Sow well, sow well books and stories free download online pdf in Marathi

चांगले पेरा चांगलेच उगवेल

चांगले पेरा, चांगलेच उगवेल

आयुष्य खुप सुंदर असते. पण ते आपण कसे घडवतो यावर अवलंबून असते. आपण चांगले कर्म केले तर चांगलंच आयुष्य आपल्याला मिळतं आणि वाईट केल्यास वाईट. चांगले वागलो तर आपले आयुष्यही चांगले घडते आणि आपण वाईट वागलो तर आपले आषुष्यही वाईट बनते. उदाहरण द्यायचं झालंच तर आपल्याला दोन मुलींचं उदाहरण देता येईल. पहिला प्रसंग सुवर्णाचा.
एक सुवर्णा नावाची मुलगी. ती महाविद्यालयात शिकली. त्यातच तिनं ऐन परीक्षेच्या काळात एका गरीब मुलाला मदत केली. त्याला परीक्षेच्या काळातच पुस्तकं पुरवली अभ्यासाला. आपल्या अभ्यासाचा विचार न करता. तसं पाहता ती श्रीमंत असल्यानं तिनं नोट्समधून अभ्यास केला. त्यातच वर्षाशेवटी ज्या परीक्षा झाल्या. त्या परीक्षेत तो मुलगा कसाबसा पास झाला पुढं त्यानं डी एड केलं व शिक्षक म्हणून लवकरच नोकरीला लागला. याचाच अर्थ असा की त्याचं करीअर बनलं. तिनं त्याला जर ती पुस्तकांची मदत केली नसती आणि तो नापास झाला असता तर चित्र काही औरच असते. तो अर्थातच शेतमजूर वा एखाद्या कारखान्याचा मजूर बनला असता. यात दुमत नाही. तिही चांगल्या गुणानं पास झाली. पुढे ती बी एड झाली व एका खाजगी शिक्षणसंस्थेत शिक्षीका म्हणून लागली. त्यातच तिला पतीही चांगला मिळाला. जो प्राध्यापक होता. पुढं जावून तो प्राचार्य बनला. अर्थात पुढं जावून तिचंही करीअर बनलं. हा परीणाम आपल्या चांगल्या आयुष्याचा. चांगलं कर्म केल्यास चांगलंच आयुष्य जगायला मिळतं.
दुसरी मुलगी रजनी. जी त्याच्याचसोबत एका डी एडच्या महाविद्यालयात शिकत होती. परंतू तिनं सुरुवातीपासूनच त्या मुलाबद्दल आपल्या मनात किंतू परंतू निर्माण केला. ती त्याचेवर प्रेम करु लागली. पुढे त्यानं नकार देताच तिनं दुसरा मुलगा पकडला. त्यातच ती वाहवत गेली. त्याचा परीणाम हा झाला की ती डी एडची परीक्षा नापास होता होता वाचली. त्यातच टक्केवारीही कमी झाली. शेवटी ती कशीबशी नोकरीला लागली. त्यानंतर तिनं विवाह केला. परंतू विवाहानंतर तिचं कर्मफळ बदललं. तिला. मिळालेला पतीही वात्रट स्वभावाचा मिळाला. तोही दारु ढोसणारा व अनकष्टी अर्थात तिच्याच भरवशावर बसून खाणारा. अर्यात तिच्या कर्मफळानं तिचं आषुष्य घडवलं नाही.
माणसानं कार्य करावं. कार्यासाठीच आपण जन्माला आलो. पण असं कार्य करावं की त्या कार्यानं आपलं पुढील आयुष्यात चांगले दिवस दिसतील. वाईट दिवस दिसणार नाही.
आजचा विचार आपण केल्यास एक गोष्ट आवर्जून सांगेल. ती म्हणजे वर्तमानपत्राची. वर्तमानपत्रात दररोज बातम्या छापून येतात.,अमूक ठिकाणी चोरी झाली. अमूक ठिकाणी दरोडा पडला. अमूक ठिकाणी बवत्कार. अमूक ठिकाणी खून. कधी व्हाट्सअप, फेसबूकच्या तरुणानं फसवलं हेही येतं छापून. सगळा पेपर याच बातम्यांनी जास्त रंगवला असतो. यामध्ये एक विशेष गोष्ट सांगतो. ती म्हणजे या बातमीमधील एखाद्या प्रकरणाचा बारकाईनं अभ्यास केल्यास आणि अतीत जाणून घेतल्यास आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येईल. ती म्हणजे त्या प्रकरणाच्या नायकानं त्याच्या आयुष्यात कुठंतरी कधीतरी पाप केलेलं आहे. ते त्याला माहित नाही. पण समाजाला माहित आहे.
विशेष सांगायचं म्हणजे मोठमोठे अधिकारी व मोठमोठे राजकारणी भ्रष्टाचार करुन पैसा कमवितात. पण त्यांची मुलं जेव्हा मोठी होतात. तेव्हा ती चोर, खुनी, बलत्कारी बनलेली असतात. कोणी ड्रग्ज सप्लायर करतात. तर कोणी मुलींचं अपहरण. बिचारे बाप कोणत्या पदावर आणि आपण कोणते कारनामे करतो? आपण केलेले कारनामे चांगले की वाईट. आपल्याला ती कामं शोभतील का? याचाही विचार करीत नाहीत. याला काय म्हणावं!
महत्वपूर्ण गोष्ट ही की आयुष्य फार सुंदर आहे. पण या आयुष्याला आपणच सुंदर बनवू शकतो. एक लक्षात ठेवा की आपण जे पेरु, तेच रोप निघेल. म्हणून चांगले पेरा व चांगलीच फळं घ्या. वाईट पेरुन विनाकारण पापाचे भागीदार बनू नका. तसेच वाईट पेरुन स्वतःवर पश्चातापाची वेळ येवू देवू नका म्हणजे झालं. चांगले पेरा चांगलेच उगवेल हा मंत्र ध्यानी धरा.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED