प्रेम म्हणजे काय Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम म्हणजे काय

यालाच प्रेम म्हणावे काय?

प्रेम आंधळं असतं........प्रेम आंधळं बनायला लावतं. हे खरंच आहे.
अलिकडे प्रेमाला फार महत्व आहे. कारण जीवनात प्रेम जर नसेल तर माणसं जगू शकणार नाहीत. ती जीवंत असली तरी त्यांची अवस्था मेलेल्या मुदड्यागत होईल यात काहीच शंका नाही.
आज जग प्रेमावरच आधारलेले आहे. प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे. परंतू आज प्रेम निःस्वार्थपणे करीत नाहीत लोकं. लोकं प्रेमाला स्वार्थाच्या कक्षेत मोजत असतात.
प्रेम काही एकाच प्रकारचं नसतं. प्रेम हे देवावरचं असू शकतं. प्रेम मायबापावरचं असू शकतं. बहिणीवरचं असू शकतं. तसेच एखाद्या मैत्रीणीवरचं असू शकतं. परंतू आपल्याला फक्त एकच प्रेम कळतं. ते म्हणजे आपलं प्रेयसीवरचं प्रेम. तेच जगात सर्वात मोठं प्रेम वाटत असतं माणसाला. जर ती मुलगी असेल तर तिला मित्राचं प्रेम आईपेक्षाही मोठं वाटतं. परंतू तेव्हा हे कळत नाही की ती किंवा तो आपल्या लायक आहे की नाही. प्रेमात अगदी आंधळं होवून आपण आपल्या हालचाली करीत असतो.
अशावेळी आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी आपली आई आपल्याला आवडत नाही. आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारा आपला पिता आवडत नाही आणि निःस्वार्थ प्रेम करणारी आपली भावंडं आवडत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आवडतो तो प्रियकर आणि मुलाला आवडते ती प्रेयसी. तेच आपल्याला विश्व वाटतं. अर्थात ज्याप्रमाणे एखाद्या मासोळीला एखादा तलाव म्हणजे समुद्र वाटतो. अगदी तशीच व्याख्या प्रेयसी प्रियकरांची एकमेकांबद्दल असते. परंतू जेव्हा तलाव सुकतं आणि त्या मासोळ्या तडफडून मरतात. तशी अवस्था मायबापाचं न ऐकल्यानं या तरुण तरुणीची होते.
प्रेम हे आंधळं बनविणारं असतं. प्रेयसी आणि प्रियकर यात आंधळे बनत असतात. त्यांना इतर भागातलं काहीच दिसत नाही. दिसतं फक्त तिच्याबद्दलचं भाकीत आणि तिला त्याच्याबद्दलचं भाकीत. तो तिला मी आत्महत्या करील जर तू नाही मिळाली तर असं म्हणून विवश करीत असतो. तिही तशीच. दोघंही एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत असतात. मग यावर मायबाप कितीही सांगत असले. कोणी इतरही माणसं कितीही सांगत असले तरी ते आपल्याला वाईट सांगतात असंच वाटतं. तो वाईटही बोलत असेल, तरी त्याचं बोलणं तिला चांगलंच वाटतं. त्याची अवस्था तशीच.
एक प्रसंग सांगतो. दोन प्रेमविरांचा प्रसंग. हवं तर ही कथा आहे. या प्रसंगात प्रियकर म्हणतो,
"मी तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो." तशी प्रेयसी म्हणाली,
"जर तू माझ्यावर जीवापाड प्रेम करीत असशील तर एक काम करशील?"
"कोणतं?"
"आपला विवाह होण्यापुर्वी मला तुझ्या आईचं ह्रृदय हवं. बोल, आणशील का? ते आणल्यावरच आपण विवाह करु."
मुलगा प्रेमात आंधळा. तो तिला ती काय बोलत आहे हे समजू शकला नाही. ते ऐकताच तो ताबडतोब घरी गेला. त्यानं आईचा खुन केला. तसं ह्रृदय काढलं व ते हातात घेवून तो चालू लागला. वाटेल त्याला एक ठोकर लागली. तसं त्याला खरचटलं. त्याला थोडफार लागलं व तो वेदनेनं विव्हळू लागला. तसं ते ह्रृदय म्हणालं,
"बाळ, काही लागलं तर नाही."
ते ऐकताच बाळाला काही वाटलं नाही. कारण तो प्रेमात अगदी आंधळा झाला होता. तसा तो ते ह्रृदय घेवून प्रेयसीकडे आला. म्हणाला,
"हे घे ह्रृदय, तुझ्यासाठी मी माझ्या आईचं ह्रृदय आणलं." तशी ती म्हणाली,
"नको मला तुझ्या आईचं ह्रृदय अन् नको मला तुझं प्रेम. जो व्यक्ती माझं प्रेम मिळविण्यासाठी आपल्या आईची हत्या करु शकते. तो व्यक्ती उद्या माझ्याहीपेक्षा सुंदर मुलगी मिळाल्यास माझीही हत्या नक्कीच करील."
ती प्रेयसी असं म्हणताच त्याला सोडून जाते. महत्वाचं म्हणजे आज त्या मुलाजवळ काही नाही राहात. त्या मुलाची अवस्था ही तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं, अशी होते. शेवटी तो पश्चाताप करतो. परंतू आता त्याला धड आई दिसत नाही आणि प्रेयसीही मिळत नाही.
आज समाजात प्रेमविरांची अवस्था काहीशी अशीच असलेली दिसते. आईचं प्रेम मिळविण्यासाठी प्रत्यक्ष विष्णूनं पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्यातच त्यांचे पुराणात वेगवेगळे अवतार दिसतात. कोणी त्याला भाकडकथाही समजतात. परंतू आज समाज त्या गोष्टीला मानत नाही. आज समाजात प्रेम म्हणजे निव्वळ वासनेची भावना तृप्त करणारी यंत्रणा वाटते. मायबापापेक्षा वा इतर प्रेमापेक्षा प्रेयसीचं प्रेम मोठं वाटतं. त्या गोष्टीसाठी ते सर्व सोडायला तयार होतात. कधी आम्ही एकमेकांना जीवंतपणी नाही मिळू शकत तर मेल्यानंतर असं समजून ते आत्महत्येचा मार्ग पत्करतात. शेवटी त्यांचं काय जातं. जातं फक्त त्यांच्या परीवाराचं. ज्या परीवारातील ते सदस्य असतात.
अलिकडं मुलींची संख्याा कमी आहे. या काळात तर प्रेम मिळवणं कठीण गोष्ट बनली आहे. तेव्हा आजच्या काळात असं प्रेम मिळविण्यासाठी वशीकरणासारखे मार्ग वापरले जातात. नव्हे तर ब्लैकमेलिंगचे प्ररार वाढलेेले आहे. तू मला जर मिळाली नाही तर मी आत्महत्या करणार.. तुला फसवणार इत्यादी गोष्टी आज सुरु आहेत आणि एकदा का ते प्रेम मिळालं की बस त्यानंतर तिला वासनेची शिकार केलं जातं. ही वासना तृप्त झालीच की तिचा व्यापार केला जातो. अगदी देहाचा व्यापार. ती भविष्यात सुखी राहात नाही. ती तोही मार्ग स्विकारते. कारण ती मायबापापासून तुटलेली असते.
महत्वपूर्ण गोष्ट ही की यालाच प्रेम म्हणावं काय? असा प्रश्न पडतो. कारण अशा प्रेमातून काही साध्य होत नाही. मिळते फक्त नैराश्य. ज्य नैराश्येतून मार्ग निघत नाही आणि ब-याचदा जो मार्ग निघतो. तो निव्वळ मृत्यूचा मार्ग असतो वा क्लेष देणारा मार्ग असतो. म्हणून प्रत्येकानं प्रेम करण्यापुर्वी सावधान असावं. खरं प्रेम विवाहापुर्वी होतच नाही. विवाहानंतरच होते. विवाहापुर्वीचं प्रेम हे धोक्याची सुचना असते. यशस्वी जीवनाचा श्रीगणेशा नाही. म्हणूनच प्रेम जर करायचंच असेल तर विवाहानंतर करावं, विवाहापुर्वी नाही. याबाबत आपण सखोल विचार करावा. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूूर ९३७३३५९४५०