शिक्षण शिकता येईल काय Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिक्षण शिकता येईल काय

विद्यार्थी शिकेल, पण.......

शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. तिथं समता असणं गरजेचं आहे. आपण जर शाळेतच विषमता पाळत असलो तर ती विषमता आपल्या वागण्यातून नक्की दिसेल. कारण जसं बीज आपण पेरतो. तेच बीज पुढंं अंकुरतं. पेरुच्या झाडाला कधीही आंबे लागत नाही. तिच ठेवण असते त्यांची. कारण निसर्गानं त्या झाडाला तसं बनवलं आहे. माणसाचंही तसंच आहे. जर एखाद्या माणसाच्या मनात कुविचार शिरलेच तर त्याच्या मनात सुविचार शिरायला वेळच लागतो. सुविचार लवकर येत नाही माणसाच्या मनात. तेच संस्काराचं आहे. शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. असे असतांना सर्व विद्यार्थ्यांसमोर आपण समतेनं नजरेत आलो नाही आणि आपण जर विषमतेननं वागत असलो तर विद्यार्थी मनात समस्या निर्माण होतात. जरी आपण विद्यार्थ्यांसमोर समता वापरत असलो आणि इतर ठिकाणी विषमेनं अधिवास करीत असलो, आपले आचारविचार तसेच ठेवत असलो, तरी आपण वर्गात जाताच आपल्या वागण्यातून पदोपदी विषमता दिसेल. म्हणून लोकांनी विशेषतः शिक्षकांनी तरी विद्यार्थ्यांसमोरच नाही तर इतरत्रही विषमतेनं वागू नये. समतेनंच वागावं.
उदाहरण डॉक्टर बाबासाहेबांचं देता येईल. बाबासाहेब जेव्हा शिकत होते, तेव्हा त्यांना शिकविणारे शिक्षक आंबावडेकर हे विशेेषता विषमता पाळणारेच होते. परंतू ते तेवढ्या प्रमाणात विषमता पाळणारे नसतील. म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकर नाव दिलं.
गुरु हा मुख्यतः जातीभेद पाळणारा नसावा. तसेच मुलंमुली हाही भेदभाव पाळणारा नसावा.
अलिकडे शिक्षकांच्या शिकवणूकीचं निरीक्षण केल्यास असं निदर्शनास येतं की काही शिक्षकांना मुली जास्त आवडतात. त्याचं कारण म्हणजे मुली अभ्यासाच्या गोष्टी पटकन ऐकतात. लवकर स्वाध्याय सोडवतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास मुली या अभ्यासात हुशार असतात. त्या अभ्यासात हुशार असल्यामुळं शिक्षकांना आवडतीलच. याचाच अर्थ असा की जी मुलं कमकुवत असतात. त्या मुलांकडे दुर्लक्ष होते.
शिक्षक तिही मुलं आपलीच समजून तिही मुलं पुढं जायला हवी असा विचार न करता त्या मुलांना शिकविण्यातून मागे पाडतात. त्या मुलांकडे लक्ष देत नाहीत. का? तर ते ऐकत नाहीत. अभ्यास करीत नाहीत. वारंवार सांगूनही कंटाळा येतो. परंतू मार्ग नसतो. शेवटी त्याच मुलांकडे दुर्लक्ष होवून ती मुलं मागे पडण्यामागे महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे आपलं प्रेम. आपण ती मुलं अभ्यास करीत नाही. म्हणून त्यांचा राग करतो. त्या मुलांना कधी जवळ घेत नाही. सारखे रागावतो. अलिकडे शिक्षणात रागावण्यावर बंदी घातली आहे तरी. हा आपला भेदभावच आहे. समजा आपल्याच घरात असा एखादा मंदबुद्धी मुलगा जन्मास आला तर आपण त्यांना फेकून देतो का? कधी रागावतो का? नाही ना. मग अशा मुलांची आपण हेळसांड का करावी. तेही आपलेच विद्यार्थी ना हुशार मुलांसारखेच. मग त्याचा अजिबात राग करु नये. त्याला जवळ घ्यावे. कुरवाळावे व कोणताही भाग त्याला आपलंसं करुन समजावून द्यावा. जेव्हा त्या मुलाला आपण जवळ घेवू. कुरवाळू. प्रेम देवू. तेव्हाच तो मुलगा तुम्हालाही आपला समजेल. अभ्या करेल व शिकेल. त्याला समस्या येणार नाही. त्याला तुम्ही आवडाल. जवळच्या वाटाल. हवं तर तो तुम्हाला चांगला प्रतिसाद देईल. हुशार बनेल व साहजीकच पुढं जाईल.
आज काळ तंत्रज्ञानाचा आहे. जुनं पिढीजात शिक्षण आज कालबाह्य झालं आहे. ते मागे पडलं आहे. त्या शिक्षणाला आता कोणीही विचारत नाही. अगदी डीजीटल शिक्षणाला आज विचारलं जातं. आपण नेहमी पाहतो की घराघरातील लहान मुलं मोबाईल बघतात. मोबाईल न दिल्यास ती मुलं रडतात. त्यांना मोबाईलवरचे खेळ आवडतात. कार्टून शो आवडतात. त्यांना मोबाईलच्या दुष्पपरीणामाचं काही घेणं देणं नाही. मोबाईलनं डोळे खराब होतात. कान खराब होतात. हे काही त्यांना कळत नाही. फक्त मोबाईलवर दिसणारी दृश्य ती मग कितीही वाईट असली तरी ती मुलांना आवडत असतात. तशीच ती विद्यार्थ्यांनाही आवडतात. तेव्हा हाच दृष्टीकोन अंगीकारुन शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवितांना मोबाईलचा शैक्षणीक साहित्य म्हणून वापर करावा. शासनानंही त्याला परवानगी द्यावी. तसेच जी परवानगी शासन देईल. त्या परवानगी स्वरुपात शिक्षकांनी मोबाईलचा अतिवापर वा गैरवापर टाळावा. हे झालं डीजीटल शिक्षण. यासोबतच शिक्षकांनी खेळ शिकवावे. खेळ विशेषतः मुलांना जास्त आवडतात. स्पर्धा घ्याव्यात. स्पर्धेत मुलांना जिकीरीने भाग घ्यायला आवडते. तसेच वेगवेगळे उपक्रम घ्यावेत.
हे सर्व ठीक आहे. परंतू हे तेव्हाच साध्य होईल, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर प्रेम कराल. तुम्ही जेव्हा त्यांच्या र प्रेम कराल, तेव्हा तिही मुलं तुमच्यावर प्रेम करतील. मग तुमचं सर्वच ऐकतील. तुम्ही जे सांगाल ते.
आज स्पर्धेचा काळ आहे. लोकं पुर्वीसारखे अनाडी राहिलेले नाही. अगदी थोड्या थोड्या कारणासाठी मुलांचे पालक शाळेत येत असतात. अगदी थोडंसं रागावलं तरीही. तेव्हा अशा काळात शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे कसे हा प्रश्न पडलेला आहे. तेव्हा अशा खेळाच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना शिकवले. तर विद्यार्थी शिकतील. ते केवळ शिकतीलच नाही तर चांगलं अर्थपुर्ण शिकतील. खेळातून व्यायाम होतो. बुद्धीचा विकास होतो. जिद्द, चिकाटी वाढीस लागते व हव्या तशा ज्ञानाचीही माहिती होते. परंतू यामध्ये विद्यार्थ्यांना भेदभाव दिसायला नको. कारण खेळत असतांना काही मुलं बाहेर राहतात सहभागी होत नाही. कारण मर्यादा असते. तेव्हा असे खेळ शिकवितांना सर्वांना सहभागी करुन घ्यावं. एकही सुटता कामा नये. विशेषतः त्यासाठी गट करावेत. तेव्हाच सर्व मुलांना शिकता येईल. काही करुन दाखविण्याची संधी मिळेल व भेदभावही दिसणार नाही. त्यानंतर कोणालाही विद्यार्थी शिकेल, पण.......असं म्हणण्याचीही वेळ येणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०