किमयागार - 36 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 36

पांचूची गोळी -
किमयागार म्हणाला, 'कृती' हा एकचं शिकण्याचा मार्ग आहे.
तुला तुझ्या प्रवासात पाहिजे होते तेव्हढे ज्ञान मिळाले आहे, तुला आता फक्त एकच गोष्ट शिकायची बाकी आहे.
तरुणाला वाटले किमयागार ती गोष्ट सांगेल पण तो आकाशाकडे, ससाणा येतोय का ते पाहत होता.
तरुणाने विचारले' तुम्हाला किमयागार का म्हणतात?.
कारण "मी किमयागार आहे " किमयागार म्हणाला.
आणि इतर जे लोक सोने बनवण्याचा प्रयत्न करत होते ते अयशस्वी का ठरले ? तरुणाने विचारले.
कारण ते फक्त खजिन्याच्या शोधात होते स्वतःच्या नियतीच्या शोधात जगत नव्हते.
तरूणाने विचारले, मला आणखी काय ज्ञान आवश्यक आहे?.
पण किमयागार अजूनही आकाशाकडे बघत होता. बहिरी ससाणा भक्ष्य घेऊन आला. किमयागाराने एक खड्डा खोदला व त्यात आग पेटवली. प्रकाश बाहेर दिसू नये म्हणून खड्डा खोदला होता.
तो जेवण तयार करीत असताना म्हणाला, मी माझ्या आजोबांकडून हे शास्त्र शिकलो.
त्यांनी त्यांच्या आजोबांकडून हे ज्ञान घेतले होते असे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे.
त्या काळात हे ज्ञान पाचूच्या गोळीवर लिहिले जायचे, पण नंतर माणसांनी त्यांचा अभ्यास, निष्कर्ष लिहून ठेवणे बंद केले आणि आपल्याला इतरांपेक्षा चांगले ज्ञान आहे असे त्यांना वाटू लागले. पण पाचूची गोळी अजूनही अस्तित्वात आहे.
तरूणाने विचारले, पाचूच्या गोळीवर काय लिहिले आहे?.
किमयागाराने वाळूवर चित्र काढायला सुरुवात केली आणि पाच मिनिटांत ते पुर्ण झाले. तरुणाला चित्र काढणे चालू असताना म्हाताऱ्या राजाने वाळूवर लिहिले होते ते आठवले.
किमयागार म्हणाला हे पहा , तरुणाने वाचायचा प्रयत्न केला आणि म्हणाला ही सांकेतिक भाषा आहे अशीच भाषा मी इंग्रजाकडील पुस्तकात पाहिली आहे.
किमयागार म्हणाला, हे आकाशात विहरणाऱ्या दोन बहिरी ससाण्यांप्रमाणे आहे ते फक्त तर्काने कळत नाही.‌
पाचूची गोळी जगद्आत्म्याकडे जाणारा मार्ग आहे. हुशार माणसांना कळते की हे जग एका नंदनवनाचे प्रतिबिंब आहे. या जगाचे अस्तित्व हे केवळ एक परिपूर्ण जग अस्तित्वात आहे म्हणून आहे.
परमेश्वराने हे जग निर्माण केले कारण त्यात दिसणाऱ्या गोष्टी पासून मानव आध्यात्मिक आणि सर्वश्रेष्ठ असे ज्ञान मिळवेल आणि तेही
" कृति " करून.

मला पाचूची गोळी समजून घ्यावी लागेल का तरुण म्हणाला.
तू रसशास्त्राच्या प्रयोगशाळेत होतास पण आता वेळ आली आहे की तू पाचूची गोळी समजण्याच्या योग्य मार्गाचा अभ्यास करावास.
तू वाळवंटात आहेस, तू स्वतःला त्यात झोकून दे, त्यात मिसळून जा (तादात्म्य साध).
वाळवंट तुला जगाला समजण्याचे ज्ञान देईल, आणि पृथ्वी वरील कोणतीही गोष्ट हे करू शकते. तुला वाळवंट समजून घेण्याची पण गरज नाही, तर वाळूच्या कणाला जरी समजू शकलास तरी तुला सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे काय ते कळेल.
मी वाळवंटाशी कसे तादात्म्य साधू शकतो? तरुणाने विचारले. ह्रदयाचे ऐक, त्याला सगळे समजते कारण ते जगद्आत्म्याकडून आलेले आहे आणि तू एक दिवस ते साधशिल.
किमयागार - ह्रदय -
नंतरचे दोन दिवस ते न बोलता
प्रवास करत होते. किमयागार खूपच सावधगिरीने वागत होता कारण ते प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रात पोचले होते. तरूण ह्रदयाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता.
त्याचे हृदय त्याला नेहमीच काही सांगत असे पण आता ते‌ शांत होते. असे कितीतरी वेळा होत असे की ह्रदय त्याला आपले दुःख सांगत असे, आणि काही सूर्योदयाच्या वेळी तो इतके भावनिक होत असे की त्याला आपले अश्रु लपवता येत नसतं.
ते तरुणाशी‌ खजिन्याबद्दल बोलत असे तेव्हा ते जोराने धडकत असे आणि तरुण जेव्हा वाळवंटातील दूरवर क्षितिजाकडे पाहत असे तेव्हा ते खुप हळू धडकत असे.
ते एका ठिकाणी थांबले तीथे तरुणाने विचारले ह्रदयाचे ऐकणे जरुरीचे आहे का?.
किमयागार म्हणाला हो कारण ते जिथं असेल तिथे तुला खजिना सापडेल.

माझे ह्रदय कासावीस झालेले असते. त्याला त्याची स्वप्ने आहेत, ते भावनिक होते वाळवंटातील स्रीविषयी ते अधिक भावनिक होते. ते मला कित्येक रात्री झोपू देत नाही कारण माझ्या मनात तिचे विचार असतात.
वा ! म्हणजे तुझे हृदय जागृत आहे. ते काय म्हणते ऐकत राहा.