beautiful i books and stories free download online pdf in Marathi

सुंदर आई

सुंदर आई

तिच्या डोळ्यात स्वप्न होती.आपली पिल्ले कशी मोठी होतील याचा ती विचार करीत होती.एखाद्या चिमणीची जशी पिल्लं असतात.ती जशी आपल्या पिल्लांना वाढवते.तशी ही आईही आपल्या पिल्लाला वाढवीत होती.तिचं नाव तृषा होतं.
तृषा एक सुंदर मुलगी.तिला पटापट तीन मुलं पण झाली.पण आश्चर्य म्हणजे तिचा विवाह ज्याचेशी झाला.तो व्यक्ती म्हणजे तिचा पती मरण पावला होता.तो अकाली मरण पावला.पण त्याच्या अकाली निधनानं जी पोकळी तिच्या जीवनात आली.ती पोकळी न सावरणारी अशीच होती.
तृषाचा पती मरण पावला.अकाली व अवकाळी दुःख आलं.तशी तृषा जास्त दुःखी झाली.अशा दुःखी कष्टी काळात आपल्या लेकराला कसं मोठं करावं असा प्रश्न तिला पडला.पण ती घाबरली नाही.ती तटस्थ होती.
इवल्याशा चिमणीच्या पिलांसारखी ती इवलीशी तृषाची मुलं.आज तृषा दररोज कामाला जात होती.नव्हे तर ती तशी कामाला जावून मुलांना सांभाळत होती.मुलांना शिकवीतही होती.तिला त्यासाठी खुप कष्ट करावे लागत होते.
सकाळी दहा अकराला मुलांना घासातला घास भरवून ती कामाला जात असे.रात्रीला उशीराच ती घरी परतत असे.तेव्हापर्यंत तिची ती पिल्लं वाट पाहात असायची.ती पिल्लं आई घरी आल्यास आईसोबत असायची.नव्हे तर ती आई त्या मुलांसाठी सांजच्याला लवकर स्वयंपाक करुन त्याला जेवन चारायची.त्यानंतर त्यांना अंथरुण करुन देवून त्यांना झोपवून ती स्वतः झोपी जायची.आईची हीच दिनचर्या दररोज सुरु होती.
मुलं हळूहळू चिमणीच्या पिलांसारखी मोठी झाली.ती एवढी मोठी झाली की त्यांनी खुप उंची गाठली.त्याचबरोबर त्यांचा विवाह झाला.पत्नी लक्ष्मीच्या रुपात घरी आली.
घरी असलेल्या तीन मुलांपैकी दोन मुली आपआपल्या सासरी गेल्या होत्या.तर आई मुलाजवळच राहात होती.ती आई आजही चांगली वागत होती.
दिवसानंतर दिवस जात राहिले.आईचा स्वभाव बदलला नाही.मात्र पत्नीचा स्वभाव बदलू लागला.पत्नीला हळूहळू वाचा फुटायला लागली.तिला असं वाटायला लागलं की मुलगा हा माझ्यापेक्षा आईवरच जास्त माया करतो.ती त्याला आईपासून तोडू पाहात होती.अशातच तिनं म्हटलं,
'एकतर आईच पाहा.नाहीतर मला पाहा.मला तुला कदाचित सोडून जावं लागेल.'
मुलगा आईवर माया करीत होता.तो दुःखी झाला.कारण त्याला माहित होतं की त्याला त्याच्या पत्नीनं नाही तर आईनं लहानाचं मोठं केलं,शिकवलं.आज तो मोठ्या हुद्यावर गेला.ते तो विसरला नव्हता.त्यानं पत्नीच्या पुढं नांगी टाकली नाही वा तो वरमला नाही.त्यानं सरळ म्हटलं,
'तू गेली तरी चालेल.पण मी आईला सोडणार नाही.'
मुलाची आईप्रती असलेली भावना पाहून काही दिवसातच पत्नी त्याला सोडून निघून गेली.तो मात्र आजही आईला धरुन होता.तिची सेवा करीत होता.
त्याची पत्नी त्याला सोडून जाताच तिचे तिच्या माहेरी बरेच हाल होत होते.तिला आपल्या पतीची आठवण येत होती.पण कसे जावे तिच्यासमोर प्रश्न होता.तिला यावंसं वाटत होतं.अशातच कोणीतरी तिच्या सासूला तिची इच्छा सांगीतली.
आपल्या सुनेची ही येण्याची असलेली इच्छा तिनं पडताळली.तिनं आपल्या मुलाला बोलावलं.म्हटलं,
"बेटा,तू आपल्या पत्नीला घेवून ये.मी किती दिवस पुरणार."
मुलगा म्हणाला,
"नको आई,जी मुलगी आपल्या आईचं ऐकतो म्हणून सोडून जाते.तिला पुन्हा परत आणायला लावू नकोस."
आईनं काय समजंवायचं ते समजावलं व म्हणाली,
"तू जर आणणार नाहीस तर माझं मेलेलं शरीर पाहशील.माझी तुला शपथ आहे."
मुलगा काय समजायचं ते समजला.तो दुस-या दिवशी प्रसन्न नजरेनं सासरी गेला.त्याचं सासरी आगतस्वागत झालं.एक दिवस मुक्कामही झाला.दुसरा दिवस उगवला.या दिवशी पाहूणचार करुन सास-यानं त्याच्या पत्नीसह त्याला रवाना केले.
मुलगा गावी रवाना झाला.त्याने दारात पाऊल टाकले.तोच त्याला दारातूनच आई दिसली.ती पंख्यावर लटकली होती तिची मान खाली होती.जीभ बाहेर निघाली होती.संपूर्ण शरीर लोंबकळत होतं.
जसं मुलानं ते दृश्य पाहिलं.त्यानं हंबरडा फोडला.तो आईला बिलगला.तशी त्याची नजर खाली गेली.खाली एक चिठ्ठी पडली होती.ती चिठ्ठी त्यानं उचलली.त्यात लिहिलं होतं.
'मी तुझा संसार सुखाचा चालावा म्हणून या जगाचा निरोप घेत आहे.आतातरी पत्नी सोडू नको.सुखाचा संसार कर.'
मुलगा काय समजायचं ते समजला.त्यानं आईची मैयत केली व तो आपल्या पत्नीसोबत संसार करु लागला.त्याला पत्नीचा रागही यायचा.पण त्याला क्षणात त्याची आई आठवायची.ज्या आईनं चिठ्ठीत लिहिलं होतं,
'आतातरी पत्नी सोडू नको.सुखाचा संसार कर.'
ती आई आज जगात नव्हती.पण तिचे शब्द जगात होते.ती आई........धन्य होती ती आई की ज्या आईनं आपल्या शरीराचा त्याग करुन आपल्या बाळाचा संसार बसवला होता.ती आई सुंदर होती.सुविचारी होती नव्हे तर आईच्या आईपणाला शोभणारी मुर्तीमंत प्रतिमा होती.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED