किमयागार - 25 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 25

किमयागार ओॲसिस
तांड्याच्या नेत्याने त्याचे पहारेकरी व इतरांना पण त्यांच्याकडील हत्यारे टोळी प्रमुखाने नेमलेल्या माणसाकडे देण्यास सांगितले.
नेता म्हणाला, हा युद्धाचा नियम आहे. ओॲसिस मध्ये सैनिकांना आश्रय नाही.(संघर्ष होऊ नये म्हणून).
इंग्रजाने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर बॅगेतून काढून शस्त्रे गोळा करणाऱ्याकडे दिले.
ते पाहून मुलाला आश्चर्य वाटले, त्याने विचारले रिव्हॉल्व्हर कां दिले?.
इंग्रज म्हणाला त्यामुळे एकमेकांवरील विश्वास वाढतो.
मुलाच्या मनात खजिन्याविषयी विचार चालू झाले होते. तो त्याच्या स्वप्नाच्या जेवढा जवळ जात होत होता, तेवढ्याच सर्व गोष्टी अवघड होत होत्या. राजा म्हणाला होता त्याप्रमाणे नविन सुरुवात करणाऱ्याचे नशीब हा सिद्धांत (अनुकुलतेचा सिद्धांत) सध्या काम करत नाही असे त्याला वाटले.
त्याच्या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत त्याने अनेक परीक्षा दिल्या होत्या. अनेक समस्या,संकटांना धैर्याने व चिकाटीने सामना केला होता. त्यामुळे आता अधिर होण्याची किंवा घाई करणेची आवश्यकता नाही असा विचार त्याच्या मनात आला. भावनेच्या भरात वागण्यामुळे कदाचित त्याच्या मार्गात जी शकून चिन्हे ठेवली असतील ती त्याला कळू शकणार नाहीत.
किमयागार -शोध - Girish
परमेश्वराने माझ्या मार्गात शकुन चिन्हे ठेवली आहेत या विचाराचे त्याला आश्चर्य वाटले.
तो ओमेन्स ना या जगातील मानत होता.जसे खाणे ,झोपणे , नोकरी शोधणे. त्यांचा त्याने काय करावे हे सांगण्याची देवाची भाषा म्हणून कधी विचार केला नव्हता. तो स्वतःशी म्हणाला एवढे उतावीळ होऊन उपयोग नाही.
उंटचालक म्हणाला होता तसाच विचार केला पाहिजे
"खा जेव्हा खाण्याची वेळ असेल आणि पुढे जा जेव्हा पुढे जाण्याची वेळ असेल."
पहिल्या दिवशी सगळे लवकर झोपले.
मुलाला जो तंबू मिळाला होता तो त्याच्या मित्राला (इंग्रज) मिळालेल्या तंबू पासून लांब होता. त्याच्या तंबूत त्याच्या वयाचे पाच तरुण होते.
ते वाळवंटात राहणारे होते आणि त्याच्याकडून शहरातील गोष्टी ऐकायला उत्सुक होते.
मुलाने त्याना तो मेंढपाळ असतानाच्या गोष्टी सांगितल्या व तो क्रिस्टल दुकानातील अनुभव सांगणार इतक्यात इंग्रज तेथे आला व त्याला बाहेर घेऊन जात म्हणाला, मी सकाळपासून तुला शोधत आहे.
किमयागाराला शोधण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे.
त्या दोघांनी स्वतःच शोध सुरू केला. त्यानी विचार केला की, ओॲसिस मधील इतर लोकांपेक्षा त्याचे राहणीमान वेगळे असेल आणि त्याच्या तंबू मध्ये सतत अग्नी पेटलेला असेल.
त्यांनी शोध सुरू केल्यावर त्यांच्या लक्षात आले की इथे शेकडो तंबू आहेत व असे शोधणे अवघड आहे. एका विहिरीजवळ ते थांबले. इंग्रज म्हणाला आपला एवढा वेळ फुकट गेला. मुलगा म्हणाला, 'आपण कोणाला तरी विचारले पाहिजे.'. इंग्रजाला आपण येथे का आलो आहे हे कुणाला कळू द्यायची इच्छा नव्हती त्यामुळे तो काही बोलला नाही. पण थोड्या वेळाने तो म्हणाला, 'ठिक आहे. तुला अरबी येत असल्याने तूंच हे काम कर.'
एक काळे कपडे घातलेली स्त्री तेथे आली. मुलगा म्हणाला , शुभ दुपार. या ठिकाणी राहत असलेल्या किमयागाराचा आम्ही शोध घेत आहोत. महिला म्हणाली मी अशा कुणाला ओळखत नाही आणि निघून गेली.
जाता जाता म्हणाली की काळे कपडे घातलेल्या कोणत्याही महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. येथील परंपरेत ते बसत नाही. इंग्रजाला वाटले की आपण एवढा प्रवास करून येथे आलोय खरं पण आता काय होणार?.
मुलगा थोडा निराश झाला. आपला मित्र त्याचे भाग्य मिळवणेचा प्रयत्न करतोय. त्याचे ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करत आहे. आणि जेव्हा कोणी असे आपले भाग्य मिळवण्यासाठी धडपडत असतो तेव्हा वैश्विक शक्ति त्याला मदत करते असे राजा म्हणाला होता व राजाचे म्हणणें खोटे नसते.
मी किमयागारा बद्दल ऐकलेले नाही पण इथे तो कुणाला माहीत असेल असे वाटत नाही.
अचानक इंग्रजाला काहीतरी सुचले. तो म्हणाला, किमयागार कोण आहे हे कदाचित कुणाला माहीत नसेल पण लोकांचे आजार बरे करणारा असा माणूस तर माहीत असेल, आपण अशा माणसाबद्दल विचारले पाहिजे.