सारांश आणि श्वेताची नजर एकमेकांचा नजरेशी भीडली आणि दोघेही एकाच ठिकाणी त्यांचे पाय रोवल्याप्रमाणे तेथेच उभे राहून गेले. मग क्षणात श्वेताला भान झाले की ती घराचा समेर उभी आहे तर ती लगबगीने पुढे निघाली. आता सारांश सुद्धा तीचा मागोमाग निघाला होता. मग सारांशने श्वेताचा मगोमागे लवकर जाऊन त्याने तीला घराचा पासून लांब एका ठिकाणी शेवटी गाठले आणि त्याने तिला आवाज दिला "श्वेता थांब मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे." सारांशचा आवाज ऐकून श्वेता थांबली, परन्तु तीचे मागे वळून बघण्याचे धाडस होत नव्हते. ती तशीच एकाच ठिकाणी उभी राहिली डोळे बंद करुन, मग सारांश तीचा समोर आला तरीही तीचे धाडस होत नव्हते त्याचा नजरेशी नजर मीळवायची. मग सारांश तीला म्हणाला, " श्वेता मला तुझ्या सोबत आपल्या दोघांचा बद्दल बोलायचे आहे. काय तू आज रात्री पुन्हा गच्चीवर येशील आणि एक महत्वाचे म्हणजे की काल जे काही घडले ते पुन्हा घडणार नाही याचे तुला मी वचन देतो. तर प्लीज मला माझे मन तुझ्या समोर मोकळे करायचे आहे. तेव्हा माझ्यासाठी तुझी थोडीशी वेळ देशील काय. आज रात्रीला दहा वाजता मी तुझी गच्चीवर वाट बघेन," असे म्हणुन तो
पुढे निघून गेला.
सारांश तेथून पुढे निघून गेला परन्तु श्वेता तेथेच उभी होती डोळे बंद करून, सारांशचे शब्द ऐकून तीचा अंगावर काटा उभा राहिला होता, तीला ते कालचा रात्रीचे क्षण आठवू लागले होते. तेवढ्यात तीची एक मैत्रिण तेथे आली आणि म्हणाली, " श्वेता काय झाले कामाला जायचे आहे की नाही. तेव्हा श्वेता त्या विचारांतून बाहेर आली अणि मग तीचा सोबत कामाला जाण्यासाठी नीघाली. श्वेताचे कामावर आणि सारांशचे कॉलेज मध्ये आज काही मन चित्त लागत नव्हते. सारांशला विचार येत होता की आज श्वेताचा समोर कसे आणि काय बोलायचे. तीकडे श्वेताला
विचार येत होता की सारांश काय बोलणार आहे आणि मी त्याचा सामना कशी करणार. याच विचारात दोघांचा ही दिवस संपृष्टात आला. मग श्वेता ही आज लवकर लगबगीने घरी परतं गेली होती. तीकडे सारांशने कॉलेज संपत्यावर पार्ट टाइम जॉबवर जाण्याचा आजचा बेत उद्यावर टाळला होता, कारण की त्याला स्वतःला श्वेताचा समोर जाण्यासाठी तयार करायचे होते. म्हणून तो सुद्धा कॉलेज संपल्यावर थेट घरी येऊन ठेपला होता. आता फक्त आणि फक्त प्रतीक्षा होती ती रात्रीचे १० वाजण्याची.
सारांशला आता एक क्षणही रहावत नव्हते, घड्याळात फ़क्त आठ वाजले होते आणि तो दोनदा गच्चीवर जाऊन आला होता. त्याचबरोबर त्याचा मनात प्रश्न सारखे येत जात होते की श्वेता गच्चीवर येणार की नाही. आता भवीष्याचा गर्भात काय आहे ते सगळ दहा वाजल्या नंतर कळणार
होते. इकडे श्वेताचा मनात सुद्धा प्रश्नांचे युद्ध सुरु झाले होते. जसजसी वेळ जवळ जवळ येत होती तसे तसे तीचे मन त्या प्रश्नांनी आणखीन वीचलीत होत होते. तीला प्रश्न येत होते, तीला गच्चीवर जायला हवे की नाही. तीला तेथे पुन्हा जाणे बरे राहिल की नाही, असा प्रश्न तीला सारखा बेचैन करत होता. त्याचबरोबर तीला भीती सुद्धा वाटत होती ती सारांशचा सामना कसे करणार. अशाच प्रश्रांत अडकून ती वेंधळलेल्या मनाने घरची कामे करत होती. मग काही वेळाने घड्याळात साढ़े नऊ वाजले होते आणि आता श्वेताला पुढचा क्षणाचा विचार करून प्रचंड घाम सुटला होता. तीला घाबरल्या सारखे होऊ लागले आणि तीचे सर्वांग चिंब घामात भिजुन न्हाऊन गेले होते. तीला आता घरचांची आणि शेजारचांची सुद्धा काळजी होऊ लागली. कुणी आम्हाला बोलताना बघीतले तर काय म्हणतील, काय विचार करतील, आशा विचारांनी ती आता फारच हैराण होऊन गेलेली होती. ती काही नीर्णयच घेऊ शकली न्हवती आणि ती वेळ म्हणजे घड्याळात रात्रीचे दहा वाजले होते.
घड्याळातील काटा जेवढ्या गतीने हालचाल करत होता तेव्हा तिचा हृदयाचे स्पंदन मात्र त्याचा दुप्पट गतीने धड़ धड करू लागले होते. ती नाही आणि हो चा द्वंद यात होरपळून गेली होती आणि तीचे पाऊल काही घरातुन बाहर नीघत नव्हते. घड्याळात रात्रीचे दहा वाजून पंधरा
मिनिटे झालेली होती आणि सारांश नेमका दहा वाजल्यापासून गच्चीवर जाऊन पोहोचला होता. त्याचे डोळे श्वेताचा गच्चीचा त्या दाराकड़े आणि त्याचे कान श्वेताचा पायातील पैंजन यांचा आवाजाकड़े सारखे लागुन होते. त्याचा मनातील उत्कंठा वेळेवेळेने अनावर होत चालली होती. तरीही तो त्याचा सगळा धीर एकवटून मोठ्या आतुरतेने श्वेताचा येण्याची वाट बघत बसला होता. आता त्याला श्वेताचा समोर बोलण्याची नव्हे तर फ़क्त आणि
फ़क्त श्वेताचा येण्याची प्रतीक्षा आणि काळजी लागली होती. क्षणात त्याचे मन म्हणू लागायचे कि ती नाही येणार आणि क्षणातच म्हणु लागायचे की ती येणार नक्की येणार. अशातच घड्याळात रात्रीचे १०.४५ होउन गेले होते आणि दोघांचा ही मनाची घालमघाल सुरु होतीच, आता मात्र
सारांशचे मन हताश होऊन गेले होते, श्वेताचा येण्याची त्याची अपेक्षा आता हळुहळू लोप पावत चालली होती.
तीकडे श्वेताचा मनात आता दुसऱ्या कुणाचा नव्हे तर फ़क्त आणि फ़क्त सारांशचा विचार येऊ लागला होता, तो आला असेल की नसेल, जर आला असेल तर काय करत असेल, मी त्याचा समक्ष गेल्यावर तो काय म्हणेल की माझ्यावर रागावेल उशिरा आल्यामुळे. असा विचार करत करत शेवटी श्वेताचा लक्षात आले की रात्रीचे ११.१५ होउन गेले आणि भेटण्याची वेळ होऊन १ तासाचा वर होउन गेला आहे. ती आता स्वतःलाच दोष देत बसली होती. ती स्वतःशीच बोलू लागली होती, " सारांशने मला इतक्या आतुरतेने बोलावले होते ते ही फ़क्त बोलण्यासाठी आणि मी
वेडी त्याला वाट पाहत ठेवून येथे फ़क्त विचारच करत बसली आहे." मग थोडा वेळ थांबल्यावर ती पुन्हा बोलली, " मला आता काही केल्या जावे लागेल तो माझी वाट बघत बसला असेल, परन्तु तो खरच आला असेल काय आणि आता इतका वेळ मी केला तर तो आता तेथेच बसला असेल काय, असा विचार करत ती आता गच्चीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा दिशेने जाऊ लागली होती. तीकडे रात्रीचे ११.२५ झाले होते म्हणून शेवटी हताश आणि नीराश होऊन सारांश त्याचा गच्चीचा दाराकड़े जाण्यास नीघाला होता. तो जाताना सारखा विचार करत आणि स्वतःला दोष देत चालला होता. तो स्वतःला म्हणू लागला, " मी का बर तसे कृत्य श्वेताचा बरोबर केले, मी त्यावेळेस स्वतःवर आणि स्वतःचा मनावर नियंत्रण ठेवायला हवा होता, नक्कीच श्वेता माझ्यावर रागावली असेल म्हणून ती मला भेटायला आली नाही." असे म्हणता म्हणता तो जिण्याचा दाराचा
आत शीरला आणि दिसेनासा झाला, तेव्हा त्याच क्षणी नेमकी श्वेता ही गच्चीचा दारातून बाहेर गच्चीवर येऊन ठेपली, ती काय बघते तर सारांश तेथे नव्हता.
शेष पुढील भागात........