किमयागार - 26 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 26

किमयागार - भाषा 'प्रेमाची'.
शेवटी तिथे एक तरुणी आली. तिने काळे कपडे घातले नव्हते.
तिच्या खांद्यावर कळशी होती. तिचे डोके पदराने झाकले होते पण चेहरा दिसतं होता. तरुण तिच्या जवळ किमयागाराबद्दल विचारणेसाठी गेला.
त्याच क्षणी त्याला काळ थांबला आहे असे वाटले. जगद्आत्म्याचा त्याच्यामध्ये संचार झाला आहे असे त्याला वाटले. त्याने तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहिले, तिचे अर्धोन्मिलित ओठ व स्मितरेषा (अर्धवट मिटलेले ओठ व हास्य ) पाहून त्याला अशा भाषेचे ज्ञान झाले, जी भाषा सर्व जगाला कळू शकते आणि जी थेट हृदयाला भिडते
आणि ती भाषा म्हणजे ' प्रेमाची भाषा '. माणूसकी हून अधिक जुनी आणि वाळवंटापेक्षा प्राचीन अशी ही भाषा.
दोघांची नजरभेट झाल्यावर जी एकाच वेळी दोघांनाही एक वेगळीच जाणिव देणारी ही भाषा आत्ता या विहिरीजवळ त्या दोघांमध्ये बोलली जात होती.
तरुणी त्याच्याकडे पाहून हसली आणि सॅंटिॲगोला वाटले, ज्या शकुनाची आपण वाट पाहत होतो, तो शुभ शकुन आणि ती शुभ वेळ आत्ता आपण अनुभवत आहोत.
जी गोष्ट तो आतापर्यंत त्याच्या मेंढ्या, क्रिस्टल आणि वाळवंटातील शांततेत शोधत होता.

किमयागार - प्रेम
ही जगाची शुद्ध भाषा आहे. या भाषेला कोणतीही व्याख्या किंवा स्पष्टीकरण लागू होत नाही.
ती एक अंतर्मनातील ऊर्मी असते जी अचानक निर्माण होते व एकाच वेळी दोघांनाही जाणवते. त्याला जाणवले की, आपल्याला आपल्या जीवनात हवी असणारी हीच ती जोडीदार आहे. आणि हे शब्दात सांगण्याची गरजच नव्हती की त्या तरुणीच्या पण याच भावना होत्या.
एवढ्या खात्रीशीरपणे आतापर्यंत त्याला कोणतीच गोष्ट जाणवली नव्हती.
त्याचे आईवडील,आजी आजोबा सांगत की एखाद्या स्त्रीला भेटणे, जाणून घेणे, प्रेम वाटणे हे तिच्या बरोबर नाते जोडले जाण्यासाठी महत्वाचे आहे.
पण असे ज्यांना वाटते त्यांना जगाची सांकेतिक भाषा कळलेली नसते.
कारण जेव्हा तुम्हाला जेव्हा ही भाषा कळते त्यामुळे तुम्हाला असे वाटते की, या जगात कुठे तरी मग ते एखादे गाव असेल किंवा वाळवंट, तिथे आपली वाट पाहत असलेले कोणीतरी आहे.
आणि असे तरुण तरुणी जेव्हा एकमेकांसमोर येतात आणि त्यांची नजर भिडते
व त्यातून जी आंतरिक उर्मी निर्माण होते तिच्यापुढे भुतकाळ, भविष्यकाळ नसतो.
तो एकचं क्षण असतो की तेव्हा जाणवते की या पृथ्वीतलावर एकच हात आहे ज्याने सर्व काही लिहून ठेवले आहे. तिचं शक्ती दोघांमध्ये प्रेमाची उर्मी निर्माण करते आणि या दोन आत्म्यांचे मिलन घडवत असते. अशी प्रेमभावना स्वप्नांना नवा अर्थ देत असते.
किमयागार -फातिमा - Girish
' मक्तुब ' तरुणाला हा शब्द आठवला.
(सर्व काही लिहिलेले असते). इंग्रज तरुणाला म्हणाला, जा तिला विचार. तरुण तिच्या जवळ गेला, ती त्याच्याकडे बघून हसली तेव्हा तोही हसला.
त्याने विचारले 'तुझे नांव काय आहे?. '
तिने त्याच्याकडे न बघता उत्तर दिले
' फातिमा '.
तो म्हणाला , माझ्या देशात पण काही मुलींचे हे नाव आहे.
हे प्रेषितांच्या मुलीचे नाव आहे. इतर देशांवर स्वारी करणाऱ्या लोकांनी हे नाव सगळीकडे नेले आहे.
हे सांगताना तिच्या स्वरात अभिमान होता. इंग्रजाने तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला भानावर आणले.
तरुणाने विचारले ' तुला लोकांचे आजार बरे करणारा माणूस माहीत आहे का?.'
ती म्हणाली, " त्या माणसाला जगातील सर्व गुपिते माहीत आहेत. तो वाळवंटातील जिनीं बरोबर संपर्क साधू शकतो. जिन म्हणजे चांगले व वाईट आत्मे असतात. (जिन म्हणजे असे आत्मे जे बोलाविल्यास माणसाला मदत करतात).
आणि तरुणीने दक्षिणेकडे बोट केले म्हणजे तो माणूस त्या बाजूला राहतो असे सांगितले व कळशी घेऊन तरुणी गेली.
इंग्रज हे ऐकताच लगेच त्या दिशेने निघून गेला होता.
तरुण काही वेळ विहिरीजवळ थांबला.
त्याला आठवत होते की, तरिफामध्ये वाऱ्याच्या झोताबरोबर स्रीचा गंध‌ आला होता आणि ती अस्तित्वात आहे की नाही हे माहित नसतांनाही तो तिच्या प्रेमात पडला होता. त्याला खात्री होती की, तिच्यावरचे त्याचे प्रेम जगातील सर्व खजिने शोधण्यासाठी त्याला समर्थ करेल.