गाठ कथा Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गाठ कथा

गाठ

अंबिका आणि अमोल एकमेकांचे मित्र होते. ते राजकारणात होते. परंतू ते तेवढे मोठे राजकारणी नव्हते.
ती हुशार होती. त्यामानानं अमोल हुशार नव्हता. तसं पाहता अमोलला तेवढं कळत नव्हतं. त्याला डावपेचही कळत नव्हते. राजकारणातील तर बरेचसे डावपेच त्याला कळत नव्हते.
अंबिका जशी हुशार होती. तशी ती डावपेचवाली होती. तशी बरीचशी मतलबीही तेवढीच स्वार्थीही. तसं पाहता ती आपल्या कामासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार होती आणि ती तसं आपलं काम पाहून कोणत्याही स्तराला जात होती. याउलट अमोलचं होतं. अमोल इमानदार असून त्याला पाहिजे त्या प्रमाणात डावपेच कळत नव्हते. तसा तो कुणाशीही वागतांना डावपेचानं वागत नव्हता.
आज जग धावपळीचं बनलेलं आहे. या धावपळीच्या काळात जगाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळच उरलेला नाही. त्यामुळंच काही लोकं कुणाला काहीही बोलत नाहीत. ते आपापल्या कामात व्यस्त असतात. तरीही काही लोकं असे असतात की त्यांना फालतुच्या उचापती सुचत असतात. अंबिकाचंही तसंच झालं. तिलाही तिच्या स्वार्थासाठी उचापती करण्याच्या सवयी होत्या. त्या सवयीनुसार ती अमोलला समजवायची व सांगायची की त्यानं तिच्याचसारखं वागावं. स्वार्थीपणानं वागावं, इमानदारीनं काहीही मिळत नाही. स्वार्थीपणानं सगळं मिळवता येतं.
अंबिकाचं तसं वागणं. ते काही अमोलला पटत नव्हतं. त्यामुळंच तो तिचं ऐकत नव्हता. अंबिकामुळं अमोलचं बरंचसं नुकसान झालं होतं. त्यामुळंच त्याच्या मनात तिच्या कर्तृत्वाच्या ब-याच गाठी तयार झाल्यात. एक दिवस अंबिका त्याला म्हणाली,
"अमोल, आम्ही तर बदललो. आम्हालाही सुचतं की आपण कसं वागावं. म्हणून आम्ही बदललो. तसं पाहता प्रत्येकाला स्वार्थ असतो. तो आम्हालाही आहे. म्हणूनच आम्ही बदललो."
ते अंबीकाच्या तोंडचं वाक्य. अशा ब-याच गोष्टी त्याला अंबिका बोलत होती. त्यामुळंच की काय, अमोलच्या मनावर परिणाम झाला होता. त्याला वाटत होतं की जगात असेही लोकं बरेच असतात की जे स्वतःचा स्वार्थ पाहात असतात.
अमोल एक इमानदार गृहस्थ होता. त्याला स्वार्थ आवडत नव्हता आणि स्वार्थीपणानं वागणंही आवडत नव्हतं. त्यामुळंच त्याला अंबिकेच्या तोंडचं वाक्य ऐकताच त्याला वैषम्यता वाटत होती, म्हणूनच त्याला तिच्या तोंडचं वाक्य आवडलं नव्हतं.
काही दिवस बरे गेले. अंबिकानं आपल्या स्वार्थानं आपला फायदा करुन घेतला होता. तसं अमोलचं ब-याच प्रमाणात नुकसान झालं होतं. परंतू त्यानं त्यावर शोक दर्शवला नाही वा चिंता व्यक्त केली नाही.
काळ हळूहळूच सरकत राहिला. नियती सर्व हरकती पाहात होती. अमोल इमानदारीनं वागत राहिला. त्याला त्याच्या इमानदारीपणानं फार हालअपेष्टा शोसाव्या लागल्या.
आज जसा काळ बदलला आहे. तसे लोकांचे स्वभावही बदलले आहेत. त्यामुळंच लोकं आपला स्वार्थ पाहात आहेत. ज्याचेकडे कामं आहेत, त्यांचेकडे ती मंडळी मान खाली घालून मेंढरासारखी वागत असतात.
आज स्वभावाचा असाच काळ. केवळ आपल्या स्वार्थपणामुळे आपला स्वार्थ साधण्यासाठी माणूस कुत्र्यासारखा कुणासमोर शेपटी हालवीत असतो. मग काम झालं की तोच माणूस असा दूर होतो की तो कसा दूर झाला हेही कळायला मार्ग नसतो. काळ हळूहळूच सरकला व निवडणूक झाली. त्यात अमोलही निवडणूकीत उभा राहिला. तशी निवडणूक झाली व अमोल बदलत्या काळानुसार सत्तेवर आला.
बदलत्या काळात अमोल सत्तेवर आल्यानंतर बाकीची मंडळी त्याच्या बाजूनं उभी झालीत. त्यात अंबिकाही होती.
अमोल अंबिकाचीही कामं करीत होता. सर्व मागील वाईट गोष्टी विसरुन गेला होता. परंतू ती गाठ मनात अजुनही तेवत होती. जी गाठ अंबिकानं त्याच्या मनात निर्माण केली होती. आता अमोलला विचार येत होता की जी अंबिका काल तिच्या स्वार्थीपणानं माझं नुकसान करीत होती. ती अंबिका बदलली कशी? परंतू ती बदलली असली तरी आज अमोल सत्तेवर आल्यावर त्यानं आपल्या मनात बदल्याची भावना ठेवली नाही. त्यानं तिला माफ करीत तिचे संपूर्ण कामं केले. मात्र तो तिची कामं जरी करीत असला तरी ती मागची गाठ त्याच्या मनामध्ये कायम होती. जी गाठ आज त्याला सतावत होती. ती गाठ आज विरलेली नव्हती कँन्सरच्या गाठीसारखी.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०