किमयागार - 30 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 30

किमयागार -प्रमुख
ओॲसिसच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या तंबूच्या दारात असलेल्या पहारेकऱ्यासमोर तरुण उभा राहिला व म्हणाला, मला प्रमुखांना भेटायचे आहे.
मला काही संकेत सांगायचे आहेत.
तो पहारेकरी काही न बोलताच तंबूत गेला आणि थोड्या वेळाने एका शुभ्र कपड्यातील तरुण अरबाला घेऊन आला.
तरुणाने अरबाला त्याने काय पाहिले ते सांगितले. अरब म्हणाला, तू इथेच थांब व तो आत गेला.
रात्र झाली. बाहेरच्या शेकोट्या पण हळूहळू बंद होत होत्या, सगळीकडे शांतता पसरली होती, त्या मोठ्या तंबूत प्रकाश दिसत होता.
या सर्व वेळात तरुणाच्या मनात फातिमाचा विचार चालू होता. त्यांच्या भेटीत झालेले संभाषण त्याला आठवत होते आणि त्याचा अर्थ त्याला अजूनही नीट समजला नव्हता.
बराच वेळ गेल्यानंतर पहारेकऱ्याने त्याला आत जाण्यास सांगितले.
आत गेल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. वाळवंटात अशा प्रकारचा तंबू असू शकतो याची त्याने कल्पनाही केली नव्हती.
तो आत्तापर्यंत इतक्या सुंदर कार्पेटवरून चालला नव्हता. तिथे हाती बनवलेले सोन्याचे दिवे होते व त्यात कॅंडल ठेवल्या होत्या.
प्रमुख एका बाजूला अर्धवर्तुळाकार बसले होते व मुलायम रेशमी उशांना टेकून बसले होते. चांदीच्या ट्रेमध्ये चहाचे ग्लास होते.
काही नोकर इतर कामे करीत होते. आणि वातावरणात हुक्क्याचा सुगंधी धुर पसरला होता.
ते एकूण आठजण होते.
पण त्या अर्धवर्तुळात मधोमध बसलेल्या व शुभ्र व सोनेरी कपडे घातलेल्या सर्वात मुख्य अशा अरबाकडे तरुणाचे लक्ष गेले.
त्याच्या जवळ आधी भेट झालेला अरब बसला होता. तरुणाकडे बघत एक प्रमुखाने विचारले संकेतांबद्दल सांगू इच्छिणारा परकिय माणूस कोण आहे?.
तरुण म्हणाला मी आहे, आणि त्याने सर्व हकीकत सांगितली.
दुसरा प्रमुख म्हणाला, आम्ही इथे अनेक पिढ्या राहतो आहे आणि वाळवंट एका परक्या माणसाला संकेत कां देईल?.
तरुण म्हणाला माझे डोळे अजून वाळवंटातील वातावरणात रुळले नाहीत त्यामुळे वाळवंटातील लोकांना न दिसणारे काही मला दिसू शकते.
हे बोलतं असताना त्याच्या मनात विचार आला की, मी जगद्आत्म्याला जाणत असल्याने पण असे झाले असेल.
तिसरा प्रमुख म्हणाला, ओॲसिस हे तटस्थ मैदान असते. ओॲसिसवर कोणी हल्ला करीत नाही.
तरुण म्हणाला, मला जे जाणवले ते मी सांगितले. यावर काय करायचे ते सर्वस्वी आपल्या हातात आहे.
यानंतर ते एकमेकात बोलू लागले. ते अरबी भाषेत बोलत असल्याने तरुणाला कळतं नव्हते. तो बाहेर जाऊ लागला पण त्याला थांबवण्यात आले.
तरुणाला भीती वाटली. काहीतरी गडबड आहे असे त्याचे मनात आले, आणि उंटचालकाबरोबर हा विषय आपण बोलून चूक तर केली नाही ना असे वाटू लागले.
किमयागार -प्रमुखांची चर्चा.
आणि तेवढ्यातच मध्ये बसलेल्या प्रमुखाच्या चेहऱ्यावर हसू दिसले आणि तरुणाला बरे वाटले. त्या वृद्ध प्रमुखाने आतापर्यंत चर्चेत भाग घेतला नव्हता.
पण तरुणाला जगाची भाषा कळत असलेने वातावरणातील ताण दूर झाल्याचे जाणवले. आणि त्याला थोडे बरे वाटले.
चर्चा संपली. सर्वजण शांत होते. सर्वात मोठ्या प्रमुखाकडे ते काय म्हणतात त्याची वाट बघत होते.
वृद्ध प्रमुख तरूणाकडे बघत होते.
ते बोलू लागले. दोन हजार वर्षांपूर्वी स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला अंधार कोठडीत ठेवले गेले होते. त्याला गुलाम म्हणून विकले. वृद्ध आता तरुणाला कळेल अशा भाषेत बोलत होते. आमच्या व्यापाऱ्याने त्याला इजिप्तमध्ये आणले. आम्ही मानतो की, जो स्वप्नांवर विश्वास ठेवतो तोच स्वप्नांचा अर्थ पण नीट लावू शकतो.
प्रमुख पुढे म्हणाले, फारोहनी सशक्त व अशक्त गायींचे स्वप्न पाहिले. मी त्या माणसाबद्दल बोलत आहे ज्याने इजिप्तला दुष्काळातून सोडवले.
तरुणाकडे बघत बोलत होते, तो माणूस या देशात परकिय होता आणि कदाचित तुझ्याच वयाचा होता.
आम्ही परंपरांवर विश्वास ठेवतो आणि त्यांनीच आम्हाला दुष्काळातून वाचवले, आणि इजिप्तला श्रीमंत केले.
परंपरा माणसाला वाळवंट कसे पार करावे ते शिकवतात आणि त्यांच्या मुलांनी लग्न कसे करावे हेही सांगतात.
परंपरा सांगते की, ओॲसिस तटस्थ प्रदेश असतो. युद्धात असणाऱ्या दोन्ही समुदायाचे ओॲसिस असतात आणि त्यामुळे दोघेही कमजोर असतात.
प्रमुख बोलत होते तेव्हा सर्वजण शांत बसले होते. पण परंपरा असे सांगते की, वाळवंटाच्या संकेतांवर विश्वास ठेवावा. आपल्याला जे माहित आहे ते सर्व वाळवंटाने आपल्याला शिकवले आहे.