किमयागार - 22 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 22

किमयागार
या किमयागारांनी आपले पूर्ण आयुष्य प्रयोगशाळेत धातू शुद्ध करण्यात घालवले होते. त्यांचा विश्वास होता की जर कोणताही धातू अनेक वर्षे तापवला तर तो त्याचे गुणधर्म सोडतो व मिळतो तो जगाचा आत्मा.
या जगतआत्म्याच्या सहाय्याने त्याना जगातील अनेक गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. कारण ही एक वैश्विक भाषा आहे जी सर्व ठिकाणी वापरता येते. ते जे कार्य करत होते ते घन व द्रव स्वरूपात होते. त्या कार्याला ते तज्ञांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य मानत.
मुलगा म्हणाला, तुम्ही भाषा कळण्यासाठी माणसांचे निरीक्षण व शकुन चिन्हांचा वापर करू शकत नाही का?.
इंग्रज म्हणाला, तुला सर्व गोष्टी सोप्या करण्याचे वेड आहे. किमयागारी हे एक मोठे शिस्तबद्ध काम आहे. सर्व गोष्टी तज्ञांनी सांगितलेल्या पद्धतीने तंतोतंत कराव्या लागतात. ते करत असलेल्या कार्याच्या द्रव भागाला अमृत (रामबाण औषध) असे नाव आहे.कारण त्यामुळे कोणताही आजार बरा करता येऊ शकत असे. आणि त्यामुळेच किमयागार आपले तारुण्य टिकवून ठेवू शकत होते.
आणि घन भागाला परिस असं म्हणतात. त्यामुळे कोणत्याही हिन धातूचे सोन्यात रूपांतर करता येते.
किमयागार - शुद्धीकरण
इंग्रज म्हणाला, परिस सापडणे खूप अवघड काम आहे. किमयागारांनी त्यांचे आयुष्य धातू शुद्ध करणाऱ्या अग्नीचे निरीक्षण करण्यात घालवलेले असते. ते त्या अग्नीजवळ अनेक वर्षे असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी निरर्थक वाटू लागतात.
आणि त्यांच्या लक्षात येते की, धातू शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेत त्यांचेच शुद्धीकरण झाले आहे.
मुलाला क्रिस्टल व्यापाऱ्याची आठवण झाली. तो म्हणाला होता, मुलाने क्रिस्टल साफ करणे त्याच्या हिताचे होते कारण त्या निमित्ताने त्या दोघांच्या मनातील नकारात्मक विचारांची घाण पण स्वच्छ होणार होती. आणि मुलाला विश्वास वाटू लागला होता की किमयागारी आपल्या रोजच्या जीवनातून पण शिकता येईल.
इंग्रज म्हणाला, परिस ही एक मौल्यवान वस्तू आहे कारण एखादा छोटासा चांदीचा तुकडा पण मोठ्या प्रमाणात सोन्यात रुपांतरित होतो. हे ऐकल्यावर मुलाला किमयागारीमध्ये अधिक रस वाटू लागला.
त्याने विचार केला, धैर्य व सहनशीलतेच्या जोरावर तो कोणत्याही गोष्टीचे 'सोने' करू शकतो. त्याने हे करण्यात यशस्वी झालेल्या लोकांच्या गोष्टी वाचल्या. त्या गोष्टी भारून टाकणाऱ्या व विस्मयकारक होत्या. प्रत्येकाने आपले भाग्य मिळवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले होते. त्या लोकांनी खूप प्रवास केला होता, तज्ञांचे सल्ले घेतले होते आणि चमत्कार घडवले होते. आणि त्यांच्याकडे परिस आणि अमृत होते.
किमयागार- महत्कार्य
परंतु जेव्हा मुलगा महत्कार्य कसे करावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला काही कळेनासे झाले. कारण त्यात फक्त सांकेतिक भाषेत सुचना होत्या.
काही चित्रे होती आणि अस्पस्ष्ट व अगम्य भाषा वापरली होती. या सर्व गोष्टी इतक्या अवघड का केल्या आहेत मुलाने इंग्रजाला विचारले. कारण ही जबाबदारी पेलण्याची क्षमता असलेल्यांनाच या गोष्टी समजाव्या. कल्पना कर जर सगळ्यांनाच हे जमले तर सोन्याला काही किंमतच राहणार नाही.
जे सातत्याने परिश्रम करणारे असतात, मनापासून व सखोल अभ्यासाची तयारी असणारे जे असतात तेचं महत्कार्य करू शकतात.
मी या वाळवंटात आलो आहे त्याचे कारण हेच आहे, मी अशा एखाद्या किमयागाराच्या शोधात आहे जो मला हे सर्व उलगडून सांगू शकेल. मुलाने विचारले ही पुस्तके कधी लिहीली आहेत?. खूप शतकांपूर्वी इंग्रज उत्तरला. मुलगा म्हणाला, तेव्हा छापखाने नव्हते आणि यामुळे किमयागारीबद्दल सगळ्यांना कळेल अशी शक्यता नव्हती. मग ही अशी विचित्र भाषा आणि चित्रे कशासाठी?.
इंग्रजाने त्याला या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तो म्हणाला, मी गेले काही दिवस तांड्याचे निरीक्षण करत आहे पण मला काही नवीन शिकायला मिळाले नाही. फक्त एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे टोळीयुद्धाचे प्रमाण वाढते आहे.