आता न्याय मिळत नाही? Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आता न्याय मिळत नाही?

आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही!

आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशातील जनता ही गरीब आहे. त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही. समजा अन्याय झालाच आणि त्या अन्यायाबद्दल खटला लढायचा झाल्यास तो खटला ती गरीब जनता लढू शकत नाही. कारण देशात भारदस्त वकीलाची फौज आहे. जी फौज या खटल्यावर आरोपीच्या बाजूने खटले यशस्वी करुन दाखवू शकते. त्यातच अशा खटल्यात अशा वकीलाच्या मदतीने समजा विजय मिळालाच तर तोच आरोपी पैशाच्या बलबुत्यावर अशा गरीबांवर उलट खटला दायर करुन त्यांना परेशान करीत असतो हे तेवढंच खरं आहे. आज देशात अशा प्रकारचे अनेक खटले आहेत की जे प्रलंबीत आहेत. त्या खटल्यात अगदी निर्दोष असणा-या व्यक्तींना मरणासन्न यातना होत असतात.
आज अन्यायाविरुद्ध दादही मागता येत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे आजचे शेतकरी कायदे.......हे कायदे म्हणजे शेतक-यांना अन्यायच वाटत आहे. पण त्या कायद्याविरुद्ध दाद मागतांना(लढतांना) अंदाजे साडेसातशेच्या वर शेतक-यांना वीरमरण आलेलं आहे. दुसरा भाग महाराष्ट्रात सध्या चिघळत असणारा विषय म्हणजे एसटी कामगारांचा विषय. यातही सरकारचं खाजगीकरणाचं तत्व. कितीतरी एसटी कामगारांना नोकरीवरुन हात धुवावं लागलं. त्यातच काही एसटी कामगार आत्महत्याही करीत आहेत. याबाबत एक उदाहरण देतो. एक खटलाही सांगतो.
एका वस्तीत दोन मकानं होते. त्यातच त्या मकानामध्ये एक अगदी श्रीमंत कुटूंब होतं. तर दुसरं गरीब कुटूंब. त्यातच त्यांचा त्या मकानातील जागेवरुन वाद झाला. त्यातच दोघांनी एकमेकांना मारलं. त्यातच श्रीमंत कुटूंबानं गुंड बोलावून त्या गरीब कुटूंबाना जबर मारहाण केली. त्यातच त्या गरीब कुटूंबानं त्या श्रीमंत कुटूंबाची तक्रार पोलिस स्टेशनला टाकली. त्यातच तो खटला न्यायालयात गेला.
न्यायालयात तो खटला पैशाच्या जोरावर चांगला वकील लावून त्या श्रीमंत कुटूंबानं जिंकला. त्यातच गरीब व्यक्ती हरला. त्याला अन्यायाविरुद्ध न्यायालयातूनही पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात दाद मागता आली नाही. त्यातच तो खटला हरताच त्या श्रीमंत परीवारानं त्या गरीब कुटूंबाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. अर्थात ही गोष्ट उलटा चोर कोतवालको दाटे अशी घडली. त्यातच खटला दाखल करणारा श्रीमंत व्यक्ती मरणही पावला. परंतू खटला सुरुच होता. त्यातच त्या खटल्यानं गरीब परीवार त्रस्त होत होता. परंतू तो खटला संपायचे नाव घेत नव्हता.
आज असे बरेचसे कुटूंब असेच आहेत की न्यायालयात असे विनाकारणचे खटले सुरु असून संपायचे नाव घेत नाहीत. त्यातच न्यायालयात अशा खटल्यांची संख्या वाढत आहे. न्यायालय फक्त पुरावे पाहात असून श्रीमंत माणसे केवळ पैशाच्या जोरावर असे पुरावेही गोळा करुन अशी न्यायालयीन लढाई जिंकतात. पण गरीब कुटूंबांना अशी लढाई जिंकता येत नाही. कारण त्यांच्याजवळ पुरेसा पोट भरायलाच पैसा नसतो. त्यामुळं ते न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पैसा लावतील कुठून? यातच आज श्रीमंत गरीब अशी दरी न्यायालयीन प्रकरणातही वाढत आहे. आज अन्याय होतो. श्रीमंतावरही होतो आणि गरीबांवरही. श्रीमंत माणसं हे खटला लढण्याची वाट पाहात नाही. ते गुंड लावून आपला बदला पूर्ण करतात नव्हे तर गरीबांना त्रस्त करतात. यासाठी कायद्यामध्ये तरतूदही आहे. ती तरतूद म्हणजे अन्यायग्रस्त माणसाचा खटला हा सरकारी वकील लढतो. परंतू असं जरी असलं तरी तो सरकारी वकील तो खटला जिंकून देईलच याची शाश्वती नाही. यातूनच गरीब व्यक्ती खटला हारतो. त्याला कैद होते. त्यातूनच ज्यावेळी तो गरीब कुटूंबातील व्यक्ती कैदेतून सुटतो. तेव्हा आपोआपच तो गुंड म्हणून बाहेर पडतो. हे चित्र वारंवार चित्रपटातून दिसत असलं तरी त्यात असलेली वास्तविकता नाकारता येत नाही.
सा-याच समस्या. अन्यायाविरुद्ध दाद मागायचीही समस्या.......गरीब व्यक्ती हा न्यायालयातून हरतो. पैशाअभावी पराभव पत्करावा लागतो. परंतू नियती त्याला सोडत नाही. हीच नियती पुढे असे अक्राळविक्राळ स्वरुप धारण करते. त्यात मग करोडो रुपये जरी आपल्याजवळ असले तरी ते आपल्या कामात येत नाहीत. मग हीच नियती अक्राळविक्राळ रुप धारण करुन कधी कोरोना रुपात येवून तर कधी अपघात होवून आपल्या जवळ येते. त्यातच मरण देते. मग आपल्याला मरतेवेळी नातेवाईक तर सोडा. पाणीही नशीब होत नाही. म्हणून थोडं सावधान असलेलं बरं. गरीबांवर आपण असा अन्याय करु नये. लाचारांना नेस्तनाबूत करु नये. तसेच कोणावरही अन्याय करु नये. नियतीला नक्कीच घाबरावे. दुर्बलांची सेवा करावी. त्याशिवाय खरं समाधान प्राप्त होत नाही हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०