किमयागार - 13 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 13

किमयागार भाग १३
मुलगा म्हणाला, मी दुपारीरात्री, अगदी पहाटेपर्यंत काम करीन आणि तुमचे दुकान पूर्ण स्वच्छ करीन. तुम्ही मला पैसे द्याल त्यातून मला उद्या इजिप्तला जायचे आहे.
व्यापारी हसला , तू माझ्याकडे वर्षभर काम केलेस व मी तुला क्रिस्टल विक्री चे चांगले कमिशन दिले तरी तुला इजिप्तला जाण्यासाठी कर्ज काढावे लागेल. हजारो किलोमीटर चे वाळवंट या दोन प्रदेशांदरम्यान आहे.

क्षणभर तिथे सारे शहर निद्रीस्त असल्यासारखी शांतता पसरली.
बाजारातील आवाज, व्यापारी व गिह्राइक यांचे बोलणे असा कोणताच आवाज येत नव्हता. कान बधीर झाले होते. आता कसलीच आशा राहिली नव्हती, ना तो राजा, ना नियती, ना पिऱ्यामिड ना खजिना.

मुलगा सुन्न होऊन कॅफेच्या बाहेर बघत होता, आता मरण आले तर बरे असे वाटून गेले.
मुला, मी तुला तुझ्या देशात परत जाण्यासाठी काही पैसे देऊ शकतो व्यापारी म्हणाला. मुलगा काहीच बोलला नाही , तो उभा राहिला, त्याने आपले कपडे नीट केले, पिशवी उचलली आणि शांतपणे म्हणाला मी तुमच्या कडे काम करीन. थोड्या शांततेनंतर परत म्हणाला, मला मेंढ्या घेण्यासाठी पैसे जमवायचेत.
किमयागार- क्रिस्टल दुकानातील अनुभव
क्रिस्टल व्यापाऱ्याकडे कामाला लागून आता एक महिना संपला होता. त्याच्या लक्षात आले होते की, ही नोकरी काही खुप आनंददायी नाही.
तो व्यापारी काउंटरमागे बसून मुलाला क्रिस्टल नीट हाताळ, फोडशील बघ, असे सारखे बडबडत बसे.
तो म्हातारा जरी थोडा विचित्र असला तरी त्याला तो चांगली वागणूक देत असे , क्रिस्टल विक्री चे चांगले कमीशन देत असे, थोडे पैसे तो बाजुला ठेवू शकला होता, यामुळेच तो त्या व्यापाऱ्याबरोबर काम करत होता.
त्या सकाळी त्याने हिशोब केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो अशाच प्रकारे काम करत राहिला तर वर्षभरात मेंढ्या घेण्याइतके पैसे साठतील.
मुलगा व्यापाऱ्याला म्हणाला, मी क्रिस्टल ठेवण्यासाठी एक शोकेस करावी म्हणतोय, ती जर आपण बाहेर ठेवली तर टेकडीखालून जाणाऱ्यांना ती दिसेल व लोक खरेदी साठी वर येतील.
" माझ्याकडे अशी शोकेस कधीच नव्हती, लोक त्या शोकेसला धडकतील व क्रिस्टल फुटतील." व्यापारी म्हणाला.
असंच काही नाही, मी जेव्हा कुरणात मेंढ्या घेऊन जात असे, तेव्हा कधी कधी सापामुळे मेंढ्या मरण्याची भीती असे पण हेच तर मेंढपाळ व मेंढ्यांचे जीवन असते.
व्यापारी आलेल्या गिह्राइकाशी बोलण्यासाठी वळला. आता त्याची विक्री चांगली होत होती. त्याला टॅंझीअर मधील पूर्वीचे दिवस परत आल्यासारखे वाटत होते जेव्हा हा रस्ता टॅंझीअर मधील प्रमुख आकर्षण होता. गिह्राइक गेल्यावर व्यापारी मुलाला म्हणाला
" व्यवसाय खरंच चांगला होत आहे. मला खुप समाधान वाटते आहे, तू पण लवकरच मेंढ्या घेउ शकशील. माणसाला आणि काय हवे असते ?"
आपण शकुन चिन्हे ओळखून त्याप्रमाणे वागावे लागते. मुलगा सहज बोलून गेला, नंतर त्याला वाटले
आपण हे उगाच बोललो, व्यापारी कुठे राजाला (म्हातारा) भेटला होता ?.
यालाच अनुकुलतेचा सिद्धांत म्हणतात,
शुभ सुरुवात, कारण तुम्ही आपल्या भाग्यापर्यंत
पोचणार असता, राजा म्हणाला होता.
पण व्यापाऱ्याला त्याचे म्हणणे कळले होते.
मुलगा दुकानात असणे हाच एक शकुन होता.
काळ जात होता तसे कॅश बॉक्स मधील पैसे वाढत होते. मुलाला कामावर ठेवल्याचे त्याला अजिबात वाईट वाटत नव्हते. मुलाला थोडे जास्तच पैसे दिले जात होते कारण विक्री फार होणार नाही असे समजून व्यापाऱ्याने जास्त कमीशन कबूल केले होते. शोकेसचा विषय बंद करण्याचे हेतूने त्याने मुलाला विचारले तुला पिऱ्यामिड का बघायचे आहेत?.
मुलगा म्हणाला मी त्यांच्याबद्दल बरेच ऐकले आहे. तो स्वप्नाबद्दल काही बोलला नाही कारण खजिना म्हणजे आता एक त्रासदायक आठवण राहिली होती, त्याबाबत त्याला काही विचार करायचा नव्हता.