Existence Fiction Collection books and stories free download online pdf in Marathi

अस्तित्व कथासंग्रह




१} अस्तित्व

ती अस्तित्व होती त्याचं.हवी तर त्याची मसीहा ही.लहानपणापासून ती फार कष्ट करीत होती.पण खरं सुख तिच्या जीवनात अजून आलं नव्हतं.
असाच तिचा पती मरुन गेला.चौदावीही आनंदात पार पडली.आता मात्र तिच्यासमोर मोठा विचार येत होता की कसे आपले पोट भरावे?
तिला तीन मुली होत्या.त्या आपआपल्या घरी सुखी होत्या.मात्र जो एक मुलगा होता.त्याला मात्र कोणताच आधार नव्हता.त्यामुळे तिला त्याचाही विचार असायचा की त्याला जगवावे कसे?तसा तो शहरात उच्च शिक्षण घेत होता.त्यामुळे आपलं पोट व आपल्या लेकराचं पोट एवढंच तिचं उद्दीष्ट्य होतं.
मुलगाही वयात आला होता.त्यालाही आपल्या आईची काळजी वाटत होती.पण त्याला शिक्षण घ्यायचे होते.उच्च शिक्षण हे त्याचं ध्येय होतं.पण आईलाही सांभाळणे हेही तो आपले कर्तव्य समजत होता.आई जे काम करायची.लोकांच्या शेतीत राबराब राबायची.ते पाहुन त्याला दया यायची.त्याला वाटत होते की त्याच्या आईला त्याच्या बहिणीने सांभाळावे.तसा तो बहिणींना बोलूनही गेला होता.पण....
बहिणीने नकार दिला होता.बहिणीने नकार दिल्याने ती काबाडकष्ट करीत आपले पोट भागवित असतांना बरेचसे उतार चढाव झेलत होती.ती रोजमजुरीला शेतात जात होती.तिचं वय झाल्याने व काम बरोबर जमत नसल्याने मजुरीच्या बायाही तिला सोबत न्यायला नकार देत.मालकही ती का आली म्हणुन तिला टार्चर करीत.तरीही ती जबरदस्तीनं शेतावर गेली असल्यानं नाईलाजानं व मालकाला दया येत असल्यानं तिला लोकं कामाला लावीत.काही पैसेही पचवीत होते.
मुलगा शहरात शिक्षण घेत घेत कामही करीत होता.त्याचीही अस्तित्वाची लढाई त्याच गावी सुरु होती.परमानंट नोकरी होईल या आशेने तो अगदी फुकटामध्ये नोकरी करीत होता.कधी रात्रीला फुटपाथवर झोपत होता.तर कधी बहिणीकडे तर कधी गावाकडे सायकलनं जात होता..बदल्यात तो आईने शेतावरुन आणलेला माल,टमाटर,मिरची,वांगे इत्यादी पदार्थ बहिणीला द्यायचा.
गावचं घरंही पडत चाललं होतं.मातीच्या भींतींना पाणी लागून त्या पाऊस येत असतांना अगदी नजरेसमोर पडायच्या.त्यातुन डोळ्यादेखत साप,विंचूसारखे विषारी वन्यजीव निघायचे.ते घराच्याच आतमध्ये साचलेल्या पाण्यात जलक्रीडा करायचे.नव्हे तर पावसाच्या पाण्यानं अंथरुण ओलं व्हायचं.पण तेही ओलं अंथरुण थंडीने कुडकुडत असलेली आई अंगावर लपेटून घ्यायची व कुडकुडतच झोपी जायची.दिवसभराच्या थकव्याने अंथरुण ओलं असलं तरी झोप केव्हा लागायची ते कळायचंच नाही.शिवाय केव्हा ह्या भींती भुईसपाट होवून केव्हा पडतील व केव्हा आई दबून मरेल याचा नेम नव्हता.
मुलाला दया यायची.पण तो तरी काय करणार.त्याची कमाईच नसल्यानं तो हतबल होता.तो बहिणीला सारखा विनवणी करीत होता की आईला पुष्कळ त्रास आहे.तो आपलं पोट पाहून घेईल.बहिणीने आईला पोसावे.पण बहिणी ऐकणार तेव्हा ना.
मुलाला शाळेत नोकरी लागली होती.पण तो खाजगी श्रेत्रात असल्याने व वेतन अल्प असल्याने तो आपली उपजीवीकाही बरोबर चालवू शकत नव्हता.तरीही त्याने आपल्या आईला शहरात आपल्याजवळ आणलं होतं.तो स्वतःच्या हातानं स्वयंपाक करीत होता.त्यात सवय नसल्यानं पोळ्याही कच्च्या राहायच्या.पण आई तेही पदार्थ गोड समजून खायची.किळस करायची नाही.शिवाय त्याला साथ द्यायची.यातच कालांतरानं त्याचा विवाह झाला.
पगारवाढ झाली होती.आता तो बायकोही पोसू शकत होता.शिवाय कदाचित पत्नी आल्यावर आपल्या आईला चार घास सुखाचे मिळतील या उद्देशाने त्याने विवाह केला होता.पण नियतीला आणि त्याच्या पत्नीला त्याच्या व तिच्या खस्तांची जाणीव नव्हती.पत्नी दिड महिण्यातच नखरे दाखवायला लागली.ती त्याला म्हणत असायची की त्याच्या आईला त्याने वृद्धाश्रमात किंवा बहिणीच्या घरी ठेवावे.एकतर आईलाच ठेवावे नाहीतर मला.मुलाला आता पदोपदी विचार यायचा की ज्या आईनं आपल्याला जन्म दिला,ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि ज्या आईनं आपल्याला शिकवून मास्तर बनवलं.त्याच आईला वृद्धाश्रमात!बहिण तर पोसायलाच तयार नव्हती.विचाराअंती त्यानं ठरवलं.बायको सोडून गेली तरी चालेल.पण आईला सोडायचे नाही.
काही दिवसानं पत्नी सोडून गेली होती.आई अजुनही जवळच होती.पुन्हा कामं करतांना नाकीनव यायचं.म्हणून त्याने दुसरा विवाहही केला होता. त्यातच त्याला पुन्हा विचार यायचा की माझा दुसरा विवाह.......मला पुढे मुलं बाळ झाले तर कदाचित माझे लक्ष मुलाबाळात गोवेल.आईकडे राहणार नाही.मग आईला राग येईल.माझं आईच्या सेवेकडे दुर्लक्ष होईल.म्हणुन त्याने एक एकर शेती आईच्या नावानं करुन दिली होती.कदाचित इस्टेटीच्या लोभानं तरी आपण आईची सेवा करु शकू हा त्याचा उद्देश होता.
लोभ कोणाला राहात नाही.आईच्या शेतीबद्दलही तसंच घडलं.आतापर्यंत झोपलेल्या बहिणी आईला चाहायला लागल्या.आम्हाला हिस्सा दे म्हणायला लागल्या.आईला थुलकवू लागल्या.आईही जाळ्यात फसत जावू लागली.त्यातच आता पोरा सुनेचा राग करायला लागली.पोरी तिला प्रिय व्हायला लागल्या.तिच्यात अगतिक बदल घडायला लागला.
कधीही आईवर हात न उचललेल्या मुलाला मुलीही बदनाम करायला लागल्या.त्याची पत्नी मारते....तोही मारतो.शिळ्या पोळ्या खायला देतो.इत्यादी आरोप व्हायला लागले.सारं अस्तित्व संपायला लागलं.आईचं आणि त्याचंही.त्यातच एक दिवस आईला गाजरचा हलवा खायच्या निमित्यानं पोरींनी आईला नेलं.एक एकर नावावर करुन घेतली.आईचे परत हाल सुरु झाले.पण आता मुलाने पुर्ण दुर्लक्ष केलं होतं.ज्या आईवर त्याने मनापासून प्रेम केलं होतं.ज्या आईसाठी त्याने आपली पत्नी सोडली होती.ज्या आईच्या नावावर एक एकर शेती करुन दिली होती.तिच आई अंतिम समयी शेत नावावर होताच मुलाचा विचार न करता त्याला सोडून गेली होती.तिनं जुन्या दिवसाचा विचार केला नव्हता.पडक्या भींती,रोजंदारीचे काम,नकार असतांनाही कामाला बायांच्या मागे लागून जाणे,पैसे व्यवस्थीत न मिळणे,बहिणींना आईला पोसा म्हटल्यावरही बहिणींचे आईला न पोसणे.या सा-याच गोष्टी आई विसरली होती.पण तिला तरी म्हातारपणात काय कळेल?म्हातारपणात आपला मेंदू तल्लख नसतो.तेच आईच्या बाबतीत झालं.
महत्वाचं म्हणजे आज म्हाता-या माणसांची सेवा करणं हा अभिशापच वाटतो माणसाला.अलिकडचा जमाना स्वार्थी आहे.या काळात सुनेला सासूसासरे सहनच होत नाही.मुलगाही तिच्यासमोर बैलासारखा वागतो.आईनं आपल्यासाठी काय केलं हे विसरुन तिच्या म्हणण्यानुसार तिला वृद्धाश्रमात टाकतो.ज्या वृद्धाश्रमात नातवंड दिसत नाहीत.ना मुलाचे प्रेम.अगदी जीव कासावीस होतो.म्हातारपण जगतांना.पण काय करणार.मरण येईपर्यंत जगावंच लागत असतं.
तो देश महान होता की ज्या देशात ती जन्माला आली होती.ती जेव्हा मुलीकडे राहायला गेली.तेव्हा तिनं हाय खाल्ली होती.कारण मुलीनं तिच्या नावावरचं शेत आपल्या नावावर मरणाआधी करुन टाकलं होतं.
आज ती हयात नव्हती.पण तिचं अस्तित्व पावलोपावली जाणवत होतं.वृद्धाश्रम ही गोष्ट त्याला थोतांड वाटत होती.मुलगी असो की मुलगा,त्याने इस्टेटीचा लोभ न करता मायबापाची सेवा करावी असं त्याला वाटत होतं.ते अस्तित्व संपलं असलं तरी ज्या महान देशात तिचा जन्म झाला होता.त्या महान देशातील ती महिला अभागी ठरली असली तरी वृद्धावस्था हे तत्व तिच्याहीसाठी अभिशाप ठरलं होतं.ती महान होती नव्हे तर ज्या देशात अशी मंडळी जन्मतात,तो देशही महान असतो असं त्याला वाटत होतं.
मित्रांनो,वृद्धावस्था जरी अभिशाप असला तरी ही वृद्धावस्था तुम्हालाही येणारच असते.याचा थोडा विचार करा.म्हातारे आईबाप हे आपलेच एक अंग असतात.त्यांची सेवा करा निस्वार्थपणे.त्यांना अंतर देवू नका.त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका.वृद्धाश्रम त्यांच्यासाठी नाही.ज्यांना काहीच संतती नाही.त्यांना जगू द्या वृद्धाश्रमात.......पण ज्यांना खरंच संतती आहे.त्यांना मात्र घरीच ठेवा.नातवंडाचं सुख पाहू द्या.त्यांचं अस्तित्व जगवा.कारण त्याची सेवा केल्यानेच तुमचा देशही महान बनणार नाही.


२}आधार

झाडाला पालवी फुटेनाशी झाली होती.पाऊस पडेनासा झाला होता.झाडेही सुकत चालली होती.नव्हे तर पाऊस न पडण्यानं बंद झाडे आत्महत्या केल्यागत मृत होती.अर्थात वाळत होती.एवढ्यातच बाजीरावला जो एक होता.तो आधार पुर्णतः संपेल की काय असे वाटेनासे झाले होते.
बाजीराव सामान्य शेतकरी होता.आता शेत मात्र भरघोष पीकत नव्हतं.कारण पाऊस पडत नव्हता.त्यामुळं त्याच्या मनातली स्वप्न खंगत चालली होती.तरीही तो संयम ठेवून होता.पण कितीही त्याने संयम ठेवला असला तरी धीर मात्र खचत चालला होता.काय करावे आणि काय नको असे त्याला होवून गेले होते.
बाजीरावच्या शेतात टुमदार एक झाड होतं.दरवर्षी याच झाडावर बाहेरुन विदेशपक्षी यायचे व गुंजारव करीत फेर धरुन नाचू लागायचे.बाजीरावचा बा याच झाडाच्या सावलीत दुपारी विसावायचा.त्याला शांत झोप लागायची.ती काळझोप नसायची तर ती स्वप्नझोप असायची.आपल्या ओसाड शेतात हिवाळी तसेच पावसाळी हंगामात पेरलेले धान्य कसे हिरवेगार दिसतात.याचं स्वप्न याच झाडाखाली झोपेमध्ये बाजीरावचा बा पाहात असायचा.ते त्याचे स्वप्नही खरे व्हायचे.बाजीरावही बा पाठोपाठ तेच स्वप्न पाहात असायचा.
शेतात भरपूर पीकत होतं त्यावेळी.पैशाचीही ऐनचैन होती.तसा तो मेहनतही करीत होता.पण कालांतरानं बाजीरावच्या बाच्या याच स्वप्नाला कोणाची तीट लागली कुणास ठाऊक.आता मात्र शेत पीकेनासे झाले होते.
बाजीरावचा बा मरण पावला होता.तसा बाजीरावही तरुण झाला होता.शेती वंशपरंपरागत बाजीरावकडे आली होती.त्याचबरोबर घरंही वंशपरंपरागत भाऊ नसल्यानं त्यालाच मिळालं होतं.
बाजीरावचं गावात घर होतं.चांगलं कुळानं बांधलेलं घर.भींती मातीच्या जरी असल्या तरी त्या भींतीत कोणी सब्बल जरी खुपसली तरी ते पडणं दूर साधं छिद्र ही पडत नव्हतं.एवढं मजबूत घर होतं.अनंत सुख होतं बालपणात.पण सुखामागून दुःख येतं ,त्याप्रमाणे बाजीरावचं झालं.दुःखच वाट्याला आलं होतं.नव्हे तर सततच्या नापिकीने आता खायलाही अन्न मिळत नसल्यानं व वरुन शेतबियाणासाठी कर्जावू रक्कम घ्यावी लागत असल्यानं बाजीरावनं जे घर गहाण टाकलं होतं.ते घर त्याला सोडवता आलं नाही.त्यातच ते घर निलामी निघालं.आता आपण कुठं राहावं म्हणून बाजीराव विचार करु लागला.विचाराअंती त्याला आपल्या शेताची आठवण झाली.जी शेती पीकत नसली तरी ज्या शेतीनं आपलं एवढं मोठं बि-हाड पोसलं नव्हे तर कुळ सांभाळलं.त्याच शेतीत घर बांधायचं.असं बाजीरावनं ठरवलं होतं.
बाजीरावनं आपल्या मनात विचार केला नी त्याने घर बांधायचा निर्णय घेतला.तो मनात विचार करु लागला की घर बांधणं सोपं आहे.पण वरुन छताचं काय? आजुबाजूला काहीही लावता येईल पण वरुन काय टाकणार.त्यातच एखादं प्लास्टीक टाकूही आपण.पण ते तरी सालभर टिकेल काय?
बाजीराव विचार करु लागला.विचाराअंती त्याला या झाडाची आठवण झाली.ज्या झाडात तो बालपणी पहुडत असे.बालपणातील कित्येक दुपारचा प्रहर त्याने वडीलांसोबत याच झाडात काढला होता.त्याला आठवत होतं की उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही याच झाडाने त्याला आधार दिला होता.नव्हे तर ते झाड आजही पशुपक्षांना आधार देत होतं.
बाजीरावने विचार करताच आपलं कसंतरी मोडकंतोडकं घर उभं केलं.त्या झाडाला आपला आधार मानले.ते झाडंही बाजीरावला काहीही न मागता आधार देवू लागले.विदेशपक्षासह दिवस काढतांना बाजीरावला काहीही वाटलं नाही.हेही दिवस निघून जातील असा विचार करुन तो दिवस कंठू लागला.त्याला काय माहीत होते की आपल्या आयुष्यात पुढे असेही संकट येवू शकते.
लोकं इंधनासाठी झाडं कापत होते.काही लोक रोजगार म्हणून झाडं कापत होते.तर काही मंडळींनी शेतात झाडाच्या सावलीने पीक होत नाही म्हणून झाड कापले होते.तर काहींनी आपल्या शेतीतील पीकांवर माकडांचा त्रास होतो म्हणून झाडं तोडली होती.उरली सुरली गावातील माळरानातील झाडं इतरही कारणांनी कापून टाकली होती.आता गावात झाडं उरली नव्हती.आजुबाजूच्याही गाववाल्यांनी याच कारणानं झाडं कापली होती.त्यामुळे साहजिकच पाऊस येत नव्हता.पीकं पीकत नव्हती.तसं रासायनिक खतांनं जमीनीचा कसंही कमी झाला होता.पावसाळ्याचे चार महिने जर सोडले तर बाकी आठ महिने उन्हाळाच आहे काय असे वाटत होते.हिवाळा ऋतू नावापुरताच अस्तित्वात होता.
बंदा पाऊस माळरानातून गायब झाल्यानं आता शेतात पाऊस येत नव्हता.झाडं जशी इतर भागातील वाळली होती.तसंच झाड बाजीरावच्या शेतातीलही वाळलं होतं ज्या झाडाचा बाजारावला आधार होता.ते झाड वाळल्यानं बाजीरावचा आधार संपला होता.उन्हं दिवसेंदिवस कडक होत चाललं होतं.अशातच एक दिवस पाणी न मिळाल्यानं बाजीरावही कुटूंबासह तडफडून मरण पावला होता आता मात्र त्या ठिकाणी एक पडकी झोपडी उरली होती.त्याचबरोबर ते निष्पर्ण झाड.जणू संभाव्य धोक्याची सुचना देत ते नाळलेलं झाडं आजही डौलानं उभं होतं.एक आस आजही त्या झाडाच्या अंतर्मनात होती की कुणीतरी येईल व नव्या जोमान झाडं लावण्यास प्रारंभ करेल.पण असा विचार कोणाच्या मनात येत नव्हता.आणि कोणीच तिकडे भटकत नव्हता.मात्र आजही त्या वाळलेल्या झाडाला त्या पडक्या झोपडीची सोबत होती.जणू आधार असल्यागत ते शेजारधर्म पाळत होते.

३} नशीब

भव्य तो समुद्रकिनारा होता.पण तरीही तो शांत होता.त्याच्यावर लाटा उसळत होत्या.माणसाच्या डोक्याच्या वर जातील एवढ्या उंच.त्या लाटाकडे पाहात असता कोणालाही धस्स वाटेल एवढी त्या लाटांची उंची होती.नव्हे तर धुके पडल्यागत त्याचा दुधाळ फेसही जाणवत होता.
सोमनाथ आपल्या परीवारासह फिरायला गेला होता.तो समुद्रकिनारी फिरत होता.तेथील वाळूवर चालतांना त्याला मजा वाटत होती.तसे वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले व रंगीबेरंगी दगडं पाहून त्याच्या आनंदात अजून भर पडली होती.त्यातच आजुबाजूला असलेली वनराई त्याला खुणावत होती.ते हिरवी हिरवीे पाचूची तसेच माड सुपारीची डेरेदार झाडं त्याच्या मनात नवे तरंग निर्माण करीत होती.अशातच त्याला त्याची प्रेयसी श्वेताची आठवण आली.श्वेता सोबत असती तर.......
श्वेता दिसायला सुंदर होती.बोलायलाही सुस्वभावी होती.पण परीस्थीतीनं तेवढी श्रीमंत नव्हती.घरी असलेल्या दोन बहिणींना शिकविता शिकविता वडालांचे हालहाल होत होते.ती शिकत होती.फिरणे तिच्या नशिबात नव्हतेच.
अचानक या समुद्रकिनारी फिरतांना सोमनाथला आपल्या प्रेयसीची जशी आठवण आली.त्यानं त्याच किना-यावरुन तिला फोन लावला.
"हलो श्वेता,मी सोमनाथ बोलतोय."
"बोला,कुठे आहात?"
"मी गोव्याला समुद्रकिनारी आहे."
"कशाला गेलात?"
"फिरायला.मी फिरायला आलो आहे."
"कसा काय फोन केलात?
"अगं मला तुझी आठवण आली.वाटलं तू सोबत असती तर........"
"माझ्या नशिबात कुठाय बाबा फिरणं.आम्ही गरीब मंडळी.आमचं काशी,पंढरपूर,गोवा सगळं इथंच असतं."
"हो का."
सोमनाथनं फोन ठेवला.त्याला अतिशय वाईट वाटलं.तिला फोन लावून त्याला तिच्या काळजावर घाव केल्यासारखं वाटलं.तिच्या गरीबीची टर उडविल्यासारखी वाटली.तो विचार करु लागला.फिरण्यासाठी कोण जातो?जो श्रीमंत आहे तोच.गरिबांच्या आयुष्यात फिरणं नसतं.हे फिरणं म्हणजे अवाढव्य झालेला पैसा उधळणं.केवळ माणुसकीची थट्टाच.एकीकडे लोकांना दोन वेळचं पोटभर भेटत नाही तर दुसरीकडे फिरण्याच्या नावावर शेकडो पैसे उधळतात.एकीकडे जेवायला बसायला साधी चटई मिळत नाही तर दुसरीकडे जेवायला बसायला डायनिंग टेबल.एकीकडे आमलंचिमलं खावं लागतं तर दुसरीकडे कितीतरी अन्नाची नासाडी.अतोनात पैशानं माजलेले लोकं जीवंतपणी मायबापाची सेवा करीत नाही आणि मेल्यावर त्याची राख कितीतरी दूर इलाहाबादला नेतात.याला काय म्हणावे.विचाराअंती सोमनाथच्या पायाखालची वाळू हळूहळू सरकत होती.त्याला आपल्या श्रीमंतीचा पश्चाताप होत होता.नव्हे तर तोच जगातला सर्वात मोठा गरीब आहे हे जाणवत होतं.
तो अजून विचार करु लागला की समुद्र कितीही मोठा असला तरी त्याच्यात सर्वांना सामावून घेणे हा मोठा गुण आहे.तो कालाकलूटा आहे.त्याचे पाणी खारट आहे.पण त्यामध्ये कित्येक नदीचे पाणी सामाविण्याची शक्ती आहे.आपणही या समुद्रासारखे बनावे.सर्वांचा आदर करावा.प्रसंगी आपल्याला कोणी वाईट म्हटलं तरी चालेल.पण आपण कोणाचे मन दुखवू नये.कोणाच्या श्रीमंतीची थट्टा उडवू नये.त्याला श्वेताचं म्हणणं पटलं होतं.नशीब वैगेरे काही नसतं तर नशीब माणूसच घडवत असतो हे त्याला पटत होतं.पण तिला कोण सांगणार.
सोमनाथनं निर्णय घेतला होता.तिचे नशीब बदलण्याचा.तो गोव्याहून परत आला होता.तसा तो परत आल्यावर आपल्या प्रेयसीला मदत करु लागला होता.तिला त्यानं शिक्षणाचं महत्व पटवून दिलं होतं.हवं तर तिला तो मार्गदर्शन करीत होता.
श्वेता शिकत होती.परीस्थीतीवर मात करुन.हवं तर सोमनाथ तिला शिकवीत होता.सर्वतोपरीनं.आज श्वेता शिक्षणातून मोठी झाली होती.उच्चपदावर गेली होती.श्रीमंतही झाली होती.तिला कळलं होतं की नशीब वैगेरे काही नसतं.नशीब माणसाला बदलवता येतं ते शिक्षणानं.जर ती शिकली नसती तर आज तिला आपलं नशीब बदलवता आलं नसतं.
श्वेता आज श्रीमंत बनली होती.मात्र तिचा स्वभाव बदलला होता.ती त्याला विसरली होती.अगदी नदीसारखी.नदी जशी इतरांना आपल्या पात्रातील पाणी पुरवून पोषते.जेव्हा तिच्या पात्रात पाणी कमी असतं.पण वेळ आल्यास आपल्या पूराने सा-यांचे पीकही बुडवून टाकते.अगदी तिचा स्वभाव या नदीप्रमाणेच बदलला होता.काल नदीप्रमाणे पात्रात कमी पाणी असल्याने अर्थात पैसा कमी असल्याने तसेच गरीब असल्याने इतरांना मदत करणारी श्वेता आज मात्र श्रीमंतीच्या पुराने इतरांचं नुकसान करीत होती.तो मात्र बदलला नव्हता.तो आजही त्या समुद्रासारखा इतरांना आजही सहकार्य करीत होता.समुद्र जसा आपल्यातून निर्माण झालेल्या मीठाने अख्ख जग पोषतो.तसा तोही इतरांवर प्रेम करीत इतरांना मदत करीत होता.आज त्याला गोव्याचा टूर आठवत होतं.श्वेताही आठवत होती.पण श्वेता मात्र त्याला विसरुन गेली होती.तिचं अस्तित्वही लुप्त झालं होतं.नदी जशी कोणत्याही समुद्रात विलीन होवून आपलं अस्तित्व विसरुन जाते तशी तिही कोण्या दुस-याच समुद्राच्या अर्थात मुलाच्या प्रेमात पडून आपलं अस्तित्व विसरली होती सोमनाथला विसरुन.सोमनाथने केलेली मदतही विसरुन..........
४} भूक

आजकाल कोवळ्या वयातील मुली आपला मागचा पुढचा विचार न करता पळून जातांना दिसतात.त्यानंतर त्यांची काय दुर्गती होईल ह्याचाही ते विचार करीत नाहीत.
शहाजनाबाद जिल्ह्यातील एका गावात एक मुलगी राहात होती.तिचं नाव शबीना होतं.शबीना पाहायला सुंदर होती.तिचा विवाह झाला होता.तिला पहिल्या पतीपासून एक मुलगीही होती.तिचं नाव होतं समा.
शबीनाला मुलगी झाली खरी.पण त्या मुलीकडे तिचं फारसं लक्ष नव्हतं.त्या मुलीचा सांभाळ तिचा बापच करीत असायचा.निव्वळ दूधच पाजणे नाही तर सर्व गोष्टी बापाला कराव्या लागायच्या.ती मात्र फोनवरच सातत्यानं बोलत असायची.त्यामुळे तिचं सगळं जुळवून नेण्यात तिच्या पतीची जिंदगी जात होती नव्हे तर त्याची जिंदगी हालबेहाल झाली होती.
मुलगी दहा वर्षाची झाली होती.आता नाही म्हणता ती सक्षम झाली होती.काही गरजही आता तिच्या मुलीसाठी तिच्या पतीची उरली नव्हती.त्याचबरोबर तिच्या सतत मोबाईलवर राहण्याने पतीच्या मनात एक संशयही निर्माण झाला होता आणि का नाही होणार.यात शबीनाच्या मुलीचा दोष नव्हताच.
तिच्या पतीचं नाव शहजाद होतं.तो तिला मोबाईलवर पाहून सारखा संशय करीत होता.त्यातच तिला मोबाईलवर बोलू नको.मोबाईल बंद कर असे सारखे म्हणायचा.नव्हे तर तिचा मोबाईलही लपून चोरुन पाहायचा.यातच तिला आलेले मेसेज चेक करायचा.त्यात अश्लिलता भरलेली असायची.त्यामुळं तर शहजादला जबरदस्त झटका पडायचा.आपली पत्नी आपल्याच घरी राहून रंगरलिया मनवते.याचं अफाट दुःख त्याला वाटायचं.शेवटी याच उतकळ्यात रमता रमता तो दारु प्यायला लागला.मग सतत भांडण यातच त्याची जिंदगी जात होती.शेवटी तो त्या मोबाइलला बंद करण्यासाठी सतत त्रास देवू लागला.
पती पत्नीचं भांडण.त्यात मुलीचा दोषच नव्हता.पण त्यांच्या भांडणात धारेवर धरली गेली मुलगी.त्या शबीनाला आता त्याची गरज उरली नव्हती.त्याचं मोबाईलसाठी केलेलं भांडण.तिला स्वस्थ बसू देत नव्हतं.शेवटी तिनं फारकत घेण्याचा निर्णय घेतला.तशी ती त्याच्यापासून वेगळी राहायला गेली होती.तिनं आपल्यासोबत समालाही नेलं होतं.
समाला बापाची फार आठवण येत होती.पण आईच्या मोबाईल व्यसनात समाचा बळी जात होता.ती शहजादपासून तर वेगळी झाली होती.पण आजही ती सुधारली नव्हती.आजही ती मोबाईलवर बोलतच होती.असंच मोबाईलवर बोलण्यातून तिनं असाच एक मुलगा पकडला.तो मुलगा तिच्यापेक्षा वयानं अतिशय लहान होता.त्यांच्या वयात अकरा वर्षाचं अंतर होतं.दोघांचं तासन् तास बोलणं.आता जवळ आल्याशिवाय पर्याय नाही असं वाटत होतं.याच मुलावर प्रेम झालं होतं.निरतिशय प्रेम झालं होतं व विवाह करण्याची इच्छा होती.सगळे नातेवाईक समजावत होते.पण आज तिला जी वासनेची भूक लागली होती.ती भूक तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती.चाहे यात समाचा बळी गेला तरी चालेल.तिला समाचीही काळजी नव्हतीच.
प्रेमात वाहवत जाता जाता तिचं मुलीकडं लक्षच राहिलं नाही.पुढे काय होणार समाचं ह्याचा विचार न करता ती प्रेमात पडली नव्हे तर पुढे जावून तिनं लग्नही केलं.
मनोज नाव होतं त्याचं.तो पाहायला साधारण होता.तोही काही तिच्या प्रेमात पडणार नव्हता.पण भूकच ती.मग ती भूक वासनेची का असेना,तिलाही तीच भूक लागली होती.वासना तृप्त झाली नव्हती.त्यामुळं तिच्याच मर्जीनुसार त्यानं लग्न केलं.लग्नाचा करारही केला.त्या करारात त्यानं समाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली.
शबीना पेशानं परीचारीका होती.तिची कधीकधी रात्रपाळीही असायची.ती रात्रपाळीली जायची.आपल्या मुलीला आपल्या नवीन पतीजवळ ठेवून.पतीवर जणू विश्वास ठेवून.कारण त्यानं तिला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती.
शबीना लग्न करतेवेळी चाळीस वर्षाची झाली होती.मनोजनं या अर्ध्या वयात शबीनाशी लग्न केलं होतं.कदाचित त्याने विवाहाचा विचारपूर्वक निर्णय घेतला होता.कदाचित त्याला वाटत होतं की शबीना तर म्हातारी झाली.तिच्यामुळे वासनेची भूक भागणार नाही.पण समा उद्या तरुण होणार.आपल्या कामात येणार.आपल्या वासनेची भूक भागणार.
आज शबीना पश्चात्ताप करीत होती.मनोजनं स्वतःच्या रक्ताचं नातं नसलेल्या शबीनाच्या लेकीला म्हणजे समाला वेश्या बनवले होते.तिनंच केलेला पती तिच्याच डोळ्यासमोर तिच्या मुलीवर अत्याचार करीत होता.ती काही मनोजची रक्ताची मुलगी नव्हती.त्यामुळं मनोजला काही फरक पडत नव्हता.फरक पडत होता शबीनाला.ज्या शबीनानं आयुष्यभर रंगरलिया मनवीत आपल्या आयुष्याचीच नाही तर अख्ख्या संसाराची धुळधानी केली होती. मनोजच्या निर्दयी बलत्कारी स्वभावाला आज ती रोखू शकत नव्हती.कारण आता आपलेच दात आणि आपलेच ओठ होते.पतीला काही म्हटल्यावर पती पोषणार नव्हता.तसेच लेकीवरचाही ती काही केल्या अत्याचार रोखू शकत नव्हती.
वासनेची भूक तर आज शबीनाची भागली होती.त्यातच मनोजचीही वासनेची भूक थंड झाली होती.पण समाच्या आयुष्याचं काय?तिच्या तर आयुष्याचं पुर्णतः वाटोळं झालं होतं.समाला वासनेची भूक नव्हती.पण शबीनाच्या गैरजबाबदार वर्तणूकीचा परीपाक की काय आज शबानाही भोगत होती.बिचारी लाचार,असहाय्य आणि निर्दयी बनून.........

५} निकाल

घर.......घरासाठी लोकं किती भांडत असतात.घराच्या एक एक इंच जागेसाठी वाद चालत असतात.नव्हे तर याच घराच्या एक एक इंच जागेसाठी हत्याही होत असतात.काहींना घरपण मिळतं तर काहींना तेही मिळत नाही.अशीच एक गोष्ट.
सुभाषनगरात एक गोपाल नावाचा व्यक्ती राहात होता.त्याचं सुजाताशी लग्न झालं होतं.गोपालजवळ भरपूर मालमत्ता होती.त्याचं एक टुमदार घर होतं.नव्हे तर शेतीवाडी सर्वकाही होतं.त्यांचा संसारही व्यवस्थीत चालला होता.असे बारा वर्ष निघून गेले होते.त्यांना एक पुत्ररत्नही होतं.
वयानुसार माणूस खंगतं.गोपालचंही तेच झालं.त्याची पत्नी वयानं बरीच लहान असल्यानं ती मात्र खंगली नव्हती.पण गोपालनं काम करणं बंद केलं होतं.त्यातच त्याची प्रकृतीही व्यवस्थीत राहात नव्हती.एरवी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याच्या पत्नीला कामावर निघावंच लागलं.
गोपालची पत्नी कामावर जात होती.गोपाल मात्र बसल्या बसल्या घरची कामं करायचा.पण तिचा कामावर जाण्याचा अवकाश तिच्या पतीच्या नाकर्तेपणाचा फायदा घेत एका तरुणानं तिला प्रेमपाशात ओढलं.
आता ती गोपालशी नफरत करु लागली होती.त्याच्याशी उद्धट बोलू लागली होती.त्यातच त्यांचे खटले उडू लागले व ते काही दिवसानंतर वेगळे राहू लागले.
आता तर ती वेगळी राहात असली तरी ती गोपालला मदत करीत होती.पण तिच्या पुढील प्रेम प्रकरणानं घराचीच नव्हे तर संसाराची वाट लागली होती.तिनं गोपालपासून वेगळं राहताच त्या फुस लावणा-या तरुणाशी लग्न केलं होतं.अगदी गोडगोड बोलून.
गोपालजवळ मालमत्ता भरपूर होती.पण आता त्याच्या मालमत्तेचा उपयोग नव्हता.त्याची मालमत्ता त्याला विकता तर येत होती.पण लेकीचा त्याला विचार होता.माझी मुलगी जाईल कुठे?तो मालमत्ता सांभाळून ठेवत होता.पण मुलीसह तिनं तर दुसरं लग्न केलं.हे दुसरं लग्न आता गोपालला माहीत झालं होतं.
आता या मालमत्तेतून मुलीचाही अधिकार संपला.त्याच्या मनात दुसरा विचार असाही होता.तेव्हा त्यानं आपली मालमत्ता विकायला काढली.कारण काम जमत नव्हतं.पोटाला अन्न हवं होतं.ते देणार कोण? सुजाता खुप हुशार होती.जेव्हा तिला माहीत झालं की आपला पहिला पती घर विकतोय.ती त्याच्या घरी गेली व तिनं त्याच्या कमजोरीचा फायदा घेत ते दस्ताऐवज सोबत घेऊन गेली.तेव्हा गोपाल तिला वारंवार फोन करीत होता.आपल्या मालमत्तेची कागदपत्रं मागत होता.पण तिला वाटत होतं की ही मालमत्ता माझ्या मुलीची आहे.
दुस-या लग्नाचा करार.त्या करारात दुस-या पतीनं लिहिलं होतं की मी सुजाताच्या मुलीसह तिचा स्विकार करीत आहे.मी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतो.मग लग्नाचा करारच तो........तो गोपालच्या हातात पडला.
सुजाताचं दुसरं लग्न.......दुसरा पती.......तोही निकम्मा.दुस-या पतीजवळ मालमत्ता नव्हती.त्यानं सुजाताला फसवलं होतं.वाटत होतं की सुजाताच्या पहिल्या पतीची असलेली मालमत्ता आपलीच होईल.कारण आजारानं गोपाल खंगलेला.तो केव्हा मरेल याची खात्री नव्हती.म्हणूनच दुस-या पतीनं लग्न केलं.पण जेव्हा गोपालनं आपल्या मालमत्तेचा मुकदमा न्यायालयात दाखल केला.तेव्हा मात्र दुस-या पतीचे धाबे दणाणले होते.तो आता तिला सोडून पळून गेला होता.त्याला वाटलं होतं आता गोपालची मालमत्ता सुजाताला मिळणार नाही.सुजाता बेघर होईल.
सुजाताची नशा उतरली होती.आता तिला घर हवं होतं.मालमत्ताही हवी होती.आता तिला गोपालही हवा होता.पण न्यायालयात जेव्हा मुकदमा दायर झाला.तेव्हा मात्र त्याला ती हवी नव्हती.तिची सावली आणि तिची मुलगीही हवी नव्हती.
न्यायालयानं निकाल दिला होता.सुजातानं लग्न केलं पहिला पती असतानाही.हे लग्न दुस-या लग्नाच्या करारानुसार तिच्या मर्जीनं झालेलं आहे.तेही तिच्या मुलीला स्विकार करण्याचे जणू वचन घेवूनच हा लग्नाचा करार केलेला आहे.तेव्हा गोपालच्या मालमत्तेवर उभयंताचा काहीही अधिकार नसून या मालमत्तेतील टिसूभरही रक्कम आज सुजाता तसेच तिच्या मुलीला देण्यात येवू नये.हं मालमत्ता सांभाळण्याचा अधिकार मुलीजवळच राहील.पण ते गोपाल म्हणेल तर........
न्यायालयाचा निकाल आला खरा.पण न्यायालयानं निर्णयाची चाबी गोपालजवळच दिली.गोपालही आता विचार करु लागला की जी मुलगी आपल्या आईच्या म्हणण्यानुसार वागली नव्हे तर कळत असतांनाही आपल्या आईसोबतच मला सोडून निघून गेली.त्या मुलीचा मालमत्तेसाठी विचार का बरं करायचा.त्यापेक्षा ही संपुर्ण मालमत्ता सरकारी दप्तरी गोळा करायची.
विचारांचा अवकाश.गोपालनं न्यायालयाकरवी आपली पुर्ण मालमत्ता सरकारी दप्तरी गोळा केली व आपण स्वतः अनाथालयात जावून अनाथांची सेवा करु लागला.त्याला कधीकधी आपल्या मुलीची आठवणही यायची.पण क्षणात तो ती आठवण विसरुन जात होता.त्या अनाथांकडे पाहून त्यात आपली मुलगी शोधायचा.एखादी मुलगी दिसलीच तर तिच्यासोबत आनंदाचे क्षण शेअर करीत गोपाल आपले दिवस घालवत होता.कधीही आपल्या पत्नी अन् मुलींची आठवण न करता.
सुजाताचे म्हातारपण दुःखात जात होते.मुलगी चांगली होती.पण जावई बरोबर नव्हता.तो काही आपल्या पत्नीच्या आईला जवळ करीत नव्हता.त्यामुळं ती म्हातारपणी एकटीच राहात होती.पोटासाठी रस्त्यावर भीक मागत होती.तिही आज वेडी झाली होती लेकरासाठी.जणू त्या मंदीराच्या बाहेर येणा-या जाणा-यांच्या गर्दीत ती आपली मुलगी शोधीत होती.
न्यायालयानं तर निकाल मालमत्तेचा लावला होता.पण नियतीनं मात्र तिच्या जीवनाचा म्हातारपणात निकाल लावून दिला होता.करावे तसे भरावे हे आज तिला कळले होते.जेव्हा मंदीराच्या बाहेरही भीक्षा मागतांना लोकं लाथाडत होते.काहीबाही बोलत होते.हाच तिनं केलेल्या पापाचा परीपाक होता.

