पालकांच्या धमक्या कुसंस्कारास बाधा? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पालकांच्या धमक्या कुसंस्कारास बाधा?

पालकांच्या धमक्या कुसंस्काराला बळ देतात?

पुर्वी पालक हे सुज्ञतेनं वागायचे. धमक्या द्यायचे नाहीत. उलट म्हणायचे की सर हा अभ्यास करीत नाही. आपण याला चांगला चोप द्या. मग काय शिक्षकांचा रुळ आणि मुलांची पाठ. त्यानंतर ती पाठ सुजलीच म्हणून समजा. त्यातच कोणी सांत्वनाही देत नसत.
एक शाळा होती व त्या शाळेत हिंदीचे शिक्षक काही चुकले तर बेदम मारायचे. त्यांच्या जवळ एक पिशवी होती. त्याच पिशवीत एक लहानशी काठी होती. त्या काठीला सर टप्पू म्हणत असत. एखाद्या विद्यार्थ्यांचं काही चुकलं रे चुकलं की बस. अशातच एका मुलीचं चुकलं. मग काय तिला शिक्षकांनी धू धू धुतला. ती जशी जशी रडायची. तसे तसे सर जास्त मारायचे. मग तिचाही आवाज वाढला आणि शिक्षकांचा मारण्याचाही. शेवटी काय? काय झालं म्हणून बाजूच्या वर्गातील शिक्षक त्या वर्गात आले. त्यांनी त्या शिक्षकांना समजावलं व शिक्षकांनी मारणं बंद केलं. असं होतं त्या काळातील शिक्षकांचं मारणं. त्यावर घरीही काही कोणी म्हणत नसत. घरीही मार पडायचा. आज मात्र तसं नाही. पुर्वीचे पालक साधे चित्रकलेचे जरी असले तरी एका एका हातावर दहा दहा छड्या द्यायचे. त्यांची तासीका असली की सबंध वर्ग चिडीचूप राहायचा. कोणीच बोलायचा नाही.
आज तसं नाही. आजचे पालक शिक्षकांनी एक जरी छडी त्यांच्या पाल्यांना मारली तर तो शाळेत येत असतो. धमक्या देत असतो आणि ती धमकी मुलांसमोर शिक्षकांना देत असल्यानं मुलंही वात्रट वागत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास एका शाळेचं देतो. त्या शाळेत आरक्षण असलेला एक विद्यार्थी बसत होता. त्याला एकदा शिक्षकेनं मारलं. जास्त मारलंही नव्हतंच. कारण अलीकडील काळ हा जास्त मारण्याचा नाही. त्यानंतर त्या मुलानं सायंकाळी घरी जाताच आपल्या आईला सांगीतलं की त्याला संबंधीत शिक्षिकेनं त्याला बेदम मारलं. मग काय, दुसरा दिवस उजळला व त्या मुलासोबत त्याची आई शाळेत हजर झाली व शिक्षकांना काय झालं? प्रकरण काय आहे हे न विचारता तंबी देवू लागली की यानंतर माझ्या मुलाला मारलं तर याद राखा. ॲक्ट्रासिटी ॲक्टनं अंदर टाकीन.
त्या मुलाच्या आईची धमकी. त्या धमकीनंतर संबंधीत शिक्षक घाबरले. मुलगा स्वतःच इतर मुलांशी भांडण करु लागला. तो स्वतःच भांडण करायचा आणि स्वतःच आईला बोलावून आणण्याचा बहाणा करायचा. त्याला शिक्षक समजवायचे. परंतु तो काही ऐकायचा नाही. तसं पाहता दोन तीन वेळा त्यानं आपल्या आईला आणलं होतं. त्यामुळंच शिक्षकही काही म्हणत नव्हते त्याला. हळूहळू वय वाढलं. आज तो सातवीत होता व त्याला त्याच्या कृतीनं अ चं ढं ही येत नव्हतं.
असाच दुसरा मुलगा. हा मुलगा दुसरीत होता. लहान असतांना त्यानं एका मुलाला मांडीवर पेनाचं टोक मारला. त्यानंतर त्याची तक्रार शिक्षकानं त्याच्या आईवडीलाला केली. आईवडील काही बोलले नाही. परंतु काही वेळानं फोन आला. फोनवर आजी बोलली. म्हणाली की आपण माझ्या नातवाला दाटलं, त्यामुळंच त्याला ताप आलाय. त्यानंतर शिक्षक नरमले. ते त्या मुलाला काहीच म्हणत नव्हते. कारण तोही शिक्षकांवर केस करण्याची धमकी देत होता. शाळेत तसाच परीसरात मस्त्या करीत होता आणि आजीच्या लाडानं त्याला कोणी काहीही म्हणत नव्हतं. आज तो मुलगा युवक बनला आहे व एक गुंड म्हणून पुढे आला आहे.
शाळेतील मुलांचं वागणं. त्यावर पालकांचं शिक्षकांशी वागणं. कायद्याचा धाक आदी सर्व बाबी बालकांच्या व्यक्तीमत्वाला घडवीत नाहीत. पालकांच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोरच दिल्या जाणाऱ्या धमक्या त्या धमक्यांनी शिक्षकांची कसोटी पणाला लागते. तो कितीही चांगल्या पद्धतीनं शिकवीत असला तरी त्याचं शाळेत मन रमत नाही. कुठंतरी त्याच्या शिकविण्यात बाधा उत्पन्न होते व त्याचा परिणाम त्याच्या शिकविण्यावर होतो. या पालकांच्या धमक्यांमुळच आजची पिढी वाया जात आहे. आपलं अख्खं जीवन उद्ध्वस्त करीत आहे. परंतु त्याचं त्या पालकांना काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त शिक्षक त्यांच्या मुलांवर काही ओरडत असेल तर ते चालत नाही. आज अशाही काही शाळा आहेत की त्या शाळेतील सातवीचे विद्यार्थी एकमेकांवर चाकूचे वार करतात व मारुन टाकतात आपल्या संवंगड्यांना. त्याला तुरुंग, कैद वा शिक्षा त्या वयात कळतच नाही. बालसुधारगृह असतं. परंतु तिथंही काहीच शिक्षा नसते. मग संस्कार कसे फुलतील विद्यार्थ्यात? हा प्रश्न आहे. कालपर्यंत या गोष्टी नव्हत्या. कालचा कोणताच अल्पवयीन विद्यार्थी शाळेत तरी आपल्या सवंगड्यांवर चाकूचे वार करीत नव्हता. आज मात्र चौथीचा मुलगाही आपल्या सवंगड्यांवर चाकूचे वार करीत असतो. याला जबाबदार कोण? असा प्रश्न कोणी केल्यास निश्चीतच त्याचा दोष पालकांनाच देता येईल. तसंच पालकही शाळेतील शिक्षकांवर त्यांची मुलं शिकवून उपकार केल्यागतच वागत असलेले दिसतात. त्याचं कारण आहे. आजचं लोकसंख्या नियंत्रण तत्व व कुटुंबनियोजन तत्व. अलीकडील काळात हम दो जरी असले तरी हमारा एक वा दोनचं तत्व आल्यानं अलीकडील काळात मुलं पालकांच्या अतिशय लाडाची बनलेली आहेत. त्यामुळंच मुलांना काहीही म्हणता येत नाही. याचाच परिणाम आजच्या एकंदर परिस्थितीवर झालेला असून मरण अतिशय स्वस्त झालेलं आहे. लोकांची मुलं शाळेतून जेव्हा मोठी होतात, ती लाडानं मोठी झालेली असल्यानं पुढील काळात संकटमयी हातात आलेलं शिवधनुष्य पेलवू शकत नाही. त्यामुळंच आत्महत्या सत्र वाढलेलं आहे. आता कोणीही अगदी सहज आत्महत्या करतांना दिसतात. जे पुर्वीच्या काळात दिसत नव्हतं. कारण आव्हान पेलण्याचं सामर्थ्य पुर्वी वर्गावर्गातूनच छडीच्या माध्यमातून शिकविलं जात होतं. जे आज शिकविलं जात नाही.
महत्वपुर्ण बाब ही की आज संस्कार दूर पळालेला आहे. मुलं शिक्षकाला दबत नाहीत. निव्वळ शाळेत गोंधळ करतात. त्यातून मुल्य मरत चाललेली आहेत. संस्काराची हत्या होत आहे. त्यातच त्याची परियंती आत्महत्येतून होत आहे हे तेवढंच खरं. विशेष गोष्ट ही की मुलांवर संस्कार जर करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांना धमक्या देवू नये. शिक्षक काही विद्यार्थ्यांचे शत्रू नसतात की जे विद्यार्थ्यांना जीव घेतील. शिवाय आजपर्यंतच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे नाहीत. हेही तेवढंच खरं. म्हणूनच पालकांची याच गोष्टी लक्षात घेवून शिक्षकांना अभय देवून विद्यार्थ्यांना निर्भयपणाने शिकवू द्यावे. जेणेकरुन विद्यार्थीरुपी लहान बालकं उद्याच्या उज्ज्वल देशाचे सक्षम नागरीक बनतील व देशाला विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेवू शकतील यात शंका नाही. महत्वपुर्ण गोष्ट ही की पालकांच्या धमक्या ह्या मुलात होणाऱ्या कुसंस्काराला बळ देत असतात. मुलांमध्ये कुसंस्कार फुलवीत असतात. ते होवू नये म्हणून पालकांनीच खबरदारी घेवून वेळीच जागं व्हावं व शिक्षकांना अपमानदायक वागणूक देवू नये. धमक्या तर देवूच नये आपल्या पाल्यांसमोर. जेणेकरुन पाल्यात सुयोग्य, सकारात्मक बदल होतील व पालकही संतुष्ट व प्रफुल्लीत होतील.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०