परीचारीकेचा संघर्ष Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परीचारीकेचा संघर्ष

परिचारीकेचा संघर्ष
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०(संस्कार) नागपुर
आपली प्रकृती बिघडली की आपल्याला दवाखान्याची आठवण येते.त्यामुळे उपचार करण्यासाठी लगेच आपण दवाखान्यात जातो आणि उपचार करुन घेतो.आपल्याला आराम लागल्यास आपण सुटी घेतो.
आपण आपल्याला आराम लागल्यास सुटी घेतो.हे जर बरोबर मानले आणि कोणी विचारले की कोणामुळे आराम लागला तर चक्क आपण डाँक्टरचं नाव सांगत त्या सर्व आजाराचं संपुर्ण श्रेय डाँक्टरला देतो.पण आपण बरे व्हावे यासाठी जी व्यक्ती धावपळ करते,त्या व्यक्तीला आपण विसरुनच जातो.ती व्यक्ती म्हणजे परीचारीका.
आपण बरे व्हावे म्हणुन ही परीचारीका खुप धावपळ करते.ती डाँक्टरांचे आदेश पाळत असते.आपल्याला सलाईन लावणे.सुई लावणे हे तिचं काम असतं.त्यातच रोग्यांचं अंथरुण पांघरुण करुन देणं तसेच त्याच्या आरोग्याची काळजी घेणं हे असतं तिचं काम.कधीकधी डाँक्टर मंडळी एक प्रकारचा आळसपणा दाखवतात.पण ही परीचारीका आळस कधीच करीत नाही.डाँक्टर राऊंडवर आलाच तर ती लगबगीनं त्याच्या पुढे तयार होते आणि त्याला मदत करीत असते.
परीचारीका ही रुग्न आणि डाँक्टर ह्यामधील दुवा असते.रुग्नांना ती प्रसंगी बँन्डेजही बांधुन देते.नव्हे तर जखम साफ करण्यासारख्या गोष्टी औषध लावण्यासारख्या गोष्टी तीच सांभाळते.एवढेच नाही तर डाँक्टरांच्या म्हणण्यानुसार कोणती औषधी रुग्नांना केव्हा द्यायची ह्या गोष्टीही तीच सांभाळत असते.तरीही तिचे थोडेसे जरी चुकले तरी आपण तिलाच दोष देत चक्क तिच्या भावनांचा गळा घोटत असतो.तिला दुषणे देत असतो.डाँक्टरांना मात्र काहीच बोलत नाही.
परीचारीकेच्या कामाची वाटणी सरकारी रुग्नालयात तिच्या आयुष्याला साजेशी ठेवलेली नाही.तिच्या दर दिवसाला दिवट्या बदलत असतात.कधी सकाळी आठ ते दोन तर कधी दोन ते आठ तर कधी सायंकाळी आठ ते सकाळी आठ.यातच तिच्या खाण्याच्या वेळा चुकतात.झोपेच्या वेळाही चुकतात.याचा परीणाम तिच्या स्वास्थावर होतात.ती आजारीही पडत असते.पण तरीही तिला सुटी मिळत नाही.सुटीसाठी तिला आठ दिवसापुर्वी पासुनच सुचना द्यावी लागतात.अकस्मात सुटीच्या वेळी मात्र तिची तारांबळ उडते.
मला माझ्या आयुष्यात काही परीचारीकेंनी केलेलं कार्य नक्कीच आठवतं.ते सरकारी रुग्नालय.माझी मुलगी जन्मतःच आजारी.या रुग्नालयात भर्ती होती.मुलगी लहान असतांना तिला सलाईन लागत नव्हती.तशी ती सलाईनवरच जीवंत होती.कारण ती पंधराच दिवसाची असल्यानं काही खावु शकत नव्हती.दुधही पाजायला डाँक्टरांनी मनाई केली होती.त्याचं कारण काय होतं ते मला माहीत नाही.स्नायुतून लावता येणारी सलाईन अगदी पंधरा दिवसाची असल्यानं स्नायु मोकळे झाले नव्हते.त्यामुळं लागलेल्या सलाईन ब्लाक होणं सुरु होतं.पण स्नायु मोकळे न झाल्याने व ते दिसत नसल्याने सलाईन आज दोन दिवसापासुन बंद होती. डाँक्टरही हारले होते स्नायु शोधण्यात..... आम्ही मात्र चिंतेत होतो.आता आपली मुलगी वाचणार नाही.ती जाणार हे गृहीत धरुन सामान भरुन एका कोप-यात बसलो होतो.पावसामुळं चिमणीचं घरटं वाहुन गेल्यावर चिमणीची जी अवस्था होते.ती अवस्था आमची झालेली होती.कारण दोन दिवसापासुन अन्न पाणी त्या पंधरा दिवसाच्या मुलीच्या पोटात नव्हतं.
आम्ही निराश बसलो होतो.हे सगळं त्या दवाखान्यातील परीचारीकाही पाहात होत्या.त्यातच एक परीचारीका आमच्याजवळ येत म्हणाली,
"का बरं निराश बसले आहात?"
रडकुंडीचा चेहरा करीत मी म्हटलं,
"सिस्टर,आमची मुलगी जाणार आम्हाला सोडुन.दोन दिवसापासुन तिला सलाईन न लागल्यानं तिच्या पोटात पाणी आणि अन्नही गेलं नाही."
"बरं काळजी करु नका.मी बघते प्रयत्न करुन.पण एक अट आहे.ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही."ती म्हणाली.
मी न सांगण्याचं आश्वासन दिलं.तिनं त्यानंतर सीरींजची सुई आणली व प्रयत्न केला.पहिल्या प्रयत्नात काही तिला जमलं नाही.सुई खराब झाली.तशी ती म्हणाली,
"मी आता शेवटचा प्रयत्न करते."
तिनं पुन्हा सुई घेतली.पुन्हा प्रयत्न केला.तिला यश आलं.जे काम दोन दिवसापासुन डाँक्टर करीत होते.ते त्यांना जमलंही नव्हतं.ते काम या परीचारीकेला जमलं.ती देवदुतासारखी आमच्या आयुष्यात आली होती.
मुलगी दहा वर्षाची झाली होती.आमचा एक नातेवाईक भर्ती असल्यानं त्याला भेटायला गेलो.तेव्हा माझ्या पत्नीनं सांगितलं,
"आपल्या मुलीच्या वेळी जी परीचारीका कामात आली.ती बाजुच्या वार्डात आहे"
मी आवर्जुन भेटायला गेलो.तिला परीचय सांगितला व तिच्या पायावर नतमस्तक झालो.तिलाही भरभरुन आलं.कारण ती तिनं केलेल्या कामाची तिला मिळालेली पावती होती.
परीचारीका खुप काम करतात.तरीही एखाद्या वेळी एखाद्या परीतारीकेला काही वेळेवर काम आलंच तर ऐनवेळी आढेवेढे न घेता ओव्हरटाईमही करतात.त्यांनाही थकवा येतोच.कारण त्या सतत उभ्या राहुनच कार्य करीत असतात.त्या कितीही थकल्या असल्या तरीपण थकवा जाणवु न देता आपल्याला मदत करीत असतात.द्वेष हा शब्द त्यांच्या जीवनाच्या शब्दभांडारातच नसावा असंही कधीकधी वाटतं.
माझी साळीही अशीच परीचारीका आहे.माझ्या मुलीला जेव्हा जन्मतः प्राब्लेम उद्भभवला.तेव्हा तिही कामात आली होती.सकाळची दिवटी करुन थकलेली असतांनाही थकवा जाणवु न देता,तिनं माझ्या पत्नीच्या गरोदर पणात मदत केली होती.शिवाय रात्री जेव्हा मला मुलीचा प्राब्लेम माहीत झाला.तेव्हा तिच्या डोळ्यात झोप असतांना ती रात्रभर माझ्या मुलीसाठी जागली होती.
परीचारीकेच्या आपण भावना समजुन घ्याव्यात.तिला दोष देवु नये.तुमचं जसं चुकतं.तिचंही थोडफार चुकतं.खरं तर ती मानसिकता आपली असावी.
ह्या परीचारीका आपल्यासाठी मोलाचं कार्य करतात.तरीपण ब-यापैकी परीचारीका सुखी दिसत नाही.काहींना पतीचा महाभयंकर त्रास असतो.काहींना आजाराचा महाभयंकर त्रासच असतो.ब-याचशा परीचारीकेचे पती व्यसनाधीन तर असतात.पण अल्पशिक्षीतही असतात.शिवाय ते काहीच काम करीत नसतात.एव्हांना आपल्या दारुच्या शौकासाठी पत्नीला पैसे मागत असतात.नाही दिल्यास मारत असतात.तरीही या परीचारीका सगळं सहन करतात.कारण त्यांच्याही भावना रुग्नालयातील वेगवेगळे रोगी पाहुन मेलेल्याच असतात.
एक दिवस माझ्या पत्नीलाही भर्ती करण्याचा योग आला.हे मात्र खाजगी रुग्नालय.चांगली सेवा करतात.कारण त्याचे पाहिजे तेवढे पैसे मिळतात रूग्नालयाला.त्यातच ती आजारी असतांना एका नवीन परीचारीकेनं माझ्या हातात चिठ्ठी देवुन 'रक्त तपासणीला न्या' असे म्हटले.मला तिची भाषा न समजल्याने मी माझ्या पत्नीला पायाने चालवत चालवत रक्त तपासणी पेढीकडे घेवुन गेलो.पण पेशंटला पायी आलेलं पाहुन ती रक्ततपासणी पेढीवाली अधिकारी मैडम जाम भडकली.तिनं फोन लावला.म्हणाली,"कोणी पाठवलंय."
ज्या परीचारीकेनं माझ्या हातात ती चिठ्ठी दिली होती.ती लगेच खाली आली.ती फार घाबरली होती.खरं तर तिच्याकडुन थोडीशी चुक झाली होती.पण अधिकारी वर्ग तिला फार दमदाटी करीत होता.अशातच नोकरी जायचीही भीती असते.ती नवीन असल्यानं तिलाही काही समजलं नाही व मीही नवीनच असल्यानं मलाही काही समजण्या पलिकडचं.चुक तिची जरी असली तरी मी ठरवलं तिला वाचवायचं.तिला काही होवु द्यायचं नाही.कारण आपण रुग्नालयात एकच दिवस येणार.तिला दररोज काम करायचं आहे.
मी त्या अधिकारी वर्गाकडे गेलो.माझी स्वतःचीच चुक असल्याचं कबुल केलं.मी खोटे बोलत होतो.याचं भान होतं मला.पण ते खोटं माझ्यासाठी नव्हतं तर त्यामधुन कोणाच्या तरी मनातली भीती दूर होणार होती.त्यात मला आनंद होता.
अधिकारी मैडमने मलाच झापलं.मी सगळं निमुटपणे सहन केलं.जिनं चिठ्ठी दिली.तिलाही माझ्या कृत्याबद्दल रागच आला असेल.तिला वाचविल्याबद्दल तिला काहीच वाटलं नसेल असंही वाटलं.कारण ती त्यादिवशी दिवसभर आमच्या रुममध्ये भटकली नाही.पण मी केलेल्या कार्याचा मला आनंद होता.कारण मी एका परीचारीकेला तिच्या मनातील भीतीतुन बाहेर काढलं होतं.
परीचारीका खुप चांगल्या स्वभावाच्या असतात.पण त्या सतत चिडचिड करतांना दिसतात आपल्याला.कारण मुळात त्यांना घरी दारी,त्या जिथे जातील तिथे लोकं छळत असतात.त्यांच्याकडे वासनेच्या दृष्टिकोणातुन पाहात असतात.पदोपदी त्यांना त्रासच देत असतात इथली मंडळी.त्यांना व्यवस्थीत जगु देत नाहीत.म्हणुन त्या चिडचिड करतात.दुसरी गोष्ट म्हणजे कामाचा ताण व पुरेशी झोपही न झाल्याने त्या चिडचिड तर करणारच.पण आपण त्यांना समजुनच घेत नाही.
आपण परीचारीका का असेना जशी डाँक्टरची इज्जत करतो तशी परीचारीकेचीही इज्जत करा.खरं तर तिच्यामुळचं तुमचे प्राण वाचतात.आपरेशन करतेवेळी इत्यंभुत माहीती असलेली परीचारीका डाँक्टरजवळ असते.समजा एक क्षणभर जर तिनं आपरेशनचं साहित्य दिलं नाही तर तुमचा जीवही जावु शकतो.हे विसरु नका.त्या आहेत म्हणुन आपण आहोत हेही विसरता कामा नये.
आपल्याला मदत करणारा घटक म्हणुन राबणा-या या घटकाचा अरूणा शानबाग करु नका.तुम्ही त्यांना सिस्टर म्हणता ना.मग तिच्याशी वागतांनाही सिस्टरसारखंच वागा.तिच्याही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा.तेव्हाच तिला न्याय मिळेल व तिच्या जीवनाचं आणि जगण्याचं सार्थक होईल यात काही दुमत नाही.तसं पाहता तुम्ही त्यांचेहा त्रुणकर्ते आहात.कारण डाँक्टर जर तुमचे प्राण वाचवत असेल,तरीही तुमचे प्राण वाचविण्यात तिचाही सिंहाचा वाटा आहे हे विसरु नका.