६} झोपडी

घर..........प्रत्येकाला घर आवडत असतं.मग ते घर लहानसं का असेना.आपलं ते आपलं घर असतं.या घरात काही लोकं सुखी असतात.काही लोकं दुःखी असतात.काहींची घरं लहानही असली तरी त्यांना समाधान असतं आपल्या घरात.काहींची मोठी घरं असली तरी ते हावरट असतात.मात्र झोपडी कोणालाच आवडत नाही.
मोहम्मद अमजद खान नावाचा तो गृहस्थ.स्वभावानं अतिशय चांगला होता.त्याला एक पत्नीही होती.पत्नीही स्वभावानं सुंदर होती.पत्नीचं नाव जायदाबेगम होतं.तसं त्या दोघांचं खुप पटत असे.
गाव तसं मोठं नव्हतं.पण गाव स्वयंपुर्ण होतं.त्या गावाजवळूनच एक नदी वाहात होती.नदी पाहिजे तेवढी मोठी नव्हती.पण ती नदी गावाला वळसा मारुन गेली होती.पावसाळ्यात या नदीला पुरही असायचा.पण त्या पुराने कधी गावक-यांचे नुकसान केलेले नव्हते.
अमजद भाई कबाडीचे काम करायचा.दररोज सायकलवर फिरुन अमजदभाई है क्या जुना पुराना लोहा लोखंड म्हणत गल्लीबोळीतून फिरुन लोहा लोखंड गोळा करायचा आणि तो जास्त दामात विकून दोन पैसे कमवून अमजदभाई आपला संसार चालवायचा.असे वर्षामागून वर्ष निघून चालले होते.अमजद भाईला वाटलं आपण आपला धंदा असाच चालवला तर आपण काही आपली दशा पालटवू शकणार नाही.म्हणून अमजदभाईनं आपला धंदा वाढविण्याचा विचार केला.
अमजदभाई आपले दुकान वाढविण्याचा विचार करीत असतांना त्याला अचानक युक्ती सुचली.त्यानं खाजगी लोन काढलं व त्यानं एक लहानशी जुनी चारचाकी गाडी उचलली.ती गाडी रोज फिरवून अमजदभाई आपली दिनचर्या चालवू लागला.त्यातच त्याचा धंदा वाढला.तो धंदा एवढा वाढला की आता अमजदभाईजवळ चार ट्रक होते.तो खूप श्रीमंत बनला होता.पैसा अमाप होता.पण त्याला यत्किंचितही गर्व नव्हता.
जायदाबेगम मात्र कालपर्यंत बरी होती.दिवसेंदिवस ती आपल्या पतीची वाढती शौकात पाहात होती.तिलाही वाटत होतं की आपण काल गरीब होतो.आज श्रीमंत बनलो.आज एखादं घर असावं.मोठं घरं........ती हट्ट करायची अमजदभाईजवळ की तिला मोठं घर हवं आहे.प्रसंगी ती अमजदभाईशी घरासाठी भांडणं देखील करायची.
अमजदभाईला विचार यायचा की आपण काल गरीब होतो.याच झोपड्यानं बनवलं आपल्याला.नदीचं पाणी पुरत नाही,तिथं पैसा कसा पुरेल.आज आपण घर बांधायला हरकत नाही.पण घर जर बांधलं तर उद्या त्या घरात ऐषआराम असेल आणि मग आपण आळशी बनू.मोठं घर असल्यानं घरात बेगमला कामं लवकर करता येणार नाही,मग तिला कामाला आधार व्हावा म्हणून एखादी मोलकरीण लावावीच लागेल.मग ती मोलकरीणही कुरकूर करेल.म्हणेल कपड्याला सायेब एखादी मशीन घेवून द्या.मग द्यावीच लागेल मशीन घेवून.त्यानंतर तिला दिवाळीला साडी द्यावी लागेल.त्यानंतर ती एखादा पगार बोनस मागेल.शिवाय या चक्करमध्ये पैशाचा अपव्यय होईल.आजार तर पाचवीला पुजलेले असतील.शिवाय आपलं घर बांधतांना वेळ जाईल तो वेगळा.यापेक्षा आपण झोपडीतच राहिलेलं बरं.
जायदाबेगम भांडण करीत होती खरी,पण अमजदभाईची घर बांधायची इच्छा नव्हती.संपुर्ण चाळीतील माणसांनी आपापलं टुमजली घर बांधून टाकलं होतं.पण अमजद भाई काही त्या विचारातच नव्हता.
वर्षानुवर्ष पैसा असुनही अमजदभाई झोपडीतच राहात होता.सगळी मंडळी त्याला हसत होती.पण तरीही अमजदभाईला त्यांचं नवल वाटत नव्हतं.
आज मात्र नियतीनं डाव साधला होता.अचानक पाऊस सुरु झाला.सुरुवातीला पाऊस कमी होता.पण संततधार सुरु झाली पावसाची आणि या पावसानं विक्रमच केला.काल पर्यंत न फुगलेली गावची नदी.आज गावच्या नदीला पूर आला.तो पूर गावात शिरला.लोकं बिल्डींगवर चढायला लागले.पण पाऊस आणि पूर काही केल्या ऐकत नव्हता.त्याने थैमानच घालायचे ठरवले होते.
टोलेजंग इमारतीतील ती मंडळी.त्यांचा आपल्या इमारतीवर विश्वास होता.त्यांना वाटत होतं की आपली इमारत आपल्याला मदत करेल.ते आपली इमारत सोडायला तयार नव्हते.ते वरवरची मजली चढत होते.
अचानक नदीचं पाणी वाढलं.रात्रीचा तो अंधार.संपुर्ण अंधार पसरला होता.त्या अंधारात आजुबाजूचं काहीच दिसत नव्हतं.नदीचं पाणी वाढतच होतं.त्याच पाण्यानं आता प्रचंड वेगही पकडला होता.खालची माती वाहायला लागली होती.सरकारी रसद पोहोचायची होती.ती रसद अजूनपर्यंत पोहोचली नव्हती.त्यातच संपुर्ण माती वाहून गेल्यानं त्या इमारतीचे खालचे स्तंभ उघडे पडले.तसे ते कोसळू लागले.त्या नव्या को-या इमारती माणसासकट वाहायला लागल्या.सोनं नाणं सारं काही वाहायला लागलं.एक चिपूराही वाचला नाही. पण अमजदभाईजवळ काय होतं.काहीच नाही.त्यानं पटकन आपली झोपडी सोडली होती.तो या किना-यावरुन त्या किना-यावर केव्हाच पोहोचला होता.तो आणि जायदाबेगम सुखरुप होते.
सकाळ झाली होती.माहीती घेण्यासाठी अमजदभाई स्थळावर आला तर पाहातो काय?तिथं गाव नव्हतं.पुर्ण जागाच भुईसपाट झाली होती.अमजदभाईच्या धंद्याचीही वाट लागली होती.पण तरीही अमजदभाईचं सोनं नाणं सारं काही वाचलं होतं.पैसा अडका सारं काही वाचलं होतं.बहुतःश त्या झोपडीनच त्याचा जीव वाचवला होता.ती त्याचेसाठी झोपडी नव्हती.तर एक महाल होता.ज्या झोपडीनं त्याचा तर जीव वाचवलाच होता.त्यासोबतच त्याच्या पत्नीचाही जीव वाचवला होता.जर का अमजदभाईनं मकान बांधलं असतंच.तर आज तो डोळ्यालाही दिसला नसता.कारण इतर लोकांप्रमाणेच आपली इमारतच आपला जीव वाचेल असे समजून त्याच इमारतीत राहून त्याही इमारतीची अशीच वाट लागली असती.अमजदभाई कोणत्या थडीला जावून पडला असता ते त्यालाही कळलं नसतं.
आज अमजदभाईनं नव्यानं शहरात धंदा सुरु केला होता.पण याही ठिकाणी येवून त्यानं टोलेजंग इमारत उभारली नव्हती.तर तीच तनामनाची लहानशी झोपडी उभारली होती.ज्या झोपडीनं त्याचा जीव वाचवला होता.त्याचा विश्वास होता याच झोपडीवर.
जायदाबेगमही आज खुश होती.तिला झोपडी आणि महालातील फरक कळला होता आज ती भांडणं करीत नव्हती.कारण तिलाही माहीत झालं होतं की त्याच झोपडीनं त्यांना वाचवलंय.नव्हे तर त्याच झोपडीनं त्यांना आधार दिला.त्याच झोपडीनं त्यांना आधार दिला नव्हे तर त्याच झोपडीनं त्यांना मालामाल बनवलं होतं.नव्हे तर त्याच झोपडीत त्यांना सुखसमाधान व शांती लाभत होती.

७} खावटी

बाहेर पावसाची सारखी रिपरिप सुरु होती.धरणी न्हाऊन तृप्त झाली होती.हवेत गारवा निर्माण झाला होता.तृणाकूरही धरणीतून डोकं काढून बाहेर आले होते.तरीपण त्याचे पाय जमीनीतच होते.पक्षी किलबिल करीत होते.पण पावसात भिजल्यानं गारठले असल्यानं आपल्या जोडीदारासमवेत अगदी निगरगट्ट राहून बसले होते.तसं त्याच्या जोडीदारांनाही हायसं वाटत होतं.
बाहेर पाऊस पडत असल्यानं सगळी माणसंही आपआपल्या घरातच होती.कोणाची भार्या भजी तळत होती.तर कुणाची भार्या पापड.पाऊस सुरु असतांना आलेल्या सुगंधावरुन हे सगळं कळत होतं.हा सुगंध त्या धरणीमाईच्या सुगंधात मिसळून गेला होता.
गंगाधर आपल्या झोपडीत विचार करीत बसला होता.तो त्या पक्षांचं निरीक्षण करीत बसला होता.त्याला आपल्या पत्नीची सारखी आठवण येत होती.
गंगाधर शेतकरी होता.त्याच्याजवळ चार एकड शेती होती.शेती दुष्काळानं पिकत नव्हती.कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ पडायचा.काही रात्री तर उपासातच काढाव्या लागायच्या.तरीही त्याच्या बानं त्याला शिकवलं होतं.त्याचं लग्नही करुन दिलं होतं.
गंगाधरचं लग्न झालेलं होतं.तोही शिकला असल्यानं त्यानं नोकरीसाठी बराच प्रयत्न केला होता.पण बराच प्रयत्न करुनही नोकरी न लागल्यानं शेवटी निराश होवून तो शेती करु लागला होता आणि आता नोकरीसाठी प्रयत्नही करणे सोडले होते.
त्यानं लग्न केलं होतं. शिकलेलीच मुलगी मागीतली होती.त्याला आता विचार आला होता की या आपल्या शेतीत पाहिजे तेवढं पिकत नाही.त्यामुळं नोकरी शोधलेली बरी.निदान मला नाही मिळाली तर काय झाले.आपल्या पत्नीला तर मिळेल.तसा आता तो तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्यामुळं ते दोघेही नोकरीसाठी प्रयत्न करीत असतांना एका कंपनीत तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
ती नोकरी करु लागली होती.त्यामुळं साहजिकच तिला चांगलं राहावं लागत होतं.तिला मिळणा-या पैशाच्या आधारानं घर व्यवस्थीत चालत होतं.तसा जुने दिवस न विसरल्यानं गंगाधर साधा राहात होता.पण ती आपले सारे अस्तिवं विसरुन गेली होती.तशातच गंगाधर शेतकरी असल्यानं व गबाळपणानं राहात असल्यानं तो तिला आवडेनासा झाला.तसंही तिला वाटायचं की आपला पगार गंगाधरनं आपल्या घरात वापरायला नको.आपल्याला पोषणं त्याचं कर्तव्य आहे.याच कारणावरुन त्यांचं दररोज भांडणंही होत होती.अशातच ती एक दिवस त्याच्या घरुन निघून गेली.
तीन चार महिने उलटले होते.एक पोस्टमेन घरी आला.गंगाधरची सही घेत त्याच्या हातात एक पत्र देवून गेला.गंगाधरनं पत्र उघडलं.तसं त्याला जाणवलं की तो त्याच्या पत्नीनं पाठवलेला नोटीस आहे.नोटीसात तिनं हुंड्याचा आरोप लावला होता व त्यामुळं ती गेली असं तिचं म्हणणं होतं.आता तिला त्याच्याकडून खावटी हवी आहे असंही तिचं म्हणणं होतं.कारण ती आजही अर्धांगीनी आहे असंही ती म्हणत होती.
गंगाधर विचार करायचा की आपणच हिला नोकरी लावून दिली.आपणच तिच्या नोकरीसाठी प्रयत्न केले.अन् आपल्यामुळंच ती पगार कमवू लागली.मग आपण संसाराला थोडा पैसा मागीतला तर काय झाले?म्हणून पत्नीनं आपल्याला सोडून जायचं काय? ती स्वतः गेली.तरीही तिनं नोटीसात लिहिलं की आपण हुसकावून लावलं.तसेच हुंडा मागीतला नसतांना मागीतला असं लिहिलं.कधी मारलं नसतांना मारल्याचा आरोपही.त्याला वाटत होतं की चूक तिचीच असून दोष मला देत आहे.त्यानंही तिला नोटीस पाठवला.त्यातच केस सुरु झाली.पण शेतीच्या सततच्या नापिकीनं तो एवढा मागं आला की वकीलाचे पैसे देवू न शकल्यानं न्यायालयानं त्याच्यावर खावटी बसवली.ती नोकरीवर असतांनाही ते तो सिद्ध करु न शकल्यानं........
आज ती नोकरी करीत होती आणि तिला खावटीही मिळाली होती.चूक तिचीच होती.पण न्यायालयानं खावटी तिलाच दिली होती.पुरावे सादर केले नसल्यानं.शेती पिकत नव्हती.तरीही खावटी द्यावी लागतच होती.
खावटीची इच्छा उभ्या आयुष्यात पुर्ण करता करता उभी शेती पूर्णतः विकल्या गेली होती.पण आजही खावटी बंद झाली नव्हती.तिनं लपून चोरुन एक बायफ्रेंडही ठेवला होता.कारण तिच्याजवळ नोकरी आणि खावटीचा पैसा होता.पण गंगाधर काही जीवनभर इच्छा असूनही लग्न करु शकला नाही.कारण त्याचा पैसा त्यालाच खावटी देत असतांना तसेच शेतीच्या नापिकीनं पुरत नव्हता.शिवाय त्याच्या पत्नीचीही टांगती तलवार त्याच्या डोक्यावर त्या संविधानाच्या कलमांतर्गत होती.ज्या संविधानाच्या कलमांनी आज ब-याच गंगाधरांची जिंदगी बरबाद केली होती. आलेली संकटं कलीयुगात पत्नी जीवंत असतांना तसेच मृत्यूनंतरही कित्येक गंगाधरांना झेलावी लागत होती.चूक त्यांचीच असायची.पण आजही कित्येक गंगाधरलाच न्यायालयानं दोषी मानून खावटी लावून शेत्या विकायला लावल्या होत्या.तसेच विवाहही करु दिले नव्हते.कारण तसे पुरावे आज कित्येक गंगाधरकडे नव्हते.आज याच कारणानं कित्येक गंगाधर आत्महत्या करुन संपले होते.पण खावट्या संपल्या नव्हत्या व खावटी मिळते म्हणून प्रश्न संपले नव्हते.पतींना धमक्या देणेही संपले नव्हते नव्हे तर न्यायालयात अशा प्रकारचे खटलेही दाखल होणे संपले नव्हते.

८} माणुसकीची हत्या

बाहेर धो धो पाऊस सुरु होता.विजेचा गडगडाटही सुरु होता.त्याचबरोबर लख्ख प्रकाशही दिसत होता.
त्या धो धो पावसात सर्वजण आडोशाला लपले होते.कैरण सर्वांना भीती वाटत होती.गुरं ढोर,पशू पक्षी सारेच आडोशाला लपले होते.पण अशा या धो धो पडणा-या पावसात ती मात्र अजूनही भीजत होती.तिला पावसाचं भय वाटत नव्हतं ना विजेचं भय वाटत होतं.
कोण होती ती?ती का बरं पावसात उभी होती?का बरं तिला भय वाटत नव्हतं? सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.
सोनिया तिचं नाव होतं.तिलाही पाऊस झोंबत होता.परंतू आता तिला पावसाची भीती वाटत नव्हती.कारण ती वेडी झाली होती.परिस्थितीनं तिला वेडं बनवलं होतं.
तिला पावसाची भीती वाटत नव्हती.भीती वाटत होती ती माणसाची.कारण तिला कोणत्यातरी माणसानं वेड लावलं होतं.नव्हे तर घरातून हाकलून दिलं होतं.
सोनिया पाहायला सुंदर होती.लहानपणीच मायबापानं तिला जपलं होतं.भरपूर संस्कार तिच्यात कुटकूट भरले होते.त्याच संस्कारातून तिच्यामध्ये आदर्शाची पेरणी झाली होती.
सोनियाचा विवाह जुळला.अगदी थाटामाटात विवाह पार पडला व तिची घरी पाठवणी झाली.ती सुहागरात्र पार पडली.तसा सकाळी निरोप आला की तिच्या मायबापाचा रस्ता अपघातात अपघात झाला.दोघंही मृत्यू पावले.
अभागी ती.लग्न बोवारं लागलं.लग्न नुकतंच झालेलं आणि तिच्या माहेरी तिच्या मायबापाची लाश.मैयत कशीबशी निपटली आणि आता तिच्या सार्वभौम विचारावर गदा आली.
सासू सासरे तिला सासुरवास करीत असत.तिच्याकडून नानात-हेची कामं घेत असत.घरच्या कामासोबतच आता तर सासूसास-यानं तिच्याकडून देहविक्रीची कामं करुन घेण्यास सुरुवात केली.म्हणायला बोलायला कोणी नाही.ती असहाय्य आहे याचा फायदा घेवून सोनियावर सासूसासरे अशा प्रकारचा अत्याचार करु लागले.त्यातच त्यातून सासूसास-यांना पैसे मिळत व घर चालत असे.पतीही त्या गोष्टीचा विरोध न करता तिला बळ देत नव्हता.तर ती काही म्हणताच तिला मारत असे.
दररोजच्या अशा प्रकारच्या सासरच्या वागण्यानं सोनिया कंटाळली.तिला कसंतरी वाटायला लागलं व संधी साधून ती पोलिसस्टेशनला गेली.तिनं तक्रार नोंदवली.परंतू तिला तक्रार टाकून काही उपयोग झाला नाही.कारण पोलिसांनी त्यांना बोलावताच त्यांनी बयाणात सांगीतलं की विवाहाच्या दुस-याच दिवशी तिचे मायबाप मरण पावल्यानं तिच्या मेंदूत फरक पडलेला असून आम्ही तिला चांगले सांभाळून घेत असूनही ती आमच्याविरुद्ध अशी वागते.शेवटी नोंदविलेल्या तक्रारीवर पोलिसांनी त्यांना अटक न करता सोडून दिलं.परत सोनियाला घरी आणण्यात आलं.पुन्हा तेच ते अत्याचार दररोज तिच्यावर होवू लागले.आता तर तिच्यावर कडक पहारा बसवण्यात आला.
दररोजची कामाची रेलचेल व दररोजच पैसे कमविण्याच्या हव्यास्याने तिच्या सासूसास-यांच्या वागण्यानं व पतीच्या निगरगट्ट बसण्यानं तिच्या मानसिकतेवर जबरदस्त परीणाम झाला.ती वेडी झाली.
ती वेडी झाली होती.आता तिच्या शरीराचा उपभोग कोणाला घेताच येत नव्हता.कारण ती त्या वेडेपणात कोणाला काहीही मारुन देत असे.त्यामुळं कोणी आता तिच्या जवळ भटकत नव्हतं.शेवटी ती सासूसास-यांच्याही कामात पडत नव्हती.
सासूसास-यांना पैसे मिळत नव्हते.उलट ती वेडी झाल्यानं ती कामंही करु शकत नव्हती.त्यातच तिला निव्वळ खावू पिवू घालणं जिव्हारी येत होतं त्यामुळं तिचा आपल्याला उपयोग काय? सासूसासरे विचार करीत होते.अशातच त्यांनी तिला एकदिवस घरातून हाकलून दिलं.
सोनिया आज पावसात रस्त्यावर भिजत होती.तिला पावसाचं भय नव्हतं.भय होतं ते माणसाचं.माणसानंच तिच्यावर अत्याचार करुन माणुसकीची हत्या केली होती.तिचे मायबाप मरणं म्हणजे तिच्यासाठी धोकादायक ठरलं होतं.तिनं असा कोणता गुन्हा केला होता की तिला अशी शिक्षा मिळाली असावी हे कोणालाही कळत नव्हतं नव्हे तर ती वेडी का झाली असावी याचा विचारही कोणी करीत नव्हतं.

९} ममता

रात्रीचे बारा वाजले होते.रात्र फारच झाली होती.ममताला लेकराची आठवण येत होती.तिचं लेकरु तिच्याजवळ नव्हतं.त्यातच तिचं बाळ तिच्याजवळ नसल्यानं रात्रीला झोप येत नव्हती.तसं तिला जेवणही धकत नव्हतं.
ममता........ममताचा जीव जडला होता तिच्या बाळावर.तिला कसंही करुन बाळ हवं होतं.तसा तिचा विवाह थाटात झाला होता.परंतू सासू मात्र बरोबर निघाली नव्हती.
ममताचा नवनवीन संसार होता.तो फुलत चालला होता.अशातच आई वारली होती.त्यातच वडील एकाकी पडल्यानं ममता आपल्या वडीलांकडे दर आठ पंधरा दिवसानं येत असे.एक लहानसा भाऊ असल्यानं ममताला त्याचीही आठवण येत होती.
ममताचं सातत्यानं वडीलांकडे जाणं तिच्या सासूला खपत नव्हतं.पण ती तरी काय करणार होती?वडीलांनाही कोण होतं तिच्या.एक मुलगा.......तोही लहान.त्यातच ती गरोदर राहिली.
ममताचं वडालांकडे सातत्यानं जाणं.तसेच ते सासूला न खपणं कुठंतरी तिच्या संसाराला छेद देणारी घटना ठरली.जसा मुलगा झाला.तशी ममताला सबक शिकविण्याची योजना सासूच्या मनात आकार घेवू लागली.त्यातच ती नवनवीन योजना आखून ममताला त्रास देवू लागली.त्यातच रोजची भांडणं होवू लागली.
दररोजची होणारी सातत्यपुर्ण भांडणं.ममताला तिथं राहाणं नकोसं करु लागली.त्यातच ती भांडणं वडीलांनाही माहिती झाली.म्हातारा बाप चिंता व्यक्त करु लागला.त्यातच काय करावं तेही त्याला सुचत नव्हतं.शेवटी काय तर आता मुलीला कायमस्वरुपी आणणं हेच उद्दीष्ट त्यांच्यासमोर उरलं.
एक दिवस असंच भांडण होत असतांना ममतानं बापाला बोलावलं व ते भांडू लागले.त्यातच भांडण एवढं विकोपाला गेलं की वडीलांनी ममताला माहेरी परत आणली.कदाचित तिची सासू सुधारेल व झालेल्या चुकीची माफी मागून ती न्यायला येईल या उद्देशानं.पण त्यात त्यांची एक चूक झाली.ती म्हणजे त्यांनी बाळ हिसकावून ठेवल्यानं त्या बाळाला न आणता आपल्या मुलीला आणलं होतं निदान बाळासाठी तरी ते न्यायला येतील असं त्यांना वाटत होतं.
भरपूर दिवस झाले होते.सासूचा काही फोन नव्हता.ना पतीचाही फोन येत होता.ममता घायाळ होत होती एखाद्या हरीणीसारखी.एखाद्या म्हशीचं लहान रेडकू मेल्यावर जसं त्या म्हशीला वाटतं,तसं तिला वाटत होतं.ती वडीलांना नेवून द्या म्हणत होती.त्या घायाळ पशूपक्षांसारखी.पण वडील आपल्या बाळाला विसरुन जा म्हणत होते.त्यांनी फार अपमान केला आपला असेही म्हणत होते.
संसार तुटला होता.विवाह मोडला होता.तिच्या मनात बाळाची ममता असली तरी ममतेची हार होत चालली होती,नव्हे तर त्या ममतेपुढे वडीलांच्या भावनेचा बळी जात होता.ममताला काय करावे ते सुचत नव्हते.ती घायाळ हरीणीगत तळपत होती आपल्या बाळाची आस करुन.आपला बाळ आज भेटेल,उद्या भेटेल याच आशेने.पण तो दिवस उजळत नव्हता.कारण सासू आणि बापाच्या महत्वाकाक्षेनं ममताच्या ममतेची हत्या झाली होती.

१०} खरं प्रेम

वारांगणा.........वारांगणा ही खरी विरांगणाच असते.पण आम्ही फक्त तिचा उपभोग घेत असतो.आपल्या कामवासना जबरदस्तीने पुर्ण करीत असतो.तिची इच्छा नसतांनाही.हे आमचं बरोबर नसतं.तरीही आम्ही तिच्या भावभावना.इच्छा आकांक्षा समजून न घेता तिच्यावर शारिरीक वार करीत असतो नव्हे तर बलत्कारच.
मेघना अशीच वारांगणा.अंत्यपुरात ती आपल्या देहाचा व्यापार करीत होती.नव्हे तर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपला देह विकत होती.पण यातून ती माणसाला बिघडवीत आहे असा हेतू नव्हता तिचा.
श्याम असाच एक गृहस्थ.वारांगणेच्या पेशावर प्रेम करणारा.त्यांच्या शरीरावर त्याचं प्रेम नव्हतं.तो कधीच या वेश्यावस्तीत गेला नव्हता.तरीही त्याला वेश्यांबद्दल आत्मीयता वाटत होती.तसं पाहता श्यामला लेखन करण्याचा ध्यास असल्यानं त्याला त्या वारांगणेबद्दल लिहावसं वाटायचं.
आज त्यांचं याच वारांगणेच्या वस्तीजवळ प्रशिक्षण लागलं होतं.दुपारची सुटी झाली होती.तसं मित्रांनी म्हटलं,
"श्याम,चल आपण वारांगणेची वस्ती पाहून येवू."
"हट्,मी नाही येणार.तिथं वारांगणा जबरदस्तीनं आत खिचतात म्हणे आणि पैसेही लुटतात असं मी ऐकलंय."
"अरे,तसं गिसं काही नाही.तू चल तर.आम्ही आहो ना."
वेश्येबद्दलचं आकर्षण.त्यांना पाहण्याची लालसा.शिवाय जी भीती होती,ती भीती मित्रांनी कमी केल्याने श्याम वारांगणेच्या वस्तीत जायला तयार झाला.मग सर्व मित्र दात काढत,दंगामस्ती करीत करीत त्या वारांगणेच्या वस्तीत फेरफटका मारु लागले.सर्व वेश्या घराच्या बाहेर बसल्या होत्या.काहीजण उभ्या होत्या.त्यातच त्या पाहात होत्या.श्याम आणि त्याच्या मित्रांकडे.जे चेंगळ करीत करीत वेश्यांची टिंगल उडवीत त्या गल्लीतून चालले होते.लागलीच यांना धडा शिकवायला हवा याचा निर्धार करुन त्यामधील दोन तरुण मुलींनी दोघांना पकडलं.त्यात एका मुलीनं एका मित्राचा हात पकडला.तर दुसरीनं श्यामची शर्टची कॉलर.बस मित्राने हाताला झटका मारला व सर्व मित्र तेथून धुम पळाले.मात्र शर्टाची कॉलर पकडलेल्या श्यामची त्या वेश्येच्या कैदेतून सुटका झाली नसल्यानं त्या वेश्येनं त्याला आपल्या कम-यात नेलं.कम-याला आतमधून कुलूप लावला.किल्ली आपल्या गादीच्या खाली लपवली.तशी ती म्हणाली,
"पैसे निकाल."
"श्याम अवाक् होवून पाहू लागला.तोच त्या वारांगणेचा पुन्हा तोच प्रश्न श्यामचं काळीज चिरुन गेला.
"ऐ,सुनी नही क्या?क्या बोल रही हूँ मै।पैसे निकाल बोली ना।"
पुन्हा श्याम तटस्थ उभा.पुन्हा प्रश्न.
"भडवे,गुंगा है क्या?सुनाई नही आता क्या?क्या मारु एक झापड?पैसे निकाल बोली ना मै।"
"कसले पैसे?मी फक्त फिरायला आलो.पण तूच आणलं ना मला आत जबरदस्तीनं."
"यहाँ पर क्या कोई घुमने को आता है!बात करता है।चल चल जल्दी पैसे निकाल।मुझे टाईमपास नही करनी है।मुझे दुसरा गि-हाईक ढुँढना है।चलो देर हो रही है।"
श्याम पुन्हा गप्प झाला.तशी तिनं त्याला एक झापड मारली.त्याचे खिसे तपासले व असलेले सर्व पैसे घेवून ती मोकळी झाली.तशी ती म्हणाली,
"चल निकल बाहर.जल्दी निकल।नही तो कोई आ जायेगा और तुझे पीटकर जायेगा।मै कुछ नही बोलूँगी।चल निकल."
"देख मेरे पैसे दे।मै तुझे तकलीफ नही देना चाहता।ना ही मुझे तेरी चाहत है।"
"तो फिर इधर क्यो आया?"
"सुनना चाहती हो।"
"हाँ सुना।"
तो सांगू लागला.आपला उद्देश बयाण करु लागला.तिच्या तो उद्देश लक्षात येत होता.त्याची सामाजीक बांधीलकी,त्याची स्वाधीनता तिला ओढत होती.तसं तिला वाटत होतं की मला जन्मोजन्मी हाच पती मिळायला हवा होता.पण मी वेश्या बनले.आता मला दररोज पती मिळतात.तेही वासनाच घेवून येणारे.एकतरी आतापर्यंत श्यामसारखा आला नाही.ज्याने शारिरीक संबंधाची आस न धरता केवळ आम्हा वेश्यांना समजून घेण्यासाठी इथं आला.एवढंच नाही तर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.खरंच मी नालायक आहे की त्याला आधी समजून न घेता त्याला मारलं.त्याला शिव्या दिल्या.तो तर आपल्या सारख्या बिरादरीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे.
सर्व कहाणी श्यामनं कथन केली होती.मेघनालाही ती गोष्ट पटली होती.तशी ती म्हणाली,
"श्यामजी,मला माफ करा.मी विनाकारण तुमच्यावर शंका घेतली.तुम्हाला जर आमच्याबद्दल आत्मीयताच आहे तर तुम्ही खुशाल येत जा इथे न घाबरता.कोणी काही म्हटलंच तर माझं नाव सांगत चला.कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही.
श्यामला मेघनाने त्याचे घेतलेले सर्व पैसे परत केले व त्याला बंधमुक्त केले.तोही त्या दिवसापासून तिला भेटायला जावू लागला.तिच्या भावभावना समजून घेवू लागला.तिच्यावर निर्भीडपणानं लेखन करु लागला नव्हे तर तिच्या बिरादरीतील कित्येक मुलींवर होणा-या अन्यायावर वाचा फोडू लागला.पण समाज झोपलेला होता.तो समाज त्याचं काही ऐकत नव्हता.नव्हे तर त्यालाच दोषी मानून त्याच्यावर हसत होता निर्ढावल्यागत.शासनही ऐकत नव्हतं.नेतेही ऐकत नव्हते. नव्हते ऐकत शिकलेलेही.कारण ते आपल्या पत्नीला धोके देत याच वेश्येच्या बाहुपाशाचे गुलाम झाले होते.जर का त्या वेश्या वेश्येपणाच्या धंद्यातून मोकळ्या झाल्या असत्या आणि त्यांनी आपला धंदा बंद केला असता तर कदाचित याच भडव्यांवर आत्महत्येची पाळी आली असती.वासना पुर्ण न झाल्याने.
श्यामचं मेघनावरच नाही तर पुर्ण मेघनाच्या बिरादरीवर प्रेम होतं.पण मेघनाचं श्यामवर खरं प्रेम होतं.पण त्याचेपेक्षाही जास्त आणि खरं प्रेम तिचं आपल्या धंद्यावर होतं.जो धंदा तिच्या पोटाचा आधारस्तंभ आणि दीपस्तंभ बनला होता.तिला पोषत होता.समाजात स्वाभिमानी पणाची छाप ठेवायला बाध्य करीत होता.काळाच्या या ओघात श्यामनं तिला पत्नीही बनविण्याची इच्छा बोलून दाखवली.पण ती तयार नव्हती.कारण तिला श्यामला बिघडवायचे नव्हते.तर त्याला पुर्वीचाच खरा माणूस म्हणून जगवायचे होते.ती या पत्नीविषयावर भांडणही करायची श्यामसोबत.कारण श्यामवर तिचं खरं प्रेम होतं.जे खरं प्रेम त्या धंद्यापुढे कुचकामी होतं.जे खरं प्रेम कधीच मिटणार नव्हतं.ती बिरादरी संपली तरीही.......कारण त्यांच्या जीवनात मित्रांपेक्षा धंद्याला जास्त किंमत होती.
श्याम विचार करायचा कधीकधी तिचा.......तिच्या बिरादरीचा..... त्या वीरांगणा आहेत नवयुगाच्या.कारण पुर्वीच्या काळी सैनिक जेव्हा मरत.तेव्हा त्या सैनिकांच्या पत्नी आपली हौस पुर्ण करण्यासाठी जनानखाण्यात जात.नव्हे तर काही स्रीया ह्या सैनिकांनी जोमानं लढलं पाहिजे म्हणून त्या सैनिकांना आपला देह सोपवत.पण आता ती पद्धत अस्तित्वात नसूनही या वेश्या देहव्यवसाय करतात.सैनिकांच्या सुखासाठी नाही तर माणसाचे माणूसपण हरवलेल्या लोकांसाठी.ज्या लोकांना त्यांच्या भावभावनेचं काही देणं घेणं नाही.तर त्यांना केवळं पैशानं त्रास देत असतात.काय मिळतं यांना हा तुटपुंजा पैसा कमवून.म्हातारपणात तर एड्ससारख्या महाभयंकर आजाराच्या शिकार होतात या वेश्या.एवढेच नाही तर कधीकधी तो त्रास सहन न झाल्यानं जेव्हा विषाचे इंजेक्शन घेवून मरतात या वेश्या.तेव्हा त्यांच्या मदतीला देवही धावून येत नाही.कारण त्याच ख-या वीरांगणा असतात सर्व संकटांशी लढणा-या.........


११} निराशा

रोहन एक चांगल्या व्यक्तीमत्वाचा मुलगा.फारच कष्ट करायचा तो.त्याला पाहून लोकंही त्याचं उदाहरण आपल्या मुलांना देत.म्हणत असत,"तो रोहन बघा,किती काम करतोय."
त्याला आई होती.तिही कष्टीक होती.पण आता म्हातारपण होतं.आता म्हातारपणात तिला कष्ट पाहिजे तेवढं करणं जमत नव्हतं.नव्हे तर ती सारखी आजारीही राहात असे.कारण तिनं जे तरुणपणात कष्ट केले होते.त्या अतीव कष्टामुळं ती आजारी राहात होती.
रोहनचं आईवर खुप प्रेम होतं.आईवरची माया त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.आई आजारी पडताच तो विचलीत होत होता.कारण ती आज आजारी जरी राहात असली तरी ती आजही त्याच्या कामाची होती.
अशातच रोहनचा विवाह झाला.त्याला पुर्वी फक्त आई होती.आता मात्र त्यात भर पडून पत्नीची जबाबदारी वाढली होती.त्याला मिळालेली पत्नी ही नोकरी करणारी होती.
नवीन पत्नी,तिही नोकरी करणारी.त्याला पत्नीची पाहिजे तेवढी चिंता नव्हती.पण पत्नी नोकरी करणारी असल्यानं ती काही रोहनचं ऐकत नव्हती.नव्हे तर तिला ग्लासभर पाणीही देत नव्हती.त्यातच त्याचं कधीकधी पत्नीसोबत भांडण होत असे.मग भांडणात सा-याच गोष्टी.त्यातच तो परेशान होत असे आणि मनात त्याच्या निराशेचं वादळ तयार होत असे.
रोहनला सुचत नव्हतं की काय आणि कसं करावं.एरवी त्याच्या आईनं त्याला मोठं करतांना खुप कष्ट उपसले होते.स्वतः मात्र उपास भोगला होता.पण लेकराला घास भरवला होता.
बाप मात्र लहानपणीच मरुन गेला होता.तेव्हा आईनं स्वतः च्या आधारासाठी दुसरा विवाह न करता स्वतःच्या तरुणपणाचा त्याग केला होता.नव्हे तर काही माणसं त्या काळात तिच्या जवानीवर डोळे टाकत.पण कोणाच्याही नजरेला दाद न देता ती अबला जगत होती रोहनसाठी आणि रोहनला जगवतही होती.याच काळात ती नजरेला दाद देत नाही म्हणून काही लोकं तिला कामावर येवू देत नसत.त्यांना वाटायचं की जर उपासमार झाली तर ही आई आपल्या नजरेला नजर भिडविण्यास तयार होईल.मग आपण हिचे एखाद्या हरिणीगत लचके तोडू.पण ते त्यांना शक्य झालं नाही.कारण काही मंडळी निश्चीतच चांगल्या स्वभावाची होती.जेव्हा थोडंसं म्हातारपण आलं,तेव्हा तिच्यानं काम जमेना.त्या काळात रोहन महाविद्यालयात होता.त्याच काळात लोकं आईला कामावर येवू देईना,पण आई जबरदस्तीनं लोकांच्या मागं लागून कामावर जायची नव्हे तर त्या कामातून पैसा कमवून रोहनला शिकवायची.अशातच आज रोहन उच्चविद्याविभुषीत झाला होता.त्याला सरकारी नोकरीही लागली होती.
रोहन आईची सेवा नित्यनेमानं करीत आहे.तिचं दुखलं खुपलं सांभाळत आहे.हे त्याच्या पत्नीनं पाहिलं.असंच जर सुरु राहिलं तर हा रोहन आईचाच बनून राहील हेही तिला वाटलं.तो आपला व्हावा.आपल्या बोटाच्या इशा-यावर चालावा असं रोहनच्या पत्नीला वाटत होतं.त्यामुळं ती सारखी भांडत होती.तिला लयच त्रास देत होती.अशातच चिंकीला दिवस गेलेत.
चिंकी रोहनच्या पत्नीचं नाव.रोहनला चांगली पगाराची नोकरी लागल्यानं चिंकीच्या आईवडीलानं रोहनसाठी आपल्या लेकीला दिलं.शिवाय रोहनला कोणते शौकंही नव्हते.तसेच तो विचारानंही साधा भोळा होता.शिवाय त्याला एक आई असून रोहनच्या परीवारात कोणी आपलं म्हणणारं कोणीच नसल्यानं चिंकीच्या आईवडीलांनी चिंकीला त्याचेसाठी देवू केलं. चिंकीला आई आवडायची नाही.त्यातच ती आता फक्त नोकरी करु लागली.सगळं काम आईच करायची.तरीही ती घरी येताच चिंकी काही ना काही कारणावरुन भांडण करु लागली.
गरोदर असलेली चिंकी........त्यातच आईचं आजारपण........रोहन जास्त परेशान होता.त्याचबरोबर तो निराशही.पण तो आईला अद्याप सोडू शकत नव्हता.कारण आईचे उपकार त्याला आठवत होते.
गरोदर चिंकी..........आता चिंकीचं बाळंतपण झालं होतं.तिला मुलगा झाला होता.चिंकीनं सुट्ट्या घेतल्या होत्या.पण जेव्हा सुट्ट्या संपल्या.चिंकी नोकरीवर जायला लागली,तेव्हा संपुर्ण बाळाची काळजी आणि घरकाम आईच सांभाळून घेत असे.पण तरीही चिंकीला सासूची काहीही कदर नव्हती.
आज रोहनचा मुलगा थोडा मोठा झाला होता.त्याला आजीची फारशी गरज नव्हती.नव्हे तर आज आईची तब्येत जास्त बिघडायला लागली होती.त्यामुळं रोहनला फारच त्रास व्हायला लागला होता.
रोहनला होत असलेला त्रास,त्यातच सासूचं खोकलणं अगदी वैतागून गेली होती चिंकी.तिला त्याच्या आईनं कोणते कष्ट उपसले होते त्याचेसाठी याची काही एक कल्पना नव्हती.असेलही कदाचित,पण ती ते कष्ट जाणत नव्हती.त्यातच आता तिनं घाट घातला होता की रोहननं आईलाच घरी ठेवावं नाहीतर मला.जर तो आईला ठेवत असेल तर ती त्याला सोडून व मुलाला घेऊन माहेरी जावून राहील.नाहीतर आईला ठेवू नये.तिला वृद्धाश्रमात ठेवावे.
आईला कुठे ठेवायचे याबद्दलही चिंकीनं सांगून टाकलं होतं.आपणही कुठे जाणार हेही सांगून टाकलं होतं.आजचं भांडण त्याच शब्दावर रंगात आलं होतं.आजचाच दिवस शेवटचा होता त्यांचेसाठी.
चिंकीनं त्या शब्दावर केलेलं भांडण आईनं लपून चोरुन ऐकलं होतं.तशी ती रोजच्या भांडणाला किटकिटली होती.रोजचं भांडण आईवरुनच होत असे.ते ऐकून आई तंग झाली होती.शिवाय उद्या आईच राहील नाही तर मी.हेही चिंकीचे शब्द आईनं ऐकले होते.
आई विचार करीत होती.आपण आपल्या लेकराच्या जीवनातील काटे आहोत.एकतर आपण सतत आजारी असतो आणि दुसरीकडे आपण काही आपल्या लेकराच्या कामाचेही नाही.आपली गरज संपली आहे.उद्या जर आपल्या पोरानं आपल्याला वृद्धाश्रमात टाकलंच तर आपलं सारंच संपेल.यापेक्षा आपण मरण पत्करलेलं बरं.
अर्धी रात्र उलटली होती.सर्वजण झोपी गेले होते.ती रात्र आईसाठी काळरात्र ठरली होती.ती मरणाचाच विचार करीत होती.उद्याची वाट पाहावी असं तिला वाटत नव्हतं.तिला वाटत होतं आपण मरावं.तशीही आजारपणानं तंग झाली होती.
आज आत्महत्या करायची आहे याचा संपुर्ण विचार तिनं केला होता.तसं तिनं त्यासाठी लागणारे साधन आज झोपण्यापुर्वीच कोणाला लक्षात न येवू देता गोळा केले होते.तसा तिनं सर्व झोपले असल्याचा अंदाज घेतला.नव्हे तर त्या भयाण रात्री तिनं आपल्या गळ्याला फाश लावत आपली प्राणज्योत मालवून घेतली.
आई मरण पावली होती.पण रोहनला काहीच कल्पना नव्हती.ना ती कल्पना चिंकीलाही होती.तो उद्याची वाट पाहात बसला होता.उद्याला नाईलाजास्तव संसार टिकविण्यासाठी आईला वृद्धाश्रमात ठेवायची स्वप्न पाहात होता.नव्हे तर तोच एक विचार त्याच्या मनात होता.त्याच्या डोळ्यात अश्रू होते.पण ते अश्रू मृगजळासारखे गिळून तो अगदी स्तब्ध होता.जर का पत्नीला हुसकावून लावलं तर तिच्यासोबत मुलगाही जाईल.सारा संसार उध्वस्त होईल असे त्याला वाटत होते.आई केव्हापर्यंत जगणार.त्यापरस आईलाच वृद्धाश्रमात टाकलेलं बरं असं त्याला वाटत होतं.
सकाळ झाली होती.रोहन झोपेतून उठला होता.चिंकीही उठली होती.पण आई अद्याप उठली नव्हती.दररोज सकाळीच उठणारी आई........आज आईच्या कम-यातून साधा आवाजही येत नव्हता.त्यामुळं काय झालं असेल याचा विचार करुन त्यानं आईला आवाज दिला.
"आई$ आई$$"
कमरा आतून बंद होता.खिडकीही लावलेली होती.तसा त्यानं दरवाजा ठोकला आणि जोरात म्हटलं,
"आई$,दार उघड."
दार उघडायला आई जीवंत नव्हती.तसा तो घाबरला.त्याला अद्यापही माहीत नव्हतं आई मरण पावलेली आहे की जीवंत आहे.तोच त्याने खिडकीच्या फटीतून पाहिलं तर पाहतो काय, आई चक्क फासावर लटकलेली होती.
रोहनची काही वेळ शुद्ध हरपली होती.त्याचा पाय जमीनीवर स्थिरावत नव्हता.पण जे सत्य होतं ते तर स्विकारणं भाग होतं.तसं चिंकीनं विचारलं,
"काय झालं?"
रोहन खाली बसला होता.तशी चिंकी त्या खिडकीतून पाहू लागली.तोच तिही अवाक् झाली.हा काल झालेल्या भांडणाचाच परीणाम होता की आज आई फासावर लटकली होती.
चिंकी पुरती घाबरली होती.पण धीर धरुन तिनं घरातून पाणी आणलं.तसं ते पाणी रोहनच्या चेह-यावर शिंपडलं.तसा रोेहन होशात आला.
दोघांनी मिळून आईला फासावरुन बाहेर काढलं.पोलिस तक्रारीपासून स्वतःला वाचवलं.तसा रोहन रडू लागला.त्याला सगळं आठवत होतं.
आईचा अंत्यविधी पार पडला.तसा रोहन गप्प झाला.तो दररोज हताश राहायचा.नैराश्येनं त्याच्या जीवनात प्रवेश केला होता.पत्नी चिंकी सोबत होती.पण तो आज खुश नव्हता.कारण ज्या आईनं त्याला लहानाचं मोठं केलं होतं.ती त्या भांडणामुळं केव्हाच दूर गेली होती.
दररोजचं नैराश्य........रोहनला जगू देत नव्हतं.सततचा नकाराचा विचार त्याच्याही मनात आत्महत्येची भावना जागृत करीत होता.त्याला मुलगा होता.पण तोही नकोसा वाटत होता.चिंकीही त्याला दूरचीच वाटत होती.अशातच एक दिवस तोही नदीत उडी टाकून मरण पावला.
सगळं संपलं होतं.चिंकीला जे पाहिजे होतं त्यापरस तिनं जास्त गमावलं होतं.पतीचं दुःख तिला आता छळत होतं.कळत होतं की जे मिळालं होतं ते महाभयंकर कोणत्यातरी हानीला जन्म देणार होतं.आई वृद्धाश्रमाऐवजी देवाघरी गेली होती.पतीही देवाघरी गेला होता.
आज चिंकी पश्चाताप करीत होती.सासू चांगली असली तरी तिला सासूचा त्रास वाटत होता.पण सासू देवाघरी गेल्यावर तिला जीवनभर त्रास सहन करावा लागला.त्यातच ती जेव्हा म्हातारी झाली.तेव्हा तिच्याही मुलाचं लग्न झालं होतं आणि तिच्याही सुनेनं तिला वृद्धाश्रमात टाकलं होतं.
आज चिंकी वृध्दाश्रमात होती.मुलगा व सुनही भटकत नव्हते.तसा तिला तिच्या केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप येत होता.तिनं तर फक्त सासूला वृध्दाश्रमात टाकण्याचा विचार केला होता.त्याआधी सासू देवाघरी निघून गेली होती.पण तिला तर प्रत्यक्ष तिच्या सुनेनं वृध्दाश्रमात टाकलं होतं.जिथे वेदना तर होत्या.पण मरणही येत नव्हतं.मरताही येणार नव्हतं.ती देवाला प्रार्थना करीत होती,
'देवा मला घेवून जा.पण देवही तिला आपल्याजवळ बोलवत नव्हतं.' जे काही आता तिच्या जीवनात घडत होतं.ते तिनं आपल्या सासुच्या अंधूक नजरेसमोर आपल्या पतीशी केलेल्या भांडणाचा परीपाक होता.

१२} दुरावा

अमीत आपल्या घरात एकटा बसला होता.त्याच्यासोबत त्याची पत्नीही बसली होती.त्या दोघात थोडं भांडण झालं होतं.भांडणाचं कारण शुल्लक होतं.पती मैत्रीणीशी बोलला.
अमीतला एक मैत्रीण होती.शारजा नाव होतं तिचं.ती अमीतशी बोलायची.चांगल्या विषयावर चर्चा करायची.त्याला तिचा मेसेज वा फोन आलाच तर अगदी मनापासून बरं वाटायचं.तिलाही बरं वाटायचं त्याचा फोन वा मेसेज येताच.त्याला काही जगण्याचं सुत्र मिळायचं.
अमीतची पत्नी संशयी वृत्तीची होती.ती अमीतवर शंका करायची.तिला वाटायचं की कदाचित तिचा पती शारजाशी बोलता बोलता आपल्यापासून दूर गेला तर......ती त्याच गोष्टीला भीत होती.कारण तसे भरपूर प्रकरणही घडलेले होते.
अमीत आणि शारजा हे फक्त मित्र होते.त्यांचं बोलणं रास्त होतं.मैत्रीच्या पलिकडचं नातं नव्हतं त्यांच्यात.कधीतरी तिला पाहावं जवळून असं अमीतला वाटायचं.पण पाहणार कसा?ती तर सातासमुद्रापलिकडे होती.जिथे तो पोहोचू शकत नव्हता.फक्त ते फोनच्या माध्यमातूनच भेटत असत.
शारजा गरीब होती.पैशानं आणि स्वभावानंही.तिच्या मनात कपटी भावना नव्हती.ना ही कोणाबद्दल डावपेच होते.पण अमीतच्या पत्नीला तिच्या डावपेचाची कल्पना होती.एक दिवस हा अमीत तिच्याचमुळं दुराव्यात राहिल असं तिला वाटायचं.ती त्याला तिच्याशी मेसेजवर बोलण्यास वा फोन करण्यास मनाई करायची.
अमीत व शारजाची ओळख फेसबुकवर झाली होती.त्याचा बायोडाटा पाहून तो तिला आवडला होता.मग तिनं मैत्रीची त्याला विनंती पाठवली होती.मग काय अमीतनेही तिचा फेसबुक अकाऊंट तपासला व त्याने तिच्या मैत्रीचा स्विकार केला.मग काय दोघंही मेसेंजरवर आपापसात बोलू लागले.सुरुवातीला ते लपुन चोरुन बोलायचे.पण आता ते बिनधास्त बोलू लागले.मग शंका तर येणारच पत्नीला.एक महिला दुस-या महिलेला मनानं स्विकारु शकत नाही.तसंच अमीतची पत्नी शिलाच्याही मनात झालं.
शिलाचा पती चांगला आहे.हे त्या शिलालाही माहीत होतं.त्यामुळं शिला त्याला अगदी नक्षत्रासारखी जपत होती.अमीतचंही आपल्या पत्नीवरच प्रेम होतं.पण एक विरंगुळा म्हणून तो बोलत होता शारजाशी.पण आता मात्र हद्द झाली होती.
अमीत आपल्या पत्नीप्रती कर्तव्यनिष्ठ जरी असला तरी शारजामुळं त्याच्या घरात होत असलेला कलह त्याला आवडत नव्हता.त्याला वाटत होतं की त्यांच्यात जर असं काही नाही आहे तर शिलानं गप्प राहावं.पण शिलाचं म्हणणं होतं की जर का त्यांच्यात असं काही नाही आहे तर अमीत शारजाशी बोलतो कशाला?त्यानं तिच्याशी बोलणं बंद करावं.
पण तो बोलणं बंद करणार कसा?चांगले संबंध शारजाशी जुळलेले होते.मनही त्यांचे रुळलेले होते.तो तिच्याशी दुरावा निर्माण करु शकत नव्हता आणि शिलालाही सोडू शकत नव्हता.याच गोष्टीसाठी तो भांडणं करायचा.तो आपल्या पत्नीला समजावून सांगायचा की त्यांच्यात असं काहीच नाही.ती उगाच शंका घेते.पण तिच्या मनात गैरसमजच होता.शेवटी त्यांचं एकमेकांशी पटेनासं झालं.ती त्याच नादातून त्याच्यापासून दूर जाऊ लागली होती.ती स्वतःच दुरावा निर्माण करीत चालली होती.
आजचं भांडण.......ती म्हणत होती की ती आज माहेरी जाणार.आजपासून ती परत येणार नाही.त्यानं आपलं पाहावं.ती आपलं पाहणार.आजपासून कोणी कोणावर अवलंबून राहणार नाही.
म्हटल्याप्रमाणे ती त्याला सोडून माहेरी राहायला लागली.संसार विस्कटला होता त्यांचा एका शुल्लक कारणाने.तिही मागे हटायला तयार नव्हती.तोही एक पाऊल मागे हटायला तयार नव्हता.त्याला वाटत होतं,त्याचं काहीच चुकत नाही.तिलाही वाटत होतं तिचं काही चुकत नाही.
आज तो एकटा राहात होता.मनोरंजन म्हणून आजही तो शारदाशी बोलत होता.त्याच आपुलकीने.त्यानं बरेच वेळा त्याच्या जवळ येण्याची तिला अॉफर दिली.शिवाय विवाहाबद्दलही विचारले.पण ती त्याच्यासोबत राहायला तयार नव्हती वा विवाह करायलाही तयार झाली नाही.ती चांगली मैत्रीण होती.पण निव्वळ एका शंकेनं वा नमतं न घेतल्यानं अमीत व शिलात दुरावा निर्माण झाला होता.ज्या समस्येवर काहीच उपाय नव्हता.
काही मंडळी निश्चितच शिलाला समजावीत होते.काही अमीतलाही.पण ते स्वतःची चूक कबूल करायला तयार नव्हते.अमीतही तिला न्यायला जायला तयार नव्हता.
आज म्हातारपण आलं होतं.त्याला आता शिला हवीहवीशी वाटत होती.तिला आणावेसे वाटत होते.कारण अमीतची ती मैत्रीण दुस-याशी विवाह करुन केव्हाच त्याच्या जीवनातून गेली होती.विवाह होताच तिनं काही दिवसानं अमीतशी बोलणं बंद केलं होतं.परंतू तिच्याचमुळं आज जो दुरावा शिला आणि अमीतमध्ये निर्माण झाला होता.त्या दुराव्याला सुधारायला ती जबाबदार असूनही ती धावली नाही.
आयुष्याच्या वळणावर पती पत्नीला मदत करतो.पती पत्नीला.आज अमीतला आपली चूक गवसली होती.त्याची ती चूकच होती.त्यानं आपला संसार तुटू दिला होता.पण आपल्या मैत्रीणीशी बोलणं बंद केलं नव्हतं.त्याचाच परीणाम त्यांच्या संसारावर झाला होता.तरीही तो सुधरायला तयार नव्हता.कारण ते तरुणपण होतं.पण आता म्हातारपणात तो सुधारला होता.पण वेळ निघून गेली होती.
शिला अमीतजवळ यायला तयार नव्हती.कारण तिनं ज्या मुलीला त्याचेपासून दूर जावून शिकवलं होतं.ती मुलगीच आता शिलाला पोसत होती.त्यामुळं ती कोणावर अवलंबून नव्हती.पण अमीत आज म्हातारपणात आधार शोधत होता.जो आधार आज कोणीच द्यायला तयार नव्हता.

१३} आयुष्य

मधू आपल्या घरी झुल्यावर बसून झोके घेत होता.प्रत्येक झोक्यागणिक त्याच्या मनात विचार होता की मी एवढं सगळं केलं,पण मला काहीच फायदा झालेला नाही.तसा नुकताच तो लकव्यातून सुधारला होता आणि आता आरामात घरातल्या झोक्यावर झोके घेत होता.
मधू हा स्वार्थी स्वभावाचा नव्हता.तो एक स्वयंसेवी स्वभावाचा होता.त्याला कुणाचीही लवकर दया येत असे.परंतू तो ज्याला ज्याला मदत करीत असे,तो तो बेईमानच निघत असे.
अब्दूल असाच एक त्याचा मित्र होता.तो गरीब होता.त्याच्या घरी उपासमार सुरु होती.त्याची मुलं फाटकेतुटके कपडे घालून जगत होती.नव्हे तर लोकांना त्या मुलांची दया येत होती.तसा एक दिवस अब्दूल मधूला म्हणाला,
"मित्रा,मला मदत करशील का?मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही."
म्हणण्याचा अवकाश.मधू मदतीला धावला अब्दूलच्या.त्याने भेदभाव बाळगला नाही.वा मदत करतांना धर्म आड आणला नाही.माणसाचे आयुष्य हे असेच एक फुल आहे.जे कळी सारखे फुलते व नंतर कोमेजून जाते.कुणास ठाऊक हे आयुष्य असेच का असते.माणसाने फुलासारखे रहावे,काटयासारखे कधीच न व्हावे.कारण फुले सुगंध देतात व काटे पायाखाली तूडवले जातात.
अब्दूलच्याही जीवनाचं तसंच झालं.अब्दूल मुस्लीम होता.तर मधू हिंदू होता.आज मदत करतांना मधूनं हिंदू मुस्लीम भाव मनात आणला नव्हता.त्याच्या मुलांना कपडे तर दिले होते नव्हे तर त्याने आपला मित्र आपल्या पायावर उभा राहावा म्हणून त्याला सर्वतोपरी मदत केली होती.त्याला पैसे दिले होते.
मिळालेल्या पैशातून अब्दूलनं दुकान सुरु केलं होतं.आज त्याच दुकानाच्या भरवशावर अब्दूल ब-यापैकी जमला होता.त्याला आता पैशाची कमी नव्हती.एवढेच नव्हे तर तो मधू परसही श्रीमंत बनला होता.त्याने आता ती झोपडपट्टी सोडून चांगल्या ठिकाणी मोठं घर बांधलं होतं.मधू मात्र आज गरीब बनला होता.
अब्दूल श्रीमंत बनला खरा.पण तो काही चांगल्या स्वभावाचा नव्हता.तर तो अतिशय वाईट स्वभावाचा असून स्वार्थी व मतलबी होता.त्याचे डावपेच मधूला समजत नव्हते.आज त्याचे घरी नोकरचाकर सारे काही होते.पण मधूप्रती प्रेमभावना आजही त्याच्या डोळ्यात झळकत होती.
मधूची मुलं मोठी झाली होती.ती मधूची सेवा करीत नव्हती.आता मधूच्या खुप हालअपेष्टा सुरु होत्या.त्याला पोटभर जेवन मिळत नव्हतं.तसेच थंडीच्या दिवसांतही त्याला कपडे वा पांघरायला गोधडी मिळत नव्हती.तो मरण मागायचा देवाला.पण देव मरण देईल तेव्हा ना.आयुष्य हे खुप सुंदर होतं.पण ते जगतांना जर सर्वत्र दुःखच पसरलं असेल तर.........तर मात्र त्या आयुष्याचा तिटकारा वाटत असतो.अब्दूलचं जीवन मुधूमुळं सुखकर झालं होतं.पण मधूचं जीवन आज दुःखमय होतं.
अब्दूल रोजच मधूला आठवत होता.त्याच्या होणा-या गती त्याला माहीत नव्हत्या.तो आपला संसार पाहात होता.मधूवरचा होणारा अत्याचार त्याला दिसत नव्हता.तो मधूच्या आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहात होता.पण तो अत्याचार,तोच फक्त पाहू शकत नव्हता.दूरही करु शकत नव्हता.याचं कारण होतं त्याची मुलं आणि त्याचं दूर असणं.......समजा अब्दूलला माहीत झालं असतं तरी अब्दूल त्याला आणू शकला नसता.अब्दूलला वाटलं असतं की जर का त्याच्या वडीलांना पोषतो म्हटलं तर मुलांना राग येईल व ते बापाची कस्टडी त्याला देणार नाहीत.
दिवसेंदिवस मधुचं आयुष्य वाढत चाललेलं.पण त्याचबरोबर त्याच्या अत्याचारात वाढ होत असलेली निदर्शनास येत होती.कोणाचंही मन विचलीत होईल असं ते आयुष्य.........जो माणूस जन्म घेतो,तो माणूस केव्हातरी मरणारच असतो.पण मरतांना एवढ्या असहाय्य वेदना.म्हातारपण शाप की वरदान.सारंच कसं मनाला न पटणारं.खरंच ज्या म्हातारपणात सरकारची मदत हवी.त्या म्हातारपणात सरकारची मदत न मिळणं,ज्या म्हातारपणात जास्त पैसा हवा स्वतःचा जीव पालविण्यासाठी........त्याच म्हातारपणात जवळ पुरेसा पैसा नसणं.ही न शोभणारी गोष्ट होती.अशातच मधुची प्रकृती बिघडली.त्याला पक्षाघात मारला.पक्षाघात........मधू बिस्त-याला खिळला.आता तर मोठी पंचाईत झाली होती.
सर्वांना वृद्धापकाळाच्या पेन्शन होत्या.पण मधूला तेही मिळत नव्हती.कदाचित त्यासाठी काय करावे लागते हे त्याला माहीत होतं,नव्हे तर त्याच्या मुलांनीही ते केलं नव्हतं.आता मात्र मधूची पुरती आफत.त्याच्याजवळ कोणी जायला तयार नव्हता.त्याला कोणी चारायला तयार नव्हता.तो मुलांना नकोसा झाला होता.अशातच ही गोष्ट अब्दूलला माहीत झाली.तो त्याला पाहायला आला.
अब्दूलने मधूला पाहिले.त्याला रडू कोसळलं.तसा दयाभाव अब्दूलच्या मनात निर्माण झाली.तसा तो मधूच्या मुलांना म्हणाला,
"मी नेवू शकतो का मधूला उपचारार्थ.राहिल दोनचार दिवस माझ्याचकडे."
मधूची मुले आनंदीत झाली होती.त्यांना तसाही तो नकोसा वाटत होता.तसा त्यांनी पटकन होकार दिला.तसं अब्दूलनं त्याला आपल्या गाडीत बसवलं व तो त्याला घेवून निघून गेला.
मधूला अब्दूलनं आपल्या घरी आणलं होतं.त्याने त्याला दवाखान्यात नेले होते.तसा तो उपकाराची परतफेड करीत होता नव्हे तर तो त्याची नित्य व निरंतर सेवा करीत होता.दररोज त्याची सेवा करतांना त्याला मालिश करणे,त्याची औषधी वेळोवेळी करणे,त्याच्या जेवनाखावन्यावर सतत लक्ष ठेवणे,तसेच असीम माया करणे इत्यादी गोष्टी तो करीत होता.याचाच परीणाम हा झाला की तो त्याच्या उपचाराने नव्हे तर असीम मायेने लवकर बरा झाला.विना आधारानेही चालायला लागला नव्हे तर बोलायला लागला.
त्याला पुर्वीचे दिवस आठवत होते.त्याला अब्दूल आठवत होता.त्याला मुलंही आठवत होते.जी मुलं त्याच्याच घरी,त्यानेच बांधलेल्या बंगल्यात राहात होती,ज्यांनी त्याची किंचीतही सेवा केलेली नव्हती.मात्र अब्दुलच्या घरी तो त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणे राहात होता.अब्दूलची मुलंही त्याची नित्य सेवा करीत असत.
आज तो अब्दूलच्याच घरी झुल्यावर बसला होता.कसलातरी विचार करीत होता.उदास होता.त्याच्या चेह-यावरचे भाव सतत बदलत होते.तसा समजू न आल्याने अब्दूल म्हणाला,
"हे बघ,मधू कसला विचार करतोय.सारी चिंता सोड.याला आपलंच घर समज व जग."
मधू काय समजायचं ते समजला.तसा मधू म्हणाला,
"अब्दुल्ला,तू माझा मित्र आहेस.तू मला पोसतोस विना मोबदल्यानं.तू महान आहेस.केलेल्या थोड्याशा उपकाराची परतफेड.पण मला हे असह्य होतेय.त्यापेक्षा मला असह्य होते ती गोष्ट. माझा बंगला ते वापरतात माझी सेवा न करता.......ही बाब असह्य आहे.माझ्या काळजाचा ठाव घेतेय ही गोष्ट.मला तीळतीळ मारतेय हीच गोष्ट."
"जावू दे ना मधू...........तुला इथं कोणता त्रास आहे?"
"नाही,त्यांना शिक्षा व्हायलाच हवी.त्यांना जर शिक्षा झाली नाही तर,तर जगातील मुलं आपल्या मायबापासोबत असंच वागतील."
"ते सगळं बरोबर आहे तुझं.पण आपण म्हातारे आहोत.आपण काय करु शकतोस?"
"तू थोडासा पैसा देवू शकशील मला."
"थोडासा!अरे ही मालमत्ता तुझीच आहे.तू जर दिला नसता ना मला पैसा आणि मी माझं दुकान उघडलं नसतं तर आज एवढी धनसंपत्ती मी मिळवलीच नसती.बोल कशासाठी हवाय तुला पैसा?"
"मला मालमत्तेसाठी खटला भरायचाय पोरांवर.मला माझा बंगला खाली करायचाय.तुझ्या पोरांसाठी.जे माझी सेवा करतात."
"नको मला तुझा बंगला.मला पाप बसवू नको.त्यापेक्षा तू एक काम कर.तुला बंगलाच जर खाली करायचा असेल तर तू त्या लोकांसाठी खाली कर.ज्या लोकांना आधार नाही.ज्यांची मुलं पोसत नाहीत.ज्यांना खरंच तुझ्या आणि माझ्यासारख्यांच्या आधाराची गरज आहे.
"बरोबर आहे तुझं म्हणणं.तुला जर गरज नसेल आणि तुझ्या मुलांना तर मी तसंच करेल.माझं उर्वरीत आयुष्य मी त्यांच्या जीवनासाठी खर्च करेल."
मधूला त्याची गोष्ट पटली होती.दोघांनी एकमेकांच्या सहकार्यानं खटला न्यायालयात दाखल केला.तसा न्यायालयात निकाल लागला.न्यायालयानं मुलांना बंगला खाली करायला लावला.तसा मुलांनी चरफडत बंगला खाली केला.
आज त्या बंगल्यात वृद्धाश्रम उघडण्यात आलं होतं.म्हातारी मंडळी त्या बंगल्यात गुण्यागोविंदाने राहात होती.नव्हे तर आपल्या उरलेल्या आयुष्याची पिकलेली पानं मोजीत होती.मधूही आपलं उरलेलं आयुष्य त्यांना देत होता.तसा अब्दूलही त्यांच्या सोबतीला होता.तोही आपल्या उर्वरीत आयुष्याचा वेळ त्याच म्हाता-यांना देत होता.ज्या म्हाता-यांना त्यांच्या मुलांनी टाकून दिले होते.

१४} दप्तराचे ओझे

शाळेचा पहिला दिवस होता.पावसाची सर येवून गेली होती.अस्तावलेलं मन आता थोडं शांत झालं होतं.तशा जमीनीला पडलेल्या भेगाही आज दिसत नव्हत्या.अशातच सुमंत आपल्या शेतात वखरानांगराची कामे करीत होता.शेती पिकत जरी नसली तरी ती शेती पिकविण्यासाठी तो काबाड मेहनत करीत होता.
सुमंतला एक मुलगीही होती.चारुशिला नाव होतं तिचं.ती त्या काबाडकष्ट करणा-या माणसाची मुलगी असली तरी ती शरीरानं धडधाकट नव्हती.ती अत्यंत नाजूक होती.
चारुशिला नाजूक होती.ती आता चौथीत गेली होती.काँन्व्हेटचं प्रस्थ असल्याने सुमंतनेही तिचे नाव काँन्व्हेंटमध्ये टाकले होते.दररोज ती नित्यनेमाने शाळेत जात होती.मात्र वाढत्या दप्तराच्या ओझ्याने व शाळेचे जिने चढावे लागल्याने ती त्रस्त होती.सायंकाळी घरी आल्यावर सारखी हात दुखते,पाय दुखते म्हणत जेव्हा ओरडायची,तेव्हा सुमंतच्या डोळ्यातून साहजिकच अश्रू निघायचे.यामुळे सुमंतलाही वेदना व्हायच्या व तोही घायाळ व्हायचा.त्याला विचार यायचा की आपली मुलगी जर एवढी त्रस्त आहे तर हिच्यासारखी बाकीच्या मुली त्रस्त नसतील काय?विचारांचा अवकाश त्याने हे दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला.तो सदोदित विचार करु लागला की हे दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल.
तो शेतकरी जरी असला तरी तो उच्चशिक्षित होता.कुठे अर्ज पाठवायचे व कसे अर्ज लिहायचे याचे त्याला भान होते.तसेच शासनाशी कसे लढायचे हेही त्याला ठाऊक होते.
आज तो शासनाशी लढत होता.अर्जावर अर्ज देत होता.नव्हे तर आता दप्तराच्या ओझ्याची याचिका त्याने न्यायालयातही टाकली होती.
न्यायालयात खटला रंगत चालला होता.तसा दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न ऐरणीवर होता.वेगवेगळ्या क्लृप्त्या द्वारे दप्तराचे ओझे कमी कसे करता येईल.हे पटवून देवू लागला.
देशात नवी पार्टी सत्तेवर आली होती.देश डीजीटल बनवला होता.तशातच दप्तराचं ओझंही डीजीटल बनवावं हे ही सुमंतच्या मनात आलं.तसा न्यायालयात डीजीटल इंडीयाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.न्यायालयाच्या ते लक्षात आले होते.दप्तराच्या ओझ्याने मुले कशी घायल होतात हेही समजलं होतं.त्यांनी डीजीटल पाठ्यपुस्तकाचा आदेश दिला.
आज पाठ्यक्रम बदलला होता.पाठ्यपुस्तके बंद झाली होती.काम्प्युटरचे टँब विद्यार्थ्यांना वाटप झाले होते.विद्यार्थी शाळेत पाठ्यपुस्तके व नोटबूक न नेता फक्त टँब्लेट नेत होते व डीजीटल अभ्यास करीत होते.
महत्वाचं म्हणजे लहान मुलांना आपण देवाघरची फुलं म्हणत असलो तरी मुलांसाठी काय करतो.काहीच करीत नाही.सर्वांची मुले दप्तराच्या ओझ्याने सारखी ओरडत असतात.सध्या डीजीटल जमाना आहे.या डीजीटल काळात या पाठ्यपुस्तक व नोटबुकाची गरज नाही.अशा काळात पाठ्यपुस्तकाऐवजी व नोटबुकाऐवजी जर टँब्लेट दिले गेले आणि ते कसे चालवायचे ते शिकवल्या गेले तर खरंच पाठ्यपुस्तकाच्या ओझ्याचा त्रास निश्चितच कमी होईल.सुमंतने पाठ्यपुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी जो लढा दिला,तो खरंच वाखाणण्याजोगा होता.खरंच त्याच्या लढण्याने चारुशिलेचीच नाही तर संबंध देशातील मुलांचे ओझे कमी झाले होते व ते आनंद महसूस करीत होते.तसेच सुमंतच्या या लढ्याने शेतीकडे दुर्लक्ष झाले असले तरी मुलांमध्ये आनंद निर्माण झाला होता व चांगले समाधान सुमंतच्या मनात निर्माण झाले होते व तो राहत महसूस करीत होता.

१५} ऐतिहासिक निर्णय

त्या रखरखत्या उन्हात त्याचा बा अगदी मन लावून काम करीत होता.त्याले का माईत होतं पाऊस पडल का नाई ते.पीक पिकल का नाई ते.तरी बी तो आपले कष्ट करत होता. परकाश खोपटात बसून ते समदं पाहात होता.त्याले बी माईत नोयतं का बा एवळ्या रखरखीत उन्हामंधी काम का करत असन ते.पण एक मातर नक्की समजत होतं का बानं उन्हामंधी आडशाला अंग टाकावं.
ना-या धु-या झाडाच्या सावलीत बांधलेलं.त्याले बी बानं आराम देलेला.पण सोता मातर उन्हात राबत.का बाले आराम नोका का? वैगेरे प्रश्न प्रकाशच्या डोयासमोरुन तरळत होते.जिथं जितरुबाले सावली पाह्यजे म्हून त्याले सावलीत ठेवून सोता उन्हात राबणं बाले बी आवडत नोयतं.पण परीस्थीतीपुळं विवश झालेला बा.......त्याच्याबी डोयात एक सपन होतं.आपल्या पोराले शिकवायचं.त्यानं जगाले परकाश द्यावा म्हून त्याचं नाव बी बानं परकाश ठेवलं होतं.
बाले दोन पोरं होती समदी दोघंबी हुशारच होती.दोघालेबी कसंबसं दहावीपर्यंत बानं शिकोलं.पण पुळं शेत पीकंनासं झालं आन् बस बाचं सपन खुंटलं.तरणीताठी पोरं.दोघंबी हुशार.पण त्याईले शिक्षणापासून वंचित ठेवावं लागलं.त्यातच बाच्या मनात सपन घुसलेलं.कोण्या एका पोरालेतरी शिकवावं.मोठा परकाशच होता.म्हून साहजिकच मोठ्याले बा शिकवत होता.
आज बा थोडा म्हातारा झाला होता.परीस्थीती आन् घरची वावरातली काम उन्हातान्हात करुन बा पुरता खंगून गेला होता.त्यामुळं काम काई जमत नोयतं.त्यातच वावराले आसरा म्हून बानं काई म्हशी बी पोसल्या होत्या.त्यामुळं त्याबी पायण्यासाठी त्यानं सान पोराच्या शिक्सनाची आहूती देली होती.
लान कैलास.त्याले समजत होतं का बा का बरं तसं करतोय ते.त्याची बी उच्च शिक्सन घ्याची इच्छा होती.तो तं गणितात लयच हुशार होता.पण घरी कराले कोणी नाय म्हून.त्याले शिक्सन मधातच सोळावं लागलं.त्यानंबी सहानुभूतीनं ते स्विकारावं लागलं.
आज बा म्हातारा झाला होता.दोघाबी पोरायचं लगन झालेलं होतं.मोठा मास्तर झाला होता.तं लान शेतकरी.लायन्याच्या जीवनात तेच दुःख होतं,जे बापाले होतं.मोठा मातर सुखी होता.ते बी लायन्यामुळं.जर का लायन्यानं आपल्या शिक्सनाची तिलांजली देली नसती तं आतं मोठा मास्तर झाला नसता हे लायन्यालेबी आन् मोठ्यालेबी मालूम होतं.ते दोघंबी संयम राखून होते.
दोघांचं लगन झालेलं.पण बायका मोठ्या तुफान भेटल्या होत्या.मोठ्याची बायको तं गर्वानं फुलली होती.तिले तं आपल्या नव-यांच्या दिवटीचा गर्वच होता.पण लायन्याचीबी काई कमजोर नोयती.तिले बी मालूम झालं होतं का तिच्या नव-यान का हुशार असतानी बी शिक्सनात तिलांजली देली नसती तं आज भासरा मास्तर झाला नसता.दोघ्याबी जावा मोठ्या हिरीरीनं भांडत होत्या.याच भांडणाचं कारण का काय?मोठ्यानं इस्टेटीत हिस्सा मागतला होता.पण लान तो हिस्सा द्याले तयार नोयता.त्याचं म्हणणं होतं का त्याच्याचमुळे मोठा मास्तर झाला.त्याचंबी म्हणणं बरोबर होतं.कारण त्याच्याच त्यागामुळं तो मास्तर बनला होता.बा ले बी असच वाटत होतं.शिवाय बाचं म्हणणं होतं का आपल्या लान पोरानं त्याग केला म्हून मोठा मास्तर बनला.त्यामुळं तो सक्सम हाये.आन् लान तेवळा सक्सम नाय.तेवा संबंधीत शेती लायन्याले मिळावी.पण मोठा मानत नोयता.त्यानं तर कोर्टात केस बी दायर केली होती.
मोठ्यानं कोरटाची पायरी दाखवली म्हून बा नाराज होता.लान बी काई कमजोर नोयता.त्यानं बी आपल्या हुशारकीनं आपली बाजू सक्समपणानं मांडली होती.दोनबी पारटीवाल्यानं आपआपल्या वकीलामार्फत दावा मांडला.त्यात न्यायाधीश महोदयांनी ऐतिहासिक निकाल दिला.का जर का घरातले कोणी नवकरीले असन तर त्याले मायबापाच्या इस्टेटीत वाटा मिळू नये.कारण त्याले नवकरी लागण्यामागं कुटूंबाचाबी त्याग असते.
ऐतिहासीक निर्णय झाला होता.मोठ्याले दुःख झालं होतं.तो काई शांत नोयता.लायन्याचा त्याग आन् सारं काई इसरुन याचा काटा कसा काहाळता येईन याचा तो इचार करीत होता.त्यातच त्यानं गुंडांकरवी आपल्या लान भावाचीच सुपारी देली.आन् ऐन अज्ञात स्थळी कोणाले न माईत करता त्याचा खात्मा केला.पण खुन तो खुनच.कसा लपन.पोलिसाईनं आपली शोधाची चक्र फिरवली.आन् खुनी धुंडून काहाळला.अंती माईत झालं का खुनी मोठाच भाऊ असावा.
मोठ्याले अटक झाली होती तो तुरुंगात खडे फोडत होता.त्याची नवकरीबी गेली होती.बाचं सपन तुटलं होतं.ज्याचं नाव परकाश ठेवलं होतं का तो जगाले परकाश देईन.पण समदं उलटं झालं होतं.परकाशनं तं दुस-याच्या जीवनात अंधार निर्माण केला होता.ज्याने त्याच्यासाठी त्याग केला होता.त्यालेच त्यानं आज संपवला होता.हे समदं मोहामुळं घडलं होतं.बाच्या डोयादेखत.आज बा दोघाबी लेकराईच्या पिरमाले पारखा झाला होता.

१६} अपघात


लोकं लहानपण देगा देवा असं नेहमीच म्हणत असतात,पण म्हातारपण देगा देवा असं कोणी म्हणत नाहीत.कारण म्हातारपणाच्या झळा या न सोसणा-या अशाच असतात.
गोविंन्दनगरात वल्लभ नावाचा माणूस राहात असे.तो तुफान ताकदीचा होता.त्याची शरीरयष्टी दणकट होती.जणू तो पहेलवानासारखा दिसत होता,नव्हे तर तो पहेलवानच होता.त्याने आपल्या पिळदार ताकदीच्या भरवशावर कित्येक कुस्त्या मारल्या होत्या,कित्येक आखाडेही आपल्या नावावर केले होते.याच कुस्त्यातून त्यानं आपलं नाव पंचक्रोशीत पसरवलं होतं.शेकडो लोकं त्याला ओळखत असत.
त्याला दोन मुलं होती.दोन्ही मुलांचं लग्न झालं होतं.ते आपल्या पत्नीसमवेत सुखात राहात होते.मोठ्याचं नाव मंगेश व पत्नीचं नाव गोकुळा तर लहान पोराचं नाव सुरेश व पत्नीचे नाव मधुरा होते.
जवळंच स्मशान होतं.त्या स्मशानात जातांना मोठा रस्ता ओलांडून जावे लागत होते.ज्या रस्त्यावरुन मोठमोठी जड वाहनं जायची.हा रस्ता ओलांडणं म्हणजे तारेवरची कसरत होती.कित्येक अपघात याच रस्त्यावर झालेले होते.
वल्लभचं जीवन कुस्त्या लढता लढता गेलं.त्याला त्या कुस्त्या लढता लढता केव्हा म्हातारपण आलं ते कळलंच नाही.वल्लभ जसा म्हातारा झाला.तशी त्याची मुलं तरुण झाली होती.मुलं मात्र त्याची चांगली निघाली नव्हती.ती त्याला लय त्रास देत होती.
वल्लभला आता जुने दिवसं आठवत होते.त्या आखाड्यात रंगलेल्या दंगली आठवत होत्या.कित्येक मारलेले मैदान आठवत होते,नव्हे तर कित्येक पहेलवानालाही गारद केलेले आठवत होते.पण आज तोच वल्लभ जीवनाच्या आखाड्यात हारत चालला होता.
वल्लभनं लहानपणापासून आपल्या मुलांना उन्हातून सावलीत नेलं होतं.त्यांना चांगलं शिकवलं होतं.त्यांना चांगलं खावू पिवू घातलं होतं.त्यानं कष्ट उपसले होते.पण लेकराच्या केसालाही धक्का लागू दिला नव्हता.याचबरोबर त्यानं आपली पहेलवानकीही सांभाळली होती.
तरुणपणात कष्ट उपसतांना भयंकर त्रास झाला होता.मुलांचं आजारपण आलं की रातरात जागणारा वल्लभच होता,नव्हे तर सटवाई लागली म्हणून रात्री अपरात्री कोणाला न सांगता आपल्या दोन हातावर आपल्या बाळाला घेवून मातामायच्या देवळात घेवून जातानाचे दिवस त्याला आठवत होते.त्यांचा टाहो,त्यांचं रडणं........ सारं काही त्याला आठवत होतं.बाळानं शौच केली की तोच पुढं होवून मुलांना त्रास होवू नये म्हणून साफ ठेवायचा.स्वतः मात्र काही न घेता फक्त न फक्त बाळासाठी कपडे घेवून देणे हे त्यानं जीवनात प्रथम कर्तव्य मानलं होतं.
आज त्याचं म्हातारपण त्याला डीवचत होतं.मुलांचा सर्व काही सांभाळ केलेला असतांनाही मुलं मोठी झाली असता ती आपल्या बापाची सेवा करीत नव्हती.त्याला फार त्रास देत होती.ती मुलं तो धोतरात शौच करतो म्हणून त्याला उपाशी ठेवू लागली.तसेच तो शौच करतो म्हणून त्याला एकाच कपड्यावर ठेवू लागली.तो बडबड करतो म्हणून त्याला बाजूच्या तट्ट्याच्या खोलीत एकटेच ठेवू लागली.
वल्लभनं आपल्या हयातीत मोठं घर बांधलं होतं,मुलांना राहायला होईल तसेच मलाही राहता येईल या हेतूनं.पण त्या घरात केवळ मुलंच राहात होती.वल्लभसाठी त्यांनी वेगळी तट्ट्याची खोली इमारतीच्या बाजूला बांधली होती.थंडीच्या दिवसात व आजारपणातही त्याला पांघरायला गोधळी नशीब नव्हती. घर नावावर होतं.पण अंगात चालण्याचं बळ नव्हतं.कोणाला सांगावं तर कोणी तट्ट्याच्या कम-याचा वास येतो म्हणून तिथे जायला तयार नव्हतं.तोच तो विचार त्याला येत होता.शेवटी विचार करता करता व आजारपणामुळं खंगून जावून वल्लभनं जवळंच पडलेली दोरी घेतली.ती तट्ट्याच्या कम-याच्या छताला बांधली व धाड्दिशी त्यानं फास आवळला.तसा तो गतप्राण झाला एका क्षणात.मनात विचार होता की'मी खावू शकत नाही मकान तर तुम्हालाही खावू देणार नाही.'
तरुणपणी मोठमोठ्या कुस्त्या मारलेला पहेलवान म्हातारपणातील जाचाला कंटाळून त्या जाचरुपी पहेलवानासमोर हारला होता.स्वार्थी मुलांच्या स्वार्थपणाची शिकार होवून.
हा अपघात होता.आयुष्याच्या उंबरठ्यावर झालेला.सर्वांनी रस्त्यावरचा अपघात बघितला होता.पण घरातही अपघात होतो हे मात्र कोणीही जाणत नव्हतं.
सकाळ झाली होती.सकाळचे नव वाजले होते.अजुनही तट्ट्याच्या खोलीचा आवाज येत नव्हता.काय झालं ते माहीत नव्हतं.अजुनही दोन मुलांपैकी कोणी तिकडं फिरकलं नव्हतं.तशी गोकुळा म्हणाली,
"काय झालं बुढ्यास्नी पाहा न हो."
गोकुळा मंगेशची पत्नी.तिनं म्हटलं म्हणून मंगेश पाहायला गेला.तो काय! त्याचा चेहरा पडला.तो धाड्कन खाली पडला.धनी खाली का पडला? म्हणून गोकुळा पाहायला गेली.तोच तिच्या पाहिलेला प्रकार लक्षात आला.आपल्याच शिकवणुकाचा प्रकार म्हणून ती गप्प झाली.क्षणात वेळ न दवडता तिनं तो पाश वल्लभच्या गळ्यातून काढला.पोलिस तक्रार होवू नये म्हणून तशी काळजी घेतली.तिनं वल्लभला आडवं झोपवलं व धाय मोकलून रडू लागली.
गोकुळा का रडते म्हणून आजुबाजूचे लोकं न् लोकं गोळा होवू लागले.शेवटी वल्लभ मेल्याची पुष्टी झाली.मयतीचं सामान आणलं गेलं.वल्लभची अंत्ययात्रा निघाली.बँडबाजा सारं काही लावलं गेलं.तिरडी फुलांनी सजविण्यात आली.नातवंडापासून तर मुलांसुनापर्यंत सारेच काही रडू लागले.पंचक्रोशीतून सर्व लोकं गोळा झाले.
अंत्ययात्रा मोठ्या थाटामाटात निघाली.ती स्मशानात पोहोचली.लोकं लाकडं काढू लागलेत.तोच मोठा पोरगा म्हणाला,
"माझ्या बाच्या शरणाला लाकडे नकोत.पहेलवान होता.गोव-यांनी पेटवूया."
गोव-या महाग होत्या.पण बाप मेल्यावर त्या गोव-यांना किंमत नव्हती.जीवंतपणी बापाला किंमत नव्हती.मात्र आता बाप मेल्यावर बापाला किंमत आली होती.अग्नी दिला गेला.शरण पेटलं.तोच टिकोरी फोडून पोरं माघारी फिरली.
ती रस्त्यावरुन चालत होती.आपल्या बापाच्या पहेवानकीला आठवत होती.आपल्या बापाच्या केलेल्या गोष्टी आठवत होत्या नव्हे तर आपल्या बापाचं राबणं त्यांना आता आठवत होतं.शेवटी आपण त्यांच्यासाठी काय काय केलं तेही आठवत होतं.तोच एक पाठीमागून गाडी आली.ती थेट त्या दोन्ही भावाच्या उरावरुन गेली.दोघंही जागीच मरण पावले.
'मी नाही खावू शकत मकान तर तुम्हालाही खावू देणार नाही.'हे म्हाता-याच्या तोंडचे वाक्य.आज खरं झालं होतं.नियतीनं खरा न्याय केला होता.त्या दोन्ही लेकरांसोबत.जशी करनी केली होती,तसं नियतीनं त्याचं फळंही दिलं होतं.
सगळी मंडळी म्हाता-यानं पोरांना सोबती नेलं असे म्हणत होते.पण तसं काही नव्हतं.हे करनीचे भोग होते.गोकुळा व मधुराला सर्वकाही भेटलं होतं.पण पती मात्र हिरावून नेले होते हक्काचे पती तेही एका अपघातात.त्या अपघातानं सारं संपवलं होतं.सर्व ऐश्वर्य इथंच ठेवलं होतं.ज्या ऐश्वर्याचा त्या लेकरांनी उपभोग तर घेतला होता.पण त्या प्रती ते जागले नव्हते.

१७} भारतरत्न

*सचिनला भारतरत्न मिळाला होता.सर्वत्र त्याचं कौतूक होत होतं.पण असा एक व्यक्ती होता की त्याला या गोष्टीचा राग येत होता.तो एक शेतकरी होता.आपल्या जमीनीत काबाडकष्ट करुन पीक पिकवून शेती करुन पैसा कमविण्यात त्याला धन्यता वाटत होती.*
बाहेर पाऊस धो धो कोसळत होता.तर घरामध्ये टिव्हीवर विश्वचषकाची क्रिकेट रंगली होती.क्रिकेट......प्रत्येक फटक्यागणिक टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येत होता.सगळी क्रिकेट चाहते हर्षोलास करीत टाळ्या वाजवीत होते.कुणी डान्सही करीत होते.दूर कुठेतरी क्रिकेट सुरु होतं.अशातच क्रिकेट सुरु असतांना पाऊस आला आणि क्रिकेट काही वेळासाठी बंद झालं.हजारोच्या संख्येतले प्रेक्षक आपआपल्या छत्र्या उघडून बसले.कितीतरी रुपये तिकिटीचे पैसे देवून ते क्रिकेट पाहायला आले होते.अखेर पावसामुळे सामना रद्द झाल्यानं त्यांच्या तिकीटाचे पैसे वाया गेले होते.
रात्रीला पाऊस झाला होता.अरुण आपल्या शेतावर असा क्रिकेटचा सामना रोजच खेळत होता.रोजच वखरामागं रण काढतांना तो थकत होता.पण त्याचा क्रिकेटचा सामना पाहायला कोणी प्रेक्षक नसायचा.हे रण काढतांना त्या पावसाच्या ऐन वेळी येण्यानं सामना रद्द व्हायचा.तर कधी पावसानं व्यत्यय आणला नाही तर शेतात भरघोष पीक येवून या अरुणला समाधानाची मँन आफ द मँचही मिळायची.पण ते केवळ त्याच्या पुरतं होतं.क्रिकेटमध्ये जसा इतरांना आनंद होतो.तसा इतरांना आनंद देणारा तो क्षण नसायचा.त्यालाही वाटायचं की लोकांनी त्याच्या शेतातली त्याची मेहनत क्रिकेटसारखी पाहावी.त्याही मेहनतीला पाहण्यासाठी तिकीट काढावी.जेणेकरून त्या पैशाचा उपयोग शेतक-यांना दुष्काळावर मात करण्यासाठी तरी करता येईल.
सकाळी अरुण चहाची वाट पाहात होता.त्याचबरोबर पावसाचीही.रात्रीला पाऊस आल्यानं तो थोडा सुखावला होता.तसा मृग आद्रा निघून जावूनही अद्याप पावसाने हजेरी लावली नव्हती.त्यामुळे अमदाही दुष्काळच नशिबाची वाट लावते की काय असे होवून झाले होते.अशातच कालच्या पावसाच्या सरी......वातावरणात थंडावा..... त्याचबरोबर गोडवाही निर्माण झाला होता.पण आता आलेला हा पाऊस शेवटपर्यंत टिकेल काय? याची चिंता अरुणला लागली होती.
अरुण मेहनती होता खरा.पण पावसामुळे त्याच्या मेहनतीचे चीज होत नव्हते.त्याला आपल्या वीतभर जमीनीत मेहनत करणे आवडायचे.कारण तीच धरणीमाय त्याच्या पोटाला अन्न देत होती.त्याची लेकरंबाळं पोषत होती.
चहा बनायचाच होता.चुलीवर राणूनं चहा चढवला होता.संबंध गावात सिलेंडर नसल्यानं राणू तरी काय करणार.ती चूल फुंकत होती.पण लाकडात पावसानं ओलावा निर्माण केल्याने फक्त धूर तेवढा येत होता.अग्नी मात्र पेटत नव्हता.त्यामुळं आज चहा लवकर शिजेल की नाही.असं अरुणला वाटत होतं.तसा चिडचिड होत अरुण म्हणाला,
''किती येळ लावतेस राणू.तुले इंचीपण चिंता न्हाय.बग रात्रीला पाऊस झाल्याती.मी म्हणलं किती पाऊस झाला.वावरात जावून येतो.पेरणी आटोपा लागन का न्हाय."
"मी तरी का करु धनी.काल पावसात लाकडं ओली झाली.आतं पेटत न्हाय."
"मंग खड्ड्यात जावू दे तुहा चाय आन् तुबी जा खड्ड्यात.मी जातो वावराकडं."
अरुण चरफडत शेतीकडे निघाला.तसा तो सरकारला दोष देवू लागला.कारण एवढे महान कष्ट शेतकरी जीवनात असूनही शेतक-यांच्या पदरात सरकार काही अनुदान टाकत नाही.शिवाय लोकही त्यांची हेळसांड करतात नव्हे तर एवढ्या संकटावर मात करुन एखाद्या शेतक-याने जास्त अन्न पिकविले तरी त्याचं कौतूक होत नाही.मात्र विश्वचषकात एखाद्या खेळाडूने कामगीरी केल्यास त्याचं कौतूक सरकारही करतं.त्या खेळाडूंना कित्येक रुपये दान म्हणून दिले जातात.मात्र शेतक-याच्या पदरात काहीच नाही.जो जगाला पोषतो.त्याला काहीच नाही.
खरं तर सन्मानाचा अधिकारी हा शेतकरीच आहे.पण कुठेही हा शेतकरी गेलाच,तर त्याच्या पदरी निराशाच येते.सतत घोर अपमान.हा अपमान सरकार तर करतंच करतं.पण निसर्गही करतो.ते एसीत बसणारे खेळाडू....ते जिंकल्यावर त्यांना मिळणारे मोठमोठे बक्षीस जाण्यायेण्यासाठी असणा-या आरक्षीत सीटा नव्हे तर विमानप्रवास त्यांच्या खाण्याच्या सुविधा आणि त्यांचा पेहराव हे पाहून अरुणच्या मनात या खेळाडूबद्दल इर्ष्या निर्माण झाली होती.आपण या खेळाडूचा खेळच पाहायचा नाही.नव्हे तर टिव्हीही पाहायचा नाही असे त्याला वाटत होते.तसे त्याने मनात ठरवलेही होते.
अरुण क्रिकेट पाहात नव्हता.नव्हे तर टिव्हीदेखील पाहात नव्हता.याच क्रिकेटच्या रागाने त्याने घरची टिव्ही फोडून टाकली होती. तासनतास टिव्हीसमोर बसणा-या लोकांचाही त्याला आता राग येत होता.आता ते खेळाडूच नाही तर त्या दूरदर्शनवरील सिरीयलाही त्याला आवडत नव्हत्या.कारण ते कलावंत संबंधीत मेहनत करणारे वाटत नव्हते.तर सर्व त्याच्या दृष्टीकोनातून एसीच्या गाडीत फिरणारे व शेतक-याचं रक्त पिवून एसीच्या बंगल्यात राहणारे वाटत होते.अशातच घरचा टिव्हीही त्याने बंद केला होता.
आज अरुणचा मुलगा कलेक्टर होता.इंटरव्ह्यूतून तो चक्क बापाचे नाव घेत होता.ज्या वयात टिव्हीमुळं अख्खी पिढी गारद होते.त्या वयात घरी टिव्ही नसल्यानं जो वेळ अरुणच्या मुलाला अभ्यासाला मिळायचा.तो वेळ टिव्ही सुरु असल्यानं मिळाला नसता.हे आपल्या इंटरव्ह्यूतून मुलगा सांगत होता.त्याच्या मुलाला घडविण्यात बाप कारणीभूत ठरला नसला तरी बापाने टिव्ही बंद केल्याने त्याचा फायदा अरुणच्या मुलाला झाला होता. तर बापाला अक्कल देण्यास ते खेळाडू कारणीभूत ठरले होते.
अरुणच्या टिव्ही बंदमुळे घरी भांडणंही होत असत.पण या गोष्टीचा परीणाम मात्र रास्त निघाला होता.त्याचा मुलगा मात्र आज कलेक्टर झाला होता.त्याला बापाच्या त्यागाची जाणीव होत होती.जर बापानं लोकांसारखी टिव्हीला परवानगी दिली असती तर.......
आज आम्ही पाहतो की मुलं तासनतास टिव्ही पाहतात.इंटरनेटच्या काळात टिव्हीवर गेम खेळतात.मोबाईल हातून सुटत नाही.त्याच काळात अरुणचा मुलगा अभ्यास करीत होता.लहानपणी बापाच्या कृत्याचा रागही येत असेल त्याला.पण मोठेपणी कलेक्टर झाल्यावर तोच मुलगा बापाची चारचौघात प्रशंसा करीत होता.आपल्या यशाचे श्रेय बापाला देत होता.खरं तर हाच सन्मान अरुणसाठी भारतरत्न पेक्षाही मोठा होता.

१८} फुलपाखरू

सुवर्णा तिचं नाव.दिसायला फारच सुंदर होती.हसतांना गालात खळी उमटावी अशी गोरीपान.स्वप्न ही होते अाकाशाला गवसणी घालणारे.तशी ती जास्त बोलायची.मात्र स्वच्छंदी स्वभावाची असल्यानं तिच्यावर महाविद्यालयातील भुंगे घिरट्या घालत होते.तिही त्यांना भाव देत आहे असे सर्वांना वाटत होते.अशातच तिच्या महाविद्यालयात एक मुलगा आला.अब्दूल नाव होतं त्याचं.अत्यंत गरीबीत वाढलेला अब्दूल काम करीत करीत शिकला आणि आज शालान्त पास होवून महाविद्यालयात त्याने प्रवेश मिळवला होता.
पळस नुसताच बहरला होता.त्याच्या अंगावर ते तुरेही आल्याने लाल शालू पांघरल्यागत तो अगदी छान साजेसा वाटत होता.अगदी त्याच पळसछायेत वाढलेला अब्दूल नुकतीच शालान्त पास होवून महाविद्यालयात आला होता.मात्र पहिल्याच दिवशी अब्दूलची नजर सुवर्णावर पडली आणि त्याला ती आवडलीही.तो तिच्यावर नजर टाकू लागला.तिची चौकशीही करु लागला.त्या चौकशीदरम्यान त्याला जाणवलं की ती त्याला शालान्तला शिकविणा-या शिक्षकाची मुलगी आहे.
आता मात्र तो तिच्याकडे प्रेमाच्या नजरेनं पाहू लागला होता.तिची स्वच्छंदी नजर त्याला आवडत होती.पण ती नजर त्याचेपुरती होती.ती काही त्याला भाव देत नव्हती.कदाचित तिच्या स्वच्छंदी स्वभावाचा फायदा कोण्या महाविद्यालयीन युवकाने घेवून तिला वा-यावर सोडू नये असे त्याला वाटत होते.तसा तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता.
सुवर्णा भाव देत नाही हे जाणून एकदा अब्दूलने तिची भेट घ्यायचे ठरवले.तसा सायंकाळी महाविद्यालय सुटतेवेळी त्याने तिला अडवले व क्षणातच मी तुझ्यावर प्रेम करतोही म्हटले.
सुवर्णाने क्षणभर विचार केला.ती किंचीतही घाबरली नाही.तशी ती म्हणाली,
"अब्दूल,तुझं प्रेम मला स्विकार आहे.पण........" ती थोडी थांबली.तसा उत्सुकतेचा कळस गाठलेल्या अब्दूलच्या मनाने कालवाकालव केल्याने त्याने विचारले.
"पण काय सुवर्णा?नक्की सांग.तुझं जर का माझ्यावर प्रेम नसेल तर मी तुला सोडून जाणार नाही.मी हा देहच संपवून टाकणार तुझ्यासमोर."
तशी ती बोलती झाली.
"हे बघ अब्दूल,माझ्यासारख्या कित्येक सुंदर मुली पुढे फुलपाखरासारख्या तुझ्या जीवनात येतील.धोके देत देत निघून जातील.मग तू कोणाकोणासाठी तरी जीव देणार.अरे.माझ्यासारख्या कित्येक तरुणींवर एकतर्फी प्रेम करुन कित्येक प्रेमवीर मरण पावलेले आहेत.तेव्हा मी काय सांगते ते ऐक."
तो भावूकतेने ऐकू लागला.तशी ती परत म्हणाली,
"हे बघ,आजचं प्रेम हे आंधळं असतं.आपण परीपक्व झालेलो नाही.तेव्हा तू आधी आपलं जीवन घडव.गरीबीतून बाहेर निघ.आपल्या भावांनाही काढ.आपल्या पायावर उभा हो.मग बघ या सुवर्णासारख्या कित्येक मुली तुला कशा मिळणार नाही ते.हवी तर माझी मदत घे."
अब्दूलला सुवर्णाची गोष्ट पटली.आज त्याचं जीवन घडलं आहे.तसं पाहता सुवर्णानं ऐन परीक्षेच्या काळात केलेली मदत आजही आठवत आहे.ऐन परीक्षेच्या काळात अब्दूल पास व्हावा म्हणून तिने स्वतः अभ्यास न करता ती पुस्तकं त्याला पुरवली होती.यामुळंच की काय तिचा बारावीचा टक्का घसरला होता.
ती पुढे नाव काढून दुसरीकडे गेली.तो मात्र त्याच महाविद्यालयात होता.ती कुठे गेली हे काही माहीत नाही.पण तिची आठवण म्हणून त्याने आज विवाह केला आहे हिंदू मुलीशीच.धर्माच्या भिंती तोडून......आजही सुवर्णा त्याला आठवते आहे.कदाचित ती जर नसती मिळाली तर आज तो स्वतः आपल्या पायावर उभा झाला नसता हे आजही त्याला माहीत आहे.तो आजही फुलपाखरू बनून सुवर्णाला शोधतो आहे.पण तिही कोणत्या भुंग्यासोबत निघून गेली याचा काही त्याला थांगपत्ता नाही.

१९} भरभराट

नुकताच पावसाळा सुरु झाला होता.शेतात उभं पीक डोलु लागणार होतं.सोयाबीनचे पीक जोमात राहणार.ज्वारीची कणसंही डोलणार या स्वप्नवत आनंदाने सदाच्या आनंदाला उधाण आले होते.
माणसाने जंगलतोड केली होती.त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता.एवढेच नाही तर जंगल तोडल्याने पाऊस कमी पडतो हेही बरोबर होते.त्यामुळे सदासह बाकीच्यांनीही कमी पाणी लागणारी पीकं पेरली होती.आज पाच वर्ष पीक चांगले झाल्याने लोकांचे विचार करणेही स्वाभाविक होते.
सर्वांनी कमी पाणी लागणारी पीक पेरली खरी पण यावर्षी पाऊस पक्काच लागुन पडला होता.सदाला फार चिंता पडली होती.काय करावे सुचेनासे झाले होते.तसा तो पत्नीला म्हणाला,
"अमदा पाऊस काही केल्या जगु देत नाय.असं वाटतेय. का करावं?"
"मी का तरी सांगु धनी.यावर्षी पावसानं तं कहरच केला म्हंते."
"मले तं समजतच नाय.मोड करावा लागन म्हंतो."
"धनी मंग या ऊब्या पिकावर नांगर चालवान का जी."
"हो चालवाच लागन."
"अवो पण ही झाडं म्हंजे आपलं लेकरु.मोड करुन लेकराचा जीव घ्याचा म्हंता.नाय धनी हे बराबर नाय."
"अवो मंग झाडं वाळतेत खाडं पडले त्याईचं कसं?"
"त्या जागी धनी आपुन जवारी अन् कापुस लावुन म्हंतो.सोयाबीन निघन तं जवारी राहीन,जवारी निघन तं कापुस राहीन."
"पण लोकं मोडुन राहले नं दुसरा पेरा पेरायसाठी."
"पेरु द्या त्याईले.मोडु द्या त्याईले मोडतेत तं.झाडं आपली लेकरं.त्याईचा आशीर्वाद लागन."
"हो तुह्यं बी म्हणणं बराबर आहे."
"धनी पाऊस उघडन.थोडा धीर धरा.संयम ठेवा.हे पीक म्हंजे आपला संसार.हे झाड आपलं लेकरु.अवो माणसाईचा राकस झाला.त्याईनच जंगलतोड केली.म्हणुन हे समदं घडत आहे.ईश्वास ठेवा.समदं बराबर होईन."
बाकी शेतक-यांनी मोडी केल्या होत्या.पण सदाने पत्नीचं ऐकुन त्याप्रमाणे केलं होतं.आज सदाचं पीक वा-यानं डोलत होतं.ज्वारीचे कणसंही डोलत होते.कापसाला बोंड फुटु लागले होते.सोयाबीनचे तांबुस निळे फुलं झडुन कोवळ्या कोवळ्या शेंगा पकडल्या होत्या.
बाकीच्यांनी धानाची पेरणी केली होती.शेवटी पाऊस नसल्याने धान करपत चालला होता.सदानं संयम बाळगल्यानं त्याच्या शेतीत पांढरं सोनं पिकलं होतं.
सदाच्या वागणुकीवर पुर्वी अख्खा गाव हासत होता.आज पूर्ण गाव रडत होतं.कोणी सदाचा द्वेषही करीत असेल असं वाटत होते.
सदानं सोयाबीन कापलं काही दिवसांनी कणसं कापले.कडबा विकुनही पैसे मिळाले कापुस विकता आलं, तर सरपणासाठी धसकटटंही मिळाले.पण ज्यांनी मोड करुन धान रोवले होते.ते मात्र संकटात सापडले.त्यांची तेल गेलं तुप गेलं हाती आलं धुपाटणं अशी अवस्था झाली होती.सदाच्या पत्नीच्या संयमी वागणुकीनं त्याची भरभराट झाली होती..त्यानं सोचलेलं स्वप्न साकार झालं होतं.
२०} त्याग

आपले पाळीव पशू.आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.आपणही करतो.पण आपलं प्रेम स्वार्थी असतं.आपल्याला त्यांची जर मदत होत नसेल तर आपण त्यांना विष देवूनही मारायला मागंपुढं पाहात नाही.आज कोंबडीचंच उदाहरण घेवू.साधं कोंबडीचं पिल्लू जरी झिंगत असलं तर त्याला मानवी समाज कापून खातो.स्वलेकरासारखं वाढवून देखील.अशीच एका खंडू बैलाची कथा.
खंडू तरुण होता.तो आपल्या धन्याची चाकरी करीत होता.रात्रंदिवस राबत होता शेतात.पीकही जोमात यायचं त्यावेळी.कारण तो तरुण होता आणि मालकही.
आज मालक म्हातारा झाला होता.त्याचबरोबर खंडूही.या खंडूला आज काम करणे जमत नव्हते.तरीही मालकाची परिस्थीती पाहून तो शेतात ऐपत नसतांनाही काम करीत असायचा.मालकाची दया घ्यायचा.
आज रोहन बैल बांधत होता.त्याच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या.एरवी त्याने आजपर्यंत तरी आपल्या बैलांवर पराणी टोचली नव्हती.वा कधी बैलांना मारलं देखील नव्हतं.पण आज त्यानं ठरवलं होतं की आता खंडू म्हातारा झालाय.त्याला विकायला हवं.दोन पैसे तरी अरजतील.पण तो तर म्हातारा.त्याला घेणार तरी कोण?तो विचार करु लागला.कसाबाशिवाय पर्याय नाही.
आज शिवारात त्यानं बैल नेले होते.ते वखराला बांधले होते.तो वखर चालवत होता. पण त्यात तो वखर चालवता चालवता एक बैल वार्धक्यानं बसला होता.त्याचा त्याला राग आला होता.म्हणून त्यानं बैलाला मारलं होतं बेदम.याचं कारणंही तसंच होतं.
पाऊस आला होता.या पावसाच्या हंगामात त्याला पीक पेरायचं होतं.त्यासाठी त्याला शेत वखरुन तयार करायचं होतं.पावसाचा काहीही नेम नसल्यानं त्याला लय घाई होती.पण अशातच खंडूनं घात केला.तो वखराला चालायचा थकला आणि लगेच बसला.तो काही केल्या उठेना.त्यामुळं अशा घाईगडबडीत रोहनचा राग पारावर गेला.मग काय,त्याने बेदम हाणला खंडूला.पण खंडूचा त्यात काहीही दोष नव्हता.दोष होता निसर्गाचा.निसर्गच दरवर्षी रोहनलाच नाही तर समस्त शेतक-यांना त्रास देत होता.
खंडू व शंक-या दोन बैलांची नावं.ब-याच वर्षापासून नवा बैल घेण्याचा रोहननं विचार केला.पण निसर्गराजा त्यांना दगाच देत राहिला.शेवटी खंडू आणि शंक-या म्हातारे झाले होते.पण तरीही रोहनला साथ देत होते.पण ते तरी किती दिवस देणार साथ.शेवटी तेही जीवच.साथ देणारे जीव.
खंडूवर रोहनचा राग.खंडूला मारलं खरं.पण सायंकाळी बैल बांधतेवेळी त्याच्या डोळ्यात अश्रू.त्याचं कारणही तसंच होतं.ज्या खंडूला त्यानं मारलं होतं.त्या खंडूनं खुंटाला गाठ बांधतेवेळी रोहनला चाटायला सुरुवात केली होती.
मुकं जनावर ते.त्यांना राग येत नसेल का?येतो राग त्यांनाही.पण ते राग राग जपत कुठं जाणार आणि रागही आलाच तर धन्याबद्दल काळजी वाटत असते.म्हणून ते चाटतांना प्रेमवर्षाव करीत असतात.पण माणसाच्या माणुसकीचं काय,त्याला हे काही समजत नाही.तो ती मुकी जनावरं त्यांच्यासाठी काहीही करो,त्यांना शेवटच्या समयीही त्रासच देत असतात.कारण त्यावेळी त्यांचा उपयोग नसतो.
रोहनला आज बैलानं चाटलं जरी असलं,त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहिल्या जरी असल्या तरी काल दुपारची गोष्ट तो विसरला नव्हता.त्याने लगेच गावातील कसाबाला बोलावून आजच खंडूचा सौदा करवून टाकली होता.
ठरल्याप्रमाणे सकाळीच कसाबवाले घरी आले.बायको ओरडत होती,'कशाला विकलाय धनी खंडू.तो आपल्या पोरासमान हायती.' पण रोहनचे काही डोळे उघडत नव्हते.त्यानं लागलीच त्याला पोळी दिली आणि म्हटलं,"जा बाबा,देवाघरी खुश राहा.तुझा आमच्या घरचा दाणा संपलाय."
खंडूनं एक कटाक्ष टाकला.तो समजून गेला.माझ्या धन्यानं माझा सौदा केलाय.क्षणात त्यानं अश्रू गाळले.कसाबानं दावं सोडलं व त्या बैलाला मारत मारत तो हाकलू लागला.तोच रोहनचा जीव तळमळला.त्याला कसाब मारत असलेले फटके स्वतःला मारत असल्यासारखे वाटत होते.
खंडू काही कसाबाबरोबर जायला तयार नव्हता.त्यासाठी तो कसाब त्याला चाबकाचे फटके मारतच होता.शेवटी तोही एक जीवच.शेवटी तो जायला तयार नव्हता. खंडूला कसाब नेतांना चाबकाचे फटके मारतच होता.शेवटी तो नजरेच्या पडद्याआड गेला.
सायंकाळ होत आली होती.रोहनला कसाब आठवत होता.त्याचा जीव त्याला कासावीस वाटत होता.घरुन एक जीव मेल्याचं दुःख वाटत होतं.पण हा जीव मेला की आपण त्याची इच्छा नसतांनाही हत्या केली.त्याला विचार येत होता.तसं त्याला खंडूचा भुतकाळ आठवला.खंडूचं अंग चाटतानाची आठवण येत होती.त्याला विचार येत होता,कदाचित खंडू जीवंत तर असेल ना.शेवटी सायंकाळी त्यानं निर्णय घेतला.खंडूला परत आणायचं.
सांजवात झाली होती.तसा तो कसाबाच्या घरी गेला.त्याला पैसे परत करु लागला.रडू लागला गिडगिडू लागला.खंडूला परत मागू लागला.कसाब मात्र काही केल्या ऐकत नव्हता.शेवटी कसाबानं निर्णय घेतला की जर का खंडू जीवंत असेल तर त्या खंडूला तो परत करणार.पण एक अट असेल ती म्हणजे रोहननं खंडूला किंवा खंडूनं रोहनला ओळखायला हवं रोहननं काहीही आवाज न करता.
रात्रीचा अंधार.खंडूसह बाकीची जनावरं दावणीला बांधलेली होती.सकाळीच खंडूचा नंबर लागणार होता कापणीला.इतक्यात रोहन तिथं पोहोचला.
खंडू अटीप्रमाणे गुपचूप होता.त्याला आपला खंडू त्या अंधारात दिसत नव्हता.तरीही तिथं असलेला खंडू त्याच्याजवळ आला व त्याला चाटू लागला..रोहननेही त्याला घट्ट मीठी मारली.ते दृश्य कसाब पाहात होता.त्याचंही ह्रृदय ते दृश्य पाहून पिघललं व त्याने खंडूला ब-या बोलानं रोहनबरोबर जावू दिलं.त्याने खंडूचे पैसेही परत मागीतले नाहीत.
खंडूचा रोहनने केलेला त्याग आज त्याला जिव्हारी लागला असता,जर खंडू परत भेटला नसता तर.आज खंडूनेही जीवनभर धन्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता.आज खंडू काही काही कामाचा नव्हता.पण तरीही तो रोहनच्या घराची एक शान होता.जणू त्याला रोहनने वाघाच्या तावडीतून सोडवून आणल्यासारखे वाटत होते.नव्हे तर प्रेमामुळंं शत्रुत्वही विसरता येतं,नव्हे तर शत्रूलाही हारवता येतं हेही खंडूनं दाखवून दिलं होतं.
अंकुश शिंगाडे नागपूर
१२२बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर पिन कोड ४४००३५ मो ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय