मदिराप्राशनाचा अतिरेक नकोच Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मदिराप्राशनाचा अतिरेक नकोच

मदीराप्राशनाचा अतिरेक नको?

*मदीराप्राशन अशी गोष्ट की ती केल्यानंतर आपण काय करतो? कसे बोलतो? कसे वागतो? याचं भान नसते. म्हणूनच मदिरापान करुन नये. कारण त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होतात व अख्खं कुटूंबच देशोधडीला लागत असतं.*
मदिराप्राशन...... खरं तर मदिराप्राशन करणं ही ही काही वाईट गोष्ट नाही. कित्येक लोकं मदिराप्राशन करतात. काही छंद म्हणून तर काही सवय म्हणून. काही लोकांना मदिराप्राशनची एवढी सवय असते की ते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मदिराप्राशनच्या तालातच थिरकत असतात. मदिराप्राशन करणाऱ्यांचेही दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की जी मंडळी मदिराप्राशन करतात. ती अजीबात बोलत नाहीत. त्यावरुन त्यांनी मदिराप्राशन केलं की नाही हा विचारच असतो. ते दिसतच नाहीत तसे. दुसरा प्रकार असतो. तो म्हणजे मदिराप्राशन करणारा व्यक्ती एवढा बोलतो की त्याचं बोलणं संपत नाही. जसा तोच एक जगातील बादशाहा असतो की त्यालाच मदिराप्राशन करता येतं. इतरांना नाही.
मदिराप्राशन ही एक कला आहे. त्या कलेनुसार जो वागतो. तो कधीच उध्वस्त होत नाही. कारण मदिराप्राशन हे थोडं थोडं प्रमाणानुसार करावं लागतं. जर तसं केलं तर ते अंगाला लागतं. नाहीतर तेच मदिराप्राशन अंगाला फाडून खात असतं. काही लोकं असेही असतात की ते मदिराप्राशन एवढे करतात की त्यांना होशच नसतं. तर काही लोकं हे मदिराप्राशन लिमीटमध्येच करीत असतात.
एक उदाहरण देतो. एक व्यक्ती असा आहे की त्यानं सांगीतल्यानुसार त्याला सवय आहे. त्यानं जर मदिराप्राशन केलं नाही तर त्याचं शरीर थरथर कापायला लागतं. म्हणूनच तो सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेला मदिराप्राशन करतो.परंतु तो प्रमाणाच्या बाहेर जात नाही आणि त्याचाच मुलगा दिवसभर पिवून राहतो.
मदिराप्राशनची सवय काही जन्मजात नसतेच. आम्हाला आमचे वडील अगदी बालवयातच एक झाकणभर मदिरा द्यायचे. ते आमच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून. परंतु ती सवय आम्हाला लागली नाही. कारण आमच्या वडीलांनी मदिरेचा उपयोग आमच्यासाठी एक टॉनिक म्हणून केला. मदिरा म्हणून नाही. जेव्हा वयात आलो आणि शाळाच शिकत होतो. त्यावेळेस मीही निवडणुकीचा प्रसार करायला लागलो. त्यावेळेस मदिरेचा गैरवापर कसा होतो. तेही मी पाहिलं. मला सवय लागली नाही. कारण माझे वडील भरपूर प्यायचे. त्यामुळंच पैसा उरायचा नाही.
मदिराप्राशन सुटतं. परंतु कोणी त्यावर सतत टाकत गेलं तर. परंतु लोकं टाकत नाहीत व विचार करतात की आमच्या घरातील काय जातं. ती मंडळी दुसऱ्याचं घर जळत असतांना त्यात आनंद शोधत असतात. याला असुरी आनंद म्हणतात.
मदिराप्राशन सुटंत. ते जर मदिराप्राशन करणाऱ्या व्यक्तीनं मनात आणलं तर.......याबाबतीत एक प्रसंग सांगतो. माझाच एक मित्र. एक व्यक्ती हवं तर त्याला मुलगा म्हणता येईल. वय वर्ष एकोणवीस सुरु असतांना त्याला एका गावातील नेत्यानं आपल्यासोबत प्रचाराला फिरवले. सायंकाळी तो नेता प्रचार झाला की गाडी एका धाब्यावर थांबवायचा. मग त्या धाब्यावर तो आदेश द्यायचा की बिल तो देणार. हे माझे कार्यकर्ते आहेत. यातील ज्याला जेवढी मदिरा प्यायची असेल, तेवढी त्याला मदिला प्यायला द्या. पैशाचं पाहून घेवू. तसा तो नेताही पियक्कडच होता.
माझा तो मित्र. तो एकोणवीस वर्षाचा होता व नुकतीच त्याला सरकारी नोकरी लागली होती. ते त्या नेत्याला माहीत होतं. त्यानंच लावून दिली होती सरकारी नोकरी. तिही त्याच्याच शाळेत. त्यानंतर त्या एकोणवीस वर्षाच्या मुलानं मदिरापान केलं. ते मदिरापान एवढी चढली त्याला की समोरचा ग्लासच दिसत नव्हता. त्यानंतर त्याला तेथील काही कार्यकर्त्यांनी ग्लासातील पाणी पाजलं. ते त्या नेत्यानंच पाजायला लावलं होतं. त्यानंतर काही वेळानं माझा मित्र होशात आला. तेव्हा तो नेता त्या माझ्या मित्राला म्हणाला,
"मदिरापान ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तू आता मास्तर बनतो आहस. मग तू जर असा मदिराप्राशन करीत राहशील, तर आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवशील?"
काही दिवस गेले. काही दिवसानं तोच मित्र त्या नेत्याच्या बारवर सकाळी गेला. सकाळी सकाळीच तो नेता मदिरापान करुन असलेला दिसला. त्यावेळेस त्याला फार चढलेली होती. त्याला पाणी हवं होतं. सर्व नोकरचाकर त्याच्या आजुबाजूला उभे होते. परंतु कोणीही त्याला पाणी द्यायला तयार नव्हतं. अशातच त्या मित्रानं पाणी दिलं. त्यावेळेस तो माझ्या त्या मित्राला पुन्हा म्हणाला,
"मदिराप्राशन वाईट गोष्ट. ती करु नये. हे बघ, हे माझेच नोकर. माझ्या पैशावर राज करतात. परंतु मला आता पाणीही देत नाहीत. कारण मी प्यायलेला आहे. म्हणूनच मी तुला त्या दिवशी सांगत होतो की मदिराप्राशन वाईट गोष्ट आहे."
तो प्रसंग. त्या प्रसंगाचा बोध घेतला त्या मित्रानं व त्यावेळेपासून त्यानं मदिराप्राशन कधीच केलं नाही. आता तो निवृत्तही झाला आहे.
मदिराप्राशन करणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. ती करुच नये. कारण ती गोष्ट चार लोकांतून तुम्हाला तुम्हाला उठवते. तुमचीच बदनामी करते आणि तेवढीच तुमची गैरसोयही यात शंका नाही. मदिराप्राशननं घराची राखरांगोळीही होत असते. पैसा उरत नाही. मुलांना त्रास होतो. पत्नीला त्रास होतो. नातेवाईक येत नाहीत. ढुंकूनही पाहात नाहीत. खरं पाहिल्यास मदिराप्राशन ज्या घरात केलं जातं. त्या घराला संपूर्णतः वाळीत टाकलेलं असतं. म्हणूनच मदिराप्राशन करु नये आणि करायचंच झालं तर त्यात मर्यादा असावी. तिला एक औषधी म्हणून घ्यावं. तिचा अतिरेक करु नये. नाहीतर ती तुमचाच अतिरेक करुन टाकेल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३४५९४५०