देश हा देश असतो Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देश हा देश असतो

तो देश देश म्हणून संबोधला जाणार नाही!

प्रत्येक शाळा. ती शाळा चालावी म्हणून म्हणून त्या शाळेत मुख्याध्यापक नियुक्त केलेला असतो. हा मुख्याध्यापक शाळेचं प्रशासन चालवत असतो. तो जे काम करतो. त्यालाच मुख्याध्यापकाचे कर्तव्य असे म्हणतात. हा मुख्याध्यापक शाळेत देखरेख ठेवतो. तो शिक्षकाचे वेतन करणे, विद्यार्थ्यांना सुखसोयी देणे, जमाखर्च ठेवणे, शिक्षक शिकवितात की नाही ते पाहणे, विद्यार्थ्यांचे दाखले देणे, पालकांना सांभाळणे, शासनाला सांभाळणे आणि महत्वाचं काम म्हणजे आपल्या मालकाला सांभाळणे ही महत्वाची कामे करीत असतो.
मुख्याध्यापक हा शाळेचा कणाच असतो. तो जर नसेल तर ती शाळा डोकं नसलेल्या शरीरासारखी होते. नव्हे तर हा मुख्याध्यापक चांगल्या स्वभावाचाही असावा. उदा. ज्या जहाजाचा कप्टान चांगला ती जहाजं फारशी डुबत नाहीत. याचा अनुभव सांगतो.
एक अशीही शाळा की त्या शाळेत पुर्वी जो मुख्याध्यापक होता. तो अरेरावी स्वभावाचा होता. परंतू त्याला तसा स्वभाव ठेवणे रास्त होते. त्याला कारण होतं तो शाळेचा मालक. मालक पुष्कळ बेकार होता.
मुख्याध्यापक अरेरावी स्वभावाचा. त्यामुुळं ती शाळा बुडत चालली होती जहाजासारखी. परंतू मालकाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता शाळा पुर्णतः नेस्तनाबूत होणार. अशावेळी तो मुख्याध्यापक अकस्मात मरण पावला. त्यामुुळं शाळेत पुरता काही दिवस गोंधळच उभा होता. कारण मुख्य म्हणजे जहाजाचा कप्तानच गेला होता. त्यानंतर काही दिवसानं तिथं दुसरा कप्तान बसला व पुन्हा नव्यानं शाळा वळणावर आली.
असा हा शाळेचा मुख्याध्यापक. शाळेसाठी झटत असतो अहोरात्र. परंतू त्यांच्या मेहनतीला काही कवडीची किंमत नसते. जसा एखाद्या देशाचा पंतप्रधान. तो कितीही चांगला असला तरी त्याला विरोधी पक्ष नावबोटं ठेवतच असतात. तसंच शाळेचं आहे.
मुख्याध्यापक हा शाळेचा सर्वेसर्वा असतो. परंतू त्यालाही त्याच्या मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. कारण त्याचेही वर कोणीतरी वरदहस्त असतो. तो वरदहस्त चांगला असेल तर ती शाळा नावारुपाला येते. नाहीतर ती शाळा बुडते. हे सत्य आहे आणि ही सत्यता नाकारता येत नाही.
मुख्याध्यापक शाळेत सर्वेसर्वा समजून कर्तव्य करीत असतांना त्यांना कोण अडवतं? असा जर प्रश्न केला तर यामध्ये दोन घटक कारणीभूत ठरतात. पहिला म्हणजे त्या शाळेचा संस्थाचालक व दुसरा घटक म्हणजे शिक्षणाधिकारी. हे दोन्ही घटक मुख्याध्यापकाचे प्रमुख शत्रू असतात. तसं पाहता त्याचे मित्र कमी व शत्रूच जास्त असतात. त्याच्या शत्रूंमध्ये त्या भागातील पालक तसेच विद्यार्थी, त्या भागातील नगरसेवक तसेच त्या शाळेतील शिक्षक.......हे सर्व घटक त्याचे शत्रू असतात. तो जर चांगला वागेल तर हे सर्व मित्र.
मुख्य शत्रूंमध्ये त्या शाळेतील संस्थाचालक, याचा समावेश होतो. त्याचं कारण म्हणजे संस्थाचालकाला शाळेच्या माध्यमातून पैसा कमवायचा असतो. जर मुख्याध्यापक हा इमानदार असेल तर त्यावेळी संस्थाचालकाची गोची होते. म्हणून तो शत्रू. त्यानंतर दुसरा शत्रू म्हणजे त्या भागातील शिक्षणाधिकारी. हाही घटक संस्थाचालकासारखाच. परंतू थोडा वेगळ्या स्वरुपाचा. त्यालाही पैशाची भूक असते. तोही शिक्षकांच्या नियुक्ती व बाकी गोष्टींमध्ये शाळेकडून पैसा उकळत असतो. जर असा पैसा त्या शाळेतील मुख्याध्यापकाने त्याला वा त्याच्या चमुला न पुरविल्यास तो आणि त्याची चमू त्या मुख्याध्यापकाची शत्रू बनत असते.
मुख्याध्यापकाचे अलिकडे पालकही शत्रू आहेत. कारण एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास न आल्यास एखादा पालक त्याची तक्रार करु शकतो वा एखादी दुखापत झाल्यासही तो पालक त्या मुख्याध्यापकाची तक्रार करु शकतो. नव्हे तर तो मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचाही शत्रू असतो. जर त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकानं मारहाण केली तर...... किंवा त्या विद्यार्थ्यांची शालेय कामं न केली तर.
अलिकडे मुख्याध्यापक शाळेतील सर्व कामं व्यवस्थीत पार पाडत असतात. परंतू वरील प्रकारच्या लोकांकडून त्याला समस्या येत असतात. अशा समस्या की त्या अडचणीच्याच वाटतात. त्यावेळी तो व्यवस्थीत काम करु शकत नाही. अशावेळी शाळा बुडत जर असेल तर त्याला दोषी समजण्यात येते. परंतू त्याचा दोष मुळातच नसतो.
मुख्यतः मुख्याध्यापक हा शाळेचा कणाच असतो. त्याला अभय देण्याची गरज आहे. त्याला जर अभय दिलं नाही आणि वरील प्रकारच्या सर्वच घटकांनी त्यांना त्रास दिला तर तो खचून जाईल व कोणीही दुसरा मुख्याध्यापक बनायला पुढे येणार नाही. अर्थातच शाळा बुडेल आणि शाळाच नसतील तर विद्यार्थी घडणार नाही. राहणारही नाहीत आणि ज्या देशात विद्यार्थीच राहणार नाही. तो देश देश म्हणून संबोधला जाणार नाही हे तेवढंच सत्य आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०