्हे तर दुःख स्वतः होवून ओढवून घेतो.हेच सत्य आहे.आपण राग,लोभ,मध,मत्सर,द्वेष यांच्या आहारी जावून सर्व प्रकारे आपल्या जीवनाची हानी करतो.
संत ज्ञानेश्वरांना मायबापाची जेव्हा गरज होती.तेव्हा मात्र मृत्यू त्यांना घेवून गेला.मग काय त्यांना कितीतरी त्रास सहन करावा लागला.असं वाटायचं की मेलेलं बरं.पण या लेकरांना मृत्यू आलाच नाही.खरी गरज त्यांच्या मायबापांना नव्हती.पण मायबाप मेल्यावरच खरी गरज निर्माण झालेली असतांनाही मृत्यू आला नाही.
मृत्यू यावा.कारण तोच अंतिम सत्य आहे.सर्व दुःखाचा अंत मृत्यू हेच आहे.पण मृत्यूचाही कधीकधी राग येतो.कारण तो येतांना कधी विचारच करीत नाही की समाजाला कोणाची गरज आहे.तो केव्हाही कोणाच्याही आयुष्यात कोणाच्याही घरी येत असतो.ज्या घराला मृतवत माणसाची सर्वात जास्त गरज असते.तो माणुस मृत्यू पावतो व जी माणसे असह्य यातना भोगत असतात नव्हे तर त्याला मृत्यू हवा असतो.सगळी माणसे जेव्हा त्याला पाहतात,हळहळतात.याला मृत्यू यावा असेही म्हणतात,ती माणसे मृत्यू पावत नाही.त्यांना मृत्यू हवा असतो.
आज कितीतरी माणसे अशी असतात की जी म्हातारी असतात.त्यांची मुले त्यांची सेवाही करीत नाहीत.नव्हे तर वृद्धाश्रमात टाकतात.त्यांचा ज्यांच्यावर जीव असतो.त्या नातवंडांची त्यांना भेटही घेवू दिली जात नाही.तसं पाहिल्यास मृत्यू त्यांना हवा असतो.तसे ते देवाला प्रार्थना देखील करतात.पण मृत्यू त्यांना येत नाही.म्हातारपणात म्हातारी माणसे कपड्यात विष्ठा जेव्हा करतात,तेव्हा सुन बाई त्यांना जेवायला देत नाही.भुक लागूनही उपवासात दिवस काढावे लागतात.तरीही मृत्यू येत नाही.काही सुना तर चक्कही सासुसास-यांना म्हातारपणात मारत असतात नव्हे तर नाना त-हेचे बोल बोलत असतात.जे बोल सहन होत नाही.हे झालं वृद्धावस्थेतलं.पण जी माणसे तरुण असून अपंगत्वाने भीक मागतात किंवा जी माणसे दुर्धर आजाराने त्रस्त असतात किंवा जी माणसे गुलाम असतात किंवा जी माणसे कैदेत अतिशय त्रस्त जीवन काढत असतात.खरं तर तेही मृत्यू मागत असतात.त्यांना मृत्यू हवा असतो.पण देणार कोण?याऊलट ज्यांना जीवंत राहावसं वाटतं,ज्यांची या परीवाराला गरज असते.ज्यांची देशाला गरज असते.अशी माणसे जीवंत राहावी काही दिवस असे वाटत असते.पण मृत्यू त्यांना जीवंत ठेवत नाही.नव्हे तर ज्यांच्या पायाशी अठराविश्वाचं सुख लोळत असतं,घिरट्याही घालत असतं.त्यांनाही मात्र मृत्यू अवकाळी घेरतोच.
कधीकधी आम्ही जेव्हा दोन लहान बाळ पाहतो.कडेवर सांभाळत नसतांनाही ते लहान बाळ कसेतरी कडेवर घेवून मोठा बाळ भिक्षा मागत असतो आपल्या लहान भावाला जगविण्यासाठी.आम्ही त्याला लाखो शिव्याही हासडतो कधीकधी.पण तो लाचार असतो.मजबुरी असते त्याची.कारण त्याला आईबाप नसतात.ते नुकतेच मरण पावलेले असतात.कधी अपघातात तर कधीकधी आत्महत्या करुन.तसा विचार केल्यास या लहान बाळासाठी ह्या मायबापाचे जीवंत राहणे गरजेचे असते.पण मृत्यू त्यांना सोडत नाही.तो येतोच.तेव्हा विचार येतो.
मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य जरी असले तरी त्या मृत्यूने थोडा तरी विचार करावा.कोणाच्याही घरी असे जावू नये.हं हे मात्र खरं की ज्या परीवाराला,ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे.त्या घरी तो गेला तरी चालेल.हरकत नाही.पण उगाचच प्राण घेवून त्या लहानग्या बाळांना मृत्युने तरी भिक्षा मागायला लावू नये.थोडा तरी यावर विचार करावा.

आता लग्नाचं फँडच आलयं.लोक आता फँशन म्हणून विवाह करु लागले आहेत.आपली ऐपत नसतांनाही लोक प्रसंगी कर्ज काढून लग्नासाठी पैसा गोळा करतात आणि लग्नसोहळा थाटामाटात पार पाडतांना दिसतात.मग लग्नानंतर वर्षगणती तो कर्जाचा पैसा (परतफेड)देत असतात.
पुर्वीही लग्नसोहळे होत.विवाह करायला पैसे लागतच.तेव्हा लोकं आपली शेती सावकारांकडे गहाण टाकून त्या बदल्यात लग्नविधी पार पाडत असत.यातच शेतकरी राजा शिकला नसल्याने थोड्याशा रकमेत त्याचा अंगठा कागदावर घेतला जात असे.ज्या कागदावर सदर शेतक-याने सावकाराला शेती विकलेली आहे हे लिहिले असायचे.कधीकधी हे शेतकरी आपल्या कर्जाची रक्कम सावकाराला देत.पण त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेवून हे सावकार व्याजावर व्याज लावून ती पुर्ण रक्कम देवूनही ती रक्कम काहीच मिळालेली नाही अशा प्रकारचा व्यवहार करीत असत.अशाप्रकारे शेती हडपण्याचे प्रकार भरपूर झाले.नेमकं यात कोणाचं चुकलं.शेतक-यांचं की सावकाराचं.पण गरज ही माणसाला कोणत्या थरावर नेते याचा नेम नाही.तसं शेतक-यांचं झालं.
आजही शेतक-यांची स्थिती पाहिजे तशी बदललेली नाही.मुलींचे लग्न करतांना जवळ पैसा नसल्याने ते कर्ज उचलतात.ती कर्जाची रक्कम भरणे न झाल्याने ती जमीन बँकेकडे गहाण पडते.बँकही शेतक-यांची मुरवत करीत नाही.तिही आपला पैसा प्रसंगी शेतक-याची मालमत्ता विकून वसूल करते.याच गोष्टीतून शेतकरी आत्महत्या घडत आहेत.एकतर शेती पिकत नाही.वरुन समाजबंधनं.........लग्न असंच करावं तसंच करावं हे वरपक्षाचं सांगणं.समाजही तेवढाच जबाबदार.समाजात बसता यावं.मानसन्मान मिळावा म्हणून दाखविण्यात येणारा बडेजावपणा हेच धोरण शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ठरलं आहे. म्हणून आता फरक एवढाच पडला आहे.पुर्वी कर्ज देणारा सावकार होता,आता बँक आहे.
लग्न करणे ही समाजाची परंपरा आहे.त्याशिवाय विवाहाला महत्व येत नाही.कसे करणे ही काही आपली परंपरा नाही.कोणी सामुहीक विवाह सोहळ्यातही लग्न करतात.कोणी नाश्त्यावरही लग्न करतात.तर कोणी पैसा असेल तर आलीशान होटलमध्ये लग्न करतात.त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार लग्नसोहळे आयोजीत होतात.म्हणायचे एवढेच आहे की लोकांनी लग्न करावं.ती परंपरा आहे.कारण लिव्ह इन रिलेशनशिप ही काही आपली संस्कृती नाही.पण लग्न करतांना बडेजावपणा कोणीच करु नये.आपल्याजवळ जेवढी ताकद आहे.त्याच ताकदीवर लग्नाचा खेळ करावा.कोणाकडून उसणे घेवून वा कर्ज करुन लग्न करु नये वा लग्नसोहळा आयोजीत करु नये.कारण कितीही पैसे लावून तुम्ही लग्नसोहळा साजरा केला तरी पळसाला पाने तीनच असल्यागत आपली स्थिती होते.कारण हे लग्नसोहळे आजच्या भपकेबाज संस्कृतीत टिकतीलच असे नाही.
आज लग्न तर केलं जातं.मोठ्या थाटामाटात लग्न करुन आपल्या मायबापाला गहाण ठेवलं जातं बँकेत.त्याचं मुलांना काही लेनदेण नाही.आजची मुले आपल्या पित्याचे कष्ट पाहात नाही.आईच्या कष्टाची किंमत त्यांना कळत नाही.ते लग्न झाल्यावर ही कुटूंबाची जवाबदारी स्विकारत नाहीत.तर कुवारेपणासारखे अल्लड वागतात.त्यातच टिव्हीवरील सीरीयलचा एवढा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे की ते लग्नानंतरही बायफ्रेंड गर्लफ्रेंड ठेवीत असतात.कधीकधी मुलाची गर्लफ्रेंड असल्याने ही गोष्ट त्याच्या पत्नीला माहीत होते,तेव्हा वाद होवून घटस्फोटाची तयारी सुरु होते.कधीकधी हीच गोष्ट मुलीमध्येही घडते.तिचाही बायफ्रेंड असल्याचे लक्षात येताच मुलगा चटकन निर्णय घेतो.मग तत्काळ घटस्फोट......कर्जाची रक्कम खंडण्यापुर्वीच.ती मुले मुली मायबापाचा विचारच करीत नाही.त्यामुळं कशाला कर्ज करायचंय लग्नसोहळ्यासाठी.या वाह्यात मुलांसाठी.जे लग्नानंतरही सुधरत नाहीत.
काही काही मुलेमुली तर चक्क पळून जावून लग्न करतात.अगदी चित्रपटासारखी.पण चित्रपटात त्यांचं पटतं.कारण तो चित्रपट आहे.वास्तविक जीवनात मात्र पळून गेल्यानंतर मायबापांनी स्विकार न केल्यास समाजही या जोडप्यांना स्विकारत नाही.मग काय?दररोज खस्ता खात खात जिणं.नव-याचे सतत टोमणे मारंण.घटस्फोट घ्यावासा वाटतो.पण एकटी जाणार कुठे?त्यालाही बेकारच वाटते.दोष त्याचा जरी असला तरी तो तिलाच दोष दाखवत दररोज झगडतो.कधीकधी रिलँक्स होण्यासाठी दारुही पितो.पण तरीही शांती मिळत नाही.घटस्फोटही नाही.आत्महत्या करायला जीव घाबरते.काय करावे सुचत नाही.जीव मात्र दररोजच कासावीस.
तरुणांनी,लग्न करावे.पण पळून जावून लग्न करु नये. प्रेम असेल ना.पण त्याला घरच्यांचा विरोध असतो ना.मग समाजाचा असणारच.साहजीक आहे.मग जिथे आंतरजातीय लग्नाला विरोध आहे.तिथे असे करु आंतरजातीय लग्न.कारण ते सालाबी जात नाहीत आणि जर करायचेच आहे लग्न तर एकमेकांचा जीवनभर साथ देण्याची प्रतिज्ञा घेवून लग्न करावे.काहीही झाले तरी आम्ही एकमेकांपासून विभक्त होणार नाही.ही शपथ घेवून.जेणेकरुन संकटातही कोणाला कोणी डळमळीत करणार नाही.जर का आयुष्याच्या वळणावर कधीतरी एकमेकांना सोडायचे असेल तर लग्नच करु नये.चुकून पळून जावून तर लग्न अजिबात करु नये.
या सर्व गोष्टीचा चांगला विचार करावा.जेणेकरुन वैवाहीक जीवन सुखी समाधानी होईल.मायबापांना कर्ज काढायला लावू नये.जो वरपक्ष असा थाट दाखवायला लावत असेल.मला असाच घोडा हवा असे म्हणत असेल किंवा माझं लग्न असंच व्हावं असं वरपक्ष म्हणत असेल तर तोडून टाकावे असं हे लग्न.तसेच जो मुलगा हुंडा मागत असेल किंवा तशी त्याची भावना दिसत असेल तरही तोडून टाकावे ते लग्न.कारण उद्याच्या संकटापेक्षा आजचं संकट बरं.उद्याच्या घटस्फोटाच्या फालतूच्या भानगडी नकोत.या सर्व गोष्टीचा लग्नापूर्वीच विचार करावा.आपणही वाचावे व मायबापांनाही वाचवावे.नव्हे तर मायबापाचा पैसाही वाचवावा.







रामभाऊचा विचार चांगल्या प्रकारचा असला तरी त्याला पत्नीची पाहिजे तेवढी मदत होत नव्हती. ती पत्नी त्याच्या अशा विचार करण्यानं सोडून गेली होती त्याला. मग काय तो खस्ता खात खात जगला. पण ध्येय सोडलं नाही. कधीकधी त्याला वाटत असे. चांगली पत्नी मिळणं चांगल्या भाग्याचं लक्षण आहे.माणसे मोठ्या मोठ्या पदावर जातात.नावे कमावतात.परीसरात तसेच देशात आणि पुढे जगातही नाव होते.मग एखाद्या कार्यक्रम प्रसंगी किंवा एखाद्या सत्काराप्रसंगी त्या माणसाला मनोगत व्यक्त करायला सांगीतलं जातं की त्याच्या यशाचं रहस्य काय?तेव्हा मनोगतात तो चक्क आपल्या पत्नीचा उल्लेख करतो.खरंच पत्नीमुळे माणूस उच्चपदाला पोहोचतो.त्यासाठी पत्नी चांगली असावी.
याचे श्रेय पत्नीला देणे अर्थात त्या त्या गृहस्थांचे मोठेपणाचे लक्षण आहे.ज्या माणसाला घरुन उत्तेजना मिळते.तो पुढे जाणारच.चांगली पत्नी मिळणे हे चांगल्या भाग्याचं लक्षण आहे.याच पत्नीच्या मदतीतून डाँ.बाबासाहेब आंबेडकर घडले.रमाईने रोजमजूरी करुन बाबासाहेबांना शिक्षणासाठी आणि खटल्यासाठी पैसा पुरवला.सावित्रीनेही खांद्याला खांदा लावून महात्मा फुलेंचे कार्य नेटाने पुढे नेले.महात्मा गांधींनाही कस्तूरबानं पुढं नेलं.एवढंच नाही तर जीजाऊसुद्घा मागे राहिली नाही.
पत्नीच पतीला साथ देते असे नाही.काही काही पतींच्या प्रेरणेने पत्नीवर्गही समोर गेलेला आहे.पण जिथे पत्नी जर व्यवस्थीत नसेल आणि त्या ठिकाणी पतीला पुढे जायचे असेल किंवा जिथे पती बरोबर नसेल आणि पत्नीला पुढे जायचे असेल तर तिथे मात्र समस्या निर्माण होतात.
पती आणि पत्नी ह्या दोघांना संसाररथाची चाके समजले जाते.त्यामुळे एक चाक जरी बिघडलं तर संसार तुटतो असंही समजलं जातं.तसेच जी प्रगती करायची असते तीही होत नाही.
पुर्वी चूल आणि मूल हे स्रियांचे कार्य होते.मोठमोठ्या संकटाच्या प्रसंगीही पुरुषवर्ग पत्नीचा सल्ला घेत नव्हता.पुरुषांचं काम असायचं कमाई करुन आणणे.असाच आपल्या मुलाबाळांना,मायबापांना व पत्नीला सांभाळणा-या रत्नाकरने आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी दरोडेखोरीचा मार्ग पत्करला.त्यावर जंगलात विहरतांना नारदमुनी त्याला भेटला.त्या नारदमुनीचा वध करीत नारदमूनी त्याला म्हणाले,
"हे उदरनिर्वाहासाठी तू जे काही करतोस.ते पाप आहे.हे कोणासाठी करतोस?"
त्यावर रत्नाकर म्हणाला,
"मी माझी पत्नी,माझी मुले व माझ्या आईवडीलांसाठी करतो."
"मग हे जर पाप आहे तर ह्या पापात तुझे मायबाप,मुले व पत्नी सहभागी आहेत का?"
"अर्थातच.ते सहभागी आहेत.ते माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत."
"मग जावून विचार त्यांना की तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का म्हणून.खात्री तर करुन पाहा."
रत्नाकर खात्री करायला निघाला.घरी जाताच त्यानं पत्नी,मुले व आईवडीलांना त्याबद्दल विचारलं तर त्यांनी सांगीतलं की ते त्यांचे कर्तव्य आहे.खुद्द पत्नीही तेच म्हणाली.त्यावर खजील होवून रत्नाकरने संसाराचा त्याग केला व तो एक ऋषी बनला व त्यानं रामायण लिहिलं.
चांगली पत्नी ही पतीला चांगल्या कार्यावर मार्गदर्शन करते.समर्थन करीत नाही.केवळ आपलं पोट भरवणे हे आपल्या पतीचे कर्तव्य समजून रत्नाकर नावाच्या दरोडेखोराला त्याच्या पत्नीने अडवले नाही.त्यामूळे त्याच्या हातून पापच घडत गेले.जर तिने त्याला अडवले असते तर सात रांजण दगडाने भरले नसते.जे खुनाचे दगड होते.पत्नाकर एक माणूस मारला की एक दगड त्या राजनात टाकत असे.
राजा दशरथही पत्नीच्याच कर्तृत्वाने मरण पावला.लहान राणी कैकेयी लाडकी असल्याने तिच्या पुत्राला राजगादीवर बसवण्याचे व थोरला पोरगा रामाला चौदा वर्ष वनवासात पाठवण्याचे वचन राजा दशरथाने आपल्या पत्नीला दिले.त्याला वाटत नव्हते की ती राणी असे करेल.पण जेव्हा वेळ आली,तेव्हा मात्र कैकेयीनं रामाला चौदा वर्ष वनवास दिला आणि भरतासाठी राजगादी मागीतली.याच रामायणाचा प्रखर परीणाम लहानपणापासूनच समर्थ रामदास स्वामींच्या मनावर बिंबल्यामुळे त्यांची विवाहाला मंजूरी नव्हती.त्यातच जबरदस्तीनं त्याला विवाहस्थळी उभं करण्यात आलं आणि मंगलाष्टक म्हणण्यात आली.त्यात सावधान शब्द ऐकताच स्वामी पळाले आणि संन्यस्थ जीवन जगत असतांना दासबोध हा ग्रंथ लिहिला.संत ज्ञानेश्वराच्या वडीलाचाही जीव पत्नीप्रेमानच गेला असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.संसारातून सन्यास घेतल्यावर ही सांसरीक गोष्टीची आठवण आल्यामूळे ते संसारात परत आले.संन्यास घेतल्यानंतर संसारात येणे हे पाप समजत असलेल्या समाजाने वाळीत टाकताच ते जोडपे पाण्यात बुडून मेले.कारण जर ज्ञानेश्वराच्या वडीलांनी विवाहच केला नसता तर हे भोग त्यांना भोगावे लागले नसते.
चांगली पत्नी मिळणे आता वर्तमानकाळाची गरज झाली आहे.कारण आजच्या वर्तमानकाळात मोबाइलचा जमाना आला आहे.शिवाय दूरदर्शन मधून विघातक सीरीयलचा प्रसार होत आहे.या सीरीयलमध्ये एकाची पत्नी दुस-याला व दुस-याची पत्नी तिस-याला असे दृश्य दाखवले जात आहेत.एक पुरुष दहा मुलींना घुमवतांना दाखवले जाते. तसेच एक स्री देखील दहा पुरुषांना फिरवतानाचे चित्र दाखवले जाते.त्यातच शेवटी फारकत (घटस्फोट)कोर्ट कचेरी,वकील अपघात सारंच दृश्य.महत्वाचं म्हणजे हे दृश्य असं केल्यानं असं घडते.असं करु नये.यासाठी दाखवलं जातं.पण हा समाज चांगल्या गोष्टी या दृश्य पटातून कधी घेणार नाही.वाईट गोष्टी अवश्य घेतात.हा आमचा समाज आजच्या काळात पुरुष जर असेल तर तो पत्नीचं ऐकत नाही.पत्नी जर असेल तर ती पतीचं ऐकत नाही.कारण कायद्याने घटस्फोटाची चांगली सोय करुन ठेवली आहे.शिवाय खावटीचीही सोय आहे.
कायद्यानुसार पत्नी आणि पतींसाठी घटस्फोटाची सोय जरी असली,खावटीची सोय जरी असली तरी कायद्याला हे माहीत नाही की नेमका कोणाचा दोष असावा?कारण पतीचा जर पंच्याहत्तर टक्के दोष असेल तर तो तेवढा दोष पत्नीचा सांगतोच.पत्नीही तेच करते.यामुळं घटस्फोटाचं प्रमाण अलिकडे खुप वाढलं आहे.
वाद कुणाच्या संसारात होत नाहीत.सा-यांच्या संसारात वाद होतात.याचा अर्थ थेट घटस्फोटापर्यंत जाणे हे बरोबर नाही.ही पती पत्नीच्या भांडणाची गोष्ट जर न्यायालयात घटस्फोटापर्यंत गेली तर यातच चांगल्या विचारांची धुळधानी होते.तो व्यक्ती कलावंत असेल तर त्याचे विचार मारले जातात.त्याला नोकरी असेल तर असा व्यक्ती नोकरीही सोडून देतो.कुणी व्यसनी नसेल तर तो व्यसनी बनतो.सारंच काही धुळधाण केल्यागत.तर कधी मुलं जर असतील तर मुलांसह आत्महत्याही केल्या जातात.त्यात मुलांचा कोणता दोष असतो?
आजकाल भांडणं हे शुल्लक कारणावरुन होतात.पत्नीला वाटते माझा पती दबून राहायला हवा.पतीला वाटते माझी पत्नी दबून राहावी.मग एकमेकांना दाबण्याच्या पयत्नात हे सगळं.पती जर दबत नसेल तर त्याबद्दल एखाद्या मित्राला सांगणं.तोही मित्र तिला समजविण्याची भुमिका न घेता आगीत तेल ओतल्यागत ही गोष्ट हळूवार हाताळत नाही तर तिला जाळ्यात फसवून गोड गोड बोलून बलत्कार करतो,तर कधी पुढे जावून तिला फूस लावून पळूनही नेतो.तिही स्वतःची मुले पतीजवळ ठेवून पळून जाते.याचाच धसका घेवून तो पतीही आत्महत्या करतो अशाच घटना आज सदैव घडत आहेत.ही काही चित्रपटाची कथा नाही.तर चक्क अशा गोष्टी सर्वत्र घडत आहेत.
लग्न करण्यापुर्वीच पती पत्नीने विचार करावा की मी पत्नीसाठी सर्व सोडून परीस्थीती जुळवून नेईन.पतीनेही तोच विचार करावा.नातेसंबंधासाठी विच्छेद होत असेल तर त्या संबंधाला तिलांजली द्यावी.समर्पण भावना ठेवावी. संसाराला तुम्ही पती पत्नीरुपाचे दोन चाके समजता ना.मंग ते ढळू देवू नका.एकमेकांना समजून घ्या.एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि पतीसंबंध जोपासा पत्नीसंबंधही जोपासा.जेणेकरुन संसारवेल बहरेल.संसार फुलेल.मित्रांनो चांगली पत्नी मिळणं चांगल्या भाग्याचं लक्षण आहे.

श्रावण महिना........या श्रावण महिण्यात कोणी नागद्वारला जातात आणि कोणी सव्वा महिना पाळतात.तर कोणी श्रावण सोमवार करतात.हे सर्व करीत असतांना या सव्वा महिण्याच्या काळात मांस मासे,खात नाही.त्या अन्नाला निषिद्ध मानलं जातं.त्याचा त्याग केला जातो.
अन्न ही माणसाची फार मोठी गरज.अन्न हे पुर्णबम्ह आहे.अन्नाला देवाचा दर्जा दिला आहे.माणूस काबाडकष्ट करतो ते अन्न मिळविण्यासाठी.त्यासाठी राब राब राबतो.प्रसंगी त्यासाठी चो-या करतो.लुटमार करतो.नव्हे तर नाना प्रकारे जे करता येईल ते करतो.
अन्नाचे दोन गटात वर्गीकरण झाले आहे.शाकाहारी अन्नगट आणि मांसाहारी अन्नगट.शाकाहारी अन्नगटात सर्व प्रकारच्या वनस्पतीपासून उत्पन्न होणारे अन्न आणि मांसाहारी मध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांपासून मिळणारे अन्न.दूध वर्जीत करुन.अर्थात सर्व प्राण्यांची हत्या करुन मिळणारं अन्न.अलिकडे तर कोण्या मंत्र्यानं म्हटलं होतं की कोंबडी व अंड्यांचा समावेश शाकाहारी अन्नगटात करा कारण सर्व अन्नाची जी अन्नगटात विभागणी झाली ती माणसाच्या स्वार्थावरुन.
अन्नाची मुख्यत्वे वर्गीकरण निर्जीव आणि सजीव या आधारे केल्यास शाकाहारी म्हणजे निर्जीव पदार्थाचा वापर करुन मिळणारे अन्न.व सजीव पदार्थाचा वापर करुन मिळणारे अन्न असे करायला हवे होते.हे वर्गीकरण करतांना उद्देश तोच असेल.संशोधनाच्या काळापुर्वी माणूस वनस्पतीलाही निर्जीव समजायचा आणि म्हणूनच वनस्पतीचाही या शाकाहारी अन्नगटात समावेश झाला असावा. यावरुन कालांतरानं माणसानं आपल्या स्वार्थासाठी या अन्नवर्गीकरणात बदल केला असे म्हणायला काहीच हरकत नाही.
निर्जीव पदार्थात हंगाम पुर्ण होताच जे बी बियाणं निघतं.ते सर्व प्रकारचं बी बियाणं,निसर्गतः मेलेले पुर्ण प्राणी अंडे यांचा समावेश व्हायला हवा होता.सर्व प्रकारच्या फळभाज्यांचा समावेश व्हायला नको होता.कारण झाडे जीवंत असतात.त्या झाडांनाही भावभावना असतात.तीही रडतात.तीही हसतात.हे आता संशोधनांती सिद्ध झालेय.झाडे बोलत नाही म्हणून काय झाले.केळीच्या झाडांना जेव्हा बहर येतो.त्याच्या फुलाचे फळात रुपांतर होतांना केळीचं झाड रडतं असं म्हणतात.लाजाळूच्या पानाला हात लावले तर ते झाड आपलं संपूर्ण पर्ण मिटवतात.घटपर्णीसारख्या वनस्पती किड्यांची शिकार करतात.अर्थात यावरुन सिद्ध झालं की झाडेही जीवंत आहेत प्राणीमात्रासारखी.मग त्या संपुर्ण झाडांचा वा त्याच्या अन्नगटाचा समावेश शाकाहारी अन्नगटात होणे बरोबर होवू शकेल काय?तर यांचे उत्तर नाही असेच येईल.तरीही आम्ही त्याच अन्नाला शाकाहारी समजून चविष्ट म्हणून खातो.उपवासाच्या दिवशीही आम्ही सात्वीकतेचा गवगवा करुन मिरची,टमाटर यांची खमंग फोडणी देवून आमचा उपवास साजरा करतो.नव्हे तर सात्वीक आहार म्हणून फळफळावळंही खातो.
फळं,मिरची,टमाटर हे झाडांचे अवयव.नव्हे तर ती त्यांची लेकरंच.मग ते खाणे म्हणजे झाडांच्या लेकरांना मारुन खाणे नाही का?पण आम्ही याचा विचार न करता त्याचे वर्गाकरण शाकाहारी अन्नगटात केले असल्याने आवडीने खातो.मंत्र्याच्या म्हणण्यानुसार उद्या कोंबडी आणि अंड्यचा शाकाहारी गटात समावेश केल्यास त्या पदार्थाचाही उपवासाच्या दिवशी वापर करु असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.कारण आम्ही स्वार्थी आहोत.आम्हाला लोकांच्या भावभावनांचं काहीही लेनदेन नाही.
मंत्री महोदयाच्या म्हणण्यानुसार आज कोंबडीचा समावेश शाकाहारी अन्नगटात करायला हवा आणि केलाच.तर उद्या याच मंत्र्यांपैकी कोणीतरी नक्कीच म्हणतील की जेवढेही पशूपक्षी आहे.त्यांचाही समावेश शाकाहारी अन्नगटात करावा.मग मांसाहारी अन्नगट उरणारच नाही.मग तर मांस खाणा-यांना सुगीचे दिवस येतील.ते राजरोषपणे मांस खातील.
आज अन्नाचं वर्गीकरण शाकाहारी अन्नगट आणि मांसाहारी अन्नगट असे वर्गीकरण न करता फक्त निर्जीव पदार्थ अन्नगट व सजीव पदार्थ अन्नगट असं करायला हवं.तीच अन्नाची अन्नसाखळी आहे शिवाय हे खाऊ नये,ते खावू नये.हे उपवासाला चालते,ते चालत नाही असं खाणा-यावर बंधन नसावे.जर एखादा माणूस संपुर्ण समुद्रातच वा त्याच्या किना-यावर वास्तव्य करीत असेल आणि त्याने जर उपास ठेवण्याचा विचार केला आणि त्याने विचार केला की उपवासाला मासोळी चालत नाही.मी मासोळी खाणार नाही.तर तो उपवासच करु शकत नाही.
उपवासाचा अर्थ सर्वसामान्य पद्धतीने दररोजच्यापेक्षा कमी खाणे असा घ्यायला हवा.उपवास करायला हवा.पण त्यासाठी बंधने टाकायला नकोत.हेच खावे,तेच खावे,हे खावू नये,ते खावू नये असे कोणीही म्हणू नये.अगदी साध्या पद्धतीने पोटाला आराम म्हणून उपवास करावा.अजिबात जेवू नये याला उपवास म्हणत नाहीत.वा उपवासाच्या दिवशी पोटभर साबूदाना भगर खाणे याला उपवास म्हणत नाही.जे अन्न लवकर पचण्यास मदत होते.ते अन्न खायला हवं.जसे खिचडी,ताक वैगेरे.पण भात खाण्याला उपवासात गणले जात नाही.तर उपवासाला साबूदाना वा भगरच खाल्ला पाहिजे असे बंधन असल्याने आम्ही उपवासाला तेच खातो.त्या पदार्थांना पोटभर खात उपवास समजतो.
उपवासाच्या निमित्ताने का होईना आम्ही पोटाला आराम द्यायला हवा.जेणेकरून आमचं शरीर सुदृढ राहील.नाहीतर आमच पोटभर खाणं.मग पोट बिघजवणं हे काही चांगल्या आरोग्याचं लक्षण नाही.
काही काही तर वडसावित्री व्रत करतात.सकाळ व सायंकाळी उपवास ठेवतात.पतीच्या नावाचा.पती चांगला असो की नसो तरीही......
सकाळी सकाळी वड पुजायला निघतात त्या. ताटात एक नारळ,दोन चार आंबे आणि एक धागा असतो.थोडं बारकाईनं निरीक्षण केल्यास त्या चांगल्या साड्या परीधान केलेल्या अवतारात असतात.चांगला मेकअपही केलेला असतो.त्या महिला वडाच्या झाडाला धागा बांधण्यासाठी जात असतात.याचं कारण सांगीतलं आहे की या झाडाची पुजा केल्याने आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभते.
आम्ही वटपौर्णिमा उत्सव साजरा करतो.खरंच हा पती सात जन्म मिळावा म्हणून.पण खरंच आजच्या स्रीला वाटत असते का की मला सात जन्म हाच पती मिळावा.कधीच वाटत नाही,तरीही लोकलाजेखातर आजही हा व्रत स्रीया करतात.पुर्वी ही करायच्या.
पुर्वी हा व्रत करण्यामागची भुमिका म्हणजे धाक.स्रीयांना येथील पुरुष संस्कृतीने बंधन घातलं होतं की कोणत्याच स्रीने पुरुषांच्या विरोधात जावू नये.संयुक्त कुटुंबपद्धती असल्याने स्रीयांना डोके वर काढून चालण्याची अनुमती नव्हती आणि एखादी स्री जर का या पुरुष संस्कृतीच्या विरोधात गेल्यास तिला ठारही केले जात असे.म्हणूनच सासू जे म्हणते त्याप्रमाणे सुना वागत.तोंडाला तोंड देण्याची अनुमती नव्हती.शिवाय काही अत्याचारही होत असतील सासरी....तरी ते अत्याचार मुलींना सहन करावे लागत.विवाह करतांना बाप सांगूनच पाठवत असे की मुली दिल्या घरी सुखी राहा.सासरलाच आपले घर मान.ते सोडू नकोस आणि परत यायचेच असेल तर परत येण्याऐवजी एखाद्या ठिकाणी जीव देशील कारण तुझ्या पाठीमागं या बहिणी असल्यानं त्यांचा विवाह होणार नाही.खानदानाला बट्टाही लागेल.
बालविवाह प्रथा अस्तित्वात होती.तसेच आजारही जास्त व्हायचे.साथच यायची.त्यात मुलंमुली जास्त प्रमाणात मरण पावायचे.शिवाय विवाह करता करता त्याही काळी नाकी नव यायचं.अशावेळी बाप मुलींना दिल्या घरालाच आपलं सासर माहेर म्हणायला लावणार नाही तर काय?
सतीप्रथा ही सुरु होती.सतीप्रथा ही बळजबरीची पद्धत.पती मरण पावल्यास इच्छा नसतांनाही पुरुषांच्या चितेवर महिलांना ढकलून देत नव्हे तर याला सतीप्रथा हे नाव दिलं होतं.म्हणूनच नाईलाजानं का होईना,महिला वर्ग ती सतीप्रथा टाळण्यासाठी या वडाच्या झाडाला धागा बांधून आपल्या पतीच्या दिर्घायुष्याची कामना करीत.कारण जर पती मरण पावलाच तर ही अग्नीयात्रा कोणाला सहन होईल.शिवाय कोणी वाचलीच तर तिला इथला पुरुषी समाज योग्य सन्मानानं जगू देत नव्हता.हा समाज या विधवेला घराच्या आतमध्येच कोंडून ठेवत असे.तिच्यावर जबरन बलत्कार करुन आपली कामना भागवीत असे.पुरुषी ताबा असल्यानं स्रीला ब्र ही काढण्याची परवानगी नव्हती.त्यानंतर जर का या महिलांना दिवस गेलेच तर तिला ठार केले जात असे आणि एखाद्या रोगाने मरण पावली हे सांगीतले जात असे.यामुळे महादेव रानडेंना विधवा पुनर्विवाह कायदा पारीत करावा लागला.
विधवा विवाह बंदी,सतीप्रथा ह्या कुप्रथाच होत्या.काही सासवा ह्या समजदार जरी असल्या तरी त्या पुरुषी सत्तेच्या विरोधात जायला तयार नव्हत्या.त्यांना माहीत असायचे की जर का घरातल्या विधवा जीवंत असल्या तर त्यांची मुले हैवानासारखी वागतांना त्या मुलांना त्याही रोखू शकत नव्हत्या म्हणूनच या सासवांचीही सतीप्रथेला मनात इच्छा नसतांना परवानगीच राहायची.
वडाला पुजण्याच्या या पद्धतीचे खरे कारण सतीप्रथा जरी असले तरी पुढे याला सामाजिक वलय निर्माण झाले.महिलांनी पुढे जावून या वडाच्या झाडाला भाऊ मानले.त्या भावाने आपले संकटाच्या वेळी पावलोपावली रक्षण करावे म्हणून महिला त्याला धागे बांधू लागले.हे रक्षासुत्र होते.कोणाच्याही मृत्यूच्या आधी यम या धरणीवर येतो.तो सरासर कोणाला नेत नाही तर या झाडावर आधी येतो.तो त्या गावातील सर्वांचे निरीक्षण करतो व जिचा पती बरोबर नसेल किंवा जिचे काही चुकले असेल तिच्या पतीला घेवून जातो.म्हणूनच वडाच्या झाडाला जर का रक्षासुत्र बांधले तर त्या झाडावर राहणारा यक्ष यमाला गावातील कोणाला न नेण्याची विनंती करेल व पतीचे प्राण वाचेल असाही एक समज.पुढे सत्यवान सावित्रीची कथाच या व्रतामागे प्रसिद्ध करुन टाकली.सत्यवानाला आपण नेणार असल्याचे सावित्रीला स्वप्नामध्ये कोणीतरी येवून सांगीतले.त्यामुळे अगाढ विश्वास ठेवून मनात चिंता असलेली ती सावित्री वडाची पुजा करीत होती.तरीही सर्पदंश झाला आणि सत्यवानाला यम यमलोकी घेवून गेला.पुढे माझ्या पतीचे प्राण परत द्या.म्हणून सावित्री ही त्या यमाच्या मागे मागे यमलोकी गेली व तिने अखंड त्रास सहन करुन सत्यवानाचे प्राण परत आणले.म्हणून महिला या वडाची पुजा करतात.सावित्री ने जसे सात जन्म मला हाच पती मिळावा असा वर मागीतला होता.तसाच वर या स्रीया मागतात.खरंच स्रीया यासाठी व्रत करीत असतील काय?ही विचार करायला लावणारी बाब आहे. त्या सत्यवानाचं ठीक आहे.तो चांगला होता.पण काय जिचा दारुडा असतो,जुवारी असतो.जो आपल्या पत्नीवर अत्याचार करतो.बेदम मारहाण करतो.तिही असा व्रत करतांना दिसते.खरंच तिही आपल्याला असाच पती सात जन्म मिळावा असे म्हणत असेल काय?नाही.पण तरीही समाजाची एक परंपरा आहे म्हणून सन्मानानं अशी स्री ही परंपरा पाळतांना दिसते.
ही सर्व कारणे वडाच्या पुजेमागची गौण मानली तर महत्वाचं कारण असं आहे की ही वड पिंपळ ही झाडं जास्तीत जास्त प्रमाणात आँक्सीजन सोडतात.कार्बन डाय आँक्साईड वायू शोषून घेतात.तसेच जमीनीची धूप होवू देत नाही.शिवाय जमीनीतलं पाणीही आटू देत नाही.म्हणून या झाडाची पुजा.वृक्षारोपनाचं महत्व वाढविण्यासाठी.काल प्रत्येक गावात अशी वड पिंपळाची झाडं असायची.आज ती कापली आहेत.आज आम्ही सन्मानानं निलगीरीची झाडं लावली आहेत.जी झाडं आमच्या जमीनीतली आर्द्रता शोषून घेवून जमीनीतील पाण्याची पातळी कमी करतात.पण चांगली दिसतात म्हणून आम्ही ती झाडं लावतो.
आम्ही आज जे उपयोगी असं वडाचं झाड कापलं आहे.जर का या झाडाने जगातल्या प्रत्येक सावित्रीचे पती वाचवले असते तर यमाने कापणा-याला आधी मारले असते.पण असे झाले नाही होणारही नाही.कारण या सर्व गोष्टीचा विचार आम्ही स्रीयांवर थोपवला आहे.पुरुषांवर नाही.आजही काही अपवाद सोडल्यास पुरुष जे म्हणेल ते स्रीला करावेच लागते,नाहीतर तिची जागा घरात नसते.तिला आजही सतीप्रथा बंद झाली तरी आजही हे ना ते आरोप लावून तिचं खच्चीकरण केलं जाते.तिला ठारही केलं जाते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास वडाचं झाड स्रीयांनीच का पुजावं.पुरुषांनी का पुजू नये.तिला जर जन्मोजन्मी तुम्ही हवे असता,म्हणून ती पुजा करते.मग तुम्हाला ती जन्मोजन्मी हवी नसते का?पुर्वीही ती याच उद्देशाने पुजा करायची.मात्र पुरुष तिच्याच समोर दहा बायका करायचा.खरंच त्या पत्नीला असे चालत असेल काय?तरीही ते सगळं ती सहन करुन आपली गप्प बसून संसार करायची.आपल्या पतीच्या चांगल्या सुदृढपणाची कामना करायची.आजही करते अन् आम्ही मात्र तिनं आमचा पिच्छा सोडावा म्हणून न्यायालयात खटले दाखल करतो.तिला कायमचे सोडण्यासाठी.असली बायको नको रे बाबा पुन्हा असे म्हणत.ही बायको या जन्मी भेटली तं भेटली.पुन्हा पुढल्या जन्मी नकोच असेही म्हणत.कधी कधी वाटते की यामुळेच तर लोकांनी वड पिंपळाची झाडे नसेल ना कापली असावी.पण ते सगळं विसरुन सर्वांनी या वटपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने एक तरी झाड लावण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि प्रत्यक्षात एक तरी वडाचं किंवा कोणत्याही प्रकारचं झाड लावावं.तरंच वटपौर्णिमा उत्सवाचं सार्थक होईल.नाहीतर तो यमही आज परीस्थिती विचारात घेवून एक तरी झाड तुम्ही जर नाही लावलं तर उद्या तुमच्या सत्यवानासकट सावित्रीलाही आपल्यासोबत न्यायला यम मागे पुढे पाहणार नाही.






माणूस माकडाच्या रुपात जेव्हा झाडावर राहात होता.तेव्हा त्याला नियम समजत नव्हते.या झाडावरुन त्या झाडावर त्या झाडावरुन या झाडावर उड्या मारण्यात त्यांचा अख्खा दिवस जात असे.पण जेव्हा तो झाडावरुन जमीनीवर उतरला आणि वावरायला लागला,तेव्हा मात्र त्यांनी काही नियम बनवले.त्या नियमानुसार तो वागायला लागला.कोणी ते नियम मोडल्यास त्याला दंड व्हायला लागला.लोकं टोळीबाहेर काढायला लागले.तेव्हा मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती.राजा हा महिलांचेच सल्ले घ्यायचा.त्यावेळी महिलांचा तीन दिवसाचा विटाळ मानत नसत.
मातृसत्ताक कुटूंबपद्धतीत महिलांच्याच सल्ल्यानुसार व्यवहार चालायचा.महिलांना शिर्षस्थानी समजण्यात येई.महिला म्हणेल ते.कालांतरानं आर्य भारतात आले.त्यांनी येथील एकंतर परिस्थितीचा व व्यवहाराचा अभ्यास केला.त्यांनी महिलांच्याही कर्तबगारीचा अभ्यास केला.त्यामुळे त्यांनी या देशात धार्मीकता पसरवली.कर्मकांड धर्मकांड आणि प्रथाकांडास मान्यता दिली.त्यांनी त्यानुसार नियम बनवले.त्या नियमानुसार लोकांना वागायला लावले.
स्रिया मुळात शुर असल्यामुळे तसेच या देशात राहणारी द्रविड मंडळी शुर असल्यामुळे त्यांना कसे आपल्या ताब्यात ठेवता येईल याचा विचार करुन त्यांनी या देशातील मुळच्या द्रविड लोकांसाठी काही नियम बनवले.ते नियम बुद्धीला तसेच तत्वाला पटत नाहीत.
या भारतात आलेल्या आर्यांनी इथल्या तमाम द्रविडांवर नियम लावले.त्यांनीच जाती पाडून जाती जातीत इथल्या द्रविडांना विभागले नव्हे तर या द्रविडांना आपले मांडलिक बनवले.त्यांच्याकडून जबरदस्तीने सेवाही करुन घेतली.त्यांना देवधर्म शिकवला.दगडालाही सेंदूर फासल्यास काही काळानंतर त्यांच्यात देवपण येतं व तो दगड जीवंत होतो.हे सांगीतलं.नव्हे तर स्रीयांनीही देवधर्म केव्हा पाळावा? केव्हा पाळू नये हेही सांगीतलं.त्यानुसार आचरण करायला लावलं.त्यातील मासीकपाळी हा एक भाग होय.स्रीया जर रजस्वाला होत असतील तर त्यांचा स्पर्श पुरुषाला चालत नाही.तिनं घराच्या बाहेर राहावं.घरात वावरु नये.कारण तिचा विटाळ होतो.म्हणून तिने असे नियम पाळावे.कारण तिचा स्पर्श माणसालाच नाही तर देवालाही चालत नाही.जो देव माणसानं निर्माण केला.आपल्या कल्पना करुन त्या देवाचा त्यानं आकार बनवला.हा देव माणसानं आपल्या स्वार्थासाठी बनवला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.त्यामुळे देवा मला सुखी ठेव.मी तुला अमुक अमुक वाहीन.अमुक अमुक गोष्टी करणार नाही.अमुक गोष्टी त्याज्र करीन असे देवाला म्हणत आम्हीही नियम पाळायला लागतो.त्या गोष्टीच्या अंतरंगात न शिरता की खरंच हा नियम पाळला नाही तर बिघाड होतो का?
कावळा फांदीवर बसायचा नि फांदी मोडायची किंवा एखाद्याने पाऊस येईल म्हटल्यास पाऊस यायचा.अशीच काहीशी गोष्ट स्रीयांबद्दल घडली.स्रीयांना दुय्यम स्थान देण्यात आलं.स्रीयांनी दुर्बल बनून राहावं,तिनं सबल बनू नये.मातृसत्ताक कुटुंबपद्धती जावून पुरुषांचच राज्य राहावं म्हणून या सगळ्या जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या योजना.मुलांच्या जन्मावर जास्त भर देण्यात आला.मुलगी झाली तर शोक मनविण्यात येवू लागला.स्रीयांनी मासीकधर्म पाळावा.तसेच घरात जर पहिल्यांदा मुलगी जन्मास आली तर घरातील जेष्ठ मुलगी देवदासी म्हणून देवाला वाहण्याची प्रथा.या देवदासीने मग गावातील तसेच मंदिरातील बहुतःश सर्वच पुरुषांसोबत न बोलता शारिरीक संबंध प्रस्थापित करायचे.अशी बंधने.ही बंधने नाही पाळल्यास त्या कुटूंबावर बहिष्कार टाकून त्या कुटूंबाचं जगणं मुश्किल करायचं इत्यादी गोष्टी कालांतरानं होवू लागल्या.तसेच ज्या स्रीया नियम मोडत त्या स्रीयांना मार दिला जाई.जबर शिक्षाही केल्या जात असत.
आपणच बसवलेला देव.आपल्या या देवाला फुले चालतात.फुलांचा सुंदरसा सुवास आमच्या देवाला चालतात.पण आमच्या स्रीया जर रजस्वाला होत असतील तर त्या आमच्या देवालाच नाही तर आमच्या माणसालाही चालत नाही.देव तर आम्हीच निर्माण केला ना,तरीही.........मग फुलांमध्ये आणि आमच्या रजस्व स्रीयांमध्ये काय फरक आहे.काहीच तर फरक दिसत नाही.
वनस्पतीलाही जीव असतो.ते एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करु शकत नसले तरी ते श्वास घेतात,प्रजनन करतात.त्यामुळे ते सजीव असतात.हे प्रयोगांती जगदिशचंद्र बोस यांनी सिद्ध केले.त्यानुसार जेव्हा हे झाड रजस्व होते.तेव्हा त्याला फूल येतं.हे फुल म्हणजेच झाडाचं रजस्वपण.मग ही रजस्वाची फुलं देवाला सोडा आम्हालाही चालतात.त्या रजस्वातून निर्माण झालेलं फळ आम्हाला तसेच देवालाही चालतं.मग हा मासीकपाळीचाच धर्म आमच्या स्रीयांच्या जातीला का?वनस्पती आणि माणसात कोणता फरक आहे.मुख्य म्हणजे ही मासीक पाळी सोडा,साधी एखादी स्री बाळंतीण झाली तर तिच्या हातचं,त्या घरचं पाणीही आम्हाला बनू नये एवढा भयंकर भेदभाव माणसात.माणसाने नियम बनवले.माणूस विचारी प्राणी आहे हे माहीत असूनसुद्धा........खरंच त्यापेक्षा हा वनस्पतीचा आणि प्राण्यांचा जन्म बरा की जे असला भेदभाव करीत नाहीत.
आजही लोकांच्या मनावर या कुप्रथांचा पगडा आहे.संविधान बनलं,देश स्वतंत्र झाला.सतीप्रथा संपल्या.केशवेपण संपलं.नवनवे शोध लागले.दवाखाने उघडले.पुर्वी बाळ जर लहानपणी बारीक असले तर सटवाई झाली म्हणून त्या देवीला भोपळा कबूलणारे मायबाप आज दिसत नाहीत.आज या भोपळ्यात कोलेस्टेरॉल दूर करणारे तत्व आहे.जे कोलेस्टेरॉल ह्रृदयाला हानीकारक आहे.तसेच या भोपळ्यात कँन्सरसारख्या रोगांना दूर करणारे तत्व आहे.तसेच काल लेकरांसाठी फणस वाहणारी मंडळी आज नाही.मुंगण्याच्या शेंगा खाल्ल्याने औषधी उतरते असे म्हणणारी मंडळी आज सर्व प्रकारच्या रोगावर रामबाण औषध म्हणून मुंगणा खातात.मुंगण्यापासून हातपाय दुखण्यावर प्रतिबंध लावता येतो.पण ह्या प्रथा ज्या आर्यांनी निर्माण केल्या,त्याची शहानिशा न करता आम्ही पाळतो नव्हे तर एखाद्या माणसाने या प्रथांना विरोध केला तर आम्हाला हा विरोध सहन होत नाही.एवढा आमचा विरोधाभास.
खरंच जो देव आम्ही स्वतः निर्माण केला.तो देव खरंच म्हणतो का की मला रजस्व स्रीचा स्पर्श चालत नाही.खरंच कुणाशी बोलतो का की मला ह्याच स्रिया पुजेला चालतात.नाही ना.अहो देवच तो देवासमोर सर्व समान.देव जर असा भेदभाव करीत असेल तर तो देव कसला? गरीब-श्रीमंत,स्री-पुरुष,लहान बालक,पशुपक्षी वनस्पती,जीवजंतू सारेच देवांनी निर्माण केलेले.त्याला सर्वच गोष्टी प्रिय.मग ती रजस्व स्री का असेना......देव भेदभाव करीत नाही.भेदभाव आपणच करतो.मानवजात.देव पावतो म्हणून नवशं करतो.कोंबडे बकरे कापतो.देव रक्त पित नसूनही त्याच्या चरणावर रक्त टाकतो.त्याचं मांस बनवून स्वतःच खातो.देवाच्या नावावर पुर्ण बकरा कोंबडा सोडत नाही.काही ठिकाणी नरबळीचीही प्रथा आजही सुरु आहे.आजही गुप्त धन मिळतं म्हणून काही स्वतःस तांत्रीक समजणारे नरबळी देतात.पण नरबळी देवूनही धन न मिळाल्याने पश्चात्ताप करत त्या तांत्रीकाला गजाआड करतात.भंडाफोड करतात.हे वास्तव सत्य आहे.खरंच माणसाने यावर विचार करावा की करु नये.तसेच मासीकपाळी,देवधर्म व लोकांमधील संभ्रम यावर विचार करण्याची गरज आहे.
माणसाने देवधर्म पाळावा.त्या देवाची पुजा करायची इच्छा असेल तर ती अवश्य पुर्ण करावी.पण त्या देवाला अमुक गोष्टी चालत नाही,अमुक गोष्टी चालतात हे ठरविणारे आम्ही कोण?कोणीच नाही.कारण देव आम्ही निर्माण केलेला असून आमचा देव बोलत नसल्याने तो कुरकुर करीत नाही.मग देवासमोर रजस्व स्रीदेखील एखाद्या फुलासारखी जावून बसली तरीही ती स्री त्याला आवडणारच.कारण देवाला फक्त फुल आवडतं मग ते वनस्पतीचं असो की नराचं असो.त्याला त्यात भेद करता येत नाही.तो भेद धर्माच्याच ठेकेदारांना करता येते.देवाला नाही.त्यामुळे मासीकपाळीबद्दल लोकांच्या मनात संभ्रम जरी असला तरी आज परीवर्तननादी काळात यावर विचार करावा.मासीकपाळी हा विटाळ नसून एक नवचैतन्य निर्माण करणारं साधन समजावं.मासीकपाळीच नसेल तर नवनिर्मीती होणार नाही.नवीन जीव जन्माला येणार नाही आणि नवीन जीव जर जन्माला आला नाही तर अन्नसाखळी बिघडेल.पर्यावरण संतुलनही बिघडेल.पृथ्वीवरच नाही तर ब्रमांड ज्याला मानतो.त्या ब्रम्हांडात बिघाड होईल.तसेच सारंच काही बिघडून जाईल.मानवच नाही तर मग देवही या जगात उरणार नाही.
पोळा.शेतक-यांच्या आनंदाचा दिवस.शेतक-यांचाच नाही तर बैलांच्याही आनंदाचा दिवस.त्यानिमीत्ताने लोक बैलाची पुजा करतात.त्याला एक दिवस का होईना आराम देतात.आदल्या दिवशी खोर भरो,कोटा वाढो म्हणतात.तर बैलाचे खांदे शेकतांना आज आवतन घे,उद्या जेवायला ये म्हणतात.
लोकं जसे बैलं पुजतात,तसेच बैल उद्याही पुजले जातील,कालही पुजत होते.पण आज बैलाची संख्या कमी झाली आहे.त्या बैलाची जागा न परवडणारा ट्रँक्टर घेवू पाहात आहे.पण महत्वाचे म्हणजे जी कामे बैलं करु शकतात.ती कामे ट्रँक्टर करु शकत नाही.
काल जेव्हा बैलपोळा साजरा व्हायचा.तेव्हा शेतकरी या बैलासाठी खास बोरुच्या तागाचे दोर बनवायचे.चौ-या मटाटेही याच तागाचे बनवायचे.त्या तागाला रंग द्यायचे.गेरुचा रंग बनवायचे.तसेच चिक्कीनं बेगड लावायचे.मात्र बैलाला वेदना देत त्याची शिंग तासत नसत.
आज मात्र या बैलाला ऐन बैलपोळ्याच्या दिवशी त्रास दिला जातो.आज बैलाची शिंगे तासली जातात.त्या शिंगाला जास्त शिलल्याने कधीकधी बैलाला रक्त लागतं.तिथं जखम होते.ती जखम पुढं एवढी चिघळते की त्यात बैलाला मृत्यूही संभवतो.
शिंग तासणे ही एक पद्धत जरी वाईट असली तरी आज प्रत्येक शेतकरी बैलाची शिंग तासतात.नव्हे तर जास्तीतजास्त पैसे मिळावे म्हणून बैलाला पोळा फुटल्यावर धावत धावत घरी नेण्यासाठी पराण्याही टोचतात.मारतातही.तेव्हा विचार येतो की हाच का बैलपोळा! बैलाच्या आनंदाचा क्षण की दुःखाचा क्षण! जिथे बैलाला पुरणपोळी पुरविण्याऐवजी त्या बैलाचा आधार घेवून पैसे कमविण्याचा गोरखधंदा आज सुरु आहे.नव्हे तर या बैलाला घरोघरी फिरवून आलेल्या पैशातून जुव्वा खेळून दारु पिवून झिंगत पडणारे महाभाग आज आहेत.
बैलपोळ्याला जसा बैलाला त्रास होतो,तसाच त्रास त्या झाडांनाही होतो.या दिवशी शेकडो पळसाच्या झाडाची हत्या केली जाते.मेढ्या म्हणून लावतांना शेकडो पळसाची झाडे गारद होतात व पर्यावरण संतुलन बिघडते.नव्हे तर दुस-या दिवशी श्रावण महिना संपला म्हणून बकरा,कोंबडा यासारख्या प्राण्यांचीही हत्या केली जाते.बकराबाजारात आजही रक्ताचे पाट वाहतील अशी स्थिती असते.एवढी भयानक वास्तवता.खरंच बैलपोळा बैलाच्याही आनंदाचा नाही.प्राणीमात्राच्याही आनंदाचा नाही तसेच वृक्षांच्याही आनंदाचा नाही असे वाटायला लागते.
आज मात्र या बैलपोळ्याने महागाईची जागा घेतलेली आहे.काल खास शेतकरीवर्ग बैलासाठी बोरुच्या तागाचे दोर विणत होता.आज तो दोर विणतांना दिसत नाही.काल बेगडावर काम भागवत होता.आज मात्र शिंगांना पेंट केला जातो.काल नाला ठोकत नव्हते.आज बैलाला नाल ठोकली जाते.
बैलाला सजविण्यात येणारे रंग,चौ-या मटाटे,बाशिंग अति महाग झाले असून शेतकरी वर्गाला परवडणारी गोष्ट नाही.आताच्या शेतक-यांसमोर आजच्या दिवसाची सांज कशी भागवायची असा विचार असतो.त्यातच आजचा शेतकरी आत्महत्या ही करतो. अशावेळी बैलपोळा साजरा करतांना महागाई जर असा नाच दाखवत असेल तर शेतक-याने बैलपोळा हा सण कसा साजरा करावा.बाजारात महागाईने उसळी घ्यावी.त्या गोष्टीला मनाई नाही.पण निदान बैलासाठी तरी या महागाईने उसळी घेवू नये.जेणेकरून उद्या हा बैलपोळाच सण बंद करावा लागेल.तसेच आपणही बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलाची काळजी घ्यावी.निदान त्यांना या दिवशी तरी मारु नये.दारोदारी फिरवावे.बैलालाही पुरणपोळी खायला घालावी.पण याचा अर्थ पाहिजे तेवढीच.त्याचा त्रास बैलाला होणार नाही.याची काळजी आपण घेतलेली बरी.
पोळ्यावर महागाईची मारबत येवू देवू नये.जरी दुकानातल्या वस्तू महाग झाल्या असतील,तरी शेतक-याने पुर्वीसारखे आज बोरुपासून ताग काढावा.दोरखंड बनवावे.नव्हे तर त्या तागापासूनच चौरं व मटाट्या बनवाव्या.जेणेकरून बौलपोळा साजरा करतांना महागाईची ही मारबत त्रास देणार नाही.

माणसाने जीवन जगतांना कोणत्याही प्रकरणावर दोष काढावे.दोष काढणे अपेक्षीत आहे.त्याशिवाय चूक लक्षात येत नाही.पण नाहकच कोणाला त्रास देण्यासाठी दोष काढू नये.असे केल्याने फालतूची तेढ समाजात निर्माण होते.जेणेकरुन समाजसुधारणा करणा-यांचा भ्रमनिरास होतो व सुधारणा घडत नाही.
आपण आपल्या घरी राहतो.प्रेमाने वावरतो.एकमेकांची इज्जत करतो.आदर,मानसन्मान राखतो नव्हे तर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो.
घरातील नात्याने ओवलेल्या सर्व मंडळी मिळून परीवार बनतो.या नात्यात थोडा जरी दुरावा आला की परीवार तुटतो.मग चटके बसतात.ते चटके आपल्यालाच सहन करावे लागतात.
नातेसंबंधातील परीवाराच्या या दलदलीत एका सदस्याला जरी इजा झाली,तर त्याची झळ सर्व सदस्यांना बसते.थोडाफार त्रास त्यांनाही सहन करावाच लागतो.जरी सदस्य घरुन निघून गेला तरी.म्हणूनच आपले नाते बळकट असायला हवे.
अलिकडे व्हाट्सअप फेसबूकचा जमाना आलाय.या नादात लोकं आपले वैयक्तीक कामंही विसरलेले आहेत.लोकांना फेसबुक व्हाट्सअप पाहतांना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.यामुळे की काय?घरातील छोट्या छोट्या कामावर दुर्लक्ष होते.चिडचिड निर्माण होते.यातच घरातील एखादा सदस्य रागावलाच तर एवढा महाभयंकर राग येतो की टोकणा-या माणसाचा जीव घ्यावासा वाटतो.पण परीवाराच्या नातेसंबंधांच्या व्युहरचनेत तसे करता येत नसल्यानं आपली वेगळी पोळी शिजवावी म्हणून काही सदस्य घर सोडून जातात.पण व्हाट्सअप फेसबुक सोडायला तयार होत नाहीत.काही सदस्य तर याहीपलिकडचे असतात.ते आपल्या घरातील सर्व मंडळींना झोपू देतात.मग अर्धरात्री उठून व्हाट्सअप फेसबुक पाहात बसतात.तर काही सदस्य हे अंगावर पांघरुन घेवून व्हाट्सअप पाहात बसतात.पण व्हाट्सअप पाहतांना कितीही लपून पाहण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या दिवशी ती चोरी पकडलीच जाते.
परीवारात एक जबाबदार व्यक्ती असतो.त्याचेवर परीवाराची भिस्त अवलंबून असते.जरी सदस्य घरातून निघून जरी गेला असेल तरी त्या जबाबदार व्यक्तीला अतीव दुःख होते.त्याच्या सुखात परीवाराचे सुख अवलंबून असते.परीवारातील प्रत्येक सदस्य सुखी तर तो सुखी अशी त्याची अवस्था असते.परीवारातील सदस्य दुःखी तर तोही दुःखी होत असतो.कारण तो परीवाराच्या आनंदासाठी जगत असतो.पण परीवारातील सदस्याला याची जाणीव नसल्याने त्याला कोणीतरी दुःखाच्या खाईत ढकलल्यासारखे वाटते.त्यातच तो तुटतो व त्याला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याची कल्पनाही करता येत नाही.यानंतर हा जबाबदार व्यक्ती अशा घरुन निघून गेलेल्या सदस्याला परत माघारी आणण्यासाठी प्रयत्न करतो.त्यांना मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.कधीकधी तो यशस्वी होतो.कधीकधी होत नाही.
परीवारातील सदस्यांच्या बाबतीत विचार केल्यास तेही सुखी नसतात.आत्मीक बळ देणा-या व्यक्तीचं मन तोडल्यानं ते अशा खाईत जावून पडतात की कधीकधी त्यांना त्या खाईतून परत येता येत नाही.कारण तिथे दलदल असते.शिवाय आपल्या घरचं भांडण बाहेरची मंडळी पाहात असतात.त्यांना अशा भांडणातून खुप आनंद मिळतो.ते तर वाटच पाहात असतात की दुस-याच्या घरात भांडणं केव्हा होतील.अशावेळी पारीवारीक सदस्यांनी अत्यंत जोखमीचं पाऊल टाकावं लागतं.
काही लेखक मंडळी हिरीरीनं लेख लिहितात.कधीकधी वाईट चालीरीतीवर हल्ला चढवतात.मग त्या परीवारातील का असेना किंवा समाजातील का असेना.त्या वाईट कुप्रथा बदलायला हव्या असं वाटतं.जर या वाईट प्रथा वा सवयी बदलल्या नाही तर परीवार नासतो.तसेच असल्या वाईट प्रथा समाजात असल्या तर समाजही नासतो.पण परीवार किंवा समाज सुधरंवायचा असेल तर लेखकाला भिवून चालत नाही.त्याला या वाईट रुढी प्रथा परंपरा बदलविण्यासाठी असे लेख नाईलाजानं लिहावेच लागतात.मग ते परीणामाचाही विचार करीत नाहीत.
रामभाऊ तसा विचारच करीत होता.त्याचं बरोबरही होतं.कारण लेखकाच्याच लेखनीनं आजपर्यंतचा समाज सुधारला होता.समाजसुधारणा झाली होती.
आमचा देश सुजलाम होता.सुफलाम होता.या भारतावर वाईट परंपरेचं अधिराज्य होतं.पण या वाईट प्रथा त्यावेळच्या इतर समाजालाही घातक वाटत नसल्या तरी त्या आमच्या समाजासाठी घातक होत्या.सतीप्रथा,बालविवाह,केशवेपन यासारख्या वाईट प्रथा.......काही समाजसेवकांनी यावर हल्ला चढवला की त्या वाईट प्रथा बंद व्हाव्या.त्यामुळे त्या काळच्या लोकांना याची झळ सोसावी लागली.पण या कुप्रथा बंद झाल्या.त्याचा फायदा समाजालाच झाला.कित्येक स्रीयांच्या सतीप्रथा थांबल्या.केशवेपन,बालविवाह थ

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED