मुलं जन्मासच घालू नये Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुलं जन्मासच घालू नये

मुलं जन्मालाच घालू नये!
पशूपक्षापासून बोध घेण्याची गरज!

संस्कार........संस्काराला तिलांजली देवून काही महिला वागत असलेल्या दिसतात. आजही काही महिला कारंट्या आई असल्यासारख्या आपल्या इवल्याशा बाळाला सोडून पळून जातात. असं वाटतं की अशा आईंनी कशाला बाळांना जन्म दिला असावा.
एक प्रसंग सांगतो. एका आईनं तिची मुलगी बारा वर्षाची असतांना व तिचा पती मरण पावलेला असतांना आपल्या मुलीला बळ देण्याऐवजी अचानक विवाह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती बारा वर्षाची मुलगी म्हणाली,
” आई, विवाह करु नकोस. मला तो पसंत नाही." त्यावर आई म्हणाली,
"बेटा, मला भविष्याची चिंता आहे. तुझ्या पतीनं मला पोषलं नाही तर........" त्यावर मुलगी म्हणाली,
"आई, मी त्याला सोडून देईल."
"पण तेव्हापर्यंत मला कोण पोषेल?"
"आई, मी फाटके वस्र घालणार. हवं तर आपला प्लाट विकून टाकू. परंतू तू दूसरा विवाह करु नकोस."
"नाही बेटा, तू अजून लहान आहेस. तुला कळणार नाही मी विवाह का करतोय."
"ठीक आहे मग. मी तुझ्याजवळ कधीच राहणार नाही. तू मला मुलगीही म्हणायचं नाही. तू तुटली मला. मी तुटलो तुला आणि आता माझ्या राहण्याचा प्रश्न सोडव."
"तू तुझ्या मोठ्या पप्पाकडे राहशील."
तिची आई सहजपणे बोलून गेली. तशी मुलगी म्हणाली,
"ठीक आहे आई, बडे पप्पा मला पोषायला आहेत म्हणून ठीक आहे. नाहीतर तू मला रस्त्यावर सोडून गेली असती काय?"
"नाही."
"मग काय केलं असतं?"
"मी तुला आश्रमात ठेवलं असतं नाहीतर अनाथाश्रमात."
आई बोलली. त्याचबरोबर मुलीच्या डोळ्यातून अश्रू गळले. परंतू त्या आईला एवढंसं सुद्धा रडू आलं नाही. त्याचं कारण होतं तिची वासनेची भावना. त्यावेळी आई एकेचाळीस वर्षाची होती.
अशी अनेक प्रकरणं आज भारतासारख्या देशात रोजच घडत आहेत. रोजच मुलींच्या आई मिसींग होत आहेत आणि रोजच अशी मुलं आश्रमात वा अनाथालयात दाखल होत आहेत. तसेच रोजच अशा आईंमुळं त्या मुलांमुलींना अनाथालयाचं दुर्दैवी जीवन जगावं लागत आहे. यात त्या लेकरांचा कोणता दोष असतो. कोणताच नाही. हे आजपासूनच घडत नाही तर हे प्राचीन काळापासूनच घडत आहे.
मी लहान असतांना माझ्या आईनं एक प्रसंग सांगीतला. एक महिला.......तिचा पती तिला इवली इवली मुलं असतांना मरण पावला. तिला चार मुलं होती. त्यानंतर ती महिला त्या चारही मुलांना पोषण्याऐवजी गावातल्याच एका व्यक्तीसोबत पळून गेली. त्या मुलांचा विचार न करता. ती मुलं नंतर भीक्षा मागत जगली. ही वास्तविकता आहे. हे असं का घडतं. आज याचा विचार केला तर आपण आपल्या भारतात आलेल्या पाश्चात्य संस्कृतीला दोष देवू. परंतू हे तर पुर्वापारच घडून येत आहे. मग यात पाश्चात्य संस्कृतीचा दोष कसला?
मायबापाचं कर्तव्य असतं, ज्याप्रमाणे आपण आपल्या बाळाला जन्म दिला. त्याप्रमाणे त्याचं पालनपोषण करणं हे त्या मायबापाचं आद्य कर्तव्य. परंतू काही काही मायबाप तसे करीत नाहीत. ते चक्क आपल्या वासनेच्या पुर्तीसाठी आपल्या मुलाबाळांना सोडून जातात. मग विचार येतो कशाला जन्माला घातली ही मुलं. लहानपणीच मारुन टाकली असती अशी मुलं तर बरं झालं असतं.
विश्वात जन्मणारे सारे जीवजंतू. त्या जीवजंतूंमध्ये सारेच प्राणी आपल्या मुलांना जन्म देतात. त्यानुसार प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा आहे. ते प्राणी आपल्या मुलांचा त्रास सहन करु शकत नाहीत. एक गाय आपल्या पाडसाला सावली मिळावी म्हणून तो बसला असतांना स्वतः उन्हं अंगावर घेवून आपल्या बाळावर सावली धरते. एक विंचवी आपल्या बाळाला जन्म देवून स्वतः त्यांचं पोट भरण्यासाठी त्या पिल्लांचे भक्ष ठरते. तसेच चिमण्या पाखरं.........आपलं बाळ लहान असतांना त्याला मोठे करीत असतांना त्यांना घास भरवतात. तसेच जंगलातील काही जीव आपल्या बाळाला वाचविण्यासाठी वन्य प्राण्यांचे स्वतः भक्ष ठरतात. या सर्व वन्य प्राण्यात फक्त एकच अपवाद आहे. तो प्राणी म्हणजे साप. तो आपल्या बाळाला जन्म देतांनाच त्या पिल्लांला खावून टाकते. त्यामुळं अशी बाळाला सोडून जाणारी आई ही तिच्या वागण्यानं नागीणच असल्यासारखी वाटते.
स्रीयांबद्दलची आजची उदाहरणं चांगली आहेत. म्हणतात की एक पुरुष पत्नी मरण पावल्यानंतर आपल्या मुलांबाळांचा विचार न करता केवळ आपल्या लैंगीक सुखासाठी विवाह करते आणि सांगतो की मी माझ्या मुलासाठी विवाह केला. परंतू असं काहीच घडत नाही. कारण ती येणारी नवीन त्या बाळाची आई त्याच्या मुलांना सांभाळत नाही. म्हणून म्हणतात की महिला कशीही असो, ती आपल्या मुलांचे पतीनिधनानंतर संगोपन करते. परंतू तेही काही अंशी चूकच आहे. कारण आजही मी ब-याच महिला पाहतो की पती निधनानंतर लैंगीकतेची पुर्तता करण्यासाठी विवाह करतात. आपल्या मुलाबाळांचा विवाह न करता. हा येणारा नवीन बाप, तिची मुलगी आहे. ती उद्या तरुण होणार असा विचार करुन विवाह करतात. त्यातच तो बाप ती मुलगी तरुण होताच तिच्यावरही नजर टाकतात. त्यातच तिला जाळ्यात ओढतात. तसेच तिच्या आईलाही मारुन टाकण्याची धमकी देवून तिच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करतात किंवा तिच्या आईला, मुलीला मारुन टाकीन अशी धमकी देवून गप्प राहायला सांगतात आणि हवी तेव्हा वासना पुर्ण करतात. ही देखील वास्तविकता आहे. यात काही प्रकरणं उघडकीस येतात. काही मात्र अशीच दबून जातात.
माणसानं जीवन जगतांना अगदी प्राणीमात्रापासून शिकायला हवं. मुलं पैदा करतांना त्याच्या योग्य पालनपोषणाचा विचार करुनच मुलं पैदा करावीत. विनाकारण मुलं पैदा करुन त्यांचं नुकसान करु नये वा त्याला वेळी अवेळी अनाथासारखं जीवन जगण्यासाठी सोडून जावू नये. तसा विचार आधीच करावा. जेणेकरुन मुलांचं नुकसान होणार नाही. असे जर करण्याचा विचार असेल तर मुलं जन्मालाच घालू नये. तसेच मुलांना वा-यावर सोडू नये. मग कोणत्याच अडचणी येत असतील तरी. त्याचा सामना करण्याची ताकद मनात ठेवावी म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर