Don't mumble the waffle books and stories free download online pdf in Marathi

वायफळ बडबडू नये

*इतिहास सांगण्याचा नाही. पुराव्याचा आहे?*

*दि. १९ फेब्रुवारी. शिवाजी महाराजांची जयंती. दरवर्षी ही जयंती येते व नव्या वादाला तोंड फुटतेच. तसं पाहिल्यास इतिहास हा सांगण्याचा नाही तर तो पुराव्याचा आहे. काही लोकं असे असतात की ज्यांच्याजवळ पुरावा नसतो, तरीही ते इतिहासाची तोडफोड करीत असतात. असाच एक प्रसंग शिवरायांबाबत.*
शिवरायांच्या जन्माबाबत वाद आहेत. वाद बरेच गाजले आहेत. त्या वादानुसार सत्तावीस एप्रिल पासून तर शिवरायांची जयंती तीन मार्च व एकोणवीस फेब्रुवारीपर्यंत येवून पोहोचली. आता नेमकी त्यांच्या जन्माची तारीख हीच की आणखी अनेक तारखा आहेत. हा मात्र वादाचा मुद्दा आहे.
वरील प्रकारचं विवेचन व त्याचा वाद संपला व आता कोणी तीन मार्च तर कोणी एकोणवीस फेब्रुवारीला शिवरायांचा जन्मदिवस साजरा करतात. यावरुन हे लक्षात येतं की हा सर्व खेळ एक प्रकारचं क्रेडीट घेण्यासाठी तर नसेल. असो, त्याबद्दल न बोललेलं बरं.
वरील विवेचनावरून आणखी आता एक नवीन विषय सांगतो. काल जन्मदिवसाबाबत वाद होते. आज तेच क्रेडीट घेण्यासाठी आज आणखी नव्या वादाला तोंड फुटते की असं जाणवते. विषय हा आहे.
एके ठिकाणी संमेलन सुरु होतं. एका लहानशा साहित्य संस्थेचं संमेलन. बरं झालं की तिथं पत्रकार नव्हते. नाहीतर तो मुद्दा वादग्रस्त झालाच असता. विषय होता शिवाजी महाराजांचा जन्म कुणाच्या घरी झाला. तसा प्रश्न एका व्यक्तीनं विचारपीठावरच उपस्थित केला व विचार करायला भाग पाडलं. त्यानंतर त्यानं सांगीतलं की शिवाजी महाराजांचा जन्म एका अमूक अमूक व्यक्तीच्या घरी झाला व आम्ही त्याचे तेरावे वंशज आहोत. त्यानंतर बाकी मंडळीत विचारांचं पेव फुटलं. पेव होतं शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. कुणाच्या घरी नाही तर आणखी काही लोकं म्हणत होते की शिवरायांचा जन्म देशमुखांच्या घरी झाला. आता नेमका कुणाच्या घरी झाला? हा प्रश्न विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि जिथं आपल्या पणजोबाचं नाव माहीत नसतं. तिथं त्या व्यक्तीला तो तेरावा वंशज आहे हे कसं काय कळलं? परंतु काही लोकांना दाखवण्याचीच सवय असते. ती कशी जाईल? तेच घडलं त्या साहित्य संमेलनात.
सगळं दिखाव्याचं जग. असंच एक साहित्य संमेलन सुरु होते. मान्यवर विचारपीठावर बसलेले होते. त्याच्याच बाजूला बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. जे त्या साहित्य संस्थेच्या मंडळाचे होते. तसं पाहिल्यास त्या कार्यक्रमातील काही लोकांनी बाहेर असलेल्या लोकांच्या बसण्याची व्यवस्था पाहणे गरजेचे होते. काही लोकांना वेगळीच कामं होती. परंतु ती मंडळी ते न करता निव्वळ विचारपीठावरच उभी होती. लक्षात येत नव्हतं की ते तिथंच का बरं उभे असावेत. विचारांती बऱ्याच वेळानं लक्षात आलं की त्यांना विचारपीठावरच बसलेल्या नेत्यांसोबत फोटो काढायची होती. आता ती त्यांची फोटो कोण पाहणार होते? त्यांच्या फोटो काढण्याला काय अर्थ होता?
आज फोटोबाजीचा काळ आला आहे. जो तो फोटो काढायला लागलाय. मग तो नेता त्याला ओळखो की न ओळखो, त्याचं त्यांना काही घेणं देणं नाही. परंतु आज असे बरेच कार्यकर्ते दिसतात की त्यांनी नेत्यांसोबत काढलेले फोटो त्यांच्या घरात असतात. कोणाचे राजीव गांधीसोबत फोटो असतात तर कुणाचे अटलबिहारी वाजपेयींसोबत फोटो दिसतात. बरं झालं शिवराय अलिकडील काळातील नाहीत. नाहीतर त्यांच्याही सोबत त्यांनी काढलेल्या फोटोवरुन सांगीतलं असतं की शिवाजी महाराज त्यांना चांगले ओळखतात. मग त्यांना शिवाजी महाराज प्रत्यक्ष ओळखो की न ओळखो.
तो काळच तसा होता की त्या काळात कुणाजवळ फोटो काढायला वेळ नव्हतं. आज सगळं सेल्फीचं जग. आजचं जग असं आहे की आजचा व्यक्ती शत्रूलाही म्हणू शकेल की दादा थोडा थांब. आपण एक सेल्फी काढू. त्यानंतर युद्ध करु आणि आजचं जग डोक्याला कॅमेरा लावून मी अमूक अमूक शत्रूला कसं मारलं हेच दाखविण्याचं आहे. मग आम्ही परास्त झालो तरी चालेल.
सेल्फी किंवा फोटो काढण्याचा नाद. त्या नादात शिवरायांच्या काळात शिवाजीचा महाराजांचा मृत्यू झाला असता आणि जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं शिवाजी महाराजांनी. ते शिवरायांना करता आलं नसतं. आजही तेच घडत शकते. सेल्फी किंवा फोटोच्या नादात शत्रू काही हे म्हणणार नाही की थांब मीही सेल्फी काढण्याची तुझी भावना स्विकार करतो. तो हेच ठरवेल की याला सेल्फी काढेपर्यंत आपण याचा खात्मा करु. त्यानंतर तो युद्ध जिंकेल आणि आपण जागच्या जागीच सेल्फीच्या नादात आपला जीव गमावू. त्याचबरोबर आपलं राज्य आणि राष्ट्र.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आज जरी स्पर्धा असल्या तरी सेल्फीचा नाद कोणी करु नये. तसंच आपलं स्वतःचं क्रेडीट सांगण्यासाठी इतिहासाची तोडफोड करु नये. शिवाजी केव्हा जन्मला आणि कुठं जन्मला याबाबत घेणं देणं, किंतू परंतु बाळगू नये. विचार हाच ठेवावा की त्यांनी जसं कार्य केलं. ते कार्य करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या पावलावर चालून त्यानुसार वागावे. तसंच ते जसे वागले, तसं वागावं. तरंच आपल्यालाही त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य टिकवता येईल. अन् आपण जर तसे वागलो नाही आणि सेल्फी काढत बसलो तर हेच शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य रसातळाला जाईल यात शंका नाही. म्हणूनच आपण शिवरायांसारखंच प्रत्येक पाऊल फुकून टाकावा. काट्यावर पाय देवू नये. हं, प्रसिद्धी तुमचा त्यांच्यासोबत असलेला फोटो मिळवून देत नाही तर प्रसिद्धी मिळवून देतं तुमचं कार्य, जे चांगलं असेल. ज्यांचं कार्य चांगलं असेल, त्याला फोटो काढण्याची गरज नाही. तो आपोआपच प्रसिद्ध होतो तसंच जो खरा वंशंज असेल शिवरायांचा तो बरोबर बाहेर येईल कालानुरूप. त्यासाठी मी अमूक अमूक व्यक्तींचा वंशज आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यावरुन इतिहासाची तोडफोड होते व निव्वळ वाद निर्माण होतात. तसं वाद कोणीही उत्पन्न करु नये. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांसारखेच ठेवावे. त्यांच्या इतिहासात आतातरी जनमतारखेसारखीच तोडफोड करु नये. कारण तो काळ आपण पाहायला गेलेलो नाही आणि त्याचे आपण तेवढेच साक्षीदारही नाही. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED