Everyone should improve their behavior books and stories free download online pdf in Marathi

प्रत्येकांनी आपलं वागणं सुधरावं

प्रत्येकानं आपलं वागणं सुधारावं.

काही काही माणसं अशी असतात की त्यांच्यासमोर कितीही वाईट परीस्थीती आली तरी ते हिंमतीनं सामोरे जातात. विपरीत परीस्थीतीत स्वतःचा तोल जावू देत नाहीत. तर काही माणसं अशी असतात की जे विपरीत परीस्थीती येताच आपला तोल ढासळतात. काही माणसं हे क्षणीक सुखाचे भागीदार असतात. अशी माणसं ही चापलुसी करीत असतात. संभवतः जसे दिवस आले. तसा आपला लबाडीपणा दाखवतात. व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचा स्वभावगुण ठरलेला असतो. त्या त्या स्वभावानुसार ते तसे बदलत असतात. महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं आपलं वागणं सुधारण्याची गरज आहे.
काही माणसं अशीही असतात की जे थोडंसं संकट आलं की घाबरुन गप्प पडून राहतात. ते संधीची वाट पाहात असतात. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस येतो. त्याप्रमाणे संधी तशी चालून आलीच की मग ते आपला स्वभावगुणही बदलवीत असतात. आज त्याच स्वभावगुणानुसार माणसाच्या स्वभावाला प्राण्याचे नाव दिले आहे. जसे माकडासारखा हसतो. वाघासारखा डकरतो. हरणासारखा चालतो. सशासारखा पळतो. कासवचालीचाच आहे हा.......वैगेरे वैगेरे.
काही माणसं संकट जाताच व परीस्थीती समतोल होताच असे बदलतात की ज्यांना वाटते शेतातील मालक मरण पावला. आता उस मुळासकटच खायला हवा. तसेच काही लोकांना वाटते की सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारुनच पाहायला हवी म्हणजे हिच्या पोटात जास्त अंडी दिसतील. याबाबत एक उदाहरण देतो.
एक शाळा. त्या शाळेचा मुख्याध्यापक हा अतिशय त्रास देणारा होता. तो एवढा त्रास द्यायचा की त्याचा त्रास सहन होत नव्हता. त्यातच त्याचं वागणं पाहून सगळे शिक्षक घाबरलेले असायचे. कारण तो मुख्याध्यापक शिक्षकांचे वेतनच बंद करायचा.
काळ हळूहळू सरकला. या बदलत्या काळात त्याला अपघात झाला व तो मरण पावला. बदलत्या काळानं त्याचा जीव घेतला. कारण त्याच्या कर्मानं त्याचा हिशोब केला होता नव्हे तर त्यानं केलेले एकशे एक गुन्हे पुर्ण झाले होते.
गतकाळातील मुख्याध्यापक मरण पावला होता. तो अपघातानं मरण का पावेना. परंतू त्या मरण पावल्यानं शिक्षकांची व संस्थाचालकाची चांदी झाली. त्यातच संस्थाचालकालाही वाटलं की आपण आता मोकळे झालो. आता आपल्याला कोणीच अडवू शकत नाही.
दिवंगत मुख्याध्यापक तसा क्रुरकर्माच होता. तो ज्याप्रमाणे शिक्षकांचे वेतन बंद करायचा. त्याचप्रमाणे तो संस्थाचालकालाही मोजत नव्हता. संस्थाचालकाला तर शाळेत पायच ठेवू देत नव्हता. शेवटी संस्थाचालकानं त्याच्या मरणापर्यंत शाळेत पायच ठेवला नाही.
जेव्हा तो मुख्याध्यापक मरण पावला. त्याच्या मरणानंतर संस्थाचालक मोकळा झाला. त्यानं त्या मुख्याध्यापकाची जागा घेतली. त्यातच त्याच्या शिक्षकांना धमक्या सुरु झाल्या. त्या धमक्यामध्ये अख्खी शाळाच गारद व्हायला लागली. जणू त्याची अवस्था उसाचा मळा पाहणा-या पांथस्थासारखी झाली. त्याला वाटलं की आता उसाचा मालक मरण पावला. आपण आता या मळ्यातील अख्खा उसच मुळासकट खावा. तसाच तो वागू लागला.
ज्याप्रमाणे संस्थाचालकाचा स्वभाव बदलला. त्याप्रमाणे त्या शाळेतील शिक्षकांचाही स्वभाव बदलला. ते शिक्षकही त्या मुळाचा उस खाणा-या पांथस्थासारखेच वागू लागले.
विशेष सांगायचं म्हणजे दुःखानंतर सुख येतं. सुखानंतर दुःख. तेव्हा सुख जर आलं तर हुरळून जावू नये आणि दुःख जर आलं तर लाजू नये. या अर्थाची एक म्हणही आहे. आपल्या पुर्वजांनी अशा काही म्हणी निर्माण केल्या. त्या सोचून समजूनच आणि त्या त्या परीस्थितीनुसार. तशीच एक म्हण अशीही बनवली की उस गोड लागला, म्हणून मुळासकट खावू नये. ते खरंही आहे. कारण असा जर मुळासकट उस खाल्ला तर एखाद्या वेळी त्या उसाचे मुळं रुतून घशाला समस्या निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेवून प्रत्येकानं आपलं वागणं सुधरायला हवं. त्या त्या परीस्थीतीनुसार कधी आनंद आलाच तर माजू जावू नये आणि दुःख आलंच तर लाजू नये. तो आनंद आणि ते दुःख पचविण्याचीही ताकद आपल्यात निर्माण करावी. तेव्हाच आपण जीवनात यशस्वी होवू शकतो. आनंद आणि दुःख शिशिरानंतर वसंत व वसंतानंतर जसा ग्रीष्म येतो. तसे येत असतात किंवा जसा रात्रीनंतर दिवस येतो व दिवसानंतर रात्र. तशा येत असतात. अशा परीस्थीतीत जे आपले विचार बदलवीत नाही. तेच तरुन जातात. तेव्हा प्रत्येकानं आपलं वागणं सुधरवायला हवं आणि त्यानुसार स्वतःला समर्पीत करायला हवं. जेणेकरुन आपल्यासमोर संकट आलंच तर निराशा येणार नाही आणि आनंद आलाच तर तो पचविताही येईल एवढंच सांगणं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED