गुप्तधन नको गं बाई Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुप्तधन नको गं बाई

गुप्तधन ; नको गं बाई

आज जसजसा तंत्राच्या शोध लागत आहे. तसंतसं जग विज्ञानयुगाकडे वाटचाल करीत आहेत. त्यातच गुप्तधन प्राप्त होणं वा ते करणं या भ्रामक कल्पना. तरीही बरेच लोकं आजही गुप्त धनाच्या मागं लागतात व आपला संसार उध्वस्त करुन बसतात.
कजली हा असाच प्रकार आहे. गुप्तधन काढण्याचा. या प्रकारानुसार तांत्रिक लोकं जमिनीच्या खोलवर भागातून तंत्र आणि मंत्राच्या सहाय्यानं गुप्त धन बोलावत असतात आणि त्याला बाहेर काढून मालामाल होत असतात. म्हणतात की हे धन मिळतं परंतू त्यासाठी साधकानं त्या धन काढण्याच्या जागेवर काहीतरी नरबळी अवश्य द्यावा. कोणी कोंबड्या बक-याचा बळी द्यावा असंही सांगतात.
गुप्तधन मिळवणं ही भ्रामक कल्पना असली तरी आजही जे बरेच लोकं त्या पाठीमागं लागलेले आहेत. ते लोकं ते धन मिळत अगर न मिळो. परंतू त्यासाठी नरबळी द्यावा लागतो असा विचार करुन तू नरबळी शोधतात. मग या नरबळीत निवड करायची झाल्यास रस्त्यारस्त्यावरील निवास करणारी वेडी माणसं, वेड्या स्रिया की ज्यांचा कुणीच वाली नाही वा ज्याचं अपहरण केल्यास आपण सापडणार नाही. तसंच ती वेडी असल्यानं त्यांचं कोणी अपहरण केलं. ते त्याला सांगता येणार नाही. तसंच खेळणारी घरादारातील लहान मुलं की ज्यांचे वयोमान जास्त नाही वा ज्याला आपला पत्ता नीट सांगता येत नाही. कारण या नरबळी देणा-यांना माहीत असतं की प्रसंगी एखाद्या वेळी न पडणारी धाड पडलीच आणि आपण जर पळून जाण्यात यशस्वी झालोच तर हे वेडे किंवा ही लहान मुलं आपलं नाव व पत्ता नीट सांगू शकणार नाहीत व आपण सिताफीनं सुटू शकू. यासाठीच तो प्रयत्न असतो त्यांचा.
गुप्तधनासाठी समजा नरबळी दिलाच तर धन मिळते काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. तरीही शेकडो लोकं आजही त्यामागं लागलेले आहेत व तांत्रिकाच्या नादाला लागून रात्री अपरात्री गुप्तधनासाठी फे-या लावत आहेत. कधीकाळी एखादी टोळी रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात सापडलीच तर ते पोलीसवाले त्यांना पकडून तुरुंगात टाकतात. परंतू असं त्यांना तुरुंगात टाकणं हा त्याचेवरील उपाय नाही. कारण ते काही काळानंतर आरोप सिद्ध न झाल्यानं सुटतात.
महत्वाचं सांगायचं म्हणजे ते सुटणारच. कारण ती वेडी माणसं आणि ती लहानगी मुलं त्यांना तरी कशी ओळखणार? ती ओळखूच शकत नाहीत. तसं लहान मुलांचं वय लहान असतं आणि वेडी ती वेडीच. शिवाय त्यांनी जर ओळखलंच तर त्यांना निर्घुणपणे न्यायालयाच्या बाहेर मारण्याचीही व्यवस्था करतात हे लोकं. पुराव्यात समजा साक्षीदार बोललेच तर,त्यांनाही संपवून टाकण्याची धमकी. मग कोण बोलणार? हा प्रश्न आहे.
विशेष सांगायचं म्हणजे समाजात अशा घटना वाढत आहेत. अपहरणाचीही प्रकरणं वाढली आहेत. गुप्तधनच मिळविण्यासाठी नाही तर इतरही अनेक कारणानं. कळायला मार्ग सापडत नाही. तसंच गुप्तधन मिळत जरी नसलं तरी गुप्तधनाच्या मागं फिरणा-यांची संख्याही वाढत आहे. यात एका ठिकाणी ऐकलंय की एका व्यक्तीनं त्याच्या घरातच गुप्त धन मिळवलंय. ते त्या गुप्तधनाच्या जागेवर दारु टाकून. म्हणतात की त्या माणसाला दररोज दारु पिण्याचा छंद होता. तो दारु प्यायचा व त्या दारुतील दोन थेंब त्या जागेवर टाकायचा. कधी कधी कपभर दारु ओतायचा त्या जागेवर. अशातच ती गुप्तधनाची देवता प्रसन्न झाली व तिनं त्याला भरभरून धन दिलं.
गुप्तधनाचा हा प्रकार निरक्षर, तसेच आदिवासी व अस्पृश्य समाजात जास्त होता. कुटूंबच्या कुटूंब हा प्रकार जाणत होते. आता इतरही समाजात याचे लोण पसरत असून तेही यात लिप्त होत आहेत. अलीकडे विज्ञानानं एवढे शोध लावले तरी त्या शोधावर त्यांचा विश्वास नाही. घरी कामधाम करुन मेहनतीनं पैसा कमविण्याऐवजी काही मंडळी निव्वळ गुप्तधनाच्या नावानं व्यापार करीत आहेत.
महत्वाचं म्हणजे गुप्तधन मिळत नाही. ती आपली एक भ्रामक कल्पना आहे. या कल्पनेचा मोरक्या असलेला तांत्रिक हा गुप्तधन मिळवून देण्याची आस प्रत्येक जनमाणसात निर्माण करतो. ती आस तो दाखवतो. म्हणूनच आपण त्यांच्या मागं लागतो ना. आपल्यातही ती आस निर्माण होते. कारण आपल्याला त्या माध्यमातून लाखो रुपये कमवायचे असतात. मग हळूच तांत्रिक एक पिल्लू बाहेर काढतो पैसे लुबाडण्याचं. तो सतत सांत्वन देत असतो की लाखो रुपये तुला मिळणार आहेत. परंतू तू आता खर्च करशील तर........त्यातच साधक त्याचेवर विश्वास ठेवून तो पैसा लुटलूट लुटत असतो. ज्या पैशाचं मोजमाप नसतं.
विशेष सांगायचं म्हणजे असं गुप्तधन कधीच मिळत नाही. आजच्या विज्ञानयुगात तरी नाही. ती एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळं त्यावर आपण विश्वास ठेवू नये आणि त्यावर विश्वास ठेवून आपला संसारही उध्वस्त करु नये. कारण यामागे फिरतांना काही काही लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत हे तेवढंच सत्य आहे. तसंच आज ज्या घरात महिला या गुप्तधनाच्या पाठीमागं लागतात. त्या बाईचे पती गुप्तधन नाकारतात आणि ज्या बाईचे पती अशा गुप्तधनाच्या पाठीमागं लागतात, त्या महिला गुप्तधन नको गं बाई म्हटल्याशिवाय राहात नाहीत हेही तेवढंच सत्य आहे यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०