नराधम पिसाळले Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नराधम पिसाळले

सावधान;नराधम पिसाळले आहेत

चौदा सप्टेंबरचा तो दिवस.उत्तरप्रदेशातील हाथरस येथील ती तरुणी.त्या तरुणीचं वय होतं एकोणवीस.शेतीवर चारा कापण्यासाठी गेलेली.त्यातच तिच्यावर बलत्कार करुन तिला शेतात फेकलं.हाथरसची शाई वाळते न वाळते तोच बलरामपूरलाही तशीच घटना झाली.वय वर्ष बावीस. शिक्षणाच्या प्रवाहात असलेली तरुणी.बहुतेक ती बी कॉमचा फॉम भरायला जात होती.तिला इंजेक्शन देवून बेशुद्ध केलं गेलं.
हाथरसमध्ये काही तरुणांनी तिला पकडून तिच्यावर बलत्कार केला.त्यातच ती त्या तरुणांना ओळखत असल्यानं तिनं कोणाला सांगू नये.तसेच चालत चालत पोलिस कार्यालयात तसेच कुठेच जावू नये म्हणून तिची जीभ कापली.तसेच तिचे हातपाय व कंबरडे मोडले.तिच्या शरीरातील अंतर्गत व बाह्य भागावर जखमा केल्या.त्यातच कुठेतरी जबर दुखापत झाल्यानं तिला नंतर लकवाही मारला.तिला त्या तरुणांनी रिक्षात बसवले व तिला घरी पोचते करुन ते फरार झाले.
माणुसकीला काळीमा फासणा-या या दुर्दैवी घटना.अशा या घटना दोनच नाही.ह्या घटना दलित मुलींच्याच जरी असल्या तरी अशा बलत्काराच्या घटना दोनच नाही.यापुर्वीही भरपूर घटना घडल्या आहेत.
अरुणा शानबाग,जी बलत्कार झाल्यानंतर तब्बल बेचाळीस वर्ष कोमात होती.निर्भया, जी बलात्कारानंतर मरण पावली.नेहा, जिला बलत्कार केल्यानंतर जाळून टाकलं.ह्या तरुणी इतर समाजातील.ह्या तीनच तरुणी नाही,तर त्या तरुणींच्या संख्या पुष्कळ आहेत.एकटा दलित समाज जर घेतला.तर त्यांच्याही संख्या भरपूरच असतील.पण मुख्यतः तीनचा उल्लेख करणे गरजेचे आहे.
१)करनालच्या निसींगमध्ये रात्रीला दोन वाजता काही राजपुतांनी वाल्मीकी समाजाच्या मुलींवर बलत्कार केला.
२)कोपर्डी येथील दलित हत्याकांड
३)खैरलांजीतील दलित हत्याकांड
खैरलांजी प्रकरण खुप गाजलं.खटला बरेच दिवस चालला.काही साक्षीदार मरण पावले.खटला टाकणाराही मरण पावला.न्याय अधुरा राहिला. तेच करनालच्या बाबतीत घडलं.पोलिसांनी काहीच कारवाही केली नाही.तेच मनिषाच्याही बाबतीत घडते की काय?अशी आशंका आहे.
सध्याचा काळ हा बिभत्स स्वरुपाचा काळ आहे.नराधम पिसाळले आहेत.म्हणून अशा घटना वारंवार घडत आहेत.निर्भया प्रकरण घडलं.तोही उत्तरप्रदेशात दिल्ली या भागात.नंतर मोदी शासन बसलं.उत्तरप्रदेशात योगी शासन आलं.वाटलं आता असं होणार नाही.तसंच काही दिवस झालं.मोदी येताच देशातील इतर भागात बाँबस्फोट होणं बंद झालं.अशा घटनाही काही अंशी कमी झाल्या.तसेच योगी येताच युपीतही अशा घटना कमी झाल्या. पण चौदा सप्टेंबरची घटना योगींना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार करणारी घटना आहे.तसेच मोदींनाही जाब विचारणारी घटना आहे.कारण ही मुलगी ज्यावेळी मरण पावली.त्या मुलीला मायबापांनाही भेटू दिलं नाही.तसेच अंत्यसंस्कारही रात्री बारा वाजताच करण्यात आला.कदाचित कोरोनाचा याला हवाला देता येईल.परंतू सामान्य माणसं तर याला पुरावा नष्ट करणे म्हणू शकतात ना.
बलत्कार........मग तो दलित मुलीवर होवो की स्रीवर.वा अन्य कोणावरही होवो.त्याला बलत्कारच म्हणता येईल ना.आरोपीला जबर शिक्षा होत नसल्यानं अशा प्रकारच्या घटना आज घडत आहेत.त्या घटनात वाढ होत आहे.मागे नेहा नावाच्या डॉक्टर मुलीवर,ती रात्रीला रुग्णालयातून ड्युटीवरुन सुटून घरी जात असतांना बलत्कार झाला.त्यानंतर तिला जाळून टाकण्यात आलं.त्याचबरोबर तिच्या मारेक-यांना पोलिस चकमकीत मारुन टाकण्यात आलं.तशाच चकमकी आरोपींना शह न देता जर झाल्या आणि बलत्कार पीडीतांची जशी दुरावस्था आरोपींनी केली.तसंच त्या आरोपींच्या बाबतीत केलं गेलं,तर कदाचित या घटना कमी व्हायला वेळ लागणार नाही.वा संपवायला वेळ लागणार नाही.महत्वाचे म्हणजे मग ती बलत्काराची घटना असो की अन्य कोणत्याही.याही घटनेत ज्याप्रमाणे त्या आरोपींनी मनिषाची जीभ तोडली.कंबर आणि हातपाय तोडले.तसाच प्रकार आरोपीसोबत करुन त्यांचीही जीभ आणि कंबरडे तोडायला हवे.हातपाय तोडायला हवे.किंवा फक्त एक हात शाबूत ठेवून त्याला भीक मागायला सोडायला हवं.
बलात्कार पीडीतांच्या बाबतीत सांगतांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,ती म्हणजे की काही लोकं फाशी द्या म्हणतात.पण फाशी हा त्यावरील उपाय नाही.लोकं मरणाला आता घाबरत नाहीत.लोकं निर्भीडपणे आत्महत्या करतात.त्यामुळं फाशी देणं म्हणजे आरोपीला त्रासातून मुक्त करणे होय.त्याला जगवावं.जेणेकरुन त्याला पश्चाताप व्हावा आपल्या सुदृढ शरीराचा.त्यालाही आठवायला हवं की मी जर असं केलं नसतं,तर माझे असे हातपाय तुटले नसते.मला असं लुळं पांगळं बनवलं गेलं नसतं.हाच बोध इतरांनाही देता येईल.बलत्काराच्या घटना कमी करण्यासाठी.
काही लोकं म्हणतात की महिलांनी असं वागावं.तसं वागावं.महिला अशा वागतात,तशा वागतात.म्हणून असं होतं.पण तसं काही नाही.ही मानसिकता आहे.कुविचाराची मानसिकता.जेव्हा असे कुविचार डोक्यात येतात.तेव्हा आपण काय करीत आहो याचं भान नसतं.त्यानंतर आपलं काय होणार आहे.काय होवू शकतं.याचाही विचार कोणीच कृत्य करण्यापुर्वी करीत नाहीत.मग कृत्य झालं की त्यानंतर पश्चाताप येतो.तेवढीच भीतीही वाटते.वाटते की आपला हा गुन्हा उजागर झाला तर.......आपल्याला शिक्षा होईल.याच भीतीनं मग हातपाय तोडणे,जीभ छाटणे,बाह्य तसेच आंतर अवयवांना इजा पोहचविणे तसेच कंबरडे मोडणे इत्यादी गोष्टी केल्या जातात.कधी कधी ठारही केले जाते.
पुर्वीचा काळ बरा होता की बालविवाह होत.अशा बलत्काराच्या घटना कमी होत्या.कारण पुरुष आपली वासना आपल्या संगीनीसोबत पुर्ण करीत.परंतू ही बालविवाह प्रथा कुप्रथा ठरली.कारण तारुण्य येण्यापुर्वीच कौमार्याच्या काळात मुलींचे विवाह झाल्याने मुलींना अत्यंत मोठ्या वेदनादायी समस्यांना सामोरे जावे लागायचे.त्यातच मुली कोवळ्या नाबालिग असायच्या.तर विवाह करणारा वर अतिशय वयस्क.तो एवढा वयस्क की तो तिचा बापच शोभायचा.साहजिकच ही प्रथा कुप्रथा ठरुन बंद झाली.त्याचबरोबर विवाहाचे वय वाढविण्यात आले व जसे विवाहाचे वय वाढले.तशा या घटनात वाढ झाली.सामुहीक बलत्काराचे प्रमाण वाढायला लागले.त्याचबरोबर त्या प्रकरणातून आरोपींना जबर शिक्षा,जशास तशा शिक्षा न झाल्यानं आरोपींचे अभय झाले.त्यांची डेरींग वाढली.
दिवसेंदिवस अशी बलत्काराची वाढती संख्या व वाढता आलेख लक्षात घेता त्या जुन्या बालविवाह प्रथा परत आणाव्या का? असा प्रश्न पडतो.कारण त्यावेळी घटना कमी होत्या.परंतू त्याही तर कुप्रथाच होत्या ना.मग कशा आणाव्या? हाही प्रश्न पडतो.या अशा घटना रोखायच्या कशा? हाही प्रश्न पडतो.कारण कोणत्या घटना कुठे आणि केव्हा घडतील हे सांगून येत नाहीत.मात्र त्यानंतर सर्व उपाययोजना करता येतात.जसे फास्टट्रँक न्यायालयात खटला चालवणे.पण यातही आरोपी सुटतात.कारण ते तसा वकील आपले मत मांडण्यासाठी करतात.हा वकील बलात्कार पीडीता तर गेली.तिचे साक्षीदारही गेले.पुरावेही बरोबर नाहीत.तेव्हा पुराव्याअभावी तो खटला खारीज करतो न्यायालयातून.तो आरोपी बा इज्जत बरी होतो.मग काय? आरोपी बा इज्जत बरी झाला की तो पुढील गुन्हे करायला मोकळे होतो.त्यातच इतरही लोकांची हिंमत वाढते.त्यांनाही वाटते की यांनाच तर काही झालं नाही.मग आम्हालाच काय होणार! अशाप्रकारे बाकी बलत्कारांची प्रकरण घडतात नव्हे तर वाढतात.
महिलांनी असं वागावं,तसं वागावं असं काहीजण म्हणतात.(लिपस्टिक लावू नये.मेकअप करु नये) पण महिला कितीही चांगल्या वागल्या तरी पुरुषांच्या या भुंकपासारख्या वासनांध वृत्तीला रोखता येत नाही.भुकंप जेव्हा सांगून येत नाही.तशा या वृत्त्याही सांगून कोणी करीत नाही.तेव्हा यावर एकच उपाय आहे की मुलींना शस्र वापरण्याची सरकारनं परवानगी द्यावी.जेणेकरुन त्या एखाद्या तरी नराधमाचे लचके नक्कीच तोडतील.असे लचके जेव्हापर्यंत तोडले जाणार नाही.तेव्हापर्यंत तरी ह्या बलत्काराच्या संख्येत घट होणार नाही.तसेच देशातील बलत्कारं बंद होणार नाही.पण तेव्हापर्यंत तरी मुलींनी स्वतः सांभाळून राहावं.काळजी घ्यावी.कारण आता नराधमं पिसाळले आहेत.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०