government job books and stories free download online pdf in Marathi

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी

क्रिष्णा एक सर्वसाधारण घरचा मुलगा होता. तो भोळा भाबडा होता. पण त्याचं भाग्य चांगलं होतं. त्या भाग्यानच त्याला सर्वकाही मिळत होतं. परंतू जे मिळत होतं. ते मिळत असतांना संकटही पाचवीला पुजलेली होती.
क्रिष्णा लहानाचा मोठा झाला. तसा तो शिक्षणही शिकत गेला. त्याचं शिक्षण शिकणं हे अख्ख्या गावाला आवडत नव्हतं. कारण तो गरीबाचा मुलगा होता. तरीही तो शिकत गेला आणि सरकारी नोकरीपर्यंत पोहोचला.
सरकारी नोकरी........त्या काळात सरकारी नोकरीला फार मोठे प्राधान्य होते. मुलींचे विवाह करतांना वधूपीते आपल्या जावयाला सरकारी नोकरीच हवी असे मानत होते. तसेच सरकारी नोकरीच्या माणसांची समाजात फार मोठी इज्जतही होती. म्हणून की काय क्रिष्णाला सरकारी नोकरी कराविशी वाटत होती. त्यातच त्यानं सरकारी नोकरीचे आवेदन करुन व पुरेसा पैसा डोनेशन म्हणून देवून त्यानं सरकारी नोकरी मिळवली.
क्रिष्णा शिकत गेला. शिकता शिकता त्याला सरकारी नोकरीही लागली. पण त्याबरोबर संकटही आलं. त्याच्या नशीबानं त्याला मदत करुन सरकारी नोकरी तर दिली. परंतू ही सरकारी नोकरी त्याच्यावर संकट घेवून आली होती. ते संकट म्हणजे त्याचा अधिकारी. त्याचा अधिकारी हा चांगल्या स्वभावाचा नव्हता. तो त्याला अतिव त्रास देत असे. कधीकधी तो अधिकारी त्याचं वेतनही बंद करीत असे. मग काय सरकारी नोकरी असूनही घरी पोटाची आबाळ होत होती. त्याची परीवारासह उपासमार होत होती. त्यातच न्यायालयाचे खटले व तारीखवर तारीख. तसा क्रिष्णा ते पाहून परेशान होत होता. त्याला वाटत होतं की ही नोकरी सोडून द्यावी. परंतू तो नोकरी सोडणार कसा? कारण आता त्याला सरकारी नोकरीची सवय पडल्यानं खाजगी काम करणं कठीण जाणार होतं. तसा तो मनातच कुढत कुढत आयुष्य काढत होता.
ती सरकारी नोकरी........ पुन्हा त्याच्या भाग्यानं त्याला मदत केली व आज तो अधिकारी बनला. त्याला क्षणभर वाटलं की त्याच्या मागची अलाबला गेली. परंतू तो फक्त त्याचा विचार होता. जसा तो अधिकारी बनला. तसं संकट अजून वाढलं. आता अख्ख्या गावाची कामं करता करता त्याला नाकीनव येत होतं. सोबतच मंत्र्यांचेही खडे बोल त्याची मानसिकता दुखवून जात होते. काय करावं सुचत नव्हतं. राजीनामा दिला तर पोटाचा प्रश्न होता. कारण निघणारी पेन्शन ही पुरेशी मिळणार नव्हती.
क्रिष्णाला नेहमी विचार यायचा त्या सरकारी नोकरीचा. ती सरकारी नोकरी. गलेलठ्ठ वेतन. परंतू काय उपयोग! त्रास किती असतो. एवढा अमाप पैसा लावून शिक्षण शिका. गलेलठ्ठ डोनेशन देवून सरकारी नोकरी प्राप्त करा. त्यातच गलेलठ्ठ पगार म्हणून लोकांचेही टोमणे ऐका. मुलीही गलेलठ्ठ पगारदार मुलांशी विवाह करतात. पण खरं सुख गलेलठ्ठ वेतनधारकांच्या घरी असते का? त्यांच्या पत्नींनाही उपासतापास भोगावाच लागतोच ना? त्यांचा परीवारही सुखी नसतोच. यापेक्षा सुख असतं मजूरांना. निदान त्यांना रात्रीची सुखाची झोप तर येते. पोटभर जेवन तर धकतं.
क्रिष्णाचा विचार खरा होता. कारण जावं त्याच्या वंशा, तेव्हा कळे याप्रमाणे क्रिष्णाला अधिकारी बनल्यावरही लोकांचा रोष सहन करावा लागला. त्यातच गावक-यांचाही. त्याचं मानसिक स्वातंत्र्य हिरावलं गेलं.
क्रिष्णा सारखा विचार करायचा. त्यातच एकदा त्याचा द्वेष करणा-या एका व्यक्तीनं त्याची कुरघोडी मंत्र्याला केली. मग काय त्याच्यावर चौकशी बसली. चौकशीत मागील मंत्र्याच्या दबावात केलेलं एक काम उघड झालं. आपोआपच त्याच्या मागं काहीही चूक नसतांना न्यायालयाचं झमेलं पाठीमागं लागलं.
आज क्रिष्णाचे हाल बेहाल होत होते. कळत नव्हतं त्याला त्याची चूक काय? निव्वळ सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी आज तो स्वतःचे अस्तित्व हरवून बसला होता नव्हे तर त्या सरकारी नोकरीनं त्याचं अस्तित्व संपवलं होतं.
आज त्याला विचार येत होता की आपण ह्या सरकारी नोकरीच्या हव्यासानं शिकत गेलो. सरकारी नोकरी मिळवली. परंतू या सरकारी नोकरीनं आपल्याला काय दिलं. साधं दोन वेळचं जेवनही पोटभर मिळालं नाही. त्यातच पुरेशी झोपही मिळाली नाही. त्यापेक्षा आपण मजूर बनलो असतो तर........कदाचित आपल्याला समाजानं तेवढी इज्जत दिलीही नसती. पण पोटाला पोटभर अन्न अाणि पुरेशी झोप तर मिळाली असती. आज माझं अस्तित्व काय? ते अस्तित्व मी हरवून बसलोय.
न्यायालयात त्याचा खटला सुरु होता. तसा तो त्या दिवशी आपल्याच घरी घराच्या पारावर विचार करीत बसला. त्यातच विचार करता करता ते विचार मनात एवढे तीव्र झाले की त्याच्या छातीत दुखायला लागले. मग काय अचानक कळ आली आणि कोणालाही सांगायच्या पुर्वीच क्रिष्णा यमसदनी पोहोचला. सगळं जागचं जाग्यावरच राहिलं.
ती सरकारी नोकरी चांगली होती. परंतू त्याच सरकारी नोकरीनं त्याचं टेन्शन वाढवलं होतं नव्हे तर त्याच सरकारी नोकरीनं त्याचा जीवही घेतला होता. तोंडात कोणाच्याच हातचं पाणी पडू न देता.......सगळं जागचं जाग्यावरच सोडून........

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED